एका माणसाचा मृत्यू झाला. जेंव्हा त्याला जाणवले तेंव्हा त्याने बघितले की परमेश्वर
त्याच्या जवळ येऊ लागले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक सूटकेस आहे. परमेश्वर
म्हणाले, "बाळा, चला... आता वेळ झाली आहे." आश्चर्यचकित होऊन माणसाने
उत्तर दिले, "आता एवढ्या लवकर. आता तर मला खूप काम करायचे आहे. मला माफ करा
पण आता जायची वेळ नाही. आपल्याजवळ असलेल्या सुटकेसमध्ये काय आहे?"
परमेश्वर म्हणाले, "तुझे साहित्य." "माझं साहित्य? तुम्हाला असे म्हणायचे आहे की माझ्या वस्तू, माझे कपडे, माझा पैसा."
परमेश्वर यावर उत्तर देत म्हणाले, "ह्या वस्तू तुझ्या नाहीत. ह्या तर
पृथ्वीशी संबंधित आहेत." माणसाने विचारले, "माझ्या आठवणी?" परमेश्वराने उत्तर दिले, "त्या तर कधीच तुझ्या नव्हत्या. त्या
तर वेळेच्या होत्या. " माणूस म्हणाला, "मग तर ही माझी बुध्दीमत्ता
असेल." परमेश्वराने परत पुन्हा उत्तर सांगितले, "ती तर तुझी कधीच
नव्हती. ती तर परिस्थितीजन्य होती." "मग हे माझे कुटुंब आणि मित्र असतील?" परमेश्वराने उत्तर दिले, "क्षमा कर... ते तर कधीच तुझे
नव्हते. ते तर प्रवासात भेटणारे जोडीदार होते." मग तो मनुष्य म्हणाला, "
मग तर हे निश्चितपणे माझे शरीर असणार?" परमेश्वराने
स्मित हास्य करत सांगितले, "ते तर तुझे कधी होऊ शकत नाही. त्याची राख झाली
आहे." मनुष्य म्हणाला, "मग काय... हा माझा आत्मा आहे?" "नाही... तो तर माझा आहे." परमेश्वर म्हणाले. घाबरुन
त्या माणसाने परमेश्वराच्या हातून सूटकेस घेतला आणि त्यामध्ये काय आहे हे
पाहण्यासाठी त्याला उघडले. तो सूटकेस रिकामा होता.
माणसाच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि तो म्हणतो, "माझ्याजवळ काहीच नव्हते." परमेश्वराने उत्तर दिले, "हेच सत्य आहे. अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतंच. माणूस - मग त्या सगळ्याचा अर्थ काय ?? "जीवन हे क्षणभंगुर आहे.. फक्त जगा..प्रेम करा.. माणसं जोड़ा.." आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच घमेंड करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... " मृत्यु नंतरचं हेच कडव सत्य 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 2:-"समाज" स्मशाना पर्यंत 3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त "कर्म" ईश्वरा पर्यंत. प्रत्येक क्षण जो तू जगलास तोच खरा होता. आयुष्य क्षणभंगुर आहे आणि ते प्रसंगच तुझे आहेत. त्यामुळे जो पण वेळ तुमच्याजवळ आहे त्या वेळेसोबत भरपूर जगा. वर्तमानकाळात जगा. आपले आयुष्य जगा. सुखी राहणे कधी विसरु नका ह्याच एका गोष्टीला महत्व आहे. भौतिक वस्तू आणि ज्या सर्व वस्तूंसाठी आपण येथे लढतो, कष्ट करत असतो.... तुम्ही येथून काहीच घेऊन जाऊ शकत नाही. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन."
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा