जावई: तुम्ही नाही गेल्या तिच्यासोबत?
सासू: नाही, ऊन होतं म्हणून टाळलं.
जावई: बरं झालं, मलाही तुमच्याशीच बोलायचं होतं.
सासू: काय बोलायचं होतं?
जावई: आधी तर तुमच्या पाया पडतो.
सासू: अहो, पाया नका पडू जावईबापू...
जावई: का बरं?
सासू: आज अचानक का?
जावई: अहो, मला साक्षात्कार झालाय.
सासू: कसला साक्षात्कार?
जावई: तुमच्या ज्ञानाचा...
सासू: म्हणजे?
जावई: तुम्ही कितीवीपर्यंत शिकल्या आहात?
सासू: दहावी.
जावई: बघा तरीही तुम्हाला...
सासू: काय मला?
जावई: तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा अहंकार नाही.
सासू: नाही समजलं.
जावई: अहो सासूबाई, तुमच्यात एक डॉक्टर, इंजिनिअर, काउन्सलर आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट दडलेला आहे.
सासू: काहीही...
जावई: अहो, खरंच...
सासू: मला तर काही समजेना.
जावई: सविस्तर सांगतो.
सासू: सांगाच.
जावई: त्यापूर्वी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
सासू: विचारा...
जावई: तुम्हाला एकूण मुलं किती?
सासू: तुम्हाला ठाऊक नाहीत?
जावई: मला तुमच्याकडून उत्तर ऐकायचं आहे.
सासू: दोन मुली आणि एक मुलगा.
जावई: तुमच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत?
सासू: हो.
जावई: आणि मुलाचं?
सासू: पुढच्यावर्षी करणार आहोत.
जावई: आमच्या लग्नाला किती वर्षे झाली?
सासू: ३ वर्षे.
जावई: सर्व अगदी व्यवस्थित लक्षात आहे तुमच्या...
सासू: स्मरणशक्ती अगदी चांगली माझी.
जावई: तुम्ही दिवसभरात तुमच्या मुलींशी कितीवेळा बोलता?
सासू: सकाळी एखादा आणि संध्याकाळी एखादा कॉल...
जावई: किती वेळ?
सासू: असं का विचारताय?
जावई: अहो, सहजच...
सासू: सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी एखादा तास...
जावई: कशाबद्दल बोलणं होतं?
सासू: म्हणजे?
जावई: म्हणजे विषय काय असतात?
सासू: जनरल गप्पा असतात.
जावई: नक्की?
सासू: हो.
जावई: मला तर तसं वाटत नाहीये.
सासू: का बरं?
जावई: कारण मला तर वेगळंच काहीतरी ऐकायला मिळालंय.
सासू: काय?
जावई: तुम्ही माझ्या बायकोला बरेच सल्ले देत असता.
सासू: आई मुलीच्या चांगल्यासाठी...
जावई: चांगल्यासाठी की वाईटासाठी?
सासू: मी कशाला माझ्याच मुलीचं वाईट?
जावई: वेगळं रहाण्याचा सल्ला?
सासू: तिचं तुमच्या आईशी पटत नसल्याने...
जावई: हाच सल्ला तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीलाही दिलेला?
सासू: आजकाल सासू-सुनेचं नाही पटत.
जावई: त्याला कारण काय असेल?
सासू: बरीच कारणं आहेत.
जावई: आईचा चुकीचा सल्लाही कारणीभूत असू शकतो?
सासू: आई स्वतःच्या मुलीला चुकीचा सल्ला देऊच शकत नाही.
जावई: २ वर्षांपूर्वी मला संशय आलेला.
सासू: कसला?
जावई: की कुणीतरी माझ्या बायकोचा ब्रेनवॉश करतंय.
सासू: ब्रेनवॉश म्हणजे?
जावई: म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर, मतांवर किंवा निर्णयक्षमतेवर सतत प्रभाव टाकून तिची विचारसरणी बदलणे
सासू: कोण करत होतं?
जावई: मलाही तोच प्रश्न पडलेला.
सासू: कुटुंबातील कुणीतरी असेल.
जावई: इकडे तर ती कुणाशीही बोलत नव्हती.
सासू: मग?
जावई: हो, मोबाईलवर मात्र ती तासनतास गप्पा मारायची.
सासू: कुणाशी?
जावई: तेच जाणून घेण्यासाठी नाईलाजाने...
सासू: काय?
जावई: मी तिच्या मोबाईलमध्ये स्पाय रेकॉर्डींग ॲप इंस्टॉल केलं.
सासू: कशासाठी?
जावई: तुमच्या मुलीचं ब्रेनवॉशिंग करणाऱ्या व्यक्तीचं नाव जाणून घेण्यासाठी...
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
सासू: तिला ठाऊक होतं?
जावई: नाही.
सासू: का नाही सांगितलं?
जावई: कारण तिच्याकडे चौकशी केल्यानंतरही तिने माझ्याच कुटुंबाला दोष दिलेला.
सासू: तुमच्या आईचा स्वभाव...
जावई: लग्न झाल्यापासूनच ती आईशी तात्पुरतं बोलते.
सासू: हो, सुरुवातीला वाद झालेले ना...
जावई: म्हणून काय?
सासू: म्हणून कामापुरतं बोलण्याचा सल्ला मीच दिलेला.
जावई: तुम्ही रिलेशनशिप काउन्सेलर आहात?
सासू: म्हणजे?
जावई: नातेसंबंधांबाबत मार्गदर्शन करणारी व्यक्ती...
सासू: नाही.
जावई: मग तुमच्या मुलीला थेट सल्ला कसा दिला?
सासू: माझ्या आयुष्याच्या अनुभवांवर...
जावई: जर नात्यात संवादच नसेल तर गैरसमज दूर होतील?
सासू: मला वाटलं तसं...
जावई: तुमचं वाटणं दरवेळी योग्यच असू शकतं?
सासू: नाही.
जावई: मागील ३ वर्षात ती आमच्या एकाही कौटुंबिक चर्चेत सहभागी झालेली नाही.
सासू: घाबरत असेल.
जावई: मागील ६ महिन्यांत तर तिचा वावर अगदी एखाद्या पेइंग गेस्टसारखा झालाय.
सासू: मला नव्हतं ठाऊक.
जावई: लग्नानंतर २ वर्षे मुलबाळ नको, हा सल्ला कुणाचा?
सासू: मला नाही माहीत.
जावई: तुम्हाला नसेल ठाऊक, मात्र मला माहित आहे.
सासू: कुणी दिलेला सल्ला?
जावई: तुमच्या मोठ्या मुलीने...
सासू: शक्यच नाही.
जावई: रेकॉर्डिंग प्ले करतो, तुम्ही आवाज ओळखा...
सासू: हो, आवाज तर तिचाच आहे.
जावई: आमच्या कुटुंबातील मुलाबाळांच्या जन्माचा निर्णयही तुम्ही घेणार?
सासू: तसं नाहीये जावईबापू...
जावई: मागच्यावर्षी आम्हाला नवा रिफ्रिजरेटर घ्यायचा होता.
सासू: त्याचं काय मग?
जावई: माझ्या आईने व्हर्लपूल कंपनीचं मॉडेल बुक केलेलं.
सासू: मग?
जावई: त्यानंतर तुमच्या मुलीने तुम्हाला कॉल केलेला.
सासू: हो, आठवतंय...
जावई: तेव्हा तुम्ही तिला सॅमसंग कंपनीचा फ्रिज घेण्याचा सल्ला दिला.
सासू: हो, कारण आम्ही मागील १० वर्षांपासून त्याच कंपनीचा वापरतोय.
जावई: त्यानंतर तुमच्या मुलीने सॅमसंग कंपनीचा फ्रिज घेण्याचा हट्ट सुरू केला.
सासू: केला असेल...
जावई: वाद टाळण्यासाठी शेवटी माझ्या आईने माघार घेतली.
सासू: त्याचं काय मग?
जावई: आमच्या घरातील फ्रिजही तुमच्या सल्ल्याने?
सासू: चांगल्याच भावनेने...
जावई: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी नवीन ब्रांचची सुरुवात करणार होतो.
सासू: मागच्यावर्षी ना?
जावई: त्यावेळीही तुम्ही तारीख बदलण्याचा सल्ला दिला...
सासू: आमच्या गुरुजींना विचारलेलं...
जावई: कुणी?
सासू: मीच विचारलेलं.
जावई: म्हणजे, आमच्या घरातील शुभकार्याची तारीखही तुमच्या सल्ल्याने ठरणार?
सासू: तुमचा गैरसमज होतोय.
जावई: दिवाळीमध्ये साडी खरेदीसाठी आम्ही दुकानात गेलेलो.
सासू: छान साड्या होत्या.
जावई: त्यावेळीही प्रत्येक साडीचा फोटो व्हॉट्सॲपवर तुम्हाला पाठवून, तुमची पसंती...
सासू: हो.
जावई: माझ्या आईसाठी ते अपमानास्पद नाही?
सासू: काय?
जावई: माझी आई समोर बसलेली असतानाही, तुमचा सल्ला?
सासू: तसा विचारच केला नाही मी...
जावई: आम्हा नवरा-बायकोत काही वाद झाल्यानंतरही...
सासू: काय?
जावई: तुमची मुलगी तुमच्याकडून सल्ला घेते.
सासू: करते ती मन मोकळं...
जावई: वेगळं झोपण्याचा सल्ला कुणी दिलेला?
सासू: नाही आठवत.
जावई: २३ फेब्रुवारीला तुमचं बोलणं झालेलं...
सासू: झालं असेल.
जावई: ही तेव्हाची कॉल रेकॉर्डिंग आहे.
सासू: मी चुकून बोलून गेले असेल.
जावई: डॉक्टरांनी माझ्या बायकोला प्रेग्नन्सीमध्ये प्रवास टाळायला सांगितला होता.
सासू: हो.
जावई: तरीही तुमच्या मोठ्या मुलीने कार पाठवलेली?
सासू: त्यांची वास्तुशांती होती ना...
जावई: डॉक्टरांनी सूचना दिलेली असूनही?
सासू: नसेल तिला ठाऊक...
जावई: तुमच्या दोन्ही मुलींचं हे कॉल रेकॉर्डिंग...
सासू: काय आहे त्यात?
जावई: त्यात तुमची मोठी मुलगी माझ्या बायकोला सल्ला देतेय.
सासू: कसला?
जावई: प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या २-३ महिन्यात काही भिती नसते.
सासू: चुकून बोलून गेली असेल.
जावई: तुमची मोठी मुलगीही गायनॅकॉलॉजिस्ट नाही.
सासू: तिच्यावतीने मी माफी मागते.
जावई: माहेरी दररोज बऱ्याच गोष्टी घडत असतात.
सासू: हो.
जावई: काही आनंद देणाऱ्या असतात, तर काही त्रासदायक...
सासू: सहमत.
जावई: जर तिकडच्या गोष्टींमुळे ती इकडे तणावात राहत असेल तर?
सासू: ते योग्य नाही.
जावई: काही उपाय तुमच्या कौटुंबिक स्तरावर शोधले गेले पाहिजेत.
सासू: हो.
जावई: प्रत्येकच गोष्ट तिला समजणं गरजेचं नाही.
सासू: १००%
जावई: फॅमिली ट्रिपचं ठिकाण, नवी इलेक्ट्रिक स्कूटर किंवा अगदी साधा कुलर खरेदी करतानाही तुमचा सल्ला?
सासू: चुकतंय...
जावई: कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते.
सासू: अगदी बरोबर.
जावई: तुमची मुलगी किती शिकलेय?
सासू: तिचं ग्रॅज्युएशन झालंय.
जावई: परीक्षा तिने दिल्या की तुम्ही?
सासू: तिनेच दिल्या...
जावई: मग आता आयुष्याच्या या परीक्षेत, तिला आत्मविश्वासाने तिचे निर्णय घेऊ द्या ना.
सासू: ती गोंधळलेली असेल, तर?
जावई: वाईट नका वाटून घेऊ, पण...
सासू: काय?
जावई: लग्न झाल्यानंतर मुलीच्या संसारात माहेरच्या लोकांचा एवढा हस्तक्षेप योग्य नाही.
सासू: पोटच्या लेकराची काळजी असल्याने...
जावई: एवढी जर काळजी असेल, तर तिचं लग्नच नव्हतं करायचं.
सासू: पण...
जावई: हेच जर आयुष्यभर सुरू राहणार असेल, तर मीही घटस्फोट द्यायला तयार आहे.
सासू: असं नका बोलू जावईबापू...
जावई: बोलावं लागतंय, कारण आता पाणी डोक्यावरून जातंय.
सासू: यापुढे नाही घडणार असं...
जावई: टेक्नॉलॉजीचा वापर करून जर मी या गोष्टी ट्रॅक केल्या नसत्या, तर मलाही हे गौडबंगाल कधीच समजलं नसतं.
सासू: चुकलं आमचं...
जावई: या गोष्टी माझ्या आईवडिलांना किंवा सासरच्या मंडळींना समजल्या, तर...
सासू: खूप गोंधळ होईल.
जावई: म्हणूनच मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं.
सासू: बरं केलं.
जावई: उद्याला तुमच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर...
सासू: काय?
जावई: तुमच्या मुलाच्या संसारात त्याच्या माहेरच्या लोकांचा सततचा हस्तक्षेप तुम्हाला आवडेल?
सासू: नाही आवडणार.
जावई: मग मलाही तुमचा मुलगा समजा.
सासू: मुलगाच समजतो.
जावई: आणि तरीही असे अजब-गजब सल्ले?
सासू: ते भावनेच्या भरात...
जावई: सोशल मीडियामुळे संवाद सोपा झालेला असला, तरी...
सासू: तरी काय?
जावई: तरी आता माणसांना मर्यादांचं भान राहिलेलं नाही.
सासू: खरं आहे.
जावई: त्यामुळेच नात्यातील वैमनस्य आणि घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय.
सासू: पटतंय.
जावई: नात्यातील संवादच संपला, तर नातीही मरतील.
सासू: हो.
जावई: आणि तुम्ही तर थेट मुलीला, सासुशी न बोलण्याचा सल्ला देताय.
सासू: चुकून झालं.
जावई: अपेक्षा आहे की, तुम्हाला माझ्या भावना समजल्या असतील.
सासू: समजल्या.
जावई: त्यामुळे यापुढे तरी, आमच्या कुटुंबातील हस्तक्षेप तुम्ही लोकांनी थांबवावा एवढीच विनंती.
सासू: मी स्वतः खबरदारी घेईल.
जावई: लग्न झाल्यानंतर सासरच मुलीचं घर असतं.
सासू: तेच आम्हीही तिला सांगतो.
जावई: सुनेला माहेरच्या माणसांशी जसं तासनतास बोलायला जमतं, तसं सासरच्या माणसांशीही बोलण्यासाठी पुढाकार गरजेचा...
सासू: पण, ती माहेरी लहानाची मोठी झाली असल्याने...
जावई: तेच तर आव्हान आहे.
सासू: कसलं?
जावई: अनोळखी माणसांना आपलसं करण्याचं...
सासू: आणि त्यांनी तिला स्वीकारलं नाही, तर?
जावई: किमान आयुष्याचा जोडीदार तरी, तिला समजून घेईल ना.
सासू: हो.
जावई: मात्र तुमचा असा हस्तक्षेप सुरूच राहिला, तर नात्यांमधील दुरावे वाढत राहतील.
सासू: चुकीचं आहे.
जावई: आणि मग नकळत नातीही तुटतील.
सासू: तसं नको व्हायला.
जावई: तुमच्या रोज बोलण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही.
सासू: मग?
जावई: मात्र तिने माहेरच्या गोष्टींमध्ये आणि तिकडच्या माणसांनी आमच्या कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ करायला नको.
सासू: रास्त मागणी आहे तुमची...
जावई: नाहीतर...
सासू: नाहीतर काय?
जावई: अति केल्यावर मातीच होईल.

©️अक्षय भिंगारदिवे,
१७ मे २०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा