शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

157. कवीच्या शब्दांची ताकद

          एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला होता. त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. तो एवढा दरिद्री होता की त्याला अश्रू देखील महाग झाले होते. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही. एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला. खिशात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर पडतो. त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे आणि त्याच्या करुण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले असतात. हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, मित्रा, मी एक लेखक आहे ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? भिकारी म्हणतो, साहेब, माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा. तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातोत्या क्षणापासून भिकाऱ्याच्या लक्षात येतं की, एकदम जाणाऱ्या येणाऱ्यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय. थोड्याच वेळात तिथे पैशांची रास जमते. तो भिकारी बैचेन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते.  तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दलमी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील. तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.
वसंत ऋतू, बहारलेली सृष्टी आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.
     भिकाऱ्याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात. आयुष्य कोणी जास्त जाणलं? या ओळी लिहणाऱ्या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी? की इतक्या वर्षी रडणाऱ्या त्या भिकाऱ्यानं? तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल... पण जर तुमची वाणी गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल... माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) 2 वर्ष लागतात... पण "काय बोलावे?" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते... ओढ म्हणजे काय? हे जीव लावल्याशिवाय कळत नाही... प्रेम म्हणजे काय? हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही... विरह म्हणजे काय? हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही... जिंकण म्हणजे काय? हे हरल्याशिवाय कळत नाही... दुःख म्हणजे काय? हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही... सुख म्हणजे काय? हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही... समाधान म्हणजे काय? हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही... मैत्री म्हणजे काय? हे ती केल्याशिवाय कळत नाही... आपली माणस कोण? हे संकटांशिवाय कळत नाही... सत्य म्हणजे काय? हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही... उत्तर म्हणजे काय? हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही... जबाबदारी म्हणजे काय? हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही... काळ म्हणजे काय? हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही... 🎭 मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात. जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...