तो वय
पंचवीस.
तसा
मुळचा मुंबईचा.
पण
शिक्षणांसाठी पुण्यात जोश्यांकडे रहायचा.
ती
वय
बावीस.
नृत्य शिकायची.
आई-वडील आणि लहान भावांबरोबर
पुण्यात रहायची.
एक
दिवस त्याने तिला लग्नाबद्दल विचारले पण
तिने त्याला नकार दिला.
पण
तो
तिचं मन
वळवण्याचा प्रयत्न करत
असतो.
आजही तिच्या पाठीमागून चालत असतो.
ती
घराजवळ पोहचते.
पाठीमागून तो
येत
असतो.
शेवटी हतबल होऊन ती
म्हणते,
“तुला नक्की हवं तरी काय? माझं लग्न ठरलंय. निर्णय झालाय…”
त्यावर तो
म्हणतो,
“तू आनंदी आहेस का? नक्की?”
“हुम्म्म्म्म्म्म” ती होकारार्थी
मान
हलविते.
मागे वळतो पण
तिचे बाबा उभे
असतात.
त्यांचा गैरसमज होतो आणि
डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि
फुटतो.
गालावरचा हात
तसाच राहतो.
बाबा तिच्याजवळ येतात आणि
दोघेही नजरेआड होतात.
तिला अखेरचं बघत
तो
नाहीसा होतो.
अंधार पडू
लागतो.
रस्त्यावरुन समोरुन येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते.
अंगावर येणारा प्रकाश एक
निमिष आणि
मग
सर्वत्र अंधार असतो.
दोन महिने उलटतात. फासे हळूहळू पालटू लागतात. दोन दिवसावर लग्न. पण ती गेली दोन दिवस त्याचाच विचार करते. तिलाही कळत नाही असं का होतय. त्या दिवशी बराच वेळ त्या रस्त्यावर ती ताटकळत उभी होती. आत दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही. कॉलेमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. त्याने जीवचं काही बरं-वाईट तर करुन नाही घेतलं असं तिला वाटू लागलं. ती फार बैचेन झाली. शेवटी ती जोश्यांकडे पोहचते. त्याचा मोठा अपघात झाल्याचं कळतं. ती त्याचा नंबर घेते, घाबरत घाबरत त्याला फोन लावते. रिंग वाजते, फोन उचलला जातो. तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत –रडत बोलत असते. त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर असे अनेक प्रश्न येऊन जातात. तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन देऊन ठेवतो.
तो बोलला का नाही? दोन दिवसावर लग्न. आता तिला सगळं असह्य होत चाललंय. त्याला भेटणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीत. ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहचते. तो आत्ताच पुण्याला निघाल्याचं कळतं. तातडीने पुण्याची व्हाल्वो पकडते. सीटजवळ येते आणि जे पाहते त्याच्यावर विश्वास बसत नाही. तो समोर असतो. काही बोलायला तिच्याकडे शब्द नसतात. तो एक कागद घेतो. त्याच्यावर काहीतरी लिहतो आणि तिच्या हातात देतो. ती वाचायला सुरवात करते. त्यामध्ये
लिहलेले असते,
दोन महिने उलटतात. फासे हळूहळू पालटू लागतात. दोन दिवसावर लग्न. पण ती गेली दोन दिवस त्याचाच विचार करते. तिलाही कळत नाही असं का होतय. त्या दिवशी बराच वेळ त्या रस्त्यावर ती ताटकळत उभी होती. आत दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही. कॉलेमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. त्याने जीवचं काही बरं-वाईट तर करुन नाही घेतलं असं तिला वाटू लागलं. ती फार बैचेन झाली. शेवटी ती जोश्यांकडे पोहचते. त्याचा मोठा अपघात झाल्याचं कळतं. ती त्याचा नंबर घेते, घाबरत घाबरत त्याला फोन लावते. रिंग वाजते, फोन उचलला जातो. तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत –रडत बोलत असते. त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर असे अनेक प्रश्न येऊन जातात. तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन देऊन ठेवतो.
“हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक.
आहेत गोठले कंठी ते शब्द ते शब्द अनेक.
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द.
कळतील तुला का ते बोल निशब्द.
भान हरपते कंठातील शब्द कंठात कोचणार का?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का?”
कागद निसटतो.
आणि
दोघं एकमेकांना मिठीत घेत
पुढच्या मार्गाला लागतात.
थोडक्यात त्याला सांगायचे होते की
ज्या रात्री तिला शेवटचे भेटून तो
घरी
परत
येत
होता त्यावेळी त्याचा अपघात झाला होता त्या रात्री तो
अपघातातून वाचला खरा
पण
त्या अपघातात तो
आपली वाचा गमावून बसला होता. प्रेम ही अशी भावना आहे जिच्यासमोर स्वर्गही काही भासत नाही.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा