ऐका... माझ्या प्रियतम, माझ्या साथी,
तुमच्याविना आयुष्य मला,
जगता येत नाही.
तुमच्याविना आयुष्य मला,
जगता येत नाही.
तुम्ही तर वीर आहात, लढाऊ आहात, योद्धा आहात.
शत्रूंच्या टोळीबरोबर लढत असता...
हे सांगा, मी एकटेपनाबरोबर कसे लढू?
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्ही दिसता.
मी आठवणींच्या सावलीबरोबर कसे लढू?
काल फोटोंचा अलबम बघितला,
आपले सगळे फोटो जुने झाले आहेत.
नवीन कधी काढायचे?
ह्यावेळेला तुम्ही रंगपंचमीलासुद्धा घरी नाही आलात.
आपण एकमेकांना रंग कधी लावायचे?
पूर्ण दिवाळीच्या सणामध्ये ती साडी नेसली होती,
जी तुम्ही बनारस मधून आणली होती.
सगळ्यांनी कौतुक केले पण,
कुणाचेच कौतुक माझ्या ह्रदयापर्यंत पोहचले नाही.
जोपर्यंत तुम्ही नाही म्हणत,
तोपर्यंत मी स्वतःला सुंदर नाही वाटत.
कडवा चौथचे व्रत असेच निघून गेले.
सगळ्यांच्या चाळणीमध्ये चंद्र झगमगला.
फक्त माझाच चंद्र घरी नाही आला.
माझी अवस्था काय आहे माहित आहे?
वेडी झाली आहे मी.
तुम्ही वाळवंटामध्ये ५० डिग्री अंश तापमानात लढत आहात,
हा विचार करून मी थंड हवेबरोबर शत्रुत्व केले आहे.
कुठून तरी हवेची झुळूक शरीराला स्पर्श करू नये म्हणून,
घरातली प्रत्येक खिडकी बंद करून ठेवली आहे.
आता कुठूनच हवा येत नाही. ऐकलंत का? माझ्या प्रियतम...
जगामध्ये कोणाला आवडेल कोणाचे दुसरे प्रेम बनायला?
मी ते पण मोठ्या आनंदाने बनले.
माहिती होते, फौजीच्या आयुष्यात जी कोणी येईल,
तिला दुसरे प्रेमच म्हटले जाईल. कारण
पहिले प्रेम पहिले वचन तुम्ही देशाच्या मातीसाठी निभावणार.
ऐका, माझ्या प्रियतम... माझ्या साथी...
आता आणखी नका त्रास देऊ,
ज्या ठकठकीसाठी माझे कान आतुरलेले आहेत,
ती ठकठक बनून या..
ज्या चाहुलीसाठी मी रोज तडफडत असते,
ती चाहूल बनून या...
पण लक्षात असू द्या, माझ्या ढोल - योध्याला,
भारत मातेला जे वाचन दिले आहे, ते तोडून येऊ नका...
तुम्हाला शपथ आहे माझी,
कदाचित मी प्रेमाशिवाय मरुन जरी गेले,
तरी मैदान सोडून येऊ नका.... मैदान सोडून येऊ नका...
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा