शनिवार, १२ जानेवारी, २०१९

10. आठवणीत तुझ्या (आयुष्याच्या जोडीदारावर आधारलेली कथा)

     जोशी काका, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून रस्त्याने चालले होते. रस्ता तसा नेहमीचाच पण गाड्या भरगांव अशा सुसाट धावायच्या की सिग्नल लागला नसेल तर रस्ता ओलांडून जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे लक्षण होते. जयेशने आरतीचा हात धरला आणि बाबा, चला लवकर, सिग्नल लागला आहे. असे ओरडून ते दोघे धावले. पार रस्ता ओलांडून दुसऱ्या रस्त्याला चालूसुध्दा लागले. आरतीने मागे वळून बघितले आणि तिने जयेशला मागे खेचले. अरे थांब, बाबा तिथेच आहेत. साठीकडे झुकलेल्या जोशी काकांसाठी हा रस्ता नवीन नव्हता. सहा महिन्यांपूर्वी ते गावी रहायला गेले होते. परंतु त्यांचे अवघे तारुण्य या मुंबईत गेले होते. आता वार्धक्याचे (खरे तर निवृत्तीचे) आयुष्य त्यांना त्यांच्या पत्नीसोबत घालवायचे होते. तिलाही तिच्या हक्काचा वेळ द्यायचा होता. या विचाराने ते दोघे म्हणजे जोशी काका आणि जोशी काकू गावी शिफ्ट झाले होते. परंतु म्हणून काही या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते रस्ता पुढे ओलांडून जाणे विसरले होते? कसे शक्य आहे? जयेश विचार करत होता आणि त्याने पुन्हा रस्ता ओलांडला आणि बाबांना घेऊन आला. रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाले. आरतीने आरुषला झोपवले आणि जयेशकडे वळली. आरुष झोपलाय, जाऊया आतातरी. बोलूया बाबांशी? अगं, रात्रीचे अकरा वाजले आहेत. झोपतील आता ते, उद्या बोलू. नाही जयेशजागे आहेत ते. तुझा उद्या कधीच उजाडणार नाही. प्लीज, आज काय ते नक्की करायलाच हवं. शेवटी नाखुशीने तो तयार झाला. जोशीकाका गॅलरीमध्ये आराम खुर्चीत बसले होते आकाशांतील ताऱ्यांकडे बघत. नकळत काहीतरी बोलत होते. जणूकाही ताऱ्यांमध्ये काहीतरी असल्यासारखे.
     जयेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते तंद्रीतून जागे झाले. अरे बाळांनो, तुम्ही जागे आहात. झोपा जाऑफिस नाही का उद्या? आरु झोपला वाटते…? नकळत त्यांनी एका हाताने डोळे टिपले. दोघांच्या नजरेतून ते काही सुटले नाही. उद्या शनिवार आहे. सुट्टी आहे आमची. म्हणूनच आज मुद्दाम तुमच्याजवळ आलो आहे. काय गप्पा मारता त्या ताऱ्यांशी…? ते एवढे लांब मिलो दूर, त्यांच्याशी रात्रभर बोलता. आज आमच्याशी बोला ना? काय बोलत असता त्यांच्याशी? आरती भडाभडा सगळं बोलून गेली. जोशी काका वेळ दवडता बोलले, आज वेळ आहे ना तुमच्याकडे, तुमच्याशी बोलतोआणि आरती, मी ह्या ताऱ्यांशी नाही गं बोलत, मी हिच्याशी बोलत असतो. तिला या ताऱ्यामध्ये पहात असतो. हे दोघे थोडे घाबरले. बाबांची मानसिक अवस्था ठीक तर आहे ना? असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. वडीलांनी ते ओळखले आणि बोलले, घाबरु नका, तुम्हाला एक प्रेमकथा ऐकवू का? बाबा हे दोघे एकदम आश्चर्याने बोलले.  पुढे जोशी काका आठवणीत रममाण झाले आणि बोलत गेले आणि हे दोघे ऐकत गेले.
     तुमची आजची पिढी ही प्रेमविवाहाला जास्त मानणारी. वयात आलो नाही तर तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड हवा असतो. काय एवढं वेगळं बोलायचं असतं तुम्हाला जे तुम्ही आई-वडीलांशी शेअर नाही करु शकत? बर ते जाऊ दे. सख्खी भावंडे तर आहेत ना तुमच्या वयाची…? मग जनरेशन गॅपचा प्रश्न येतो कुठे? बर जाऊ दे. मला तुम्हाला फैलावर नाही घ्यायचं रे. फक्त थोडसं वेगळे प्रेम जे मी अनुभवलं त्याची प्रस्तावना किंवा कल्पना तुम्हाला यावी म्हणून बोललो या दोघांनी (अर्थातच प्रेम विवाह केला होतात्यामुळे त्यांनी) सुटकेचा श्वास सोडला. एक वेगळीच गंमत असते रे लग्न करुन त्या बंधनात अडकून मग आयुष्याच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करण्यात, त्याच्याशी जुळवून घेण्यात. तुझ्या आईचा माझ्या बरोबरचा संसार 35 वर्षांचा. खूप गोष्टी अनुभवल्या आम्ही एकत्रसुख-दु:, कितीतरी ऋतू कूस बदलून गेले. आता सगळंच संपल्यासारखं वाटतंय रे. तिची आणि माझी पहिली भेट. तुझ्या मावशी आज्जीने सुचवलेलं स्थळ. तिच्या घरी गेलो, मी पाहिलेलं हे तिसरं स्थळ असेल बहुतेक. यावेळेस पहिले पत्रिका जुळवली आणि मग भेटीचा कार्यक्रम आखला होता. खरं तर कांद्यापोहांचा आणि चहाचा. ठरवून लग्न करण्यात हा मात्र एक तोटा असतो बरं काम्हणजे मुलींसाठी लग्न जुळलं तर ठीक नाही तर उगाचच खर्च आणि मुलांसाठीसुध्दा. अरे मुलींच्या घरी जाण्या येण्याचे भाडे नाही का प्रवासाचे? हाहाहाजोशीकाका अचानक हसायला लागले. पुन्हा सुरवात, तिच्या घरी पोहचलो साधारणत: 5.30 वाजता संध्याकाळी. पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे गरमागरम पोह्यांची अपेक्षा होती. आपले काही नियम कळतचं नाहीत. म्हणजे नुसते पोहे खाऊन पूर्ण स्वयंपाक करता येतो की नाही हे कसे ठरवायचे बरे? आणि खरच ती मुलगी (उपवर वधू) बनवत असेल का ते पोहे? पण यावेळचे पोहे चांगले निघावेत अशी खूप अपेक्षा होती. तुझ्या आईचा फोटो खूपच आवडला होता रेअपेक्षेप्रमाणे आणि फोटोपेक्षा जास्त सुंदर दिसत होती ती प्रत्यक्षात. ती मोरपंखी रंगाची साडी, त्याचा जो जाडा काठ, तिची लाजेने खाली झुकलेली नजर, कपाळावरची टिकली, लांब सडक केस आणि त्यात घातलेला तो मोगऱ्याचा गजरा. काय सुंदर दिसत होती ती. आरती खुदकन हसली. बाबा इज ब्लिशींग. जयेशलाही गम्मव वाटली. काका बोलत होते. तिने बश्या ठेवल्या पण त्यात पोहे नव्हतेगोड शिरा होता अन् त्याबरोबर चहा नाही काही तर कॉफी होती. हे मात्र नवीन होतं. असं का? याचा खुलासा पुढे होणाऱ्या प्रश्नोत्तरात तिला करणारच, हा निर्धार मी केला होता. एकमेकांची तोंड ओळख होण्याइतके विरुध्द पार्टींनी (आम्हां दोघांचे आई-वडील आणि उपस्थित मोठे मान्यवर) एकमेकांना प्रश्न विचारुन झाले होते. त्यांची मनासारखी उत्तर देऊन आम्ही तोंडी परीक्षेत पास झालो होतो हे त्यांच्या चेहऱ्यावरुन कळालं होतं. त्यात माझे मामा बोलले, मग त्यांना बोलू दे थोडं सविस्तरपणे. आपण जाऊया आतल्या खोलीत. देवा केंव्हापासून ऐकायचं होतं हे मला. त्या अधिरेपणाची, घाईची मजाच वेगळीआता आम्ही दोघेच होतो, एकटेतिची नजर खाली आणि माझी तिच्या चेहऱ्यावर. पहिले विचारले, हा शिरा कॉफी काय प्रकार आहे? कांदेपोहेंचा कार्यक्रम असतो ना? तिला हा प्रश्न अपेक्षितच होता बहुतेक. ती म्हणाली, माफ करा, थोडं स्पष्टचं बोलते. आमच्या घरच्यांनी तुमची माहिती काढली होती. त्यांना तुम्ही आधीच आवडला होता, त्यामुळे मी ही होकारच दिला होता. तुम्ही माझ्या भावी आयुष्याचे जोडीदार व्हावे असं वाटतं होते आणि म्हणूनच आपल्या नात्याची सुरवात तिखट अशा कांद्यापोह्यांनी होता गोड शि-याने व्हावीम्हणून शिरा. आणि नात्यात फक्त गोडपणाच राहतो हे शक्यच नाही म्हणून सोबतीला कॉफी. थोडीशी कडवट. पुढच्या प्रवासात सुख-दु: तर येणारच, तेच तर आयुष्य आहे. ते आपण दोघे एकत्र मिळून सांभाळून नेऊ आणि लग्नाच्या संसाराच्या वादळ वाटेला सामोर जाऊ हेच सांगायचं होतं. तिचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व अफाट होतं पण त्याचबरोबर तिची भावनिकता जुळली होती. आणि खंबरीपणे आलेल्या संकटाला एकजुटीने सामोरे जायची तयारीही. तेवढ्याशा 5-6 ओळींनी माझं हृदय जिंकून घेतलं. तिच्यावरच्या संस्काराची जाणीव झाली आणि आमच्या लग्नाची सुपारी फोडूनच आम्ही परतलो. कुमारी भैरवी विष्णू बर्वे, सौभाग्यवती भैरवी उमाकांत जोशी झाली. आमच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले आणि ती माझ्या आयुष्यात कायमची आली. आम्ही अनुभवलेले सोनेरी क्षण आणि हो लोखंडी क्षणसुध्दा घेऊन येईन उद्यातुमच्यासाठीयेऊ ना  जोशी काका.
     एक नोकरी सोडली तर माझ्याकडे स्वत:चं असं म्हणवून घेण्यासारखं काहीच नव्हतं. वडीलोपार्जित दोन खोल्यांचं चाळीतलं घर. मी मोठा, माझ्या मागे दोन बहिणी, एक भाऊ तो तसा लहानच होता. म्हातारे आई-वडील. हिच्या घरची परिस्थिती तशी म्हणायला गेलं तर माझ्यापेक्षा उत्तमच. पण पाण्यात साखर विरघळावी तशी ही आमच्या घरात नांदू लागली. आमच्यातली एक बनून. सगळ्यांनाच आपलंस केलं तिने. लग्नानंतर म्हणावा तसा एकांत आम्हाला कधी मिळालाच नाही. गप्पागोष्टी-गुजगोष्टी असं बोलण हिला नेहमी खटकायचं. अहो, … अस कायआई-आण्णा काय म्हणतील? या प्रश्नावरच आमची गाडी अडकायची. त्यातूनही मी काही ना काही मार्ग काढायचोच. माझ्या ऑफिसची वेळ तशी ठरलेलीच. तरीही कधी-कधी लवकर सटकायची संधी मिळायची. 1 वा 2 तास. त्याकाळी मोबाईलची सुविधा नव्हती. मोबईल काय आमच्या घरी साधा एमटीएनएल पण नव्हता. मग मी शेजाऱ्यांकडे फोन लावायचो. हिला बोलवायचो. तीही यायची (काहीतरी बहाणा करुन) मग आम्ही घरापासून थोडं दूर असलेल्या बागेत जायचो, गप्पा मारायचो. मज्जा यायची. विवाहीत असूनदेखील असं लपत छपत आमचं प्रेम बहरायचं. कोणी बघितलं तर काय म्हणेल? अशी तिची हूरहूर कायम असायची. पण तिच्या चेहऱ्यावरही आनंद बहरुन यायचा. आपला हक्काचा नवरा सोबत आहे, त्याचा अभिमान स्पष्ट दिसायचा तिच्या चेहऱ्यावर. पावसाळ्यात  आमचं कौलारु घर गळायचं. बिचारीची खूप दमछाक व्हायची, सगळं घर साफ करताना. प्लास्टिक लावलेलं असायचं. तरीही कुठेतरी काहीतरी राहायचं. मी खूप वैतागायचो. अहो, रडायचं कशाला? बाहेर जाऊन आपण भिजू शकत नाही का? मग इथेच आनंद लुटा ना खूपच सकारात्मक दृष्टीकोन असायचा तिचा. टपटप गळणाऱ्या घरात पावसाचा आनंद कसा लुटता येणार? मग आमची शाब्दिक चकमक व्हायची. पाऊस कशाला येतो? तिथपासून नळाला, शेतीला पाणी कोण देणार? असं कुठल्याकुठं बोलणं जायचं. पुढे तुझा जन्म झाला. तिच्या जबाबदारीत आणखीन भर पडली. तिचा पगार काही वाढला नाही मात्र मातृत्वाने प्रमोशन मिळाले हे समाधान तिला आनंद देत होतं. भैरवीच्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. गृहप्रवेश करताच आईने घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे दिल्या. मोठ्या सूनेकडे सारी सूत्रे सोपवली. मी माझी सगळी कामे तिला देऊन टाकली. अंघोळीच्या टॉवेलपासून रात्रीच्या जेवणापर्यंत. आई होतीच, पण घरच्या वहिनीकडे जास्त लाड व्हायचे म्हणून तुझ्या आत्या आणि छोटे काका तिच्याकडे धावायचे, केसांना तेलाने मॉलिश करुन घेताना त्यांच्याबरोबर मी ही कधीतरी माझा नंबर लावायचो.  गौरी गणपती, घटस्थापना, दसरा, दिवाळी. सगळे सण सुरळीत पार पडले. माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नात तिने लगबीने काम पाहिले. खर्चाचे मोजमाप नीट बसत नव्हते.  सोन्याच्या दागिन्यांना तेंव्हाही तेवढाच जोम होता जो खिशाला परवडत नव्हता. पहिलीच्या लग्नात तिने स्वत:चा चपला हार मोठ्या मनाने  भेट दिला. दुसरीच्या लग्नातही तिच गत. यावेळेस तिने हातातल्या पाटल्या दिल्या. माझं मन खात होतं. एकीकडे बहीण तर दुसरीकडे बायको. अगं, माफ कर गं मला, आपण नंतर देऊ यात ना? एवढी काय घाई आहे दागिन्यांची, तिच्या सासरकडचे पण मागत नाही आहेत काहीच. तेंव्हा ती म्हणाली होती, माझं लग्न झालं की तुमच्याशी. मी मिरवले माझ्या लग्नात दागिने घालून. आता यांना मिरवू दे की, नंतर हवे तर मला करा दागिने. आणि हो, आईंनी दिलेले तुमचे खानदानी तोडे आहेत की माझ्या हातात. तिचा समंजयपणा नेहमी भारावून टाकायचा. तिचं मन खूप मोठं होतं. आजकालचे दिवसच वेगळे. सगळीकडे बाजारीकरण झालाय. पार्ट्या वाढल्या आहेत. ते प्रेम, नाजूक संवेदनशीलता कुठेतरी हरवली आहे. माझ्या हिचा वाढदिवस. कामाच्या व्यापात एखाद्या वर्षी विसरलो असेनही तर तिनं त्यासाठी घर डोक्यावर घेतलेलं मला कधीच आठवत नाही. तिच्या केसात एखादं गुलाबाचं फुल नाहीतर फार फार तर मोगऱ्याचा गजरा घातला की आमची स्वारी भयंकर खुश. तेच तिच गिफ्ट. तिच्यामुळेच तर पैसा जुळत गेला. पुढे दिवस बदलत गेले. दिवसांबरोबर परिस्थितीही बदलत गेली.  माझ्या प्रमोशनामुळे पगारात भर पडली. गाठीला पैसे जोडून जोडून एका घराची दोन घरे केली. आमचा संसार फुलत गेला. छोट्या भावाचेही लग्न झाले. पण त्याला त्याच्या पत्नीला एकत्रित कुटुंबात अडकायचे नव्हते. रोज वाद होण्यापेक्षा दुसरे घर तिने दिराच्या नावे करायला लावले.  पैसा, जमीन-जुमला यापेक्षा सतत निे नात्यांना आणि प्रेमाला जास्त जपले.
     मात्र नोकरीच्या कचाट्यात सापडलेल्या मला तिला कधी मनसोक्त वेळच देता आला नाही. माझी भावंडे, आई-वडील मग तू. तुमच सगळं करण्यातच वेळ जायचा. आता निवृत्तीनंतर तिच्याशी गप्पा मारायचं ठरवलं तर तिच सोडून गेली. मला आयुष्यात शेवटपर्यंत साथ देणार होती ती. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अशी कशी एकटीच गेली ती? किती एकटा पडलोय मी? तिला मी नेहमी म्हणायचो, आपण म्हातारे झालो ना, की मी माझ्या जबाबदारीतून मोकळा होईन, तू ही होशील. मग आपण फक्त दोघे. कितीतरी गप्पा मारु. आपला आयुष्याच्या प्रवासावर एकत्रितरित्या फेरफटका मारुन येऊ. मस्त फिरुपण काहीच जमलं नाही रे. सारं गणितच चुकलं. आम्ही गावी शिफ्ट झालो. एके रात्री असेच गप्पा मारत बसलो तर अचानक म्हणाली, अहो, माझ्या छातीत दुखतंय आणि बस्ससंपलं सगळंतिनं डोळे मिटलेते कायमचेचहृदयविकाराचा झटका असा कसा रे? मला काहीच बोलू दिलं नाही. जोशी काका हमसाहमशी रडू लागले. आईच्या आठवणीने जयेशचेही डोळे पाणवले. आरतीने दोघांना सावरले. पण आपली सासू किती चांगली होती याच्या जाणीवेने तिचा उर भरुन आला. काका थोडे सावरले. पुढे बोलू लागले, दहा दिवसांपूर्वी देशमुखांच्या घरी गेलो होतो. तुला आठवत असतील देशमुख काका. इथून दोन इमारती सोडून रहायचे. आपल्या घरी यायचे. पण आता तोही नाही. यावर जयेश बोलला, ते वारले…? नाही रे, कुठल्यातरी वृध्दाश्रमात रवानगी केली आहे त्याच्या मुलाने आणि सुनेने. त्याची बायको होती, नातवंडांना सांभाळायची, त्याला एवढं नाही जमत. सासू गेली गरज संपली. मुलांसाठी केअर टेकर ठेवली. पण या म्हाताऱ्याला कोण सांभाळणार? तोही खचूनच गेला होता बायको गेल्यावर. चिडचिडा झाला होता. म्हणूनच धाडलं घरापासून दूर त्याला. बाबा, पण तुम्हाला हे सगळं कसं माहित? जयेशने विचारलं. अरे, त्याच्या घरी गेलो. तो नव्हता पण ती केअर टेकर होती. तिनं सर्व सांगितलं. वरुन सल्लाही दिला, तुम्ही देखील मनाची तयारी करुन ठेवा आजोबा. जरा जास्तच वाईट वाटलं रे. ही असती तर मी इथे परत आलोच नसतो रे. तू कशाला घेऊन आलास मला? मी इथे तिच्या आठवणीत रमलो असतो. आता तुम्हाला उगाचच माझी अडगळ. त्यांचा एकूतला एक मुलगा आणि त्यांची सून एकमेकांकडे बघतच राहिले. आई-बाबांच्या आयुष्याचा प्रवास इथे येऊन नवीन वळण घेईल तेही आपल्या विरुध्द हे त्यांच्या ध्यानी मनीही नव्हते. तरीही जयेश सावरुन म्हणाला, बाबा, काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझे जन्मदाते आहात. मला एवढंच ओळखलंत? आरती तर रागाने उठून गेली. ती गेलेली पाहून जोशी काकांनी मुलाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. जणू ते म्हणत होते की मी तिचा जन्मताना नाही ना? … थोडा वेळ गेला. रात्रीची शांतता जाणवू लागली. त्या शांततेचा भंग करत आरती परत आली. जणू काही तिनं वडील आणि मुलगा यांच्यातील मूक संभाषण ऐकलं होतं. काहीतरी दाखवतं म्हणाली, तुम्ही माझे जन्मदाते नाहीतपण माझ्या मनात तुमच्याबद्दल तेवढाच आदर आहे जेवढा माझ्या सख्या जन्मदात्यांसाठी आहे. तुम्हाला मी माझे दुसरे वडील मानतेबाबातुम्हीच आज मला परकं केलंत. ती देखील रडू लागली. रडतच पुन्हा म्हणाली, हे पहाह्या घरच्या चाव्या आणि हे तोडे. आई गेल्या पण माझ्या अंगावर सगळ्यांची जबाबदारी टाकून गेल्या. मी त्यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही. पण तसं प्रामाणिक आणि समंजय वागण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि जगातील सगळीच लोक सारखी नसतात ना? तुम्ही अडगळ कशी होऊ    शकता? तुम्ही आमच्यापेक्षाही जास्त उन्हाळेपावसाळे पाहिले आहात. तुमचं मार्गदर्शन आणि आशिर्वाद आम्हाला हवेच आहे. आज जसा विचार केला तसा पुन्हा कल्पनेतही करु नका. जोशी काका समाधानाने म्हणाले, चुकलो मी पोरीखरच जोशी घराण्याला सुना ह्या फारच गुणवान मिळतात. भाग्यच हेआता मी निश्चिंत आहे.  तिघांचे डोळे भरुन आले आणि हसतच शुभ रात्री म्हणत ते झोपायला गेले.
     जयेश तर आरतीवर खूप खूश होता. त्याला त्याच्या बायकोचा खूप अभिमान वाटत होता. तो म्हणाला, आरती, आज बाबा आईला खूप खूश होऊन सांगत असतील तुझ्याबद्दल. तशीही ती त्यांना स्वप्नांत रोज भेटतचं असेल. आरती म्हणाली, बाबांशी बोललो महणून खूप बर झालं. नाहीतर ते नको नको ते विचार करुन ते आजारी पडले असते. मानसिक दृट्या खंगले असते. त्यांच्याशी दररोज थोडं बोलायला हवं. ते एकटे नाहीत याची जाणीव करुन द्यावला
     काही दिवसांनी रस्ता ओलांडून पुढे जायचे होते. जोशी काकांबरोबर आरती आणि जयेश होते. आरतीने त्यांचा उजवा हात पकडला तर जयशने डाव हात. तिघांनी मिळून रस्ता पार केला. खरंच मन किती विचार करत असतं. जर आपल्याच माणसांशी थोडं मोकळेपणानं बोललो तर नात कसं सदा प्रफुल्लीत राहत आणि सतत बहरत आणि फुलत जातंहोय 

लेखक : अज्ञात 
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...