सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

28. वडीलांचे प्रेम

 
  नक्कीच वाचा, विचार करा...
     मुलगा नुकताच आफिसमधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचा आजार असतो. ते विचारतात, बेटा माझी औषधे आणली काय? कालपासून संपली आहेत. मुलगा, मी आज खूप थकून आलो आहे, मी उद्या घेऊन येईन.
बाप : ठीक आहे बेटा, तू आराम कर, खूप थकला असशील (रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो. घरी औषध नसल्याने त्यांना दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्यांच्या मृत्यू होतो.)
     काही दिवसानंतर मुलाला त्याच्या रुमची सफाई करताना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते. त्यात त्याला 30 वर्षे अगोदरची एक लिहलेली नोंद सापडते. ती असते, आज माझ्या सोन्याला ताप आला होता. टॅक्सी मिळाल्यामुळे दवाखान्याची लिफट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेताना थोडा त्रास झाला, पण माझे बाळ आता शांत झोपी गेला आहे... (वेळ: रात्री दोन वाजता). त्या मुलाच्या डोळयांतून अश्रू वाहू लागले होते. आता सर्व संपले होते.
     तुमच्या आई-वडिलांना कधीच दु: देऊ नका. तुम्ही आज जे काही आहात ते त्यांच्यामुळेच. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे कधीच वागू नका.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

27. कृतज्ञता

             एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला. एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही. भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.  तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली. तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले. दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.
      ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात. ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती "घटती कृतज्ञता" असते!आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते. आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते. कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे, त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे, अशी वृत्ती होऊन जाते. ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी!
            आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती. उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा. नोकरीतील काम,वाढत्या किंमती, सरकारी धोरण, वाढलेला ट्रॅफिक, प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो. पण आज आपण 'तक्रार  मोडवरून' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत. आज 'मला भाजी मिळाली', 'मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे', 'मी तंदुरुस्त आहे' असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो. दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही, त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत; तर ते पटलंही नसतं. ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित!  आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते. ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.
             साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो. दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बिल कमी करण्याची तयारी दाखवितात. पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते. तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो. माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे, ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी परमेश्वराचे किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे परमेश्वराकडून विनामूल्य मिळवतोय." अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत. अन्य काहीच नाही. जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील. कृतज्ञता परमेश्वराप्रति  आणि व्यक्तींप्रतिही!
         जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे.  झोप, शांतता, आनंद, हवा, पाणी, प्रकाश आणि सर्वात जरूरी आपला श्वास, नेहमी आनंदी रहा.
  संपूर्ण लेख वाचल्या बद्दल धन्यवाद

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

26. आईचे प्रेम

 एकदा नक्की वाचा.. आईची प्रेमळ कथा

     एका गावात एक बाई आपल्या छोटया मुलाबरोबर एका छोटया झोपडीत रहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करुन ती काम करत असे, पण त्या छोटया मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करीत असतो. कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते, पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एककटाक्ष टाकून ता तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रंचड बोलतो. कशाला आली होतीस शाळेतआता माझे मित्र मला चिडवतीलमी उद्या शाळेत कसा जाऊ? तूला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस.  वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काहीच वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही बोलता तो जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते. तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळयाच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो. शिकून खूप मोठे व्हायचे आणि येथून बाहेर पडायचे. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठया शहरात येतो. नामवंत विद्यापिठातून पदवी मिळवितो. मोठया कंपनीत मोठया हुद्यावर काम करु लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते. कारण हे सुंदर चित्र बिघडविणारी एक डोळयाची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरुनच गेलेला असतो. अतिशय सुखात असतो

            एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तिच एका डोळयाची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरुन आत पळून जाते. तो आधी चक्रावतो आणि मग स्वत:ला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ, माझी मुलगी तुला घाबरली. मी  बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले. असे काहीतरी पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही(?) अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो. काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असूनही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटे सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते  आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.  

              तो वाचू लागतो, मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता परत मी कधीही येणार नाही. पण कधीतरी तू मला येऊन भेटावे अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनात तू येणार हे कळले होते. पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहित आहे, एका डोळयाची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का ? असे तू मला एकदा विचारले होतेस. तेंव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही. पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमवलास. एक डोळयाने तू तुझे संपूर्ण आयुष्य कसे जगणार? या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जे वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवलेले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे, असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वत:चा सर्वात महत्वाचा अवयव  जिने त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठयाने हाका मारु लागला. पण आता त्याचा काय उपयोग होता

             आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...