शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

174. अपघात

    कदाचित लिहणाऱ्याने हृदय बाजूला काढून ठेवले असेल. मी एका दुकानामध्ये खरेदी करत होतो. तेंव्हा मी त्या दुकानाच्या पैसे घेणाऱ्या माणसाला एका 5-6  वर्षांच्या मुलीबरोबर बोलत असताना पाहिले. तो दुकानातला माणूस म्हणाला, "माफ कर मुली. या बाहुलीला खरेदी कराण्याएवढे पैसे तुझ्याजवळ नाहीत. मग त्या छोट्याशा मुलगीने माझ्याकडे बघून मला प्रश्न केला, "दादा, तुम्हाला पण असे वाटते का की माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीत?" मी तिचे पैसे मोजले आणि म्हणालो, "होय मुली... तुझ्याजवळ ही बाहुली खरेदी करण्याइतके पैसे नाहीत. ती लहान मुलगी अजूनही ती बाहुली आपल्या हातात घेऊन उभी होती. त्यानंतर मला राहवलेच नाही. मी विचारले, "ही बाहुली तू कोणाला देणार आहेस?" त्यावर ती मुलगी म्हणाली की, "ही बाहुली माझ्या बहिणीला खूप आवडते आणि ती तिला तिच्या वाढदिवसाच्यावेळी देणार आहे." मुलगी म्हणाली, "पहिल्यांदा मी ही बाहुली माझ्या आईला देणार आहे आणि ती नंतर माझ्या बहिणीला देणार आहे." असे सांगत सांगत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. "माझी बहीण परमेश्वराजवळ गेली आहे. आणि माझे वडील सांगत होते की माझी आईपण तेथेच जाणार आहे. मग मी असा विचार केला की का नाही? माझी आईच ही बाहुली आपल्या जवळ घेऊन परमेश्वराजवळ गेल्यावर माझ्या बहिणीला देईल."
     माझ्या हृदयाला अचानक धक्काच बसला. ह्या सर्व गोष्टी तिने एका श्वासामध्ये सांगितल्या आणि माझ्याकडे बघत म्हणाली, "मी माझ्या वडीलांना सांगितले आहे की आईला सांगा की आता लगेच जावू नकोस. ती माझी मी दुकानातून येईपर्यंत वाट  बघेल. मग तिने मला एक प्रेमळ फोटो दाखवला की ज्यामध्ये ती खळखळून हसत होती. त्यानंतर ती मला म्हणाली, "माझी अशी इच्छा आहे की माझी आई हा फोटोसुध्दा आपल्याजवळ घेऊन जाऊ दे. कारण माझी बहीणीने मला विसरु नये. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते आणि मला नाही वाटत की ती मला असे एकटे सोडून जायला तयार होईल. पण वडील म्हणतात की आईला बहीणीकडे राहण्यासाठी जावेच लागणार. कारण माझी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे. खूपच लहान." तिने हळू आवाजात सांगितले. त्यानंतर तिने पुन्हा त्या बाहुलीकडे दु:खद नजरेने शांतपणे पाहिले. माझे हात लवकरात लवकर आपल्या पाकीटाजवळ गेले आणि मी म्हणालो, "चला... एक वेळ पुन्हा मोजून घेऊया की तुझ्याजवळ बाहुली खरेदी करायला पुरेसे पैसे आहेत की नाही?" ती म्हणाली, "ठीक आहे.. पण मला वाटते की कदाचित माझ्याजवळ पूर्ण पैसे आहेत." त्यानंतर मी तिची नजर चुकवत काही पैसे तिच्या पर्समध्ये ठेवले आणि पुन्हा आम्ही मोजयला सुरवात केली. आता हे पैसे तिच्या बाहुलीसाठी पुरेसे होते. एवढेपण नाही तर काही शिल्लक पण रहात होते. लहान मुलगी म्हणाली, "परमेश्वराचे लाखो-लाखो आभार, मला एवढे पैसे देण्यासाठी." मग तिने माझ्याकडे बघत मला सांगितले की, "काल रात्री झोपण्याच्या पूर्वी परमेश्वराजवळ प्रार्थना केली होती की मला ह्या बाहुलीला खरेदी करण्यासाठी पैसे द्या. कारण माझी आई ह्या बाहुलीला माझ्या बहीणीला देईल आणि परमेश्वराने माझे ऐकले." याव्यतिरिक्त मला आईसाठी एक पांढरा गुलाब खरेदी करण्यासाठी पैसे हवे होते. पण परमेश्वराजवळ एवढे पैसे मागण्याचे धाडस होत नव्हते. पण परमेश्वराने मला एवढे पैसे दिले आहेत की मी ह्या बाहुलीबरोबर एक पांढरा गुलाबपण खरेदी करु शकते. माझ्या आईला पांढरे गुलाब खूप आवडतात. "
     मग आम्ही तेथून निघालो. माझ्या डोक्यातून ती छोटीशी लहान मुलगी जात नव्हती. मग मला दोन दिवसांपूर्वीची एका वर्तमानपत्रातील बातमी आठवली ज्यामध्ये एका दारुड्या ट्रक चालकाविषयी लिहले होते ज्याने दारुच्या नशेत मोबाईलवर बोलता-बोलता एका महिला कार-चालक असलेल्या कारला टक्कर मारली होती. त्यामुळे तिची तीन वर्षांच्या मुलगीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि ती महिला कोमामध्ये गेली. आता एक महत्वाचा निर्णय त्या कुटुंबाला घ्यायचा होता की त्या महिलेला एका जीवन रक्षक नावाच्या मशिनवर बसवायचे की नाही? कारण ती कोमातून बाहेर येऊन बरी होईल अशा अवस्थेमध्ये नव्हती. दोन पाय, एक हात आणि निम्मा चेहरा तुटलेला होता. डोळ्यांची दृष्टी गेलेली होती. "काय हेच कुटुंब त्या मुलगीचे होते?" माझ्या शरीराचा प्रत्येक भाग थरथर कापत होता. माझी त्या लहान मुलीबरोबर झालेल्या मुलाखतीनंतर दोन दिवसानंतर मी वर्तमानपत्रात वाचले की त्या महिलेला वाचवू शकत नाही. मी स्वत:ला थांबवू शकलो नाही आणि वर्तमानपत्रात दिलेल्या पत्यावर जाऊन पोहोचलो जिथे त्या महिलेला शेवटच्या दर्शनासाठी ठेवले होते. ती महिल्या पांढऱ्या वस्त्रामध्ये होती. आपल्या हातामध्ये एक पांढरा गुलाब आणि त्या छोट्याशा मुलीचा हसत असलेला फोटो घेतला होता आणि तिच्या छातीवर ती लहान बाहुली ठेवली होती. माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. दुकानामध्ये भेटलेली ती मुलगी आणि समोर ठेवलेली मृत महिला यांच्या माझ्याशी काहीही संबंध नव्हता. परंतु शेवटी मी माणूसच आहे. हे सर्व बघितल्यानंतर स्वत:ला सांभाळणे एक आव्हानच होते. मी डोळ्यांत अश्रू घेऊन तेथून घरी परत आलो.
     त्या लहान मुलीचे तिच्या बहीणीसाठी आणि आईसाठी जे अमर्यादित प्रेम होते ते शब्दांत सांगता येणे कठीण आहे आणि अशामध्ये एका दारुड्या चालकाने त्याच्या स्वत:चया हलगर्जीपणामुळे काही क्षणातच त्या मुलीचे सर्वकाही हिसकावून घेतले होते. हे दु:ख रोज किती कुटुंबांचे असेल मला माहित नाही. कदाचित ही अविस्मरणीय घटना एक संदेश देऊ पाहते की, कृपया दारु पिऊन आणि मोबाईलवर बोलत-बोलत वाहन चालवू नये. कारण तुमचा आनंद कुणासाठीतरी शाप पण बनू शकतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...