सोमवार, ३० जून, २०२५

2030. वाढदिवस

      दोन दोन पिशव्या हातात घेऊन तळपत्या उन्हात चालत नलूताई घरी आली. सतीशला जाऊन चार वर्षं झाली होती. दोन्ही मुलं परदेशात होती. सतीश गेल्यापासून तिला साथ होती फक्त गच्चीतल्या तुळशीची !
घरासाठी चंदनासारखं झिजण्यात जन्म गेला पण ज्या वयात खरा आधार लागतो, तेव्हा सारे लांब गेले होते. बरोबरच्या मैत्रिणीपैकी काही आजारी होत्या तर काही पुढच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचीही शेवटची चार पानं आता फडफडत आहेत, असं तिला वाटे.
आज तिचा ७८ वर्षाचा वाढदिवस होता. ‘नसेना का कुणी जवळ. आज माझा वाढदिवस मीच साजरा केला तर?’
नलूताई धाडस करून दुकानात गेली. ‘असं गेलं पाहिजे अधून मधून नाहीतर पूर्ण सवय जाईल,’ वाटलं. पण बाहेरच्या गर्दीनं ती हैराण झाली होती. फक्त दहीवडा व मसालेभात करायचं ठरवून तिनं सर्व साहित्य घेतलं.
तिचा अत्यंत आवडता रेड वेल्वेट केक घेतला. त्यावर, ‘Happy Birthday Nalu लिहा’ म्हणून सांगताना तिनं कुणाचं लक्ष नसताना मान वळवून डोळे पुसले.
‘आपलं कौतुक आपण करण्यात काही चूक नाही’, म्हणत तिनं एक मोठी बदामी रंगाची मेणबत्ती घेतली. वितभर उंचीच्या मेणबत्ती बाहेरील काचेवर नाजूक नक्षी होती. ‘मेणबत्ती पेटवताच ती नक्षी चमकेल आणि अगदी अश्शी मेणबत्ती आणून सतीश विश करायचा, तसं वाटेल…’ असा विचार नको म्हटलं तरी मनात आलाच.
पूर्वी आई ओवाळायची तेव्हा वाटायचं, निरांजनातल्या ज्योती कशा जवळच्या वाटतात. मेणबत्तीची ज्योत परकी वाटते… पण इतर बदलांसह हा बदलही तिने स्वीकारला होता. ‘Change is the only constant in life’ हेच खरं… म्हणून तिनं उसासा सोडला.
निशिगंधाच्या फुलांचा एक गुच्छ घेताना, ‘रजनीगंधा फूल तुम्हारे…’ वाले मेहकलेले कॉलेजचे दिवस आठवले. गुलाबी फुगे घेताना, हातात गुलाबी फुगे घेऊन येणारा सतीश दिसत होता… सेल्सगर्लनं कौतुकानं विचारलं,
“आजी कुणाचा वाढदिवस?”
“मैत्रिणीचा…” ती म्हणाली खरी, पण तिचा तिलाच राग आला. _ ‘माझा वाढदिवस, म्हणून सांगायला काय मला धाड भरली होती…’_ म्हणत तिनं सर्व सामानाचे पैसे दिले. पिशव्या उचलताना म्हणाली, “मीच माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे!”
सेल्सगर्लनं ‘काय कोण जाणे?’ असा चेहरा केला.
अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये येताच तिच्या हातातल्या पिशव्यांतून काय आहे बघण्यासाठी नऊ वर्षाचा वरूण धावत आला, 
“आजी कॅडबरी आणलीस मला?”
“आज नाही आणली रे… काम आहे मला.” म्हणत नलूताईनं फ्लॅटचं दार उघडलं. वरूण धावत आला आणि म्हणाला,
“मी येऊ का, आजी?”
तिनं त्याला कॅडबरी आणली नाही, असं कधी झालं नव्हतं. नलूताई नको म्हणणार, तेवढ्यात वरूणच्या आईनं वरूणला होमवर्क संपवण्यासाठी हाक मारली. नलूताईला वाटलं तिचा नातू विक्रम जवळ असता, तर असाच वागला असता.
तिनं दार बंद केलं आणि व्रात्य, चंचल मनाला खडसावलं, ‘कशाला विक्रमच्या, सतीशच्या सतत आठवणी करून देतोस. गप्प बसायला काय घेशील?’ मन काहीसं वरमलं आणि काही वेळ चूप बसलं.
स्वयंपाक घरात जाऊन मसालेभात टाकला व भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमधुन काढायला सुरूवात केली. मिक्सरचा बेस घट्ट बसला नव्हता त्यामुळं अर्धवट वाटलेली डाळ व पाणी मिक्सरमधून गळायला सुरूवात झाली. मसालेभातातलं पाणी उकळून उतू जाऊ लागलं.
…तेवढ्यात फोन वाजला, म्हणून ती फोन घ्यायला वळली आणि सामानाची पिशवी टेबलावरून खाली पडली. मेणबत्तीची काच फुटली व तुकडे जमिनीवर पसरले. केक धाडकन खाली पडला. काही निशिगंधाची फुलं देठापासून तुटली.
नलूताईंनी गॅस कमी केला. जमिनीवरच्या काचा उचलल्या. केकवरलं फ्रॉस्टिंग व सुंदर डेकोरेशन एकात एक मिसळून गेलं होतं. ‘नलू’ हे केकवरचं नावही गायब झालं होतं!
त्या केककडे बघून ती ओक्साबोक्शी रडू लागली. पन्नास लोकांचा स्वयंपाक जाता जाता करणारी मी आता दोन गोष्टी धड करू शकत नाही, या विचारानं डोळे वाहू लागले. दुखरी पाठ अजूनच दुखू लागली. एकटेपणा, विकल शरीर आणि त्याहून विकल मन… यांचा उद्रेक अश्रूंच्या रूपात बाहेर पडला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिला दार उघडावसं वाटतं नव्हतं. ती तशीच बसून राहिली. वरूण बाहेरून ओरडत होता,
“आजी दार उघड… झालयं माझ होमवर्क!”
तो दार वाजवायचा थांबणार नाही म्हणून तिनं डोळे पुसले. केस हातानं सारखे केले व दार उघडलं.
“काय झालं आजी…?” म्हणत त्यानं तिच्या गळ्यात हात घालताच त्या निरागसतेत तिचा बांध फुटला.
“मी करतो तुला मदत…” म्हणत वरुणनं केक उचलला आणि अनेक रंग मिसळलेले फ्रॉस्टिंग बघत म्हणाला,
“आज तुझा वाढदिवस आहे…?"
त्यानं मेणबत्ती उचलून केकजवळ ठेवली. मेणबत्तीवर फुटलेल्या काचेचा एक तुकडा तळाला अजूनही शिल्लक होता. नलूताई म्हणाली, 
“अरे ती फुटकी मेणबत्ती नको घेऊस…”
वरूण म्हणाला, “का? बाहेरची काच फुटली असली तरी मेणबत्ती प्रकाश द्यायची थांबत नाही आजी! आणि केकवर लिहिलेलं नाव पुसलं गेलं, तरी केकची चव बदलत नाही! आणि फुलं तुटली म्हणून त्यांचा वास जात नाही… बरोबर?”
त्याचं वाक्य ऐकताच ती चमकली. दुखरी पाठ, थरथरणारे हात असतील… तर काय झालं? अंतरीच्या दिव्याचं तेज थोडंच कमी होणार आहे? तो दिवा तसाच युगानुयुगं तळपतोय. किती जन्म आले आणि गेले पण त्या लखलखणाऱ्या दिव्याचं तेज बरकरार आहे! मग कशाची भीती? कसली चिंता?
विजेसारखा चमकलेला तो दिव्य विचार सर्व विकलता, एकटेपणा, व्याधींना वितळवून टाकणारा होता…
वरुणनं Happy Birthday song म्हटलं आणि तो म्हणाला,
“Make a wish Aaji…! काय मागशील?”
“काय मागितलं ते सांगायचं नसतं रे… नाही तर ते मिळत नाही.” ती म्हणाली.
वरूणला पटलं. "अग आजी, माझी कॅडबरी दिसतेय इथे! तरी मला वाटलंच… तू कशी विसरलीस?” तो पिशवीत बघत म्हणाला.
दुकानातली मुलगी एवढ्या किमतीचं सामान घेतलंत, तर एक कॅडबरी मिळेल असं काही म्हणाली होती खरं!
वरूणला कॅडबरी देताच तो परत एकदा तिच्या गळ्यात पडला व घरी गेला. आज त्याच्या विश्वासाला तडा नाही गेला याचं तिला समाधान वाटलं.
नलूताईचा मसालेभात झाला होता. दहीवडे कॅन्सल केले. आत जाऊन भरजरी साडी नेसून ती बाहेर आली. ताटाभोवती छान रांगोळी काढली. मसालेभात घेतला. त्यावर ओलं खोबरं कोथिंबीर घातली. घरचं दही घेतलं. गच्चीतली तुळस शेजारी ठेवली. बिस्मिलाखॉंची सनई लावली. रेड वेल्वेट केक शेजारची बदामी मेणबत्ती पेटवली व जरीची साडी नेसून मसालेभाताचा घास घेताना सेल्फी काढली.
त्या बदामी प्रकाशाकडे बघत हात जोडून म्हणाली, “काय मागू…? वरूणसारखं एखादे नातवंड, अगदी शेजारी राहणारं, प्रत्येक आजीला दे देवा… जे अगदी सहजतेनं सांगेल की ‘काच फुटली तरी मेणबत्ती प्रकाश देणं सोडत नाही, केक वरची नक्षी विस्कटली तरी केकची चव बदलत नाही आणि तुटलेल्या फुलाचा वास नष्ट होत नाही!’
‘शरीर कितीही विकल झालं, तरी ती अंतरीची आत्मज्योत कधीच विझत नाही. ना सतीशची… ना माझी… ना आणि कुणाची… आपले आपण जसे आहोत तसे परिपूर्ण आहोत. इथं. आत्ता… या क्षणी!
“दोरीला साप मानून घाबरणं पुरे झालं. शस्त्रानी न तोडले जाणाऱ्या, अग्नीनं न जळणाऱ्या, शाश्वत अशा आपल्या ‘स्व’रूपाची खरी ओळख होताच फक्त आनंद आहे. आता  फक्त ते रूप पूर्ण शोधायचं आहे !”
त्या ज्योतीच्या मंद प्रकाशात रेड वेल्वेट केकचा घास तोंडात घालत तिनं एका अत्यंत परिपूर्ण वाढदिवसाचं वर्णन लेकीला सांगण्यासाठी फोन उचलला.
अंतरीच्या दिव्याशी आता नातं जुळलं होतं ! त्या शोधात आता जीवनातला अंधार वितळून जाणार होता.

2029. शिक्षकाची कदर.....✒️

 अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे.
•°`´°• रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळे कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं, "प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही."
माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आंत न्यायाधीश म्हणालेत,
•°`´°• अ टीचर इज इन द कोर्ट ...!
लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.
त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.
•°`´°• ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?
•°`´°• अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. वैज्ञानिक आणि शिक्षक.
•°`´°• फ्रान्सच्या न्यायालयां मधे केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.
•°`´°• जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.
•°`´°• कोरियात प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.
•°`´°• अमेरिकन आणि युरोपीय देशांमध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.
•°`´°• ज्या समाजात स्वभावाने आणि वर्तवणुकीने चांगल्या आणि पवित्र मनाने शुद्ध असलेल्या शिक्षकांचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.

सर्व शिक्षकांना समर्पित.

2028. ती – शिल्पकार

 "तू टीचरच राहिली आहेस. घरातलं काहीही घडो, तुझं शिक्षकी डोकं त्यात नियम शोधतं आणि सुधारणा सुचवतं. हे घर आहे, वर्ग नाही!"
श्रीधरराव रागारागाने आपल्या सुनेला बडबडत होते.
श्रीधरराव देशमुख. शिक्षण क्षेत्रातलं मोठं नाव. चार शाळा, दोन कॉलेज, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य ज्याच्या निर्णयावर अवलंबून असायचं असा माणूस.
पण घरात? घरात शिक्षणाचा अधिकार फक्त पुरुषांचा.स्त्रियांना पाहुण्यांसमोर हसावं,स्वयंपाकघरात रमावं, आणि आपलं मत –  चार भिंतीआतच ठेऊन द्यावं. आणि सून म्हणून शोभून वागावं.
शिल्पा या घरात दोन महिन्यांपूर्वी आली होती.B.Ed. झालेली, जिल्हा परिषद शाळेत शिकवणारी. डोळ्यात स्वतःचं शिक्षणाचं विश्व घडवण्याचं स्वप्न.
पण इथे तिचं ओळखपत्र बदललं – "सून देशमुख" म्हणून. सासूबाई म्हणायच्या, घर सांभाळणं हेच खरं व्यवस्थापन, पण तिच्या डोक्यात वेगळंच व्यवस्थापन फिरत होतं -- महाविद्यालयाचं.
रविवारी सकाळी श्रीधररावांनी घरात बैठक बोलावली.
नवीन उघडणाऱ्या कॉलेजसाठी प्राचार्य ठरवायचा होता.सगळे पुरुष वेगवेगळी नावं सुचवत होते.
शिल्पा चहा घेऊन आली, आणि कोणालाही अपेक्षित न होता शांतपणे म्हणाली –
"माफ करा, पण जर आपण मुलींना नेतृत्वाचं शिक्षण देतो,तर संस्थेतल्या स्त्रीला नेतृत्वाची संधी देताना इतका संकोच का?"
क्षणभर शांतता.
श्रीधरराव स्तब्ध. मग हसून म्हणाले,
"प्राचार्यपद? तू? अरे हे कॉलेज आहे, शाळा नाही!"
शिल्पा हसली. पण तिच्या नजरेत एक निश्चय होता.
सर, मी शाळेत शिकवते मला शिकवण्याचा अनुभव आहे.म्हणून मी कॉलेजमधेही शिकवू शकते.
संधी द्या. पगार नको. पण जबाबदारी द्या.
त्या क्षणाने सगळं बदललं. तिला प्राचार्य नाही, पण ‘विशेष प्रकल्प संयोजक’ ही भूमिका देण्यात आली – औपचारिकच.
पण पहिल्याच महिन्यात शिल्पाने कॉलेजचं स्वरूपच बदलून टाकलं –
लेक्चर प्लॅनिंग, विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद, बॅकवर्ड क्लासेस, महिला हक्क कार्यशाळा, अभिप्राय फॉर्म... एक नवा शैक्षणिक श्वास कॉलेजमध्ये वाहू लागला.
एक दिवस पेपर फुटीचं प्रकरण बाहेर आलं.
शिक्षण खात्याकडून चौकशीची नोटीस आली.
श्रीधरराव संतापले – "संस्थेची इज्जत धुळीत जाणार!"
शिल्पा समोर उभी राहिली.
"ही चौकशी मी सांभाळेल. समिती स्वतंत्र असेल. आणि निकाल पारदर्शक."
"दोषी आपलाच माणूस निघाला तर?"श्रीधर राव बोलत होते.
"मग घरातली लाज झाकण्यापेक्षा संस्थेचा आत्मसन्मान महत्त्वाचा " शिल्पा ठामपणे म्हणाली .
खरंच दोषी निघाला – श्रीधररावांचा पुतण्या.
शिल्पाने कोणताही भावनिक संकोच न करता त्याला निलंबित केलं.
त्या रात्री श्रीधरराव गोंधळले होते.
पहिल्यांदा त्यांनी स्वतःचं नातं तपासलं – ‘सून’ म्हणून ओळखणारी ती, खरं तर ‘संस्थेची शिल्पकार’ होती.
दोन आठवड्यांत कॉलेजला ISO मानांकन मिळालं.
राज्य शासनाकडून ‘आदर्श संस्था’चा गौरव जाहीर झाला.
शिल्पाने फक्त कॉलेजमध्येच नाही, तर घरातही बदल करत होती. सासूबाईंना स्वतःचं कौशल्य – लोणचं-पापड – व्यवसायात रूपांतरित करायला तिने प्रोत्साहित केलं. त्यांनी सुरुवात केली आणि काही महिन्यांतच त्याचं एक छोटंसं ब्रँडिंग केलं. शीलाने फेसबुक पेज, व्हॉट्सअप ऑर्डर सिस्टीम सुरू केली. सासूबाईंची ‘माय लोणचं’ प्रसिद्ध झाली.
ती नुसतीच सून नव्हती, शिक्षिका नव्हती...
पण ती होती – त्या संस्थेची दिशा ठरवणारी, विचारांची दिशा बदलणारी, आणि काळाच्या ओघात नवी वाट करणारी – शिल्पकार.

2027. पहिल्या नजरेतील प्रेम

      सुमित मीराला बघायला गेला. अगदी पारंपारिक पद्धतीने चहा पोह्यांचा कार्यक्रम ठरलेला. मीरा समोर बसली असताना आतमधून पडद्यामागून कोणीतरी डोकावून बघत होतं. सुमितची नजर पडली. तीही गोड हसली आणि पहिल्या नजरेचं प्रेम म्हणतात तसेच काहीतरी. झालं त्याच्या मनात तिची खट्याळ हसरी छवी घर करून गेली. दोन दिवस झालेत पण डोळयांपुढे सारखी तीच दिसायची. स्थळ लक्षात आलं का? म्हणून आईने त्याला तीन चार वेळा विचारले पण तो सारखी टाळाटाळ करत होता. मुलीकडच्यांना निरोप द्यायचं काय सांगायचं ? आता मात्र उत्तर देणे गरजेचं होतं. त्यानी आईला शेवटी सांगून टाकलं. मला ती आतून डोकावून बघत होती ती पसंत आहे. आईने डोक्यावर हात ठेवला,
"अरे राजा कोणाविषयी बोलतोय तू ,आपण मीराला बघायला गेलेलो आणि तू कोणाला पसंत केलंस ? मला वाटतं तू जिला बघितलं ती मिराची धाकटी बहीण असावी,' राधा ' पण त्या लोकांना काय उत्तर देणार आम्ही? आई तू एकदा बाबांशी बोल माझ्यासाठी. बरं बघते मी ,म्हणून आई स्वयंपाकाला लागली. सुमीतच्या हृदयावर तिच्या निखळ हास्याचं प्रतिबिंब उमटलेलं होतं. अगदी देवानी वेळ काढून कोरीव शिल्प बनवावं तशीच होती राधा. कदाचित तिच्या सौंदर्याने सुमितला मोहिनी घातली असावी. आईने सगळं बाबांच्या कानावर घातलं. पण त्यांच्या तत्वाला हे पटत नव्हतं. तरीही सुमितच्या खुशीसाठी ते बोलायला तयार झाले. त्यांनी फोन करून भेटायचा दिवस घेतला. सुमित आई बाबा राधाचा हात सुमीत साठी मागायला गेले. सुरुवात कशी करावी कळत नव्हते. आतमध्ये मीराला वाटलं होकार द्यायला आलेत म्हणून तीही खुश होती, राधा तिला खट्याळपणे चिडवत म्हणाली,
"काय मग मीरा सुमित गोडबोले. एका भेटीतच काळीज चोरी झालं का?? मीरा लाजली. इतक्यात बाहेरून कसला तरी आवाज आला मीरा हॉलच्या खिडकीजवळ जाऊन ऐकू लागली. तर आलेले पाहुणे जातांना दिसले. मिरा चे बाबा जाम चिडलेले होते. नेमकं काय झालं हे कळत नव्हतं.
     ते लोक परत गेले. मीराला कळायला मार्ग नव्हता. तिचा चेहरा पडला. काय झालं विचारणार तरी कसं ? तिचा लहान भाऊ चहाचा ट्रे घेऊन गेलेला तो तिथेच होता. ट्रे परत आणल्यावर मीरानी त्याला तिच्या खोलीत बोलावले .
आणि काय झालं ? म्हणून चौकशी केली. अनुप नि घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या सुमित दादाला म्हणे राधा ताई आवडली. तिच्याशी लग्न करायचं म्हणतो तो म्हणून काका चिडले. त्यांना सांगितलं कि राधा ताई. धाकटी नसून थोरली आहे आणि एक वर्षांपूर्वीच तिचा घटस्फोट झाला. मीरानी उत्सुकतेने विचारले 
मग काय म्हणाले ते?
काहीच नाही. परत गेले. 
    राधा रडायला लागली. मला माफ कर मीरा. माझ्यामुळे सगळं घडलं. मी खरच अपशकुनी आहे. मी तर तुला बघायला कोण आलं म्हणून सहज डोकावले आणि .....आई बाबांना ....कसं सामोरी जाऊ .....काय म्हणतील ते मला लहान बहिणीच्या जीवनात विष कालवलं....
अग ताई तू नकोस मनाला लावून घेऊ ....यात तूझी चुकी नाही आणि त्याचीही नाही ....मीराने राधाला कसेबसे समजावले ....
दुसऱ्या दिवशी सुमित मीराला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये गेला. ती येतांना दिसली त्यानी हात दाखवून हाय असा 
इशारा केला .जास्त आढेवेढे न घेता तीही त्याच्या दिशेने आली .....तुम्ही इथे ....त्यानी स्पष्टच सांगितलं ,
" मला तुमच्याशी बोलायचं आहे , आधी मी तुमची माफी मागतो. मला तुमची बहीण अगदी मनापासून आवडली 
"तिने लगेच वाक्य पूर्ण केलं ,पण ती घटस्फोटित आहे म्हणून तुम्ही आल्या पाऊली परत गेलात .....असच ना ! 
नाही असं अजिबात नाही. मी अजूनही लग्नाला तयार आहे. पण माझे बाबा जुन्या विचारांचे. त्यांचं मन वळवायचा 
मी प्रयत्न करतो .... तुमची पण मदत हवी आहे मला ......हे पत्र राधाला द्याल का ? त्यानी पत्रात त्याच्या घायाळ मनाची अवस्था रेखाटली होती ......तिने पत्र घेतले आणि घरी आल्यावर राधाला दिले .....राधाला परत लग्न करायची इच्छा नव्हती .....पण मीराने तिला समजावले .....तिच्या आई आणि बाबाना एकच चिंता आहे .....ती म्हणजे राधाचं पुढे भविष्य काय ? निदान त्यांचा विचार करून तरी तू होकार दे .....मान्य आहे तुझं पाहिलं लग्न फसलं ......पण ताई सुमित खूप चांगला आहे .....रूढी ....परंपरा ....समाज हि सगळी बंधने झुगारून तो तुझी वाट बघतोय .....तो खूप आनंदात ठेवेल तुला .....कदाचित ईश्वरानेच पाठवलाय त्याला .....आतापर्यंत खूप दुख्ख भोगलंय  तू .....म्हणून प्रेमाची फुंकर घालून .....सर्व वेदना शमवायला .... सुमित आलाय ......
   आईने पान वाढली सुमित आणि बाबांना आवाज दिला. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं .....शेवटी आईने विषय काढला ,
"उदयाला त्या गोखलेंची मुलगी बघायला किती वाजता जायचं आहे? " सुमितने हातातला घास परत पानात ठेवला आणि सरळ खोलीत गेला.....बाबा आईवर चिडले तुझ्या लाडानी हट्टी बनलाय तो .....बरं वाईट काय ....काहीच विचार न करता ....म्हणतो तिच्याशीच लग्न करायचं आहे ....अहो लोक काय म्हणतील .....एकुलता एक मुलगा आपला .....त्याचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण केला ....पण हे शक्य नाही ....एका घटस्फोटित मुलीशी सुमीतच लग्न मी लावून देणार नाही म्हणजे नाही .....
    आई ताट घेऊन सुमितच्या खोलीत आली .....आणि त्याला समजावू लागली ....अरे तिच्यापेक्षाही सुंदर मुली आहेत. तू तिचा विचार सोड. नवरा बायकोची कुरबुर चालतेच म्हणून काय असं कोणी तडकाफडकी घटस्फोट घेतं का? आईच्या बोलण्यावर सुमित चिडला,
" आई तू एक स्त्री असून असं बोलतेस तिच्या बाबांनी काय सांगितलं. ती केवळ नवराबायको मधील कुरबुर. नव्हती. त्यानी राधाला जीवे मारण्याचा प्रयत्न. केला आणि मी फक्त तिच्या सौंदर्यावर भाळून निर्णय घेतला असं अजिबात नाही. माझ्या मनानी मला कौल दिला. मी निर्णय बदलणार नाही.
      आज एक महिना होत आला. सुमित कोणत्याच स्थळाला पसंती देत नव्हता. बायको नावाच्या फ्रेममध्ये त्याला राधाच हवी होती. सकाळी त्यानी बाबांना बँकेत सोडले आणि तो ऑफिसला गेला. बाबांना काही पैसे फिक्स करायचे होते. त्यांनी तिथल्या मॅडम कडून फॉर्म घेतला आणि त्यांना अचानक चक्कर आली ते खाली कोसळणार इतक्यात त्या टेबलावरच्या मॅडमनी त्यांचा हात धरून सोफ्यावर बसवले ..लगेच तिथल्या प्युन ला आवाज देऊन साखर पाणी मागवले. चमच्याने एक एक घोट तोंडात टाकू लागली. आता बाबांना बरं वाटलं ....ते जरा टेकून बसले तिनेच फॉर्म भरून दिला. घरी फोन करून कोणाला तरी बोलवा. मला नंबर सांगा मी फोन लावते. तिचं बोलणं खूप सुखद वाटत होतं. नाही तशी गरज नाही बरं वाटतंय आता 
मी जाईन ...म्हणून ते निघाले.
       कधीही बँकेत आले कि बाबा तिला भेटायचे. ती चारचौघीसारखी नव्हती. एका क्षणात परक्यालाही आपलं बनवणारा गोडवा तिच्या स्वभावात होता. नखोशिखांत सौंदर्याची खान असूनही जराही घमंड नव्हते. बाबांनी एकदा तिच्या नकळत फोटो काढला आणि आईला दाखवला. फोटो बघून आईचे डोळेही दिपले. .मी ज्या बँकेत जातो तिथे हि काम करते मागे मला चक्कर आली तेव्हा ह्याच मुलीने मदत केली .....खूप गोड आणि लोभस आहे ....एकदा हीचा फोटो सुमितला दाखव आणि विचार त्याला .....हिच्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला मिळणार नाही .....
रात्री जेवण आटोपल्यावर आईने कसाबसा विषय काढला .....सुमित त्या मुलींसाठी तू तुझ्या आईबाबांना या वयात दुख्ख देतोय .....अरे थोडातरी आमचा विचार कर ....ह्यांना एक मुलगी खूप आवडली ....तुझ्यासाठी तिच्यापेक्षा छान मुलगी नाही मिळणार ....
तिचा फोटोही आहे .....बाळा एकदा बघून तर घे ....माझ्यासाठी .....सुमित विनवण्या केल्यावर फोटो बघायला तयार झाला .......आणि हे काय आश्चर्य .....फोटोतली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पहिल्या नजरेत प्रेमात पाडणारी त्याचं काळीज चोरणारी राधा होती ......मनातला आनंद त्यांनी चेहऱ्यावर अजिबात येऊ दिला नाही .....आणि हि कोण म्हणून आईला विचारले .....आईने घडलेली हकीकत सांगितली .....सुमितच्या सगळं लक्षात आलं कारण बाबांनी राधाला बघितलं नव्हतं .....त्यांनी आईला तंबी दिली आधी तू बाबांकडून वचन घे .....हिच्यानंतर मी कोणतीच मुलगी बघणार नाही ....तुमच्या आनंदासाठी मी मुलगी बघायला तयार आहे .....तुम्हाला माझं लग्नच लावायचं आहे तर तर करिन मी तुमची इच्छा पूर्ण ......
सुमितने बाईक काढली आणि सरळ गावाच्या वेशीबाहेर टेकडीवर गेला .....आतापर्यंत मनात लपवलेला आनंद जोरानी ओरडून व्यक्त केला .....राधा$ $$$$" आय लव्ह यु "$$$$
दुसऱ्या दिवशी बाबा सुमितला तिला बघायला बँकेत घेऊन गेले .....तिच्या टेबलाजवळ जाऊन तिला बाबांनी आवाज दिला बेटा माझं एक काम आहे तुझ्याकडे ....तिने वर बघितले .....समोर सुमितला बघून तिची स्पंदन वाढली .....प्रथमच दोघेही समोरासमोर आलेले होते ......तसं हे सगळं मी तुझ्या बाबांशी बोलायला पाहिजे .....ते बोलेल च पण त्या आधी तुला विचारावं म्हटलं ......मला तू माझ्या मुलासाठी "कुलवधू" म्हणून पसंत आहे .....मला तुझ्या बाबांचा पत्ता आणि नंबर हवाय .....ती जरा घाबरली .....काका माझ्या बाबांचं नाव रमाकांत देव...मी राधा त्यांची थोरली मुलगी .....
बाबा कसला विचार करताय .....आता तुम्ही पसंत केलय हिला ......बघा तुम्हालाही तिने मोहात ,पाडलं ना !!!! काय कमी आहे तिच्यात .....हेच ना ....ती घटस्फोटित आहे .....त्यात तिची काय चूक .....आणि तुम्ही मला वचन दिलय ......बाबांनी मोठा श्वास घेतला .....सुमितच्या पाठिवर थाप दिली ....तू बोल हिच्याशी मी बाहेर आहे ....म्हणून निघून गेले .....
राधाला कळत नव्हतं काय बोलावं .....तिने त्याला एकच प्रश्न विचारला 
" असं काय बघितलं तुम्ही माझ्यात ",सुमितने हसून उत्तर दिलं......
.ते मला माहित नाही पण पहिल्या नजरेतच तू माझं काळिज चोरलस आणि मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझा होकार समजू. होशील ना गोडबोलेंची कुलवधू. राधाने गोड हसून होकार दर्शवला. सुमितच्या बाबांनी रमाकांत यांना राधासाठी मागणी घातली लेकीचा नव्याने संसार फुलतोय .....एका बापाला यापेक्षा मोठा आनंद कोणता असणार. 
      ना डेटिंग.....ना चॅटिंग.....खरं म्हणजे प्रेमात पडायला रोज रोज भेटलं पाहिजे. खूप खूप बोललं पाहिजे. हा समजचं चुकीचा. केवळ सहवास म्हणजे प्रेम नव्हे. काही न बोलता एकमेकांना डोळ्यांची भाषा समजते ते म्हणजे 'प्रेम 'गर्दीतही त्याला तिच्या हृदयाचा आवाज येतो ते म्हणजे ' प्रेम ' दूर राहूनही ती व्यक्ती आपल्या आसपासच असते ते म्हणजे ' प्रेम '
कसं आहे ना ! एका क्षणातही परकं माणूस आपलं होऊन बसतं ...
लाईफ हे असच असतं.

2026. ज्यांनी तुमच्या अंधारात साथ दिली

 एक मुलगा आपल्या आजोबांकडे गेला आणि विचारलं,
"आजोबा, तुम्ही मला एखादी नैतिक शिक्षण देणारी गोष्ट सांगाल का? मला उद्या ती शाळेत सांगायची आहे."
म्हातारे आजोबा क्षणभर विचारात पडले, मग गळा साफ करत म्हणाले,
"बस बाळा, एक गोष्ट सांगतो...नीट ऐक."
"सारा नावाची एक अंध मुलगी होती. तिचे आईवडील एका कार अपघातात मरण पावले आणि त्याच अपघातात सारा देखील दृष्टीहीन झाली. तिच्या आजीनं तिला गावात नेलं आणि तिचं पालनपोषण केलं.
साराचा एकही मित्र नव्हता. तिची एकमेव खरी सोबती होती तची छडी.
ही छडी तिला प्रत्येक ठिकाणी नेत होती, कुणावर अवलंबून न राहता. तिला कधीही धोका दिला नाही, कधीच तिची हसणारी मुद्रा हरवली नाही.
साराची छडी तिच्यासाठी सगळं काही होती, विश्वास, आधार, आणि मैत्री."
"नंतर एक श्रीमंत, देखणा तरुण तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने तिला देशातील सर्वोत्तम रुग्णालयात नेलं, तिची दृष्टी परत मिळवण्यासाठी. आणि सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. सारा पुन्हा जग पाहू लागली..."
इतकं सांगून आजोबा थांबले.
मुलगा थोडा गोंधळून म्हणाला,
"पण आजोबा, ही गोष्ट संपली? यात नैतिक शिकवण कुठे आहे?"
आजोबांनी हळूच हसत विचारलं,
"अंध सारा जेव्हा पुन्हा पाहू लागली, तेव्हा तिनं एक गोष्ट फेकून दिली. माहितीये काय?"
मुलानं विचार करत विचारलं,
"काय फेकलं?"
आजोबा म्हणाले,
"तिनं तिची छडी फेकून दिली. ती छडी, जी तिच्यासोबत होती जेव्हा कुणी नव्हतं. तीच छडी जिनं तिची मदत केली, साथ दिली, तिच्यावर कधीही रागावली नाही."
आजोबांनी मुलाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले,
"पाह बाळा... जीवन असंच असतं. अनेकदा आपण त्यांना विसरतो जे आपल्यासाठी अंधारात प्रकाश  बनले होते.
ज्यांनी आपल्या आयुष्यात खंबीर साथ दिली, आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र – त्यांचं आपल्यावर असलेलं ऋण आपण सहज विसरतो.
अंधारात आपल्यासाठी ज्यांनी दिवा धरला, त्यांचं मोल आपल्याला प्रकाश आल्यावर उरतच नाही."
मित्रांनो,  ज्यांनी तुमच्या अंधारात साथ दिली, त्यांना प्रकाशात विसरू नका. 🌼

2025. गोल्डीलॉक्स नियम

 १९५५ साल. डिस्नेलँड नुकताच सुरू झालं होतं. एक १० वर्षांचा मुलगा तिथे नोकरी मागण्यासाठी गेला. त्याला ग्राहकांना डिस्नेलँडचं गाईडबुक विकण्याचं काम मिळालं.
काही महिन्यांतच तो डिस्नेलँडच्या मॅजिक शॉपमध्ये पोहोचला. तिथे जादू शिकला आणि तिथेच प्रयोगही करायला लागला. पण जादू नव्हे, तर प्रेक्षकांसमोर उभं राहून काहीतरी सादर करणं — यात खरी मजा आहे, हे त्याला उमगलं. त्याने ठरवलं की आता मी हेच काम करणार !
त्याची सुरुवात झाली स्टँड-अप कॉमेडीच्या लहान लहान अ‍ॅक्ट्सनी. २-५ मिनिटं. प्रेक्षक हसत नाहीत, बहुतेक वेळा कोणीतरी ऐकतही नाही. कधी कधी कुणीही प्रेक्षक नसताना, एकटाच शो करायचा ! काही विनोद चालायचे काही सपशेल आपटायचे ! पण तो थांबला नाही.
२  मिनिटे - पाच मिनिटे - पंधरा मिनिटे असे करत करत शेवटी तब्बल १४ वर्षांनंतर तो स्वतःचे संपूर्ण प्रयोग करू लागला ! कधीकाळी रिकाम्या खुर्च्यांसमोर प्रयोग करणाऱ्या त्या मुलाच्या शो साठी १८०००  क्षमतेचे सभागृह देखील हाऊसफुल होऊ लागले !
त्या मुलाचं नाव होतं — स्टीव्ह मार्टिन. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वोत्तम कॉमेडियन म्हणून स्टीव्ह मार्टिन ओळखला गेला !
अनेकवेळा अपयशी होऊनही स्टीव्हने प्रगती करण्याची प्रेरणा कशी टिकविली ? 
स्टीव्हच्या या दीर्घ वाटचालीत एक मानसशास्त्रीय तत्त्व सतत कार्यरत होतं — गोल्डीलॉक्स नियम (Goldilocks Rule).
हा नियम सांगतो —
"मानव मेंदूला तीच कामं करताना जास्त प्रेरणा मिळते, जी त्याच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा थोडीशीच अधिक कठीण असतात."
‘गोल्डीलॉक्स अँड द थ्री बेअर्स’ – या परीकथेत गोल्डीलॉक्स ही मुलगी तीन पातेल्यांतील खिचडी चाखते. एक गरम, एक थंड आणि एक – "अगदी बरोबर!"
हेच सूत्र आपल्या आयुष्यातही लागू होतं. अगदी सोपं काम असलं की ते कंटाळवाणं होतं. अगदी कठीण असलं तर अशक्यप्राय वाटतं !
तुम्ही जर टेनिस खेळायला सुरुवात केली आणि समोर चार वर्षांचं मूल खेळत असेल — तर लगेच कंटाळा येईल. आणि जर समोर सेरेना विल्यम्स असेल — तर लगेच हार होईल.
पण एखाद्या तुमच्यासारख्या खेळाडूसोबत खेळाल तर?
कधी तुम्ही जिंकाल, कधी समोरचा. तुम्ही त्याला हरवू शकता हा विश्वास आणखी प्रयत्न करायला उद्युक्त करेल. मोबईल मधील गेम्स मध्ये पण ज्या लेव्हल्स असतात त्या या गोल्डीलॉक्स नियमाप्रमाणेच असतात. म्हणूनच प्रत्येक लेव्हल पार करण्यासाठी मुले विचार करतात, सतत प्रयत्न करतात !
आपल्या मेंदूला आव्हानं आवडतात – पण ती जर खूपच अवघड असतील, तर तो लगेच हार मानतो."
त्यामुळे प्रेरणा टिकवण्यासाठी, आपल्या कार्यक्षेत्रात ‘अगदी बरोबर’ कठीण गोष्टी निवडणं गरजेचं आहे.
मी नोकरी करत असताना एकदा आमच्या सेल्स टीमसाठी नव्या वर्षात लक्ष्य ठरवत होतो. मागच्या वर्षीचा आकडा होता — ₹४ कोटी विक्री. मॅनेजमेंटमध्ये काही जणांनी सुचवलं – यावर्षी ₹७ कोटीचं टारगेट ठेवा.
हा आकडा  आम्हाला "too hot" – म्हणजेच गोल्डीलॉक्सच्या भाषेत खूपच अवघड वाटला. ज्यामुळे टीममध्ये आधीच तणावाची भावना निर्माण झाली.
मी टीममध्ये प्रत्येकाचा मागील कामगिरीचा डेटा बघितला. काहीजण ७०% target पूर्ण करत होते, काहीजण ९०%. 
प्रत्येक विक्रेत्याला त्याच्या सध्याच्या सरासरीहून ३५ % वाढलेलं वैयक्तिक लक्ष्य दिलं.
हे टार्गेट "ना खूप सोपं होतं, ना खूप कठीण". ते "Just right!" होतं !
टार्गेट पाहून कोणीही घाबरलं नाही.
उलट, सर्वांचं लक्ष वाढलं.
लोकांनी आपल्या शक्तीनुसार योजना आखल्या.
विक्री दर महिन्याला ८-१०% वाढत गेली.
शेवटी, आम्ही ₹५.८ कोटी विक्री केली – जी याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ४५% जास्त होती!
टीममधील प्रत्येक व्यक्ती म्हणत होती –
"या वर्षीच्या टार्गेटने आम्हाला धक्का नाही बसला… उलट, ते अचिव्हेबल वाटत होतं !
गोल्डीलॉक्स नियमसोबतच आणखी एक गोष्ट प्रेरणा अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ठरते , ते म्हणजे – “Progress Visibility”
आपली प्रगती किती होत आहे हे तात्काळ कळणे महत्वाचे !
स्टीव्ह मार्टिनला प्रेक्षकांचा हशा हा तात्काळ मिळणारा फीडबॅक होता. आमच्या सेल्स टीमलाही दर पंधरा दिवसांनी "कोण किती टक्के टार्गेटच्या जवळ आहे?" "कुणी मागे आहे, कुणी पुढे आहे?" हे लीडरबोर्डवर दिसत होते.
प्रत्येक विक्रेत्याला स्वतःच्या प्रगतीचं मोजमाप करता येत होतं — आणि याचं मोटिवेशन खूप प्रबळ होतं.
ही पद्धत आपल्यालाही वापरता येईल. स्वतःचा गोल्डीलॉक्स झोन शोधा – आणि प्रगती सुरू ठेवा!
सरळ मॅरेथॉन धावण्याचा विचार केलात तर – नाही जमत. पण दररोज १५ मिनिटं चालणं/धावणं  – जमेल.
जर तुम्हाला स्टेजवर भाषण देण्याची भीती वाटत असेल – तर सुरुवात ५ लोकांसमोरून करा. मग १५, मग ३०, मग स्टेज… तुमचा आत्मविश्वास पायरी-पायरीनं वाढेल.
गोल्डीलॉक्स नियम तुम्हाला प्रेरणा टिकवून ठेवायला शिकवतो.
आणि प्रगतीचं मोजमाप तुम्हाला पुढच्या पायरीवर न्यायला प्रेरणा देतो.
दररोज विचार करा:
माझं आजचं काम "बरोबर आव्हानात्मक" आहे का?
मला माझी प्रगती दिसते का?
मी रोज एक छोटं पाऊल पुढे टाकतोय का?
जर या सगळ्याचं उत्तर “हो” असेल, तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात — गोल्डीलॉक्सच्या वाटेवर.

शनिवार, २८ जून, २०२५

2024. अभिधा

     माझ्याकडे हे नाही ते नाही हे वाक्य आपल्या तोंडातून दिवसातून किमान एकदा तरी बाहेर पडतेच... जीवनातलं असमाधान आणि कर्तव्य शून्यता आयुष्य भर उगाळली तरी संपत नाही.... आणि मग एक दिवस आयुष्य संपतं..... कर्तृत्वाला मिळणारी झळाळी संकुचित विचारांच्या कोंदणात तशीच अडकून राहते आणि चमकायचीच राहून जाते तत्पूर्वी....!
      लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!*
कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून. "अभिधा" शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..! ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी 'अभिधा धुमटकर' हिची.! अभिधा आपल्या पार्ल्यातल्या. शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली. सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही. ती जन्मतःच दृष्टीहीन आहे. या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.
     अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक. ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची. ही मात्र डोळे फिरवायची. त्यावरुन आईने डॉक्टरांना हे सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही. खरी कहाणी इथूनच सुरू होते. या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं. बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती. एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता. मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती. पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला. बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले. प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच. जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची. 'कमळ' शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा 'ब' कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.
      अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती. आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता. शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, "पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार. पण मला खेळू द्या.!' यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता. आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं. अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली. गणितात पैकीच्या पैकी मार्क. आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं. नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं. त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची. नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं. अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती. संस्कृत, मराठी, इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.
      याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली. पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या. 1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली. सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला. हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात. एम.ए., बी.एड., सेट, नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं. नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते. पण अंध म्हणून नकार मिळत होते. ती खूप खचून जायची. पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली. ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे. रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती. पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली. 
     पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली. 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली. श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं. फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं. त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती. अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती. पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं. लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली. सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे. ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते. सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे. 
      दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं. त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम. आभिधाचे 14 रिसर्च पेपर "इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली", "इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स", "इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग", "इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च" अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.
आता प्रश्न हा उरतो की आपले देखील आयुष्याचे पेपर या धर्तीवर नामांकित होतील काय?

2023. मुक्ता

      मुक्ताला प्रथम पाहिलं तो दिवस. तसा मी परत लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. सहा महिन्यापूर्वीचा अपघात आणि स्मिताच रक्ताच्या थारोळ्यातलं प्रेत माझ्या डोळ्या-समोरून हलत नव्हतं.रॉग साईडनं येणाच्या सायकलवरच्या लहान मुलाला वाचवायला गेलो आणि माझी स्कूटर खड्ड्यात गेली. वर्षांच्या स्वातीला घेऊन बसलेली स्मिता उडून पडली आणि एक कार तिच्या..! दैव गती कशी असते बघा, स्वातीही बाजूला जाऊन पडली पण तिला साध खरचटलंही नाही ! मला फक्त वेड लागायचं बाकी होतं. पराकोटीचं दुःख काय असते याचा अनुभव मी घेतला. महिनाभर नोकरीलाच गेलो नाही. स्वातीची मावशी याच गावात राहाते.तिच्याकडं ती स्वातीला घेऊन गेली. पण असं किती दिवस चालणार? माझे नातेवाईक, मित्र, ताई मला परत लग्न करायचा सल्ला देत होते.मुलगी लहान आहे, तुझी उभे आयुष्य आहे अजून.’ सगळ्यांनी मुलगी बघायचा दिवसही ठरवला.मुक्ता, गव्हाळी वर्ण, मध्यम उंची, दोन वेण्या, पाणीदार बोलके डोळे; हसतानाही अर्धेचे मोती चमकवणारे. बघता क्षणी  पसत पडावी अशी मुक्ता. पण मी म्हटलं, 
“मला जरा मुलीशी एकटीशी बोलायचंय." जवळच्या खोलीतच आम्ही बसलो. साधी आकाशी रंगाची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज दाखवायचा कार्यक्रम म्हणून विशेष काही नाही. मी म्हणालो, 
‘‘तुम्हाला नापसंत करावं असं तुमच्यात काही नाही. पण माझे एक लग्न आधी झालं होतं. मला दीड वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ करावा लागणार आहे. ती एकदम उभी राहिली. आनंदानं म्हणाली, 
‘म्हणजे मी तुम्हांला पसंत आहे तर ! मग तुम्हांला एक गोष्ट मला सांगायची आहेपण कानात सांगायची आहे. ती माझ्याजवळ येऊन कानात कुजबुजली, ‘
‘ती बाई आहे ना, ती माझी सावत्र आई आहे. अगदी वाईट आहेआत्ता प्रेमानं वागतेय ना, ते नाटक आहे. केव्हा एकदा इथून बाहेर पडेन असं झालंय. मी गारच झालो.
‘म्हणजे इथून बाहेर पडायसाठी तुम्ही ही तडजोड करताय तर. मग मलाही विचार करावा लागेल. मग एकदम जीभ चावून ती म्हणाली, 
“तुम्ही, तुम्ही मला एकदम पसंत आहात. मला नकार द्यायचा नाही हं ! माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला !"
     मला भपका नको होता. उपचार म्हणून साखरपुडा केला. सारखपुड्याआधी तिचा मामा मला भेटायला आला होता. डोळ्यांतपाणी आणून मला म्हणाला, 
‘माझी भाची सरळ आहे, निष्पाप आहे. तिची आई म्हणजेच माझी बहीण काविळीनं गेली. मुक्ता तेव्हा तीन वर्षांची होती. तुमचं आता होतंय असंच लग्न तिच्या बाबांनी केलं. कसंतरी वर्षभर नीट गेलं. तिच्या सावत्र आईला दिवस गेले आणि सारं बिघडलं. मुक्ताला बालपण लाभलंच नाही. लहान वयातच ओझे आणि वाईट-साईट बोलणे. तसे तिचे बाबा मनाने चांगले आहेत, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. मुक्ताला कॉलेज लाईफही एंजॉय करता आले नाही. मराठी घेऊन ती एक्स्टर्नल बी. ए. झाली. घरात कामं करायची ती तिनंच ना? सावत्र भाऊ, बहीण यांना सारी सुखं मिळाली. मुक्तीला मात्र... ’मामाला हुंदका फुटला. आवेग ओसरल्यावर डोळे पुसत तो म्हणाला,‘‘तिनंच फोन करून मला बोलावलंय. पूर्वी मी येत असे, पण माझ येणे तिच्या आईला आवडत नसे. मग मी हळूहळू कमी केलं. तुम्ही तिला पसंत केलेत. तुमची काही अपेक्षा नाही, ठाऊक आहे मला.
     मी हा पन्नास हजाराचा ड्राफ्ट आणलाय. माझी छोटीशी भेट तुमच्या संसाराला." मी जागेवरून उठले. त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो, 
‘‘लाख मोलाची भाची देताय. पैसे देऊन मला छोटं करू नका. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. शेवटच्या वाक्यानं मामा दिलखुलास हसला. त्यान चेक खिशात ठेवला. अगदी साध्या वातावरणात देवीच्या देवळात आमच लग्न झालंमला गाजावाजा नको होता. माझी ताई आणि तिचा नवरा आला होता. आम्ही दोघा भावंड. मी सोळा वर्षाचा असतानाच आई-वडील दोन वर्षांच्या अंतरात आजारपणाचं निमित्त होऊन गेले. मी आणि माझी ताई आमचे किती प्रेम; शब्दात नाही सांगता यायचं. खरं तर ही गेली तेव्हा स्वातीला ताईच घेऊन जाणार होती. पण मीच म्हणालो, “अगं ताई, ती मावशीकडेच राहू दे. म्हणजे मी तिला रोज भटेन ना !’’ लहान मुलाच्या फिरवावा तसा ताईनं माझ्या गालावरून हात फिरवला. मला आणि स्वातीला जवळ घेऊन रडरडरडली. ताई प्रथमच मुक्ताला बघत होती. ती लग्नाआधी दोन दिवस आली. लग्न देवळात म्हटल्यावर ती थोडी निराश झाली. मी म्हणालो, 
‘‘अगं दुसरं लग्न आहे. सोय म्हणून करतो आहोत, त्यात समारभ कशाला ?” 
“तुझे दुसरं आहे रे. पण मुलीचे पहिलंच आहे,' ताई म्हणाली. मुक्ताला पाहिल्यावर तिला जवळ घेत ताई म्हणाली, ‘किती गोड आहे रे ही !' यावर मुक्ता तिला बिलगत म्हणाली, 
‘ताई खरंच सांगा, मी इतकी गोड आहे? खर सांगा ह, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला." लग्नानंतर कोकणातल्या कुलदैवताला जाऊन आल्यावर ताई गेली. मुक्ता घरी आली. स्वाती आणि मुक्ताची दोन दिवसात गद्दी जमली. नकळत माझ्या मनात तुलना सुरू झाली. स्मिता विलक्षण प्रेमळ होती. पण शांत, सौम्य होती. मुक्ता मात्र अवखळ होती. खरं तर तिच्या अवखळपणाला प्रथमच व्यक्त होण्याची संधी मिळत होती. सावत्र आईमुळे तो मोकळेपणा दबला होता, तो बाहेर येत होता. स्वाती तिला ‘आई’ म्हणत होती. खरं तर ती तिची सखी होती. स्वातीची खूप खेळणी होती. दोघी मिळून खूप खेळायच्या. चार पाच दिवसानंतर मुक्ता तिला अंक, शब्द शिकवू लागली. शिकताना मुक्ता रागावली की स्वाती रुसायची. मग मुक्ता म्हणायची,
‘‘एक मुलगी रुसली, कोपच्यात जाऊन बसली; तिकडुनआला नवरा अन् खुदकन हसली." कधी कधी स्वाती अभ्यासाचा कंटाळाकरायची म्हणून मुक्ता रुसायची. मग स्वाती म्हणायची, 
“एक मुलगी रुसली. ..' पुढच तिला आठवायचं नाही. मग ती मुक्ताजवळ जाऊन तिचा हात पकडून म्हणायची,
 “ए आईपुढचं सांग ना ग !"
मग मुक्ता म्हणायची, “आम्ही सांगणार नाही. आम्ही रुसलोय !'  मग स्वाती म्हणायची, 
“तू सांगत नाहीस म्हणून मीही रुसलेय !'
मग मुक्ता तिला सांगायची. स्वाती मागून म्हणायची. नंतर दोषी मिळून म्हणायच्या, 
‘दोन मुली रुसल्या, कोपच्यात जाऊन बसल्या; तिकडून आले नवरे अन् खुदकन हसल्या."
वर्षसव्वावर्षांनंतर मुक्तानं एक वेगळाच हट्ट सुरू केला. 
‘‘माझे फंमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करूया." मी गारच झालो. 
'अगं तुझे वय काय? त बोलतेस काय?’ ती म्हणाली, 
‘‘आत्तापर्यंत मी गोळ्यांनी सांभाळलं पण...” मी चिडून म्हणालो, 
‘कोणाला विचारून चाललंय हे ? तुला काही अक्कल आहे की नाही ? मला तरी सांगायचेस. मी म्हणजे कुणीच नाही का ? शी...!' मुक्ता म्हणाली, 
‘मला माझे प्रेम स्वातीशिवाय कोणालाही द्यायचं नाही." मी तिच्यावर जास्तच चिडत म्हणालो, 
“स्वाती माझी मुलगी आहे." 
‘‘माझी मुलगी नाही? ” मुक्तानं एकदम विचारलं.  मी एकदम गोंधळून गेलो. नंतर म्हणालो, 
“तुझीही मुलगी आहे पण त्यासाठी हे सगळे कशासाठी ?' मुक्ताचा चेहरा बदलला. ती निर्धारानं म्हणाली, 
“परक्याचं ते परक्याचं आणि आपलं ते आपलंच. मी खूप भोगलंय ते आणि मला स्वातीची आईच व्हायचंय. सावत्र आई व्हायचं नाही. मला माझ्या पोटचं मूल झाले की माझें मन, माझी प्रेम. मी माझेच सांगू शकत नाही. आता मला कोणत्याही अपयश देणाच्या परीक्षेला बसायचं नाही. माझ्यावर ती वेळच यायला नको. मी तसं वचन दिलंय स्मिताताईंना." मी एकदम चमकलो. 
"काय म्हणालीस ?” मुक्ता कपाटाजवळ गेली. तिनं हिचा फोटो तिच्याकप्प्यात ठेवला होता. 
‘स्मिताताईंशी मी रोज गप्पा मारते. स्वातीच्यागोष्टी सांगते. तुमच्या विषयीही सांगते. त्या बोलतात माझ्याशी. खूप चांगल्या आहेत त्या. मीच त्यांना वचन दिलंय. माझे ऑपरेशनकरायचं म्हणजे करायचं. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. 
      प्रेमकिरण जोशी म्हणून माझा एक डॉक्टर मित्र आहे. तो फैमिली प्लॅनिंगची ऑपरेशन्सही करतो. त्याला विश्वासात घेऊन सगळे सांगितलं. सगळे ठरलं. एक दिवस स्वातीला तिच्या मावशीकडं ठेवून मी आणि मुक्ता दवाखान्यात गेलो. प्रेमकिरण मुक्ताला म्हणाला, ‘
‘वहिनी दोनच मिनिटं बाहेर बसा. मी व्यवस्था झाली की बोलवतो तुम्हांला. त्याचे माझे ठरल्याप्रमाणे त्याने माझे ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यावर तो बाहेर आला. तोपर्यंत मुक्ता अस्वस्थ इतका वेळा झाला तरी आपल्याला कोणी बोलावत का नाही. प्रेमकिरण बाहेर येऊन म्हणाला, 
“वहिनी ऑपरेशन झालंय. आता मित्राला भेटायला हरकत नाही.’’ माझे नावच सन्मित्र', सारे मला ‘मित्र’ म्हणत. ‘काऽऽय ?” मुक्ता जोरात किंचाळली. प्रेमकिरण काहीच बोलला नाही. मुक्ता पाय आपटत आत आली. 
नाही. कायमची गद्दी फू !’ 
‘ठीक आहे मग मी तरी हॉस्पिटलमधून घरी कशाला येऊ? मी जातो दुसरीकडेच कुठेतरी. मी हसून म्हणालो. 
ती एकदम जवळ आली. माझ्या छातीवर डोकं ठेवूनम्हणाली, 
“तुमच्याशिवाय मी जग शकेन का ? तुम्ही स्वत:चं... "
ती रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो, “तुझे काय माझे काय ? परिणाम तोच ना !’
     मुक्ता-स्वाती. दोघींचं अलौकिक सख्य होतं. स्वाती शरीरानं, मनानं मोठी होत होती. मुक्ता स्वातीबरोबर मनान प्रगल्भ बनत होती. मी मुक्ताचं लायब्ररीत नाव घातलं होतं. चांगली चांगलीपुस्तकं वाचून ती स्वातीला गोष्टी सांगायची. मुक्तामुळे स्वातीलाहीवाचनाची गोडी लागली. बघता बघता स्वाती कॉम्प्युटर-इंजिनियर झाली. घरात कॉम्प्युटर आला. केवळ प्रैक्टिसनं मुक्ताही कॉम्प्युटरमध्ये तरबेज झाली. मुक्ताचं ग्रास्पींग अफाट होतं. मुक्ताचा मामा नेहमी यायचा. मला तो रावसाहेब म्हणायचा. मी त्याला मामासाहेब म्हणायचो. तो मला म्हणाला, 
“रावसाहेब, तुमचे उपकार मी कोणत्या शब्दात मानू ? माझी मुक्ता, बालपणी खूप सोसलेंन तिनं. आता हे सुख अनुभवायचं होते म्हणून. पण रावसाहेब, कधी कधी तिच्या बालिशपणाचा तुम्हाला त्रास झाला असेल नाही?’ 
मला भरून आलं. गहिवर आवरून मी म्हणालो, 
‘मामासाहेब, तुमचीभाची म्हणजे प्रेमाचा निखळ झरा. ती जेव्हाअवखळपणानं, बालिशपणानं वागते किंवा बोलते ना; तेव्हा ही देवाची खरी निर्मिती आहे असं वाटतं. कारण तिच्या तशा वागण्यातही त्याग असतो, परोपकार असतो.” मामाच्या डोळ्यांत पाणी उभे राहिलं. त्यालाही खूप बोलायचं होत पण शब्दच गप्प झाले .स्वातीचं लग्नाचं वय झालं. मुक्ताचं विचारूच नका पण मीही जड झालो. ही पोर घरातून जाणार, कल्पनाच सहन होत नव्हती. एक स्थळ पसंत पडलं. मुलगा निर्यसनी, हुशार आणि गोड होता. तोही कॉम्प्युटर इंजिनियर होता. फॉरिन कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीत होता. लग्न ठरलं. त्यांची अपेक्षा काही नव्हती.फक्त लग्न मुंबईलाच करावं, असा त्यांचा आग्रह होता. आमची अडचण असेल तर मुंबईतल्या लग्नकार्याचा सगळा खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. कारण त्यांचा सगळा गोतावळा मुंबईलाच होता. स्वातीनं लग्नानंतरच नवच्याच्या इच्छेनुसार नोकरी करावी किंवा करू नये, असं आम्ही ठरवलं होतं. म्हणून तिनं कैंपस इंटरव्यूही दिला नव्हता. माझी आता तीन वर्ष नोकरी होती. त्या दिवशी मी माझे पासबुक घेऊन हिशोब करत होतो. दीड एक लाख शिल्लक होते. प्रॉव्हिडंट फंडावर बिनपरतीचे कर्ज काढावे की काय असा विचार सुरू होता. कारण पी-एफंची रक्कम-तिच्यातून मिळणारं व्याज आणि पेन्शन यावर माझे आणि मुक्ताच म्हातारपण होत. माझी आकडेमोड सुरू होती. मुंबईत लग्न म्हणजे साडेतीन-चारलाख खर्च. शिवाय आमची हौस म्हणून स्वातीला. पुन्हा मलाभरून आलं. मी पासबुक मिटलं. डोळे मिटून गप्प बसलो. मुक्तान माझ्या खाद्यावर हात ठेवला तेव्हा भानावर आलो. मुक्ताने माझ्या गालावरून ओघळणारे अशू पदरानं पुसले, 
“तुम्हीच असं करणार असाल तर मी काय करायचं ? मी आता जे तुम्हांला सरप्राईझ देणाराय ते निमुटपणे घ्यायचं. माझ्या स्वातीसाठीच साठवलंय  मी. खरं तर तुमचंच आहे ते. पण तुम्ही नाही म्हणायचं नाही. आपल्या लग्नाच्या वेळी मामानं तुम्हाला पन्नास हजार देऊ केले होते. तुम्ही ते नाकारले. त्यान माझ बँकेत खात उघडून मला पासबुक दिलं. तुम्ही सगळा घरखर्च करण्यासाठी मला पैसे द्यायचात. दरमहा मी उरलेले पैसे बैंकेत भरायची. मोठी रक्कम झाली की मुदतबंद ठेव करायची.” तिनं माझ्यासमोर पावत्या आणि पासबुकं ठेवली. साडेचार लाख जमले होते. माझ्याजवळ शब्दच नव्हते.
     डोळ्यातून अधू गळू लागले. प्रेमान मला जवळ घेत मुक्ता म्हणाली, ‘माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. अस रडायच नाही. खूप थाटामाटात स्वातीचं लग्न करायचं. पण खरं सांगू, स्वाती सासरी जाणार, या कल्पनेनं मीही.’ असं म्हणून तीही रडू लागली. स्वाती सगळे ऐकत होती. तिलाही राहावलं नाही. तीही आम्हा दोघांना येऊन बिलगली.  तिनीही आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

अज्ञात

2022. मी देवाचे आभार मानतो

 माझ्या वडिलांची सवय काहीशी वेगळीच होती.
जेवायला बसले की पहिला घास तोडायचे, मग तो थोडा थाळीभोवती फिरवायचे आणि एका कोपऱ्यात ठेवून संपूर्ण थाळीला नमस्कार करून मग जेवायला सुरुवात करायचे.
मी त्यांचं हे पाहायचे आणि विचार करायचे, वडील असं का करतात?
एक दिवस हिम्मत करून मी विचारलंच,
“बाबा, तुम्ही रोज हा एक घास वेगळा ठेवता आणि थाळीला नमस्कार करता, का?”
वडील हसले.
मग त्यांनी शांतपणे उत्तर दिलं,
“मी जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे आभार मानतो बेटा. 🙏
देवाचे आभार की आज मला अन्न मिळालं.
देवाचे आभार की मी ते खाण्यायोग्य आहे.
आणि देवाचे आभार की आजचं अन्न खाण्यासाठी योग्य आहे.”
मी तेव्हा लहान होते, मला हे फारसं कळलं नाही.
माझ्या मनात विचार आला, जेवण तर आईने बनवलं आहे, मग यात देव कुठे आला?🤔
बहुधा वडिलांनी माझ्या डोळ्यांतला प्रश्न ओळखला.
ते म्हणाले,
“अन्न चविष्ट आहे, त्यामुळे तुझ्या आईचे  देखील आभार मानेन हो.”😊
ही गोष्ट कायम लक्षात राहिली. का?
कारण...
ज्या दिवशी आईने शेवटचा श्वास घेतला, त्याआधी तिने हाताच्या इशाऱ्याने वडिलांना जवळ बोलावलं.
ती म्हणाली ,“माझ्या तोंडात तुळशीचं पान आणि थोडंसं पाणी टाका.”
वडिलांनी ते केलं.
त्यांनी पाण्याचा घोट आईच्या तोंडात घातला आणि तेवढ्यात आई हसली…
तिने दोन्ही हात जोडले आणि वडिलांना हळूच “धन्यवाद” म्हटलं.
आई जात होती.
संपूर्ण कुटुंब तिच्या आजूबाजूला होतं.
तिच्या चेहऱ्यावर कुठेही वेदनेचा लवलेश नव्हता.
ती हसतच गेली..
वडिलांचे आभार मानत.
धन्यवाद – एवढे वर्ष साथ दिल्याबद्दल.
धन्यवाद – माझ्या आजारात माझी सेवा केल्याबद्दल.
आईचं जगणं खरंच अद्भुत होतं.
आई गेल्यानंतर आयुष्याबद्दल मला मोहच उरला न्हवता... खूप उदास राहायला लागले मी.
त्या वेळी वडिलांनी मला जवळ बसवून सांगितलं,
“उदास राहू नकोस. आयुष्य समजून घे. तुझी आई तुझ्यासोबत अनेक वर्ष होती, याबद्दल विचार कर.”
ते सांगू लागले,
“माझ्या वडिलांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा मी फक्त तीन वर्षांचा होतो.”
देवाच्या प्रत्येक निर्णयामागे काही तरी कारण असतं.
आपल्याला त्याचा स्वीकार करायला हवा आणि त्याचे आभार मानायला हवेत.
मी विचारलं,
“आई गेली, यामध्ये आभार कसले?”
त्यांनी माझी डायरी काढून दाखवली.
त्यात मी काही महिन्यांपूर्वी लिहिलं होतं, “हे देवा, माझ्या आईला मृत्यू दे.. तिच्या वेदना मला पाहवत नाहीत आणि तिलाही सहन होत नाहीत.” 😔
वडिलांनी दाखवलं आणि सांगितलं,
“तुझी आई कष्टमुक्त झाली, त्यामुळे देवाचे आभार मानायला हवेत.
या जगात अनेक लोक अनेक असाध्य आजारात फार त्रास सहन करतात.
आईला यातून मुक्ती मिळाली, यासाठीही कृतज्ञता हवी.”
वडिलांनी एकच गोष्ट शिकवली,
आपल्यात मनापासून “धन्यवाद” म्हणण्याची भावना यायला हवी.
आपण निरोगी आहोत.
आपल्याला रोज दोन वेळा अन्न मिळतं.
आपल्याकडे घर आहे, छप्पर आहे.
आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या इतरांकडे नाहीत.
त्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत.
ज्याच्याकडे नाही, त्याबद्दल खंत बाळगण्याऐवजी
“जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहा”  हे शिकणं महत्त्वाचं आहे.
मी कधीच वडिलांना दुःखी पाहिलं नाही.
एकदा विचारलं,
“तुम्ही कधी दुःखी होत नाही का?”
ते फक्त एक ओळ गुणगुणले,
“मुझे ग़म भी उनका अज़ीज है, कि ये उन्हीं की दी हुई चीज़ है...”
त्यांनी सांगितलं,
“घडणाऱ्या गोष्टींना जर तू देवाची योजना मानलीस, तर आयुष्य खूप सोपं होईल.
तुला जर का सवय लागलीना चांगुलपणा शोधायची, तर आयुष्य फार सुंदर होईल.”
कथा संपली... पण शिकवण आयुष्यभरासाठी लक्षात राहीली...
‘धन्यवाद’  मानायला  शिका! 🙏

2021. राजकारणी ती

 मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू होता, होणाऱ्या सासरेबुवांनी विचारले,
“ पोरी, तू केसांची जी वेणी घातली आहेस त्याला एकूण किती वेढे आहेत??”
इतर मंडळी चक्रावून गेली, असा काय प्रश्न विचारला? पण शीला अजिबात गोंधळली नाही ….
शीलाने सडेतोड उत्तर दिले, “ तुमच्या धोतराला जेवढ्या मिऱ्या आहेत ना तेवढेच वेढे माझ्या वेणीला आहे.”
बस्स… त्या एका उत्तराने मुलीला पसंत केलं दिला. कारणही तसंच होतं. मुलाकडचे घर म्हणजे अट्टल राजकारणी घर. त्यांना अशीच राजकारणी स्वभावाची मुलगी हवी होती. शिलाच्या उत्तराने त्याला खात्री पटली की आपल्या राजकारणी घराण्याला ही मुलगी शोभून दिसेल. शीला ही काही कमी नव्हती. तिने शाळेपासून ते अगदी कॉलेज पर्यंत निवडणुका गाजवल्या होत्या, राजकारण तिच्या नसानसात भरलेलं होतं आणि स्थळही तिने असच बघायला सांगितलं की जे राजकारणात सक्रिय असेल. मग काय... तोडीस तोड भेटल्यानंतर थाटामाटात लग्न झाले.
    लग्न आटोपलं. तिला अपेक्षा होती की लग्नानंतरआपल्यालाही या घरात राजकारणात सक्रिय राहता येईल. राजकारणात भाग घेता येईल. पण घरात मात्र वातावरण वेगळे होते. त्यांना जरी राजकारणी मुलगी हवी असली तरी ती फक्त स्वभावाने. प्रत्यक्षात कृती करणारी मात्र त्यांना नको होती. त्या घरामध्ये स्त्रियांना दिवाणखान्यात येण्याची मनाई होती आणि अशा इतर अनेक गोष्टींवर घरातील महिलांना बंधनं होती. शीलाने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. तिने जी स्वप्न पाहिली होती त्याचा सर्व उलटे झाले. पण शीला ने या गोष्टीला फसवणूक न समजता त्याला एक संधी म्हणून स्वीकारायचे ठरवले.
    सासरेबुवा समोर होते. त्यांच्यासमोर ती आईशी फोनवर बोलायला लागली, “आई तू किती काटकसरीने संसार केलास गं. अगदी पै-पै जमा करून तू तुझा संसार चालवला आणि आज इतका पैसा असूनही तुझा काटकसरी स्वभाव काही गेला नाही. आजही तू उधळपट्टी न करता पै पै जमवून ठेवतेस आणि वेळेला तेच उपयोगात येतात.” सासरेबुवा ते ऐकून जरा विचारात पडले.
    काही दिवसांनी सासरेबुवा आणि सासू यांच्यामध्ये वाद व्हायला लागले. सासरेबुवा आधी सासुजवळ पैसे देत होते ते आता द्यायला ते टाळाटाळ करत होते. सासूला समजत नव्हतं की हे अचानक असे का वागताय आणि मग सासूच्या लक्षात आले की आपण किती परावलंबी आहोत. आपल्याला कुठलंही आर्थिक स्वातंत्र्य नाही.. नवरा पैसे देतोय. त्याच्यावरच आपण मजा करतोय पण आपल्याला एक रुपया कमवायची अक्कल नाही आणि मग अशावेळेस आपण स्वतः हातपाय हलवावे. नवऱ्याकडे पैशांचा तगादा न लावता चार पैसे कमवून दाखवावे. घरात कितीही पैसा असला तरी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तिच्या सासूने आता हातपाय हलवायला सुरुवात केली होती.
कशी शक्य झाली ही गोष्ट? तर शीलाने केलेल्या राजकारणाने. मुद्दाम सासऱ्यांसमोर फोन केला, सासर्यांनी नकळत आपल्या बायकोची तुलना केली. शीलाने घरात राजकारण केलं पण एक सात्विक राजकारण की ज्याच्यामुळे सासूचा आत्मसन्मान जागा झाला होता.  कसे केले हे राजकारण? सर्व प्रथम तिने निरीक्षण केले सासूच्या स्वभावाचे, सासर्‍यांच्या स्वभावाचे आणि घरातल्या एकंदर परिस्थितीचे.
     तिने ठरवलं आता राजकारण करायचे ते या घरात पण माणसं तोडण्यासाठी नाही तर माणसं जोडण्यासाठी. आणि एक सात्विक राजकारण जेणेकरून या घरांमध्ये तिला राजकारणात सक्रियतेने भाग घेता येईल आणि इतर अशा अनेक गोष्टी होत्या ज्याच्या मध्ये तिला बदल घडवून आणायचा. घरातही तिच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. सासूबाई केवळ नवऱ्याच्या कामावर अत्यंत खुश होत्या, स्वतःची कुठलीही कर्तबगारी न गाजवता केवळ नवऱ्याच्या कमाईवर खूश राहणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे शीला ने सुद्धा तेच करावं असं त्यांना वाटलं.नवरा कर्तबगार आहे, पैसे आणून देतोय मग त्याचावरच खुश राहायचं असं सासूला वाटायचं आणि सुनेनेही तेच करावं ही त्यांची अपेक्षा.
     मग अशा परिस्थितीत पहिली गोष्ट साध्य करायची होती ती म्हणजे तिच्या सासूचं मन वळवायचं. घरातल्या स्त्रियांना बाहेर पडता यावे. त्यांनाही स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची एक संधी दिली जावी आणि स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव तिच्या सासूला करून द्यायची होती. आणि म्हणूनच शिलाने हे राजकारण केले आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवले. मुद्दाम आईला फोन करून सासरेबुवांच्या मनात सासू बद्दल राग निर्माण केला आणि सासूचा आत्मसन्मान जागा केला. सासूचा आत्मसन्मान आता जागा झाला होता आणि आता सासूने शीला ला सुद्धा धडे दिले. तिला सांगितले की आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले. पाहिजे स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे. परावलंबी राहता कामा नये नये. शीला हेच हवं होतं. तिला काहीतरी कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळणं गरजेचं होतं. शीलाच्या सासूला लोणची पापड अत्यंत उत्तम बनवता येत असत. असं त्यांनी ठरवलं की या त्याचा व्यवसाय चालू करायचा. पण आता मात्र सासरेबुवांनी अडचण उभी केली. त्यांनी सांगितले हे असले काही उद्योग आपल्या राजकारणी घराला शोभतील का?? तुला हवं तर पैसे मी देतो. मागे मी तुला पैसे देणे कमी केलं होतं पण वाटल्यास आता तुला हवे तेवढे पैसे घे पण असले उद्योग काही करू नका. पण सासूने हट्ट केला. त्यांनी ठरवलं होतं की आता जे करायचं ते स्वतःच्या पायावर उभे राहून करायचं. मात्र सासऱ्यांच्या परवानगी शिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते..
     मग आता इथे सुरु झाली शीलाची खेळी.. तिने सासरेबुवांना बोलावले आणि सांगितले की सासरेबुवा आईंना हे काम करू द्या. याचा फायदा असा होईल ही लोकांना जेव्हा कळेल ही एका अट्टल राजकारण्याची बायको असूनही लोणची पापड करून चार पैसे कमावते. त्यावेळेस लोकांच्या लक्षात येईल की यांच्या घरात आर्थिक चणचण आहे…कुठलाही भ्रष्टाचार ही लोक करत नाही आणि त्याच्या मुळे यांच्या घरात वारेमाप पैसाही नाही आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आई लोणची पापड याचे व्यवसाय करत आहेत. यामुळे आपलीच इमेज लोकांमध्ये चांगली होईल..आणि येत्या निवडणुकीत आपल्यालाच फायदा होईल. आता या गोष्टीचा राजकारणात आपल्याला फायदा होत असेल तर ही गोष्ट करायला काही हरकत नाही हे सासरेबुवांना पटले. त्यांनी लगेच परवानगी दिली आणि त्याच्या मुळे घरात एक नवीन व्यवसाय सुरु झाला. सासूला सुद्धा काटकसरीची सवय लागली. त्यांच्यातला आत्मसन्मान जागृत झाला आणि सासरेबुवांना सुद्धा आपल्या बायकोच्या डोळ्यात एक नवीन चमक दिसू लागली होती आणि या गोष्टीचा आपल्याला राजकारणात कधी ना कधी फायदा होईल अशा आशेवर ते होते..
     शीलाने पहिली खेळी केली होती आणि त्यात ती यशस्वी झाली. या घरातल्या महिलेला तिचा आत्मसन्मान परत मिळवून देण्याचा हेतू होता त्यामुळे घरातल्या मुख्य महिलेला म्हणजेच तिच्या सासूबाईंना तिने घरात एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला होता आणि आणि त्यांना बंधनातून मुक्त केले आणि त्यामुळे तिच्यावरही कुठल्याही प्रकारचे बंधनं येणार नव्हती. नंतर निवडणुकीचे वारे वाहायला लागले.
सासरेबुवा म्हणजेच अप्पासाहेबांचा राजकारणातील एक कट्टर शत्रू म्हणजे ‘प्रतापराव’… त्यांना काहीही करून या निवडणुकीत जिंकू द्यायचे नव्हते… सासरेबुवा स्वतः निवडणुकीला उभे राहणार होते पण त्यांना पक्षाचे तिकीट काही मिळाले नाही… मग शीलाने सासरेबुवांना बोलून दाखवलं की ती स्वतः अपक्ष म्हणून लढायला तयार आहे ..
ते म्हणाले “इथे मला पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून मला उभे उभे राहता आले नाही पण तू जर निवडणूक हरलीस तर घराण्याची इज्जत जाईल … आणि मी हि रिस्क घेऊ शकत नाही … “
“हे बघा आप्पा , प्रतापरावांचा मोठा समाज हा माझ्या वडिलांच्या बाजूने आहे … मी जर निवडणुकीला उभे राहिले तर प्रतापरावांना मिळणारी मतं फुटतील आणि त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला होईल… प्रतापराव काहीही करून निवडून येणार नाही..”
प्रतापराव जिंकणार नाहीत हे ऐकल्यानंतर सासरेबुवा मात्र एका पायावर तयार झाले….
येथे राजकारणातला दुसरा डाव शीला ने जिंकला …
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार होता आणि मधल्या काळात शीला च्या नणंदेचे लग्न ठरते… तिलाही असाच राजकारणी सासर शोधलं होतं … त्या मुलाला सारिका म्हणजेच शीला ची नणंद खूप आवडली होती.. तसं पाहिलं तर तिच्या नणंदेला आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याला राजकारणात मुळीच रस नव्हता त्या दोघांना परदेशांमध्ये नोकरी करण्याची स्वप्न होते…
लग्नाची सर्व तयारी चालू होती आणि आणि लग्नाच्या दिवशी अचानक मुलाच्या आजीच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक… त्यांनी सांगितले की हे लग्न होणार नाही कारण विचारले तर समजले की त्यांनी सारिका ची कुंडली पाहिली होती आणि त्यात त्यांना मंगळ होता…
आता अप्पासाहेबांना पत्रिकेवर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी सारिका ची पत्रिका वगैरे काही काढली नव्हती… पण आता मात्र मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता…
सारिका तर रडायलाच लागली कारण तिला मोहन आवडला होता आणि दोघांना लग्न करून आपले स्वप्न पूर्ण करायचे होते.. एका क्षुल्लक गोष्टीमुळे ऐन लग्नाच्या दिवशी हे घडत होते ..
आप्पासाहेब घामेघुम झाले …
लग्नाची सगळी तयारी झालेली असताना मोठमोठे राजकारणी पक्षातले नेते मंडळी आणि कार्यकर्ते आलेली असताना अशांमध्ये अपमान होईल या धाकाने अप्पासाहेब अक्षरश रडकुंडीला आले होते …
मग अशा वेळेस शीला पुढे आली आणि ती तडक वर पक्षाच्या खोलीत गेली…
आप्पा साहेबांना सांगितले तुम्ही बाहेर उभा राहा मी दोन मिनिटात आले…
शीला मध्ये जाऊन काहीतरी बोलली आणि बाहेर आली….
आणि बघतो तर काय मुलाकडच्यांनी माफी मागितली आणि लग्न करण्यास होकार दर्शवला… अप्पासाहेब खुश झाले त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.. शीला असं काय बोलली होती त्यांना कि त्यांनी डायरेक्ट माफी मागितली ???
लग्न वगैरे आटोपून सर्वजण आपापल्या घरी गेले आणि मग आप्पासाहेबांनी शीलाला विचारलं की तू तिथे असं काय बोलली होती?
शीला ने सांगितलं की मी त्यांना असं सांगितलं की
“तुम्ही जर हे लग्न मोडलं तर आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला यामुळे फार मोठे नुकसान होईल .. कारण तुम्ही पत्रिकेसारख्या क्षुल्लक गोष्टीमुळे लग्न मोडलंत तर तुमचाच समाजात अपमान होईल… 
समाजामध्ये तुमची प्रतिमा वाईट होईल… सोशल मीडियावर तुमच्या धिक्कार केला जाईल आणि आयुष्यभर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल आणि राहिला प्रश्न मंगळाचा तर एक शांती करून ही समस्या सहज सुटेल ती काही फारशी मोठी समस्या नाही जर तुम्ही लग्न मोडलं तर लोक म्हणतील .. “बघा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारा हा नेता… एका मुलीला लग्न मांडवात नकार देणारा हा काय जनता सांभाळणार? काय समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करेल? असं लोक म्हणतील आणि राजकारणात तुम्हाला फार मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागेल … “
आणि ते ऐकताच समोरच्या पक्षाने पटकन आपले शब्द मागे घेतला आणि लग्नाला होकार दर्शवला…
आप्पासाहेबांनी शीलाची पाठ थोपटली… आणि म्हणाले राजकारणी सून केल्याचा फायदा झाला म्हणायचा …
आता शीला ने निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला अर्ज दिला… तिने सांगितले होते की तिला प्रतापरावांना मिळणारी मदत फोडायची होती पण तशातला काहीही भाग नव्हता….
तिला निवडणूक जिंकायची होती. आता निवडणूक म्हटली की प्रचार आला … पण तिला प्रचाराला बाहेर निघता येत नव्हतं … अप्पासाहेबांच्या मते केवळ अर्ज भरला म्हणजे काम झाले … प्रचार वगैरे काहीही गरज नाही. कारण प्रतापरावांची मतही आपसूकच तिला मिळणार होती आणि जिंकायचा वगैरे भाग नव्ह्ताच… त्याच्यामुळे प्रचाराची काही गरज नव्हती… मग प्रचाराला बाहेर पडायचं पण नाही आणि निवडणूकही जिंकायची … हे कसे शीला ला कसं शक्य होणार होतं?
एकदा अप्पासाहेब आणि सासूबाई दुपारच्या जेवणानंतर गप्पा मारत होते , त्यांनी शीला ला आवाज दिला पण तिकडून काही उत्तर आले नाही..
सासुबाई म्हणाल्या अहो शीलाला दुपारी तीन तास झोपायची सवय आहे त्यामुळे दार खोलीचं दार लावून की शांतपणे झोपत असते … तिला काही डिस्टर्ब् करू नका… आप्पासाहेब हसले आणी म्हणाले बर बर … झोपू द्या सुनबाईला … काम करून थकते ना बिचारी … असं म्हणत दोघेही हसायला लागले …
निवडणूक झाली…
निकाल लागले …
आणि बघतो तर काय शीलाचा अत्यंत बहुमताने निवडून येऊन विजय झाला… अप्पासाहेबांना चक्कर यायचेच बाकी होते… कशी काय आली होती शीला निवडून ?
निवडणूक जिंकण्याचे गूढ म्हणजे “शीलाची दुपारची झोप”… 
ती रोज दुपारी तीन तास खोलीत दार लावून झोपत नसे… तर तिचा प्रचार चालू खोलीच्या चार भिंतीत… तिच्याकडे लॅपटॉप होता इंटरनेट होते… तीने सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करायला सुरुवात केली होती स्वतःचे फेसबुक पेज चालू केले व्हाट्सअप ग्रुप बनवला आणि घरातल्या महिलांना पर्यंत ती पोहोचायची … कारण दाराशी कोणी प्रचाराला आलं कि त्याला विचित्र वागणूक आजकाल लोकं देतात हे तिला माहित होतं … त्यामुळे घरबसल्या आपल्याला त्रास न देता आपल्या मोबाईलवर कोणी आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तेही लोकांना आवडायला लागलं… शीला ने लोकांना पटवून दिलं होतं की नगराचा विकास ती कशी चांगल्या पद्धतीने करू शकते …
एखाद्या नवीन जोमाच्या तरुणीच्या हातात नगराचं भविष्य अवलंबून आहे … स्त्रियांना आणि तरुणांना तिने सोबत घेतलं …. त्यांना जे आवडतं त्याच माध्यमातून तिने स्वतःचा प्रचार केला होता… अर्थात आप्पासाहेबांना मोबाईलचं जास्त समजत नसल्याने त्यांना काही या गोष्टीचा सुगावा लागला नव्हता…
अप्पासाहेबांना कळून चुकले की आपण एक राजकारणी मुलगी घरात आणली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिचा राजकारणी स्वभाव हा डोकावणारच … तिने केलेले सर्व डाव त्यांच्या लक्षात आले पण त्यांना या गोष्टीचा राग न येता त्यांना अभिमान वाटला… ते आनंदाने म्हणाले … "पोरी … तू घरात जरी माझी सून असलीस तरी राजकारणात तू बाप आहेस 

2020. गोत्राची खरी शक्ती

 तुम्हाला आपल्या गोत्राची खरी शक्ती माहिती आहे का
हे केवळ एक विधी नाही. अंधश्रद्धा तर मुळीच नाही. हे आहे तुमचं प्राचीन सांकेतिक वारसत्व—एक आत्मिक कोड. हे संपूर्ण लेखधागा वाचा, असं समजा की तुमचं भूतकाळच त्यावर अवलंबून आहे.

१. गोत्र म्हणजे तुमचं आडनाव नाही—ते तुमचं आध्यात्मिक DNA आहे
आपण बहुतेकजण आपल्या गोत्राबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. आपण समजतो की पुजेमध्ये पुजारी जे काही म्हणतो त्याचा तो भाग आहे, पण ते तितकंच नाही. गोत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ऋषींच्या मनोवृत्तीशी जोडलेले आहात. हे रक्तानं नाही, तर विचारांनी, ऊर्जेने, कंपनांनी आणि ज्ञानधारेनं जोडलेलं असतं. प्रत्येक हिंदूचा आत्मिक स्रोत एखाद्या ऋषीकडे जातो. तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज. त्याचं ज्ञान, मनोस्वभाव, अंतर्गत ऊर्जा—हे सगळं तुमच्यात वाहत असतं.

२. गोत्र म्हणजे जात नाही
आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करून पाहतात. पण गोत्र हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र याचं प्रतीक नाही. ते जातप्रथा, आडनावं, आणि राज्ये उदयास येण्यापूर्वीच अस्तित्वात होतं. गोत्र म्हणजे ज्ञानाधारित ओळख—सत्ताधारित नव्हे. ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले, त्यांनाही ऋषी गोत्र देत असत. हे कमावलेलं असतं—जन्मसिद्ध नव्हे. म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे—तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा.

३. प्रत्येक गोत्र एखाद्या ऋषीकडून उगम पावलेलं असतं—एका सुपरमाइंड कडून
उदा. तुम्ही वसिष्ठ गोत्रातले असाल, तर तुम्ही त्या वसिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केलं. भरद्वाज गोत्रातले असाल, तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात ज्यांनी वेदांचे अंश लिहिले, योद्धे आणि पंडित घडवले. प्रमुख ४९ गोत्रे आहेत—प्रत्येक ऋषी वैज्ञानिक, योद्धा, मंत्रद्रष्टा, वैद्य किंवा खगोलतज्ञ होते.

४. एकाच गोत्रातील विवाहास वडीलधारी मंडळींनी का मनाई केली
प्राचीन भारतात गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे. गोत्र पुरुषवर्गातून पुढे जाते, म्हणजे मुलगा ऋषीवंश पुढे नेत असतो. एकाच गोत्रात विवाह केला, तर दोघंही अनुवांशिकदृष्ट्या खूप जवळचे—म्हणजे बहीणभावासारखे—असतात. यामुळे संततीमध्ये मानसिक व शारीरिक दोष होऊ शकतात. गोत्रपद्धती म्हणजे प्राचीन भारतीय जनुकीय शास्त्र. आपण हे हजारो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं—जे पाश्चात्य शास्त्राने अलीकडेच शोधलं.

५. गोत्र म्हणजे तुमचं मानसिक संप्रेषण
काही लोक जन्मतःच विचारवंत असतात. काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते. काहींना निसर्गात शांतता वाटते. काही स्वाभाविक नेते असतात. का? कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग घडवत असतं. तो ऋषी जसा विचार करत होता, जसं अनुभवत होता, जसा प्रार्थना करत होता—तसंच काहीसं तुमच्या विचारांमध्ये झलकत असतं. ही जादू नाही—ही आहे डीप कोडिंग.

६. गोत्राचा उपयोग शिक्षणपद्धती ठरवण्यासाठी होत असे
प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एकसारखं शिकवलं जात नसे. गुरु पहिलाच प्रश्न विचारत: "बाळा, तुझं गोत्र काय?" हे का विचारायचं? कारण त्यातून समजायचं की कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे. कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगत आहेत. उदा. अत्री गोत्राचा विद्यार्थी ध्यान आणि मंत्रविद्येत पारंगत होतो. कश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गूढ प्रवेश करतो. गोत्र म्हणजे शिक्षणशैली, जीवनमार्ग आणि आत्मस्वरूप.

७. ब्रिटिशांनी याची थट्टा केली आणि आपण विसरलो
जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्रपद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिणवलं. बॉलीवूडने पुजाऱ्यांच्या गोत्र विचारण्याची चेष्टा केली. आणि हळूहळू आपण आपल्या आजीआजोबांना विचारणं थांबवलं, आपल्या मुलांना सांगणं बंद केलं. दहा हजार वर्षांची परंपरा फक्त शंभर वर्षांत हरवली. कोणी नष्ट केली नाही—आपणच विसरलो.

८. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल — तर तुम्ही एक नकाशा गमावला आहे
कल्पना करा, तुम्ही एखाद्या प्राचीन राजघराण्यातले आहात, पण तुमचं आडनाव काय आहे हेच माहीत नाही. तसंच आहे गोत्राचं महत्त्व. गोत्र म्हणजे तुमचं आध्यात्मिक GPS — जे तुम्हाला योग्य मंत्र, विधी, ऊर्जा उपचार, वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोड मिळवण्यासाठी मार्ग दाखवतं. गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारात चालणारे होतो.

९. गोत्र सांगणं हे “फक्त औपचारिकता” नव्हतं
पुजेमध्ये पंडित जेव्हा तुमचं गोत्र उच्चारतो, तेव्हा तो केवळ एक विधी करत नसतो — तो तुम्हाला तुमच्या ऋषिपरंपरेशी पुन्हा जोडत असतो. तुमच्या आत्मिक वंशपरंपरेला साक्षी म्हणून बोलावतो, आणि आशीर्वादाची वाट मोकळी करतो. म्हणूनच संकल्पात गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान असतं — “मी, भरद्वाज ऋषींचा वंशज, पूर्ण आत्मचेतनेने देवतांचे साहाय्य मागतो.”

१०. तुमचं गोत्र जतन करा — उशीर होण्याआधी
आईवडिलांना, आजीआजोबांना विचारा. माहिती नसेल, तर शोधा. पण ते माहीत नसणं म्हणजे आपली मुळं विसरणं. ते लिहून ठेवा, मुलांना सांगा, आणि अभिमानाने उच्चारा. तुम्ही २००० साली जन्मलेले असाल तरी, तुमचं गोत्र हजारो वर्षांपूर्वीच्या ऋषीने पेटवलेली दिव्य ज्योत आहे. तुम्ही त्या अजरामर कथेचं आत्ताचं शेवटचं पान आहात.

११. तुमचं गोत्र म्हणजे आत्म्याचं विसरलेलं पासवर्ड
आज आपण Wi-Fi पासवर्ड, ईमेल लॉगिन, Netflix कोड लक्षात ठेवतो. पण सगळ्यात जुना पासवर्ड — आपलं गोत्र — विसरतो. तो एकच शब्द तुमचं पूर्वजांचं ज्ञान, मानसिक सवयी, कर्माचे संस्कार आणि आत्मिक बल उघडू शकतो. हे फक्त एक लेबल नाही — ही एक किल्ली आहे. ती वापरा… नाहीतर गमवा.

१२. स्त्रिया विवाहानंतर गोत्र ‘गमावत’ नाहीत — त्या ते मौनपणे जपत असतात
अनेकांना वाटतं की लग्नानंतर स्त्रियांचं गोत्र बदलतं, पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म आहे. श्राद्ध विधीत स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जातं — कारण गोत्र Y-क्रोमोसोमने पुरुषवाटे पुढे जातं. स्त्रिया गोत्राची ऊर्जा वाहक असतात, पण ते आनुवंशिकदृष्ट्या पुढे नेत नाहीत. म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही तिच्या अस्तित्वात जिवंत असतं.
१३. देवांनीसुद्धा गोत्र नियम पाळले होते

रामायणात जेव्हा प्रभु राम आणि सीतेचं लग्न झालं, तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलं:
राम: इक्ष्वाकु वंश, वसिष्ठ गोत्र
सीता: जनक राजा यांची कन्या, कश्यप गोत्र
प्रेमाखातर त्यांनी धर्माचे नियम झुगारले नाहीत. देवसुद्धा गोत्रसंहिता पाळत होते — हे याचं महत्त्व सिद्ध करतं.

१४. गोत्र आणि प्रारब्ध कर्म यांचा संबंध आहे
कधी असं वाटतं का, की लहानपणापासून तुम्ही काही विशिष्ट गोष्टींमध्ये आकर्षित होता? ते प्रारब्ध कर्म असतं — या जन्मात फळ देणारी कर्मबीजं. प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगळ्या होत्या. तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे, ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते. गोत्र समजणं म्हणजे तुमचं कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरुकिल्ली.

१५. प्रत्येक गोत्राशी विशिष्ट देवता आणि बीजमंत्र जोडलेले असतात
गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे — ते विशिष्ट देवता आणि बीजमंत्रांशी सुसंगत असतं. कधी वाटतं का की एखादा मंत्र “काम करत” नाही? कदाचित तुम्ही तुमच्या आत्मिक ऊर्जेला सुसंगत मंत्र न वापरताय. योग्य गोत्र + योग्य मंत्र = आध्यात्मिक प्रवाह. हे समजल्यास ध्यान, साधना आणि उपचारशक्ती १० पट वाढते.

१६. गोत्र = अंतःप्रेरणा गोंधळात
आज बरेच लोक हरवलेले वाटतात — उद्दिष्ट काय? जीवनमार्ग कोणता? नातेसंबंध कसे असावेत? पण जर तुम्ही शांत बसलात आणि तुमचं गोत्र, ऋषी, परंपरा यांचा विचार केला, तर अंतःप्रेरणा जागृत होते. तुमचा ऋषी गोंधळात नव्हता. त्याची विचारलहर अजूनही तुमच्या नसानसांत आहे. तिला अनुसरलं, तर स्पष्टता मिळते.

१७. प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला
चंद्रगुप्त मौर्य, हर्षवर्धन, शिवाजी महाराज — सगळ्यांनी राजगुरु नेमले, जे कुल, गोत्र आणि परंपरा यांची नोंद ठेवत. राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचाही आधार गोत्रावर असायचा. गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हे — ती संस्कृतीची शिरा आहे. तिला दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळालाच नाकारणं.

१८. गोत्रपद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं
आधुनिक भाषेत बोलायचं झालं, तर गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षाव्यवस्था होती. ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी, रक्तसंबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी होती. युद्धात हरवलेल्या किंवा अपहृत स्त्रियांनाही त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजात स्थान मिळवता आलं. ही मागासपणा नव्हे — ही पुरातन बुद्धिमत्ता होती.

१९. गोत्र म्हणजे तुमची कॉस्मिक भूमिका
प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एका विशिष्ट कार्यासाठी झटत होता:
काही शरीरोपचारात पारंगत
काही खगोलशास्त्रज्ञ
काही धर्मरक्षक
काही न्यायसंस्थापक
तुमचं गोत्र त्या उद्देशाचं पडसाद घेऊन येतं. तुम्हाला आयुष्यात रिकामेपण जाणवतं? कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका विसरलात. गोत्र शोधा. भूमिका सापडेल.

२०. हे धर्माबद्दल नाही — ही ओळखीबद्दल आहे
तुम्ही नास्तिक असाल, फक्त आध्यात्मिक असाल, विधी-धर्मांबद्दल गोंधळलेले असाल — तरीही गोत्र महत्त्वाचं आहे. कारण हे धर्माच्या पलिकडचं आहे. हे आहे पूर्वजांचं भान. हे आहे भारतीय तत्वज्ञानाचं मौन मार्गदर्शन. त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही — पण ते आठवणं गरजेचं आहे.

अंतिम शब्द:
तुमचं नाव आधुनिक असू शकतं. तुमचं जीवनशैली जागतिक असू शकते. पण तुमचं गोत्र  कालातीत आहे.
आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंत, तर तुम्ही त्या नदीसारखे आहात  जी आपला उगम विसरलेली आहे.
गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे  ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे. ते उघडा आणि पुढच्या पिढीला ते हरवू देऊ नका.

2019. पालक आहात, मालक नाही !

 NEET परीक्षेच्या तयारीसाठी बापाने पोरीला क्लास लावला. क्लासमध्ये झालेल्या सराव परीक्षेत लेकीला अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत याचा मुख्याध्यापक असलेल्या बापाला भलता राग आला. लेकीच्या शिक्षणावर बाप पैसे खर्च करत होता त्या बदल्यात त्याला घसघशीत मार्क्सच्या रूपाने रिटर्न्स हवे होते.
बापाचं टाकून बोलणं असह्य झाल्यानं "तुम्ही अभ्यास केला होतात. तुम्ही कुठे कलेक्टर झाला. शिक्षक झालात ना?" पोरगी उलटून बोलल्याने बापाचा पारा चढला. त्याने जात्याच्या खुट्याने, लाथा बुक्क्यांनी पोरीला जबर मारहाण केली. एकदा नव्हे तर अनेकदा बापाने अमानुषपणे मारहाण केली. जबर मारहाण झाल्याने अर्धमेली झालेली पोरगी रात्रभर निपचित पडून राहिली. दयामाया नसलेल्या पाषाणहृदयी बापाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. निर्दयी बाप शनिवारी सकाळी खुशाल शाळेत निघून गेला. 
घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध असल्याचं आईने सांगितल्यावर पोरीला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली. तोपर्यंत वेळ फितूर झाली होती. त्या अभागी लेकराच्या शरीरातून प्राण निघून गेला होता. ही घटना वाचून मन सुन्न झालं. एकाएकी उदास वाटू लागलं. काही काळ तर काय बोलावं, काय लिहावं कसं व्यक्त व्हावं.... अशी विमनस्क मन:स्थिती झाली होती. 
भारताच्या संदर्भाने विचार करतो तेव्हा मुलांना जन्मताच पीसी म्हणजे पेरेंटल कस्टडी मिळाल्याचे माझे मत आहे. मुलांना काय वाटतं? त्यांना कोणत्या शाळेत जायचं आहे? त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या? यांचा साकल्याने विचार न करता मुलांच्या आयुष्याचं सगळं काही जणू आपल्याला कळतं, अशा मस्तीत गुर्मीत असलेले पालक मुलांच्या आयुष्याचे जवळपास सगळे निर्णय पालक मुलांच्या परस्पर घेतात. मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत? हे अनेक पालकांच्या गावी नसते. मुलांचं करिअर निवडताना पालक प्रचंड गोंधळलेले आहेत. संभ्रमात आहेत. ते इतरांचे कोणाचे तरी अनुकरण करताना दिसतात. यातून मुलांचे त्रास आणखी वाढत आहेत. 
पालकांकडे पैसे आहेत म्हणून नीट किंवा जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी लावली जाते. दहावीत मिळालेले भरमसाट मार्क्स अकरावी-बारावी विज्ञान आणि त्यापुढील प्रवेश परीक्षेत फारसे कामाला येत नाहीत. आपली मुलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आयआयटीमध्ये जाण्याची स्वप्नं यांनी उराशी बाळगलेली असतात. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने महागडे क्लास लावले जातात. गुंतवणूक आणि परतावा अशी मार्केटची भाषा पालक मुलांसाठी वापरताना दिसतात. पैसे खर्च केले तर मार्क्स मिळायला हवे असा आग्रह असतो. 
अनेक मुलांना गुंतागुंतीचे किचकट प्रश्न सोडवता येत नाहीत. संकल्पना स्पष्ट नसतात. शिकवलेलं समजलेलं नसलं तरी परीक्षा कठोर वातावरणात होतात. अशा वेळी मुलांच्या नाकी नऊ येतात. तीव्र स्पर्धा. आई-बाबांनी पैसे खर्च केलेले आहेत. अपेक्षित मार्क्स मिळत नाहीयेत. आई-वडिलांना मार्क्स पाहिजेत. मौनातला आकांत मुलांना असह्य होतो आहे. अभ्यासात मन लागत नाही. तीव्र चिंता सतावत असते. मनात भीती घर करून बसलेली असते. आतल्या आत प्रचंड खळबळ सुरू असते. रेसच्या घोड्यावर लावतात तसे पालकांनी मुलांवर पैसे लावलेले असतात! त्यांना केवळ यश हवं असतं! मूल म्हणजे मार्क्स मशीन नाहीयेत याचं भान हरपून गेले आहे. 
परिणामी मुलं त्रासात आहेत ताणात आहेत. त्यांची विचित्र कोंडी झाली आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी मनोवस्था मुलं अनुभवत आहेत... वरवर पाहता सगळं काही ठीक चाललं आहे असं वाटत असतं तरी पालकांना मुलांच्या अंतरंगातला कल्लोळ आणि त्रास यांचा अंदाज येत नाही. प्रेशर कुकरला शिटी असते. मुलांच्या डोक्याला तशी सोय नाहीये... न झेपणाऱ्या विचारांची कोंडलेली वाफ आतून धडका मारत असते, याची पुसटशी कल्पना पालकांना असते का...?
सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या बापाला लेकीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे महत्त्वाचे वाटत होते! गुंतवणूक करूनही अपेक्षित रिटर्न्स मिळाले नाहीत म्हणजे आपलं नुकसान झाल्यासारखं पालकांना वाटत असेल तर हा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे याचा आपल्याला अंदाज येतो. हा बाप माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. अशा मानसिकतेचा मुख्याध्यापक म्हणजे तिथल्या मुलांचीदेखील चिंता वाटते...
आपण इतका खर्च करतो तर मुलांनी टॉपर म्हणून मार्क मिळवत राहावे, असे पालकांना वाटते. इतकं सोपं असतं का खरेच हे सगळं? आपल्या मुलांची क्षमता किती आहे? याचा विचार मागे पडलेला आहे. गोष्टी लादल्या गेल्याने त्यातला आनंद संपलेला असतो. मुलं दुबळी आणि पालक सबळ असतात. निमूटपणे सहन करण्याशिवाय मुलांपुढे अन्य पर्याय नसतो. गुमान गप्प बसून बिचारी मुलं सगळं काही सहन करतात. आतली खळबळ न सांगता. अनेकदा या मानसिक ताणतणावातून मुलं नैराश्याच्या फेऱ्यात सापडतात. NEET आणि JEE या परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधल्या कोटा येथे गेलेल्या मुलांपैकी अनेक मुलं कमी मार्क्स घेऊन येतात. तेव्हा त्यांना आपण जणू काय आपल्या पालकांचे गुन्हेगार आहोत, असा अपराधगंड छळत असतो. कोटा शहरात मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या गंभीर चिंतेचा विषय असूनही अनेक मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय पालक मुलांना या चरकात आपणहून ढकलताहेत. या चरकात अडकलेल्या अनेक मुलांमधला जीवनरस संपून त्यांचं पार चिपाड होऊन जातं. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन उग्ररूप धारण करते आहे. मुलांच्या यशात स्वतःचे यश शोधणारे पालक आपल्या पोटच्या पोरांशी क्रूर वागू लागलेत. आयआयटीमधून शिक्षण लाखांचे पॅकेज किंवा डॉक्टर होऊन दवाखाना थाटणार आणि मग सोंगाढोंगात लग्न कार्य... कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी आईवडील कसे बहकत चाललेत, याचं प्रत्यंतर सांगलीसारख्या मन विदीर्ण करणाऱ्या विदारक घटनांनी येतं.
जेईई, नीट या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले तर आणि तरच आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य आहे असे बहुसंख्य पालकांना वाटू लागले आहे. यातूनच तुलना केली जाते. ताण असह्य होऊन किंवा कथित अपयशाची भीती वाटल्याने, मनावर प्रचंड दडपण आल्यामुळे 'आई बाबा मला माफ करा...' अशी नोट लिहून मुलं आत्महत्या करतात अशा बातम्या यायच्या. आता तर पालकच मुलांच्या हत्या करायला लागलेत.
मातापित्यांच्या लैंगिक सुखाच्या प्रेरणेतून, नैसर्गिक गरजेतून मुलांचा जन्म होतो. पालकत्व ही जबाबदारी आहे. ती समजून उमजून विचारपूर्वक करायची कृती आहे हे किती पालक लक्षात घेतात? पालक व्हायच्या आधी हे सगळं लग्न झालेल्या दाम्पत्याला नीट समजून सांगितले पाहिजे. आपल्या समाजात पालकत्वाचे कोणतेही शिक्षण नाही. पहिल्या वर्गात प्रवेश घेताना शाळा आणि माध्यम निवडण्यापासून करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेपर्यंत निर्णय पालक घेतात. पालकांच्या मनातला गोंधळ, संभ्रम नजरेस पडत राहतो. मुलांच्या भविष्याची प्रामाणिक काळजी पालकांना वाटते हे वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलांचं काय होईल? अशी असुरक्षितता पालकांच्या मनात असते. काहीशी ती स्वाभाविकही आहे. अलीकडे मात्र पालकांचं ताळतंत्र सुटत चाललं आहे. या गोंधळाचे वाईट परिणाम मुलांवर होताहेत. याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 
शासकीय पातळीवर काही होईल अशा अपेक्षा करणे गैर आहे. वाढत चाललेला स्क्रीन टाईम, अकॅडमीक ओव्हरलोड, आकर्षणातून निर्माण होणाऱ्या लैंगिक समस्या, हिंसा आणि व्यसनांचे आकर्षण अशा अनेक गोष्टी आहेत. मुलं ताणात आणि त्रासात आहेत. प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही सरकार दुर्लक्ष करत आले आहे. कारण अकरावी बारावीचे वर्ग ओस पडलेले आहेत आणि क्लासेस ओसंडून वाहत आहेत. प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना मुलांच्या मनावर मेंदूवर किती ताण येतो, त्यांची मनःस्थिती कशी असते? एकूण शिक्षण, करियर आणि एकूण मानसिक आरोग्याबाबत एखादा अभ्यास केल्यास यातलं भीषण वास्तव समोर येईल.
खलिल जिब्रान म्हणतो "तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्ये आहेत. तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत." वास्तविक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मुलांचा आदर पालकांनी करायला हवा. मात्र अलीकडे पालक मुलांचे मालक झाल्यासारखे वागताना दिसतात.

- भाऊ चासकर

मंगळवार, २४ जून, २०२५

2018. स्वर्ग

      आज दिवसभर त्याला काम होतं. म्हणजे ते रोजच असायचं. पण आज जरा जास्त होतं. त्याचं काम सोप्या शब्दात सांगायचं तर त्याच्या ऑफिसच्या मुंबईतील चार ऑफिसची कागदपत्रे साहेब लोकांच्या सह्या वगैरे घेऊन ह्या ऑफिसातून त्या ऑफिसात नेणे. काम जोखमीच होतं. पण तो ते  उत्तम रित्या करत होता. आज दिवसभर तो फिरत होता. कंपनीने दोन्ही रेल्वे आणि बस चे पास काढून दिले होते त्याला. त्यामुळे त्याला एकदम भारी वाटत असे. तर आज फार फिराफीरी झाली होती. शेवटची फाईल बॅलार्ड पियर ऑफिसातून सही घेऊन त्याने मारोळ ऑफिसात पोहोचवली आणि तो साधारण साडेसातला ऑफिसातून निघाला !
      बाहेर पडतो तो प्रचंड पाऊस. त्याने छत्री उघडली आणि अंधेरी स्टेशनला जाणाऱ्या बसच्या रांगेत उभा राहिला. मोबाईल आणि पाकीट त्याने प्लास्टिकच्या पिशवीत टाकून खिशात ठेवले. बसला प्रचंड लाईन होती. रस्त्याला फुल ट्राफिक. पाऊस कोसळत होता! आता इथून अंधेरी स्टेशन. मेट्रो परवडत नसल्याने अंधेरीहून ट्रेन ने  दादर आणि दादर वरून वांगणी. तिथून पुढे बस नाहीतर शेयर रिक्षाने वीस मिनिटं ! छत्री असूनही तो अर्धा भिजला होता. पॅन्ट गुढघ्यापर्यंत चिंब झाली होती आणि शर्टपण त्याच्या जुन्या झालेल्या छत्रीच्या कापडातून ठिबकणाऱ्या पाण्याने ओला झाला होता! बस आली. लोक छत्र्या बंद करत, अर्धे भिजत, ब्यागा सांभाळत बस मध्ये घुसले. तो पण चढला. रोजची सवय !
    बसने ट्राफिक कापत अंधेरी स्टेशनला यायला एक तास घेतला. तो स्टेशन वर आला आणि चर्चगेट फास्टची वाट पाहू लागला. गाड्या दहा मिनिटं लेट होत्या. गाडी आली. तो चढला. उलट जात असल्याने फार गर्दी नव्हती. तो बसला. रुमालाने चेहरा पुसून त्याने बॅग मधून पाण्याची बाटली काढून पाणी प्यायलं. तो डोळे मिटून मागे डोकं टेकवून बसला. थोडी झोप लागली पण बांद्रा जाताच ती यंत्रवत उडून तो जागा झाला ! दादर नामक जनसागरात गाडीतून उतरल्यावर सेंट्रल रेल्वे प्लॅटफॉर्मला जाताना अक्षरशः जनसागर पोहून प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागत होतं. ते पण रोजचं होतं. त्याने लीलया तो जनसागर पार केला आणि तो प्लॅटफॉर्म वर आला तो अनौन्समेंट झाली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या अर्धा तास उशिरा धावत होत्या!  फलाटावर तोबा गर्दी होती. भिजलेल्या आणि घराकडे निघालेल्या श्रमिकांची !
        गाडी आली. लोक जिवाच्या आकांताने त्यात घुसले. हा गर्दी बरोबर आपोआप आत गेला. हे रोजचं होतं. आज गर्दी थोडी जास्त आणि ओली हाच फरक! अक्षरशः मुंगीला शिरायला जागा मिळणार नाही असे लोक एकमेकांना चिकटून उभे होते. ह्याच्या समोर उभा असलेल्या माणसाच्या लाल तोंडातून तो खात असलेल्या तंबाखूचा दर्प येत होता ज्यात दारूचा वास मिसळला होता. सबंध डब्यात सार्वजनिक घामाचा वास भरून राहिला होता. त्यात भिजलेल्या कपड्यांचा कुबट वास मिसळला होता. गाडी पळत होती. पाऊस असल्याने सगळ्या खिडक्या आणि दारं बंद होती. लोक स्टॅच्यु केल्या सारखे एकमेकांना खेटून अचल उभे होते. त्यातच तो देखील ! मध्ये मध्ये सिग्नलला, उशीर करत, संथ धावत गाडी वांगणी स्थानकात पोहोचली तोवर बारा वाजले होते. तो आणि त्याच्या सारखेच काही तुरळक लोक गाडीतून उतरले. स्टेशन बाहेर कोसळणारा पाऊस आणि मोजक्या रिक्षा. तो रहात असलेला रानवारा प्रकल्प दूर डोंगराच्या पायथ्याशी होता.  तो शेयर रिक्षात बसला. काळोख्या रस्त्यावर झुंजूमंजू प्रकाशात रिक्षा पाऊस कापत निघाली. ड्रायव्हर हाताने वायपर हलवत होता पण समोर फार काही दिसत नव्हतं. तो रोजच्या अंदाजाने रिक्षा चालवत होता. दोघांना वाटेत सोडून रिक्षा ह्याला घेऊन निघाली. आजूबाजूला झाडी आणि खडबडीत रस्ता. रिक्षा घराजवळ चौकात थांबली. त्याने पैसे दिले आणि छत्री सांभाळत तो घराकडे जाऊ लागला. मिट्ट काळोख. रस्त्यात आणि घरातही. तशीही लोड शेडिंग ने वीज कमीच असे. त्यात पाऊस म्हणजे तर वीज जायला मुहूर्त मिळालेला.
     तो घरी पोहोचला. कडी वाजवली. बायकोने दार उघडलं. घरात मेणबत्ती तेवत होती. पावसाने बाहेरून आणि आतून थोडं शेवाळ धरलेल्या घराच्या भिंतींना शेवाळाचा वास येत होता. त्यांची संपूर्ण इमारत पावसाळ्यात शेवाळमय होत असे. लीकेजचा कायम स्वरूपी रोग होता इमारतीला !
बायको- भिजलात हो खूप.
तो- हम्म...पाऊस आहे भरपूर...
बायको- तुम्ही अंग पुसा. मी जेवायला वाढते गरम गरम.
बायको किचन मध्ये गेली. तो टॉवेल ने अंग पुसून कपडे बदलू लागला. समोरच त्याची चार आणि सहा वर्षांची दोन मुलं गाढ झोपलेली होती. त्याने अंग पुसून टॉवेल दांडीवर टाकला तोवर बायको जेवणाच ताट घेऊन आली. काही खास नव्हतं. वांग्याचं भरीत, गरम भाकरी आणि ठेचा. तो जमिनीवर जेवायला बसला. बायकोने ताट आणि पाण्याचा तांब्याभांड त्याच्या समोर ठेवलं. त्याने एक घास घेतला आणि आहा... तब्बेत खुश. 
बायको- तुम्ही जेवा मी अजून भाकऱ्या आणते.
त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला-
तो- बस इथे...
ती- काय?
तो- आमच्या कंपनीतून पाच लाख कर्ज मिळालं त्यात आपले थोडे घालून ही छोटीशी जागा घेतली आपण.  आपली जागा ! रोज इथे परत येण्यासाठी खूप प्रवास करतो मी. कारण मला दार उघडणारा तुझा हसरा चेहरा दिसत असतो आणि आठवत असते तुझ्या हातांची ही चव ! 
इतक्यात दोन्ही मुलं जागी होऊन त्याच्या पाठीमागून येऊन त्याच्या पाठीवर रेलून "बाबा आलात? पाऊस खूप पडतोय. उद्या मी होडी करणार आहे." अशी चिवचिव करू लागली. 
तो बायकोला म्हणाला -
तो- आपलं घर लहान आहे, लांब आहे, सोयी फार नाहीत. पावसाळ्यात तर हालच होतात. पण ह्या पोरांची चिवचिव आणि तुझं हास्य इथे भरून आहे. हाच माझा स्वर्ग आहे ! 
तिच्या डोळ्यात अश्रू तराळले. मुलं त्याला बिलगून चिवचिवाट करत होती.  आत गॅस वर भाकरी करपली होती. पण स्वर्ग सुखाचा आनंद घेणाऱ्या त्या चौघांना त्याची पर्वा नव्हती. पाऊस बाहेर कोसळत होता. आत त्या चिमुकल्या घरातल्या मिणमिणत्या प्रकाशात मात्र स्वर्ग अवतरला होता !-  

© मंदार जोग



2017. स्वाभिमानाची किंमत

 एका वेश्यालयाच्या गर्द गल्लीतील कोपऱ्यात, तिचे डोळे दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडे बघत. हसत, पण आतून मरणारा आत्मा लपवत असत.
ती – "सुजाता" दिसायला सुंदर, पण तिचं जीवन काळाने कुरतडलेलं. लाखो रुपयांची कमाई करूनही, तिचं जीवन केवळ नाण्यांच्या खणखणाटाने भरलेलं, पण माणुसकीच्या एका शब्दाने रिकामं.
एक दिवस त्या गल्लीच्या बाहेरून एक टाय घातलेला, कोटातला सरकारी अधिकारी तिला पाहतो.
सगळ्यांना तिच्याकडे एक "सेवा" म्हणून पाहायची सवय होती पण त्याने तिच्या डोळ्यातलं एक "जीवंतपणं" पाहिलं.
त्याने तिला म्हटलं
"सुजाता, या पापाच्या दलदलीतून बाहेर ये. मी तुला सन्मानाने घर देईन, समाजात मानाचं स्थान देईन. तू फक्त 'हो' म्हण."
ती खळखळून हसली होती तेव्हा. पण त्या हसण्यामागे एक अविश्वास होता समाजाच्या खोट्या दयाळूपणावर.
तरीही, कोणीतरी आपल्याला "माणूस" म्हणून स्वीकारायला तयार आहे, या विचाराने ती बधली आणि त्यांनी लग्न केलं.
पण... स्वप्नं जेवढी सुंदर, तितकीच त्या मागची वास्तवाची जळती बाजू होती..
एक काळ गेला साडीतील ती सुजाता आता ऑफिस पार्टीत त्याच्या सोबतीला दिसू लागली. समाजात तिला मान मिळू लागला पण तिचा आत्मा अजूनही कापसासारखा हलका आणि भितीदायक होता. तिने एक नवा अध्याय सुरू केला होता – पण जुन्या पुस्तकाच्या पानांना वास सुटलेला होता.
एक दिवस…
बातमी आली
"IAS अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. चौकशीत नाव बदनाम झालं. समाजात थू थू झाली."
प्रत्येक बातमीत, त्याच्यासोबत सुजाताचं नाव डकलं गेलं.
"ती वेश्या होती म्हणून त्यानं भ्रष्टाचार केला!" – असंही कोणी बोललं.
सर्वांनी तिच्या नव्या आयुष्याला परत जुन्या ओळखीच्या काळ्या डागाने भरलं.
ती जेलमध्ये गेली एक भेट घेण्यासाठी.
तो हतबल, नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. 
ती थांबली आणि म्हणाली
"तू म्हणाला होतास, मी तुला सन्मानाने जगवीन... पण तूच माझा स्वाभिमान लज्जास्पद केलास.
माझ्या जुन्या आयुष्यात शरीर विकत होते,
पण इथे – तू आत्मा विकलास...
मग सांग… मी चुकले कुठं?
जिथं होते तिथं निदान माझा खोटा मुखवटा नव्हता.
माझं आयुष्य कसंही असो, मी कोणावरही अवलंबून नव्हते.
पण तुझ्यासोबत येऊन मी माझं अस्तित्व गमावलं..."
तेवढं बोलून ती निघाली.
शेवटी वास्तव हेच सांगतं...
सन्मान हा कोणाच्या जात, व्यवसाय, भूतकाळावर अवलंबून नसतो.
तो व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर आणि मनाच्या शुद्धतेवर असतो.
जो स्वतः भ्रष्ट आहे, तो दुसऱ्याला स्वच्छतेचं नाटक फक्त काही काळ दाखवू शकतो.
पण सत्य उघड व्हायलाच हवं आणि एकदा उघडलं की त्याचं पांढरं वस्त्र पारदर्शक होतं…
म्हणून...
"प्रेम हेच सर्वस्व नाही.
ते जर खोट्या आधारावर, ढोंगावर, स्वार्थावर उभं असेल तर ते फक्त सुंदर गोंडस मृगजळ ठरतं."

संदीप चव्हाण 


2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...