गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

155. नातं, विश्वास तुटण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो

    ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना आहे. एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की, आतमध्ये एक पाल अकडून पडली आहे. आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे. त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतूहल जागृत झालं की हा खिळा जवळपास पाच वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग पाच वर्षे पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होत की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल करता ती पाल जिवंत कशी राहिली? जे जवळ-जवळ अशक्य होतं.
     त्यानं त्याचं काम अक्षरश: थांबवलच आणि तो त्या पालीवर लक्ष वेधून बसला की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता-पाहता त्याच्या लक्षात आलं की, तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे. आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे. हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला……
      कल्पना करा, एक नाही……दोन नाही…… तर पाच वर्षे कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून देता !  एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून जाता त्याची अशाप्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून नक्कीच काहीतरी शिकू शकतो. तेंव्हा अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या. जेंव्हा तिला तुमची खरोखर गरज असते तेंव्हा तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जग असू शकता. कोणतीही गोष्ट म्हणजे नातं, विश्वास तुटण्यासाठी एका क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं. पण जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...