शनिवार, २८ जानेवारी, २०२३

187. शेवटची भेट

 मुलगा : हॅलो पिलू... आय मिस यू बेबी...
मुलगी : आय मिस यू टू बेबी. आज सकाळपासून तुझी खूप आठवण येतेय तुझी. आय मिस 
            यू.
मुलगा : (थोडा वेळ शांत राहतो.) पिलू, तु आता माझ्याजवळ येऊ शकतेस का???
मुलगी : हो... मला पण तुम्हाला खूप भेटावे वाटतेय.
मुलगा : मी हॉस्पिटलमध्ये आहे. प्लीज ये ना...
मुलगी : (थोडी घाबरते.) काय झाले तुम्हाला??? प्लीज सांगा ना... (आणि रडते.)
मुलगा : पीलू... प्लीज रडू नकोस. फक्त माझ्याजवळ ये जानू... प्लीज... आय मिस यू.
(मुलगी हॉस्पिटलचा पत्ता विचारुन लगेच फोन कट करते  आणि मुलग्याजवळ जाते. मुलगा बेशुध्द असतो. मुलगी मुलाच्या वडीलांना विचारते.
मुलगी : काका... दत्ताला काय झालंय...????
मुलाचे वडील : तू दत्ताला ओळखतेस का?
मुलगी : हो... मी त्याची उत्कृष्ट मैत्रीण आहे.
मुलाचे वडील : (थोडे उदास होऊन लहान आवाजात). दत्ताला ब्लड कॅन्सर आहे. प्लीज तू जेंव्हा दत्ताला भेटशील तेंव्हा त्याला काही सांगू नकोस की त्याला कॅन्सर झाला आहे. त्याला काहीच माहीत नाही याबद्दल.
(हे ऐकून तिला काहीच सूचत नाही. तिला वाटतं हे स्वप्न तर नाही ना... हे स्वप्नच असावं.)
काही वेळानंतर मुलाला शुध्द येते. मुलगा त्याच्या वडीलांना विचारतो, "पप्पा कोणी भेटायला आलेले आहे का मला?"
मुलाचे वडील : हो बाळा... तुझी कोण उत्कृष्ठ मैत्रिण आलेली आहे.
मुलगा : प्लीज पप्पा.. मी तिला एकांतात भेटू शकतो का???
मुलाचे वडील : मी तिला पाठवतो.
(मुलाचे वडील बाहेर जातात आणि मुलीला बोलवतात. बाळा, तुला दत्ता बोलवतोय. मुलगी लगेच स्वत:ची बॅग जमिनीवर फेकून मुलाच्या रुमकडे धावत जाते. रुमच्या दरवाजाच्या जवळ थोडं थांबून आपले डोळे पुसते आणि रुममध्ये अशी जाते की जसं तिला काही माहित नाही.)
मुलगी : दत्ता तू बरा आहेस आता...
मुलगा : पीलू तू आलीस ना मग, आता मी ठीक आहे.
मुलगी : (खूप रडू वाटतंय पण मुलाच्या समोर शांत बसते.) हो तू लवकर बरा होशील.
मुलगा : (हसत) पीलू, उद्या परत कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू... पण हो उद्या माझ्याकडे जास्त नको बसू... उद्या फक्त अभ्यास... ओके. तू तर वेडी आहेस. तू पण अभ्यास करत नाहीस आणि मला पण करु देत नाहीस. सारखी बघत असतेस.
मुलगी : (डोळ्यांत पाणी येते पण मुलगा बघू नये म्हणून डोळे लगेच पुसते. थोडे हसत बोलते) हो दत्ता... उद्या तू अभ्यास करुन घे. नाही बघणार मी तुला.. ठीक आहे.
मुलगा : (हळू आवाजात बोलतो) पीलू...
मुलगी : काय? बोल ना...
मुलगा : तू प्रत्येक वेळी माझी किती काळजी घेतेस.
मुलगी : (डोळ्यांत पाणी थांबवू शकत नाही. ती रडते)
मुलगा : काय झालं पीलू? मी ठीक आहे. रडू नकोस प्लीज... रडू नको पीलू.
मुलगी : मी रडत नाहीये. माझे आयुष्य तुला मिळो हीच इच्छा आहे देवाकडे. तुला काही होऊ देणार नाही मी. (डोळे पुसत बोलते.)
मुलगा : प्लीज मला मिठीत घे ना पीलू ...!
(मुलगी मुलाचं डोकं मांडीवर ठेवते)
मुलगा : पीलू आज तुझ्या मांडीवर शांत झोपू वाटतंय...!!!
मुलगी : (डोळ्यांत पाणी येत असतं) प्लीज असं बोलू नकोस... प्लीज...
मुलगा : फक्त थोडा वेळ झोपू दे ना पीलू. खूप छान वाटतंय... काय माहित कधी वेळ मिळेल की नाही...?
मुलगी : ठीक आहे... झोप तू !!!
मुलगा : पीलू... मी नेहमी तुझी सारखी राहून राहून आठवण काढतो.
(आणि मुलगा डोळे बंद करतो. काही वेळाने मुलीला कळतं की तिचा दत्ता या जगात नाही राहीला. तरीही ती त्याला सोडत नाही. मांडीवर घेऊन तशीच बसते आणि तीही शेवटचे डोळे बंद करते.)
     खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे वडील रुममध्ये जातात आणि बघतात की त्यांच्या प्रेमळ मुलाने तिच्या उत्कृष्ठ मैत्रिणीजवळ जीव सोडला होता..! आणि त्या मुलीचा श्वासही थांबला होता. दोघेही सोबतच जीव सोडतात...!!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...