शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

179. परमेश्वराचे नियोजन अगदी अचूक असते

 

मी

:-

परमेश्वरा, मी तुला एक प्रश्न विचारु का?

परमेश्वर

:-

खात्रीने...

मी

:-

मला वचन दे... तू चिडणार नाहीस.

परमेश्वर

:-

मी वचन देतो.

मी

:-

आज माझ्या दिवसामध्ये इतके वाईट का घडले?

परमेश्वर

:-

तुला काय म्हणायचे आहे?

मी

:-

ठीक आहे. मी दररोज लवकर उठायचो पण आज उशीरा उठलो.

परमेश्वर

:-

होय.

मी

:-

माझी कार सुरु व्हायला खूप वेळ लागला.

परमेश्वर

:-

ठीक आहे.

मी

:-

सकाळी नाष्टाच्यावेळी माझे सँडवीच खराब होते. त्यामुळे मला वाट बघावी लागली.

परमेश्वर

:-

हम्म्म्म्म...

मी

:-

रस्त्यावरुन जात असताना जेंव्हा माझा फोन वाजला तेंव्हा मी तो घेण्यासाठी उचलला पण तो स्वीच ऑफ झाला.

परमेश्वर

:-

बर....

मी

:-

संध्याकाळी जेंव्हा मी घरी आलो तेंव्हा फ्रेश होण्यासाठी हीटर चालू केला पण तो लागत नव्हता. त्यामुळे मला गरम पाणी मिळाले नाही. दिवसभर काहीच चांगले झाले नाही. तू असे का केलेस?

परमेश्वर

:-

मला जर पाहू दे. सकाळी मृत्यूदेवता तुझ्या बेडजवळ होती. त्यामुळे तुला काही होऊ न देण्यासाठी व तुझे आयुष्य वाचवण्यासाठी मी माझ्या चांगल्या दूताला त्याच्याबरोबर लढण्यासाठी पाठवले. त्यामुळे तुला मी झोपू दिले व तू उशीरा उठलास.

मी

:-

ओह....

परमेश्वर

:-

तुझी कार लवकर चालू होऊ दिली नाही. कारण तू ज्या रस्त्यावरुन जाणार होतास त्या रस्त्यावर एक दारु पिलेला ड्रायव्हर कार चालवत होता जो की तुला धडकून उडवून टाकू शकत होता जर तू रस्त्यावर असतास तर...

मी

:-

(मला लाज वाटल्यासारखे झाले)

परमेश्वर

:-

ज्या पहिल्या व्यक्तीने तुझे सँडवीच बनवले तो आजारी होता. त्यामुळे ते तयार करत असताना त्याचा परिणाम तुझ्यावर होऊ नये म्हणून दुसऱ्या व्यक्तीने ते तयार करेपर्यंत तुला वाट पहावी लागली. जर ते तू खाल्ले असतेस तर त्याचा शरीरावर परीणाम झाला असता. मला चांगले माहित आहे तुला काम चुकवून रहायला अजिबात आवडत नाही.

मी

:-

(गोंधळून...) ठीक आहे.

परमेश्वर

:-

तुझा फोन स्वीच ऑफ झाला. कारण जी व्यक्ती तुला कॉल करत होती ती तू कॉलवर जे काही सांगणार होतास ते खोट्या साक्षीसाठी एका केसमध्ये तुला फसवणार होती. मला तुला त्याच्याबरोबर बोलू द्यायचे नव्हते. म्हणून तसे केले.

मी

:-

(हळूवारपणे...) मी ऐकत आहे परमेश्वरा.

परमेश्वर

:-

आणि त्या हीटरच्या बाबतीत सांगायचे झाले तर तो शॉर्ट झाला होता. त्यामुळे कदाचित घरातील सर्व लाईट जाण्याची शक्यता होती. मला तुला संपूर्ण रात्र अंधारात ठेवायचे नव्हते. म्हणून तो चालू झाला नाही.

मी

:-

मला माफ कर परमेश्वरा...

परमेश्वर

:-

माफी मागू नकोस... फक्त माझ्यावर विश्वास ठेव... सर्व गोष्टींमध्ये जसे की चांगल्या आणि वाईट...

मी

:-

मी तुझ्यावर विश्वास ठेवेन.

परमेश्वर

:-

आणि आजच्या तुझ्या नियोजनापेक्षा माझ्या नियोजनावर कधीही शंका घेऊ नकोस.

मी

:-

मी तशी शंका कधी घेणार नाही आणि मला फक्त सांगू दे.... आज सर्वकाही असे घडवलेस त्याबद्दल आभारी आहे.

परमेश्वर

:-

ठीक आहे माझ्या बाळा... तो फक्त एक दिवस होता आणि मला माझ्या बाळांना प्रेमळ व चांगल्या रुपात पहायला आवडते. 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...