शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

3. बघ माझी आठवण येते का?

बघ माझी आठवण येते का?
खिडकीत उभे राहून बघ … 
बघ माझी आठवण येते का? 
हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं  पाणी 
इवलसं  तळ  पिऊन  टाक, बघ माझी आठवण येते का? ।।धृ ।।

वा-याचे उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो. 
नाहीच जाणवलं काही तर पाय मोकळे कर,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. 
पाण्यात पाय बुडवून उभी राहा, 
वाळू सरकेल पायांखालून,
बघ माझी आठवण येते का? ।।१।।

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे. 
चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. 
शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नव-याची वाट  बघ. 
बघ माझी आठवण येते का? ।।२।।

दारावर बेल वाजेल, दार  उघड, नवरा असेल. 
त्याच्या हातातील ब्याग घे, रेनकोट तो स्व:ताच  काढील,
तो विचारेल तुझ्या भिजण्याचे कारण, तू म्हण घर गळंतय. 
मग चहा कर, तूही  घे. तो उठून पंकज उधास लावेल, 
तू बंद कर,किशोरीचं सहीर अली  लाव. 
बघ मझी आठवण येते का? ।।३।।

मग रात्र होईल, तो तुला खुशीत घेईल,
म्हणेल, "तू मला आवडतेस.", पण तुही तसचं म्हण. 
विजांचा कडकडाट  होईल, ढगांचा गडगडाट  होईल, 
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमो-या शरीराकडे बघ. 
बघ माझी आठवण येते का? ।।४।।

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस  नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. 
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. 
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी,
बघ माझी आठवण येते का? ।।५।।

लेखक : अज्ञात 
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

2. घाबरत घाबरत शब्द जुळवत …

घाबरत घाबरत  शब्द  जुळवत … 
घाबरत घाबरत शब्द जुळवत  
त्याने तिला एकदाच विचारलं ,
"प्रेम करतो तुझ्यावर ,
तू करशील का माझ्यावर?"
तिने त्याच्याकडे हसून पाहिलं, 
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं. 
मग हळूच तिने त्याला डोळ्यांतून "हो" म्हटलं. 
ढग नाही बरसले तेंव्हा, 
वारा  नाही सुटला तेंव्हा, 
मोरही नाही दिसला नाचताना. 
एक कावळा  तेवढा ओरडला. 
त्याला मात्र सतारीच्या ,
झंकाराचा  भास झाला. 

अविश्वासाने त्याने थरथरत,
तिचा हात हातात घेतला. 
छाती फाटोस्तोवर एक भला मोठा,
मोकळा मोकळा  श्वास घेतला. 
चंद्र नाही हसला तेंव्हा,
मोगरा नाही फुलाला तेंव्हा. 
गाणंही  नाही सुचलं गुणगुणाव म्हणायला,
एक स्कूटरवाला तेवढी शिवी हासडून गेला. 
त्याला मात्र सनईच्या,
 ओल्या सुरांचा भास झाला. 

मागे - पुढे लग्न-बिग्न, पोरं -बिरं,
संसार- बिव्न्सार  करून झालं. 
चिमणा-चिमणीचे एक पाखरू,
दूर देशात उडून गेलं. 
एके दिवशी घाबरत-घाबरत शब्द जुळवत,
त्यानं तिला एकदाच विचारलं,
"जमली का गं  मला तुझी सगळी सुखं  द्यायला?"
तिनं त्याचाकड हसून पाहिलं,
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं. 
मग तिने त्याला डोळ्यांतून "हो" म्हटलं. 

समाधानानं थरथरता त्याचा हात,
त्यानं तिच्या हातात ठेवला. 
छाती फाटोस्तोवर एक भला मोठा,
मोकळा मोकळा  श्वास घेतला. 
पाऊस नाही पडला तेंव्हा,
क्षितीज नाही रंगलं  तेंव्हा. 
झुलाही नव्हता तिथं  झुलाव म्हणताना. 
पोस्टमन तेव्हढ पोराचं  पत्र टाकून गेला,
त्याला मात्र आयुष्यच सतार झाल्याचा भास झाला. 

लेखक : अज्ञात 
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

सोमवार, २२ जून, २०१५

1. आवडती मैत्रीण …

                       
वाटल जेंव्हा आयुष्यातील आता सर्व काही सरल… 
जेंव्हा आवडणाऱ्या मैत्रिणीच लग्न ठरलं … 

म्हणाली चांगल्या जीवनसाथीसाठी नवस करायला गेले होतो …. 
जर चांगला जीवनसाथी  हवा होता तर आम्ही काय मेलो होतो?

टेम्पररी नोकरीमुळे विचारायचा धीर नाही झाला … 
नंतर नेहमीप्रमाणे कळलं की आता फार उशीर झाला … 

आता दररोज हिचं  फक्त नावारापुराण  …. 
दुस-या  पुरुषाची स्तुती ऐकूण  आम्ही झालो पुरते हैरान … 

मग एके दिवशी आम्हांला त्याचं दर्शन घडलं …. 
विचार नुसता करत राहिलो की , हिने ह्याच्यात काय पाहिलं …. 

एक कायमची नोकरी लग्नासाठी पुरेशी असू शकते?
सुरक्षिततेची भावना सगळ्यात मोठी ठरू शकते… 


शेवटी स्वीकार केला आम्ही, नशिबाची चाल आहे तिरकी … 
प्रेमासारख्या नाजूकबाबतीतही दैवाने घेतली आमची फिरकी …  

दोन वर्षानंतर रस्त्यात पुन्हा ती भेटली …. 
हसायलाही पैसे पडतात याची आम्हाला खात्री पटली … 

प्रेमाचे आम्ही विसरून गेलो 
पण आता मैत्रीही शाबूत नसते … 

कारण आपणासोबत असणारी काही क्षणांची मैत्रीण 
ही अनंत काळासाठी तिच्या नवऱ्याची पत्नी असते … 

लेखक - अज्ञात 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------



2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...