शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

827. कुठं?... केव्हा?... कधी?

 एकदा एका कारखान्यातील महत्वाचे इंजिन बंद पडले. कंपनीतील सर्व हुशार इंजिनियर्स, कुशल कामगार सगळे झटत होते पण इंजिन काही दुरुस्त झाले नाही. इंजिन महत्वाचे असल्याने पूर्ण उत्पादनच थांबले होते अन प्रतिदिन लाखो रुपयांचे नुकसान होत होते. तीन दिवस झाले तरी इंजिन सुरु होईना. त्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर गेटबाहेरच्या चहाच्या टपरीवर मेन मेन इंजिनियर चहा घ्यायला गेले. तिथं त्यांच्यात बंद पडलेल्या इंजिनबद्दल चर्चा सुरु होती की काय करावं म्हणजे इंजिन सुरु होईल ? तिथेच पलीकडे एक आजोबा बसून यांचे बोलणे ऐकत होते. 
शेवटी न राहवून ते आजोबा इंजिनियरच्या घोळक्याजवळ येऊन म्हणाले, 
"साहेब, ते इंजिन मी पाहू शकतो का ?"
त्यावर मुख्य इंजिनियर साहेब म्हणाले, 
"अहो, आजोबा.... आम्ही इतके शिकलेले, फॉरीन रिटर्न... तरी आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हाला कसे जमेल ? राहू द्या."
तरी आजोबांनी विनंती केली की, " मी फक्त इंजिन पाहतो. एक संधी तर द्या"
शेवटी त्यांच्या जिद्दीला पाहून सर्वजण त्यांना कारखान्यात नेतात, इंजिन दाखवतात. 
आजोबा एक मिनिटभर बारकाईने निरीक्षण करतात. इंजिनभोवती एक फेरी मारतात आणि "एक हातोडा मिळेल का ?" असं विचारतात. 
एका कामगाराने हातोडा आणून दिला. (इथं मला एक इंग्रजी म्हण आठवली.)
"Life doesn't change in ONE MINUTE, but taking decision after thinking for ONE MINUTE can change life."
आणि मग त्या आजोबानी इंजिनच्या एका स्क्रूच्या बाजूला हातोड्याने ठोका टाकला. आणि स्टार्टरचे बटन दाबले. 
आणि काय आश्चर्य. इंजिन झटक्यात सुरु झाले. हे पाहून सगळेच उडाले. मात्र खुशही झाले. कारखान्याचा मालकही खुश झाला की त्याचे रोजचे लाखोंचे नुकसान वाचले म्हणून.
आणि मग आजोबाला त्या मुख्य इंजिनियरने विचारले की "किती पैसे देऊ?"
यावर शांतपणे आजोबा म्हणाले, "एक लाख रुपये"
हे ऐकून सगळेच लटपटले. तरी एकजण बिचकत बिचकत त्यांना म्हणाला, 
"अहो आजोबा, हातोड्याचा एक ठोका तर टाकलाय. त्याचे एक लाख रुपये ??"
यावर आजोबा म्हणाले, 
"साहेब. हातोड्याचा ठोका तर मी एकच मारला. हे खरं आहे. पण केव्हा, कुठे आणि कसा मारायचा असतो, हे फक्त मला माहित होते. तुम्हाला कुणालाच नाही"
(इथंहि मला एक इंग्रजी फ्रेज  आठवली.)
Effort is important, but knowing where to make an effort in your life, makes all the difference.
गोष्ट इथं संपलीय. 

डॉ. डीडी क्लास : आपला घोळ कुठं होतो माहितीय का ? की आपण दुसऱ्याचे अनुभव घेत नाही अन कुणाचे ऐकत पण नाही आणि ऐकण्याची इच्छा पण नसते. आपल्यापैकी अनेकजण "सेल्फ इगो" नावाच्या रोगाने ग्रस्त आहेत. त्यातही जर एखादी अडचण आली तर आपण त्याबद्दल कुणाला विचारतो ? तर आपल्या समवयीन मित्रमैत्रिणींना. आता विचार करा की तुमच्या वयाचेच ते लोक असल्याने  (एखादा अपवाद वगळता) त्यांनाही साधारण तुमच्याइतकीच बुद्धी असणार न. मग ते काय वेगळा मार्ग तुम्हाला सांगणार अन अडचणीतून बाहेर काढणार?
इथेच आजूबाजूला जरा डोकावून पहा. अनेकांच्या घरात "त्या" आजोबासारखे अनुभवी लोक नक्की असतील पण त्यांच्या मताला किती किंमत दिली जाते ? त्यांच्या अनुभवाचा फायदा किती लोक घेतात ? मला नक्की माहित आहे की याचे प्रमाण फारच कमी आहे. याचे कारण म्हणजे "सेल्फ इगो" रोग आणि "त्यांना यातलं काय कळत. आऊटडेटेड आहेत ते" असा शिक्का मारून आपण मोकळे होतो.  विश्वास ठेवा मंडळी, जिथं तुमचा गुंताडा तुम्ही दोन्ही हाताने सोडवू शकत नाही तिथं हि बुजुर्ग मंडळी तोच गुंताडा डाव्या पायाच्या करंगळीच्या मदतीने सहज सोडवून दाखवतात. कारण त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात.  तुम्ही त्यांना एक अडचण सांगून पहा.ते त्यावर तुम्हाला पाच सोल्युशन्स देतील. यातून फायदा तुमचाच आहे आणि नकळत त्यातून पुन्हा एकदा नात्याची वीण अधिक घट्ट होत जाईल. 
     अजून एक महत्वाचे सांगतो. आपण अशा बुजुर्गांचा अनुभव पैशाने खरेदी करू शकत नाही. पण तुमचे होणारे लाखोंचे नुकसान मात्र बुजुर्ग मंडळी थांबवू  शकतात. तसेही तुम्ही अडचणीत असलात आणि सगळीकडून कोंडी झालीय, बाहेर निघायचा मार्ग दिसत नाहीये तर अशावेळी एकदा शांतपणे बुजुर्ग मंडळींशी बोलून तर पहा. ९९% खात्रीने सांगतो.  तुम्हाला बाहेर काढण्यासाठी त्या बुजुर्ग मंडळींचा अनुभवच कामाला येणार आहे. कारण असं म्हणतात की, म्हातारे झालेले झाड फळ देत नसले तरी सावली तर नक्की देते न.
 
डॉ. धनंजय (डी. डी.)

828. तिचं दु:ख

      गीता ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा अमेरिकेला  जॉब करीत होता. 
मुलगी म्हणाली," चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी ".
मात्र माधवने  नकार दिला.
रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं. चाळीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला गीता सोबत घालवलेले दिवस आठवू लागले.कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी  मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. गीता  होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. माधवने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्द्यावर सोडून जाईल.
"गीता  तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करत नाही ग. कस जगू मी गीता तुझ्या शिवाय." माधवला हुंदका अनावर झाला.
    गीताचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे गीता सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू. सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली. माधवने  डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला. एक डायरी खाली पडली. थरथरत्या हातानी डायरी उघडली. त्याने ती डायरी वाचायला सुरवात केली.
दि, =====
नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणुन जगायचं ठरविले.
बरंच काही लिहिलं होत. तो पान  पलटवत होता.
दि......
आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,"आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या ".
तर म्हणाले ,"मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चल. तू खा मी तुला सोडतो हॉटेलला ".
अरे, हे काय बोलणं झालं... मला काय एकटीला खायला जायची हौस होती का? मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो. नवऱ्याने गिफ्ट दिलं. फार हेवा वाटायचा. कारण इथे काहीच आवडत नव्हतं. काही म्हटलं तर ऐकणार नाही. मला म्हणतात नवऱ्यानं गिफ्ट दिल म्हणजे, फिरवलं, हॉटेल मध्ये जेवू घातलं म्हणजे  बायकोवर खूप प्रेम करतोच असं काही नसत. नवरा -बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा ? त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले.
दि....
माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ. थांबा थोडा वेळ. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत. हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खुप अपमानित वाटले. खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागलं. हीचं मन दुखावलं हे ज्ञानीही नसतं. मी मात्र विसरू शकत नाही. सगळं दुःख. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेचं लागली तर कप्पा उघडून बघते. फार त्रास होतो तेव्हा.
दि,....
आज मी पडद्याचे कापडं आणले.  खुप ओरडले. कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार. तुला वापरायची तरी अक्कल आहे का  वगैरे वगैरे. काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंद चांगली नाही. तुला व्यवहार समजत नाही. तुला लोक ठगवतात. इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत. त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही. पानांमागून पान पलटवू लागला. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. माधवला खुप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की गीता इतकी दुःखी आहे. गीताच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले. बहुतेक शेवटचे
दि....
आज खुप डावा हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते. तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.
दि....
काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली. यांना फोन लावला. म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे.
अँजिओग्राफी केली. 95 टक्के ब्लॉकेज. डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.
घरी येऊन यांना सांगावं या  विचारातच घरी आले. हे बाहेरगावावरून आलेले होते. घरी येताना औषध आणायला विसरले. खुप थकवा आला होता. म्हटलं, थोडी औषधं आणून देता का?
'आताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः, परत कपडे बदलवू, परत जाऊ ".
"खुप चिडचिड आणि बडबड केली "
"असू द्या, मी घेईल उद्या "
"अग, पण काय झालंय....? 
काय सांगितलं डॉक्टरांनी "
"काही नाही, सगळं ठीक आहे "
मी ह्यांना काहीही सांगितलं नाही. साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा सेटल आहे... रोजची लहान सहान बाबीवरून कटकट. आता मी थकली. हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही. शांतपणे जाता येईल. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात.
डायरीचे शेवटचेच पान होते.
      माधवने डायरी बंद केली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गीताचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे. गीता, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना. तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही. मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होतं आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही. का वागली तू अशी गीता ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू ? गीता  मी तुला समजूच शकलो नाही. तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही. मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही. तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही. पण गीता, अग एकदा बोलायचं होतं ग. व्यक्त व्हायच होत. भांडलो असतो कदाचित. परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलं ही असतं. नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसतं लागलं. मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्नं असतील. तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्या सोबत राहिली असतीस ग. मला माफ कर... !! 

कदाचित यातून फार मोठा बोध घेण्यासारखा आहे 

संग्रही: श्रुती मुंदडा (काबरा)

824. दुसरी संधी नाही

   त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो ऑफीसमधून येण्याची ती आतुरतेनं वाट पहात होती. लग्नानंतर काही वर्षात सगळी समीकरणंच बदलून गेली. परस्परांशिवाय क्षणही राहू न शकणा-या त्या दोघांचं क्षुल्लक कारणानंही भांडण होऊ लागलं.  एकामेकांशी तर आता ते फारसं बोलतही नसत. एकाच छपराखाली राहूनही दोघंजण परस्परांना अनोळखी झाले. पण मनातून दोघांनाही त्या बदललेल्या वातावरणाबद्दल पश्चाताप होत होता. आणि म्हणूनच त्या दिवशी ती त्याची आतुरतेनं वाट पहात होती. त्याला लग्नाचा वाढदिवस तरी लक्षात आहे का याची ती वाट पहात होती. नेमकं त्याच वेळी दाराची बेल् वाजली. तिनं धावतच जाऊन दार उघडलं तर बाहेर पावसानं चिंब भिजलेला तो उभा होता. हातात तिच्याच आवडीची निशिगंधाची फुलं घेऊन. दोघांनीही मनोमन ठरवलं की आता काही झालं तरी भांडायचं नाही. एकामेकांना समजून घ्यायचं. फुलं तिच्या हातात देऊन तो आत गेला. त्यानं आणलेल्या निशिगंधाच्या फुलांचा सुगंध उपभोगताना ती भान हरपून गेली होती. त्याचवेळी त्याच्या फोनची रिंग वाजल्यानं ती भानावर आली.
पलिकडून आवाज ऐकू आला, "मॅम्, मी पोलिस स्टेशनमधून बोलतोय. हा नंबर --- यांचाच ना?" धडधडत्यानं हृदयानं तिनं उत्तर दिलं, "होय... पण का हो...?" त्यावर पलिकडून उत्तर आलं, "आय ऍम सॉरी मॅम्... पण एक अपघात घडलाय आणि एक व्यक्ती त्यात मृत्युमुखी पडलेली आहे. त्या व्यक्तीच्या खिश्यातल्या पाकीटातनं आम्हाला हा नंबर मिळालाय. तुम्ही शवागृहात येऊन डेड्बॉडी ओळखावी यासाठी मी हा फोन केलाय." ते ऐकून तिच्या हातापायांना कंप सुटला... ती म्हणाली, "इन्स्पेक्टर साहेब, पण माझे पती तर आत्ता इतक्यातच घरी आलेत हो..." त्यावर पोलिस स्टेशनमधून उत्तर आलं, "सॉरी मॅम्, आत्ता दुपारी चार वाजता हा अपघात घडलाय. ट्रेनमधे चढताना हा अपघात घडलाय."
     ते ऐकून तिला भोवळ आली. असं कसं काय घडू शकतं? मृत्युमुखी गेलेल्यांचा आत्मा मृत्युनंतर लगेचच दूरवर असलेल्या प्रिय व्यक्तींना शेवटचं भेटण्यासाठी येऊ शकतो असं तिनं पुस्तकांमधे वाचलेलं होतं. भरलेल्या डोळ्यांनी ती आत बेडरुमकडे धावली. पण तो तिथे नव्हताच. तिच्या मनात विचार येऊ लागले, 'पुस्तकात वाचलेलं खरं आहे का? तो खरंच गेलाय का? देवा रे... मी त्याच्याशी ज्या क्षुल्लक कारणांवरुन भांडल्येय त्याबद्दल आता मी क्षमा कशी मागू?'  मोठ्या हुंदक्यानं ती जमिनीवर कोसळली. त्याचवेळी बाथरुमचं दार उघडल्याचा आवाज तिनं ऐकला. आपले ओले केस पुसत तो बाहेर आला आणि म्हणाला, "स्विट् हार्ट. तुला सांगायचंच विसरुन गेलो बघ. आज दुपारी ट्रेनमधे चढत असतानाच कोणीतरी माझं पाकीट मारलं."
     ते ऐकून सुटकेच्या निःश्वासानं तिचं हृदय पिळवटून निघालं. तो खरोखरच जिवंत आहे हे जाणताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. पण प्रत्येकालाच आयुष्य अशी दुसरी संधी देत नसतं. आणि म्हणूनच वेळ घालवू नका. घडलेल्या चुकांबद्दल क्षमा मागून मोकळे व्हा. आई-बाबा, पती किंवा पत्नी, भावंडं, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि इतरांशी आपल्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होऊ द्या. अश्यानं आयुष्यात पश्चातापच उरत नाही.

825. यशस्वी उद्योजक

उद्योजक धीरूभाई अंबानी जन्मदिन
जन्म - २८ डिसेंबर १९३२ (चोरवाड,गुजरात)
स्मृती - ६ जुलै २००२ (मुंबई)

     उद्योजक धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरात मधील चोरवाड येथे झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी. धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. त्यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले. यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी  भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा  व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अहमदाबाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. 
१९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली. १९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.
     १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती. तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. 
एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे. थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुद्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे.

826. बाप आणि मुलाच्या विचारात फरक

      एकदा एक वडील आणि त्याचा मुलगा जलमार्गाने कुठेतरी जात असताना अचानक दोघांचा रस्ता चुकला. मग त्यांची बोट त्यांना जवळच्या दोन बेटांवर घेऊन गेली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांची बोट खराब झाली. 
वडील आपल्या मुलाला म्हणाले, "बेटा, आता आपल्या दोघांची शेवटची वेळ आली आहे असे वाटते, दूर दूरपर्यंत कोणताच आधार दिसत नाही."     
अचानक वडिलांनी उपाय विचार केला आणि आपल्या मुलाला म्हणाले, "असो, आपला शेवटचा काळ जवळ आला आहे, मग आपण देवाची प्रार्थना का करू नये." 
त्यांनी दोन्ही बेटे आपापसात वाटून घेतली. एका बाजूला वडील आणि दुसरीकडे मुलगा, दोघेही वेगवेगळ्या बेटांवर देवाची प्रार्थना करू लागले.          
मुलगा देवाला म्हणाला, 'हे देवा, या बेटावर अशी झाडे आणि वनस्पती वाढू दे ज्यांच्या फळांनी आणि फुलांनी आपली भूक भागवता येईल.'
देवाने प्रार्थना ऐकली आणि लगेच तेथे झाडे आणि झाडे वाढली आणि फळे आणि फुले देखील तेथे दिसू लागली. हा एक चमत्कार असल्याचे त्यांनी सांगितले.          
मग त्याने प्रार्थना केली की एक सुंदर स्त्री यावी जेणेकरून आपण तिच्याबरोबर येथे राहू आणि आपले कुटुंब स्थापन करू शकू. लगेच एक सुंदर स्त्री प्रगट झाली. आता त्याला वाटले की माझी प्रत्येक प्रार्थना ऐकली जात आहे, मग मी देवाकडे बोटीसाठी आणि येथून जाण्यासाठी योग्य मार्गासाठी प्रार्थना का करू नये?          
त्याने नेमके तेच केले. त्याने प्रार्थना केली की एक नवीन बोट यावी ज्यामध्ये तो चढू शकेल आणि येथून निघू शकेल.
लगेच बोट दिसली आणि मुलगा त्यात चढला आणि बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात आकाशातून आवाज आला आकाशवाणी झाली, बेटा, तू एकटाच जातोस का? तू तुझ्या वडिलांना सोबत घेणार ना?          
मुलगा म्हणाला, त्यांना सोडा प्रभु, त्यांनीही प्रार्थना केली, पण तुम्ही त्यांची प्रार्थना अजिबात ऐकली नाही. कदाचित त्यांचे मन शुद्ध नाही, म्हणून त्यांना येथे परिणाम भोगावे लागतील?    
आकाशवाणी  म्हणाली, तुझ्या वडिलांनी कोणती प्रार्थना केली माहीत आहे का?          
मुलगा म्हणाला, नाही.          
आकाशवाणी काय म्हणाली ते ऐका, तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली. देवा, माझा मुलगा तुझ्याकडून जे काही मागतो ते दे कारण मी त्याला दुःखात पाहू शकत नाही आणि जर मरणाची पाळी आली तर मला आधी मरू दे."
तुम्हाला जे काही मिळत आहे ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ आहे. मुलगा खूप लाजला.
      आपल्याला जे काही सुख, प्रसिद्धी, मान-सन्मान,यश, कीर्ती, संपत्ती, संपत्ती आणि सुविधा मिळत आहेत त्यामागे कोणाची तरी प्रार्थना आणि शक्ती नक्कीच आहे. परंतु आपल्या गर्वामुळे आपण अनभिज्ञ राहतो आणि या सर्व गोष्टींना आपले कर्तृत्व समजण्याची चूक करतो आणि कधी ज्ञान असेल तरच तुम्ही पश्चात्ताप करावा लागेल. इच्छा असूनही आपल्या आई-वडिलांचे ऋण आपण फेडू शकत नाही.
बोध
  आपल्या मुलाने खूप उंची गाठावी  खूप यश मिळवावे आपल्या पेक्षा खूप मोठे व्हावे अशी इच्छा बापच करतो. पण काही मुलगे आईवडिलांना बोझ समजतात. त्यामुळे तुम्ही नेहमी गरजूंना मदत करत राहा, दान, धर्म , गोसेवा इत्यादी साधू-संतांसाठी सेवा करत राहा, तर मग देवही तुमची काळजी घेईल.

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

823. माणुसकीचं नातं

       मी अंथरुणातून उठलो,तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का ? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं, तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, "माझ्या छातीमध्ये आज, रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो." “हो, पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईल मध्ये बघता बघताच बायको म्हणाली. 
बाकी सर्व  मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती. मी ऍक्टिवाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि ऍक्टिवा स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, "काय साहेब, ऍक्टिवा चालू होत नाही का?"
मी म्हणालो, "नाही...!!”
"साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये ऍक्टिवाला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो." ध्रुवने एकच किक मारून ऍक्टिवा चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, " साहेब, एकटेच जात आहात का?" 
मी म्हणालो, "हो." 
तो म्हणाला, "अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका. चला, माझ्या मागे बसा." 
मी म्हणालो, "तुला ऍक्टिवा चालवता येते का ?"
"साहेब, माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे, काळजी करू नका आणि मागं बसा."आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, “साहेब, पायी  चालू नका, या खुर्चीवर बसा."
ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती. मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील, की तो अजूनपर्यंत का नाही आला? शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की, "मी आज येऊ शकत नाही."
ध्रुव,डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं, की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्ट मधून तो व्हील चेअर ICU कडे घेऊन गेला. माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.
डॉक्टर म्हणाले, "तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहेत. आता कोणाचीही वाट बघणं, हे तुमच्यासाठी हानिकारक आहे, यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टच ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील. या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे." डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितल.
मी म्हणालो, "बेटा, तुला सही करता येते का?" 
तो म्हणाला, "साहेब, इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका."
"बेटा, तुझी काहीही जबाबदारी नाही. तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही, तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस. खरंतर, ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती. एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा. मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन, की मला काही झालं, तर ही  जबाबदारी माझी आहे. ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे. कृपा करून आता सही कर आणि हो, घरी फोन करून सांगून दे."
त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला. ती काय म्हणत होती,ते त्याने शांतपणे ऐकून घेतले .
थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, "मॅडम, तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल, तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका, परंतु,आत्ता ऑपरेशन सुरु होण्या आधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा. हो मॅडम, मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की आता वेळ घालवून चालणार नाही."
मी विचारलं, "बेटा घरून फोन होता का?" 
"होय साहेब."
मी मनात पत्नीविषयी विचार केला. अगं,तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी, मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, "बेटा काळजी करू नकोस. मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो, तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. तुझं काम भांडी धुणे. कपडे धुणे. हे नाही. तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे. बेटा, तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस."
ऑपरेशन नंतर मी शुद्धीवर आलो. माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते. मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले, "ध्रुव कोठे आहे?"
पत्नी म्हणाली, "तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला. म्हणत होता, की त्याच्या वडीलांचे हार्टअटॅक ने निधन झाले आहे. पंधरा दिवसानंतर तो परत येईल." आता मला समजलं, की त्याला माझ्यामध्ये आपले वडिल दिसत असावेत. हे देवा! त्याला हिम्मत दे.
संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे,मान खाली घालून माझी माफी मागत होते.  मोबाईलच व्यसन, एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून, आपल्या परिवारापासून, आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते!
डॉक्टरांनी येऊन विचारलं, "सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?"
मी म्हणालो, "डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं. अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील, फक्त मी इतकंच म्हणेन, की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता."
पिंटू म्हणाला, "आम्हांला माफ करा बाबा. जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं, ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही."
“बेटा, आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत, की आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही. एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे. आता वेळ आली आहे, की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर परिवार, समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल."
                 
"स्वतःला सत्याबरोबर जोडा, आणि जे असत्य आहे, ते आपोआपच गळून पडेल .”

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

822. ब्रेकअप

 "हॅलो...हॅलो...बाबा, मी संजय,  झोपला होतात का?"
लंडनवरून संजयचा आबांना फोन. "नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना?", आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. "आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी आता अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे ११.३० वाजलेत. तुमच्याकडे साधारण चार वाजले असतील बघा", संजयचं स्पष्टीकरण. "अरे हो की. बरं बोल, आणि फोन केलास तर जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना की आई रोज तीन ते पाचमध्ये पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगाच डबल डबल फोन कशाला करता? पैसे वाया जातात", आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्ये मध्ये उचल खायचा. ब्याऐंशी वर्षांच्या आबांना खरंतर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको-मुलांसहीत लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधी कधी ते जुनं घरंच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हंटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पागोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती.
"आबा, अहो पैशांचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केलाय. कशी तब्येत आहे?", संजयने विचारलं. "मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नव-याचं? फिरायला चल म्हंटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं तू कधी येतो आहेस?", आबांचा प्रश्न. "आबा, अहो आत्ताच सहा महिन्यांपूर्वी नाही का येऊन गेलो? विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची", संजयचं उत्तर. "बरं, बरं. बघा जमलं तर यायला. कनिष्कलाही दोन वर्षं झाली येऊन. मालती फार आठवण काढते त्याची...", आबांचा स्वर जडावला होता. "बरं, संजया, बेल वाजते आहे. तू मालती आली की फोन कर रात्री. ठेवतो आत्ता फोन", आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. कि-होल मधून त्यांनी पाहिले, मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच, आता कुटुंबासहीत वरच्या मजल्यावर रहायला गेले होते. त्यांचा मुलगा, अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं. "बोला अक्षयकुमार! आज आमची आठवण कशी काय आली?", आबांनी हसत हसत विचारलं. "काही नाही, मालती आजींच्या काही एफ.डी. मॅच्युअर होताहेत, तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची
कागदपत्रं..", त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. त्याला घरात जाणं भाग होतं आता. जराश्या नाखुषीनंच तो आत शिरला. "अरे ये ये. जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला", आबांनी त्याला जरा बळंच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले, "बरं अक्षयकुमार तू चहा घेणार का ? मालती आजी आता येईलच थोड्या वेळात. आमच्यासाठी करणारच आहे, तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच! माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा?", अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले.
अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला. अक्षय इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परिक्षा पण त्याने दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा. "अक्षयकुमार, अहो कसल्या विचारात गढला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल तितकं दुःख जास्ती होतं", आबा बोलून गेले. "आयला, म्हातारा बेरकी आहे. एरवी या म्हाता-याला काल काय घडलं आठवत नाही माझं प्रेमप्रकरण बरं लक्षात राहिलं", अक्षय या विचाराने सटपटला. "नाही आबा, तसं काही नाही. मी ठीक आहे", अक्षयने मनातले विचार लपवत म्हंटले. आबा धूर्तपणे हसले. "कसं आहे ना अक्षय की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात. आणि मी तिला पाहिलंय तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे आमचा पेन्शनर कट्टयाचा मार्ग तुमच्या त्या अड्डयावरूनच तर पुढे जातो. प्रेमात पडलेले सगळे जण मांजरासारखे असतात बघ. डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही", आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. "आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हरायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेभभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं", आबा समजावणीच्या सुरात म्हणाले.
खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांडतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. "अरे कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात त्या तेव्हा जरी क्लेशकारक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेकवेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला, तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं?", आबांनी जरा खोचकपणे विचारलं. अक्षय गडबडला या प्रश्नाने. "म्हणजे? मला समजलं नाही आबा", अक्षय. "अरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसांत आणि नात्यांत करावी जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील? मान्य की माणसांची पारख एकदम नाही करता येत. पण म्हणून सहा महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ! अति गोड कराल तरी बेचव, अगोड तरी बेचवच! चहावरून आठवलं, रिटायर झाल्यादिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ, संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास चोवीस वर्षं हा नेम मोडला नाहीये, आहेस कुठे? आता मालती येत असेल. आली की लगेच गरमागरम चाय समोर हजर! बरं ते तू कागदपत्रांचं काय बाबा म्हणत होतास? गप्पा झाल्या, चहा झाला तरी मुख्य काम विसरायला नको", आबा हसत हसत म्हणाले.
चहाचा कप ठेवत अक्षय उठला. "आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललंय माझ्याशी. थँक यू! मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला...इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स...माणसं...नाती...आणि हो कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो", म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला. मालती आजी सहा महिन्यांपूर्वीच वारली, ती कधीच परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं वाटलं त्याला. ज्या आभासी, कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या, त्या पाडून त्यातून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर. पण पुढच्याच क्षणी विचार आला की सहा-आठ महिन्यांच्या अफेअरचं ब्रेकअप झालं तर एवढा त्रास होतोय आपल्याला. साठ वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना.आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, एक नवी ऊमेद घेऊन. की-होल मधून अक्षयला गेलेलं पाहून आबा मागे वळले.
बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले, "मालती आपली इन्व्हेस्टमेंट चुकली का गं पोरांमधली? पैशाचा इन्शुरन्स नको आहे या वयात. माणसांचा हवाय. आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं नको विचारणारी माणसं. लोकांना वाटतं म्हातारा वेडा झालायं. बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय. जाता येता एकटाच बडबड करतोय. पण तसं करतो म्हणून तरी चार लोक चौकशी करतात. बाप विसरभोळा झालायं. न जाणो, उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख? चल, मी चहा ओततो. आज गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊ.

821. किस्से पोस्टमनचे...नावात काय आहे ?

 नोव्हेंबर उत्तरार्धात होता. या महिन्यात दोनशेहून अधिक पेंशनरांना मोफत आणि घरपोच सेवा देण्याचे भाग्य लाभले." या भाग्याच्या मखमली गालिचावर बसून समाधानात काही दिवस घालवावेत " या मनाच्या मंगळवाराची खिचडी शिजते न् शिजते तोच विवेक गायकवाड सरांचा फोन आला.
" पोस्टमन साहेब, तुम्ही पेंशनरांचे प्रश्न मार्गी लावत आहात म्हणून एक काम सांगतो..केसनंद मधील पारुबाई भंडलकर यांची पतीच्या पश्चात मिळणारी पेंशन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांचा कर्ता सवरता मुलगाही मागच्या महिन्यात अपघातात मरण पावला. आता त्यांच्या घरात धावपळ करणारं कुणी नाही. कृपया आपण लक्ष घालावे. " 
तसे पाहता केसनंद आमच्याच सबऑफिसचे शाखा डाकघर आहे. त्यामुळे तिथे सतत येणेजाणे असते. दुसर्या दिवशी ऑफिसला जाता जाता भंडलकर आज्जींच्या घरी गेलो.
बाहेरुनच आवाज दिला. " भंडलकर आज्जींचे घर हेच का..? " आज्जी बाहेरच धुणं धूत होत्या. खाकी डगला घातलेल्या पोस्टमनला अर्थात मला पाहताच त्या काहीश्या कुतुहलल्या. मीच पारुबाई भंडलकर..या पोश्टमन भाऊ.."
गाडी बाजूला लावून मी आज्जींच्या दारात दाखल झालो. दारासमोर दोन गाई बांधलेल्या होत्या. तिथून पुढे काही अंतरावर कोंबड्यांचे उकिरडा उकरुन चविष्ट खाद्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आज्जी धूत असलेल्या कपड्यांच्या पाण्यावर अळूंचे छोटेसे बेट उभे राहिले होते. 
मी दारात येताच जून्या जीर्ण कपड्याला आज्जींनी शेवटचा घसाडा दिला, क्षीण हातांनी वेडेवाकडे पिळले. त्याच दगडावर ते पिळलेले धुणं टाकून आज्जींनी साबणाच्या पाण्यात हात बुडवून अंगाला पुसत मला घरात बोलवले. आज्जींचे घर तसे पक्के आणि दुमजली होते परंतु त्याचा पाया खचून‌ बराच काळ लोटला होता. आज्जींचे पती BSNL मध्ये नोकरीस होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन बायका असा मोठा लवाजमा होता. दूसरी बायको आज्जींचीच सख्खी बहिण..दोघीही एकमेकींना समजून घेत. शिक्षण नसल्याने पडेल ते काम करत असत. नवरा ठणठणीत होता तोपर्यंत फिकीर नव्हती.
पण एखाद्यावर नियतीची वक्रदृष्टी पडली की होत्याचे नव्हते होते. आज्जींच्या बाबतीतही तेच झाले. पतीला अचानक देवाज्ञा झाली अन् हसत्या-खेळत्या संसाराला खीळ बसली. तीन तीन मुले, परंतु कुणाचेच धड उत्पन्नाचे मेळ बसत नव्हते. सगळे मोलमजुरीची कामे करत. वडिल हयात असताना त्यांनी मुलांना शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मुले शिकली नाहीत. परिणामी वडिलांच्या पश्चात त्यांची दयनीय अवस्था झाली. सगळे आपापला संसार थाटून दिवस काढत होते. आज्जींना मात्र पतीच्या पश्चात कौटुंबिक पेंशन सुरु झाली. तोच काय तो जगण्याचा आधार..म्हातारपणाची काठी. पेंशनवर आज्जींची कशीबशी गुजराण सुरु होती. तीच पेंशन सिस्टिमच्या घोळामुळे बंद झाली. आज्जींचे पेंशनच्या पासबुकवरील नाव पारुबाई भंडलकर असे होते आणि आधार कार्ड व पॅनकार्ड वर पार्वती भंडलकर..अचानक सिस्टिमला याची जाणीव झाली आणि आज्जींच्या पेंशनला भलीमोठी उटी बसली. आज्जींचा एक धाकटा मुलगा यासाठी धावपळ करत होता. त्याने बरेच हेलपाटे मारले परंतु पदरी निराशाच आली. सरकारी खात्यात खरतरं लोकांची कामे एका चकरेतच व्हायला हवीत पण तसे होत नाही. भस्म्यारोग झालेले भ्रष्ट  अधिकारी हजार पाचशेसाठी सामान्य जनतेची नको तेवढे पिळवणूक करतात. प्रत्यक्षात जे काम सहजासहजी होणार असते त्यासाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते.  मी सरकारी क्षेत्रात असूनही मला याची झळ बसली आहे. परंतु मी चिकाटीने आणि पाठपुराव्याने अनेक प्रश्न धसास लावले आहेत. कधी प्रेमाने,कधी विनंतीने तर कधी अधिकार्यांना त्यांच्या कर्तव्याची कठोर शब्दात जाणीव करुन देऊन.
तर आज्जींचा करतासवरता मुलगा या पेंशनच्या धावपळीत अपघातग्रस्त झाला आणि मरण पावला. त्यालाही दोन मुली आहेत. अशा या पेंशनला वैतागून आज्जींनी हात टेकले. एव्हाना पेंशन बंद होऊन सहा महिने होत आले होते. नोव्हेंबर सुरु झाला तशी ही पेंशनची कामे मी घरोघर जाऊन अगदी पोस्टाच्या अत्यल्प दरात करुन देत होते. काही वृद्धांची अवस्था पाहून तर ती अत्यल्प फीही घ्यायचे धाडस झाले नाही. मग मी सरळ पैसे घेणं बंद केलं. जी काय फी असेल ती मी पदर भरु लागलो. या सर्व गोष्टींची माहिती मी स्टेटस द्वारे लोकांना देत होतो. हाच स्टेटस पाहून मा. विवेक गायकवाड सरांनी मला आज्जींची परिस्थिती सांगितली आणि विश्वासही व्यक्त केला की " त्यांची पेंशन तुम्ही नक्की पूर्ववत सुरु करुन द्याल." घरात आल्यावर आज्जी मला बसायला टाकू लागल्या. मी नको म्हटल्यावर म्हणतात कशा, " घरात आल्याल्या पावन्याचं बूड आपून तोलून धरायचं आसतयं मास्तरं..तुमची उठबसं करण आमचा धरम हाय..आमी तुमच्या घरी आल्यावर तुमी आमाला आसचं ठेवशाल का..? सांगा बरं.."
आज्जींच्या प्रश्नाने मी भारावून गेलो. त्यांची माणूसकीची, पराकोटीची मौलिक समज पाहून माझं दुनियादारीबद्दलचं तोकडं ज्ञान गळून पडलं. अशा माणसांमुळे तर माझं माणुसपण वेळोवेळी अधिक उजळून निघतं. मला त्यात सुधारणा करता येते. कोर्या चहाचा गरम घोट घशातून खाली उतरला तशी माझी तंद्री भंग पावली. पटापट चहा संपवून मी आज्जींची सर्व परिस्थिती जाणून घेतली. पारुबाईची पार्वती झाली म्हणून पेंशन बंद पडली होती. त्यांची कागदपत्रे घेऊन तात्काळ ई-सेवा केंद्रात फोन करुन त्यांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड दुरुस्तीस पाठवले. आज्जींचा मोबाईल आधारला लिंक असल्याने लगेचच ओटीपी घेऊन आधार व पॅनकार्डचा फॉर्म सबमिट केला. पेंशनसदर्भात संबंधित अधिकार्यांना फोन‌ करुन आज्जींची आपबिती कळवली. थोडी माझ्या सामाजिक कामाची ओळख करुन दिल्यावर त्यांनी बिनशर्त सहकार्याची तयारी दर्शवली. 
आज्जींच्या पारुबाई भंडलकर नावाने मी हयातीचा दाखला आँनलाईन सबमिट केला. आज्जींची ही कामे मार्गी लावून मी तिथून निघून आलो. तीनच दिवसांत आज्जींचे दुरुस्त केलेले आधार व पॅनकार्ड आले. ते पुढे पाठवून दिले. 25 नोव्हेंबरला मी आज्जींच्या घरी गेलो‌ होतो. 
त्यानंतर सतत पाठपुरावा करुन अवघ्या पाचंच दिवसात आज्जींच्या खात्यावर 15 हजार रुपये पेंशन जमा झाली. आज्जी व त्यांचा नातू बँकेतून थेट पोस्टात आले. मला पाहताच आज्जींनी मायेने माझ्या तोंडावरुन हात फिरवला आणि दोन्ही हातांची बोटे ओवाळून कानाजवळ मोडली. माझी दृष्ट काढली.  
" मास्तरं..काय म्हणू तुमाला, मला काय सुचना..पण लय बेस काम केल तुमी.." 
असं म्हणून आज्जींनी डोळ्याला पदर लावला.
याच पेंशनसाठी त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता. तीच पेंशन मी अवघ्या पाचच दिवसात एकही हेलपाटा न मारता, एकही रुपया खर्च न करता सुरु करुन दिली होती. आज्जींना अक्षरशः आकाश ठेंगणं झालं‌ होतं. त्यांनी मला आवर्जून घरी यायला सांगितले. एकदा सवड काढून मी गेलोही..तेव्हा आज्जी म्हणाल्या, " मास्तरं..तुमचं पैसं किती देयाचं..? तसं तर कितीबी दिलं तरी कमीच हाय पण सांगा.."
"आज्जी..तुम्ही माझ्या चेहर्यावरुन मायेने हात फिरवला..तोच माझा मेहनताना..! "
गायकवाड सरांना ही बातमी कळवताच त्यांनाही आनंद झाला. जाता जाता आज्जींनी मला माझे नाव विचारले.." मास्तरं..तुमचं नाव सांगा की..."
" नावात काय आहे आज्जी. पोस्टमन गवळी लक्षात असू द्या बसं.." 
" नाव ओ.."
" नामदेव.."
" मास्तरं..नावात काय न्हाय पण ज्याच्या नावातच देव हाय त्याला काय बी औघडं न्हाय.."

©️®️ लेखक नामदेव सुखदेव गवळी
9767041875

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

817. कोरा कागद

      एक विद्वान, एका आध्यात्मिक गुरूंकडे आला. तो खूप प्रसिद्ध होता, त्या आध्यात्मिक गुरूंपेक्षा जास्त प्रसिद्ध होता आणि त्यांना शास्त्रांच देखिल ज्ञान होतं. सगळी शास्त्र अथपासून इतिपर्यंत त्यांना कंठस्थ होती, परंतु अंतर्यामी मात्र अपूर्णता होती. शास्त्र तर कंठस्थ झाली होती, परंतु तरीसुद्धा सत्य काही सापडत नव्हतं. शब्द तर सगळे पाठ होते परंतु, नि:शब्द होण्याचा कोणताच मार्ग मिळत नव्हता. म्हणून आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी गुरूचा शोध घेतला. त्यांना गुरु देखील भेटले. गुरूंनी त्या विद्वाना कडे बघितलं आणि म्हणाले, " असो, मला  तुझ्यामध्ये खूप अडचणी दिसत आहेत. तुझ्याजवळ ज्ञानाचे भांडार आहे. तुला काय-काय माहिती आहे, ते तू सर्व लिहून आण. तुला तर सर्व माहित आहे, मग त्याची चर्चा कशाला? आपण ते सर्व सोडून देऊ. नंतर,तुला जे माहित नाही ते मी तुला सांगेन."
      शिष्य निघून गेला आणि त्याला एक वर्ष लागले. त्याला तर खूप शास्त्रं माहीती होती, तो सगळं लिहित गेला, लिहितच गेला,  लिहीतच राहिला. कितीतरी हजार पानं भरली. तो हजार पानांची पोथी घेऊन परत आला. गुरु म्हणाले, "आलास तू. मला तर शंका होती की तू येऊ शकणार नाहीस, कारण इतकी माहिती तुझ्या डोक्यामध्ये होती.मला माहिती नव्हते,की किती काळ लागेल."
हजार पानांची पोथी बघून गुरू म्हणाले की, “हे खूप जास्त आहे. मी म्हातारा झालो आहे, माझा मृत्यू जवळ आला आहे. मी इतकं वाचू शकणार नाही. तू हे सगळं संक्षिप्तमध्ये लिहून आण. त्याचे सार लिहून आण."
त्याला तीन महिने लागले. तो विद्वान परत आला. त्याने ते लिखाण संक्षिप्त करून आणलं होतं. आता फक्त शंभर पानं होती. गुरु म्हणाले, "हे देखील जास्त आहे. माझे दिवस कमी कमी होत चालले आहेत. आता तर मी शंभर पानं देखील वाचू शकत नाही. याला तू आणखीन संक्षिप्त करून आण."
शिष्य परत आला. आता त्याने एकाच पानावर संपूर्ण सार लिहून आणलं होतं. परंतु गुरु मरणाच्या दारात होते. ते म्हणाले, “ हे बंधू, हे तर खूप जास्त आहे, तू आणखी संक्षिप्त करून आण. लवकर बाजूच्या खोलीमध्ये जा आणि त्याला संक्षिप्त करून आण."  शिष्याने,ते पूर्ण सार एका ओळीमधे लिहून आणलं,फक्त एकच श्र्लोक.
गुरूंचा शेवटचा श्वास अडकला होता. गुरु म्हणाले, "मी तुझ्यासाठी थांबलो आहे, तुला केंव्हा समज येईल? अजून संक्षिप्त करून आण. संक्षिप्त करण्यामध्ये तू कंजूसी का करतोयस?" तेंव्हा शिष्य भानावर आला. तो दुसऱ्या खोलीमध्ये पळत गेला. एक कोरा कागद घेऊन आला. त्याने गुरूंच्या हातामध्ये कोरा कागद दिला.
 गुरु म्हणाले, "आता तू शिष्य झालास! खरंतर मी आता चाललो आहे, परंतु तू शिष्य झालास. तेंव्हा माझ्याबरोबर तुझा संबंध राहील. जेंव्हा मी जिवंत होतो, तेंव्हा देखील तुझा माझा काहीही संबंध नव्हता, कारण ज्ञान मधे उभं होतं. आता तू कोरा कागद झाला आहेस. रिता झाला आहेस, पणं आता मी चाललो आहे. परंतु चिंता करू नकोस, आपलं नातं जोडलं गेल आहे.  मृत्यू देखील आता ते तोडू शकत नाही. तसं तर जीवन देखील मला तुझ्याबरोबर जोडू शकत नव्हतं." 
त्या रिकाम्या क्षणांमध्ये शिष्याला दिव्यत्व प्राप्त झाले. म्हणजे नक्की काय झालं? ही गोष्ट खूपच अनोखी आहे! कोरा कागद आणताच काय झालं? कोरा कागद आणण्याचा अर्थ होता, अंतर्यामी पूर्ण रितेपण.
       भागवत पुराणामध्ये एक सुंदर गोष्ट आहे. त्या गोष्टीनुसार राधेला या गोष्टीची खूप ईर्षा होती, की भगवान श्रीकृष्ण  नेहमी बासरीला आपल्याबरोबर ठेवतात. एकदा तिने कृष्णाला विचारलं, "या बासरीला तुम्ही कायम आपल्या ओठांवर का ठेवतात? एकही क्षण तुम्ही तिला वेगळं होऊ देत नाही. इतका वेळ तर तुम्ही माझ्याबरोबर देखील घालवत नाही, जितका वेळ तुम्ही या बासरी बरोबर घालवता. याच्यामागे काय कारण आहे?" यावर कृष्ण नुसतेच हसले.
”राधेला, भगवान कृष्णाच्या बासरीचा इतका हेवा वाटत होता, की बासरीच्या आतमधे काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तीने ती बासरी तोडली. परंतु बासरी तोडल्यानंतर तिला कळलं, की बासरी तर आतून एकदम रिकामी आहे."
       तसचं, ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी, आपल्याला आपल्या, अंतरातील प्रत्येक अवांछनीय गोष्टींना हटवून पूर्णपणे शून्यता विकसित करायला हवी. जर ईश्वराने, त्या बासरी प्रमाणेच दिव्य संगीत आपल्या हृदयामधून उमटवावे, असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला आपल्या हृदयातून अवांछित इच्छा, विचार, अशुद्धता आणि जटिलता हे सगळं काढून टाकावं लागेल. समजा, बासरी मध्ये बारीकसा कण किंवा काही अन्य काही गोष्ट राहीली, तर त्या बासरीमधून तुम्ही कोणतही मधुर संगीत निर्माण करू शकणार नाही.

818. Date with Dad” डेट विथ डैड

    रविवारची आळसावलेली सकाळ, सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला. 
“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडुन मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप  बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवी पर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेंशन्स अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळ झालं. वाद नव्हता पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.
मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो
शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहीलं.  
“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय” नाना फक्त हसले. 
“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी  कार्यक्रमाला तू आणि रिया जा” नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.
“आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस” मी  
“ठीकय. एंजॉय पार्टी पण लिमीटमध्ये”
“डोन्ट वरी, थॅंक यू बायको”
“दुपारी जेवायला गोड काय करायचं” बायकोनं विचारलं 
“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो. 
“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसयं”
आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो. 
“काय रे, काही पाहिजे का”
“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मी सुद्धा खूप भावुक झालो. 
“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.
सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी???  प्रचंड गिल्ट आला. 
“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना”
“हो, स्वयंपाक करून जाते”
“नको”
“का??”
“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!!”
“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या. 
“नक्कीच!! पण नंतर आज दोघंच जातो, प्लीज”दोघीनी समजुतीने घेतलं.
“उगीच खर्च कशाला. बाहेर नको” सवयीने नानांनी नकार दिला पण मी हट्ट सोडला नाही. 
संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली.
पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता आता मी. 
काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा....
हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती. 
“टेंशन घेऊ नका. रीलक्स”
“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले. 
“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय” 
“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो त्यानंतर आजच..”
“बापरे, एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट” नाना काहीच बोलले नाहीत. 
“नाना, सॉरी, माफ करा.”
“अरे, होत असं आणि तसंही आता या वयात कसलं आलय वाढदिवसाचं कौतुक!!” 
“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकड दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”
“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”
“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारला. स्वतःवर बंधनं घालून घेतली आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीज मध्ये तुम्ही नव्हताच.”
“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना 
“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं ” मी हात जोडले  एकदम आवाज कापरा झाला तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काहीक्षण शांततेचे होते. 
“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांच नात असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतेच.” 
“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.
“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली. 
“यापुढे काळजी घेईन”
“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”
“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं” नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. सगळा बँकलॉग भरायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.
“काय झालं. हसताय का”
“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.  
“खरं सांगू , बोलायची खूप इच्छा व्हायची पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते” 
“पर्याय नाही”
“मान्य तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचे याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”
“नक्कीच”
“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”
“माझ्याही”
“सर्वात महत्वाचं, आज माझा उपास नाहीये ” नाना मिष्किलपणे म्हणाले. बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती. 
“आयला, हो की....” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली. 
“चायनीज खाऊ” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून  डोळे भरून आले.
बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच  दोघांची नजर आभाळकडं गेली. 
घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व "बाप"माणसांना  समर्पित...

819. साडेतीन मिनिटे : माझा सल्ला

 मी डॉ.  दिपाली,
  माझे म्हणणे आहे की या कडाक्याच्या थंडीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री १० वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा लगेच उठू नये.  कारण थंडीमुळे शरीरातील रक्त घट्ट होते, नंतर हळूहळू काम केल्यामुळे ते हृदयापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही आणि शरीर निघून जाते.  या कारणास्तव, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणारे अपघात हिवाळ्याच्या महिन्यांत खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे, म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  मी पण तीच सूचना देतो.
साडेतीन मिनिटे: माझा सल्ला
 विजयसिंह राजपूत डॉ.  सामान्य चिकित्सक
    ज्यांना सकाळी किंवा रात्री झोपताना लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी खास माहिती. या साडेतीन मिनिटांत प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. ते इतके महत्त्वाचे का आहे? या साडेतीन मिनिटांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.  जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा रात्रीच सुदृढ व्यक्तीही मृतावस्थेत आढळते. अशा लोकांबद्दल आम्ही म्हणतो की, आम्ही त्यांच्याशी कालच बोललो.  अचानक काय झालं?  तो कसा मेला? याचे मुख्य कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री लघवी विसर्जनासाठी जातो तेव्हा अचानक किंवा अचानक आपल्याला जाग येते, परिणामी मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही. ही साडेतीन मिनिटे खूप महत्त्वाची आहेत.
       जेव्हा आपण मध्यरात्री लघवी करण्यासाठी उठतो तेव्हा आपला ईसीजी पॅटर्न बदलू शकतो.  याचे कारण असे की, जेव्हा आपण अचानक उभे होतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते.
    साडेतीन मिनिटांचा प्रयत्न हा एक उत्तम उपाय आहे.
 1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.
 2. पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा.
 3. पुढील अडीच मिनिटे गादीखाली पाय डोलत राहू द्या.
    साडेतीन मिनिटांनी तुमचा मेंदू रक्ताशिवाय राहणार नाही आणि हृदय काम करणे थांबवणार नाही.  यामुळे आकस्मिक मृत्यूही कमी होतील.
      तुमच्या प्रियजनांना फायदा झाला आहे, त्यामुळे त्यांना जाणीव करून देण्यासाठी नक्कीच प्रसारित करा.

820. असेही एक वडिल

     ते जाणार हे सहा महिन्या पूर्वीच माहित झालं होतं सर्वांना. शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्याच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरची देखील गरज नव्हती. अण्णा आता काही महिन्यांचे सोबती होते. त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले. शेवटचा महिनाभर तर हा स्वतः सबंध वेळ शेजारी बसून होता. बिनपगारी रजा काढून.  आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तसं करायची काहीच गरज नव्हती. केस लास्ट स्टेजची होती. त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढी प्रार्थना करण्या पलीकडे कोणाच्याच हातात काही नव्हते. पण हा ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो दिवस आला. अण्णा गेले. आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक. अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते. इतके की त्यांना दोन वर्षांपूर्वी नानी गेल्या हे देखील माहित नव्हते. तेव्हा पासून अण्णा आणि हा दोघेच घरात. नानी गेल्यावर अण्णांचं घरातून बाहेर पडणं कमी झालं. वाचन, टीव्ही कशाचीच विशेष आवड नव्हती त्यांना. BPT मधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे. मिळालेल्या फंडाची पै न पै फिक्स्ड डीपोझीटला टाकून त्याच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालले होते त्यांचे. फालतू खर्च करायचा नाही हा अण्णांचा शिरस्ता. 'गरज' ह्या पलीकडे केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना. आयुष्यभर १८० फुटाच्या डबल रुम मध्ये राहिले. खरं तर ब्लॉक घेणे सहज शक्य होते त्यांना. पण नाही. हा म्हणायचाच, “माझा बाप कवडी चुंबक आहे म्हणून मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेयर करून मी आनंद घ्यायचा. माझ्या वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार. माझा बाप पैसे दाबूनच गचकणार."
बर ह्याला लहानपणापासून पोलियो. उजवा पाय पूर्ण लुळा. डाव्या हाताच्या हालचाली देखील restricted आणि बुद्धी सामान्यच्या खालची. शाळेत आमच्या बरोबर रमला. जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्टसला गेला. ते काही झेपलं नाही. मग कॉलेज सुटलं मधेच केव्हातरी. मग बारीक सारीक नोकऱ्या, उद्योग. वडापावची गाडी, लॉटरीचा स्टाँल सगळं करून झालं. आमची शिक्षणं होऊन संसार सुरु झाले. ह्याचं लग्नकार्य काहीच नाही. तो म्हणायचा देखिल, “साला आम्ही रोकडा प्यारवाले. आम्हाला तुमच्या सारखं आयतं घरात नाही मिळत. आम्ही काँग्रेस हाऊस आणि सुखलाजी स्ट्रीटला जाऊन जेवतो.” 
ते बरोबर की चूक ह्यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायला गेलो नाही. कारण तो करतो ते चूक मग बरोबर काय ह्याचे उत्तर निदान त्याच्या पुरते तरी आमच्याकडे नव्हते.
त्याने त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती. अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाची बुकात एंट्री करायची नोकरी लागली. गेली अनेक वर्ष टिकली देखील. अण्णांच्या आजाराचं कळल्यावर आम्ही सगळे मित्र वेळ मिळेल तसे भेटून येत होतो. सर्वांना जाणवलेला एक फरक म्हणजे त्याचं अण्णांशी बदललेल वागणं. अचानक तो अण्णांच्या खूप जवळ गेल्या सारखा वाटला. इतकी वर्ष आपला बाप कद्रूस आणि सणकी आहे म्हणून एक दुरावा ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भावूक झालेला जाणवला. मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवसरात्र बसणं असो, ते गेले तेव्हा “अण्णा गेले रे” असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अँम्ब्युलंस मधून नेताना, “भटजीला कळवलं आहेस ना रे" अस मला विचारणं असो, हे सगळं आम्हाला नवीन होतं. 
अँम्ब्युलंस मध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूस नव्हतं. तो फक्त अण्णांकडे टक लाऊन पाहत होता. त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येई पर्यंत तो बसला होता. सर्व विधी पार पडले. बॉडी उचलून भट्टी जवळ नेली. भट्टीच्या ट्रोलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून कृश झालेला मृतदेह ठेऊन सगळे मागे होऊन उभे राहिले. भट्टीचे लोखंडी दार उघडले. एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला. ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावलं मागे सरकले. तो तसाच उभा होता. शून्यात नजर लाऊन. ट्राँलीकडे पहात. ट्राँली आपोआप पुढे सरकली, लोखंडी दरवाजा ओलांडून आत गेली, आगीच्या अक्राळ विक्राळ ज्वाळांनी पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या त्या देहाला विळखा घातला आणि स्वतः मध्ये लपेटून घेतले. लोखंडी दार बंद झाले आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवेलेला अश्रूंचा बांध सुटला. 
आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडला. बराच वेळ. आवेग ओसरल्यावर बाहेर पडलो. पाऊस नुकताच पडून गेला होता. स्मशान समोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो. फुक्यानी बिड्या पेटवल्या. ह्याने देखील दोन दम मारले. चहाचे दोन घोट घशाखाली गेल्यावर एक मोठ्ठा दम मारून तो बोलू लागला. “अण्णांचा कॅन्सर डिक्टेट झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला. डॉक्टरनी सहा महिन्याचा टाईम दिला होता. अण्णा खंबीर होते. अण्णांनी मला एक दिवस लवकर घरी बोलावलं. मी समोर बसलो.
आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसा. साला मार्क्स कमी पडायचे, डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण त्यांनी कधी हात उचलला नाही की रागावले नाही यार. त्या दिवशी त्यांनी एक फाईल माझ्या हातात दिली. त्यात त्यांच्या सर्व गुंतवणुकीची माहिती, रिसीट, सर्टिफिकेट सगळं होतं. पुण्याच्या फ्लँटचे माझ्या नावाचे अँग्रिमेंट आणि अकरा महिन्याचं अँडवांस भाडे घेतल्याची पावती पण होती. मला म्हणाले, "माझ्या नंतर तुला काम करायची गरज नाही. मजेत जग फिरुन ये. स्वत:ची काळजी घे. खर्च केलेत तरी संपणार नाहीत ऐवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत." मी ती फाईल घेऊन उठलो. अण्णा काँटवर झोपले. रात्री मी ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी माझ्या हाताला लागली. सहज उघडली. त्यात एक जुनं पत्र होतं. अण्णांनी कोकणातून नानीला लिहिलेलं. 
अण्णांनी लिहिलं होतं की, "आज पहाटे आपल्या घराबाहेर कापडात गुंडाळलेला एक मुलगा सापडला. उत्तम असता तर पोलिसांना कळवून अनाथाश्रमात पाठविला असता. पण हे खास पिल्लू दिसत आहे. आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळणेश्वराने दिलेला प्रसाद. त्याला मी आपला मानला आहे. तो जसा आहे तसा मला मान्य आहे. आता आणखी अपत्य नको. हाच आपला आहे. जसा आहे तसा. आपल्या नंतर त्याची सोय करणे महत्वाचे आहे. सबब आज पासून स्वत:वरील सर्व खर्च बंद. मी त्याला घेऊन उद्या कोकणातून निघणार आहे."
आम्ही सगळे सुन्न होऊन ऐकत होतो. प्रसाद बोलत होता. "तो भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्या नंतर का होईना आपल्याला समोर दिसणारा माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो. अण्णा परत कधीच दिसणार नाहीत हे जाणवले आणि मला राहवले नाही. जाम रडायला आलं. साला आयुष्यभर कद्रुसपणा करणारा माझा बाप. माझा बाप नव्हताचं रे. तो माझ्या उद्यासाठी स्वत:च्या आजचं बलिदान देत असलेला एक देव होता ज्याचं देवत्व मला त्याचा अवतार संपवायच्या जरा आधी लक्षात आलं. मला सत्य समजू नये म्हणून त्याने नातेवाईक तोडले. आणि मी. साला माझी लायकीच नाही यार त्याचा मुलगा म्हनवून घ्यायची."
डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना वाहू देत होता. मोकळा होत होता. थोडा थांबून तो म्हणाला, "मी अण्णाला कळू दिलं नाही की मला सत्य माहित झालं आहे. पण जमेल तेवढी त्यांची सेवा करुन आयुष्यात त्यांना त्यांच्या मागे दिलेल्या शिव्यांच प्रायश्चित्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला यार." आम्ही ऐकत होतो. प्रसाद फुटून रडत होता. पाऊस जोरात सुरु झाला होता. अण्णांचा प्राण पंचतत्वात विलीन झाला होता. प्रसादच्या झोळीत आनंदाचे दान टाकून एक अवतार संपला होता. पाऊस अजून जोरात कोसळू लागला होता.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

814. दानपेटी

 तो त्या दानपेटीत दररोज पांच रुपये टाकायचा. त्याचे ते नियमित देवळात येणे, देवाला नमस्कार करणे आणि दानपेटीत पांच रुपये टाकणे तिथल्या विश्वस्थांच्या ध्यानात आले होते. त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते. कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला बरोबर  घेऊन यायचा.  तेंव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे. त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्थानी पाहिले नव्हते. त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता. अशी वीस वर्षे संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही. आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व   स्कुटर, मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात . मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही. सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते. तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबाने चुकविला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्थानी पाहिले देखील. मात्र हा आपणहून कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखडे सांगीत नसे. सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता.
एके दिवशी देवळाच्या विश्वस्थानी हिय्या केला व आपुलकीने  त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता ? तुमचे काम सुटले आहे काय ? कसली चिंता भेडसावत आहे ? तो कसनुसे हसला. बोलला ," कांही नाही हो, मुलीचे लग्न ठरलेय व पैशाची जोडणी कांही झालेली नाही. स्थळ चांगले आहे. हातचे जाऊ नये असे वाटतेय. पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे ? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसे कांही उचलून द्यायला तयार नाही. म्हणून काळजीत आहे, इतकेच. बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते ?"
" अरे पण खर्च तरी किती आहे ?" विश्वस्थ.
"पंचवीस-तीस हजार तरी नक्की लागणार हो." तो 
त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. त्या विश्वस्थाच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोपदेखील नाही झाली. पहाटे त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता. जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले , खाऊ लागले. त्याने देवाकडे पाहिले. तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला. तो पटकन उठला. वही घेतली व हिशोब करू लागला. एकूण वर्षे वीस. एकूण दिवस ७३००/- दररोज रुपये पाच ने झाले ३६५००/-. त्याने ३६५००/- ची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला. झोपेत पुन्हा तेच स्वप्न ! तो जागा झाला व आठवू लागला. पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवले. दानपेटीतील जमा पैसे आपण एफडी'त ठेवतो हेही त्यास आठवले . त्यांनी हिशोब केला. सरासरी जमा रुपये १८२५0/- वर्षाचे अंदाजे व्याज २०००/-. वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी.
तो विश्वस्थ आता निश्चिन्त झाला होता. त्याने देवाच्या तिजोरीतून शहाहत्तर हजार पाचशेची थैली तयार करून ठेवली. आता त्यास शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. त्याने देवाला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत रुपये पाच टाकले व ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्थ देवळातील आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरिबाला दिली . सांगितले," बाबा रे , तू दररोज देवाला पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत ३६५००/- रुपये  वाहिलेस.  वीस वर्षांत त्याचे ७६५००/- रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत . आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत . म्हणून तुझे पैसे तू मोजून घे !" 
गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जसे कांही मोठे स्वप्न पडले होते. तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला. सर्वजण खूप भावूक झाले. देव प्रसन्न हसत होता. गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली. त्याने घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले. आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली. पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता . 'माझे दान देवाने परत तर नाही ना केले ?' असे त्याचे मन त्यास खाऊ लागले. काय करावे त्याला सुचेना. त्याने विश्वस्थाना बोलावले व मी जे देवाला पाच रुपये वाहिले त्याचे वीस वर्षात किती होतात असे विचारले . त्यांनी सांगितले की ३६५००/- होतात. गरीबाने थैलीतील ३६५००/- रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस ? तो बोलला ," मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय . तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवद्य होता. उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवद्य आता मी निश्चिन्त मनाने देवास वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी  तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवाने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जातो आहे ." 
आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले. देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता.   थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठविलेली कोणतीही गोष्ट; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. 

  बोध
आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केंव्हा ना केंव्हा आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जाते.

815. भाऊंच्या मुलीच लग्न

     भाऊंच्या मुलीच लग्न झालं. लग्नात लाखो रुपये खर्च झाले. लग्न झाले. पार पडले. लग्नात हजार ,दोन हजार लोकं आली. लांब लांब चे नातेवाईक आले (सुट्या काढून) मुक्कामही केले. भाऊची कॉलर टाईट झाली. वॉर्डातून, गावातून निघतांना वेगळाच आनंद असायचा. पोरीच्या लग्नानंतर भाऊ जवळपास दोन महिने लग्नाच्याच चर्चा करायचे. (जीवनभराची कमाई लग्नात निछावर करून आटापिटा करून धुमधडाक्यात भाऊने पोरीचं लग्न लावले). मग काय. चर्चेत एकच .. "२००० लोकं आली,मुंबई, दिल्ली विदेशातून संबंधित नातेवाईक आले. पाहुनचार तर  बोलायचं कामच नाही. लग्न आटोपून दोन तीन महिने गेले. पण भाऊ लग्न नाही विसरला.  " भाऊ आजारी पडला. गेल्या सात दिवसापासून भाऊ ICU मध्ये भरती आहे "  पण लग्नात आलेल्या २००० लोकांचा कुठं पत्ताच दिसत नव्हता" कुठे गेली ती पाहुनचार करणारी लांब लांबची माणसं? भाऊ ने होती नव्हती कमाई लग्नात खर्च केली. कर्जही घेतलेआणि  आता ICU मध्ये भरती आहे सात दिवसाचा ICU चा खर्च.डॉक्टर सुट्टी देण्याचं नाव घेत नाही.
भाऊची पत्नी व्याजाने पैसे घेत आहे. नातेवाईकांनाच पैश्याची अडचण ते तरी कुठून देतील?
भाऊ बेडवर पडून होते. मी गेलो भेटायला. भाऊच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत होते. रडत रडत मला म्हणाले.
रवीदादा, तुमचं ऐकलं असत तर बरं झालं असत. तुम्ही म्हणत होता, मुलीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तिच्या शिक्षणावर पैसा खर्च कराल तर 100% return मिळेल. याला आमच्या बिजनेस लँग्वेज मध्ये Return On इन्व्हेस्टमेंट म्हणतात. नातं असो की मैत्री सर्व सुखाचे भागीदार असतात.आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागते. रवीदादा, मी खूप मोठी चूक केली. शान मारण्यासाठी मी सर्वच जमा पुंजी लग्नात खर्च केली. आता माझ्यावर अगोदरच कर्ज आणि वरून मी हॉस्पिटलमध्ये आणि सर्वांनीच मदतीचा हाथ काढून घेतला. त्यांना वाटत असेल की मी पैसे परत कधी आणि कसे करेल? हे सांगताना भाऊ च्या डोळ्यातून अश्रू ढसा ढसा वाहत होते. भाऊ म्हणाले " रवीदादा, माझ्याकडे आता काहीच नाही.. पूर्णपणे कंगाल झालो आहे " 
हे सांगताना अचानक धडकन आवाज आला आणि बाहेर आरडा ओरड सुरू झाला. मी दरवाजा खोलून बाहेर गेलो. बाहेर पाहून माझं हृदय स्तब्ध झालं. माझ्याही डोळ्यात आता अश्रू होते. कारण,भाऊ ची पत्नी हार्ट attak ने दगवली होती. ( त्यांची पत्नी आमचं बोलणं  लपून ऐकत होत्या. ) मी लगेच भाऊ कडे आलो. भाऊ तडफडत होता मी मोठ्याने डॉक्टरला आवाज दिला.शेवटी भाऊचा ब्रेन ह्यमरेज ने मृत्यू झाला. माझं मन अतिशय सुन्न  झालं. रात्री झोप लागत नव्हती. पत्नीने विचारलं काय झालं? तिला संपूर्ण स्टोरी सांगितली. तिचंही मन सुन्न झालं. आणि म्हणाली 
"जर भाऊ ने लग्नात तोरा मिरविण्यासाठी अतिउत्साहात पैसा खर्च केला नसता तर भाऊ आज जिवंत असते "
आणि म्हणाली मी आजपासून विनाकारणचा खर्च टाळण्याचा प्रयत्न करते."
भाऊच्या अंत्यसंस्काराला मी जाऊ शकलो नाही. पण मी माहिती घेतली तेव्हा कळले. अंत्यसंस्कारच्या वेळी जवळपास दीड ते दोन हजार लोकं उपस्थित होती. लग्नाच्या वेळी ही जवळपास २००० लोकं होती. मरणाला आणि लग्नाला जी लोकं होती तीच लोकं  रामभाऊ हॉस्पिटल ला ICUमध्ये असताना  कुठे गायब झाली? आताही भाऊ ची आठवण येते. जिथंही थाटामटात लग्न दिसते. फक्त भाऊ सारखं हाल होऊ नये हीच इच्छा. संकटाशी एकट्यालाच सामना करावा लागतो, लोकं काय म्हणतील याला बळी पडु नका. अज्ञानाने आम्हीही कधीकाळी याला बळी पडलो आहे.  पुढच्याच ठेच मागचा शहाणा व्हावा हाच उद्देश ठेवून ही पोस्ट लिहिली. विसरू नका  सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग. 

816. वडापावची बातमी

 दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. जर ही बातमी वेगवेगळ्या लेखकांना लिहायला सांगितली तर ते कशा प्रकारे लिहीतील याची उदाहरणे. तत्पूर्वी शेयर करा नक्की 

नवकथा
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

नवकविता
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी 
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी 
अंग चोरून पडलेली 
वडे तळणाऱ्या माणसाच्या 
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब 
ठिबकतायत 
पुढ्यातल्या कढईत 
टप टप टप 
येतोय आवाज 
चुरर्र चुर्र 
ही खरी घामाची कमाई 
पुढ्यातल्या 
टवका गेलेल्या बशीतला 
वडा-पाव खाताना 
त्याच्या मनात येउन गेलं 
उगाचच

ललित
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.
'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं.
'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा.

शामची आई व्हर्जन
'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'

जी. ए. कुलकर्णी व्हर्जन
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.

गो. नि. दांडेकर व्हर्जन
हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?

ग्रेस व्हर्जन
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!
मूळ लेखक - ठाऊक नाही पण जो कोण आहे एकदम भन्नाट

संकलक ★ प्रा. माधव सावळे

813. संघर्ष

 एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला. कधी पूर येऊ शकतो, कधी दुष्काळ पडू शकतो, कधी सूर्य खूप प्रबळ असू शकतो तर कधी गारपीट होऊ शकते. प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याचे पीक खराब होते, एके दिवशी तो खूप वैतागला आणि देवाला म्हणाला, हे पहा, देवा, तूच देव आहेस, पण तुला शेतीचे फारसे ज्ञान नाही, असे दिसते. प्रार्थना केली की एक वर्षासाठी मला संधी द्या, मला हवे तसे हवामान असावे, मग तुम्ही कराल बघा मी अन्नाचे भांडार कसे भरू शकतो देव हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला सांगेल तसे हवामान देतो, मी हस्तक्षेप करणार नाही. 
        शेतकऱ्याने गव्हाचे पीक पेरले, जेव्हा त्याला सूर्यप्रकाश हवा होता तेव्हा तो मिळाला, जेव्हा पाऊस होता. त्याने काळाबरोबर कडक सूर्यप्रकाश, गारपीट, पूर, वादळ येऊ दिले नाही.पीक वाढले आणि शेतकऱ्याचा आनंदही वाढला, कारण असे पीक आज खूप चांगले आहे.शेतकऱ्याने मनात विचार केला की आता देवालाच कळेल की आपण पीक कसे काढतो, आपण शेतकरी इतके वर्ष काहीही केले नाही म्हणून त्रास देत राहिलो.  पीक काढणीची वेळही आली, शेतकरी मोठ्या अभिमानाने पीक काढायला गेला, पण लगेच त्याने कापणी सुरू केली, तो अचानक.  बरोबर त्याच्या छातीवर हात ठेवून बसला.आत गव्हाचा एक कनही आत नव्हता, सर्व आतून रिकामे होते, तो खूप दुःखी होता. मग त्याने देवाला विचारले, हे काय झाले?
तेव्हा देव म्हणाला, "हे तर व्हायलाच हवे होते, तू झाडांना झुंजण्याची किंचितही संधी दिली नाहीस, उन्हात न्हाऊन काढू दिली नाहीस, वादळ-गारपिटीशी झुंजू दिल नाहीस. त्यांना कोणत्याही प्रकारचे आव्हान वाटू द्या, म्हणूनच सर्व रोपे पोकळ राहिली , जेव्हा वादळ येते, जोरदार पाऊस पडतो किंवा गारपीट होते, तेव्हा वनस्पती स्वतःच्या पायावर उभी राहते, तो अगदी सुरुवाती पासूनच उभा राहतो, तो आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडतो आणि या संघर्षातून निर्माण होणारी शक्ती त्याला शक्ती, उर्जा देते आणि त्याचे चैतन्य वाढवते. कुंदन होण्यासाठी सोन्यालाही आगीत तापवणं, हातोड्याने मारणं, वितळणं अशा आव्हानांना तोंड द्यावं लागतं, तेव्हाच सोन्याचा आभा उगवतो आणि ते मौल्यवान बनतं.
      त्याचप्रमाणे जीवनातही संघर्ष, आव्हान नसेल तर माणूस पोकळ राहतो आणि त्याच्यात कोणतीही गुणवत्ता विकसित होत नाही. हीच आव्हाने आहेत जी माणसाच्या तलवारीला धारदार बनवतात, त्याला धारदार आणि धारदार बनवतात. जर आपल्याला प्रतिभावान बनायचे असेल तर आपल्याला आव्हाने स्वीकारावी लागतील, अन्यथा आपण पोकळ राहू. जीवनात हुशार व्हायचे असेल, प्रतिभावान व्हायचे असेल, तर संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल.
  बोध
  संघर्षातून निर्माण होणारी शक्ती उर्जा देते व चैतन्य वाढवते. संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

810. संत गाडगे महाराज

 जन्म: २३ फेब्रुवारी १८७६; जन्म कोतेगाव (शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे
      संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या- गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली... रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत.
    गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

बालपण : 
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला... त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा : 
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके- तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली... महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
 संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश.
भुकेलेल्यांना = अन्न.
तहानलेल्यांना = पाणी. 
उघड्यानागड्यांना = वस्त्र.
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत.
बेघरांना = आसरा.
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार. 
बेकारांना = रोजगार.
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय.
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न.
दुःखी व निराशांना = हिंमत. 
गोरगरिबांना = शिक्षण.
हाच आजचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे.

संक्षिप्त चरित्र :
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले... ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले. १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात, 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.' १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली. गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. . गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब. आंबेडकर : 
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या    डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली.           २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली... त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून?" पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा." संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.

संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी
स्त्रोत: विकिपीडिया..

811. राजाचा उत्तराधिकारी

      एके काळी. राज्यात नंदाराम नावाचा राजा होता. तो खूप प्रामाणिक आणि धैर्यवान होता. त्याचे आपल्या रयतेवर खूप प्रेम होते. त्याच्या राज्यात सर्वजण त्याच्यासोबत आनंदाने राहत होते. राजाला एक गोष्ट नेहमी त्रास देत असे की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याची काळजी कोण घेणार, कारण त्याला मूल नव्हते. एके दिवशी राजाने स्वतःच्या राज्यातून एका तरुणाला उत्तराधिकारी म्हणून निवडायचे ठरवले. त्याला आपल्यासारख्या प्रामाणिक मुलाकडे सत्ता सोपवायची होती, जो लोकांची काळजी घेईल. बराच विचारविनिमय केल्यानंतर राजाने राज्याच्या सर्व होतकरू मुलांना दरबारात बोलावून जाहीर केले - मला तुमच्यापैकी एकाला माझा उत्तराधिकारी बनवायचे आहे. यासाठी तुम्हा सर्वांची परीक्षा दिली जाईल, जो पास होईल तो माझा उत्तराधिकारी होईल. यानंतर राजाने तेथे उपस्थित असलेल्या सर्व मुलांना प्रत्येकी एक बीज दिले आणि त्यांना सांगितले की घरी जाऊन हे बी एका भांड्यात लावा.  4 महिन्यांनंतर प्रत्येकजण आपल्या रोपांसह येथे पुन्हा एकत्र येईल. त्यावेळी मी तुमच्यापैकी एकाला माझा उत्तराधिकारी करीन. सर्व मुले विचार करत होती की राजा आपला उत्तराधिकारी बनवण्यासाठी काही कठीण परीक्षा घेणार आहे, परंतु भांड्यात बी पेरल्याबद्दल ऐकून सर्वांनी ही परीक्षा सोपी आहे असे मानले आणि आनंदाने घरी परतले. जसजसा वेळ निघून गेला तसतसे सर्व मुलांच्या कुंडीतून बिया दिसू लागल्या, पण तन्विक नावाचे एक मूल होते, ज्याच्या कुंडीत रोपाचा मागमूसही नव्हता.
       तन्विकसोबतच्या इतर मुलांची रोपे वाढू लागली आहेत हे पाहून तो खूप अस्वस्थ झाला. तो मनात विचार करत होता की प्रत्येकाच्या कुंडीत रोपे उगवली आहेत, पण त्याच्या कुंडीत रोपे का उगवत नाहीत? आपल्या रोपाची वाढ होण्यास जास्त वेळ लागेल असे त्याला वाटले, म्हणून त्याने हार मानली नाही आणि पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन भांड्याची अधिक काळजी घेतली. हळुहळु ४ महिने उलटले, पण तन्विकच्या कुंडीतून एकही रोप आले नाही. त्याच वेळी, बहुतेक सर्व मुलांच्या कुंडीत झाडे वाढली. काही मुलांच्या रोपांवर फुले व फळेही दिसू लागली. राजाकडे जाण्याची वेळ आली आहे. तन्विकला वाटले की तो राजाकडे गेला तर त्याचे फुलांचे भांडे पाहून सगळे त्याची चेष्टा करतील. तो रोज मडक्याला पाणी द्यायचा आणि त्याची काळजी घेत असे, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तन्विकच्या आईने त्याला समजावले आणि सांगितले की त्याचा परिणाम काहीही होवो, तू त्याची बीजे परत करायला राजवाड्यात जा. जे होईल ते आम्ही पाहू. आईच्या सांगण्यावरून तन्विक राजी झाला आणि रिकामे भांडे घेऊन राथवाड्यात पोहोचला. तेथे त्याने पाहिले की प्रत्येकाच्या कुंडीत सुंदर रोपे आहेत आणि प्रत्येकजण खूप आनंदी आहे. त्याचे भांडे पाहून सगळे हसायला लागले आणि त्याच्या मेहनतीचे कौतुक करू लागले. तो शरमेने डोळे खाली करून शांत बसला.
      इतक्यात राजा आला आणि सर्वांची भांडी काळजीपूर्वक पाहू लागला. तन्विकच्या भांड्यापाशी पोहोचल्यावर त्याने विचारले - हे भांडे कोणाचे आहे? तन्विक - होय, माझे... राजसाहेब - तुझे भांडे रिकामे का आहे? तन्विक - मी रोज पाणी घालत असे. मी त्याची खूप काळजी घेतली, पण त्यातून एकही रोप उगवले नाही. राजा - चल माझ्यासोबत. राजाने त्याला बोलावल्यावर तन्विक घाबरला, पण त्याला राजाची आज्ञा पाळावी लागली. तो हळूच राजाच्या दिशेने पुढे सरकला. राजाने त्याला सिंहासनाजवळ नेले आणि म्हणाले - या राज्याचे खरे वारसदार तूच आहेस. राजाच्या या निर्णयाने तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.  राजा म्हणाला - मी दिलेले बी खोटे होते. त्यातून एक वनस्पती येऊ शकली नसती. तुम्ही सर्वांनी बिया बदलल्या, पण तन्विकने 4 महिने प्रामाणिकपणे काम करून आपले अपयश स्वीकारून रिकामे भांडे माझ्यासमोर आणण्याचे धाडस दाखवले. तन्विकला राजामध्ये जे गुण असले पाहिजेत ते सर्व आहेत. म्हणून मी तन्विकला या राज्याचा पुढचा उत्तराधिकारी बनवतो. सर्व तरुणांनी शरमेने मान खाली घातली. तो शांतपणे कोर्टातून निघून गेला. अशा प्रकारे तन्विकला त्याच्या प्रामाणिकपणामुळे राज्याचे सिंहासन मिळाले.

बोध
  आपण कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडू नये. माणसाला त्याच्या सत्य आणि प्रामाणिकपणाचे फळ नक्कीच मिळते.

812. शेवटची भेट

     शेखर परत ओरडा आरडा करत घराबाहेर पडला.रोजचच झालं होतं हे. रेवा निमूटपणे त्याच्या रागीट स्वभावाला सहन करत दिवस रेटायची. तो खूप प्रेमळ आहे पण हे ऐकवत ऐकवत सासूबाईंनी तिला नेहमीच समजावत संसार म्हणजे स्त्रीचं बलीदान वगैरे ऐकवत ऐकवत मुलं सुनेच्या मधे वाटाघाटी केल्या होत्या. त्यांच्यापरीने त्यांनी उत्तराला उत्तर टाळून घरात शांतता नांदवायचा प्रयत्न केला होता. मुलाला समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे हे कळल्यावर त्यांनी त्याला काही समजावणं टाळलेलंच होतं. शेखर चे बाबा खूप तापट म्हणून नातेवाईकांमधे प्रसिद्ध होते. त्यामुळे,वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन वळणाचं पाणी वळणावरच जाणार, म्हणून सोडून दिलं होतं आईने. सुनेसाठी मनापासून जीव तुटायचा ,पण मुळात बुजऱ्या स्वभावाची असल्याने विशेष करताही येत नव्हतं. एक दिवस सकाळीच हृदय विकाराच्या झटक्याने शेखरची आई वारली. आणि मग रेवाला वाटलं आपलं सुखं दुःखं समजून घेणारी एकुलती एक व्यक्तीपण गेली.तिचे आई वडील तर तिला कधीच पोरकं करून गेले होते.
     आई गेल्यानंतर गरम डोक्याचा असला तरी मनानी हळवा असलेला शेखर अजुनचं बिथरल्यासारखं वागायला लागला. कालपर्यंत वडील म्हणजे आदर्श मानलेला असल्याने त्यांचंच वागणं तंतोतंत बघून वागत आयुष्याची ५५ वर्ष घालवली होती. ‘स्वभावो दुरतिक्रमः’ ह्या उक्तीनुसार त्याच्या आणि बाबांच्या वागण्यात काही फरक पडेल, अशी सर्व आशा रेवाने सोडूनच दिली होती. रेवा आणि तिची दोन्ही मुलं आपापल्या परीने बाबा आणि आजोबांना शांत ठेवण्याच्या प्रयोगाला कंटाळत चालली होती. रेवाला आजकाल बाबांच्या वागण्यात मात्र फरक जाणवत चालला होता आई गेल्यापासून. ते अचानक शांत राहायला लागले होते, पेक्षाही रेवाला मदत करण्याकडे त्यांचा कल वाढत चाललं होता.ते आजकाल तिचं मन सांभाळायचा प्रयत्न करायचे. रेवाने आवर्जून मैत्रिणींना ही गोष्ट संगितली. तर त्या तिला म्हणाल्या सुद्धा, “आता त्यांना माहित आहेना त्यांना तुझ्याशिवाय पर्याय नाही म्हणून हा तात्पुरता बदल.सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को”
    पण आजही बाबा स्वतःच सर्वकाही स्वतः करायला सक्षम आहेत, हे रेवा जाणून होती त्यामुळे बाबांमधला हा सुखद बदल तिला आवडला होता. आईंना जाऊन जेमतेम तीन महिने उलटले असतील. अचानक एक दिवस शेखर ऑफीस मधून घरी आला आणि चहामधे साखर जास्त पडल्याचा शुल्लक कारणावरून घर डोक्यावर घेतलं. तीन महिन्यापासून असलेली थोडीफार शांतता आज शेवटी भंग पावली.
रेवा चार चारदा म्हणत होती, “मी दुसरा चहा देते” पण एक कप चहा न पटल्यावरून थेट तिच्या शिक्षणापासून ते दिवंगत आई वडील सगळ्यांचा उद्धार झाला.
बाबा बाजूलाच बसले होते आणि अचानक म्हणाले, “रेवा आज मी आणि शेखर डिनरला घरी नाही.”
चहात आज साखर जास्त झाली म्हणून रागावून आज हे लोक घरी जेवणार नाहीत असे समजून रेवा खूप वेळा सॉरी पण म्हणाली.पण...
इकडे आज बाबांचा आपल्याला सपोर्ट आहे असे बघून शेखरला जरा जास्तच चेव आला होता.
तो म्हणाला, “हो बाबा आपण बाहेरच जाऊ,जेवणासाठी इतकी मरमर करायची आणि तेच अन्नपाणी चविष्ट मिळत नसेल तर काय उपयोग? आपण आत्ताच निघूया चला आठ तर वाजलेच आहेत. ह्या चहानी तोंडाची पार चव गेली आहे.”
बाबांनी रेवाकडे पाहून गप्प राहा असे खुणेनीच सांगितले.
बाबांचा हा पवित्रा नविन होता रेवासाठी.
पण ह्या दोघांपैकी एकालाही प्रश्न विचारायची तिला कधीच हिम्मत नव्हती.
शेखरने गाडी काढली आणि बाबांना घेऊन जवळच्याच रेस्टॉरंट मधे दोघे पोहोचले.
शेखर आणि बाबा बरेचदा ड्रिंक पार्टी करायला इथेच यायचे.आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच आले होते.
पुरुषांनी कसं पुरुषार्थ बाळगावा,पुरुष जरा तडक फडक च शोभून दिसतो शेमळट नाही.वगैरे बाळकडू इथेच शेखरला मिळालं होतं.
पण आज बाबा चक्क ड्रिंक्स घ्यायला नाही म्हणले,शेखरसाठी हा धक्काच होता.
तो म्हणाला, “बाबा तुम्ही आणि व्हिस्कीला नाही म्हणत आहात.काय झालं तुम्हाला ?आजकाल शांत शांतही असता?”
बाबा अचानक रडायला लागले, बराच वेळ कोंडलेल्या भावना उफाळून आल्या, “ आर्त स्वरात शेखरला म्हणाले स्वतःला शिक्षा कशी द्यायची हा विचार करतोय,माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी सोडून देईन,सगळं करेन पण तिची माफी कशी मागू ?तो एक मार्ग देवाने सुचवावा... तिचीच काय आजपर्यंत ज्यांना ज्यांना जिव्हारी लागणार बोललो त्यांची माफी मागितली तर माफ करतील का मला ते ?
तिने शेवटचा श्वास घेतला त्या दिवशी सुद्धा मी तिला वाटेल तसं बोललो होतो.. आज त्या भांडणाचं कारण जरी आठवलं तरी लाज वाटते आहे स्वतःची. माणूस इतका कसा स्वार्थी होऊन जातो ?स्वतःच्या काही विक्षिप्त कल्पनांसाठी आपण दुसऱ्याला किती गृहीत धरतो ना?
पण एक दिवस असा येतो आयुष्यात की चूक झाली, आपण दुसऱ्याला दुखावलं हे समजल्यावरही काहीच करता येत नाही.
बेटा हे कालचक्र आहेना ते गोल फिरत रे,पण पुढे . मागे नाही नेता येत.मला ह्याची जाणीव झाली आणि माझी सगळी नशा खाडकन उतरली.आता कुठलिही व्हिस्की मला कामाची नाही. तुझ्या आईची मनापासून माफी मागायची आहे रे.पण कुठून आणू तिला ? आता एका क्षणासाठी तरी. तिला सांगायचं होतं तिच्यावर हक्क गाजवायचो, तिचा सतत पाणउतारा करायचो पण माझं खूप प्रेम होतं तिच्यावर.तिला माहित असेल का ते ? की एक तमासखोर माणूस नवरा म्हणून नशिबी आल्याने ती आयुष्यं संपल्याचा आनंद मानून ह्या जगातून गेली असेल ?
काय माहित सगळेच प्रश्न आता अनुत्तरित राहतील. एक धडा घेतला मात्र मी त्या दिवशीपासून.
बोलताना १०० वेळा विचार करून बोलायचं.आजनंतर तो माणूस आपल्याला आयुष्यात परत कधीच दिसला नाही तरी आपण तेव्हा असं नको होतं बोलायला ही आपल्याला बोचणी राहता कामा नये.अत्यंत विचारपूर्वक बोलायचं.
आयुष्यं असं जगायचं जणू काही ही आपली शेवटची भेट. कधी चुकून दुखावलंच कोणाला तर पटकन मनापासून साॅरी म्हणून टाकायचं.काय माहित पुन्हा संधी मिळेल का? फार भयंकर असत रे अपराधी पणाची भावना घेऊन जिवंत रहाणं.खास करून जेव्हा ती माणसं आपल्याला सोडून जातात,जी आपल्या जगण्याचं कारण असण्याची जाणीव होते आपल्याला नंतर. तेवढ्याकरीता तुला आज इथे आणलं. मी ज्या यातना भोगतो आहे त्या तुझ्या वाटेला येऊ नयेत म्हणून आज तुला माझा हा एक मोलाचा सल्ला समज. कारणं इथेच बसून नाही नाही त्या पुरुषार्थाच्या खुळचट कल्पना तुझ्या डोक्यात घुसवल्या मी. बघ आजच जागा हो.
      आपल्या मृत्यूनंतर रडणारे नसले ना तरी चालतील.पण निदान कुणाला सुटकेची भावना वाटेल इतकं दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू नये माणसांनी. आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात तोपर्यंतच त्यांची किंमत कळलेली बरी. किती शुल्लक कारणांनी आपण जिवाभावाची माणसं तोडतो.आणि मग झुरत बसतो त्यांच्यासाठी आयुष्यभर. ”
बाबा असे हताश,केविलवाणे शेखरने ५५ वर्षात कधीच पहिले नव्हते. आईला कधीच खिचगणतीतही न पकडणारे बाबा आज आईच्या आठवणीने इतके कासाविस होताना पाहून शेखरही खूप भावुक झाला. बाबांना समजावण्यासाठी तो म्हणाला, “बाबा तसंच काहीतरी कारण घडल्याशिवाय तुम्ही भांडला नसणार आईशी,मला माहित आहे. जाऊद्या कुटुंबात होत असतात अशी भांडण. ”
तसे बाबा म्हणाले, “हो रे आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की आपण योग्यच गोष्टीसाठी बोलतो आहोत. पण आपण नुसती चूक दाखवून गप्प नाही बसत ना ? आपण त्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. नाहीच जाणवत हे सगळं जोपर्यंत डोळ्यासमोर निमूटपणे ऐकून घेणारी ती व्यक्ती दिसत असते. पण आज मला जे आतून होत आहे ना ते शब्दात सांगणं कठीण आहे बाळा. काही म्हणजे काहीच श्रेष्ठ नसतं जगात ज्यासाठी आपण आपल्या माणसाला इतकं दुखवावं,अगदी आपला अहंकार सुद्धा. किती क्षुद्र भांडणाचं कारण होतं त्या दिवशी,मी सहज दुर्लक्ष करू शकलो असतो.पण कुठे माहित होतं इतकं धडधाकट आरोग्य असलेली तुझी आई,तो तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल आणि आमची शेवटचीच भेट. तिच्यापेक्षा मोठं नक्कीच नव्हतं ते कारण.”
शेखरने न राहवून विचारलं, “बाबा काय झालं होतं एवढं त्या दिवशी ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला इतकं खात आहे ?”
बाबा हताशपणे म्हणाले, “सकाळी सकाळी माझ्या किती तरी आधी उठून तयार होऊन मला आवडतो म्हणून माझ्या बरोबर चहा घ्यायला माझ्या आवडीचा चहा घेऊन तुझी आई खोलीत आली. माझं बेड टी प्रकरण तिला कधीच आवडायचं नाही तरी ती माझ्याबरोबर चहा घ्यायची. मी पहिला घोट घेतला आणि रागात तो चहाचा कप फेकून दिला.”
शेखरने कुतूहलाने विचारलं “का ?”
तसे बाबा म्हणाले, “तुझाच बाप ना मी तिने चुकून चहामधे साखर घालताना माझ्याच कपात दोन वेळा साखर घातली. त्या गोडव्याला इतकं वाईट झिडकारलं मी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला गोडवा कायमचा संपला. तिच्याबरोबर. हे सगळं ऐकून शेखरचे डोळे खाडकन उघडले होते, “बाबा प्लिज पटकन घरी चला.”असं म्हणून हॉटेलमधलं वाढलेलं ताट अर्धवट सोडून टेबलवर पाकिटातले सगळे पैसे ठेऊन तातडीने शेखर बाबांना घेऊन घरी पोहोचला. रेवाने दार उघडल्याबरोबर सुटकेचा निश्वास टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “ रेवा मला माफ कर मी परत कधीच तुझा अपमान करणार नाही.”
देव्हाऱ्याकडे बघून नकळत त्याच्या तोंडातून शब्द फुटले, “ थँक यू देवा मला आयुष्यात एक संधी दिल्याबद्दल.”

©️ ऋचा माय
        कशी वाटली कथा? आपण कळत नकळत कधीतरी कोणालातरी दुखावलेलं असतं ना? अनेकदा तर एकाच माणसाला अनेकवेळा फक्त हक्काचं माणूस म्हणून.मग पश्चातापही होतो पण मग अहंकार आड येतो किंवा त्या नात्याला गृहीतच धरलेलं असतं म्हणून माफी सुद्धा मागत नाही. असा वारंवार दुखावलेला माणूस अचानक जर आयुष्यातून वजा झाला मग काही कारण असेल.अगदी मृत्यू नसेल पण सोडून जातात ना कित्येक लोकं? ते नवरा बायको असतील,मुलं असतील,आई वडील असतील,भावंड असतील,मित्र मैत्रिणी असतील. आजच त्यांना जपून ठेवता आलं तर? कदाचित उद्याचं जगण सोपं करता येईल. ज्या नात्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही आयुष्यांत असं वाटत असेल ते आजच वाचवून बघायला हवं. ती भेट शेवटची ठरण्याआधी.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...