मी रेल्वेस्टेशन जवळच्या माझ्या मित्राच्या दुकानाजवळ उभा
होतो त्या दुकानात एक
मुलगी फाईल विकत घ्यायला आली
होती.
माझा मित्र थोडा वेळ
काही कामानिमित्त बाहेर गेला होता.
म्हणून तिला मी
वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स दाखवल्या.
त्यातली एक
फाईल तिने निवडली.
ती
फाईल घेत
आभारी आहे
म्हणाली.
मी
म्हणालो,
“अंग, आभार कशाला मानतेस. माझे कर्तव्य होते. ते मी पूर्ण केले.”
तेवढ्यात माझा मित्र आला.
ती
पुढे जाऊन एका
बाकावर बसली.
मी
ही
तिच्या शेजारी जाऊन बसलो.
बोलू की
नको
मनाला विचारु लागलो.
शेवटी निश्चय करुन तिला विचारले,
“तुझे नांव काय?”
ती
खाली बघत
म्हणाली,
“प्रिया.”
माझे मन
हसले आणि
म्हणाले,
“वा ! छान नांव आहे.”
तिला सोबत कोणी नव्हते म्हणून बोलत असेल कदाचित.
मला
सोबत कोणीच नव्हते म्हणून देवाने पाठविले असेल कदाचित. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळालंच नाही. तीची पुढची ट्रेन आली समजलंच नाही. बोलता-बोलता मी पत्ता दिला. परत भेटू म्हणाली. स्वप्ना-स्वप्नातल्या गोष्टी मी सत्यात उतरल्या. मी तिला बाय म्हणालो. तिनेही मागे वळून हसत बाय केले. आणि मीही घरी परतीच्या वाटेवर निघालो आणि मनातून आनंदाने नाहलो. पुन्हा स्वप्नांची नदी वाहू लागली. पुन्हा तिच्या आठवणींची सफर सुरु झाली. थोड्या दिवसांतच मी तिला पत्र लिहावे म्हटले. माझ्या मनातले सगळे सांगायचे ठरवले. कागद पेन घेताच मन ट्रेनमधल्या आठवणीत हरवले. पुन्हा माझ्या शब्दांना सावरले. पुन्हा तिचे पत्र आले. सर्व काही खुशाल तिने कळविले.
पुन्हा मी
म्हटले,
भेटूया का
कधी? पुन्हा मात्र उत्तराचे पत्र ना मिळाले. पुन्हा मन म्हण्टले भेटेल का ती कधी? थोड्या दिवसाने तिचे पत्र आले.
पत्र वाचून डोळ्यात पाणी भरले.
तिने तिच्या जीवनाची शोकांतिका लिहली होती.
अशी
कथा
जी
स्वप्नातही कधी
पाहिली नव्हती.
तिने लिहले होते तिच्या आयुष्यातील सत्य.
तिचे लग्न झालेय दोन
वर्षापूर्वी.
काळजाचा ठोका चुकला लग्न शब्द वाचण्यापूर्वी.
पुढे लिहले होते……
तिचा नवरा आणि
सासू सासरे अपघातात गेले आणि
त्याच क्षणी तिचे भविष्य मरण
पावले.
आपण
भेटण्यापूर्वी माझा भूतकाळ तुला माहित असावा असे
वाटले.
माझी कथा
ऐकून तू
भेटण्याचा विचार बदलशील.
माझी कथा
ऐकून तू
तुझी स्वप्ने तोडशील.
म्हणून उशीर झाला पत्राला.
म्हणून वेळ
लागला मनाला समजायला आणि
पत्र वाचून मी
सुन्न झालो.
एकाएकी मी खूप रडू लागलो. पण मनात एक विचार विजेसारखा चमकला. अन मनाला एक नवा मार्ग सापडला. ती मुलगी असून एवढे सहन करत आहे आणि आपण मुलगा असून सगळी आशा हरवून बसलो होतो. मनाशी ठरवले, आता रडायचे नाही. जर आपल्याला तिला आणि आपल्या माणसांना सुखी ठेवायचे असेल तर मोठे झाले पाहिजे, नाव मिळवले पाहिजे. तिच्या प्रत्येक सुखासाठी झटले पाहिजे. असे म्हणून जोमाला कामाला लागलो. असे म्हणून मी आज एक जबाबदार मुलगा झालो. तिचीच कमाल होती ती. दिशा दिली तिने. एखाद्या परीने जादूची कांडी फिरवावी आणि आयुष्य बदलून जावे अगदी तसेच झाले आणि आयुष्यात माझ्या सुखाचे पूर लोटले. तिला भेटण्याचा निर्णय मी घेतला. माझा निरोप मी तिला धाडला. येईल ती एक आशा होती. तिच्याही मनात मी काय बोलेल याची भिती होती आणि तो दिवस आला. आज आमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. आयुष्याच्या वळणावर येऊन आम्ही थांबलो. एकमेकांना एकटक बघत उभे राहिलो. तिने घट्ट येऊन मिठी मारली आणि ती ट्रेनमधली परी माझी झाली…कामयची…फक्त माझी… फक्त माझी…

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा