गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

126. प्रेमावरचा विश्वास

        एके दिवशी देव पृथ्वीवर प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी एक खुर्ची पाठवितो. ती खूर्ची खूप खास असते. कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खरं बोलला तर त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो आणि त्या खुर्चीवर बसून जर खोटं बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो. मुलगा त्या खुर्चीवर बसतो.
मुलगी : तू माझ्यावर प्रेम करतोस?
मुलगा : हो, मी तुझ्यावर प्रेम करतो. (लगेचच लाल दिवा पेटतो. मुलगा घाबरतो.)
मुलगी : घाबरु नकोस. देवाची काहीतरी चूक झाली असेल ही खुर्ची बनवताना. आपण परत
            एकदा प्रयत्न करुन बघू. मुलगा परत त्या खुर्चीवर जाऊन बसतो.
मुलगी : तु माझ्यावर प्रेम करतोस का?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो. (लगेच हिरवा दिवा पेटतो.)
काही कळलं का तुम्हाला?
     जेंव्हा तो मुलगा पहिल्यांदा खुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाचं त्या मुलीवर खरं प्रेम नव्हतं. पण जेंव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असलेला विश्वास पाहिला तेंव्हा तो तिच्यावर खरंखुरं प्रेम करु लागला. यालाच म्हणतात प्रेम……
     म्हणून लक्षात ठेवा एकतर्फी प्रेमसुध्दा यशस्वी होऊ शकतं. फक्त तुमचा तिच्यावर/त्याच्यावर असलेला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिजे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...