मंगळवार, १० जानेवारी, २०२३

143. एक प्रेम की एक मैत्री ?

     आम्ही एकाच कॉलनीत राहतो. ती आणि मी. मी तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. मी जेंव्हा-जेंव्हा तिच्या घरासमोरुन जात असतो तेंव्हा-तेंव्हा ती माझ्याकडे बघत असते. मला वाटतं, तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खूपच चांगली आहे. मलाही ती खूपच आवडते. पण सर्वात मोठी अडचण अशी आहे की ती माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राची सख्खी बहीण आहे. पण मी तिला खूप आवडतो. जेंव्हा मी माझी अंघोळ वगैरे आवरुन बाहेर येतो तोपर्यंत ती मला पाहण्यासाठी दारात उभी असते आणि जोपर्यंत मी बाहेर येत नाही ती मला बघत नाही तोपर्यंत ती कॉलेजला जात नाही. तिथेच उभी असते. कॉलेजला जातानाही पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत असते. मग मी संध्याकाळी  निवांत जेंव्हा बाल्कनीत येतो  तेंव्हा ती बाहेर उभी राहून माझी वाटच बघत असते की कधी एकदा मी येईन आणि तिच्याकडे माझी एक नजर वळवून पाहीन आणि मी तिच्याकडं पाहिल्यावर ती दुसरीकडे बघत असल्याचं नाटक करायची. गेली सहा महिने मी तिला टाळत आलोय. तिच्याकडं बघणं, तिच्यापासून लांब लांब पळून जाणं माझं चालूच होतं. कारण मी ठरवलं होतं की काही झालं तरी मित्राच्या बहीणीशी मी कसं काय प्रेम करु शकतो? मी मित्राला कसं काय धोका देऊ शकतो? नाहीनाहीहे कधीच होऊ शकत नाही. माझे सिध्दांत मला याची अजिबात परवानगी देत नव्हते. म्हणूनच मी तिला अशाप्रकारे टाळाटाळ करत होतो. पण तरीही ती डगमगता माझ्यावर अशीच प्रेम करत होती. माझ्याकडे सतत पहायची. आमच्या घरी येण्याची कारणे शोधायची. आमच्या घरच्यांची आणि त्यांच्या घरच्यांची चांगली ओळख होती ना म्हणूनतिच्या याच प्रेमासमोर माझे सिध्दांत विरघळले होते. हळूहळू खूपच प्रेम करु लागलो होतो मी ही तिच्यावर. मग मी तिच्या त्या घायाळ करणाऱ्या नजरेत इतका बुडालो की मी ही तिच्याकडे सारखा सारखा बघू लागलो आणि तिला कसंही करुन प्रपोज करायचं ठरवलं
        मी एक चिठ्ठी लिहून पुस्तकातल्या एका पानात घडी घालून ते पुस्तक (थोड घाबरत) तिच्याकडे एका लहान मुलगीद्वारे पाठवून दिलं. पण ते तसंच परत आलं. ती लहान मुलगी म्हणाली की ती दीदी म्हणते हे पुस्तक तिचे नाही आहे. मी ते पुस्तक परत घेतलं. कदाचित तिला कळलं नसावं की यात मी तिच्यासाठी चिठ्ठी ठेवलीय ते. मग यानंतर अशीच दोन वर्षे गेली. मी त्यानंतर तिला समोरासमोर जाऊन प्रपोज करायचं ठरवलं. पण मी खरोखरच याआधी कोणत्याही मुलीशी बोललो नव्हतो. फारच कमीमग मला हे जमेल कसं? कारण माझ्यात फारच कमी आत्मविश्वास होता. त्यामुळे सोबत मी प्रेमपत्रही लिहून घेतलं आणि खिशात ठेवलं. जर मी तिला बघितल्यावर काहीच बोलू शकलो नाही तर किमान हे पत्रतर तिच्या हातात देईन. ठरल्याप्रमाणे तिच्या घरी कोणीही नसतना मी तिच्या घरात गेलो. माझ्या मित्राचं गाण्याचं कॅसेट माझ्याकडे होतं. ते देण्याचा बहाणा करुन मी तिच्या घरात गेलो. ती एकटीच होती. मला पाहून ती थोडी दचकलीच. मी तिला हे कॅसेट दिलं आणि म्हणालो हे आशिषचं (तिचा भाऊ, माझा मित्र) कॅसेट द्यायला आलोय. ते तिनं घेतलं. मी थोडा वेळ तिच्याकडे तसाच पाहत राहिलो. माझं शरीर थरथरत होतं भितीने. तिनं माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाली की, तुला काही बोलायचे आहे? मी म्हणालो, "नाहीनाहीमला काय बोलायचं असेल?" आणि तिथून लगबगीने निघालो. खूपच घाबरलो होतो मी. खूप काही सांगायचं होतं. शब्द ओठापर्यंत येत होते. पण बाहेरच पडले नाहीत. मी आरशासमोर उभा राहिलो. मी माझ्या आतापर्यंतच्या घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेण्याचं ठरवलं. सर्व गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करण्याचं मी ठरवलं. तिला प्रपोज केल्यावर तिने जरी माझं प्रेम स्वीकारलं तर आमचं भविष्य काय असेल? काय तिचा भाऊ म्हणजे माझा मित्र तिचा नवरा म्हणून मला स्वीकारेल? तर उत्तर येत होतं नाही. तो मला स्वीकारणार नाही. उलट तो मला एक धोकेबाज म्हणेल. मी तिच्या मनाचाही विचार केला. मी तिला नाही म्हटलं तर काय होईल? तिला दु: नक्कीच होईल पण ते तात्पुरतं असेल. पण नंतर ती कदाचित मला विसरेल आणि तिचं लग्न झाल्यावर तिच्या घरी ती नक्कीच सुखी राहील. तीन  तासानंतर मी एका निर्णयावर येऊन पोहोचलो. मी तिला विसरण्याचा निर्णय घेतला. मला या निर्णयाने खूप रडू आले. मी गुपचूप बाथरुममध्ये जाऊन रडू लागलो. तोंडावर रुमाल धरुन हुंदके देऊन रडत होतो मी. काही दिवसांनी तिचं लग्न झालं. नवरा मुलाची खूप मोठी शेती, गडगंज पगाराची नोकरी होती. त्याच्या मनात एक समाधान होतं आणि एक दु:खही . डोळ्यांतील आसवांप्रमाणे मनातील आठवणी पुसता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं नाही आज ती तिच्या संसारात सुखी आहे आणि तिच्या सुखात मी ही. शेवटी मैत्री जिंकली आणि प्रेम हारलंसुखी रहावं तिनं जिथं असेल ती ही एकच इच्छा माझ्या मनी आहे. ती दूर जाताना माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत पाणी आहे. आनंदी आहेस, आनंदी रहा. तुझा नवरा तुला सुखी ठेवतो ही बातमी माझ्या कानी आहे. जाताना एकच सांगतो, सांभाळ स्वत:ला गंया वासनेने भरलेल्या जगात इथं कोणासाठी ना कोणी आडत नाही.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...