मैथिली
विभावरी आणि श्रध्दा या तिघी मैत्रिणी. अगदी जिवाभावाच्या सख्या मैत्रिणी असूनही
बहिणींचे प्रेम होते एकमेकींत. एकाच कॉलनीत राहायच्या. शिवाय पहिलीपासून आता
नववीपर्यंत एकाच शाळेत शिकत आल्या परंतु तिघींचे पालक वेगवेगळ्या स्तरावरचे.
श्रध्दा गरीब मोलमजुरी करणाऱ्या आई-वडीलांची, विभा नोकरीत झुंजत कुटूंब चालवणाऱ्या
आई-पप्पांची तर बिझनेस करत यशाच्या उंच शिखरावर मॉम डॅडची लेक होती मैथिली. तिघी
स्वभावात कमी अधिक सारख्याच होत्या. संस्कारात मात्रा कमालीची विभिन्नता होती. आता
नववीचे वर्ष संपत चालले होते. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. तिघी मुली आता
अभ्यासाला एकत्रच बसत. विभा आणि श्रध्दा कधी कधी मैथिलीला चोरुन खो-खो हसत.
मैथिलीला मात्र तो नाद धोक्याच्या घंटेप्रमाणे ऐकू येत होता. तिने कारण विचारले की
त्या उडवून लावत आणि हसत बसत...
कसलातरी लपावाचपावी त्या करत होत्या. त्या भयानक रात्रीला आता चार महिने उलटून गेलेले होते. आज त्याच रात्री घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा निकाल कोर्टात लागणार होता. कोर्टात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. साक्षी उलटतपासणी यांचा कायद्याच्या दृष्टीने विचार करुन पुरावे नसल्याने कोर्टाने शुभम आणि विवेक या दोन नराधम तरुणांना सोडून दिले. कुत्सित हासत त्या हवसी मुलांनी निर्लज्जपणे हसत मैथिलीच्या पुढून निघून गेले. ती ही बाहेर पडली. जवळच असणाऱ्या एका बागेत बसली. तिच अंग थरथरत होते, संताप होत होता. तिच्या कानाच्या पाळ्या, नाक लालबुंद झाले. तिला सूड उगवायचा होता तिच्या मैत्रिणींच्या मृत्यूचा हिशोब उगवायचा होता अगदी व्याजासकट ओरबाडून वसुल करायचा होता. तिचे अंग घामाने निथळू लागले. तिने मनाशी काहीतरी ठोस निर्धार केला आणि ती तशीच गाडीतून घरी जाताना पुन्हा त्या बिल्डींगजवळ पोहोचली जिथे त्या दैत्यांनी तिच्या मैत्रिणींच्या आयुष्याला कायमच नरकात ढकललं होतं तिला आठवायला लागले.
करकचून ब्रेक दाबत गाडी थांबली. दबकत दबकत रात्रीच्या अडीच वाजता सगळीकडे भयानक शांतता असताना ही स्मशानात मैथिली शिरली. काळोख एवढा गडद होता की तिला कुणीच दिसत नव्हते. तिची चाल मंद होती. मध्येच एक काळं मांजर ओरडायचं. बेडकांचे आवाज यायचे आणि किर्रर्र रातकीडेही होतेच. अमावस्येची रात्र असल्याने चंद्रही आकाशात नव्हता. अशात तिच्या खांद्यावर एक थंड हात पडला, ती घाबरली. तिची धडधड वाढली. तिने मागे वळून पाहिले तर तो शुभम होता. हुश्श्य तिच्या जीवात जीव आला. तिने इथे का बोलावल्याचे विचारले आणि त्यांनी ते सांगू नंतर. जवळच असणाऱ्या त्यांच्या घरी चालायला सांगितले. ते दोघे निघाले. श्रध्दा आणि विभा वाट पाहताय असे शुभम तिला खोटेच बोलला. घरी पोहचल्यावर मैथिलीला धक्काच बसतो कारण ज्या पार्टीकरिता तिला बोलावलेलं असते तिथे कोणीच नसते. खोलीत फक्त एक तरुण तो ही वसाड्या तोंडाचा, लाळ गाळत त्याच्या ओठांवरुन जीभ फिरवत तिच्याकडे पाहू लागतो. तिला संशय येतो. ती मागे फिरुन पाहते परंतु शुभम दिवे बंद करतो आणि दाराची कडी लावून घेतो. दोघेपण जोरजोरात हसू लागतात. ती विचारते, "हे काय आहे? मला सोडा.." परंतु खूप उशीर झालेला असतो. पाठून तिचे दोन्ही हात रुमालाने बांधले जातात. तोंड रुमालाने आवळून घेतात आणि तिला तसंच बिछान्यावर दोघे ढकलतात. दिवे लागतात. तेंव्हा त्या दोघांच्या अंगावर फक्त शॉर्ट पाहून तिला भयंकर भिती वाटते. ती मागे मागे जावू लागते. आपण काय? कसे? आणि किती? चुकलो हे तिला उमगते. मुलं किती नीच असू शकतात. नराधम तिचे कपडे फाडू लागतात. मैथिलीचा टोप बाजूला पडतो. विवेकचा कामुक स्पर्श तिच्या अंगाला , छातीला पिलू लागतो. तर शुभम देखील कान, मान चावत असतो. तेवढ्यात दरवाजा तोडत पोलिस इन्स्पेक्टर व्ही.पी. शिंदे आत येतो. घरात घुसून विलास (मैथिलीचा भाऊ) हा शुभम आणि विवेक यांना बेदम मारतो. दोघांनाही बरीच ईजा होते. डोक्याला मार बसल्याने बेशुध्दावस्थेत त्यांना दवाखान्यात पाठवले जाते. इकडे गळितगात्र झालेली मैथिली विलासला बिलगते. रडू लागते.. चुकले मी दादा. मैत्रिणींच्या सांगण्यावरुन इथे आले आणि फसले. पण तू वाचवलेस. राखीला जागलास देवासारखा आलास. मात्र मी इथे आहे हे कसे समजले?
विलास सांगतो की, आज संध्याकाळी तुझ्या मैत्रिणींनी
विभा आणि श्रध्दा यांनी विष प्राशन केले. दवाखान्यात नेल्यावर उपचारादरम्यान
त्यांची प्राणज्योत मावळली. परंतु जाण्यापूर्वी दोघींनी एकत्रितपणे एक चिठ्ठी
लिहली तुझ्यासाठी आणि तो चिठ्ठी दाखवतो. मैथिली वाचू लागते. "प्रिय मैथिली,
मी विभा आणि श्रध्दा आज आत्महत्या करत आहोत. तू ही चिठ्ठी वाचशील तेंव्हा आम्ही या
जगात नसू. आम्हाला तू विसरुन जा. तुला फसवंलय आज... आयुष्यात पहिल्यांदा आणि
शेवटचं देखील. तुला ज्या पार्टीकरिता ज्या ठिकाणी आम्ही बोलावले ती कधी ठरली
नव्हतीच. विवेक आणि शुभमचा तो कट होता, डाव होता, जाळे होते तुझ्याकरिता. कारण
त्या दोघांनी आम्हाला मोहात पाडून लग्नाचे आमिष दाखवले. शरीरसुखाचीही मागणी केली.
कशी? कुणास ठाऊक? आम्ही ती पुरवत गेलो.
परंतु काल रात्री त्यांनी त्यांची औकात दाखवली. त्यांचे घाणेरड्या, अश्लील डोक्यात
आता तू वास करत होती. आता त्यांना तुला उपभोगायचे होते. आमच्या व्हीडीओ क्लीप्स
जगाला दाखवू असे धमकावले. आम्हाला बळजबरी तुला फसवून बोलायला सांगितले. मैथिली तू
मागे त्यांच्याशी मैत्री करु नका असे सांगितले होतेस. परंतु आम्हीच न ऐकता तुला ही
ओळख करुन दिली. पण तुझी फसवणूक केल्याचा अपराध आम्हाला जगू देणार नाही. म्हणूनच
आम्ही आत्महत्या करत आहोत." पत्र वाचून झाल्यावर मैथिली धाय मोकून रडली. तिला
दोघींचे रडते चेहरे दिसू लागले. अतीव्र दु:खाने तिला ग्रासले. त्यानंतर दोन दिवस
ती जेवलीच नाही.
आता तिला त्या दोन नराधमांना अद्दल घडवायची होती. ते अटकेत होतेच परंतु त्यांना तुरुंगात डांबायचे तिने ठरवले. त्या दोघींच्या पालकांनी त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. मात्र आता सगळे सूत्र विचित्र पध्दतीने हलले. विभा आणि श्रध्दाचे पत्र मैथिलीचे वडील नष्ट करतात. बाप आपल्या मुलीचा जीव वाचविण्याकरिता इतका स्वार्थी कसा होतो? त्या दोन निष्पाप जीवांना न्याय मिळायला हवा विचार मोठे करोडपती लोक का करत नाहीत??? भ्रष्ट राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असणाऱ्या त्या दोघांविरुध्दचे पुरावेच नष्ट केले. विलासला पोलिस खात्यातून बडतर्फ केले गेले. आणि विभावरी, श्रध्दा या तर आधीच मेल्या होत्या कोर्टात. काहीच पुरावा सादर न झाल्याने दोघे शुभम आणि विवेक निर्दोष सुटले. पैसा आणि सत्ता यांच्या दहशतीने एकदा कायद्याला तुकावले आणि अजून एकदा असते तिला सत्य अशी लोकांची धारणा झाली. मेडिया टी.आर.पी. करिता महिनाभर हे प्रकरण चघळत होती. मात्र न्याय नाही मिळत फक्त चर्चा करुन...
दहा वर्षानंतर मैथिली दवाखान्यात विवेक आणि
शुभमला पाहून चमकली. इतक्या वर्षानंतर दोघेही एकदम गळून गेले होते. चेहरा निस्तेज
होता आणि कपाळावर त्यांच्या नैराश्य एकवटले होते. ती पुढे जावून केबिनमध्ये गेली
आणि बेल वाजविली. रिसेप्शनीस्टने शुभम आणि त्याच्या बायकोला आत जायला सांगितले.
दोघे आत गेले. मैथिली एक गायनँक होती आणि शुभम आता तिचा पेशंट होता. वंधत्व
निवारण्याकरिता तो आलेला. अगदीच सारखे विवेकच्या बाबतीतही घडले. मैथिलीने
दोघांनाही नीट तपासले. त्यांच्या बायकांत कोणतीच कमी नव्हती. मात्र ह्या दोघांत
शुक्राणूंची कमतरता होती आणि आता ते तिच्याकडे उपचारांकरिता आले होते. मैथिलीपुढून
जुन्या काळात घडलेल्या घटनांचा चित्रपट येऊन गेला. तिने दोघांच्या बायकोला एकांतात
भेटायला सांगितले. शुष्मा आणि रोहीणी (विवेक आणि शुभमच्या बायका... एक
वर्षांपूर्वी भेट झालेली होती... एका महिन्यापूर्वी सारखपुडा झालेला परंतु लग्न व्हायचे होते.)
मैथिलीला भेटल्या. ती रडत होती. खूप वर्षांनी मनातली जखम चिघळली गेली आणि तिचा
ताबा सुटला. मात्र तिला भानावर येणे गरजेचे होते...!!!
तिने त्यांना घडलेलं सांगितले आणि त्यांना देखील
धक्का बसला. कारण गेल्या एका वर्षात विभा आणि श्रध्दा या दोघांविषयी त्यांना
माहितीच नव्हते. दोघी बायकांना त्यांचा
राग आला. आणि त्या द्वेष करायला लागल्या. तेंव्हा मैथिलीने त्यांना एक योजना
सांगितली आणि त्या दोघींनी तिचा सूड पूर्ण करण्यात तिची साथ देण्याचे कबूल केले.
काही दिवस मैथिलीने त्यांच्यावर उपचार केले. आणि जेंव्हा ते संपले तेंव्हा असा रिपोर्ट आला की त्या दोघांवरही वंध्यत्व निवारण्याचे उपचार झालेच नाही. चुकीच्या उपचारांनी ते वांझोटे झालेत. हे कळल्यावर त्यांच्या दोघांच्याही बायकांनी त्यांचे लग्न नाकारले. मैथिलीला दिलेला त्रास आणि विभावरी व श्रध्दा यांच्या आत्म्यांचा तळतळाट... यामुळेच आपल्याला हे निर्बीज जीवन मिळाले या विचाराने ते दुबळे होऊन त्यांनी एकमेकांना गोळ्या घालून संपवून टाकले. विभा आणि श्रध्दाच्या फोटोंना तुळशी हार अर्पण करुन मैथिली आज हसत होती. तिचा आज बदला तिने घेतला होता. तिच्या मैत्रिणींना खऱ्याप्रकारे न्याय मिळाला होता.
कसलातरी लपावाचपावी त्या करत होत्या. त्या भयानक रात्रीला आता चार महिने उलटून गेलेले होते. आज त्याच रात्री घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा निकाल कोर्टात लागणार होता. कोर्टात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. साक्षी उलटतपासणी यांचा कायद्याच्या दृष्टीने विचार करुन पुरावे नसल्याने कोर्टाने शुभम आणि विवेक या दोन नराधम तरुणांना सोडून दिले. कुत्सित हासत त्या हवसी मुलांनी निर्लज्जपणे हसत मैथिलीच्या पुढून निघून गेले. ती ही बाहेर पडली. जवळच असणाऱ्या एका बागेत बसली. तिच अंग थरथरत होते, संताप होत होता. तिच्या कानाच्या पाळ्या, नाक लालबुंद झाले. तिला सूड उगवायचा होता तिच्या मैत्रिणींच्या मृत्यूचा हिशोब उगवायचा होता अगदी व्याजासकट ओरबाडून वसुल करायचा होता. तिचे अंग घामाने निथळू लागले. तिने मनाशी काहीतरी ठोस निर्धार केला आणि ती तशीच गाडीतून घरी जाताना पुन्हा त्या बिल्डींगजवळ पोहोचली जिथे त्या दैत्यांनी तिच्या मैत्रिणींच्या आयुष्याला कायमच नरकात ढकललं होतं तिला आठवायला लागले.
करकचून ब्रेक दाबत गाडी थांबली. दबकत दबकत रात्रीच्या अडीच वाजता सगळीकडे भयानक शांतता असताना ही स्मशानात मैथिली शिरली. काळोख एवढा गडद होता की तिला कुणीच दिसत नव्हते. तिची चाल मंद होती. मध्येच एक काळं मांजर ओरडायचं. बेडकांचे आवाज यायचे आणि किर्रर्र रातकीडेही होतेच. अमावस्येची रात्र असल्याने चंद्रही आकाशात नव्हता. अशात तिच्या खांद्यावर एक थंड हात पडला, ती घाबरली. तिची धडधड वाढली. तिने मागे वळून पाहिले तर तो शुभम होता. हुश्श्य तिच्या जीवात जीव आला. तिने इथे का बोलावल्याचे विचारले आणि त्यांनी ते सांगू नंतर. जवळच असणाऱ्या त्यांच्या घरी चालायला सांगितले. ते दोघे निघाले. श्रध्दा आणि विभा वाट पाहताय असे शुभम तिला खोटेच बोलला. घरी पोहचल्यावर मैथिलीला धक्काच बसतो कारण ज्या पार्टीकरिता तिला बोलावलेलं असते तिथे कोणीच नसते. खोलीत फक्त एक तरुण तो ही वसाड्या तोंडाचा, लाळ गाळत त्याच्या ओठांवरुन जीभ फिरवत तिच्याकडे पाहू लागतो. तिला संशय येतो. ती मागे फिरुन पाहते परंतु शुभम दिवे बंद करतो आणि दाराची कडी लावून घेतो. दोघेपण जोरजोरात हसू लागतात. ती विचारते, "हे काय आहे? मला सोडा.." परंतु खूप उशीर झालेला असतो. पाठून तिचे दोन्ही हात रुमालाने बांधले जातात. तोंड रुमालाने आवळून घेतात आणि तिला तसंच बिछान्यावर दोघे ढकलतात. दिवे लागतात. तेंव्हा त्या दोघांच्या अंगावर फक्त शॉर्ट पाहून तिला भयंकर भिती वाटते. ती मागे मागे जावू लागते. आपण काय? कसे? आणि किती? चुकलो हे तिला उमगते. मुलं किती नीच असू शकतात. नराधम तिचे कपडे फाडू लागतात. मैथिलीचा टोप बाजूला पडतो. विवेकचा कामुक स्पर्श तिच्या अंगाला , छातीला पिलू लागतो. तर शुभम देखील कान, मान चावत असतो. तेवढ्यात दरवाजा तोडत पोलिस इन्स्पेक्टर व्ही.पी. शिंदे आत येतो. घरात घुसून विलास (मैथिलीचा भाऊ) हा शुभम आणि विवेक यांना बेदम मारतो. दोघांनाही बरीच ईजा होते. डोक्याला मार बसल्याने बेशुध्दावस्थेत त्यांना दवाखान्यात पाठवले जाते. इकडे गळितगात्र झालेली मैथिली विलासला बिलगते. रडू लागते.. चुकले मी दादा. मैत्रिणींच्या सांगण्यावरुन इथे आले आणि फसले. पण तू वाचवलेस. राखीला जागलास देवासारखा आलास. मात्र मी इथे आहे हे कसे समजले?
आता तिला त्या दोन नराधमांना अद्दल घडवायची होती. ते अटकेत होतेच परंतु त्यांना तुरुंगात डांबायचे तिने ठरवले. त्या दोघींच्या पालकांनी त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. मात्र आता सगळे सूत्र विचित्र पध्दतीने हलले. विभा आणि श्रध्दाचे पत्र मैथिलीचे वडील नष्ट करतात. बाप आपल्या मुलीचा जीव वाचविण्याकरिता इतका स्वार्थी कसा होतो? त्या दोन निष्पाप जीवांना न्याय मिळायला हवा विचार मोठे करोडपती लोक का करत नाहीत??? भ्रष्ट राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असणाऱ्या त्या दोघांविरुध्दचे पुरावेच नष्ट केले. विलासला पोलिस खात्यातून बडतर्फ केले गेले. आणि विभावरी, श्रध्दा या तर आधीच मेल्या होत्या कोर्टात. काहीच पुरावा सादर न झाल्याने दोघे शुभम आणि विवेक निर्दोष सुटले. पैसा आणि सत्ता यांच्या दहशतीने एकदा कायद्याला तुकावले आणि अजून एकदा असते तिला सत्य अशी लोकांची धारणा झाली. मेडिया टी.आर.पी. करिता महिनाभर हे प्रकरण चघळत होती. मात्र न्याय नाही मिळत फक्त चर्चा करुन...
काही दिवस मैथिलीने त्यांच्यावर उपचार केले. आणि जेंव्हा ते संपले तेंव्हा असा रिपोर्ट आला की त्या दोघांवरही वंध्यत्व निवारण्याचे उपचार झालेच नाही. चुकीच्या उपचारांनी ते वांझोटे झालेत. हे कळल्यावर त्यांच्या दोघांच्याही बायकांनी त्यांचे लग्न नाकारले. मैथिलीला दिलेला त्रास आणि विभावरी व श्रध्दा यांच्या आत्म्यांचा तळतळाट... यामुळेच आपल्याला हे निर्बीज जीवन मिळाले या विचाराने ते दुबळे होऊन त्यांनी एकमेकांना गोळ्या घालून संपवून टाकले. विभा आणि श्रध्दाच्या फोटोंना तुळशी हार अर्पण करुन मैथिली आज हसत होती. तिचा आज बदला तिने घेतला होता. तिच्या मैत्रिणींना खऱ्याप्रकारे न्याय मिळाला होता.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा