मयंक तुझ्यावर आरोप आहे
की
राधाचा तू
स्वत:च्या हातांनी खून केलास, काय तू तुझी बाजू स्पष्टपणे
मांडू शकतोस.
हो
जजसाहेब,
नक्कीच मांडतो.
पण
त्यासाठी मला
सुरवातीपासून सर्व हकीकत सांगायला हवी.
(न्यायाधीश
: परवानगी आहे.)
धन्यवाद जजसाहेब.
राधा माझ्या कंपनीत जॉब करायची बेंगलोरला. ती मुळची पुण्याची आणि मी बेंगलोरचा आणि तिथेच आमचं प्रेम जमलं होतं. तिचे आईवडील एका अपघातात गेले याचा तिला जबर धक्का बसला. तिची मनस्थिती प्रचंड बिघडली आणि त्यातच तिला पॅरालिसीसचा अटॅक आला आणि तिचे हातपाय लुळे पडले. तिची काळजी घेण्यासाठी मी कंपनी डायरेक्टर बॉडीकडे सोपवली आणि तिला माझ्या घरी घेऊन आलो. माझ्या निर्णयाचं तिला प्रचंड नवल वाटलं. पण तिला सर्व सुखसोयी, आनंद देण्याचा निर्धार मी केला. वैयक्तिकरित्या मी तिची देखभाल करु लागलो. कशाही प्रकारची कमतरता तिला मी भासू देत नव्हतो. चोवीस तास मी तिच्यासोबत असायचो. तिची प्रत्येक लहान सहान कामे मीच करु लागलो. मी एका कंपनीचा मालक नव्हे तर आता एक असह्य प्रेयसीचा एक असा प्रियकर होतो जो तिला एक सुंदर आयुष्य देऊ शकेन. तिला कधी तिच्या असह्यतेची जाणीव होऊ द्यायचो नाही मी. पण जेंव्हा जेंव्हा मी तिचे केस विचरायचो तिचा मेकअप मीच करायचो तेंव्हा तेंव्हा तिला तिच्या असह्यतेची जाणीव व्हायची. तिला भरवण्यासाठी मी हात पुढे करायचो तेंव्हा. रोज तिला बेडवरुन उचलून व्हीलचेअरवर ठेवायचो तेंव्हा आणि चेहऱ्यावर पडत असलेल्या पावसाची संत धार पुसण्याची जेंव्हा तिला माझी गरज पडायची तेंव्हा तिला स्वत:च्याच अवस्थेवर किव यायची. तिच्या डोळ्यांत पाणी यायचं. तिच्या चेहऱ्यावर घोंगावणाऱ्या माशी समोरसुध्दा जेंव्हा तिला संघर्ष करावा लागायचा तेंव्हा तिच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ते अश्रू पाहिलं की मी हेलावून जायचो. तिला नकळत मी देखील रडायचो. एक दिवस राधा मला म्हणाली, “माझ्यावर किती प्रेम करतोस?” मी म्हणालो, “प्रचंड.” “मग ऐक. मी काय सांगते ते. अशा अवस्थेत माझा जीव गुदमरतोय रे. क्षणोक्षणीच माझं परावलंबित्व, माझं खच्चीकरण करतंय. माझी छोट्यातल्या छोट्या गोष्टी करण्याप्रती असमर्थता मला जगू देत नाहीये. रात्रीचा चेहऱ्याला झोंबणारा थंडगार वारा जेंव्हा मला नकोसा असतो तेंव्हा चेहरा झाकण्यासाठीसुध्दा मला तुला आवाज द्यावा लागतो. माझी अवस्था पाण्यातून काढलेल्या माशासारखी झालेली आहे जी धड जगतही नाही आणि मरतही नाही. मी तुला अंत:करणापासून विनंती करते, मला मरण हवंय… मला मरण हवंय… मला मरण हवंय…” असं म्हणून ती रडू लागली, तेंव्हा माझी हिंमत ढळली आणि माझा कंठ दाटून आला. प्रेमाने तिचा हात मी हातात घेतला पण त्या स्पर्शातलं प्रेम समजण्याइतके प्राण तिच्या हातातच नव्हते. मी तिची इच्छा मान्य केली आणि इच्छामरणासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. खटला चालू होता. बातमी मिडीयापर्यंत पोहोचली. सर्वजण तिच्या या इच्छेला एक मूर्ख मागणी म्हणून आपापल्या चॅनेल्सवर दाखवू लागले. हा मुद्दा तेंव्हाच थांबला जेंव्हा राधाने मिडीयाला एकच प्रश्न विचारला, “तुमच्यापैकी कोणीही माझं आयुष्य फक्त अर्धा तास जगून दाखवा. मी माझी मागणी तात्काळ मागे घेईन.” कोणीही तिच्या व्यक्तव्यावर पुढे सरसावले नाही आणि या बातम्या यायच्या थांबल्या. पण खटला पुढे चालू राहिला आणि एक दिवस न्यायालयाचा निकाल आला की इच्छामरणासारख्या कोणत्याही प्रकारच्या कायद्याची आपल्या संविधानात तरतूद नसल्या कारणाने ही मागणी हे न्यायालय फेटाळून लावत आहे. आभाळ कोसळलं. होत्या नव्हत्या त्या आशा हवेत विरुन गेल्या. राधा आणि मी या निकालाने पूर्णत: हादरुन गेलो. यानंतर राधा माझ्याकडे पुन्हा पुन्हा मृत्यूची मागणी करु लागली. मग एक दिवस मीच तिला तिच्या इच्छेनुसार इंजेक्शनाचा ओव्हरडोस देऊन दाठल्या मनाने मृत्यूदान दिलं. त्या इंजेक्शनाचा ओव्हरडोस घेतल्यावर माणसाला झोप येते पण त्यातून तो कधीच उठत नाही. काय चुकलं माझं. हेच की मी प्रियसीच्या सुखाचा विचार केला. जजसाहेब मी खरच मारलं तिला पण तिच्या आनंदासाठी. मी तुम्हाला हे सगळं याच्यासाठी नाही सांगत आहे की तुम्ही मला सोडावं. मला तुम्ही फाशी द्यावी ही एकच विनंती आहे तुम्हाला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर एक ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. मयंकला फक्त आणि फक्त सहा महिन्यांची कोठडी देऊन सोडण्यात आलं.
पण दुसऱ्याच दिवशी बातमी हाती आली की जिथे राधाचा मृत्यू झाला होता तिथेच मयंकही मृत अवस्थेत मिळाला. त्याने आत्महत्या केली होती. शेवटी त्याने न्याय केला होता आपल्या प्रेयसीच्या सुखाशीदेखील आणि स्वत:च्या प्रेमाशी देखील…
आपण जगायचं कसं हा ठरवण्याचा
अधिकारा पूर्णत:
तुम्हाला असतो पण
आपण
मरायचं कसं
हा
ठरवण्याचा अधिकार तुम्हाला का
असू
नये?
इच्छा मरणाचा कायदा पास
व्हायला हवा
या
मताचा मी
आहे.
तुमचं मत
काय
आहे
ते
सांगा.
– एक
प्रियकर.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा