बसमधून सकाळी
प्रवास करताना एक अनुभव आला तो सांगतो. रोजच्याप्रमाणे बसमध्ये गर्दीच होती. मी
बसमध्ये चढलो. माझ्या मागोमाग एक म्हातारे आजोबा चढले. बाळा, मला जरा पुढे जाऊ दे
असे म्हणताच मी त्यांना पुढे जायला जागा दिली. पण तिथे एक सीट रिकामी होती.
गर्दीने भरलेल्या बसमध्ये ती एकच सीट रिकामी होती. खिडकी जवळची सीट... आणि त्या
सीटच्या बाजूला सीटवर एक तरुण मुलगी बसली होती. त्या आजोबांनी तिला त्या सीटवर
बसायला सांगितले. आजोबा, "पोरी, थोडं सरकतेस का? मला बसू दे इथे." मुलगी म्हणाली,
"दिसत नाही का तुम्हाला ? त्या सीटवर पावसाचे पाणी
पडलंय ते?" आजोबा म्हणाले, "पोरी मला इथेच थोडं
पुढे उतरायचे आहे. थोडं बसू दे." मुलगी म्हणाली, "एकदा सांगून कळालं
नाही का? की वयानुसार अक्कल पण गेली?"
हा सर्व प्रकार माझ्या समोरच होत होता. तिने एवढ्या उलट भाषेत बोलल्यावर माझी
सटकली. पण मी त्या मुलीला काही बोललो नाही. सरळ माझ्या खिशातून रुमाल काढला आणि ती
सीट आजोबांना पुसून दिली. आणि त्यांना बसायला सांगितले. माझा हा प्रकार बघून तिची
तिला लाज वाटली असावी. कारण तिने लगेच मान खाली घातली. आजोबा म्हणाले, "अरे,
पोरा काय गरज होती. मला इथे पुढेच उतरायचे आहे". मी म्हणालो, "बाबा, बसा
ओ... उतरेपर्यंत बसा... काही लोकांना सुंदरतेचा माज असला तरी माणुसकी
सुंदरतेपेक्षा मोठी असते." मी नकळत तिला टोमणा मारला. तेवढ्यात ती माझ्याकडे
मान वर करुन रागाने बघायला लागली. आजोबा म्हणाले, "बर पोरा, बसतो मी.
तुझ्यासारखा विचार सर्वांनीच केला तर काहीतरी भल होईल रे तरुण पिढीचं. खूश रहा
बाळा."
एकमेकांना सहकार्य करायला शिका. मग काय फरक पडतो की समोरचा व्यक्ती ओळखीचा आहे की परका, रक्ताच्या नात्यातला आहे की मानलेला. चांगले कर्म करा, देव त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देईल.
एकमेकांना सहकार्य करायला शिका. मग काय फरक पडतो की समोरचा व्यक्ती ओळखीचा आहे की परका, रक्ताच्या नात्यातला आहे की मानलेला. चांगले कर्म करा, देव त्याचे फळ तुम्हाला नक्कीच देईल.
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा