शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

133. 31 डिसेंबरची रात्र

 31 डिसेंबर चा जल्लोष करण्यापूर्वी हे पत्र वाचा.
     ठरवलं असेल ना तुम्ही. 31 डिसेंबरला खूप जल्लोष करायचा. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके करायचं. कुणी कितीही ओरडा ओरड करो, आई-बाबा परवानगी देवो अथवा देवो, तुम्ही तुमचे नियोजन ठरवले असेल. किती लवकर संपते ना हे वर्ष. त्याला निरोप द्यायचा तर मग जंगी नियोजन करायला हवं. फुल्ल गोंधळ करायचा आणि सॉलिड एंजॉय करायचा. एंजॉय करामस्त मजा !!! तुम्ही ठरवलं का की 31 डिसेंबरला तेही हवं म्हणून. ठरवा हवं तर. दारु प्यायची की नाही यावर तात्विक चर्चा नाही करत आता. आता मुद्दा थोडा वेगळा आहे. 31 डिसेंबर संपला की घरी परत येताना कसे याल तुम्ही? आणि मुख्य म्हणजे याल ना? दारु पिऊन गाडी चालवू नये. दुकाची-चारचाकी दामटू नये. हा झाला नियम. तो कितीजण पाळतात? प्रत्येक वर्षी पिऊन गाडी चालवल्यामुळे कितीतरी तरुण जीव आनंदाला मुकतात. आनंद करायचा म्हणून असं स्वत:शीच वैर करायचं का? तुम्हीच ठरवा. पण ते ठरवणं सोप जावं म्हणून ही सध्या फॉरवर्ड होत असलेली -मेल वाचा. पाच मिनिटात वाचून होईल ही -मेल.  एका मुलाने आपल्या आईला लिहलेलं हे पत्र आहे. अशी मेल आपल्या आई-बाबांना वाचायला लागू नये एवढंच……!
     आई,
          तू म्हणाली होतीस पार्टीला जायचं तर जा पण पिऊ नकोस. आई, खरं सांगतो, मी नाही प्यालो. मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यालो सोडा असलेलं. खूप आग्रह केला मित्रांनी. म्हणाले की पी रेपी रेपण नाही प्यालो मी. सगळ्यांनी चिडवलं मला. भरीस पाडलं पण मी नाहीच ग्लासला हात लावला. तुला पिण्याचं वचन दिलेलं मी पाळलं. आई, कोणीही काहीही म्हणो, पिता आनंद घेता येतो हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं. मला गरजच वाटली नाही नशेची. आई, पार्टी संपत आली आहे. आता जो तो घराकडे निघालाय. खूप पिऊन टाईट झालेले माझे मित्र स्वत: ड्राईव्ह करत घराकडे निघालेत. मीही माझ्या कारजवळ पोहचलोय. निघालोय, पूर्ण शुध्दीत…! मी येईन घरी धडधाकट. नशेत गाडी ठोकण्याचा, काहीतरी होण्याचा प्रश्नच नाही. मी प्यालोच नाही तर बेभान होण्याचं काही कारणच नाही. आई, मी निघालो. गाडी काढतच होतो बाहेर. पण समोर पाहतो तर काय? एक गाडी सुसाट येताना दिसतेय. माझ्या अगदी जवळ येते ती. माझ्या गाडीवर…… आदळतेय. आई, मी पडलोय गाडीबाहेर. काही कळतच नाही. अंगातून काहीतरी कारंजे फुटल्यासारखं उडतंय. कोणीतरी हवालदार ओरडतोय जोरजोरात, दारु पिऊन खूप वेगाने गाडी चालवत होती ती पोरं. त्यांच्या गाडीनं ठोकलं याला. विनाकारण मरणार हे पोरगं. आई, मला वेदना होताहेत गं खूप. तू जवळ असावीस असं वाटतंय. मीमी? आई, मला का ठोकलं गं त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलो मी. जमलेत इथे सगळेजण. डॉक्टर, पोलिस. ते डॉक्टर म्हणतात, काही चान्सेस नाहीत. संपलय सारं काहीच उपाय नाही. नाही वाचणार हा. आई, तुझी शपथ, मी प्यायलो नव्हतो गं. त्या गाडीतली मुलं नशेब होती. खूप प्यायली होती. दारु पिऊन गाडी चालवत होती. आई, ती मुलंही माझ्याच बरोबर त्या पार्टीला होती बहुतेक. फरक इतकाच की प्यायले ते आणि मरतोय मी.  का पितात गं आई हे लोक? सगळं आयुष्य नासवतात. स्वत:चं आणि दुसऱ्यांचही. आई, मला आता असह्य वेदना होत आहेत. आतल्या आत काहीतरी चिरत कापत जातयं. मी कळवतोय आणि तो फक्त पाहतोय सुन्नपणे. आई, माझ्यासारखं त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं दारु पिऊन गाडी चालवू नकोस. त्याने ते ऐकलं असतं तर मी आज जिवंत राहिलो गंआई, मला आता श्वास लागायला लागलाय. तुटायला लागलो मी अख्खा आतल्या आत. पण तू नाही रडायंचं माझ्यासाठी. मला जेंव्हा जेंव्हा तुझी गरज होती तेंव्हा तेंव्हा होतीस तू माझ्याबरोबर माझ्यासाठी पण मरतानं मला फक्त एक शेवटचा प्रश्न पडलाय. जर मी पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मी का मरायचं? दुसरऱ्याच्या चुकीची शिक्षा मीच हा भोगायची……? आई, का लोकं दारु पिऊन गाडी चालवतात गं?

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...