आदिवासी समाज खरोखरच सर्वाथानं
शोषित आहे.
त्यांच्या शोषणाची तीव्रता आपल्या लक्षात येत
नाही.
ही
कहाणी आहे
यवतमाळ जिल्हयातल्या सरणी नावाच्या कुमारी मातेची.
तिच्यावर अतिप्रसंग करणारे निघून गेले.
आता
ती
तिच्या सहा
वर्षाच्या आगटयाबरोबर दिवस ढकलते आहे.
लाल
चुटूक कुंकवाच स्वप्न पाहणाऱ्या सरणीच्या नशिबी पांढरं कुंकू आलं
आहे.
आदिवासी सर्वाथानं
शोषित आहे,
हे
सत्य साऱ्यांनाच माहिती आहे.
परंतु त्यांच्या शोषणाची तीव्रता किती भयंकर आहे
याची कल्पनासुध्दा आपण
करु
शकत
नाही.
यवतमाळ,
गडचिरोली,
नांदेड आणि
अमरावती या
जिल्हयातील भागात अल्पवयीन आदिवासी मुली शोषकांच्या भक्ष झाल्या आहेत.
येथिल अल्पवयीन मुली अनेकदा अतिप्रसंगाच्या बळी ठरत आहेत व त्यांच्या भाळी कुमारी मातेचा अभिशाप लिहीला जात आहे. एकटया यवतमाळ जिल्हयात चार
तालुक्यांत
283 कुमारी माता आहेत.
मी
(अंकुश वाकडे)
यवतमाळ जिल्हयाच्या अतिदुर्गम भागात तीन
वर्षांपासून कुमारी मातांचे वास्तव्य व
त्यांच्या अवस्थेचा शोध
घेतोय.
या
काळात कुमारी मातांनी जे
दु:ख अनुभवले ते शब्दबध्द
करण्याच्या पलीकडचे आहे.
तेराव्या
वर्षात कुमारी माता बनलेल्या सरणीची कथा
प्रतिनिधीक ठरते.
सरणी
आणि आगट्या :
माथार्जुन
हे
गांव यवतमाळपासून
140 किलोमीटरवर वसलेले.
जायला व
यायला एकच
बस.
त्यामुळे आसपासच्या पौडावर भयानक स्थिती.
गावात किराणा दुकान नाही.
गावाने कधी
बसही पाहिली नाही.
रात्रभर अंधाराचे सामर्थ्य.
शाळा व
दवाखान्यांना सदासर्वदा कुलूप.
ही
अवस्था गावचे विदारक चित्र मांडण्यास पुरेशी आहे.
सरणीला सहा
वर्षाचा मुलगा आहे.
अगट्या त्याचे नाव.
म्हणजे ती
बालवयातच माता बनली हे
लक्षात यायला वेळ
लागत नाही.
सरणीने तिच्यावर ओढवलेली परिस्थिती सांगण्यास सुरवात केली.
“साहेब आमचे घर
अगदी सुरवातीपासून फार
कष्टाळू.
रानमाळात रात्रंदिवस काम
करुन जगायचे.
हा
आमचा पिढीजात कामधंदा.
घरात तसे
आम्ही आठ
लोक.
आई-बाबा, आंधळी आजी, माझी लहान भावंडे आणि मी. दिवाळीच्या सणाला घराला आंब्याचं तोरण असावे म्हणून बाबा पाने तोडण्यासाठी जंगलात गेले. गेल्यानंतर तीन दिवसापर्यंत घराकडे परतलेच नाहीत. आम्ही शोधाशोध केली. उपाशीतापाशी बाबांना शोधले पण हाती काहीच आले नाही. नंतर लाकूडतोडया डोक्यान निरोप दिला की, कुणाचतरी प्रेत जंगल कपारीत पडलं आहे. म्हणून आम्ही धाव घेतली. तर ते बाबांचेच प्रेत होते. खूप रडलो. आमचा तर आधारच गेला होता. जाग्यावरच बाबांचे पोस्टमार्टम झाले. फक्त अंगात सदरा नाही, यावरुन डाग्या होय अशी ओळख झाली. घरातल्या सर्वांसाठी बाबा एक आशा होते. ती आशा माळवली होती. काळापुढे कुणाचे चालणारॽ आता आईवर कुटुंबाची
जबाबदारी येऊन पडली.
आईपण
गेली :
तिसरा दिवस करायचा म्हणून विचार आल्यावर आईने घरातल्या
मडक्यावर असलेले तांदळाचे दाणे शिजवले.
आम्ही पानावर भात
घेऊन जंगलात निघालो,
तेंव्हा दुपारचे बारा वाजले होते.
जंगलाकडे आदिवासी घराकडे परत
असताना आमची वाटचाल बाबांच्या समाधीकडे सुरु झाली होती.
मधात नाला असल्याने पाणी पार
करुन जायचे होते.
अशातच भाताचे बोणे डोक्यावर घेऊन आई समोर निघाली आणि मागणे आम्ही चाललो होतो. एवढयात मागून काहीतरी येत आहे असा भास झाला. मी ओरडण्यापूर्वीच
आईवरती वाघाने हल्ला चढविला.
आई
एकीकडे व
आम्ही दुसऱ्या झुडपात लपलो.
भाताच्या वासाने वाघाने आईच्या नरडीवरती हल्ला चढविला. आई भांबावलेल्या अवस्थेत खाली पडली. आम्ही भावंडे हा मरणखेळ उघडया डोळयांनी बघत होतो. वाघाने आईच्या नरडीचा घोट घेतला. आम्ही भेदरलो होतो. काही क्षणापूर्वीच आमच्याशी बोलणाऱ्या आईच्या शरीराचे लचके तोडणारा वाघ जंगलाचा राजा आणि त्याचा तो रक्तखेळ आम्ही बघत होतो. रात्रीचे अकरा वाजेपर्यंत प्रेताशी खेळणारा वाघ आम्ही डोळयांत मरण ठेवून बघितला. माझा लहान भाऊ सोया ओरडत असताना मी श्वास बंद होईपर्यंत त्याच्या तोंडावर हात ठेवला. तोंडात शरीराचा तुकडा घेऊन जाणारा वाघ लांब निघून गेल्यावर आम्ही भानावर आलो. बाबा गेले,
आईही गेली हे
सर्व दु:ख घेऊन आम्ही घरी परतलो. पोडावर पाऊल टाकताच आंधळया डोळयांनी
कानोसा घेणाऱ्या आजीने आवाज दिला आणि
म्हणाली,
“टाकलास का रे घासॽ” आमच्या तोंडातून
एकही शब्द बाहेर पडत
नव्हता आणि
लगेच लहाना ओरडला “माय गेली” नंतर अंधारातच
सर्व प्रसंग आजीच्या कानावर घातला.
पाणी
मागून घात केला
:
साहेब सांगा, एवढे दु:ख काय कमी होतेॽ परंतु येणाऱ्या
दु:खाने त्यावरही
मात
केली.
माझ्या घरातील मी
सर्वात मोठी बहीण.
माझी आई
एकदा गावातल्या माणसाला मातीत गाडायला नेल्यावर बाळंतीण झाली.
त्यामुळे जळत्या सरणासमोरील
‘सरणी’
म्हणून पोडावर ओळखले जाऊ
लागले.
आंधळया आजीचा आम्हा भावंडांना आधार होता.
कधी
कधी
लहान भाऊ
कामाला जायचा.
तेंव्हा आम्हाला फार
भिती वाटायची.
परंतु टीचभर पोटाची काळजी म्हणून कोणीही काहीही बोलत नव्हते.
आदिवासी पोडावर व्यवसाय करण्यासाठी सायकलीने फेरीवाले व्यावसायिक,
मिरची व्यापारी,
मांस व्यापारी,
सौंदर्य प्रसाधनाचे सामान विकणारे,
गाव
पुढारी यांचा शिरकाव मोठया प्रमाणात होता.
घरातील माणसे कामाला गेल्यावर एक
ते
आठ
वयोगटातील मुली व
मुले घरी
असायची.
वासनांध लोकांची या
मुलींकडे नजर
असायची.
गुटक्याच्या पुढया,
चार
दोन
आणे,
रिबन किंवा डोक्याचे रबर
अशी
आमिष ही
मंडळी दाखवायची.
लहान वयात गुटखा खाल्याने नशा
येते हे
मी
स्वत:
अनुभवलेले आहे.
मी
सुध्दा या
गुटख्याची बळी
ठरले.
तो सोमवार होता. घरात कोणीच नव्हते. आजी पोडावरील
चावडीत झोपली होती.
अशातच दोन
परदेशीबाबू आमच्या पोडावर आले.
मी
त्यावेळी बारा-तेरा वर्षांची
होते.
मला
पाहून त्यांनी पाणी माघीतले.
आणि
वसरीत पाय
ठेवले.
बाहेरील माणसाचा आदर
करावा,
अशी
शिकवण आई-बाबाने दिली होती. मी पाणी आणण्यासाठी
घरात गेले आणि
पाणी आणले. घरातील सर्व चौकशी केल्यावर या लोकांनी आमच्या घराची लक्ष्मणरेषा ओलांडली. तोंडावर हात ठेवून मला उचलून जंगलामध्ये नेले. त्यावेळी जंगलात आसपास कोणीच नसल्याने चक्क दोघांनीही अतिप्रसंग केला. साहेब फुलदेवीचा चित्रपट सर्व जगाने पाहिला, मात्र आमचे वास्तव कोणीच पाहिले नाही. मी तीन तास बेशुद्ध होते. काही वेळाने जाग आली. तेंव्हा माझ्या शरीराची अवस्था खूप
वाईट झाली. मी ती उघडया डोळयांनी बघितली. घरात असणारी आजी आवाज देता देता थकून गेली होती. मी कशाबशा अवस्थेमध्ये घरी परतले. आंधळया आजीला शोधण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा चुलीजवळ दोन्ही हात भाजलेली आजी मरणासन्न अवस्थेमध्ये दिसली. मायेचा आधार इथेच संपला. कालपर्यंत हसत खेळत राहणारी सरणी या नराधमांची शिकार झाली. ती तेरा वर्षाची असताना कुमारी माता झाली. गावांत हे दु:ख
ऐकायला कोणी नव्हते.
बाळाला जन्म दिला.
आज
आगटया माझ्यासोबत आहे.
कपाळावर असणारे लाल
कुंकू जाऊन मी
पांढरे कुंकू वापरते.
या
संस्कृतीला अभिशाप देण्याची परंपरा मला
सांगायची आहे
हे
मात्र सत्य आहे.”
अंकुश वाकडे ‘आई
फांऊडेशन यवतमाळ’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा