सोमवार, ९ जानेवारी, २०२३

141. नशीबापेक्षा स्वत:च्या निर्मितीवर जास्त विश्वास ठेवावा

    या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरॉईन आहे नमिता. दोघांचाही जन्म एकाच दिवशी  एकाच हॉस्पीटलमध्ये झाला. त्या हॉस्पीटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं. तेंव्हाच त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. तेंव्हा ते दोघेही एकाच वेगळ्या उर्जेने थरारले. कदाचित त्यानं तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं असावं. सागरचे आई-वडील हे मूळचे पुण्याचे आणि नमिताचे कोल्हापूरचे. आज त्या दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या उदंड आयुष्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदीरात घेऊन आलेत. नमितालासुध्दा तिचे आई-वडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदीरात घेऊन आलेत. दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरचा स्पर्श होतो जो पहिल्यांदा दवाखान्यात झाला होता. तिने त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल केली. तेंव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की हीने मला ओळखलंय. ही त्यांची दुसरी भेट. परमेश्वरसुध्दा काय घडवून आणतोय हे कोणाला कळलंय का?
          तिसरी भेट ह्यापेक्षा मजेदार आहे. त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालंय. आज कॉलेजचा पहिला दिवस. दोघांनाही यायला खूप उशीर झालायं. (उशीर तर व्हायचाच ना, नाहीतर नशीब पुढचा खेळ कसा खेळणार?) दोघेही क्लासकडे धावताहेतधावताहेतधावताहेत… (अतिशय मंद गतीने म्हणजेच स्लो मोशन असा विचार करा) आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातून पडलेलं पुसतक तो तिच्या स्लो मोशनमध्ये उडणाऱ्या केसांकडे बघत देत असतो. त्याचा हाताचा स्पर्श तिला होताच दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.  नमिता राहून सागरला विचारते, आपण आधी कधी भेटलोय का? सागर म्हणतो, माहीत नाही. पण मलाही तसंच वाटतंय. आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते. मग हळूहळू हीच मैत्री प्रेमात बदलते. एकमेकांना चोरुन भेटणं, भेटवस्तू देणं, तिला फुले आणून देणं हे तर कायमचंच झालं.
     त्यांचं प्रेम जोरावर असताना मग अचानक नशिबाने चाके उलट्या दिशेने फिरवली. तिची काळजीखातर विचारलेली प्रश्न याला कमी लेखल्यासारखी वाटू लागली. परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं यांमुळे नमिताला तो मला टाळतोय असे वाटू लागले. एकमेकांच्या वाटेवर डोळे लावून बसणारे ते आज एकमेकांच्या वाटेवरुन जाणे टाळू लागले. आज त्या दोघांनी ब्रेकअप केला जो मनातून आधीच झाला होता. नशीब आज त्यांच्यावर हसत होतं. होतं काय? आणि झालं काय? शिक्षण संपल्यानंतर दोघांचही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी. आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता तर येणार नाही पण त्यांना जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलंय.
       आज 1993… त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीय. नशीबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत. पण वेगवेगळ्या डब्यात बसले आहेत. दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. तेवढ्यात ट्रेनमध्ये धडाम करुन स्फोट झाला. होत्याचं नव्हतं झालं. अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या त्या बाम्बस्फोटामध्ये मृत लोकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सागर आणि नमिता यांचीही नावे होती. त्यांचे शव बचावकार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुध्द दिशेला नेत असताना त्यांच्या हातांचा स्पर्श जेंव्हा एकमेकांना होतो तेंव्हा त्याच स्पर्शातील उर्जेने त्यांचे शरीर पुन्हा एकदा थरथरतात. तेंव्हा त्या शव नेणाऱ्यांना वाटते की हे जीवंत असावेत. पण पूर्ण तपासणी अंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यू झालाय. जन्माची सुरवात त्या एका गोड स्पर्शाने होते. शेवटही अशाच स्पर्शाने होतो. मात्र यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते. खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतं……
      नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या निर्मितीवर जास्त विश्वास ठेवावा. कारण तुम्हाला या गोष्टीची जाणीव कधी नसते की तुम्ही काय करु शकला असता किंवा काय करु शकता आणि मग नंतर नशीबाला दोष देत बसता.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...