एका महानगरात नोकरी गमवलेला एक
तरुण सिटी बसमधून उतरतो.
तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
त्याचे पाकीट चोराने पळविले आहे.
तो
तरुण बुचकळ्यात पडतो.
कारण त्याची नोकरी गेलेली असते आणि
खिशात फक्त दीडशे रुपये होते आणि
त्याने त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक
पत्र असते.
ज्यात त्याने लिहलेले असते की,
“माझी नोकरी मी गमावून बसलो आणि तुला आता काहीच पैसे पाठवू शकत नाही.”
तीन
दिवसांपासून ते
पत्र त्याच्या खिशात असते.
पोस्ट करु
की
नाही या
मनस्थितीतच त्याचे दीडशे रुपये आणि
ते
पत्र चोरी होते.
दीडशे रुपये काही फार
मोठी रक्कम नाही पण
त्या तरुणासाठी ते
पंधराशे रुपयेपेक्षा काही कमी
नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे पत्र त्याला मिळाले. तो तरुण आपल्या आईचे पत्र वाचून खूप आश्चर्यचकित होतो. त्याच्या आईने पत्रात लिहलेले असते, “बाळ तू पाठवलेले पाचशे रुपयांचे मनी ऑर्डर मला मिळाले. काळजी घे स्वत:ची.” तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो कोणी पाचशेची मनी ऑर्डर केली असेल? काही दिवसांनी परत त्याला एक पत्र येते. तोडक्या-मोडक्या अक्षरात लिहलेले, वाचण्यास अवघड पण तीन चार ओळींचे असते. “प्रिय भाऊ, दीडशे रुपये तुझे आणि साडे तीनशे रुपये माझ्याकडील मिळवून मी तुझ्या आईला पैसे पाठवले आहेत. काळजी करु नकोस. आई तर सर्वांचीच एकसारखी असते ना !! ती उपाशी का राहू दे? – तुझा, खिसेकापू भाऊ. !!!”

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा