एक होता वेडा राजकुमार फक्त तिच्यासाठी आणि
एक
होती स्वप्नपरी त्याच्या मनातली.
जशी
त्याला हवी
तशीच गोड
सोजवळ.
सुरवात कशी
झाली हे
दोघांनाही माहीत नव्हतं.
कधी
एकमेकांच्या प्रेमात अडकले यांवर त्यांचा विश्वास नव्हता.
पूर्ण त्याच्या आयुष्यात फक्त दुसऱ्यांसाठी जगलेला तो
आज
स्वत:साठी जगत होता. कारण ती त्याच्या
आयुष्यात आली
होती.
एक
वेगळाच क्षण अनुभवत होता तो
तिच्यासोबत.
ती
हसली की
हा
हसायचा,
ती
नाराज झाली की
हा
पण
नाराज व्हायचा.
तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा.
म्हणजे तिच्या आयुष्यातले सगळे दोर
त्याने स्वत:शी बांधले होते. तो तसा फार वैचारिक होता. आपलं घर, आई, बाबा, बहीण ह्याव्यतिरिक्त
त्याच्या मनात काही नव्हतं.
आईला एक
चांगले आयुष्य द्यायचा नेहमी त्याचा प्रयत्न असायचा.
बाबांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त करायचा आणि
सगळा भार
आपल्या खांद्यावर घ्यायचा असा
काही निश्चय करुन त्याने आपल्या भविष्याची आखणी केली होती आणि
ती
पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रवासही चालू होता.
बऱ्यापैकी तसं
झालंही होतं.
ती……
ती
फारच वेगळी होती सगळ्यांमध्ये.
छान
अशी
एक
खळी
पडायची तिच्या गालावर.
पहिल्यांदा तिथेच तो
भुलला होता स्वत:ला. एका स्वच्छंद
पक्षीसारखी होती.
स्वत:च्या अस्तित्वासाठी
जॉब
करायची घरातून प्रतिकार असतानाही.
स्वत:च्या पायावर उभे राहण्याची
उमेद होती.
खूप
बडबड करायची अगदी लहान मुलांसारखी.
लहानपण तिच्या बोलण्यातून वागण्यातून दिसून यायचं.
सुरवात झाली जानेवारीमध्ये. तो असाच मित्रांसोबत फिरायला गेला असताना बिअरची बाटली प्याला आणि तेवढ्यात तिचा फोन आला. त्याने कट करुन तिला संदेश केला की , “प्रिये, माझ्या मनात तुझ्यासाठी एक वेगळीच जाणीव होत आहे.माझे मित्र म्हणतात की हे प्रेम आहे. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय.” आणि तिला सांगितलं की मी बिअर प्यायलो. दुसऱ्या दिवशी मनात एक हुरहूर होती त्याच्या, “काय म्हणेल ती… कसा बोलू मी तिच्याशी…” नेहमीप्रमाणे तिचा फोन आला. तो तिला “माफ कर म्हणाला.” ती नजरअंदाज करत म्हणाली, “जाऊ दे रे ! बिअर प्यायल्यावर माणूस काहीही बडबडतो.” आता तिला कसं सांगणार की तेंव्हाच तो खरे बोलतो. त्याला राहवलं नाही. त्यानं तिला भेटायला बोलवलं आणि ती आलीही. एक गुलाबाचं फुल आतल्या खिशामध्ये ठेवून त्यानं तिला विचारलं, “होशील का माझी… माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे.” ती काहीशी शांत झाली आणि ठामपणे म्हणाली, “अरे, मला माफ कर. मी नाही हे स्वीकारु शकत. घरातून अडचणी आहेत खूप आणि मला प्रेम विवाह नाही करायचा आहे.” मी म्हटलं, “मग ठीक आहे. जसं तुला हवं तसं. मी नाही पुन्हा बोलणार या विषयावर. पण तुला कधीही वाटलं की माझ्याजवळ जावं तर खरंच ये. मी आता तुझ्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढं तेंव्हा ही असेन किंबहुना जास्तच. त्या दिवसाचा निरोप घेऊन महिना-दीड महिना उलटून गेला. फेब्रुवारी महिन्याची 21 तारीख संकष्टी होती. ऑफिसमधून निघाला. स्टेशनला उतरुन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. पहिला तर तिचा मॅसेज आला होता काहीसा असा, “माझ्याकडून हो आहे. “ त्याने रिक्षा आहे तिथेच थांबवायला सांगितली आणि उतरला अर्ध्यातच. आणि विचार केला मी असा की काय विचारलं होतं ज्याच्यासाठी ती हो म्हणाली. काही कळत नव्हतं नक्की कशासाठी. थोडासा शांत होऊन पुन्हा तिच्यासाठी रिप्लाय केला. “अगं… कशाबद्दल? … काय विचारलं होतं मी तुला… तू ठीक आहेस ना… तब्येत वगैरे ठिक आहे ना की चुकून मॅसेज आला हा.” तेंव्हा जे सगळ्यांना आपल्या प्रियसीकडून ऐकायचं होतं ते तिनं रिप्लाय केला की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. लव यू.” काही काळ त्याला कळेनासं झालं. त्याने मन तसाच रिप्लाय केला. “माझेसुध्दा तुझ्यावर प्रेम आहे.” खूप खूश होता तो. आनंद चेहऱ्यावर असा होता की आईपासून लपवता आलं नाही. आईने बरोबर ओळखलं त्याला आणि पटकन म्हणाली, “प्रेमात तर पडला नाहीस ना… प्रेमातलं स्मित हास्य दिसतेय.” मग त्याने घरातील सर्वांना सांगितले आणि घरातल्यांनी तिचा सून म्हणून तेंव्हाच स्वीकार केला.
ती हो बोलल्यानंतर
ते
दोघे पहिल्यांदा भेटणार होते.
ती
नाही म्हणाली तेंव्हा शर्टच्या आत
असलेला गुलाब तिथेच विलीन झाला होता.
तो
आज
पुन्हा नव्याने आला
होता.
आता
मात्र त्यानं हे
फूल
लपवून नाही ठेवलं.
हातातून घेऊन आला होता. ती आली… हसली…
नजर
फिरवली.
तसंच काही होतं याचही.
मग
देवाण घेवाण झाली.
बोलायची सुरवात कशी
करायची याचा विचार करत
असताना दोघांनाही आपल्या आयुष्याची पाने एकमेकांसमोर मांडण्यास सुरवात केली.
तेंव्हा जी
सुरवात झाली अजूनही ती
तशीच आहे.
तिच्यासोबत
ह्या महिन्यात त्याने नवीन आयुष्य जगायला सुरवात केली…
ती
रुसायची,
बोलायची,
तो
फक्त्
तिला मानवायचा.
खूप
वेळा असं
झालं माहित नाही का
ते?
असंच एक
दिवस बोलता बोलता ती
बोलून गेली की,
“का एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी नाहीये त्या योग्य? सांग ना, का…”
तेंव्हा तो
निरुत्तरीत होता.
पुन्हा ती
म्हणाली,
“अरे वेड्या, का असं करतोस. मी तुला माझ्यात गुंतू नये म्हणून रोज तुझ्याशी
भांडते.
रोज
तुला काही बोलते.
पण
तू
काहीच बोलत नाहीस.
निमूटपणे का
सहन
करतोस,
बोल
ना?
का?”
तेंव्हा तो
म्हणाला की,
“माझ्यासाठी
तेवढं महत्वाचे ते
नाही जेवढी तू
आहेस.
आणि
का
प्रेम करतो याचं उत्तर माहीत नाही पण
करतो खरं.
पण
आज
तू
हे
सगळं का
विचारतेस?
काय
झालं?”
ती
शांत झाली.
थोड्या वेळाने म्हणाली की,
“अरे, आपलं नाही पुढे काही होणार. माझ्या घरातले नाही मान्य होणार आपल्या प्रेमासाठी. खूप त्रास देतील तुला. तू तुझा मार्ग बघ. मला नाही आवडणार माझ्यामुळे
कोणाला त्रास झालेला भले
मी
आयुष्यभर त्रास सहन
करेन आणि
वेड्या मी
ही
तुझ्यावर जीवापाड प्रेम करते रे.
पण
मी
घरातल्यांना नाही दुखवू शकत.
सांग तूच,
आता
मी
काय
करु?
मला
नाही सहन
होत. बाबांकडे तुझा विषय जरी काढला तरी ते ओरडतात. त्यांना नाही आवडत तू. का?
ते
माहित नाही.
आणि
जर
मी
हट्ट केला आणि
जर
त्यांना काही झालं तर
मी
स्वत:ला माफ करु शकत नाही. बघ, मी तुला आठ दिवस देते आहे. तू म्हणशील तोच शेवटचा निर्णय असणार आहे . मला नाही काही मार्ग दिसत.”
त्याने सुध्दा तिची समजूत काढली आणि
म्हणाला,
“ठीक आहे. मी आहे ना… घेईन चांगला निर्णय पण
तू
शांत हो.”
तिच्या डोळ्यांत किंचित पाणी होतं जे
त्याला पाहून आडवलं होतं.
मनातलं सारं काही तिनं नेहमीसारखं लपवलं होतं.
खरं
तर
तो
फारच दुविधा मनस्थितीत होता.
कळत
नव्हतं,
काय
करावं?
काय
नाही?
तिच्याशिवाय किंचित न
राहणारा तो
भलत्याच निर्णयाच्या ओघात होता.
स्वत:चे मन मारुन त्याने तिच्यासाठी
एक
अवघड निर्णय घेतला होता जो
कदाचित तिलही अवघड जाणार होता.
पण
कदाचित परिस्थिती तशी
नव्हती.
म्हणून त्याने तिच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.
कारण ती
वडीलांना कधी
दुखवू शकत
नव्हती.
मग
तो
तरी
कसं
दुखवणार?
त्याला माहित होतं जर
तिला कायमचं जरी
बोलावलं असता स्वत:कडे तर ती वेड्यासारखी
आली
असती सगळी नाती तोडून.
पण
तिच्या मनात कुठेतरी एक
खंत
असती,
दु:ख असतं आणि त्यालाही
तसं
नकोच होतं.
त्याला कोणाला दुखवून आपल्या आयुष्याची सुरवात करायची नव्हती.
दिनांक एकवीस ऑगस्ट. अठरा महिने एकत्र राहून त्यानं तिला सांगितलं, “नाही जमणार ना
आपल्याला कोणाला दुखवायला. आपल्यांसाठी आपले
कुटुंब अधिक महत्वाचे आहे.
म्हणून तू तसंच कर
जे तुझे बाबा म्हणतील.
तसे आपलं काय……
वेळ थोडीच थांबतो कोणासाठी…
तो जातोच… खूप
दुखेल, त्रास होईल तुला-मला… एक
दिवस एक वर्षासारखा जाईल पण
आपण सहन करु.
हळूहळू सगळंच कमी होईल.” ती शांतपणे अडकत अडकत म्हणाली, “मला एक वचन हवं आहे तुझ्याकडून? देशील का?”
तो
म्हणाला,
“ठीक आहे. बोल.”
ती
म्हणाली,
“तू तुझं आयुष्य जगशील ना?
करशील ना आपली स्वप्न पूर्ण…
भले मग माझ्यासाठी दुसरं कोणी
असेलं तरी. आणि
तुला असंच करायचं आहे.
हेच मला वचन हवं
आहे तुझ्याकडून.”
भारावलेल्या डोळ्यांनी तो
पुटपुटला,
“हो गं,
जान… राहीन… इथे
प्रश्न फक्त जीवंत राहण्याचा आहे.
जगणं तर तू घेऊन
चालली आहेस. जिवंत काय
आपण कसेही राहतोच ना?
आई-बाबा आहेत.
त्यांच्यासाठी जगायचे आहेच की.
अजून माझी जबाबदारी कमी नाही
झाली. आणि राहिला प्रश्न स्वप्नांचा.
त्याची मी रात्रीच होळी पेटवून दिली
आहे. जर पुन्हा आलीस
माझ्याकडे तर पुन्हा नवीन
करुया.” त्यावर ती म्हणाली, “तू तशीच ठेव.
मला नाही जमणार त्यांच्यासोबत राहायला आणि
आभारी आहे. कदाचित कायमचे पाणी
दिलेस.” ती हसतच म्हणाली.
ती
भयाण शांतता होती दोघामध्ये काही वेळ.
अशा
वेळेचा निरोप घेऊन दोघे घरी
गेले.
खूप
रडले…
हसले…
फक्त लोकांसमोर,
दु:ख नाही दाखवून दिलं कोणाला. असाच मनात ठेवून काळाच्या
ओघात दोघेही असे
काही दिसेनासे झाले की
नियतीलाही त्यांचा ठाव
ठिकाणा नव्हता.
आजही त्या प्रेमाची रेषा त्याच्या आणि
तिच्या मनावर ओघळत्या जखमेसारख्या आहेत.
ज्या कधी
कोणासमोर आल्या नाहीत.
ना
कधी
कोणासमोर मांडल्या.
प्रश्न आहे
नियतीबद्दल आणि
तिच्या एका
वाक्याबद्दल,
नियतीला हेच
हवं
होतं का?
ती
नेहमी म्हणायची की
“जो भी होता है, अच्छे के लिए होता है……”
ह्यामधून काय
चांगलं झालं?
त्याच खरंच काही चुकलं का
या
निर्णयामध्ये?
खूप
सारी प्रश्न अधुरीच राहिली ह्या प्रेमकहाणीसारखी…
!!!
सुरवात झाली जानेवारीमध्ये. तो असाच मित्रांसोबत फिरायला गेला असताना बिअरची बाटली प्याला आणि तेवढ्यात तिचा फोन आला. त्याने कट करुन तिला संदेश केला की , “प्रिये, माझ्या मनात तुझ्यासाठी एक वेगळीच जाणीव होत आहे.माझे मित्र म्हणतात की हे प्रेम आहे. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय.” आणि तिला सांगितलं की मी बिअर प्यायलो. दुसऱ्या दिवशी मनात एक हुरहूर होती त्याच्या, “काय म्हणेल ती… कसा बोलू मी तिच्याशी…” नेहमीप्रमाणे तिचा फोन आला. तो तिला “माफ कर म्हणाला.” ती नजरअंदाज करत म्हणाली, “जाऊ दे रे ! बिअर प्यायल्यावर माणूस काहीही बडबडतो.” आता तिला कसं सांगणार की तेंव्हाच तो खरे बोलतो. त्याला राहवलं नाही. त्यानं तिला भेटायला बोलवलं आणि ती आलीही. एक गुलाबाचं फुल आतल्या खिशामध्ये ठेवून त्यानं तिला विचारलं, “होशील का माझी… माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे.” ती काहीशी शांत झाली आणि ठामपणे म्हणाली, “अरे, मला माफ कर. मी नाही हे स्वीकारु शकत. घरातून अडचणी आहेत खूप आणि मला प्रेम विवाह नाही करायचा आहे.” मी म्हटलं, “मग ठीक आहे. जसं तुला हवं तसं. मी नाही पुन्हा बोलणार या विषयावर. पण तुला कधीही वाटलं की माझ्याजवळ जावं तर खरंच ये. मी आता तुझ्यावर जेवढे प्रेम करतो, तेवढं तेंव्हा ही असेन किंबहुना जास्तच. त्या दिवसाचा निरोप घेऊन महिना-दीड महिना उलटून गेला. फेब्रुवारी महिन्याची 21 तारीख संकष्टी होती. ऑफिसमधून निघाला. स्टेशनला उतरुन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. पहिला तर तिचा मॅसेज आला होता काहीसा असा, “माझ्याकडून हो आहे. “ त्याने रिक्षा आहे तिथेच थांबवायला सांगितली आणि उतरला अर्ध्यातच. आणि विचार केला मी असा की काय विचारलं होतं ज्याच्यासाठी ती हो म्हणाली. काही कळत नव्हतं नक्की कशासाठी. थोडासा शांत होऊन पुन्हा तिच्यासाठी रिप्लाय केला. “अगं… कशाबद्दल? … काय विचारलं होतं मी तुला… तू ठीक आहेस ना… तब्येत वगैरे ठिक आहे ना की चुकून मॅसेज आला हा.” तेंव्हा जे सगळ्यांना आपल्या प्रियसीकडून ऐकायचं होतं ते तिनं रिप्लाय केला की, “माझं तुझ्यावर प्रेम आहे. लव यू.” काही काळ त्याला कळेनासं झालं. त्याने मन तसाच रिप्लाय केला. “माझेसुध्दा तुझ्यावर प्रेम आहे.” खूप खूश होता तो. आनंद चेहऱ्यावर असा होता की आईपासून लपवता आलं नाही. आईने बरोबर ओळखलं त्याला आणि पटकन म्हणाली, “प्रेमात तर पडला नाहीस ना… प्रेमातलं स्मित हास्य दिसतेय.” मग त्याने घरातील सर्वांना सांगितले आणि घरातल्यांनी तिचा सून म्हणून तेंव्हाच स्वीकार केला.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा