सोमवार, ३० जानेवारी, २०२३

203. एका फौजीच्या पत्नीची व्यथा

 ऐका...  माझ्या प्रियतम, माझ्या साथी,
तुमच्याविना आयुष्य मला,
जगता येत नाही. 

तुम्ही तर वीर आहात, लढाऊ आहात, योद्धा आहात. 
शत्रूंच्या टोळीबरोबर लढत असता... 
हे सांगा,  मी एकटेपनाबरोबर कसे लढू?
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्ही दिसता.
मी आठवणींच्या सावलीबरोबर  कसे लढू?

काल फोटोंचा अलबम बघितला,
आपले सगळे फोटो जुने झाले आहेत. 
नवीन कधी काढायचे?
ह्यावेळेला तुम्ही रंगपंचमीलासुद्धा घरी नाही आलात. 
आपण एकमेकांना रंग कधी लावायचे?

पूर्ण दिवाळीच्या सणामध्ये ती साडी नेसली होती,
जी तुम्ही बनारस मधून आणली होती. 
सगळ्यांनी कौतुक केले पण,
कुणाचेच कौतुक माझ्या ह्रदयापर्यंत पोहचले नाही. 
जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत, 
तोपर्यंत मी स्वतःला सुंदर नाही वाटत. 

कडवा चौथचे व्रत असेच निघून गेले. 
सगळ्यांच्या चाळणीमध्ये चंद्र झगमगला. 
फक्त माझाच चंद्र घरी नाही आला. 

माझी अवस्था काय आहे माहित आहे?
वेडी झाली आहे मी. 
तुम्ही वाळवंटामध्ये ५० डिग्री अंश तापमानात लढत आहात,
हा विचार करून मी थंड हवेबरोबर शत्रुत्व केले आहे. 
कुठून तरी हवेची झुळूक शरीराला स्पर्श करू नये म्हणून,
घरातली प्रत्येक खिडकी बंद करून ठेवली आहे. 
आता कुठूनच हवा येत नाही. ऐकलंत का? माझ्या प्रियतम... 

जगामध्ये कोणाला आवडेल कोणाचे दुसरे प्रेम बनायला?
मी ते पण मोठ्या आनंदाने बनले. 
माहिती होते, फौजीच्या आयुष्यात जी  कोणी येईल,
तिला दुसरे प्रेमच म्हटले जाईल. कारण 
पहिले प्रेम पहिले वचन तुम्ही देशाच्या मातीसाठी निभावणार. 

ऐका, माझ्या प्रियतम... माझ्या साथी... 
आता आणखी नका त्रास देऊ, 
ज्या ठकठकीसाठी माझे कान आतुरलेले आहेत,
ती ठकठक बनून या.. 
ज्या चाहुलीसाठी मी रोज तडफडत असते,
ती चाहूल बनून या... 

पण लक्षात असू द्या, माझ्या ढोल - योध्याला,
भारत मातेला जे वाचन दिले आहे,  ते तोडून येऊ नका... 
तुम्हाला शपथ आहे माझी, 
कदाचित मी प्रेमाशिवाय  मरुन जरी गेले,
तरी मैदान सोडून येऊ नका.... मैदान सोडून येऊ नका...  

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

202. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना.

 काल औरंगाबादमधील सात तरुणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. कारचा टायर फुटणे हे कारण होते.
महत्वाचे MSG नव्याने बांधलेल्या एक्स्प्रेस वेवर सध्या वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना समोर येत आहेत
  ज्यामध्ये दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. एके दिवशी माझ्या मनात प्रश्न आला की देशातील सर्वात आधुनिक रस्त्यांवर सर्वाधिक अपघात का होतात? आणि अपघाताची एकच पद्धत आहे आणि ती सुद्धा फक्त टायर फुटून. हायवे बिल्डर्सनी रस्त्यावर असे कोणते स्पाइक टाकले आहेत की सगळ्यांचे टायर फुटतात? मन वादळ झाले आहे, म्हणून आज ही गोष्ट शोधून काढावी असे वाटले. म्हणून संघ शोधण्यासाठी जमलो. 
    आता ऐका. आम्ही एका मित्राला प्रयोगासाठी बोलावले आणि आम्ही स्कॉर्पिओ एसयूव्हीमध्ये गेलो (लक्षात घ्या की खरी समस्या फ्लॅट टायरची आहे) प्रथम आम्ही कोल्ड टायरचा दाब तपासला आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ते समायोजित केले जे 25 psi आहे (सर्व विकसित देशांच्या गाड्यांमध्ये हवेचा समान दाब ठेवला जातो. जेव्हा आपल्या देशातील लोकांना याची जाणीव नसते किंवा ते इंधन वाचवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त हवेत टायर भरतात जे साधारणपणे 35 ते 45 PSI असते. चांगले...चला आता पुढे जाऊया. यानंतर आम्ही चार लेनवर चढलो आणि गाडी पळवली. वाहनाचा वेग 120 - 140 किमी/तास ठेवला होता. दोन तास एवढ्या वेगाने गाडी चालवल्यानंतर आम्ही उदयपूरजवळ पोहोचलो. आम्ही थांबून पुन्हा टायरचे प्रेशर तपासले, तेव्हा धक्का बसला. आता टायरचा दाब ५२ psi होता. आता टायरचा प्रेशर एवढा कसा वाढला असा प्रश्न पडतो.
त्यामुळे यासाठी टायरवर थर्मामीटर लावले असता टायरचे तापमान ९२.५ अंश सेल्सिअस होते. रस्त्यावरील टायर्सचे घर्षण आणि ब्रेक घासल्याने निर्माण होणारी उष्णता यामुळे टायर्सच्या आतील हवा पसरत असल्याचे संपूर्ण गूढ आता उघड झाले आहे.
       B2B टायरमधील हवेचा दाब खूप वाढला आहे. आमच्या टायर्समधील हवा आधीच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असल्याने ते फुटण्यापासून वाचले. परंतु ज्या टायरमध्ये हवेचा दाब आधीच जास्त आहे (35 -45 PSI) किंवा ज्या टायरमध्ये कट आहे त्याचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे चार लेनकडे जाण्यापूर्वी तुमचा टायरचा दाब ठीक करा आणि सुरक्षित राइडचा आनंद घ्या. मी एक्स्प्रेस वे ऑथॉरिटीला विनंती करतो की त्यांनी ड्रायव्हर्सना जागरूक करावे. जेणेकरून महामार्गाचा प्रवास हा शेवटचा प्रवास ठरू नये
तुमच्या सर्व फेसबुक आणि व्हॉट्सअप मित्रांना विनंती आहे की ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.
असे केल्याने तुम्ही एक जीवही वाचवलात तर तुमचा मनुष्य जन्म धन्य होईल. महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

201. सूर्यनमस्काराचे १०१ फायदे

 १.सुर्यनमस्कारामुळे फुफ्फुसे बळकट होऊन आयुष्य वाढते.
२.रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सुर्यनमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात प्रसन्न होते.
३. सुर्यनमस्कारात क्रमाने केली जाणारी १० /१२  आसनांमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
४. सुर्यनमस्कारामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत केली जाते.
५.योग्यप्रकारे व नियमित सुर्यनमस्कार केल्याने शारीरिक स्वास्थ्य व मानसिक शांतता लाभते.
६.सुर्यनमस्कार करताना पोटांजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
७. सुर्यनमस्कारामुळे आकर्षक अँब्स मिळण्यास मदत होते.
८. सुर्यनमस्कार करताना सतत दीर्घश्वसन केल्याने उच्छश्वास बाहेर सोडल्याने शरीराला ऑक्सिजन पुरवठा होतो.
९.सुर्यनमस्कारामुळे स्मरणशक्ती सुधारते.
१०.सुर्यनमस्कारामुळे शरीरातील थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारल्याने मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते.
११.सुर्यनमस्कारामुळे  शरीराची लवचिकता वाढते.
१२.सुर्यनमस्कारामुळे महिलांमध्ये मासिक पाळीचे चक्र सुधारते.
१३.सुर्यनमस्कारामुळे त्वचेची कांती सुधारते.
१४.सुर्यनमस्कारामुळे वृद्धपकाळात चेहेऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यांपासून सुटका होते.
१५.डायटिंग पेक्षा झटपट व सुरक्षितरीत्या वजन घटविण्याचा मार्ग म्हणजे सुर्यनमस्कार
१६.सुर्यनमस्कारामुळे जीर्णपेशींचे उच्चाटन व नवीन पेशींची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.
१७.सूर्यनमस्कार घातल्याने स्वभाव सात्विक होतो.
१८.सुर्यनमस्कारामुळे नाडीशुद्धीकरण होऊन रक्ताभिसरणाची क्रिया उत्तम चालते.
१९.सुर्यनमस्कारामुळे प्राणशक्तीचा संचय होऊन कार्यक्षमता वाढते.
२०.सुर्यनमस्कारामुळे स्थूलता व जडत्व येत नाही नेहमी हलके वाटते.
२१.सुर्यनमस्कारामुळे सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.
२२.सुर्यनमस्कारामुळे हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.
२३.सुर्यनमस्कारामुळे  बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.
२४.सुर्यनमस्कारामुळे पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.
२५.सुर्यनमस्कारामुळे पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.
२६.सुर्यनमस्कारामुळे पचनक्रिया सुधारते.
२७.सुर्यनमस्कारामुळे मनाची एकाग्रता वाढते.
२८.सुर्यनमस्कारामुळे गळ्याच्या व मानेच्या स्नायूस ताण मिळून ते बळकट होतात.
२९.सुर्यनमस्कारामुळे दंड पिळदार व बळकट होतात.
३०.सुर्यनमस्कारामुळे शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो.
३१.सुर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराला बलप्राप्ती होते.
३२.सुर्यनमस्कारामुळे मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो.
३३.सूर्यनमस्कार स्मृतीवर्धक आहे.
३४.सूर्यनमस्कारामुळे पंचेंद्रियांचे कार्य सुधारते.
३५.सुर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर,निकोप मन व सर्वांगीण आरोग्यप्राप्ती होते.
३६.सुर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम होतो.
३७.सुर्यनमस्काराला संपूर्ण व्यायाम प्रकार असे म्हणतात.
३८.सुर्यनमस्कारामुळे शीर , मान, हात ,पाय,छाती ,पोट,कंबरेचे स्नायू ,मेरुदंड ,सर्व सांधे बळकट होतात.
३९.सकाळच्या कोवळ्या उन्हात सुर्यनमस्कार केल्यामुळे शरीर व हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असणारे 'ड' जीवनसत्व मिळते.
४०. सुर्यनमस्कारामुळे अग्नी प्रदीप्त होऊन भूक लागते.
४१.सुर्यनमस्कारामुळे मधुमेह रोगामध्ये विशेष फायदा होतो.
४२. सुर्यनमस्काराच्या नियमित अभ्यासाने दोष,धातू,मल हे घटक समप्रमाणात राहिल्याने व्याधी प्रतिबंध होतो.
४३. सुर्यनमस्कार घातल्याने उंची वाढते.
४४.सबीज मंत्रोच्चार सहित सुर्यनमस्कार केल्याने शरीरांतर्गत वायूची शुद्धी होते.
४५. सुर्यनमस्कारामुळे यकृत , प्लिहा यांच्या कार्यात सुधारणा होते.
४६ बीजमंत्रासह सूर्यनमस्कार केल्याने कंठ,तालु , हृदय यावर अनुकूल परिणाम होतो.
४७. सुर्यनमस्कारामुळे कंठविकार दूर होतात.
४८. सबीज मंत्रोच्चारणासह सुर्यनमस्कार केल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
४९. सुर्यनमस्कारामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
५०.सुर्यनमस्कारामुळे स्त्रियांचे गर्भाशय व मासिक पाळी संबंधी विकार दूर होतात.
५१. सुर्यनमस्कारामुळे मूत्राशय,मलाशय यांचे विकार दूर होतात.
५२. सुर्यनमस्कारामुळे सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन संयम व धैर्य वाढते.
५३. सुर्यनमस्कारामुळे मन शांत होते.
५४. सुर्यनमस्कारामुळे मायग्रेन,डोकेदुखी सारखे विकार दूर होऊ शकतात.
५५. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर
होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो.
५६.सुर्यनमस्कारामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
५७.सुर्यनमस्कारामुळे  शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.
५८. सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर
होतात. 
६०.सुर्यनमस्कारामुळे अतिनिद्रा, अल्सर आदी
आजारही नाहीसे होतात.
६१.सुर्यनमस्कारात योगासनांचा अभ्यास आहे.त्यामुळे शरीर लवचिक बनते.
६२.सुर्यनमस्कारात प्राणायामाची साधना आहे.त्यामुळे मनशांती लाभते.
६३. सुर्यनामस्कारात सुर्यनारायणाची उपासना आहे.
६४. सुर्यनमस्कारात मंत्राचे सामर्थ्य आहे
६५.सुर्यनमस्कार घालत असताना सुर्यनमस्काराच्या प्रत्येक अवस्थेत स्थिर राहून विशिष्ट अवयवांना येणारा ताण शिथिल केल्याने संपूर्ण शारीरिक शिथिलतेचा अनुभव येतो.
६६.सुर्यनमस्काराच्या अभ्यासाने घशात होणाऱ्या मेंढक्या (थंड आणि उष्ण पदार्थांच्या सेवनाने घशातील गाठ सुजून अन्न वैगेरे गिळताना घशात दुखते) पार मोडून जाऊन घसा साफ होतो.
६७. सुर्यनमस्काराच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने आपत्तीना ,संकटांना तोंड देण्यास शरीर व मन समर्थ बनते.
६८.सुर्यनमस्कारामुळे ज्ञानतंतूची केंद्रे संवेदनाक्षम बनतात.
६९.सुर्यनमस्काराच्या अभ्यासाने बुद्धीची वाढ होते.
७०.सुर्यनमस्कारामुळे मांड्यांचा दाब पोटातली अवयवांवर पडल्यामुळे ते सुधारतात.
७१.सुर्यनमस्कारामुळे चिरतरुण राहण्यास मदत होते.
७२.सुर्यनमस्कारामुळे कार्डीओ व्हस्क्युलर प्रमाणेच व्यायाम होतो व वजन कमी होण्यास मदत होते.
७३.सुर्यनमस्कारामुळे प्राणशक्तीचा संचय होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते.
७४.सुर्यनमस्कारामुळे आपल्या शरीरातील जीर्णपेशींचे उच्चाटन व नवीन पेशींची निर्मिती होते.
७५. सुर्यनमस्कारामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
७६.जलद गतीने सुर्यनमस्कार घातल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
७७. सुर्यनमस्कारामुळे आत्मविश्वास वाढतो.निर्णयशक्ती वाढते.
७८.सूर्यनमस्कार हा धर्म व जाती पलीकडचा विचार आहे, कारण सूर्य सगळ्यांनाच समान प्रकाश देतो.
७९. शरीरातील सर्व व्यापार मेंदू व पाठीच्या कण्यातील ज्ञानरज्जूकडून करविले जातात त्याकरिता सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात.
८०.सुर्यनमस्कारामुळे पाठीच्या कण्याला विशिष्ठ तर्हेने व्यायाम मिळून लवचिकता वाढते.
८१. सुर्यनमस्कारामुळे आपल्या शरीरात जी निरनिराळी चक्राची ठिकाणे आहेत त्यावर अनुकूल परिणाम होतो आणि त्यामुळे मन प्रसन्न होऊन बुद्धीही प्रगल्भ होते.
८२.' नायमात्मा बलहिनेन लभ्य ' हे तत्व उपनिषदात सांगितले आहे.आपले शरीर सामर्थ्यवान असल्याशिवाय आपले मन समर्थ होत नाही व मन जर सामर्थ्यवान नसेल तर भावनिक व बौद्धिक उन्नती होणार नाही.यासाठी सर्वस्पर्शी उन्नतीसाठी सुर्यनमस्काराची साधना करावी.
८३. सुर्यनमस्कारामुळे शरीरात रोगप्रतिबंधक व रोगनिवारक शक्ती उत्पन्न होण्यास हृदय,फुफ्फुस,प्लिहा,यकृत,पित्ताशय,मूत्राशय,मेंदू व ज्ञानतंतु आणि अंतःस्रावी ग्रंथी सुदृढ व कार्यक्षम असावयास हव्यात.म्हणूनच सुर्यनमस्कार हा व्यायाम आंतरेन्द्रिय व बाह्यइंद्रियें यांना सारखाच उपयोगाचा आहे.
८४. सुर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्वच गात्रोपगात्राना सारखा व्यायाम घडल्याने शरीराची एकांगी,बेडौल वाढ न होता सर्व शरीर प्रमाणबद्ध राहते.
८५. सुर्यनमस्कार कमी वेळेत शरीरांतर्गत जास्त अनुकूल परिणाम देणारा व्यायाम प्रकार आहे.
८६.घरच्या घरी कोणत्याही ऋतूत इतर खर्चिक साधनसामुग्रीविना अत्यंत कमी जागेत करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे सुर्यनमस्कार.
८७. आपल्या शरीरातील स्थूल व सूक्ष्म अशा पंचकोषात्मक  घटकांवर होणारे सुर्यप्रकाशाचे परिणाम अभ्यासून ऋषीमुनींनी सुर्योपासना प्रचलित केली आहे.शारीरिक व मानसिक असे तिचे मुख्य पोटभेद असून सुर्यनमस्कार ही कायिक तर समंत्र सुर्यनमस्कार ही मानसिक सुर्योपासनाच आहे.
८८.विश्वाला ऊर्जा व प्रकाश देणाऱ्या,स्वास्थ्य व शक्ती देणाऱ्या,विभिन्न ऋतूंची निर्मिती करणाऱ्या,अन्न निर्माण करणाऱ्या जीवदायी सूर्याला नमस्कार केल्याने पहाटेच्या कोवळ्या किरणांचा शरीराला लाभ होतो.
८९. सुर्यनमस्कारामुळे विचारांना उत्तेजन मिळते,भावनिक स्पंदन होते.
९०.सुर्यनमस्कारामुळे डोळेही सतेज बनतात.
९१. सुर्यनमस्काराच्या पहिल्या अवस्थेत दृष्टी नासिग्रावर ठेवल्याने मनोनिग्रहास मदत होते.
९२. सुर्यनमस्कारामुळे आपले व्यक्तिमत्व प्रभावी होते.
९३. सुर्यनमस्कारामुळे आत्मविश्वास वाढतो.
९४. सुर्यनमस्काराच्या अभ्यासामुळे धातूक्षीणता दूर होते.
९५. सुर्यनमस्कारामुळे शरीर हलके व प्रफुल्लित बनते.
९६. सुर्यनमस्काराच्या अभ्यासाने साधकाच्या स्वभावातील तामसी गुण नष्ट होतात व सात्विक गुणांचा विकास होऊ लागतो.
९७. सुर्यनमस्काराच्या अभ्यासाने स्नायूंची कार्य करण्याची कुवत (स्टॅमिना) निश्चितच वाढते.
९८. सुर्यनमस्कारामुळे मानेच्या मणक्याचे विकार दूर होतात.
९९. सुर्यनमस्कार हा आबालवृद्धांपर्यंत सर्वांना पेलणारा व झेपणारा व्यायाम प्रकार आहे.
१००. सुर्यनमस्कारात योगासनांचा अभ्यास आहे,प्राणायामाची साधना आहे,सुर्यनारायणाची उपासना आहे व मंत्राचे सामर्थ्य आहे. म्हणून याला सर्वांगपरिपूर्ण व्यायाम म्हंटलेल आहे.
१०१. सुर्यनमस्कार घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. सुर्यनमस्काराचे महत्त्व  विशद करताना म्हंटले आहे की,
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वांती दिने दिने |
जन्मांतरसहस्त्रेशु दारिद्रय नोपजायते ||
(या श्लोकाचा अर्थ , जे दररोज सकाळी सुर्यनमस्कारचा व्यायाम करतात त्यांना या जन्मीच नव्हे तर पुढे अनेक जन्मापर्यंत दारिद्रय शिवत नाही.)

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

200. विचार करुन प्रेम करणे कधीही चांगलेच

 सुजाता... सुजाता, एक सुंदर पण अबोल मुलगी. वडील पोलिस खात्यामध्ये असल्यामुळे दर 3-4 वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या. त्यामुळे ह्या शाळेत 4 वर्षे मग दुसऱ्या शाळेत 3 वर्षे असे करत तिचं बी.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्यामुळे तिचे मित्र मैत्रिणी कधीच होऊ शकल्या नाहीत आणि मुलं स्वभावच अबोल असल्यामुळे स्वत:हून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडीलांची शेवटच्या 10 वर्षांसाठी मुंबईमध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसून-बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडीलांनी तिला कॉम्प्युटर कोर्स करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोडं शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरियामध्ये तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. तो रहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली.  दोघेही एकत्र क्लासला जायला लागले. असे करत-करत 6 महिने उलटून गेले. पण वडीलांबद्दल खूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुध्द काही करायची तिची हिंमत नव्हती. कारण तिच्या वडीलांना तिचं लग्न उच्चशिक्षित आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करुन द्यायचं होतं आणि समीर जेमतेम बी.ए. होता. त्याचबरोबर नोकरीचा अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही. असाच महिना लोटला आणि अचानक समीरचा फोन आला की मला नोकरी मिळाली आहे. एका आठवड्यात मला बेंगलोरला जायचं आहे. आणि मला 25000 रुपये पगार मिळणार आहे. आता मी तुझ्या वडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो. सुजाताला खूप आनंद होतो आणि ती त्याला आपला होकार देऊन टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो. तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खूश होऊन तिच्याशी बोलत होता. नोकरीबद्दल सर्वकाही सांगत होता. मी तुझ्या वडीलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की मी सहा महिन्यांची सुट्टी घेऊन परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाही खूप आनंद होतो. पण त्या आनंदात काही भलतच घडत. जे घडू नये असे बरेच काही. कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात. सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते. पण समीर तिची समजूत काढतो आणि तिला समजावतो. काही होणार नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊया. काही होणार नाही. तू काळजी करु नकोस. असेही आपले सहा महिन्यांत लग्न होणार आहे. तो तिला मेडिकलमध्ये घेऊन जातो. कुठलीतरी एक गोळी देतो. तू आता काळजी करु नकोस, काही होणार नाही आणि तो तिला घरात आणून सोडतो व आपल्या घरी जातो.
     दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो. तो बोलतो, की मला काल रात्रीच बेंगलोरसाठी निघावं लागलंय पण तू तुझ्या वडीलांना सांग की सहा महिन्यांत मी येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधी तर खूप घाबरते पण सर्व धीर एकवटून वडीलांशी बोलते. ते म्हणतात की ठीक आहे. मी त्याची वाट बघतोय. सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडीलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बरं वाटतं. ती ही बातमी समीरला कॉल करुन लगेच देते. पण पुढच्या महिन्यांत सर्व काही बदलून जातं. तिला समजून येतं की ती गरोदर आहे. तिला काय करावं काहीच कळत नसतं आणि गेले 8 दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काही केल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती. तिने ठरवलं की समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती मिळाली नाही. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवढ्यात एक मुलगा तिच्याजवळ आला. त्याने तिला रडण्याचे कारण विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले की तो एक नंबरचा धोकेबाज होता. त्याने असेच तुझ्यासारख्या 2-3 मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बेंगलोरला नाही, दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे. मी त्याच्याकडून तिला घेऊन देतो आणि त्या मुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तिने समीरला कॉल केला आणि सर्व सांगितले. त्याने तिला सांगितले की जावून गर्भपात कर. मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण हा नंबर इथून पुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे तिला धक्का बसतो आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते. एकदा विचार करते की घरी सर्व सांगायचं पण वडीलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो. आणि ती सरळ आपल्या रुममध्ये जाऊन काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते आणि हे सर्व संपवून टाकते.
     सुजाताचं आयुष्य तर असंच फुकट गेलं मित्रांनो, पण अशा सुजाता अजून होऊ नये ह्याची दक्षता आपण स्वत:च घेतली पाहिजे... खास करुन मुलींनी....!!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

199. अंधारात कसा चढणार डोंगर?

 तरुण शेतकरी डोंगरवरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेड्यापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ-जाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं का संपल. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने...
     रात्रीच गावाची सीमा ओलांडली. आमवस्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा. पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेल दहा पावले जाता येईल एवढाच ! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किssर्रssर्र अंधारात एवढासा कंदीत घेऊन चढणे वेडेपणाचे होईल असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहता तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला  तसा उशाला एक दगड घेऊन मुंडसं पांघरुन आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्यातरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चटकन उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढ्यात कानावर आवाज आला.
     "राम राम पाव्हण... का असं निजलात?" म्हातारा आवाज होता. शेतकऱ्यानं पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातत लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, "राम राम बाबा. उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवाळात जाईन." म्हातारा हसला... म्हणाला, "अरे, जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?" "एवढ्या अंधारात कसा चढायचा डोंगर? काय वेड लागलय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा ! अहो, कसंबसं आठ-दहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात." तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, "अरे, तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असली तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीची प्रदक्षिणा घालता येते."
     म्हाताऱ्याचं बोलणं शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदीलाच्या प्रकाशात सूर्योदयाच्यापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुध्दा. वाट पाहात बसून कशाला रहायचं.
     जो थांबतो तो संपतो. जो चालतो, तो ध्येय गाठतो. कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असू द्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.  

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

198. पहिले प्रेम अधुरे राहिले तरीही खूश

 आम्ही शाळेच्या समारंभाची तयार करत होतो. कारण खूप वर्षांनी सर्वजण एकत्र मिळणार होते. पण तो तर खास करुन तिची वाट पहात होता. कारण तो तिला 15 वर्षांनी भेटणार होता. पण भिती वाटत होती की तिला आमंत्रण मिळाले असेल का?
     संध्याकाळ झाली. सर्व मित्र-मैत्रिणी जमा झाल्या पण ह्याच्या नजरा दरवाज्याजवळच होत्या. कदाचित देवालाही त्या दोघांना एकमेकांना मिळवायचे असेल. त्याच दिवशी ती तिच्या घरी येते. तिच्या आईची तब्येत ठीक नसते व तेंव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत येते. तेंव्हा तिला समजते आणि तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन ती त्या समारंभामध्ये येते.
     तिचे नांव रिधी. सर्वात सुंदर दिसत होती व रंगाने गोरी असल्यामुळे तर ती अजूनच सुंदर दिसत होती. हा तर तिला पाहतच राहिला व त्याला त्याच्या लहानपणीची आठवण येऊ लागली. कसे ते शाळा सुटल्यावर तिला आंब्याच्या झाडाखाली भेटत असे व तिथे दोघे बसून गप्पा मारत असे व गितार बरोबर गाणी बोलून तिला खूश करत असे.
     पार्टीची सुरवात होते. हा नेहमीसारखा हातामध्ये गितार घेऊन... तुने मेने जाना कभी नहीं, ईश्क मेरा... दर्द मेरा... आशिक तेरा... भीड मैं खोया रहता हूँ... अजूनही निधी त्याच्यावर प्रेम करत असते व ती सुध्दा अकेले... अकेले... रह गयी, बिन तेरे यूँ.. अकेले.... मैं तडपू या मैं तरसू या चली आऊँ पास तेरे... इतनी तयारी है... जिंदगी... खो गयी... बातें करने सारी... आ रही हॅूं... तुझ से ही... हो... मैंने मेरे जाना... अब हैं जाना इश्क तेरा... दर्द तेरा... त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही.
     दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले. कधी एकमेकांना भेटतात असे झाले होते. भेटण्याचे ठिकाण नेहमीचे... आंब्याचे झाड... हा अगोदरच तिथेच तिची वाट पहात होता. निधी मात्र घरातून खोटं बोलून आली होती. ती म्हणाली, "कसा आहेस?" मी म्हणालो, "मी आहे गं व तू येणार या आशेवरच अजून जगत आहे. ते जाऊ दे. तुझा नवरा कसा आहे आणि तू खूश तर आहेस ना?" ती म्हणते, "खूप प्रेम करतो रे माझ्यावर आणि मी पण करते. पण काय माहिती मनामध्ये फक्त तुझाच विचार येतो रे... खूप प्रयत्न केला तुला विसरण्याचा रे पण नाही जमले मला."
     खूप उशीर विचार केल्यानंतर दोघेही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. दिवसही ठरला. तो गाडी घेऊन तिची वाट पाहत निघताना मात्र तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही. कारण माझे पहिल प्रेम मी नाही विसरु शकत. तिचा नवरा म्हणाला, "मला माहित होते की हे असे होणार. कारण पार्टीच्या वेळी तू त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होतीस ते व नंतर तुझ्या मित्र-मैत्रिणींकडून समजले. पण मी विचार केला की तो तर तुझा गेलेला काळ होता व मी आताचा काळामध्ये जगणारा माणूस आहे. मला वाटले की या दिवसामध्ये मी तुला इतके प्रेम देईल की तुला त्याची आठवणच येणार नाही. माझे अश्रू पापण्याचा आड लपवून तुला नेहमीच सुख देण्याचा प्रयत्न मी करीन. खरे म्हटले आहे प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ असते. जा गं तू... खरंच जा... कृपया आणि खूप खूश रहा... तिथे...
     अमर तिची वाट पहात होता. ती येताच तिला तू ठीक आहेस? असे विचारले. ती हो म्हणाली. गाडीमध्ये बसल्यावर तिला अचानक तिच्या नवऱ्यासोबत जे काही क्षण घालवले ते आठवले व त्यामुळे ती रडू लागली व तिने त्याला सांगितले की कृपया कार थांबव आणि मला माझ्या घरी सोड. कारण मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकत. कृपया...कृपया मला घरी सोड. अमर तिला घेऊन गेला व नवऱ्याला पाहताच तिने त्याला मिठी मारली व त्याच्या मिठीमध्ये रडू लागली.
     अमर मात्र रडतच राहिला. त्याला कोणाच्यातरी मदतीची गरज होती. तो घरी जाऊन त्याने त्याच्या आईला मिठी मारली व रडत रडत आईला म्हणाला, "माझे पहिले प्रेम अपूर्ण राहिले. मी नाही समजावू शकलो तिला आई. पण मी खूप खूश आहे. कारण तिला खरंच खूप चांगला जीवनसाथी मिळाला आहे आणि तो माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो.                                                                                                                                                                        लेखिका - कल्पना जोशी.

197. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच

         खूप उशीर झाला. ती त्याची वाट पहात होती. तो आला. आल्या आल्या ती त्याचा समाचार घेऊ लागली. तो फक्त सॉरी म्हणण्यापलीकडे काहीही करत नव्हता. शेवटी ती शांत झाली. खुल्या गार्डनसारखं गवतावर असलेल्या त्या हॉटेलमधील एका वेटरला त्याने दोन कॉफींची ऑर्डर दिली. वेटर गेल्यावर ती त्याला कॉलेजमध्ये घडलेल्या गंमती जमती सांगू लागली. तो शांतपणे ऐकून घेत  होता. पुरेसा प्रतिसाद त्याच्याकडून मिळत नव्हता. तो फक्त हो ला हो म्हणत होता आणि ही गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नाही. तिनं विचारलं, "काय झालं? मी बोलले म्हणून रागावलास की घरात काही घडलंय?" तो काहीच बोलत नव्हता. त्याला बोलायचं तर होतं पण त्याचे ओठ त्याला साथ देत नव्हते. तिने प्रेमाने त्याचा हात हाती घेतला. तर तिला जोराचा झटकाच बसला.
       त्याचं अंग प्रचंड गरम झालं होतं. त्याला दरदरुन ताप भरला होता. तिला काय बोलावं हे सूचतच नव्हते. एवढ्यात वेटरने कॉफी आणली. "अरे... तुला तर प्रचंड ताप आहे. ही कॉफी घे. तुला बरं वाटेल"  त्याने कॉफी घेतली. त्यानंतर तो थोडा थोडा बोलू लागला. "तुला इतका ताप आला आहे. तरी तू इथपर्यंत आलास? का? आणि कशासाठी?" तो म्हणाला, "तुला दिलेल्या वचनासाठी." "अरे, पण तुला काही झालं असतं तर?" "काही गोष्टी या एखाद्याच्या जीवापेक्षा त्याने दिलेलं वचन ही त्याच्या जीवापेक्षाही अनमोल अशी गोष्ट असू शकतं. त्यामुळेच तू आणि तुला दिलेलं वचन याची किंमत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे." तिच्याविषयी असणारं त्याचं प्रेम बघून तिच्या डोळ्यात अलगद पाणी आलं. तिने खुर्चीवरुन उठून त्याच्या तापलेल्या कपाळाचं अलगद चुंबन घेतलं आणि म्हणाली, "मला देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट जर कुठली असेल तर ती तू आहेस." हात पुढे करुन तो म्हणाला, "मग दे मला वचन की तू माझी आयुष्यभर साथ देशील...."
          पाऊस चालू झाला. पुढे केलेल्या त्याच्या हातावर पावसाचे थेंब पडत होते. त्यातलाच एक थेंब त्याच्या हातावर पडून त्याच्या डोळ्यांत उडाला. त्यामुळे तो तंद्रीतनं बाहेर आला. समोर कोणी नव्हतं. त्याच्या कॉफीत पाणी भरुन वाहत होतं. त्याच्या लक्षात आलं. अरे तिचं लग्न झालंय. मग ती इथे कशी येईल? दु:खी मनाने तो सायकल घेऊन त्या मुसळधार पावसात, तापलेल्या अंगाने तो चालत निघाला आणि एका घरासमोर येऊन थांबला. ती खिडकीतच उभी होती. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या तिने जेंव्हा रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्याकडे पाहिलं तेंव्हा तिला त्याच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्याच्या नजरेत फक्त प्रश्न होते. ती उत्तरादाखल मनातूनच म्हणू लागली. मला माफ कर. मी तुझी दोषी आहे. पण तूच तर म्हणायचास की, एखाद्यासाठी त्यानं दिलेलं वचन हे त्याच्या जीवापेक्षाही अनमोल अशी गोष्ट असू शकते.
     माझ्याकडून ही माझ्या आई-वडीलांनीही असंच वचन घेतलं. म्हणूनच मला दुसऱ्याशी लग्न करावं लागलं. पण आता हे तुला कसं सांगू? दोषी नजरेने असलेल्या तिच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघत तो निघून गेला.
      प्रेम ही संकल्पना सर्व तरुण-तरुणींना प्रचंड आकर्षित करते. त्यामुळे प्रेमासंदर्भात असणारी प्रत्येक गोष्ट तरुण वर्गात प्रसिध्द होते. प्रत्येक तरुणीला वाटतं की प्रेमात पडावं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजूही असतेच. प्रेमसुध्दा याला अपवाद नाहीये. प्रत्येकजण म्हणतो की प्रेम करुन अनुभवावं. पण मी आपणाला सांगू इच्छितो की, प्रेम अनुभवून करावं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

196. ओढणी

      ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर एक गड जिंकून एक योध्दा आल्याच्या अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला. चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली. "मी चौथ्या शीटची लढाई जिंकली ही बातमी चाळीत पोहोचली की काय? हे लोक आता माझी आरती ओवाळणार... यावे यावे राजे... आप आ गये... बहार आयी..." पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे. मग मला थोडा संशयच आला.
     आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची. स्वत:च्या घरात काय चालू आहे या ज्ञानाबरोबर इतर शेजाऱ्यांच्या घरात काय चालू आहे हे माहित असणं आमच्यासाठी अतिमहत्वाचं असतं. जसे ते तसा मी.  मग मी ही मागच्या एकाला हळूच कानात विचारले, "काय झालं रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला की काय?" ... मी अशीच मस्करी केली. "गचकला नाही... गचकावला... अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून मारले.
     ऐकल्याच क्षणी  माझा हात माझ्याच गळ्याशी गेला. थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले. योध्दा थोडा हडबडला होता. अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्याही बुध्दीला पटणारे नव्हते. कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस होता. सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा. माझा यार... दिसायलाही राजबिंडा. नोकरी चांगली होती. स्वत:चे राहते घर होते. आई-बाबांचा लाडका नसला तरी दोडका पण नव्हता. जशी इतर घरात होतात तशी त्यांच्याही घरात भांडणं व्हायची... शेवटी काय...? दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात... एकतर संवाद नाहीतर शांतता. दोन्ही नसेल तर तेंव्हा फक्त युध्द होतात. रक्त नाही सांडले तरी भांडी पडतात... त्यांना पोकं येतात.
     अनिकेतची बायको म्हणजे काव्या... काव्या नावासारखीच होती... कवितेसारखी... रेंगाळणारी... दिसायला नक्षत्र... वागायला नम्र... नजर लागायची शंभर टक्के शक्यता होती... आणि लागलीच... डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षांपूर्वीच तिने थोरातांची सून म्हणून घरात प्रवेश केला होता. मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव काव्या ठेवले होते. तेंव्हापासून पूजा शिंदेची काव्या थोरात झाली होती. माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती.
     तिचे प्रेत बाहेर आणले गेले होते. तिचा चेहरा अजूनही हसरा होता. सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात याची खात्री पटली. मागून अनिकेतला आणले गेले. त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते. कळत नव्हते. छोटासा का होईना लेखक मी. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते. पोलिस आले आणि अनिकेतला घेऊन गेले आणि काव्याचा देहसुध्दा...
     गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट मार्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता. गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात काही अर्थ नव्हता. बाकी सगळे गेले. माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती. "असा नाही आहे हो आमचा अनिकेत... आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे... कुणाची नजर लागली हो...?" बाहेरुन अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत... श्या... जेवण जात नव्हते. झोप ही उडाली होती. "का रे अनिकेत असे का केलेस मित्रा? ... मित्रा... तुला मित्र म्हणू की नको हा विचार करावासा वाटतोय... इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली का रे?... का??? का केलेस? ... श्या... प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... पण उत्तर नाहीत... उत्तर देणारा कुठेय???... हे करुन तो खूश असेल का?... हे घडल्यावर ती खूश असेल का??? गळा घोटताना तिला किती दुखवले असेल??? पण तरीही तिचा चेहरा हसरा कसा होता???... अनिकेत.... अन्या.... सांग मला.... असे का केलेस?"
     माणसाला आयुष्यात काय हवे असते? मान्य आहे की मागितलेले सगळेच मिळत नाही. नाही मिळणारा माणूस रडत राहतो पण मिळाले की असे स्वत:च्या कर्माने घालवून बसतो. कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वत:चीच नजर लागते. हा आरंभ आहे की शेवट आहे हे सांगणं कठीण होतं. उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते. उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते. त्या आधी मला त्याला भेटायचे होते. पोलिस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता. आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ. म्हणून बोलायला वेळ मिळाला. नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते.
     मी लॉक-अप जवळ गेलो. अनिकेत शांत बसला होता. गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते. मला पाहून तो धावत-धावत लॉक-अपच्या दारापाशी  आला. लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी सळ्यांमधून अनिकेतने माझा हात धरला आणि म्हणाला, "संपवलं... संपवलं मी सगळं... बघ आता कुणालाच त्रास नाही. श्री... शांत झालंय बघ सगळं... ती आनंदात आहे बघ आता." "अन्या... अन्या... काय बोलतोयस हे... कोण आनंदात असेल? वेडा झाला आहेस का? काय करुन ठेवलंस हे? काय बिनसलं होतं रे तुझं? काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा... गमावून बसलास सगळं.." "गमावलं??? कोण बोलतं असं? मी तिला गमावून... कमावलंय... श्री... काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं खरं बोललास. तो नशीबवान मी. पण आंधळा होतो मी. नक्षत्र होती माझी काव्या. हिऱ्यासारखी होती. पण कोंदण चुकलं होतं. इतकं तेज सांभाळायची लायकी नव्हती रे श्री माझी. काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी? तिचं हसणं वेड लावणारं होतं. पण मी तिचं वेड होतो. खूप उशिरा कळले मला ते.
     काल ही भांडूण झोपलो मी. जाग आली तेंव्हा काव्याही झोपली होती. तिचा ओला गाल पाहिला मी. रडली होती ती. खूप खूप रडली होती. रोजच्या सारखीच. मग बसलो आणि विचार केला. सगळं सगळं उलघडत होतं. मी दोषी ठरत होतो. स्वत:च्याच विचारात स्वत:ला दोष आला की स्वत:च्याच विचारांचा राग येतो... मलाही येत होता स्वत:चा राग. मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं की गर्दीची भीती वाटत नाही पण तेच माणूस जवळ नसलं की स्वत:च्या सावलीचीही भिती वाटते.  मित्रा, मला बायकोचा बैल म्हणतील म्हणून गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा. नेहमी एकटं सोडलं. तिची नजर शोधायची मला पण यातच पुरुषार्थ वाटायचा मला. पुरुषार्थ... मोठा शब्द आहे ना? अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा? घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का? संसार फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात पुरुषार्थ. विस्कटता सगळ्यांना येतं, आवरायला हिंमत असावी लागते." अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत होती. मी प्रयत्न करत होतो. पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता. माझी घाई होत होती. त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं. "श्री... नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे. साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं. पण मला कधीच नाही जमलं ते. वेळ... खूप मोठी गोष्ट आहे रे श्री... नात्यासाठी. माझ्याकडे वेळ होता पण तो तिच्यासाठी नव्हता. तो माझ्या मित्रांसाठी होता. मित्रांसोबत दारुच्या बाटल्या फोडून Get Together करताना घरातली सर्वात जवळची मैत्रिण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.  आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली की हुरुप येतो. पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला. पण तिने तोंडातून ब्र नाही काढला श्री... दुनियेला एक शब्द नाही कळला. तिने कळूच नाही दिला. आपण हसलं की जग फसतं...  तिनेही हेच केलं. नेहमी हसऱ्या चेहऱ्यानं जगाला फसवलं. स्वत:चा त्रास कधी नाही दाखवला कुणाला? का राहावं तिनं माझ्यासोबत? लायकी तरी आहे का माझी?... कोणत्या विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं? "सांभाळ माझ्या पोरीला" असे म्हणाले होते ते. काय तोंड दाखवू त्यांना आता? मी ओळखतो स्वत:ला. दोन दिवस सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला... पुन्हा तीच सहन करणार. घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल... एकच उपाय... मरण... माझं नाही... तिचं. मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल. तशीच ओढणी उचलली मी तिची. तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली. गच्च खेचत गेलो ती. तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता. चांदणं पडलं होतं पण फक्त माझ्यावरच. दोन क्षण वाटले की, इतका निर्दयी कसा होऊ शकतो मी? इतकी नाजूक... इतकी गोड काव्या माझी... नाही... नाही... नाही जमणार हे मला. पण श्री.... पण पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालांवर सुकलेले पाणी घेऊन तशीच झोपणारी काव्या दिसली. तिच्या मनातलं ऐकू येत होतं मला. मी म्हणत होती. "फक्त जेवलं, पाणी पिलं, पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक? मनाचं काय? त्याला काय हवं असते रे?  दोन सोबतीचं क्षणं, जिव्हाळ्याची एक हाक, मायेचा एक स्पर्श आणि तितकं द्यायलाही आपल्या माणसांकडे वेळ नसावा. असण्याला असणं कसं म्हणावं? इथे शांती मागितली की एकांत मिळतो. एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक... आम्ही जगासाठी दोन नसून एक आहोत. आम्ही खरंच एक आहोत. पण आमचा एक आणि जगाचा एक वेगळा आहे. आम्ही एक-एकटे आहोत.
     गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला. पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी. प्रेम होतं तिच्यासाठी. तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली. हसतच राहिली. माझा हात गच्च होत होता. ओढणी ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती. तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता. मी आजवर काय काय त्रास दिला, किती छळलं हे आठवत होतं. नाही... नाही... यापुढे नाही द्यायचा त्रास... माणूस आहे रे ती... सहन तरी किती करावं? ओढणी ताणली. गळ्याजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला. खूप ओढ होती रे त्या स्पर्शात. पण मी म्हणालो, " नको लावूस इतकी ओढ. मी नाहीये या ओढीच्या लायकीचा. तू छान आहेस काव्या... चुकलो मी, माफ कर मला. गोड हसली रे ती."
     "पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली. डोळे झाकले तिने सुखाने. पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं. तेच वेड लावणारं हास्य तिच्या जिवंतपणी जे पाहू शकलो नाही ते सूख होतं तिथं तिच्या डोळ्यांत, चेहऱ्यात, स्पर्शात." पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशान भूमीवर आणलं. काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता. अनिकेत वेड्यासारखा पुन्हा पुन्हा धावत जात होता त्या अग्नीतल्या काव्याजवळ.. आणि अडवत होतो आम्ही . त्याला... तो किंचाळत होता.... "बघ... बघ.. श्री... मी जळतोय आणि ती विझतेय."

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

195. एकतर्फी प्रेम सोप नसतं

        तुला त्याची किंमत नसेल, पण आशा नसतानाही लढणं सोप नसतं गं...तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण एकतर्फी प्रेम करणं सोप नसतं गं... !!!
     तासन्तास तुझ्या एका नजरेची वाट पहाणं. एक झलक मिळाली की जसं देव पावणं. चुकून हसलीस तर वेडच होऊन जाणं. मग रात्र काय?? आणि दिवस काय?? झोपेचं काम फक्त जागत राहणं. मग मनाला खुळं ठरवून सारा दोष त्याच्यावर ढकलून स्वत:ची समजूत काढणं सोपं नसतं गं...
     तुझ्याच विचाराने डोकं घोटाळणं. एका स्वप्नाच्या मागे बाकी सगळी ध्येयं अपर्ण करणं. एका आशेमागे जीव कुरवाळणं. आनंदाचा स्त्रोत तूच, रागाचं कारणही तूच, विचारातही तूच, स्वप्नातही तूच, देहातही तूच. एक मात्र आशा, त्या आशेतही तूच. मग एकांतातही एकटं राहणं सोपं नसतं गं...
     काळजी करणाऱ्यांशी खोटं बोलणं, मित्रांची नजर चुकवणं, सतत एकच प्रयत्न हा वेडेपणा लपवणं. पण या डोळ्यांना कसं रोखायचं??? यांचं काम फक्त मला वेड ठरवणं. कोणाची दया... कोणाचं हास्य... कोणाची चीड... लोकांची करमणूक बनणं, सोपं नसतं गं...
     सन्मान... इज्जत... अब्रू... अहंकार... हे शब्द.... हो... शब्दच ना.... कोणाच्या पायाशी अर्पण करणं. आता हास्य होईल ओठांवर श्वास की लागेल आता डोळ्यांची धास, हे ठरवायचा हक्क दुसऱ्याला देणं. स्वत:ला चिरडून टाकण्याचा हक्क कोणाला देणं सोपं नसतं गं...
     तुझा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करणं. रोज स्वत:लाच दणकावून सांगणं. वेड्यासारखं स्वत:च काहीतरी ठरवून घेणं. रोज सकाळी एक दृढनिश्चय करणं आणि निजण्याआधी पुन्हा त्या मोबाईलमध्ये तुझ्याच मॅसेजची वाट पहाणं सोपं नसतं गं...
     डोंगळाएवढं स्मितहास्य ओठांवर झेलणं.मैथिलींच्या गर्दीत, लोकांच्या चराड्यात एकटं राहणं. एकांतात स्वत:शी सोबतचही नकोशी वाटणं. मनाच्या जखमांना स्वत:च दगडानं ठेचणं. अश्रू संपसपर्यंत रडणं आणि अश्रूही सोडून गेले म्हणून पुन्हा जीव तोडणं सोप नसतं गं...
     पोहता येत नाही म्हणून पाण्याची ओढ असणं. विझली तरी चटके नाही बसणार या आशेनं आगीतच उभे राहणं. कळेल गं तुला, अवघड असतं प्रेम करणं. कोणाची जबरदस्ती होती का? या प्रश्नाला वारंवार टाळणं. पण जबरदस्ती नसतानाही स्वत:ची आहुती देणं सोप नसतं गं...
     तुला त्याची किंमत नसेल, पण आशा नसतानाही लढणं सोप नसतं गं...तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण एकतर्फी प्रेम करणं सोप नसतं गं... !!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

194. हरवलेला किनारा

        "वॉव... अक्षु किती मस्त ठिकाण आहे ना गोवा !!! मी खूप उत्साहित आहे यार... आपण खूप धमाल करायची हा, इथले सगळे बीच पालथे घालायचे." गोव्याला येऊन प्रिया खूप उत्साहित झाली होती. आज खूप दिवसांनी आकांक्षाही बाहेर पडली होती. रोजच्या कामातून तिला कधी वेळच मिळत नसे आणि स्वप्नीललाही मनात असूनसुध्दा तिला वेळ देता येत नसे. याही वेळी त्याला जमल नाही म्हणून त्याने तिला प्रियाबरोबर पिकनिकला जायला सांगितलं होतं. कारण त्याला कामानिमित्त 4-5 दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागणार होतं. हो-नाही करता करता आकांक्षाही तयार झाली आणि ती प्रियाबरोबर गोव्याला आली. प्रिया ही आकांक्षाची खूप चांगली मैत्रिण होती. दोघींनी पार्टनरशिपमध्ये पुण्यात एक बुटीक ओपन केलं होतं. लग्न झाल्यानंतर आणि कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच आकांक्षाला प्रियासारखी जीवलग एक जीवलग मैत्रिण मिळाली होती आणि स्वप्नील आकांक्षाचा नवरा. खूप चांगला मुलगा, आकांक्षावर त्याचं अगदी जीवापाड प्रेम होतं. दोघांच्या लग्नाला नुकताच 1 वर्ष झालं. दोघांचीही भेट फेसबुकवरती झाली होती 3 वर्षांपूर्वी. आकांक्षाचा स्वभाव  खूप आवडल्यामुळे त्याने तिला न बघताच प्रपोज केलं होतं. आकांक्षाही तितकीच गोड स्वभावाची आणि सुंदर होती. कोणीही सहज तिच्या प्रेमात पडलं असतं. म्हणूनच आकांक्षाला स्वप्नीलला वाईट वाटेल, त्याचं मन दुखवलं जाईल असं काहीही आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायची म्हणूनच तिने मनात असूनही स्वप्नीलला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाही. कारण तिला भीती होती की स्वप्नीलचा तिच्यावर विश्वास उरणार नाही आणि मग ती त्याला कायमचं गमाऊन बसेल आणि हेच तिला नको होतं. कारण तिचंही तितकंच प्रेम होतं स्वप्नीलवर. आणि तसंही या गोष्टी पुन्हा उकरुन काढण्यातही काही अर्थ उरला नव्हता. समीरला ती पूर्णपण नाही पण बऱ्यापैकी विसरली होती. कधी-कधी स्वप्नीलच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून आकांक्षाला समीरची आठवण व्हायची आणि मग तिला तिचा भूतकाळ जो ती खूप मागे ठेवून आली होती तो समोर येत असे. दोघी गोव्याच्या एका बिचवर आल्या होत्या फिरायला. प्रिया तिच्या इतर मैत्रिणींबरोबर मौजमजा करत होती आणि आकांक्षा मात्र एका ठिकाणी वाळूवर शांतपणे बसून समुद्राकडे पहात बसली होती. समोर एक जोडपे बसलेले होते. आकांक्षा त्यांच्याकडे टक लावून पहात होती. त्यांच्यात काही बोलणं चालू होतं. मग त्या मुलाने हसत हसत वळ पडलेल्या एका नारळाच्या झावळीच्या पानाचा एक तुकडा घेतला आणि त्याला पीळ देऊन त्याची एक लहानशी रिंग बनवली आणि मग ती त्याने त्या मुलीच्या बोटात घातली आणि म्हणाला, "हे बघ. आता आपली इंगेजमेंट झाली. आजपासून तू माझी झालीस. लवकरच लग्न करुया आपण !!!" असं म्हटल्याबरोबर त्या मुलीने हसून त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं आणि दोघे त्या निळ्याशार अथांग समुद्राकडे पाहू लागले. "अक्षु, एकटीच काय बसलीयेस. चल ना आमच्याबरोबर जरा एंजॉय कर, चल...!!!" प्रिया तिला बोलवत होती. पण आकांक्षाच तिकडे लक्षच नव्हतं. आकांक्षा कुठल्यातरी आठवणीत हरवली होती आणि हळूच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. जणू समीरच्या तिच्या जुन्या आठवणी त्यांच्याकडे पाहून जाग्या झाल्या होत्या. आणि मन म्हणत होते,
"तू परत येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला.
आधीच खूप दिवस लागलेत, मनावरची जखम भरायला.
मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही.
लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला !!!"
         आकांक्षा मनात असा विचार करत होती की, "हॅलो !!! मॅडम मी तुझ्याशी बोलतेय. कुठे हरवलीस??" प्रियाच्या आवाजाने आकांक्षा भानावर आली. तिच्या डोळ्यांत पाणी बघून प्रियाला काळजी वाटली आणि म्हणाली, "काय झालं अक्षु??? तुझ्या डोळ्यांत पाणी? स्वप्नीलची खूप आठवण येते का तुला???" प्रिया काळजीच्या सुरात म्हणाली. "नाही गं... काही नाही.. बसं असंच !!! तू जा... एंजॉय कर. मला बसू दे थोडा वेळ इथे खूपच शांत वाटतय." म्हणून तिने विषय टाळला. मग प्रियाही निघून गेली. तेवढ्यात प्रियाला कुणाचातरी कॉल आला. मग ती थोडावेळ काहीतरी फोनवर बोलली. मग हळूच प्रियाकडे बघून हसली. मग पुन्हा मैत्रिणींमध्ये निघून गेली आणि आकांक्षा पुन्हा तिच्या भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली.
     आकांक्षा मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती. वाणिज्य शाखेचे शेवटचे वर्ष बाकी होते. डिसेंबरचा महिना उजाडला होता. वर्षभर मौजमस्ती केल्यानंतर आता परीक्षेचा अभ्यास सगळ्यांना आठवत होता. आकांक्षेचेही काही वेगळे हाल नव्हते. मग शेवटी तिच्या ग्रुपने कॉलेजची लायब्ररी जॉईन केली. पण तिथे अभ्यास कमी आणि मस्ती जास्त असायची त्यांची.... "समीर... वाणिज्यच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याची ओळख झाली. तिच्या कॉलेजच्या लायब्ररीत असिस्टंट म्हणून काम करायचा. काहीतरी 2 महिन्यांपूर्वीच रुजू झाला होता. दिसायला तसा हँडसम होता अगदी गोरापान. कॉलेजच्या काही मुलींचा त्याच्यावर जाम क्रश होता. पण आकांक्षा मात्र याला अपवाद होती. कॉलेजमध्ये असताना आकांक्षाचाही स्वभाव थोडा खोडकरच होता.
            एक दिवस तिच्या एका मैत्रिणीलाही ही लायब्ररी जॉईन करायची होती म्हणून ती तिच्यासोबत तिथल्या ऑफिसमध्ये गेली आणि तिथून एक फॉर्म घेऊन तो भरण्यासाठी दोघी समोरच्याच एक टेबलवर बसल्या, तेवढ्यात समीरही काही कामानिमित्त तिथे आला होता. तिथेच त्याने पहिल्यांदा आकांक्षाला पाहिलं, पाहिल्याच नजरते ती त्याला खूप आवडली म्हणून तो त्याचं काम संपल्यानतरही मुद्दाम तिथेच एका पुस्तकांचया कपाटाजवळ काहीतरी खुडबुड करत उभा राहिला व मधून मधून चोरुन आकांक्षाकडे पाहत होता. इतक्यात आकांक्षाच सहज त्याच्याकडे लक्ष गेलं. तसं त्याने लगेच दुसरीकडे बघायला सुरवात केली. आकांक्षा त्याला पाहून मस्करीच्या मूडमध्ये येऊन तिच्या मैत्रिणीला म्हणाली, "मिनु, मी काय म्हणते हा मुलगा किती स्मार्ट आहे ना, असाच मुलगा जर माझा बॉयफ्रेंड असता तर किती छान झालं असतं  ना." "हो का?" मग जाऊन बोलणी करु का त्याच्याशी तुझ्यासाठी, तसाही तो मघापासून तो तुला चोरुन चोरुन बघतोय." मिनू म्हणाली. त्याचं बघण मिनुच्या नजरेतून सुटलं नव्हतं. लगेच आकांक्षा म्हणाली, "नको काय !!! मला गरज नाहीये त्याची. मी तर मस्करी करत होती." आणि दोघी हसायला लागल्या तसं समीर त्यांच्याकडे पाहू लागला. "ए मिनु गप बस हसू नको. ! तो बघ इकडेच बघतोय." आकांक्षा त्यांच्याकडे पाहून म्हणाली.  मग लगेच दोघी गप्प बसल्या आणि फॉर्म कांऊंटरवर जमा करुन निघून गेल्या. पण समीर मात्र त्यांना त्या बाहेर जाईपर्यंत बघत राहिला. आकांक्षा तर नाही पण समीर नक्कीच तिच्या प्रेमात पडला होता. असेच काही दिवस निघून गेले जानेवारीचा महिना उजाडला, आकांक्षाचा अभ्यास जोरात चालू होता. इकडे समीर मात्र आता नेहमीच काही न काही काम काढून लायब्ररीत सारखा यायचाच. आकांक्षाला लपूनच का होईना, तिला बघण्याचा प्रयत्न  करायचा पण आकांक्षाला याची जराही कल्पना नव्हती. हळू हळू तिच्या मैत्रिणींना मात्र ही गोष्ट जाणवू लागली आणि त्यांनी आकांक्षाला तसं सांगितलही. पण आकांक्षा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होती. कारण तिला दुनियेची कधी पडलेलीच नसायची. ती नेहमी स्वत:च्याच धुदीत असायची. तिच्याच क्लासमधल्या एका मुलीचा भाऊही तिथेच काम करत होता. हळूहळू समीरने त्याच्याकडेही आकांक्षाची चौकशी सुरु केली आणि ही गोष्ट क्लासमधल्या मैत्रिणीलाही कळली आणि अचानक एक दिवस आकांक्षा तिच्या मैत्रिणींबरोबर कँटीनमध्ये बसलेली असताना ती मुलगी ओरडतच कँटीनमध्ये आली, "ए आकांक्षा, अगं एक गोष्ट सांगायची आहे तुला !!! यार आपल्या कॉलेजध्ये एक मजनू आहे तुझा !!!" "काय????" आकांक्षा जवळ जवळ ओरडतच उठली आणि म्हणाली, "ए जरा हळू बोल आणि हे काय म्हणतेस ते जरा नीट सांग मला. कोण आहे माझा मजनू आणि तुला कुठे भेटला???" मग तिने काय ते सगळं आकांक्षाला सांगितलं की तो कसा तिच्यामागे फिरतोय आणि तिच्याविषयी सगळ्यांना लायब्ररीत विचारपूस करतोय आणि त्याचं वर्णन सांगितलं तेंव्हा हे ऐकून मिनू म्हणाली, "अगं... हा तो तर नाही न त्या दिवशी आपण फॉर्म भरत असताना तिथे उगाच उभा राहून तुला बघत होता तो?" आता सर्व मैत्रिणी आकांक्षाला रोजच चिडवू लागल्या. आता तर तिनेसुध्दा 3-4 वेळा त्याची दखल घेतली होती आणि त्यालाही ते कळलं होतं म्हणून आता तो मुद्दामच तिच्यासमोर येऊन उभा राहत असे. हळूहळू तिथल्या स्टाफलही याची भुणभुण लागली होती. असं करता करता एक दिवस त्याने ठरवलंच की आकांक्षाला त्याच्या मनातली गोष्ट सांगायचीच म्हणून. एक दिवस परीक्षेचा फॉर्म भरायचा होता आणि शेवटची तारीख होती म्हणून कँपसमधून धावत ती ऑफिसमध्ये जात होती. तेंव्हा कशात तरी तिचा पाय अडखळला आणि आकांक्षा जोरात खाली पडली आणि तिचा पाय मुरगळला. पायाचा अंगठाही चांगलाच फुटला होता. त्यातून खूप रक्त वाहत होतं. लगेच तिच्या मैत्रिणींनी तिला मेडीकल डिपार्टमेंट मध्ये नेलं आणि तात्पुरती मलमपट्टी केली.  पाय मुरगळल्यामुळे आकांक्षाला खूप त्रास होत होता. त्यामुळे ती रडत होती थोडा वेळ. ती खालीच कँपसमध्ये बसून राहिली. इकडे लायब्ररीत अजूनही आकांक्षा न दिसल्यामुळे समीर अस्वस्थ झाला होता. कारण तिला पाहिल्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. इकडे तिचा फॉर्म तिच्या मैत्रिणींनी भरला आणि तिला लायब्ररीत घेऊन आले. तेंव्हा नेमका समीर तिथेच एका मुलाबरोबर बोलत उभा होता. त्याने आकांक्षाला पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यांतलं पाणी बघून तो काळजीत पडला. मग त्याने तिच्या पायाकडं बघितलं तर अंगठ्याला पट्टी बांधलेली होती. तिचा रडवलेला चेहरा बघून त्यालाही कससंस झालं.  आकांक्षाने त्याच्याकडे पाहिले आणि खाली मान घालून आत निघून गेली.
पण समीर मात्र खूप अस्वस्थ झाला होता. स्वत:च जाऊन विचाराव की काय झालं तिला. पण त्याला धरी होत नव्हता. म्हणून त्याने त्याच्या एक मित्राला विचारायला सांगितलं कारण त्याची तिच्या मैत्रिणींनिशी चांगली ओळख होती. मग त्याने तसं विचारल्यावर काय झालं ते समीरला सांगितलं.
     मग 2-3 दिवसांनी कॉलेजमध्ये दरवषीप्रमाणे कसली तरी पूजा होती. त्याच दिवशी समीरने आकांक्षाला विचारायचं ठरवलं. म्हणून तो त्या दिवशी संधी शोधत होता. समरी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरती एका मित्राशी बोलत उभा होता तेवढ्यात "समीर-अजय चला खाली देवाच्या पाया पडायला.. इथे काय बोलत उभा राहिलात." एका सिनिअर मॅडमनी त्यांना सांगितले आणि त्या निघून गेल्या. पण समीरला खाली जायचा कंटाळा आला होता. "चल कोण जातंय खाली मला खूप कंटाळा आलाय आता!!! नंतर जाऊया." असं म्हणून तो पुन्हा मित्राशी बोलत तिथेच रेंगाळला. इतक्यात खाली कँपसमध्ये आकांक्षा तिच्या मैत्रिणींबरोबर येताना दिसली. तिने आज जांभळ्या रंगाचा सलवार आणि मेहंदी रंगाचा चुडीदार घातला होता. तिचा रंग गोरा असल्याने तो ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता आणि केसांना एक लहानशी क्लीप लावून केस मोकळे सोडले होते. एका हातात एक छानसं घड्याळ आणि एका हातात सुंदर नाजूक कडा घातला होता. खरच आज आकांक्षा नेहमीपेक्षा खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहताच समीर खूश झाला. आणि खाली कँपसकडे निघाला. "अरे समीर कुठे निघालास?" त्याच्या मित्राने त्याला अडवले. "अरे खाली पूजा आहे ना, तिथे पाया पडायला चाललो आहे. चल तू पण." समीर बोलला. "काय??? अरे आता तर तू नाही म्हणालास ना... मग अचानक काय झालं." मित्राने विचारलं. "काही नाही रे.. असंच... चल लवकर..." असं म्हणत तो मित्राला खेचतच खाली घेऊन गेला. देवाची आरती झाल्यानंतर आकांक्षा पाया पडली आणि जशी मागे वळली तशी ती एकदम दचकली. मागे एका खुर्चीवर समीर आणि त्याचे मित्र ऐटीत बसले होते आणि समीर तिच्याकडे टक लावून वेड्यासारखा पाहत होता आणि हसत होता. आकांक्षालाही खूप अवघडल्यासारखे वाटले. कारण तिच्या पायाची जखम अजून बरी झाली नव्हती. म्हणून ती थोडी लंगडतच चालत होती. शेवटी कशीबशी ती तिथून निघून गेली. आता मात्र तिच्या मैत्रिणी तिला जास्तच चिडवू लागल्या. आकांक्षाही थोडी लाजली. कारण हळूहळू समीरही तिला आवडू लागला होता. नेहमीपेक्षा आज समरी जरा जास्तच तिच्यासमोर फिरत होता आणि सोबत त्याचे मित्रही होते. पण आज त्याच्या मित्रांची टवाळी जरा जास्तच वाढली होती. म्हणून आकांक्षाला समीरचा थोडा रागही आला होता. जरी आकांक्षा खोडकर असली तरी तिला आपल्याबद्दल सर्वत्र चर्चा झालेलं आवडलेलं नव्हतं.
     कँपसच्या एका कट्ट्यावर आकांक्षाचा ग्रुप गप्पा मारत बसला होता. मन मिनू म्हणाली "ए चल आता खूप टाईमपास झाला. आता लायब्ररीत जाऊन अभ्यास करुया. चल गं अक्षु." मग लगेच मिनू आणि आकांखा लायब्ररीकडे निघाल्या. त्यांना तिकडे जाताना समीर ने पाहिलं आणि त्याचे मित्र त्याला सांगू लागले की "जा बोल... तिला काय ते." म्हणून समीर त्यांच्या पाठोपाठ गेला.  आज पूजा असल्यामुळे लायब्ररीकडे कोणी जास्त फिरकलही नव्हतं. समीरने दोघींना पहिल्या मजल्याच्या जिन्यावरच अडवलं. त्याला असं अचानक बघून दोघीही दचकल्या. मग तो पुढे जाऊन उभा राहिला. आकांक्षा जवळ येताच त्याने तिला स्माईल देत विचारलं, "हाय !! तुझे नाव काय आहे?" अचानक या प्रश्नाने बावरल्याने ती काही उत्त्र न देताच पुढे निघून गेली. पुन्हा समीर त्यांच्या मागून दुसऱ्या मजल्याच्या जिन्यावर आणखी पुढे जाऊन थांबला पुन्हा त्या जवळ येताच त्याने परत विचारले, "प्लीज थांब ना... मला काही सांगायचे आहे तुला."
     "काय सांगायचे आहे?" मिनूने पुढे होऊन त्याला प्रश्न केला. "मला तिला सांगायचं आहे, तुला नाही." समीर जरा रागानेच मिनूला बोलला. मग मिनू जरा मागे झाली. मग पुन्हा समीर आकांक्षाकडे वळून तिला म्हणाला, "हे बघ मला नक्की नाही माहीत की तुझ्या मनात काय आहे ते पण मला तू खूप आवडतेस. तुझं नांव तरी नाही माहीत पण तुझा नकार नक्कीच नसेल." आणि पुढे तो आणखी काही बोलणार इतक्यात खालच्या मजल्यावरुन कोणीतरी येण्याचा आवाज आला. तसा समीर लगेच तिथून निघून गेला. आकांक्षा स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. थोड्या वेळासाठी काय घडलं ते तिला कळलंच नाही.
     "अगं काय झालं? तो गेला पण निघून." असं म्हणत मिनूने तिला हलवलं. तशी ती भानावर येऊन मिनूकडे बघत होती तेंव्हा मिनू तिच्याकडे बघून हसत होती. "काय मुहूर्त शोधला आहे गं मिस्टर मजनू ने." आणि मिनू ने आकांक्षाला डोळा मारला. तशा दोघी हसायला लागल्या. मग दोघी लायब्ररीत आल्यावर बॅग ठेवण्याच्या काऊंटर जवळ येऊन थांबल्या पण आकांक्षाला खरंच विश्वास बसत नव्हता की समीरने तिला प्रपोज केलंय ते. तेवढ्यात पुन्हा समीर फोनवर बोलत अचानक तिथे आला व हळूच तिच्या कानात "आज खूप सुंदर दिसतेस" अस म्हणून मुद्दाम आकांक्षाच्या बाजूने निघून गेला. पण आज आकांक्षाला मात्र धक्क्यावर धक्के मिळत होते. आता लायब्ररीत काही मन लागणार नव्हते म्हणून आकांक्षाने घरी जायचे ठरवले. पण मनातून मात्र तिला तिथेच थांबावसं वाटत होतं. मग मिनूबरोबर खाली कँपसमध्ये आल्यावर तिथे मुलांचा एक ग्रुप उभा होता. तिथून काही कुजबूज तिच्या कानी पडली. "अरे विचारलं रे त्याने पण तिनेच काही उत्तर दिलं नाही." आकांक्षाने रागाने एक नजर टाकताच सर्वजण चिडीचूप झाले. पण आता मात्र आकांक्षाला समीरचा खूपच राग आला होता. तिला वाटलं की समीर तिची मस्करी करतोय आणि त्याचे मित्रही त्यात शामिल आहेत. म्हणून ती जरा रागानेच मिनूबरोबर कॉलेजच्या बाहेर पडली.
     थोडे पुढे जाताच तिला जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर मागून थोड्या अंतराने समीर आणि त्याचा मित्र येता आहेत. आता मात्र आकांक्षा जाम घाबरली आणि मिनूला म्हणाली, "अगं मिनू, ते बघ. ते दोघे आपल्या मागून येत आहेत आता. ह्या बाळवटाचं लक्षण काही चांगलं दिसत नाही."
"लक्षण चांगलं दिसत नाहीये म्हणजे???" मिनूने प्रश्न केला.
"म्हणजे मी त्याला नाही म्हणणार." आकांक्षा म्हणाली.
"काय??? खरंच नाही म्हणणार की फक्त माझ्यासमोर असे म्हणतेस??" मिनू जरा तिची मस्करी करण्याच्या उद्देशाने म्हणाली. "गप्प बस आता चल लवकर !!!" आणि दोघी पटापट निघून गेल्या. समीर मात्र दूरपर्यंत नजरेआड होईपर्यंत तिला पाहत उभा राहिला.
     दिवसभर आकांक्षाच्या नजरेसमोरुन सकाळचा क्षण जात नव्हता. दिवसभर आणि रात्रभर ती समीरचाच विचार करत होती. जरी आकांक्षाच्या मनात समीरचे विचार सुरु असले तरी तिला एका गोष्टीची भितीही वाटत होती की खरंच समीर तिच्यावर प्रेम करतोय का? की उद्या घरच्यांनी नकार दिला तर तो माघार घेईल? आणि जरी ती हो म्हणाली तर पुढे तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? असे अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करत होते. न राहवून तिने मिनूला कॉल केला. मिनूने तिला समजावलं, "अश्रू तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस आणि तू पण घाईघाईने काही मनात ठरवून ठेऊन नकोस. उद्या कॉलेजला आल्यावर बोलू आपण." आणि मिनूने फोन ठेवून दिला.
     इकडे समीरचेही काही हाल वेगळे नव्हते. मनातली गोष्ट आकांक्षाला सांगितल्यामुळे त्याला जरा मोकळे मोकळे वाटू लागले. पण आकांक्षाचं उत्तर काय असेल याचीही खूप काळजी त्याला वाटत होती. पण त्याला स्वत:वरच जास्त या गोष्टीचा राग आला की तो साध तिला तिचं नावही विचारु शकला नाही. कारण इतकी विचारपूस करुनही त्याला आकांक्षाचं नांवही कळू शकलं नव्हतं. शेवटी दुसरा दिवस उजाडला. आकांक्षा आणि तिची मैत्रिण कॉलेजला आल्या होत्या. मग कॉलेज सुटण्याच्या वेळेपर्यंत त्यांनी अभ्यास केला. पण आज आकांक्षाला समीर कुठे दिसलाच नाही कॉलेजमध्ये आल्यापासून न जानो कित्येक वेळा तिच्या नजरेने त्याचा शोध घेतला असेल पण आज त्याचा कुठे पत्ताच नव्हता.
     "काय गं, आज मिस्टर मजनू कुठे दिसलाच नाही. काल तू काही उत्तर दिलं नाही म्हणून राग आला की काय त्याला???" मिनूने मुद्दाम आकांक्षाला छेडलं. "गप्प गं. येऊ दे राग आला तर. नाहीतरी काल कसा वागला होता तो." खोट्या रागानेच आकांक्षा म्हणाली. पण तरी तिचे डोळे त्यालाच शोधत होते.
     "काय झालं आकांक्षा तुला? अशी का वागतेस तू? का त्याची इतकी वाट बघतेस?" असे अनेक प्रश्न आकांक्षा स्वत:च्याच मनाला विचारत होती. मग मिनू म्हणाली की त्याच्या मित्रालाच जाऊन विचारु. दोघी त्याच्या मित्राजवळ आल्या. मिनू, "काय काल काय चाललं तुझ्या मित्राचं आणि तुझं?" मित्र," कुठे काय? आम्ही काय केलं." "हो का? काल आम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही दोघे आमचा पाठलाग का करत होतात?" "नाही... अगं कुठे... नाही. आम्ही तर असाच बाहेर फिरत होतो." "खरं खरं सांग. असं करताना काहीच कसं वाटत नाही रे तुम्हा मुलांना." मिनू म्हणाली. आकांक्षा बाजूला शांत उभी होती. खरं तर तिला त्याच्या मित्राकडे बघून खूप हसायला येत होतं पण तिने स्वत:ला आवरलं. "मी काल काही उत्तर दिलं नाही म्हणून त्याला राग आला का?" न राहवून शेवटी मधेच आकांक्षा बोलली. "काय तू आकांक्षा जरा शांत बस ना. लगेच काय घाई पडलीय तुला." असं म्हणून मिनू तिला तिथून खेचतच घेऊन गेली आणि नंतर खूप ओरडली. मग तिला समजावलं की, "अक्षु, प्लीज. लगेच अशी घाई करु नकोस. आधी नीट त्याच्याशी बोलू. मग पुढचं पुढे बघू." "ठीक आहे." आकांक्षानेही शहाण्या मुलीसारखी मान हलवली आणि परत दोघी अभ्यास करायला निघून गेल्या.
     सोमवार उजाडला. समीर मोठ्या ऐटीत लायब्ररीत आला. आज तो खूप खूश दिसत होता. आल्याआल्या तो आकांक्षाला शोधू लागला. बघतो तर मिनू आणि आकांक्षा दोघी आतमध्ये अभ्यास करत बसल्या होत्या. दोघींचेही लक्ष त्याच्याकडे नव्हते. तिला बघून त्याला जरा समाधान वाटलं. जणू त्याचा दिवस आज खूप मजेत जाणार होता. मग त्याने त्याच्या मित्राकडे चौकशी केली तेंव्हा त्याला शनिवारच्या गोष्टीबद्दल घडले आणि त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. मग बाहेरुन त्याने हळूच मिनुला इशारे करायला सुरवात केली. अचानक दोघींचाही लक्ष त्याच्याकडे गेल. त्याचबरोबर आणखी दोन-तीन नजरही त्याच्याकडे वळल्या तसा तो गप्प बसला आणि एका बाजूला जाऊन उभा राहिला. मग काही काम आलं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने परत तो काऊंटरजवळ आला आणि पुन्हा हळूच त्याने इशारा करुन मिनुला बाहेर यायला सांगितलं. मिनुच आता घाबरली की हा तिला का बोलावतोय म्हणून आणि ती आकांक्षाला म्हणाली, "ए तुमच्या भानगडीत हा मला खेचतोय, जा तूच भेटून ये त्याला जा !!" आकांक्षा तिला विनवणी करु लागली, "प्लीज मिनू. जा न बघून तर ये तो काय म्हणतोय ते." मग मिनू बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर त्याने एक चिठ्ठी मिनुच्या हातात दिली आणि म्हणाला, "ही चिठ्ठी तिला दे." "काय लिहलंय यात?आणि मी का म्हणून देऊ. तूच जाऊन दे ना तिला. आणि काय रे! तुझं नांव काय ते तरी सांग." मिनू खूप बिनधास्त होती. "प्लीज दे ना. यात माझा नंबर आहे तिला मिस कॉल द्यायला सांग आणि त्या दिवशी तुला बोललो म्हणून राग आला असेल तर सॉरी. पण प्लीज मला ती खूप आवडते गं. तिचं नांव काय आहे सांग ना !!!" "काय !!! नांव माहित नाही आणि प्रेम कसलं करतोस रे, मी नाही नांव सांगणार तिचं. खर प्रेम करत असशील तर स्वत:च शोध तिचं नांव." मिनू म्हणाली आणि लायब्ररीत निघून गेली. मग तिने ती चिठ्ठी आकांक्षाकडे दिली. मग आकांक्षाने ती चिठ्ठी उघडली तर त्यात असं लिहीलं होतं, ".... सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर... तू नक्कीच आहेस... पण... त्यापेक्षाही सुंदर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे... आय लव यू डिअर..." आणि खाली त्याचा नंबर होता. आकांक्षाला काय करावं हेच सूचत नव्हतं. तिने समीरकडे पाहिलं तर तोही तिला एकटक पहात होता. आकांक्षाचं नांव समजावं म्हणून समीरने एका सिनिअर मॅडमना विनंती करुन बी. कॉम शेवटच्या वर्षाचे ॲडमिशन फॉर्म मागितले. त्या दिवशी दिवसभर समीर आकांक्षाच्या मिस कॉलची वाट पहात होता. पण तिचा फोन काही आला नाही. समीरला खूप भिती वाटू लागली की तिला राग तरी आला नसेल ना? पण मग तिने लाजून हसून का बघितलं काहीच कळत नव्हतं. ती रात्र समीरने कशी घालवली त्यालाच माहित. एक एक क्षण त्याला एक एक वर्षासारखा भासत होता. रात्री उशीरा झोपल्यामुळे त्याला उठायलाही उशीर झाला होता. घड्याळात 8.30 वाजले होते. घाईघाईत त्याने आवरले आणि कॉलेजला निघाला. तो स्टेशनवर पोहोचला असेल इतक्यात त्याचा फोन वाजला. एक अनोळखी नंबर होता. समीर, "हॅलो !!! हॅलो !!!" समोरुन एका मुलीचा आवाज ऐकू येत होता. "समीर स्पिकींग... आपण कोण बोलताय???" "तीच जिच्याकडे तू काल लव लेटर दिलं होतंस" मिनू म्हणाली. "तू !!!" समीरला एकदम आनंद झाला. त्याचा स्वत:च्या कानावर विश्वासच बसेना. "खरंच तू बोलतेस का? कशी आहेस.. सॉरी मला तुझं नांव माहित नाही पण..." त्याचं बोलणं मधेच थांबवत मिनू म्हणाली, "एक मिनीट... किती घाई करतोस, मी ती नाहीये जी तू समजतोस." "मग कोण बोलतेयस?" समीर गोंधळून म्हणाला. "मी तिची मैत्रिण बोलते मिनू. थांब तिला फोन देते." आणि मिनू ने आकांक्षाकडे फोन दिला. "हॅलो !!!" आकांक्षा म्हणाली. समीरला तिचा आवाज ऐकून खूप आनंद झाला. "हाय, गुड मॉर्निंग, कशी आहेस?" "मी बरी आहे. गुड मॉर्निंग." ती म्हणाली. "मला तुझं नांव माहित नाही. प्लीज सांगशील? खरं तर मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. पण फोनवर नाही जमणार. जर तुझी हरकत नसेल तर कॉलेजपासून जवळच एक हॉटेल आहे. तर आपण तिथे भेटूया का?" समीर थोडा धीर धरुन बोलला. "अगं मिनू, तो भेटायचं आहे म्हणतोय. नाही म्हणून सांगू का? मला खूप भिती वाटतेय गं." आकांक्षाने लगेच फोनवर हात ठेवून मिनूला सांगितलं. "अगं अशी काय तू मग जा ना भेटायला, तुला काही खावून नाही टाकणार आहे तो." मिनू चिडून म्हणाली. "ठीक आहे. चालेल... पण मी काही जास्त वेळ थांबणार नाही. ओके." आकांक्षाने त्याला सांगितलं. "ठीक आहे. चालेल... काळजी घे, बाय." म्हणत समीरने फोन ठेवला. थोड्या वेळाने आकांक्षा आणि मिनू त्या हॉटेलजवळ आल्या. हॉटेलमध्ये मस्तपैकी चहाचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात समीरही तेथे पोहोचला पण मिनूला पाहून त्याचा हिरमोड झाला. त्याला वाटलं की ती एकटीच येईल. मिनुला ते लगेच कळलं. "आकांक्षा मला एक काम आहे इथेच. आली मी लगेच झेरॉक्स घेऊन तू थांब इथे." असं म्हणून मिनू तिथून लगेच निघून गेली. मग समीर आणि आकांक्षा एका हॉटेलमध्ये गेले आणि एका टेबलावर बसले. काहीवेळ कुणीच काही बोलत नव्हतं. मग समीरनेच सुरवात केली, "तुझं नांव?" "आकांक्षा... आणि तुझं?" ती म्हणाली. "सुंदर नांव आहे अगदी तुझ्यासारखं." समीर हसत म्हणाला. "माझं नांव समीर. दोन महिन्यांपूर्वीच इथे जॉबला लागलो. वाटलं नव्हतं, आयुष्यात असाही टर्निंग पॉईंट (वेगळे वळण लावणारा प्रसंग) येईल म्हणून." समीर अजूनही तिच्याकडे बघत होता. आकांक्षा लाजली. "एक विचारु?" "हो... विचार ना?" मग समीरकडे बघत तिने विचारलं, "याआधी तुझ्या आयुष्यात कोणी होतं का?" तिच्या या प्रश्नाने समीर क्षणभर गोंधळला. त्याला या प्रश्नाची आकांक्षाकडून अपेक्षा नव्हती. "हो... नाही म्हणजे.... हो !!! होती एक मुलगी. दोन वर्षांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं." समीर म्हणाला. "काय??? मग कशामुळं झालं तुमचं ब्रेकअप?" तिने प्रश्न केला. "तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं आणि आता तिचं लग्नही झालं." समीर म्हणाला. "मग अजूनही तुझं तिच्यावर प्रेम आहे की......" आकांक्षा बोलता-बोलता थांबली. "आकांक्षा माझं तुझ्यावर खर प्रेम आहे. म्हणूनच तुला हे मी सांगतोय. जरी ती माझं पहिलं प्रेम असली तरी आता ती माझ्या आयुष्यात नाहीये. पूर्णपणे नाही पण थोडाफार तिला विसरु शकलोय मी. आज 2 वर्षांनी मला तूच एक अशी मुलगी भेटलीस जिने मला पहिल्यांदा तिला विसरायला आणि पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडलंस." समीर म्हणाला. मग आकांक्षा बोलली, "हे बघ समीर. मी इतर मुलींसारखी नाहीये जी फक्त स्वत:लाच मन रमवायला 4  दिवस हे अफेअरचं नाटक करेल. खरं तर तूही मला आवडतोस आणि म्हणूनच मी तुझ्याकडे माझा जीवनासाथी म्हणून पाहतेय. कारण तू जर माझ्या आयुष्यात येऊन पुन्हा निघून गेलास तर मला हे सहन होणार नाही. मग मी काय करुन बसेन माझं मलाही माहित नाही."  आकांक्षाकडून हे ऐकूण आता कुठे समीरच्या जीवात जीव आला होता. तो म्हणाला, "तू काही काळजी करु नकोस. मी तुला कधीच फसवणार नाही. त्याऐवजी मी हे करुच शकत नाही गं. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि तुला वचन देतो की शेवटपर्यंत तुला साथ देईन." हे ऐकताच आकांक्षाल खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं.
     मग थोडा वेळ दोघांनी गप्पा मारल्या इतक्यात मिनू तिथे आली. "काय??? झाल्या गप्पा मारुन की बाकी आहेत अजून..." मिनू मुद्दाम दोघांना चिडवत म्हणाली. मग आकांक्षा लाजून तिला म्हणाली, "हो हो झाल्या गप्पा मारुन चल आता." आणि ती उठली आणि मिनूचा हात धरुन तिला खेचतच तिथून निघून गेली.  जाता जाता तिने हळूच मागे वळून समीरकडे पाहिले. समीर तिच्याकडेच पाहून हसत होता. मग हातानेच त्याने तिला फोन करायचा इशारा केला.
     आता रोजच आकांक्षा आणि समीर एकमेकांना फोन करत, मॅसेज करत आणि कधी जमलच तर फिरायलाही जात. पण तिला भेटल्यानंतर कधीही समीरने त्याची मर्यादा ओलांडली नाही आणि आकांक्षाने त्याला कधी तशी परवानगी दिली नाही.  पण तरीही दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण अचानक एक दिवस आकांक्षाच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला आणि तिला कळलं की काही पाहुणे  तिला बघायला येणार आहेत.  ती खूपच घाबरली होती. तिने लगेच समीरला फोन लावला. "समीर..." "हा सोना बोलतोय, बोल... कशी आहेस? कॉलेजवरुन घरी आल्यावर तुझी खूप आठवण येते गं. असं वाटतंय की कधी आपलं लग्न होतंय आणि तू कायमची माझ्याकडे येतेयस." समीर मोठ्या आनंदात तिला म्हणत होता.
     "समीर, मी त्यासाठीच तुला फोन केला आहे रे. माझ्या आई-बाबांनी माझ्यासाठी एक स्थळ पाहिलंय आणि उद्याच ते मला पहायला येणार आहेत. समीर, मला खूप भिती वाटते रे. काय करु, काहीच सूचत नाहीये मला. प्लीज, काहीतरी कर ना रे." आकांक्षा खूप रडत होती फोनवर." हे ऐकून समीरलाही धक्काच बसला. त्यालाही काय करावं हे कळेना. "आकांक्षा, हे तू काय बोलतेस? हे बघ तू काही काळजी करु नकोस. सगळं ठीक होईल. तू एक काम कर. उद्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. मग आपण बघू काय करायचं ते." समीर तिला धीर देत म्हणाला.
     इतक्यात आकांक्षाने कॉल कट केला. कदाचित तिची आई तिथे आली होती. इकडे समीर मात्र खूप टेन्श्‍ानमध्ये आला होता. त्याच टेन्शनमध्ये तो आपल्या बाईक वरुन पडला आणि हाय वे वरुन जाताना त्याने तिथला ट्रॉफिक सिग्नल तोडला. ट्राफीक पोलिसाने त्यांना आडवलं. "काय रे... जास्त हिरोगिरी करतोस काय रे हा, समोरचा सिग्नल दिसत नाही वाटतं. चल पावतीच फाडतो तुझी. चल फाईल काढ चल." आणि त्याने समीरकडून फाईल घेतल्या आणि त्याला सोडलं. रात्रभर समीर तळमळत राहीला.
     दुसऱ्या दिवशी आकांक्षाला पाहुणे बघायला आले होते. बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने सरळ सरळ आपल्या आई-बाबांना कळविला. ही वेळ तर तिने कशीबशी निभाऊन नेली. पण पुढे काय? किती वेळा आणि किती दिवस असा नकार देत बसणार."
     कॉलेजला गेल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर आकांक्षा समीरला भेटली. "समीर, ही वेळ तर मी कशीबशी मारुन नेली पण नकार देऊन देऊन तरी मी कुणाकुणाला देणार अशाने एक दिवस माझ्या घरच्यांना संशय येईल रे. तू काहीही कर पण...." आकांक्षा काकुळतीला येऊन सांगत होती. समीरही तिला धीर देत होता. शेवटी तो म्हणाला, "आकांक्षा माझ्याकडे अजून चांगली नोकरी पण नाहीये आणि न इथे स्वत:चं घर. मी तुला मागणी तरी कशी घालू गं. तुझ्या घरचे तर मला दारात पण उभे करणार नाहीत." "मग शोध ना चांगली नोकरी. पण जे काही करशील ते लवकर कर नाही तर मग... तुला माहीतच आहे तुला काय होऊ शकते ते." आकांक्षा म्हणाली आणि रडू लागली. थोड्याच दिवसांत आकांक्षाने खूप मोठी स्वप्ने पाहिली होती. पण या स्वप्नांना  इतक्या लवकर ग्रहण लागेल हे तिला माहित नव्हतं. थोडे दिवस निभावून नेण्यासाठी तिने आपल्या आई-वडीलांना सांगितलं की किमान तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी तिच्यासाठी स्थळ शोधू नयेत. इकडे समीरही चांगल्या नोकरीसाठी खटपट करु लागला. आकांक्षा खूप भोळी होती. त्याला चांगली नोकरी मिळावी आणि दोघांचं आनंदानं लग्न पार पडावं म्हणून रोज देवाकडे प्रार्थना करु लागली. कधी नव्हे ते उपास तापास करु लागली. समीरला पाहताच त्याला हरवण्याची भिती तिच्या मनात दाटून यायची. समीरलातिची ही अवस्था बघवत नव्हती. तिला रडताना पाहिलं की त्याच्याही मनात कालवाकालव व्हायची.
     असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस समीरने आकांक्षाला फोन केला आणि घाईघाईने भेटायला बोलावले. आकांक्षा घाबरली की आता काय नवीन संकट आलं म्हणून. मग ती त्याला भेटायला गेली. भेटल्यानंतर समीरचा चेहरा थोडा गंभीर वाटत होता. आता आकांक्षा आणखीनच घाबरली. ती म्हणाली, "काय झालं समीर? इतक्या घाईघाईने मला भेटायला का बोलवलंस? काय झालं, सांग ना लवकर..." समीर थोडा वेळ तसाच गाभीरपणे बघत राहिला आणि म्हणाला, "आकांक्षा... मी आता इथला जॉब सोडून जातोय." आकांक्षा उडालीच, "काय??? पण का?" तिला खूपच भिती वाटू लागली. नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले. "हो... खरंय मी इथून हा जॉब सोडून जातोय कारण मला...... " आणि समीर शांत झाला. "कारण काय समीर?..." सांग ना लवकर. असा गप्प आहेस तू?" आणि आकांक्षा आता रडायच्या स्थितीत आली होती. "कारण आकांक्षा  मला एका मोठ्या कंपनीत चांगला जॉब मिळालाय म्हणून." समीर म्हणाला. "काय मग तू जाणार?" आणि बोलता बोलता आकांक्षा थांबली आणि पुन्हा तो नक्की काय बोलला ते आठवू लागली आणि लगेच तिने समीरकडे पाहिले तर तो तिच्याकडे बघून हसत होता. मग आकांक्षा त्याला म्हणाली, "काय खरंच... तुला जॉब मिळालाय का?..." आणि आकांक्षाने त्याला मिठी मारली. आणि हलकेच त्याला मारत म्हणाली, "समीर... मुद्दाम तू मला घाबरलंस ना रे." मग समीरनेही तिला मिठी मारली आणि मग हळूच तिचा चेहरा आपल्या हातांनी पकडून तिच्या डोळ्यांत पहात म्हणाला, "सॉरी... पण काय करु... ही बातमी ऐकवल्यानंतरचा तुझ्या चेहरऱ्यावरचा आनंद मला माझ्या डोळ्यांनी पहायचा होता. आकांक्षाला आता कुठे छोटासा आशेचा किरण दिसू लागला होता. आज कितीतरी दिवसांनी आकांक्षाच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता होती. आज ती खूप खूश होती. देवाने तिचं गार्हाणं ऐकलं होतं. आता तिला विश्वासच झाला होता की तिचं प्रेम यशस्वी व्हावं असं देवाच्याही मनात आहे. मग समीरने तिथली नोकरी सोडली आणि तो त्या नवीन कंपनीत काम करु लागला.
     इकडे आकांक्षाचीही परीक्षा जवळ आली असल्यामुळे तिनेही अभ्यासाला सुरवात केली होती पण आता प्रेमात पडल्यामुळे मध्ये मध्ये तिला समीरची खूप आठवण यायची. नवीन कंपनी मोठी असल्याने समीरला तिच्याशी जास्त बोलता येत नव्हतं. रोजचं बोलणं आता कधीतरीचं बोलणं झालं आणि आकांक्षा आता समीरवर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम करु लागली होती. कित्येक स्वप्न ती रंगवू लागली होती. आता समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायला ती तयार होती. पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. समीरचे तिला येणारे कॉल आता खूप कमी झाले होते. आकांक्षाने कधी मॅसेज पाठवले तर कधीतरी तो रिप्लाय देऊ लागला. सुरवातीला आकांक्षानेही हे सगळं समजून घेतलं. नवीन कंपनीत कामाला लागल्यामुळे कदाचित त्याला जमत नसेल असं समजून दुर्लक्ष केलं. आता तिची परीक्षाही संपली होती आणि मग लगेच पुन्हा तिच्या घरच्यांनी स्थळ बघायला सुरवात केली. आता आकांक्षा पुन्हा अस्वस्थ झाली होती. मग तिने समीरला हे सगळं फोन करुन सांगितलं. तर त्याने एकदम थंडपणे रिॲक्शन दिलं. तो म्हणाला, "तू काळजी करु नकोस गं. मी करीन काहीतरी. पण इतक्यात बोलणी करणं मला जमणार नाही. त्यासाठी मला माझ्या घरच्यांशीही बोलावं लागेल की नाही, काय माहीत ते तयार होतील की नाहीत ते." समीर हे सगळं सहजपणे म्हणत होता. त्याचा थंडपणा बघून आकांक्षाल खूप आश्चर्य वाटलं. "म्हणजे, तुझं म्हणणं आहे की तुझ्या घरच्यांचाच आपल्या लग्नाबद्दल प्रॉब्लेम असेल? अरे पण तू तर म्हणाला होतास न की त्यांचं काही ऑब्जेक्शन नसेल मग. प्लीज समीर, लवकर कर काहीतरी . माझा जीव इथे टांगणीला लागलाय." आकांक्षा काळकुळतीला येऊन म्हणाली. "हो... मला कळतंय पण... ओके... चल मी फोन ठेवतो. मला थोडं काम आलंय." आणि त्याने फोन ठेवूनसुध्दा दिला. आकांक्षाला त्याच्या या वागण्याचं खूप वाईट वाटलं. पण ती एक समजूतदार मुलगी होती. त्यामुळे तिला या लहान-लहान गोष्टींची मोठी गोष्ट करायची नव्हती. कुठल्याही परिस्थितीत तिला तिचं नातं जपायचं होतं आणि तिचं प्रेम मिळवायचं होतं.
     नवीन कंपनीत कामाला लागल्यापासून समीर खूप बदलला होता. नेहमी आकांक्षाच्या नावाची माळ जपणारा समीर आता मात्र तिच्याशी बोलताना मात्र तिच ऐकून घेणं कमी आणि त्याच्यावर किती मुलींचा क्रश आहे. त्याच्यावर किती मुली फिदा आहेत हेच सांगत बसायचा. पण आकांक्षा मात्र गुपचूप सर्व ऐकून घ्यायची. नेहमी याकडे दुर्लक्ष करायची. कॉलेजमध्ये असताना तिच्यावर इतकं प्रेम करणारा समीर तो उरलाच नव्हता. लग्नाचा विषय काढला की नेहमी उडवा-उडवीची उत्तर द्यायचा. फक्त त्याला कधी भेटावंस वाटलं तरच तो वेळ काढायचा ते पण फक्त 15-20 मिनिटे. भेटल्यानंतरही त्याचं तेच पुराण सुरु असायचं. मग जाताना तो तिला तिथूनच बाय करुन जायचा. तिला साध स्टेशनपर्यंतही तो सोडायचा नाही. आता मात्र मनातल्या मनात आकांक्षाला खूप त्रास व्हायचा या सर्व गोष्टींचा. कधी-कधी रात्रीचीच उठून रडत बसायची पण तिला कुठेतरी या सर्व गोष्टींची आशा होती की समीरचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे.
     आकांक्षाने या सर्व गोष्टी मिनूला सांगितल्या. मिनूलाही तिचं हे असं वागणं बघवत नव्हतं. तिलाही खूप वाईट वाटायचं म्हणून तिने 2-3 वेळा तिला हे नातं इथेच थांबव म्हणूनही सांगितलं. पण आकांक्षाला हे मान्य नव्हतं. एक दिवस समीर लग्नाबद्दल बोलायचं म्हणून गावी गेला. तो खरंच गावी गेला होता की मुद्दाम खोटं बोलत होता हे त्यालाच माहित. तिकडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याला कंपनीतर्फे बाहेरगावी जायची ऑफर आली होती. त्याने आकांक्षाला फोन केला. आकांक्षा त्याच्याच फोनची वेड्यासारखी वाट पहात होती. "हॅलो, आकांक्षा.. मी बोलतोय... समीर. कशी आहेस?" त्याने विचारले. "ठीक आहे. तुझ्याशिवाय नाही रे करमत मला. तुला नाही का रे आठवण येत माझी." आकांक्षा थोडी रडवेली झाली होती. "समीर, तू गांवी गेला होतास ना आई-बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलायला... काय झालं, काय बोलले आई बाबा !!!" ती म्हणाली. "आकांक्षा, मी बोललो आई-बाबांबरोबर त्यांना तुझ्याबद्दल सांगितलंही, पण......" आणि मधेच थांबला. "पण काय समीर, बोल ना..." ती काकुळतीने म्हणाली. "आकांक्षा, त्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला आणि मला घराबाहेर काढण्याची धमकीही दिली." समीर म्हणाला. "काय हे समीर, काय म्हणतोयस तू, अरे तूच तर म्हणाला होतास ना की तुझे आई-बाबा लग्नाला नकार देणार नाहीत. मग असं का केलं त्यांनी?" आकांक्षा फोनवर रडत होती. इतक्या दिवसांत समीरसाठी रडून रडून आकांक्षाने स्वत:ची खूप खराब अवस्था करुन घेतली होती. कॉलेजमधली ती खळखळून हसणारी खोडकर आकांक्षा आता उरलीच नव्हती. आता उरली ती फक्त एक शांत, चेहऱ्यावर कसलाही तेज नसलेली आकांक्षा. मग समीर पुढे म्हणाला की, त्याला त्याच्या कंपनीतून बाहेरगावी जाण्याची ऑफर आलीय आणि त्याला तिकडे सक्तीने जावं लागणार होतं आणि त्याचे घरचेही आकांक्षाबाबत माहित पडल्यापासून तिकडे जाण्यासाठी मागे लागले होते. आता आकांक्षा एकदम हतबल झाली होती. तरीही ती थोडा धरी करुन म्हणाली की, "मग समीर, तुझं म्हणणं काय आहे?" "आकांक्षा, कसं सांगू गं आता तुला. मलासुध्दा पुढे बोलवत नाहीये आणि काय करावं तेच सूचत नाही. याच टेन्शनमध्ये काल रात्रभर मी घराबाहेर फिरत होतो. तूच सांग की मी काय करु? आणि कंपनीची ही ऑफर मी नाकारु शकत नाही. कारण हे खूप महत्वाचे आहे. नाहीतर माझी नोकरी जाऊ शकते यामुळे." मग काही क्षण कोणीच काही बोलत नाही. मग आकांक्षाने मन घट्ट केलं आणि त्याला म्हणाली, "ठीक आहे मग समीर. मला वाटतं आपण आपलं नातं आता इथेच थांबवलेलं बर, उगाच माझ्यामुळे तुझ्या नोकरीवर संकट नको आणि तुझ्यात आणि तुझ्या आई-वडीलांमध्ये गैरसमजही नकोत आणि तसाही तू न सांगताच मला तुझं उत्तर कळलंय." "हे काय म्हणतेस तू आकांक्षा. तू प्लीज, मला चुकीचं समजू नकोस. अक्षु  माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. पण मी नाही काही करु शकत गं. प्लीज, मला माफ कर. एखादा चांगला मुलगा बघून त्याच्याशी लग्न करुन तू सुखी हो अक्षु. तो तुला माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करील आणि आयुष्भर तुझी साथ देईल." समीर म्हणाला. का कुणास ठाऊक पण आकांक्षाला आता त्याच्यावर विश्वास उरला नव्हता. म्हणून ती त्याला म्हणाली, "समीर तू किती साथ देतोयसं. मला जो उद्या तो जो कोणी असेल तो देईल माझी साथ. खैर तुझ्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. पुढे माझं मी पाहून घेईन काय करायचं ते आणि म्हणूनच आजचं हे आपलं शेवटचं बोलणं असेल. इथून पुढे आपण कसलाही संपर्क ठेवायचा नाही. बरं... काळजी घे स्वत:ची, आणि .... जमलं तर विसरुन जा मला." आणि तिने फोन कट केला. कारण कुठेतरी आकांक्षाला पटलं होतं की हे नातं टिकावं अस फक्त तिलाच वाटत होतं. पण समीरला नाही. समीर आता खूप बदलला होता. त्या दिवशी आकांक्षा दिवसभर आणि रात्रभर खूप रडली. तिला थोडा तापही भरला होता. समीरलाही खूप वाईट वाटलं पण... मग तो काही दिवसांनी बाहेरगावी निघून गेला. जाताना त्याने आकांक्षाला फोन केला पण तिने तो उचलला नाही. असेच काही महिने निघून गेले आकांक्षाला. सगळं एकदम विसरुन जाणं कठीण होतं. म्हणून मग तिने नोकरी करायला सुरवात केली. तरीही कधी कधी तिला समीरची खूप आठवण येत असे पण तिने स्वत:वर खूप नियंत्रण ठेऊन स्वत:चं लक्ष दुसरीकडे गुंतवायची.
     अशातच एक दिवस फेसबुकवर तिची स्वप्नीलशी ओळख झाली आणि तिच्या आयुष्याला एक नवीन वळणं मिळालं. स्वप्नीलचा स्वभाव खूप बोलका होता. अगदी जसा आकांक्षाचा स्वभाव कॉलेजमध्ये होता तसा. तो पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला होता. त्याच्याशी बोलताना आकांक्षाला कुठेतरी जे काही हरवलं होतं ते परत मिळाल्याची जाणीव होत होती. त्याच्याशी बोलताना तिच्या मनात समीरची जराही आठवण येत नसे. हळू हळू आकांक्षा पुन्हा पहिल्यासारखी हसू लागली होती. बऱ्यापैकी ती तिच्या दु:खातून सावरली होती. पण स्वप्नील आकांक्षासाठी फक्त एक चांगला मित्र होता. पण स्वप्नीलला मात्र आकांक्षाचा स्वभाव खूप आवडायचा म्हणून तीही त्याला आवडू लागली होती. एकदा बोलता-बोलता त्याने तिला प्रपोजही केलं. आधी हे आकांक्षाला अजिबात आवडलं नाही म्हणून ती त्याच्यावर रागवली. पण नंतर त्याने तिची माफी मागितल्यानंतर ती पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. पण स्वप्नील मात्र मनातल्या मनात तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण ती रागवेल म्हणून त्याने पुन्हा असं बोलणं टाळलं. तिला वाईट वाटेल अशी प्रत्येक गोष्ट करायची तो टाळायचा. तिचा अजून होकारही मिळाला नव्हता की याने तिच्याबद्दल आपल्या घरी सांगितलं होतं. त्याच्या घरच्यांनाही आकांक्षा खूप आवडली होती. पुण्यातच एक सुंदर घरही घेतलं होतं. कारण त्याला विश्वास होता की कधीकधी आकांक्षाही त्याच्यावर प्रेम करेल आणि लग्नासाठी त्याला होकार देईल.
     एक दिवस त्याने आकांक्षाला सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि म्हणून तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक मुंबईत येऊन तिला भेटायला बोलावलं पण एकदम असं अचानक बोलावल्याने ती थोडी गोंधळली. तिला असं अचानक कामातून निघणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने तिथेच स्टेशनवर तिची दिवसभर वाट बघितली.  मग संध्याकाळी ऑफिसमध्ये सांगून ती लवकर निघाली आणि स्टेशनवर त्याला भेटली तर समोर स्वप्नील एका बाकावर बसला होता तिची वाट बघत. मग आकांक्षा त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. समोर आकांक्षाला पाहून स्वप्नीलला खूप आनंद झाला होता. आकांक्षा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, "स्वप्नील तू अचानक इकडे कसा रे?" "अगं, तू माझी बेस्ट फ्रेंड ना. मग तुझा वाढदिवस मी तिकडे बसून सेलिब्रेड करु का? म्हणून तुला सरप्राईज द्यायला आलो होतो. कसं वाटलं माझं सरप्राईज !!!!" स्वप्नील हसून म्हणाला. ज्या गोष्टी आकांक्षाने समीरकडून अपेक्षित केल्या होत्या त्या गोष्टी स्वप्नील करायचा. प्रत्येक लहान लहान गोष्ट... ती खूश कशी राहील याचाच प्रयत्न तो करायचा. मग दोघे एका कॉफीशॉपमध्ये गेले आणि तिकडे दोघांनी वाढदिवस साजरा केला. "खरंच आकांक्षा, आता असं वाटतंय की सकाळपासून मी जी तुझी वाट पाहिली ना ती सार्थ झाली." स्वप्नील म्हणाला. "म्हणजे?" आकांक्षाने विचारले. "म्हणजे असं की किती मस्त वाढदिवस सेलिब्रेट केला ना आपण तुझा. आणखी एक सांगू आकांक्षा तुला... जसं मी तुझी कल्पनाशक्ती केली होती ना,  तू त्यापेक्षाही आज खूप सुंदर दिसतेस." स्वप्नील तिच्याकडे पहात म्हणाला. आकांक्षा थोडी लाजली. मग स्वप्नील म्हणाला, "आकांक्षा मला तुला एक गोष्ट विचारायची आहे." "काय विचारायचं आहे रे स्वप्नील... विचार ना." आकांक्षा सहज म्हणाली. "आकांक्षा आज खरंच तुला मनापासून सांगतोय मी, मला तू खूप आवडतेस. मला माहित आहे आधीही तू या गोष्टीपासून रागवली होतीस माझ्यावर पण विश्वास ठेव माझ्यावर. मी इतर मुलांसारखा नाहीये गं. हे बघ... मला माहित नाही की तुला प्रेमापासून इतकी ॲलर्जी का आहे. पण एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन तर बघ. तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही मी.  आणि मी हे फक्त तुला इंप्रेस करण्यासाठी बोलत नाहीये. मी आधीच माझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल सांगितलंय आणि त्यांनाही तू खूप आवडली आहेस. अक्षु, मला आता तुझं उत्तर हवंय." स्वप्नील बोलत होता आणि आकांक्षा शांतपणे सर्व ऐकत होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "खरंतर माझा विश्वासच उरला नाही प्रेमावर. भीती वाटते की आपण एखाद्यावर इतकं जीवापाड प्रेम करायचं आणि एक दिवस खूप सारी स्वप्नं दाखवून तोच एखाद्या अनोळख्यासारखा अर्ध्या रस्त्यावर आपला हाथ सोडून गेला तर?"  "एक विचारु अक्षु? तुझ्या आयुष्यात आधी असं काही घडून गेलंय का?" स्वप्नीलने विचारले. आकांक्षाला पुन्हा दु:ख उकरुन काढायचं नव्हतं. ती म्हणाली, "नाही. माझ्या आयुष्यात असं काही घडलं नाही पण कित्येक उदाहरण डोळ्यांसमोर पाहिली आहेत म्हणून भिती वाटते मला." "नाही आकांक्षा. मी असं कधीच करणार नाही. असं करायचं असतं तर तुझा होकार मिळविण्याआधीच मी तुझ्याबद्दल माझ्या घरच्यांशी बोललो नसतो. आणखी एक, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव अक्षु. आज जितक प्रेम करतोय ना तुझ्यावर, तितकंच कायम करत राहीन. कधीही तुला वाईट वाटेल असं कधीच करणार नाही मी आणि हे फक्त मी नुसतं बोलत नाहीये. मी हे खरंही करुन दाखवीन." स्वप्नील तिला विश्वासाने म्हणाला आणि तिचे डोळे पुसले. का कोण जाणे, पण आकांक्षाला त्याच्या डोळ्यांत एक सच्चेपणा दिसला. स्वत:बद्दल अमर्याद प्रेम दिसलं. पण तिला सहजासहजी हे सगळं स्वीकारणं सोपं नव्हतं. म्हणून तिने त्याच्याजवळ थोडा वेळ मागितला आणि म्हणाली, "इतक्यात लग्नाची घाई नको करायला. आधी एकमेकांना भेटून एकमेकांचे स्वभाव समजून घेतले पाहिजेत. खरंच आपण अख्ख आयुष्य एकत्र घालवण्याइतपत खरंच इतकं घट्ट नातं, इतक घट्ट होईल का हे पाहिल्याशिवाय मी हो म्हणू शकत नाही आणि त्यानंतर तुला माझ्या घरच्यांशी भेटावं लागेल मगच मी हो म्हणेन कारण माझ्या घरच्यांच्या परवानगीशिवाय लग्न करायचं नाही असं ठरवलंय." आकांक्षा म्हणाली. "ठीक आहे आकांक्षा. मला तुझे विचार खूप आवडले. कोणताही निर्णय घेण्याआधी तू किती खोलवर त्याचा विचार करतेस न आणि हाच तुझा स्वभाव मला खूप आवडतो कारण तू तुझ्या मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलतेस. ठीक आहे मग. मी माझ्या घरच्यांना तुझ्या घरी येवून, तुला मागणी घालेन मग तर तयार होशील की नाही? हा तसाही माझ्यात नकार देण्यासारखं काही कारण नाहीये. मी हँडसम आहे. चांगली नोकरी आहे आणि तुझ्यासाठी छानंसं घरही घेऊन ठेवलंय पुण्यात." स्वप्नीलने हसत तिला विचारले. "काय? अरे पण तुला काय माहित मी तुला हो बोलेन की नाही ते?" तिने प्रश्न केला. "अगं माझं खरं प्रेमच मला सांगत होतं की आज ना उद्या तू मला हो म्हणशील म्हणून. पण त्याआधी मी असाच तुला अधूनमधून भेटायला येत जाईन, चालेल ना." स्वप्नील हसत म्हणाला. आकांक्षाने मान हलवून त्याला हो म्हटलं. मग आकांक्षा स्वप्नील बरोबर त्याची पुण्याची ट्रेन येईपर्यंत बोलत उभी राहिली. मग स्वप्नीलनेच तिला उशीर होईल म्हणून परत घरी जायला सांगितले. पुण्याला गेल्यानंतर स्वप्नीलने घडलेली सगळी घटना आपल्या आई-बाबांना सांगितली. त्याच्या आई-बाबांना फार आनंद झाला. त्यानंतर स्वप्नील अधूनमधून तिला मुंबईत भेटायला येत राहिला. दोघांनी एकमेकांना समजून घेतले. त्याला भेटल्यानंतर आकांक्षाला जाणीव झाली की ह्यावेळी स्वप्नीलची निवड योग्य आहे. कारण हा तिचा नक्कीच चुकीचा निर्णय नाहीये. त्यानंतर आकांक्षाने त्याला आपला होकार कळविला मग काही  दिवसानंतर स्वप्नीलने सहपरिवार आकांक्षाच्या घरी जाऊन तिला मागणी घातली.  तिच्या घरच्यांना स्वप्नीलचं स्थळ आवडलं. मग एका छानशा मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात दोघांच लग्न पार पडलं.
     या लग्नामुळे आकांक्षा खूप खूश होती. कारण ज्या ज्या अपेक्षा तिने समीरकडून केल्या होत्या त्या सर्व गोष्टी स्वप्नील तिच्या नकळत करत असे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या व्यस्त असलेल्या वेळापत्रकामधून वेळात वेळ काढून तो तिला भेटायला येत असे आणि ते ही कोणतही कारण न देता आणि हे फक्त त्याने त्यावेळीच केलं नाही. तर लग्नानंतरही त्याचं तितकंच प्रेम आकांक्षावर होतं आणि आताही तो कसं का होईना पण थोडातरी वेळ तिच्यासाठी काढतच असे आणि म्हणूनच आकांक्षाही हळूहळू त्याच्यावर प्रेम करु लागली होती. आता फक्त तिच्या या सुखी संसारावर तिच्या भूतकाळाची सावली पडू नये आणि स्वप्नील तिच्यापासून दूर जावू नये  म्हणून तिने त्याला आपल्या भूतकाळाबद्दल सांगणं टाळलं. कारण तिच्या नजरेत आता समीरबद्दल तिळमात्रेही प्रेम उरलं नव्हतं. म्हणून तिने त्या कडू आठवणी आपल्या आयुष्यातून कायमच्या काढून टाकायच्या ठरवल्या." हाच विचार करत असताना अचानक आकांक्षाला मागून कुणीतरी मिठी मारली.  तशी स्वप्नातून भानावर येत आकांक्षाने उठून मागे वळून पाहिलं तर समोर स्वप्नील उभा होता. त्याला पाहून आकांक्षाला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाला होता. "स्वप्नील, तू इथे अचानक कसा?" आश्चर्याने तिने स्वप्नीलला विचारले. "बायको !!!  तुझ्यावरचं प्रेमच मला इथेपर्यंत खेचून घेऊन आलं म्हणून आलो." स्वप्नील तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. "गप्प बस... मस्करी करु नकोस रे. सांग ना, तू इथे कसा? तुझी महत्वाची मिटींग होती न मग?" पुन्हा तिने विचारलं. "अगं होती पण मधेच ती कँसल झाली मग म्हटलं चला इकडेच येऊन तुला सरप्राईज देऊयात. खरं तर मी तुलाच फोन करुन सांगणार होतो म्हणून तुझा नंबर लावत होतो तर तुझा नंबरच लागत नव्हता. म्हणून मी प्रियाला फोन केला तर ती म्हणाली की तू खूप दु:खी आहेस म्हणून. तू अचाकच इकडे येऊन तिला सरप्राईज दे. म्हणून आलो..." "मला सकाळीच जिजूंचा कॉल आला होता. मी तुला सकाळीच सांगणार होते. पण मॅडम तुम्ही तर उदास होता ना. म्हणून म्हटलं जीजूंनाच इथे बोलवून घेऊयात." प्रिया हसत म्हणाली. आकांक्षा तिच्याकडे पाहून हसली मग प्रिया म्हणाली, "बघितलं का स्वप्नील जीजू, हिचे गाल कसे लाजून लाल झालेत ते. चल मी तर जाते बाबा इथून. उगाच कबाब मध्ये हड्डी कशाला." आणि आकांक्षाला डोळा मारुन प्रिया तिथून निघून गेली. दोघेही तिच्याकडे पाहून हसत होते. मग स्वप्नील म्हणाला, "ये यडू !!!  काय झालं उदास व्हायला. पण आता उदास व्हायचं नाही, स्वप्नील इथे असताना त्याच्या बायकोने असं उदास होणे म्हणजे माझ्यासाठी किती लाजीरवाणं आहे हे." "नाही रे स्वप्नील. तूच तर पुन्हा हसायला शिकवलयस मला. मग आता का उदास होईन मी." आकांक्षा त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली. "म्हणजे???" स्वप्नीलने तिला विचारले. आकांक्षा त्याच्याकडे पहातच उभी राहिली. मग तिने स्वप्नीलला मिठी मारली आणि म्हणाली, "म्हणजे !!! मी खूप नशीबवान आहे जो मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला." "आह !!! नशीबवान तू नाहीस, मी आहे जी मला इतकी गोड बायको मिळाली. माझं तुझ्यावर प्रेम आहे अक्षु." आणि मग आकांक्षाने हळूच स्वप्नीलच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि दोघे त्या समुद्राकडे काहीवेळ पाहत उभे राहिले. आज खऱ्या अर्थाने आकांक्षाला तिला हवं असलेलं खरं प्रेम आणि प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. खूप सुंदर क्षण होता तो. समोर सूर्यास्ताच्या वेळी ढळणारा लालसर सूर्य आणि दोन प्रेमी आपल्या गोड स्वप्नात रंगून गेले होते.

लेखिका : ईश्वरी
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...