आम्ही
शाळेच्या समारंभाची तयार करत होतो. कारण खूप वर्षांनी सर्वजण एकत्र मिळणार होते.
पण तो तर खास करुन तिची वाट पहात होता. कारण तो तिला 15 वर्षांनी भेटणार होता. पण भिती वाटत होती
की तिला आमंत्रण मिळाले असेल का?
संध्याकाळ झाली. सर्व मित्र-मैत्रिणी जमा झाल्या पण
ह्याच्या नजरा दरवाज्याजवळच होत्या. कदाचित देवालाही त्या दोघांना एकमेकांना
मिळवायचे असेल. त्याच दिवशी ती तिच्या घरी येते. तिच्या आईची तब्येत ठीक नसते व
तेंव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत येते. तेंव्हा तिला समजते आणि तिच्या नवऱ्याच्या
सांगण्यावरुन ती त्या समारंभामध्ये येते.
तिचे नांव रिधी. सर्वात सुंदर दिसत होती व
रंगाने गोरी असल्यामुळे तर ती अजूनच सुंदर दिसत होती. हा तर तिला पाहतच राहिला व
त्याला त्याच्या लहानपणीची आठवण येऊ लागली. कसे ते शाळा सुटल्यावर तिला आंब्याच्या
झाडाखाली भेटत असे व तिथे दोघे बसून गप्पा मारत असे व गितार बरोबर गाणी बोलून तिला
खूश करत असे.
पार्टीची सुरवात होते. हा नेहमीसारखा
हातामध्ये गितार घेऊन... तुने मेने जाना कभी नहीं, ईश्क मेरा... दर्द मेरा... आशिक
तेरा... भीड मैं खोया रहता हूँ... अजूनही निधी त्याच्यावर प्रेम करत असते व ती
सुध्दा अकेले... अकेले... रह गयी, बिन तेरे यूँ.. अकेले.... मैं तडपू या मैं तरसू
या चली आऊँ पास तेरे... इतनी तयारी है... जिंदगी... खो गयी... बातें करने सारी...
आ रही हॅूं... तुझ से ही... हो... मैंने मेरे जाना... अब हैं जाना इश्क तेरा...
दर्द तेरा... त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले. कधी
एकमेकांना भेटतात असे झाले होते. भेटण्याचे ठिकाण नेहमीचे... आंब्याचे झाड... हा
अगोदरच तिथेच तिची वाट पहात होता. निधी मात्र घरातून खोटं बोलून आली होती. ती
म्हणाली, "कसा आहेस?" मी
म्हणालो, "मी आहे गं व तू येणार या आशेवरच अजून जगत आहे. ते जाऊ दे. तुझा
नवरा कसा आहे आणि तू खूश तर आहेस ना?" ती म्हणते,
"खूप प्रेम करतो रे माझ्यावर आणि मी पण करते. पण काय माहिती मनामध्ये फक्त
तुझाच विचार येतो रे... खूप प्रयत्न केला तुला विसरण्याचा रे पण नाही जमले
मला."
खूप उशीर विचार केल्यानंतर दोघेही घरातून पळून
जाण्याचा निर्णय घेतात. दिवसही ठरला. तो गाडी घेऊन तिची वाट पाहत निघताना मात्र तिने
तिच्या नवऱ्याला सांगितले की मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही. कारण माझे पहिल
प्रेम मी नाही विसरु शकत. तिचा नवरा म्हणाला, "मला माहित होते की हे असे
होणार. कारण पार्टीच्या वेळी तू त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होतीस ते व नंतर
तुझ्या मित्र-मैत्रिणींकडून समजले. पण मी विचार केला की तो तर तुझा गेलेला काळ
होता व मी आताचा काळामध्ये जगणारा माणूस आहे. मला वाटले की या दिवसामध्ये मी तुला
इतके प्रेम देईल की तुला त्याची आठवणच येणार नाही. माझे अश्रू पापण्याचा आड लपवून
तुला नेहमीच सुख देण्याचा प्रयत्न मी करीन. खरे म्हटले आहे प्रेमापेक्षा मैत्री
श्रेष्ठ असते. जा गं तू... खरंच जा... कृपया आणि खूप खूश रहा... तिथे...
अमर तिची वाट पहात होता. ती येताच तिला तू
ठीक आहेस? असे
विचारले. ती हो म्हणाली. गाडीमध्ये बसल्यावर तिला अचानक तिच्या नवऱ्यासोबत जे काही
क्षण घालवले ते आठवले व त्यामुळे ती रडू लागली व तिने त्याला सांगितले की कृपया
कार थांबव आणि मला माझ्या घरी सोड. कारण मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकत.
कृपया...कृपया मला घरी सोड. अमर तिला घेऊन गेला व नवऱ्याला पाहताच तिने त्याला
मिठी मारली व त्याच्या मिठीमध्ये रडू लागली.
अमर मात्र रडतच राहिला. त्याला कोणाच्यातरी मदतीची गरज होती. तो
घरी जाऊन त्याने त्याच्या आईला मिठी मारली व रडत रडत आईला म्हणाला, "माझे
पहिले प्रेम अपूर्ण राहिले. मी नाही समजावू शकलो तिला आई. पण मी खूप खूश आहे. कारण
तिला खरंच खूप चांगला जीवनसाथी मिळाला आहे आणि तो माझ्यापेक्षा जास्त प्रेम
करतो. लेखिका - कल्पना जोशी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा