शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

158. संस्कार काय असतात? हे फक्त सांगू नका

        ग्रुपमध्ये पोरांच्या वायफळ गप्पा चालू असताना त्याच ग्रुपमधील एकाचे वडील समोरुन त्याच ग्रुपमधील एकाचे वडील समोरुन येताना दिसतात. ज्याचे वडील आहेत तेच पोरगं म्हणतं, आमचं म्हातारं आलं बघ ! यावर सगळेजण हसतात. तो पण हसतो कारण त्यानं मोठा विनोद मारलेला असतो. वडील नजरेआड होतात. पुन्हा यांच्या गप्पा सुरु होतात. तोच तिथून एका भ्रष्ट चारित्रयहीन नेत्याची गाडी निघालेली असते. मगाशी ज्या मुलानं जन्मदात्याला म्हातारा म्हणून संबोधलं होतं तेच पोरगं त्या चारित्रयहीन नेत्याला आपले साहेब निघाले बघ. अशा गोंडस शब्दात संबोधतं तेंव्हा त्या हरामखोराला सगळे ग्रुपवाले उत्स्फूर्त प्रतिसाद देतात.
     शिवशंभूच्या या महाराष्ट्रात जन्मदात्या वडीलांना म्हातारं आणि लायकी नसलेल्याला साहेब म्हणणारे आवलादी जन्मतात याचंच दु: आहे. घडलेली आणि मी अनुभवलेली सत्य परिस्थिती आहे ही‍. वडीलांनी लहानपणीच हातात शिवचरित्र-शंभूचरित्र दिलं असतं तर आज ही वेळ त्यांच्यावर आणि या मातीवर आली नसती. आरे, एकवेळ देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी,तालुक्यासाठी, गावासाठी, भावकीसाठी काही नाही केलं तरी चालेल. फक्त आपल्या आई-वडीलांचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्हीच शिवराय असाल, तुम्हीच शंभूराजे असाल. अरे शिवराय, शंभूराजे नुसतं नाव नाही तर धमक आहे, संस्कार आहेत. सर्वोच्चतेच परिणाम आहे. आरे आपल्या स्वराज्यसंकल्पक शहाजी राजांच्या आणि स्वराज्य प्रेरीका राजमाता जिजाऊंच्या स्वराज्याच्या स्वप्नांसाठी रात्र दिवस या सह्याद्रीत वादळासारखे फिरलेत. शिवराय आणि शिवरायांचं स्वराज्याचं संरक्षण आणि विस्तार करण्यासाठी वयाच्या 32 व्या वर्षी या देशासाठी प्राणांचं बलिदान देऊन गेलेत शंभूराय. काय घेतलंय आम्ही शिवचरित्रातून? काय शिकलोय आम्ही शिवचरित्रातून? काहीच नाही……
     संस्कार काय असतात हे फक्त सांगू नका, ते आपल्या लेकरावर रुजवा. आपल्या माय-बापाची सेवा ही आपल्या पाल्यासमोरही करा जेणेकरुन त्यांना कळेल आपल्या माय-बापाने आपल्या आजी-आजोबांची सेवा किती मनोभावे केली. आपणही त्यांची सेवा याच पध्दतीने केली पाहिजे. त्याला शिकवा की एक पुंडलीक भक्त ज्याने मायबापांच्या सेवेसाठी अखिलकोटी ब्रम्हांडनायक पांडूरंग परमात्म्याला 28 युग एका विटेवर उभा केलं. ही ताकद मातृ-पितृ भक्तीची होती.
     जय शिवराय !!!!!!!…… जय शंभूराजे !!!!!!!!…… जय जिजाऊ!!!!!!!!!!………

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...