रविवार, ३० मार्च, २०२५

1824. टॅक्सी

    शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कुणीच कामाला सुरवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्याप्रमाणं आजही सुरवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता. माझ्या टेबलवरला तो कावळ्यासारखा काळाकुट्ट फोन केकाटला. हा लँडलाईन सेट सात वर्षांपूर्वी घेतला होता. मालकाला तो ‘लकी’, म्हणून अजून तसाच आहे.
“नमस्कार, दैनिक दिनकर… बोला!”
“चीफ एडिटर?”
“हां, बोलतोय…”
“काहो? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे, जी तुम्हाला हवं त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तिथं नेते !”
“अहो, अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी टॅक्सी कशी असू शकते?”
“नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले. तुम्हाला अश्या बातम्या माहीत असत्यात !”
“अशी काही अधिकृत बातमी आत्तापर्यंत तरी आमच्यापर्यंत आलेली नाही. आली, तर उद्या पेपरात तुम्हाला नक्की दिसेल. धन्यवाद.”
मी फोन कट केला. काय एक एक महाभाग असतात? काय तर म्हणे, ‘तुम्हाला हवं त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहात, तिथं नेते!’ अशी टॅक्सी…!!!
पुन्हा फोन वाजला. 
“नमस्कार…”
“नक्की अशी टॅक्सी नाही ना?” मघाचाच आवाज. 
हा मुडदा समोर असता, तर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता. एकदा सांगून कळत का नाही?
“अहो, कितीदा सांगायचं…???”
“नाही, म्हणजे तो धुमाळ म्हणत होता… पण तो खोटं बोलत असेल.”
मी काही सुनवायच्या आत त्यानंच फोन बंद केला. दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली… साला वैताग ! मी रागानं रिसीव्हर उचलला.
“अबे, भाड्खाऊ……”
“तोड सांभाळा कुलकर्णी ! मी देवधर बोलतोय…”
देवधर माझा बॉस !
“सॉरी सर , एक फोन मघापासनं……”
“उद्या बेंगलोरला सकाळी नवाला एडिटर्स मिट आहे. आपले सारे फॉरेन कोरसपॉडंट येणार आहेत. तुम्ही मुंबई रिप्रेझेन्ट करा… बाय.”
माझा ‘हॅव अ गुड डे…’ न ऐकताच बाबानं फोन कट केला. बोंबला… म्हणजे आज झोपेचं खोबरं !
लॅपटॉप जवळ ओढला. बेंगलोर फ्लाईट बुक केली. पहाटे चारचा डिपार्चर होता. दोन तास घरापासून एअरपोर्ट. तासभर चेक-इनसाठी आणि अर्धा तास बफर. म्हणजे रात्री बारा ते एकच्या दरम्यान घर सोडायला पाहिजे!
कॅब बुक केली. पुन्हा फोन किंकाळला. हे दिवसभर चालू असतं. 
“नमस्कार, दैनिक दिनकर… बोला !”
“मी डॉ. अभ्यंकर. मला एक थँक्स द्यायचे आहेत, एका अननोन टॅक्सी ड्रायव्हरला…”
डॉ. अभ्यंकर म्हणजे मुंबईतलं बडं प्रस्थ ! नामवंत न्यूरोसर्जन. अन् फोनवर!
“बोला डॉक्टर साहेब, काय झालं?”
“गोष्ट काल रात्रीची आहे… माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली. घरचा पत्ता ड्रायव्हरला सांगून गाडीत बसलो. गाडी थांबली. मी उतरलो… पण ते माझं घर नव्हतं !
“माझ्यासमोर नुकत्याच एक प्रवासी बसचा अपघात झाला होता. लोक विव्हळत होते, काही मदतीसाठी टाहो फोडत होते. परिस्थितीची मला जाणीव झाली. मी माझ्या हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, ॲम्ब्युलन्सला भराभर फोन केले.
“काही वेळात सरकारी फौज आली. तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो. फार नाही पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली.
“माझी नेमकी जिथं गरज आहे, तिथं मला पोहोचवणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरचे आभार मानायचे आहेत. या गडबडीत त्याचं भाडं पण द्यायचं राहून गेलंय ! प्लिज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या आणि हो, त्या ड्रायव्हरला मला भेटण्याचं अपील करा !”
“जरूर… ती मी सोय करतो.”
‘थँक्स’ म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मघाशी त्या बावळट माणसाचा फोन आणि हा डॉक्टर अभ्यंकरांची बातमी…! सत्य की योगायोग? मी एक छोटी नोट तयार केली…
“आनंऽऽद…!” माझ्या असिस्टंटला आवाज दिला. 
“सर…?”
“आनंद, एखादी फिलरसाठी आलेली चारोळी, कविता कमी कर. ही नोट नजरेखालून घाल आणि पेपरला घे. आणि हो, मी आता निघतो. उद्या बेंगलोरला मिटिंगसाठी जायचंय. थोडी झोप काढतो.”
“ओके सर!”
मी टेबलवरला पसारा आवरून निघालो. 
                                                                                                                                               —🌼—
              
“का रे… आज दुपारीच परतलास? बरं नाही की काय?” अंजलीनं दार उघडताच विचारणा केली. 
“अगं, सगळं ठीक आहे… प्रकृती पण मस्त आहे.”
“मग?”
“उद्या बेंगलोरला मिटिंग आहे. पहाटे चारची फ्लाईट आहे. झोपेचं खोबरं होणार. जमेल तेव्हढी दुपारी झोप काढावी, म्हणून लवकर आलो.”
“मला वाटलं माझी आठवण.”
“अंजली, तू माझ्या आत्मा… जीव की प्राण… जान… जिंदगी आहेस ! तू नेहमीच माझ्यासोबत असतेस!”
“बस, बस… नको इतकं प्रेम उतू घालवूस… जेवलास का? नसलास तर जेवून घे. ताक केलंय… पी आणि झोप.”
मी बेडरूमकडे मोर्चा वळवला. कपडे बदलले. ताक प्यालो अन् झोपी गेलो. 
                                                                                                                                           
—🌼—
अंजलीनं उठवलं तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते. फ्रेश झालो. 
“चल अंजू, जेवून घेऊया… मग तू झोप.”
“नको, मी आज जेवणार नाहीये. अरे दुपारपासनं छातीत जळजळतंय… थोडं दूध पिऊन झोपणारेय.”
अंजलीचं हे नेहमीचं आहे. अरबट-चरबट खाते अन् मग पित्त होत, डोकं दुखतं.
मी जेवून घेतलं. थोडी मीटिंगची तयारी करायची होती, त्याच्या नादी लागलो. 
कॅबला रात्री बरोबर बारा-वीसला येण्यासाठी बजावलं होतं आणि बारा-वीसला कॅब दाराबाहेर थांबली.
अंजलीचा नुकताच डोळा लागला होता. तिला उठवणं जीवावर आलं. जवळच्या चावीनं घराचं मेन डोअर लॉक करून टॅक्सीत बसलो.
आभाळ भरून आलं असावं. हवेत उष्मा वाढला होता. टॅक्सीच्या एसीमध्ये डोळे मिटून मागं टेकलो. गाडीनं वेग घेतला… तोच मोबाईल वाजला. 
“बोल आनंद !”
“सॉरी सर… दुपारची तुमची नोट चुकून खिशातच राहिली. आत्ता लक्षात आलं. तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो… पण पेपर लोड झाला होता.”
“ठीक आहे… उद्या मात्र आठवणीनं टाक. एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरला कर. बाकी घे सांभाळून…” मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो.
साधारण तासाभरानं कॅबचा वेग वाढल्याचं जाणवलं. डोळे उघडून पाहतो, तर स्ट्रीट लाईटस् बंद! सर्वत्र अंधार. बाहेर पाऊस सुरू झालेला. कोणत्या भागात आहोत, हेही कळेना. 
“काय झालंय?” मी ड्रायव्हरला विचारलं. 
“बारिश है साब… इसलिये बत्ती गुल हो गई होगी.”
“आपण वेळेत पोहोचू ना?”
“हां, आप फिक्र मत करो. टाइम पर और सही मोके पर पहूॅंचा दूंगा!”
दहा-पंधरा मिनिटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली. समोर ‘अपोलो हॉस्पिटल’ची निऑन पाटी चकाकत होती. दवाखान्याच्या इमर्जन्सी डोअर वर माझी टॅक्सी पार्क झाली होती. 
“अबे, तेरे को एयरपोर्ट चलनेको बोला था.” माझे शब्द घशातच राहिले. तेव्हढ्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ऍम्ब्युलन्स माझ्या समोर थांबली. मागचं दार उघडून आमच्या शेजारी राहणारा शेखर बाहेर उडी मारूनच उतरला. लगोलग पेशंटला स्ट्रेचरवरून बाहेर घेतले. माझ्या पाय खालची जमीनच खचली…
स्ट्रेचरवर अंजली होती…!!!
                                                                                                                                          —🌼—                 
अंजलीला आय.सी.सी.यू.मध्ये ॲडमिट केलं होतं. इमर्जन्सी होती. इ.सी.जी ॲबनॉर्मल होता. पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती. थोडं स्थिरावल्यावर मी शेखरला विचारलं…
“काय झालं होतं?”
“तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला. त्या खूप घाबरल्या होत्या. दम लागला होता. ‘छातीत जाळ होतोय’ म्हणाल्या. जबडा पण दुखतोय म्हणाल्या. मी तुम्हाला फोन लावला. ‘नॉट रिचेबल’ आला. मग ऍम्ब्युलन्स मागवली!
“पण तुम्ही इथं अगदी वेळेवर कसे? संध्याकाळी, ‘तुम्ही बेंगलोरला जाणार’ म्हणत होत्या काकू!”
“अरे, मी एअरपोर्टसाठी निघालोच होतो.” काही तरी आठवून मी मोबाईल काढला. त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा ‘गाडी फेल हुवा है, दुसरा कॅब बुक करो…’ असा मेसेज होता! 
मग मला घेऊन निघालेली आणि इथं आणणारी कॅब कोणती होती…???
मी फोन लावला. मी बराच वेळ बोलत होतो… आणि शेवटी म्हणालो,
“आनंद, त्या चारोळ्या, कविता फिलरलाच राहू दे आणि ती ‘अँन्जेल टॅक्सी’ हेडलाईनला घे ! डॉक्टर अभ्यंकरांसोबत माझी घटना पण टाक !”

— सु र कुलकर्णी

1823. जीवनाचं कटू सत्य

🏿 2 कोटीचा बंगला
🏿 त्यात तोंड दिसावं
     अशी फरशी
🏿 फरशीवर मखमली
     गालीचा
🏿 नेत्रदिपक रोषणाई
    आणि झुंबर
🏿 डोळ्याचं पारणं
     फिटणारं फर्निचर 
आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून "मेल्यावर" तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई
🔥
👉🏿 बंगल्यात
      झोपायला
👉🏿मास्टर बेडरूम !
👉🏿त्यावर लुसलुशीत
     गादी !
👉🏿झगमगीत मँचिंग
    बेडशीट !
"शव" दवाखान्यातून घरी आणाल्यावर जुनी-पुराणी लोखंडी खाट, त्यावर फाटकच बेडशीट,कव्हर फाटलेली मळकीच उशी
🔥
👉🏿बंगल्यातल्या
     देव्हाऱ्यात चांदीचे
    निरंजन, सुगंधी
    अगरबत्ती,सुवासिक
    धुप....
    शवाशेजारी शेवटी लावतात जुनं "पितळच" निरांजन अन् पाच रूपयांचीच "अगरबत्ती"
🔥
👉🏿 2 कोटीच्या
     बंगल्यात 5 लाखाचं
    बाथरूम,त्यात
   आंघोळीला टबबाथ,
   गरम पाण्याचा शाँवर,
   सुंगधी साबण आणि
   शांपू,चारी बाजूंनी
   आरशे.....
महागडी बाथरूम बांधली तरी !
शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच!
🔥
👉🏿शेवटचा कार्यक्रम
     बघा....!
     तुमचं आंघोळीचं
     पाणीसुध्दा ओलांडू
     नये असा      
    कारभाऱ्यांचा आदेश
आंघोळीचं पाणी तापतयं उघड्यावर?
"शेवटची" आंघोळ "रस्त्यावर"
आंघोळीच्या साबणाची  पाच रूपयाचीच वडी !
असं कोणी म्हणत नाही  त्याची शेवटची आंघोळ शाँवरखाली होऊ देत !
आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे,शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस,
नका महागाईचा आणू असे होते फर्मान!
मांजरपाटचा तीन बटणी शर्ट,नाडीचाच "लेंगा",आयुष्यभर घातली हँट,तरी गांधी बाबाचीच टोपी....
असं कोणाला वाटत नाही की जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत,ब्रँडेडच आणा ! त्यानचं कमावलयं !
🔥
👉🏿दारात 40 लाखाची गाडी,त्यावर चालक ड्रेसधारी,ऐटीत बसून पुढे,लोकांना हात हातवारे करी,
४० लाखाच्या गाडीचा शेवटी तुम्हाला उपयोग शून्य......
स्मशानात जाताना 
पालिकेचीच गाडी नि
पालिकेचाच चक्रधारी........!
असं कोणी म्हणालेलं
मी ऐकले नाही की
आयुष्यभर 40 लाखाच्या गाडीत फिरला, त्यातूनच
स्मशानात घेऊन जा !
🔥🔥
राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत, 
एकसारखीच "वारी"
चारच खांदेकरी !
 आणि
 एकच "मडक" धरी !!
एखाद्याच्या वाट्याला "चंदन"
कोणा मिळे "बाभळ"
कुणाच्या नशीबी "तुपाचा" मारा,
कोणावर "पडे" राँकेलचा "फवारा"
रक्षाचा रंग मात्र राखाडी.....!!
🔥
😩
स्मशानातलं ठरलेले "डायलाँग" -
काय आहे या जीवनात
मोकळं यायचयं !
मोकळचं जायचयं !!
कोट्यावधी कमावले !
पण
बरोबर काय घेऊन गेला !!
💐
मी एवढ्यासाठी हे मांडतोय की माणसानं जरूर कमवावं, माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत !
माणसानं जीवन
सुखा-समाधानानं जगावं,
जीवनातल्या सुखांचा 
पुरेपुर आनंद लुटावा !
💐
पण मालमत्तेचा कधी माज करू नका तुमच्या जवळ किती पैसा आहे. तुमची कीती इज्जत आहे, तुमच समाजात काय स्टेटस आहे याच्याशी कोणाला काही घेणे देणे नाही0 घेणे देणे आहे,तुमच्या स्वभावाशी, तुमच्या वागणूकीची, तुमच्या स्वभावातील विनम्रतेशी. कधीच पद, पैसा, प्रतिष्ठा याचा गर्व करू नका.आपल्या पेक्षा चांगले चांगले आले व गेले हे लक्षात असु दया.
माझा बंगला झाला, माझ्या मित्राचा व्हावा, अशी विचारधारा ठेवा....!
अनाथांचे "नाथ" बना !
गोर-गरीबाला मदत करून त्यांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करा !
जीवनात एखादं काम असं करा की तुमची पुढची पिढी "याद" करील !
परोपकारी बना !
कमावलेल्या रकमेतली ठराविक रक्कम समाजोन्नतीसाठी खर्च करा !
🔥💐🔥💐🔥💐🔥💐
ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले !
अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस !!
असं मला वाटतयं !
 तुम्हाला काय वाटतय देव जाणे !
वाटले ते मांडले, चांगले असेल मित्रांना पाठवा !
चुकीचं असेल तर मुर्ख म्हणून सोडून द्या....!
मी विव्दान नाही ! सरळ-साधा माणूस !
चुकून काय चुकलचं तर आपुलकीनं माझी जाहीर माफी....!

1822. उद्दिष्ट

      रात्री तीन वाजता त्याची शिफ्ट संपायची... नी घरी येता येता, त्याला चार - सव्वा चार वाजायचे. तो येतांना अर्थातच सगळीकडे सामसूम असे, रस्ते निर्जन असत. अशात सिस्टीमवर 'जगजीत' लावत असे तो, मध्यम आवाजात... आणि घर यायच्या आधी विसेक मिनिटांवर, एका ठरलेल्या जागी गाडी उभी करत असे. मग आपल्या बाजूचं दार उघडायचं... एक सिगारेट शिलगावायची... आणि बरोब्बर त्याच दरम्यान चालू असलेलं, 'दिल ए बरबाद से निकला नही अबतक कोई' म्हणत म्हणत... ती ओढायची. 'कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यूँ है' ही गझल संपेपर्यंत, त्याची सिगारेटही संपत असे. त्या नंतरच गाडीत बसून घरी... आणि हे अगदी असंच्या असं, रोजचं ठरलेलं असे.
तशीही घरी परतायची, फारशी अशी ओढ नसेच त्याला. मुळात घरातच थांबवत नसे त्याला, विशेषतः रात्रीचं. म्हणूनच तर त्याने मुद्दामहून त्याच्या 'BPO' मधून, ही आडनिड्या वेळेची 'US' शिफ्ट मागून घेतली होती... संध्याकाळी ६ ते रात्री ३ वाजेपर्यंतची. ऑफिसहून घरी परतल्यावर, कपडे बदलून तो झोपूनच जात असे... ते उठत असे थेट दुपारी बारा च्या सुमारास. फ्रेश होईपर्यंतच, त्याने लावलेला दुपारच्या जेवणाचा डबा येत असे. तो खाऊन झाल्यावर लगोलग, ऑफिसचा लॅपटॉप घेऊन बसत असे तो... नी घरून शक्य असलेली कामे उरकत असे. मग तयार होऊन चार वाजता, घराबाहेर पडायचं. खाली इराण्याकडे बन मस्का आणि चहा घ्यायचा, एक सिगारेट मारायची... नी निघायचं ऑफिस करता. ऑफिसमध्ये लवकरात लवकर... नी घरी उशिरात उशिरा पोहोचण्यातच, त्याचं आयुष्य चाललं होतं... ती गेल्यापासून. त्याची बायको... दोन वर्षांपूर्वी अचानक ब्रेन हॅमेरेज होऊन, अवघ्या काही तासांत गेली होती... पाच महिन्यांची प्रेग्नन्ट असतांना. त्याला तिच्यासाठी... नी तिच्या पोटातील त्यांच्या बाळासाठी, अगदी काहीही करायची संधी न देता. त्या दिवसापासूनच, रंग उडाले होते त्याच्या आयुष्यातले... निरस झालं होतं जगणं त्याचं. आपल्या वयाच्या तिशीतच, पोक्त झाला होता तो. गुलजार जसा म्हणतो... 'वक्त से पहले हादसों से लडा हूं.. मैं अपनी उम्र से कई साल बडा हूं'... अगदी तसाच. 
     तर... असंच त्याचं आयुष्य 'मागील पानावरून पुढे' अशा प्रकारे चाललं होतं, नी काहीतरी घडलं... काहीतरी अनपेक्षित. त्या रात्री कामावरून घरी येतांना... त्याने नेहमीच्या ठरलेल्या जागी, त्याची गाडी थांबवली. नेहमीप्रमाणेच जगजीत ऐकता ऐकता, सिगारेट शिलगावली त्याने... नी चपापला तो. त्या लाईटरच्या मंद प्रकाशात... त्याच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर जमिनीवर पडलेल्या तिला बघून, घाबरलाच होता तो. पण नंतर भानावर येत, त्याने तोंडातील सिगारेट फेकून दिली... नी पुन्हा लाईटर लावून तिच्याकडे पाहिलं. अत्यंत वाईट अवस्थेत होती ती... हे तिच्याकडे त्या तेवढ्याशा उजेडात पाहूनही, त्याला समजलं होतं. त्याने लगेच गाडीचे हेडलाईट्स ऑन केले... आणि तो दबकत दबकतच, तिच्यापाशी गेला. प्रचंड भीषण परिस्थिती होती तिची. केस विस्कटलेले... चेहऱ्यावर क्रूरपणे मारल्याच्या जखमा... जागोजागी रक्त साकळून, लाल - जांभळी पडलेली त्वचा... अंगातील टॉपची लक्तरं... स्कर्ट गुढग्यांच्याही खालपर्यंत आलेला... आणि अंतर्वस्त्रही आपापल्या जागी नाहीत. अशा भयानक अवस्थेतील, तिला पाहूनच त्याच्या लक्षात आलं की... ह्या मुलीसोबत कोणीतरी काहीतरी, प्रमाणाबाहेर वाईट केलेलं आहे. त्याने मग पुढे अजिबात वेळ न दवडता, पोलिसांना फोन केला होता. 
     ह्या गोष्टीला एव्हाना, आठवडाभर उलटून गेला होता. त्याचा जबाब, साक्ष, उलट तपासणी, प्रश्नांच्या फैरी, त्याच्या ब्लड नी सीमेन्सची चाचणी... असं सगळं काही झालं होतं पोलिसांकडून. त्यानेही अर्थातच शांतपणे, पुर्ण सहकार्य केलं होतं. अजूनही ती मुलगी अत्यवस्थच होती... आणि ती काहीच बोलू शकत नसल्याने, तिची ओळखही अद्याप पटली नव्हती पोलिसांना. त्या दृष्टीने त्यांचा पुरेपूर तपास चालू होता. प्राथमिक अंदाज असा होता की... त्या मुलीसोबत एकाहून अधिक जणांनी, कुकर्म केलं होतं. पण ती मुलगी स्वतः जोपर्यंत काही ठोस सांगत नाही, तोपर्यंत नक्की निष्कर्ष काढणं पोलिसांकरता कठीण होऊन बसलेलं. हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मधील एका बेडवर, निपचित पडून होती ती मुलगी... आणि तिच्या जवळ दिवस - रात्र बसून होता तो, तिची काळजी घेत. तिचं सगळं हवं नको ते बघत होता तो, अगदी ऑफिसमधून सुट्टी घेऊन. अचानक उद्देश मिळाला होता जणू काही, त्याच्या आयुष्य जगण्याला. काहीतरी अर्थ प्राप्त झालेला अकस्मातच, त्याच्या ह्या श्वास घेण्याला. अगदी तेव्हापासूनच.... जेव्हा तिच्या तपशीलवार तपासणीत हे सुद्धा कळून आलं होतं की, ती प्रेग्नन्ट आहे... पाच महिन्यांची. त्यामुळेच आपल्या बायकोसाठी करू न शकल्याचं सारं काही, तो तिच्यासाठी करत होता... अगदी जीवाचं रान करून. 
    असेच दिवस सरले, दिवसांचे महिने झाले. ती आता बऱ्यापैकी उपचारांना प्रतिसाद देऊ लागली होती... जरी जबरदस्त मानसिक आघातामुळे, अजून बोलू शकत नव्हती. एव्हाना तिचा नऊवा महिना संपत आला होता. हे गेले चार महिने... त्याने काहीच कमी केलं नव्हतं, तिच्यासाठी शक्य ते करण्यात. हेतू फक्त हाच की... ती लवकर बरी व्हावी, नी तिचं बाळ सुखरूप जन्माला यावं. आणि आता तर तोच अधीर झालेला तिचं बाळ पहायला, त्याला उचलून हातात घ्यायला. तिच्या प्रेग्नन्सी बद्दल, डॉक्टरांचा काय तो निर्णय झाला होता. पाच दिवसांनी तिच्या बाळाला, सिझेरिअन करून जन्म देण्यात येणार होता... आणि हे ऐकून तो प्रचंड खुश झाला होता. ते पाच दिवस त्याने कसे काढले, हे त्याचं त्यालाच माहित होतं. 
     अखेर तो दिवस उजाडला. त्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर... अगदी मिनिटभरही न झोपता, तयार होऊन तो हॉस्पिटलला गेला... नी बघतो तर तिच्या रूममध्ये, त्याला बऱ्यापैकी गर्दी दिसली. बाहेर पोलिसांकडूनच कळलं त्याला की... तिच्या कुटुंबाचा शोध लावण्यात, अखेरीस पोलिसांना यश आलेलं होतं. अथक प्रयत्नांनंतर... मिझोराम मधील ऐझॉल ह्या शहरातील, त्या मुलीच्या कुटुंबियांना शोधून काढण्यात... पोलीस सफल झाले होते. हे कळल्यावर... त्याला स्वतःला नेमकं कळत नव्हतं की, ह्या सगळ्याचं त्याला बरं वाटलंय की वाईट. स्वतःशीच खिन्नपणे हसला तो... आणि तिच्या खोलीत न जाताच, तसाच आल्या पाऊली परतला... तिच्या होणाऱ्या बाळाला आपल्या न धरलेल्या हातांनी, भरभरून आशीर्वाद देत. कारण त्याला कोणाकडूनही आभार, धन्यवाद मानून घेणं अजिबात नको होतं. त्याला शेवटपर्यंत फक्त अपेक्षा होती... तिच्या डोळ्यांतून दिसणाऱ्या एका अस्पष्ट का होईना, पण ओळखीच्या छटेची... आणि अर्थातच तिच्या बाळाच्या, लुसलुशीत स्पर्शाची. पण ह्या आपल्या इच्छा तशाच अर्ध्यावर सोडून, तो निघून गेला तिथून... तिला मिळालेल्या तिच्या पुर्ण कुटूंबीयांपुढ्यात. त्याच्या आधीच्या जगात परतणार होता तो आता, जे विस्कटलेलं हे गेले चारेक महिने. पुढे आणि जगायला काही 'उद्दिष्ट' मिळतंय का, ते बघणार होता तो आता.
     जाता जाता पॅन्टच्या डाव्या खिशातून, रुमाल काढला त्याने. ज्याच्या एका कोपऱ्यावर, सुकलेला पिवळसर रंग होता. मागच्याच आठवड्यात तिला तो हळद दूध पाजत असतांना. तिच्या तोंडातून गळलेलं थोडं दूध, त्याने ह्याच रुमालाने पुसलं होतं... आणि तो डाग काही गेला नव्हता. त्या आपल्या रुमालाकडे पाहून. खरोखरचा गळा दाटून येत खोटंच हसला तो, कुठेतरी वाचलेला शेर आठवून की. 'वो कच्चा रिश्ता.. पक्के रंग छोड गया'.

- सचिन श. देशपांडे
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

1821. बाप

 लाडात वाढलेली लेक
 मांडवात उभी पाहुन
हसर्या चेहर्यानं बाप
मुसमुसत होता राहुन राहुन // धृ//

कोपर्यात उभा बाप
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
 डोळे पुसत होता //1//

काळजाच्या तुकड्याला पाहुन
आतुन तुटत होता
 पोरीचं चांगलं झालं 
हसुन म्हणत होता //2//

अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
दुर होत नव्हता //3//

लग्न लागल्यावर सारेच
टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
आसवांमध्ये भिजत होता //4//

लहानमोठ्यांना तो
 हात जोडत होत
लेकिला जीव लावा माझ्या 
डोळे भरून सांगत होता //5//

सायंकाळी सारे पाहुणे
खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
फोनकडे जात होता //6//

लेकिचा फोन येताच
मिरची तिखट आहे  म्हणत
तांब्यानं पाणी पित होता            
अन डोळयातलं आसव मागं सारत होता //7//

सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
मला भुक नाही असं
बाप म्हणत होता //8//

बेडरूममधील लेकीचं कपाट
हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
थरथरता हात फिरवत होता //9//

तिथच बेडवर बसुन
ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत //10//

1820. रियल हिरो

      या देशात असे अनेक रियल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत. 
सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मनी रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे.पेशाने इंजीनियर होते. यांच्या रिटायरमेंट ला केवळ दोन वर्षे बाकी होते. सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे.पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी कि कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?
ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे....
ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनी च्या डब्यांची चाचणी सुरू होती.चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५०कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती.अशा परिस्थितीत या इंजीनियर ने संकल्प केला कि आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले...
Are You Sure, We Can Do It ?
उत्तर होते.....Yes Sir!
किती पैसे लागतील R&D साठी ?
फक्त १०० कोटी रु सर!
रेल्वे ने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ट्रेन १८ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो. आपल्याला ठाऊक आहे का ... या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला?
केवळ ९७ कोटी! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती. ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हीरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे कि या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच 'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी.
सुधांशु मनी सारख्या देशाच्या प्रगती साठी ध्येयवेड्या विभूतीला त्रिवार सलाम.. शेयर करा





1819. मुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवणाऱ्या पालकत्त्वाची दहा सूत्र

      मुलांचे ‘चांगले’ आई वडील होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले तर सगळेच असतात. पण मूल जस मोठं होत जातं तसं योग्य पद्धतीने त्याला आपली जवाबदारी समजणं, त्याच्या बुध्यांकाबरोबर त्याचा भावनांक सुद्धा वाढत जाणं, त्याने किंवा तिने सेल्फ मोटिव्हेटेड होणं या गोष्टी मुलांमध्ये लहान वयापासूनच उतरवणं हि ती कला आहे. मुलांना जवाबदार, सेल्फ मोटिव्हेटेड बनवण्यासाठी लहानपणा पासून काय काळजी घेतली पाहिजे ते वाचा या लेखात. आणि यातल्या कुठल्या गोष्टी आपण करतो आणि कुठल्या राहून जातात. ते एनलाईझ करा.

तुम्ही उत्तम आई वडील कसे व्हाल?
आयुष्यात आपण आई, वडील होणं म्हणजे आयुष्यचं सार्थक होणं असं आपल्याकडे मानलं जातं. आणि ते तसं खरं पण आहे. आई, वडील झाल्यावर आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. हा एक सुखद अनुभव असतो. आई वडील होणं म्हणजे आयुष्यातली एक मोठी पूर्ती आहे. पण जबाबदारी म्हणून जर विचार केला तर ही आयुष्यातली सगळ्यात मोठ्ठी आणि अवघड जबाबदारी आहे. ही जबाबदारी पेलणं तितकी सोपी गोष्ट नाही. जे आई वडील झालेत ते जाणून असतील. मुलांचे ‘चांगले’ आई वडील होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले तर सगळेच असतात. पण मूल जस मोठं होत जातं तसं योग्य पद्धतीने त्याला आपली जवाबदारी समजणं, त्याच्या बुध्यांकाबरोबर त्याचा भावनांक सुद्धा वाढत जाणं, त्याने किंवा तिने सेल्फ मोटिव्हेटेड होणं या गोष्टी मुलांमध्ये लहान वयापासूनच उतरवणं हि ती कला आहे. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हि गरज बदलत जाते. आई वडिलांच्या उतारवयात मुलांनी त्यांच्याकडे न बघणं, अपरिहार्यपणे कुटुंब खिळखिळी होणं या गोष्टी न होण्यासाठी हि कला जमवून घेणं गरजेचं आहे. ह्या कलेत सगळ्या आई वडिलांनी निपुण असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलांचं संगोपन करताना तुम्ही मुलांना काय चांगलं आणि काय वाईट ह्यातलं अंतर अगदी सहज समजून देऊ शकाल. आणि मुलांना एक अतिशय पोषक, सकारात्मक विचार देणारं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणारं वातावरण त्यांच्या भोवती तयार करू शकाल. मग चला तर जाणून घेऊ ह्या लेखातून, की चांगले पालक होण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागेल.

१:- मुलांवर प्रेम आणि स्नेहाचा वर्षाव करा.
मूल लहान असताना त्याला आपली भाषा कळणार नाही, अशावेळी त्याला तुमच्या हळुवार स्पर्शातून तुम्ही प्रेम आणि स्नेहाचा वर्षाव करा. तुमच्या स्पर्शातून मुलांना ते जाणवलं पाहिजे. बाळाच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर, गालावर हळुवार स्पर्श करा, मूल तुम्हाला त्याच्या हातांनी घट्ट पकडून ठेवेल. असा तुमचा स्पर्श बाळाला हवा हवासा वाटेल. मूल खेळत असताना त्याच्या प्रत्येक नवीन हालचालीवर लक्ष द्या, तुम्ही जवळ गेलात की ते जोर जोरात हातपाय हलवायला लागते. त्यावेळी त्याला हळुवार आलिंगन द्या. त्यामुळे त्याला त्याच्या हालचालींना प्रोत्साहन मिळेल. तुम्ही बाजूला झालात की पुन्हा जोरात हातपाय हलवायला लागेल. चेहऱ्यावर आणखी आनंद दिसायला लागेल. लहान असताना मूल त्याला काही त्रास होत असल्यास आपल्याला सांगू शकत नाही. त्यामुळे ते जोरात रडायला लागते. मुलाच्या रात्री बेरात्री रडण्यामुळे आई वडिलांची झोप उडते. झोप नीट न झाल्यामुळे चीड चीड होते. पण त्याचा राग कधीही मुलांकडे दुर्लक्ष करून व्यक्त करू नका. काहीही झालं तरी बाळाला तुमच्या प्रेमाचा ओलावा द्या. त्याला जवळ घ्या, त्याच्या कपाळाचं चुंबन घ्या. आणि प्रेम व्यक्त करा. मुलं मोठी व्हायला लागतात, अवखळ होत जातात. त्यांच्याकडून चुका व्हायला लागतात. पण चुका त्यांना समजावून सांगा, न रागावता. जर रागावण्या एवढी मोठी चूक केली असेल तर रागवा, पण नंतर काही चांगलं केलं तर रागावण्याच्या अनेक पटींनी जास्त त्याची प्रशंसा करा. शाबासकी द्या.

२:- मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांची प्रशंसा करा.
कुठल्याही चांगल्या गोष्टी करायला नेहमी प्रोत्साहन द्या. मदत करा. आणि त्यात प्राविण्य, यश मिळवल्यावर तोंड भरून त्यांची प्रशंसा करा. त्यामुळे मुलांना कोणतीही गोष्ट स्वतः च्या हिमतीवर करायची सवय लागेल. जर आपण प्रोत्साहन किंवा प्रशंसा केली नाही तर त्यांच्यात पाहिजे तशी प्रगती होणार नाही. मुलांच्या चुकांकडे जास्त लक्ष न देता, त्यांच्यातले चांगले गुण, त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे अधिक लक्ष पुरवा. त्या गुणांच्या वाढीसाठी त्यांना मदत करा. चांगले गुण वाढायला लागले की चुका आपोआप कमी कमी होत जातील. चुका केल्यावर त्यांना तुम्ही रागावलात तर काही चांगलं केल्यावर त्याच्या तिप्पट त्यांची प्रशंसा करा. प्रशंसा सगळ्यांनाच आवडते, हळू हळू चूका कमी होत जातील. म्हणजेच काय चूक आणि काय बरोबर हे मुलांना कळायला लागेल.

३:- मुलांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर किंवा त्यांच्याच बहीण भावाबरोबर करू नका. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येकाची आकलन शक्ती, शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही मुलाची तुलना कोणाशी करणं टाळावं. तुलना केली की मुलांना तो कमीपणा वाटतो, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आकस निर्माण होतो. आणि मुलं तुमच्यापासून दूर राहायला लागतात. प्रत्येक मुलातले चांगले गुण कोणते, त्याची आवड काय हे आई वडिलांनाच कळून येतं. त्याप्रमाणे त्याच्या आवडीच्या गोष्टीत जास्त लक्ष देऊन त्याला त्या गोष्टीसाठी जी काही मदत करता येईल ती करावी. म्हणजे मुलं त्या गोष्टीत सहज प्रगती करतात, आणि स्वतःची जबाबदारी घेऊ शकतात. त्यांच्यावर त्यांच्या इच्छे विरुद्ध काहीही लादू नये. मुलं लादलेल्या गोष्टीत चांगली प्रगती करू शकत नाहीत कारण ती त्यांना नको असलेली गोष्ट असते. मुलांना चित्रकला आवडत असेल आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने कराटे शिकायला पाठवलेत तर तेवढं मनापासून तो त्यात निपुण होणार नाही.

४:- मुलांच्या बोलण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
मुलं सतत प्रश्न विचारतात, काहीतरी कळत नाही म्हणून तुमच्याकडून समजून घेण्यासाठी तुमच्याकडे येतात. अशावेळी त्यांना वेळ द्या. ते काही विचारात असताना त्यांच्याकडे बघून त्यांचं नीट ऐका. मुलं तुमच्याशी बोलत असताना तुमचं लक्ष मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्याच गोष्टीकडे असेल तर मुलांना तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय असं वाटतं. मुलं निराश होतात. मूल तुमच्याशी बोलत असताना तुमचं लक्ष पूर्णपणे त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्याने विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. त्याच्या हुषारीचं कौतुक करा. त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला समजावून सांगा. त्यामुळे मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागतो. आणि तुमचं नातं खूप घट्ट होत जाईल.

५:- मुलांना तुमचा वेळ द्या.
मुलांना आपला क्वालिटी टाइम देणं पण तितकंच महत्त्वाचं. मुलांना घेऊन ग्राउंडवर खेळायला जाणे, त्यांच्याशी मैदानी खेळ खेळणे. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना घेऊन जाणे, घरात सुद्धा त्यांच्याशी बैठे खेळ खेळणे, त्यांचा होमवर्क घेणे, त्यात त्यांना मदत करणे. असं मुलांशी जवळीक साधण्यासाठी आई वडिलांनी आपला वेळ दिला पाहिजे. म्हणजे मुलं एकलकोंडी, किंवा हट्टी होत नाहीत. काही मुलं टी व्ही बघणं पसंत करतात. पण त्यांना खेळायला बाहेर घेऊन गेलात आणि ती सवय लावली, तर टी व्ही चं वेड कमी होईल. मुलांच्या शाळेतल्या कार्यक्रमांना जरूर हजेरी लावा. मुलांना खूप आनंद होतो. शाळेतली प्रगती जाणून घेण्यासाठी पालक- शिक्षक सभेला जरूर जा. मुलांच्या प्रगतीची जरूर वाहवा करा. मूल पुढच्या वेंळी आणखीन प्रगती करून दाखवेल.

६:- मुलांच्या खास कार्यक्रमांना उपस्थित रहा.
बक्षीस समारंभ, गॅदरिंग, स्पोर्ट्स इव्हेंट्स किंवा मुलांनी ज्या ज्या कार्यक्रमात भाग घेतला असेल त्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित रहा. मुलांना त्यामुळे एक भावनिक आधार मिळतो. त्यांचा उत्साह वाढतो. ह्यात मुलाच्या वयाचा विचार नाही करायचा. अगदी तुमच्या मुलाला पदवी मिळाली तरी त्याच्या पदवीदान समारंभाला तुम्ही असायालाच पाहिजे. तुमच्या शाबासकीची थाप मुलांचा आत्मविश्वास वाढवते.

७:- चांगल्या सवयी, आणि नियमांचं पालन ह्यांचा आग्रह धरा.
आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी तुम्हाला काही नियम घालून द्यायला लागतील. पण चांगल्या सवयी आधी चांगले आई वडील स्वतःला लावून घेतात. नियम स्वतः पाळतात. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून त्या सवयी आधी आपल्याला लावून घ्याव्या लागतील. म्हणजे त्याच सवयी मुलांमध्ये आणायला अवघड जाणार नाही. घरात काही नियम सुद्धा सगळ्यांनी पाळावेत म्हणून ठरवले जातात. नियम हे आई वडिलांनी पाळायला पाहिजेत म्हणजे मुलांना ते पाळायला सांगताना सोपं जातं. ह्या चांगल्या सवयी किंवा नियम मुलांना पाळायला सांगताना त्यांना ते लादले गेलेत असं वाटता कामा नये. आई वडील पाळत असले की मुलं ही सहज ते पाळायला लागतात. वेगळं मारून मुटकून त्यांच्यावर ते लादायला लागत नाहीत. चांगल्या सवयी सुद्धा मुलं हळू हळू आत्मसात करतात. कारण आई वडिलांच्या त्याच सवयी बघून मुलांना पण त्या सहज लागतात. म्हणजे ह्यात जोर जबरदस्ती नसावी.

८:- रागावर नियंत्रण.
राग हा घरातली शांतता घालवतो. म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. मुलांच्या काही चुकांमुळे काहीवेळा घरातल्या मौल्यवान वस्तू खराब होतात, काही नुकसान होते अशावेळी नुकसान झाल्यामुळे राग येतो. पण रागामुळे खराब झालेली वस्तू दुरुस्त होत नाही. त्यामुळे रागावर ताबा ठेवणं जरुरीचं असतं. चांगले आई वडील रागावर नियंत्रण ठेऊन, घरातली शांतता ढळू देत नाहीत.

९:- मुलांना स्वावलंबी बनवा
चांगल्या मुलांना सवयी लावताना स्वावलंबी बनवा. स्ववलंबी असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करताना जबाबदारी घेण्याची ताकद येते. ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जबाबदारी स्वीकारणारे आयुष्यात चांगलं यश मिळवू शकतात.

 १०:-एक गोष्ट लक्षात असू द्या की चांगल्या आई वडिलांचं कर्तव्य कधीच संपत नाही.
मुलं ही सतत आई वडिलांच्या छायेखालीच चांगली वाढतात. म्हणजे सतत काहीतरी मार्गदर्शन आई वडील मुलांना करतच असतात. मुलं आता मोठी झाली म्हणून तुमचं काम संपत नाही. मोठी झाल्यानंतर सुद्धा मुलांना आई वडिलांच्या सल्ल्याची गरज पडतेच. योग्य वेळी योग्य सल्ला मुलांना देत राहणं हेच पुढचं कर्तव्य ठरतं. मुलांचं वय कितीही असलं तरी त्यांना आई वडिलांचा आधार हवाच असतो. बाकी सगळ्या बाबतीत मुलं स्वावलंबी झालेलीच असतात. पण तरी सुद्धा तुमच्या आधाराचा वटवृक्ष त्यांना सुखाची सावली देत रहातो. त्यामुळं मुलांना ह्या सावलीत सुरक्षित वाटतं.

1818. सुंदर आणि श्रीमंत !

 अहमदाबाद मुंबई-गुजरात मेल. अहमदाबाद स्टेशनात मी धावतच गाडी गाठली. रात्रीचे पावणेदहा वाजून गेले होते आणि कामं आटोपून वेळेवर निघायचं म्हणून मला जेवणालाही फाटा द्यावा लागला होता. स्टेशनवरल्या स्टॉलवरून दोन समोसे आणि अर्धा डझन केळी विकत घेऊन मी गाडीत चढलो आणि बर्थ गाठला.. समोरचा बर्थ पाहून एकदम फ्रेश झालो. तिशी-पस्तिशीचं एक नितांत सुंदर जोडपं समोर बसलं होतं. पुरुष हिंदी सिनेमातला नट शोभावा असा होता. निळी जीन्स, त्याला शोभेसा शुभ्र पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, पायात कोल्हापुरी वहाणा. ती पावलंही इतकी नितळ होती, की माझा रिझव्‍‌र्ह्ड बर्थ असूनही मला माझ्या पायातले बूट काढायची लाज वाटू लागली. बरोबर त्याची बायको असावी. त्याच्यापेक्षाही कांकणभर सरस, उंच, सडपातळ, केसाचा बॉब, खूप गहिरे काळेभोर डोळे, चिकणा तलम गुलामी पंजाबी ड्रेस.. एका सुंदर स्त्रीचं वर्णन करताना जे जे बोलता येईल ते सर्व तिच्याकडे होतं. इतकी देखणी स्त्री जवळ असलेला हा पुरुष या क्षणाला मला जगातला सर्वात श्रीमंत पुरुष वाटत होता. गाडी सुटली तशी माझी नजर वारंवार त्या दोघांकडे जाऊ लागली आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असाच असावा, हे मी मनोमन मान्य करून टाकलं.
मी लॅपटॉप काढला, उगाचच काहीतरी करायचं म्हणून बोटं फिरवू लागलो. मधूनच मी चोरट्या नरजरेनं दोघांकडे बघून घेत होतो. रात्र झाली आणि थोड्याच वेळात मला झोपावं लागणार आहे, याचंच मला वाईट वाटत होतं. त्यांना काहीतरी जाणवलं असावं. त्या नारायणानं बॅगेतून प्लॅस्टिकचा डबा काढला. त्यातून सँडविच काढून लक्ष्मीला दिलं. तिनं हातानंच ते नाकारलं. मला त्यांनी सँडविच खाण्याकरता विचारावं, अशी माझी अपेक्षा नव्हती; पण विचारलं असतं तर संवादाला सुरुवात करता आली असती. गाडीतले नऊ निरस तास बरे तरी गेले असते.
‘‘तू अजून रागावली आहेस काय?’’ नारायणने विचारलं. मी त्याचा आवाज प्रथमच ऐकला. प्रश्न मराठीतून आल्याने मला बरं वाटलं. तिचा आवाज आता ऐकायला मिळणार, या आशेनं मी कान टवकारले.
‘‘तुझ्या आईला अक्कल नाही रे अजिबात.’’ लक्ष्मीनं एकदम बॉम्ब टाकला. लॅपटॉपआड मी थरारलो. इतक्या सुस्वरूप स्त्रीकडून इतक्या कडवट शब्दांची मी अपेक्षाच केली नव्हती.
‘‘असं का म्हणतेस?’’ नारायणाचा स्वर अजिजीचा आलेला मला जाणवला.
‘‘आपल्या डॉक्टर सुनेला अशा सूचना देऊ नये, हे एवढं साधं कळत नाही त्यांना? मी काय झोपा काढतेय दवाखान्यात, गेली दहा वर्ष?’’
‘‘अगं, तू एवढय़ा वर्षानंतर प्रथमच प्रेग्नंट आहेस म्हणून काळजीपोटी बोलते ती ?’’
‘‘तू आणखी बेअक्क्ल. ती मूर्ख बाई बोलते अन् तू तिची बाजू घेऊन मलाच समजावतोस ?’’
‘‘माझ्या आईला माझ्यासमोर हे असे शब्द ?’’
‘‘काय बोलू मग? व-हाडातल्या कुठल्या खेड्यातून आलेली बाई ही, चार बाळंतपणं घरी झाली हिची आणि ही मला, एका डॉक्टरला प्रेग्नन्सीत कसं वागावं हे शिकवते! स्टुपिड.’’
‘‘ऐकून घेत जा ग कधीतरी. फार चांगल्या मनानं सांगते ती आपल्याला.’’
‘‘का ऐकावं? तू सॉफ्टवेअर इंजिनियर, मी डॉक्टर. लाख रुपये कमवते मी महिन्याला. सीनियर डॉक्टरसुद्धा माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून ‘मॅडम मॅडम’ म्हणत मागेपुढे गोंडा घोळतात माझ्या. आणि मी या फाटक्या बाईचं ऐकून घेऊ? नेव्हर.’’
‘‘जाऊ दे ग, जुने लोक आहेत, त्यांची निश्चित मतं असतात काही.’’
‘‘ए, मतं माझ्यावर लादलेली मी नाही खपवून घेणार हं आणि यांना इतकं कळतंय, तर तुझी बहीण का मेली बाळंपतणात?’’
‘‘मेली नको म्हणूस ग, गेली बिचारी. तिचं सासर थेट खेड्यात, वेळेवर डॉक्टरी मदत मिळाली असतील तर वाचली असती ताई.’’
‘‘म्हणजे, आईचा शहाणपणा आला का कामास? ती आई तशीच आणि तिची मुलगीही तशीच.’’
‘‘बरं तू म्हणतेस तसंच. पण तू काही खाल्लेलं नाहीये, आतातरी खाऊन घे काहीतरी.’’
‘नो वे. तुझ्या आईनं सांगितलंय ना, आता तर तोंड नाही हलवणार. मी माझ्याच टाइमटेबलने चालणार. तुला समजतंय ना?’’
नारायणरावांनी नंदीबैलासारखी मान हलवली. मला सहनच होईना. या एवढय़ा चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या संवादांत, मनातल्या मनात मी कधी चकीत झालो, कधी संतापलो, कधी मला त्या क्षुद्र माणसाचा गळा दाबावासा वाटला, तर कधी चक्क त्या बाईला ‘या.. या नंदीबैलाला इंजिनियर बनवताना आणि इतर चौघांना आपल्या पायावर उभं करताना त्या माऊलीनं काय सोसलं असेल याची कल्पना आहे का?’ असं ओरडून विचारावंसं वाटलं. मला तिच्यासाठी लक्ष्मी हे नाव सहनच होईना. तासाभरापूर्वीची ती सुस्वरूप सुंदरी मला कुरूप दिसायला लागली आणि तो पुरुष जगातला सर्वात दरिद्री पुरुष.
आपला स्वत:वरचा ताबा सुटून आपण काहीतरी बोलू या भीतीनं मी लॅपटॉप मिटला, बर्थवर आडवा झालो आणि कोच अटेंडंटने दिलेली पांढरी चादर कानावर घट्ट लपेटून झोपून गेलो.
दादरला उतरलो तेव्हा प्रयत्नपूर्वक त्या दोघांकडे पाठ केली होती मी. पहाटे त्यांचे कुरूप चेहरे पाहिले असते तर दिवस निश्चितच नासला असता माझा. तसाच एसटी स्थानकावर आलो. अलिबागची बस लागलेलीच होती. खिडकीतच सीट मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानले अन् डोकं मागे टेकून, डोळे मिटून शांत बसून राहिलो.
‘‘बसू का दादा हीतं?’’ विटलेलं लुगडं नेसलेली, विस्कटलेल्या केसांची एक मध्यम वयाची बाई विचारीत होती. मी जरासा खजीलच झालो. अलिबागपर्यंत हा शेजार मला सहन करावा लागणार ही कल्पना फारशी सुसहय़ नव्हती.
मी खिडकीकडे सरकलो. बाई संकोचाने बसल्या. त्यांच्या शेजारी एक कॉलेजवयीन मुलगी येऊन बसली. साडेसहाला एसटी सुटली. गार वारा आत आला. बरं वाटलं. गाडीतले सगळे प्रवासी पेंगायला लागले. बाई मात्र टक्क जागी होती. आपल्याला झोप लागली आणि ही आपली बॅग घेऊन मध्येच उतरली तर पंचाईत या भीतीने मलाही झोपता येईना. तिच्या शेजारच्या तरुणीची मात्र झोपेमुळे मान कलायला लागली होती. मी पहात होतो, तिचं डोकं हळूच बाईच्या खांद्यांवर विसावलं. बाई तिच्याकडे सरकली. आपला हात अलगद तिच्या डोक्यावर ठेवला. पोरगी दचकली. आपलं डोकं तिने बाईच्या खांद्यावरून पटकन काढून घेतलं.
‘‘झोप बाळा, व्यवस्थित झोप. -राहु दे डोकं माझ्या खांद्यावर.’’
‘‘सॉरी हं, चुकून झालं.’’
‘‘अग, सवारी कशापायी, माजी नात बी झोपत्ये की असंच. तु बी तेवढीच.’’
‘‘कुठे असते नात तुमची?’’ मुलीनं उगाच विचारलं. मला आवडलं नाही. कारण ही बाई  एकदा बोलायला लागली की, तिला थांबवणं कठीण झालं असतं.
‘हीतंच असत्ये महमईला. आता आली न्हवती का सोडायला मला ? अलिबागला जाऊ नको म्हून लय मागं लागली माज्या.’’
‘‘ओके, तुम्ही अलिबागला जाताय होय?’’ मुलगी बोलायची  थांबतच नव्हती.
‘‘व्हय बाळा. सवत लय आजारी हाय माजी. तिचं करनारं न्हाई कुनी.’’
‘‘कोन आजारी आहे?’’ मुलीला ‘सवत’ हा शब्द ऐकायला गेला असावा. मलाही जरा आश्चर्यच वाटलं. दहा-पंधरा मिनिटांच्या आणि पाच-सात वाक्यांच्या परिचयावर बाई त्या मुलीशी ती आपली सख्खी नात असल्यासारखं बोलत होती.
‘‘सवत ना. दादल्याची ठेवलेली बाई. नऊ-धा वर्स झाली. मी मुलीजवळ महमईला, त्यो अन् सवत अलीबागला. आमची जमीन बक्क्ळ, पन ती बया घालून बसलीया घशात.’’
‘‘तरीही तुम्ही ती आजारी आहे म्हणून तिचं करायला जात आहात ?’’
‘‘मग कोन करनार तिचं? तिची मुलं इचारेना तिला अन् दादल्याचं वय हाय का धावपळ करायचं?’’
‘‘अहो, पण नवऱ्यानं तुम्हाला सोडून तिला ठेवलीय ना?’’ मला अगदीच राहवेना म्हणून मी मध्येच तोंड घातलं.
‘‘तर काय भाऊ? या अशा येळेस बी राग लोभ धरायचा? त्यांचं केलं त्याचेपाशी आणि आपुन काय मोठं करतोय? आपुन पैशानं न्हाई करु शकत काई तर कष्टानं करावं. आपण चार कष्ट केल्याने कुनाला बरं वाटत असंल तर हरकत? शरीर झिजल तेवढं बरं दादा. आता या खेपेला वारी चुकंल माजी, पन या वर्साला इठोबाची न्हाई तर या रखमाईची सेवा घडंल.’’
माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. ही वाणी या गरीब फाटक्या बाईची का कुणा संताची? काहीच वेळापूर्वी कुरूप दिसणारी ही बाई मला देखणी आणि तेज:पुंज दिसू लागली. मघाची मरगळ सहजच दूर झाली. मला स्वत:चाच अभिमान वाटू लागला.
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत स्त्रीच्या शेजारी या क्षणाला मी बसलो होतो. पुढील अडीच तासांचा प्रवास अविस्मरणीय होणार होता.
सुंदर आणि श्रीमंत !

जयंता विवरेकर यांनी पाठवलेली बोधकथा

1817. लग्न करताना मुलाकडे फ्लॅट

 लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा  फ्लॅट विकत घेतला. त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं.
त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. 
त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. 
वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं.
६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजार.
तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा.
त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच.
 वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार.
म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के
त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे😅
या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा)
यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7  हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. 
इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. 
जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे.
आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे,  आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. 
त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे.

1816. अधुरी एक कहाणी

        नमस्कार. मी शामू, आज मी माझ्या मित्राची म्हणजेच मंदार.. मंदार कर्णिक याची गोष्ट लिहायला बसलोय.. गोष्ट? हो.. कहाणी.. एक अधुरी कहाणी.
मंदार हा मुंबईचे उद्योगपती राजेंद्र कर्णिक यांचा मुलगा.एकूलता एक. मी त्यान्च्या ड्रॉयव्हरचा मुलगा.. त्यान्च्या बंगल्याच्या आऊटहौस मध्ये रहात होतो. मी मंदारच्या वयाचा. त्यामुळे लहानपणापासून मी आणि मंदार एकत्र. काहीवेळा मी मंदारच्या खोलीत झोपायचो. त्याच्यामुळे मी सेंट थॉमस या इंग्रजीशाळेत जाऊ लागलो. त्याच्या घरच्या गाडीतून. त्याला घरचा डबा यायचा, त्यात मी जेवायचो. त्यामुळे मला चांगलचुगल खायला मिळायचं. मंदारची मम्मी माझे पण लाड करायची.
मंदारचे बाबा सतत फिरत असायचे. आपल्या व्यवसायामुळे त्त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष व्हायचे. त्यामुळे मंदार आणि मी सतत एकत्र दिसायचो.
मंदार देखणा, त्याच्या आईसारखा. सावळा पण उंच, व्यायाम करत असल्याने मजबूत बांधा, केस सरळ.. नाक लांब ठेवायचा तो. कुणीही फिदा होईल अशी त्याची पर्सनिलिटी. खिशात भरपूर पैसे असायचे. अभ्यासात जेमतेम.. पण पुढे वडिलांचा व्यवसाय त्यालाच सांभाळायचंय.
त्याच्या आयुष्यात अचानक वादळ आलं.. त्याची मम्मी तिच्या आतेभावा बरोबर गेली म्हणजे तिने दुसरे लग्न केल.
मंदार हादरला. त्याची मम्मीने दुसरे लग्न केल आणि ती हॉलंडला गेली, मंदारचा विचार न करता. त्याच्या वडिलांना या प्रेम प्रकरणाचा अंदाज होता, त्यामुळे त्याना काही फरक पडला नाही.. पण दहा वर्षाचा मंदार.. गप्प गप्प झाला. फक्त माझ्याशी आणि माझ्या आई वडिलांशी बोलायचा.
त्याची मम्मी त्याला पत्रे पाठवायची आणि आपल्यकडे बोलवायची पण तिची पत्रे तो फाडून टाकायचा. हळूहळू तिची पत्रे येणे बंद झाले. मंदार आणि मी नियमित शाळेत जायचो, खेळायला जिमखान्यात जायचो.
मंदार खूपच देखणा दिसायला लागला. त्याचेवर मुली फिदा असत. मैत्री करू पहात, पण मंदार दूरदूर रहात असे.
बारावी पास करून आम्ही दोघे सेंट झेव्हीअर कॉलेज मध्ये दाखल झालो. या कॉलेजत मुंबईतील आणि बाहेर गावातील हायसोसायटीतील मुले असत, माझा प्रवेश मंदारमुळे.. नाहीतर इथला माहोल पाहून मी घाबरून गेलो असतो.
मंदार त्याच्या बुलेटवरुन कॉलेजत येई.. बुलेटच्या मागील सीटवर मी असे. आणि अचानक वीज चमकावी तशी समोर आली -शिल्पा.
 आम्ही दोघे कॅन्टीनमधून बाहेर पडत होतो आणि त्याचवेळी पाचसहा मुली कॅन्टीनमध्ये शिरत होत्या. त्या मुलीत चमकून गेली -शिल्पा.
तिला पहाताच मंदार थबकला. माझा खांदा धरून त्याने तिच्याकडे वळवला.
"बघ.. या कावळ्यात एकच राजहंस. हिची ओळख काढायची.
"पण कशी ओळख काढणार?
  त्याने लगेच स्मिता नायरला फोन लावला... स्मिता ही आमच्या शाळेतील. या कॉलेजत आलेली. ती पण त्या ग्रुपमध्ये होती. तिने सांगितले
"ही शिल्पा.. शिल्पा दळवी.. सांगलीची आहे.. साखर कारखान्याच्या मालकाची मुलगी. खुप श्रीमंत आहे. वरळीला फ्लॅट आहे त्त्यांचा.. तेथे रहाते. रोज ड्रायव्हर सोडून जातो कॉलेजवर आणि न्यायला येतो.
मंदारला काही करुंन तिची ओळख करायची होती.आता तो लवकर कॉलेजला यायला लागला आणि तिच्या येण्याचा, जाण्याच्या वेळेवर लक्ष ठेऊ लागला. तिच्यासोबत असलेल्या मुलीपैकी स्मिता ओळखीची होती, तिच्याकडे अजून अजून खोलात चौकशी करत होता. एकदिवस मला म्हणाला,
"शाम्या, आज तिला बोलती करतो बघ..
"अरे सांभाळून बाबा, सांगलीची आहे श्रीमंतांची पोरगी..
"अरे सोड.. मी पण आहे ना मुंबईचा.. मला ती हवीच..
कॉलेजमध्ये आल्यावर रोज तिच्या मागेपुढे राहणाऱ्या मंदारने शेवटी धाडस केलेच... ती वर्गातून बाहेर पडत असताना, त्याने तिला हटकले.
"हाय, मी नवीन नायक...
मंदारने खोटेच नाव सांगितले. दुसऱ्या क्षणी तिच्याकडुन उत्तर आले..
  "होय काय? मी समजत होते तू मंदार कर्णिक..
मंदार थिजल्यासारखा उभा राहिला. हसत हसत शिल्पा तिच्या मैत्रिणीत शिरली. बाजूला उभा असलेला मी मंदारची झालेली ही फजिती पाहून हसू लागलो.
", शाम्या, ही भलतीच हुशार आहे रे..
बघ हिला कशी घुमवतो..
 . आणि मंदार तिच्या पाठी लागला. काय झाले कसे झाले कोण जाणे, पण दोन दिवसात शिल्पा मंदारच्या गाडीत दिसू लागली.
माझ्या साक्षीने मंदार -शिल्पा यांचे प्रेम वाढले. आता ती दोघे सतत बरोबर दिसू लागली.शिल्पाचा ड्रायव्हर तिला रोज सकाळी नऊ वाजता कॉलेजमध्ये सोडायचा.. मग मंदारची बुलेट तयार असायची.. त्यावर बसुन ती दोघे मुंबईभर फिरायची. कधी त्याने मार्सिंडीज आणली की मी पण सोबत असायचो. त्याने तिला आपला बंगला, बांद्र्याचे अपार्टमेंट, आपली फॅक्टरी, कॉर्पोरेट ऑफिस सारे दाखवले.
शिल्पाला समुद्र फार आवडायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही तिघे बँडस्टॅन्डच्या समुद्रावर जायचो.खारावारा अंगाला घासत असायचा. मंदार शिल्पाच्या मांडीवर डोके ठेऊन डोळे मिटून पडलेला असायचा..आणि शिल्पा समुद्राच्या लांटाकडे पहात गाणे म्हणायची..
    "जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाटे.... वाट पहाते..
   शिल्पा मंदारच्या प्रेमामुळे मी खूष होतो. त्याच्या मम्मीच्या दुसऱ्या लग्नामुळे तो दुखावला होता.आतल्या आत जळत होता. शिल्पा त्याच्या आयुष्यात आली आणि तो सावरला.त्याच्या चेहेऱ्यावर चकाकी आली.त्या दोघांनी मंदारच्या बाबांना सांगायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी पण आनंदाने जबाबदारी स्वीकारली कारण सांगली भागातील साखर कारखान्याच्या मालकाची मुलगी आपली सून म्हणूंन ते थोडेच सोडणार होते. मी त्याना मंदार शिल्पा यांच्या लग्नाबद्दल सांगणार होतो पण त्याआधीच.मला सकाळी सकाळी मंदारचा फोन आला
"शाम्या, काल रात्रीपासून शिल्पाचा फोन नॉट रेचेबल येतोय रे..
"अरे असेल कुठेतरी..फोन चार्ज केला नसेल कदाचित.
नऊ वाजता मी आणि मंदार कॉलेज मध्ये पोचलो आणि शिल्पाची वाट पाहू लागलो. दहा वाजले.. अकरा वाजले.. बारा वाजले. शिल्पाचा पत्ता नव्हता. मी तिच्या मैत्रिणीना फोन लावले.. कुणालाच कसलीच कल्पना नव्हती.
मंदार काळजीत पडला. तिच्या वरळी मधील बिल्डिंगमध्ये आम्ही दोघे गेलो. काल सायंकाळ पासून प्लॅट बंद होता. बिल्डिंगच्या सेक्युरिटीकडे चौकशी केली, त्त्यांचे म्हणणे, एका काळया रंगाच्या महागड्या गाडीत तिचे सर्व सामान भरले गेले आणि ती त्या गाडीत बसुन गेली.
ही काळया रंगाची गाडी म्हणजे तिच्या वडिलांचीच असणार,हा आमचा अंदाज होता, तो खरा ठरला कारण त्याच रस्त्यावर नेहेमी शिल्पाला कॉलेजला सोडणारे ड्रायव्हर दादा भेटले. त्याना मंदारने विचारले..
"दादा,शिल्पाचे घर बंद दिसलें, गेली कुठे ती?
"मोठे शेठ आलेले काल स्वतः, तिला घेउंन गेले.
"पण तिचा फोन बंद आहे? दुसरा तिचा नंबर आहे काय?
"न्हाई, मला माहित नाही.
मंदार सैरभैर झाला. त्याचे कुठेच लक्ष लागेना.
दोन दिवस आम्ही वाट पाहिली.. मोबाईल बंदच तिचा. कुठल्याही मैत्रिणीशी संपर्क नाही.. पण मला अंदाज होता, ती कुठेही असली तरी मंदारशी संपर्क करणार.
पण तिचा फोन येईना आणि मंदार हवालदिलं झाला.. शेवटी आम्ही दोघांनी सांगलीला जायचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे सांगलीत पोहोचलो, सांगलीत मंदारच्या बाबांचे मित्र होते जयसिंगराव. त्यान्च्याच घरी आम्ही पहिल्यांदा पोहोचलो. मंदारला पाहून त्याना आनंद झाला.
"अरे मंदार, कसा काय अचानक?
"काका, या भागात दळवी नावाचे कोणी आहेत ना साखरकारखानदार?
"हो, तासगावच्यापुढे त्त्यांचा कारखाना आहे. मी कालच तिकडे गेलेलो, त्यान्च्या कन्येचे लग्न होते ना काल?
"लग्न? कोणाचे?
"अरे त्यान्च्या मुलीच, शिल्पाचं..
"शिल्पाचं लग्न? झाल?
"अरे हो.. आज दुपारी ती कॅनडाला जायची होती नवऱ्यासोबत, अकराची प्लाईट होती तिची. सुटलं असणार तिचे विमान केंव्हाच..
मंदार घामाने डबडबला..मी त्याचा हात घट्ट पकडला.
"पण काका ती आमच्या कॉलेजात होती.. आम्हाला काहीच माहिती नाही..
अरे हे बघ फोटो.. नवरा नवरीचे.
  मी पाहिले, शिल्पा आपल्या नवऱ्याला हार घालत होती आणि हसत होती.
"बर काका, आम्ही आता तिकडे जात नाही.. तिचीच चौकशी करायची होती.आम्ही बाहेर पडलो.
  आता मी गाडी चालवायला बसलो. मंदार मागे बसला. मंदार गाडीत रडत होता. मी सहज माझा मोबाईल उघडला-शिल्पाचा मेसेज होता..
"शामू, हा मेसेज विमानातलवरुन करत आहे, मी माझ्या नवऱ्यासोबत कॅनडाला निघाले, माझे नवीन आयुष्य सुरु होते आहे. मंदारला म्हणावे मला विसरून जा.... बाबांना मी मंदारबरोबर फिरते आहे हे कळले. त्यानी मंदारची चौकशी केली तेंव्हा मंदारचीआई घरातून पळाली आणि तिने दुसरे लग्न केल्याचे कळले. या माहितीने ते खवलले, माझे काही न ऐकता मला सांगलीला घेऊन गेले आणि त्यान्च्या पार्टनच्या मुला बरोबर काल लग्न लावले. मी खूष आहे की नाही हे कोणी विचारले नाही.. पण काल माझे लग्न झाले आणि मी दुसऱ्याची बायको झाले हे खरे.
तेंव्हा तू मंदारचा बालमित्र आहेस, तूच त्याला संभाळशील. मंदारला म्हणावे, कोणी शिल्पा तूझ्या आयुष्यात काहीकाळ आली होती हे विसर आणि आवडीच्या चांगल्या मुलीशी लग्न कर...
मी शिल्पाचा तो मेसेज मंदारला वाचून दाखविला आणि शांतपणे गाडी चालवू लागलो. तो डोळे मिटून सर्व ऐकत होता..
मंदारला मी घरी सोडले. दुसऱ्यादिवशी त्याच्या रूममध्ये गेलो तर दारूच्या बाटल्या,-सोडा आजूबाजूला होत्या. मला पहाताच मंदार रडू लागला "शामू, काय माझे नशीब रे.. माझी जन्मजाती दुसऱ्याबरोबर पळून गेली आणि माझी शिल्पा दुसऱ्याची झाली.... एका शब्दाने मला न कळवता.. म्हणते मला विसरून जा... दुसऱ्या मुलीशी लग्न कर.. कस विसरू रे शामू?
मी मंदारला थोपटत राहिलो. दुसरे काय करू शकत होतो मी? त्याला तरी कोण जवळचे होते? आई निघून गेली, बाबांना मुलाबरोबर दोन शब्द बोलायला वेळ नाही.
त्या दिवसा पासून मंदार कॉलेजला यायचा बंद झाला. त्याने दारू पकडली. सतत दारूच्या नशेत राहू लागला. मला काळजी वाटू लागली, मी त्याच्या बाबांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. व्यसन सुटावे म्हणून त्यानी त्यांचे मित्र डॉ. शानभाग यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.
डॉ. शानभाग हे मानसोपचारतज्ञ. त्यानी त्याची बरीच चौकशी केली, माझ्याकडून बरीच माहिती घेतली. आईने आणि प्रेयसीने दिलेल्या धक्क्यामुळे मंदारने दारू जवळ केली, हे त्यान्च्या लक्षात आले. ते रोज त्याच्याशी बोलयला लागले. मंदारला काय हवे काय नको हे पहाण्यासाठी आणि मनातील विचार कमी करण्यासाठी त्यानी मारिया या समूपदरशक मुलीची नेमणूक केली. आता मारिया सतत मंदारसोबत असायची. त्याच्याबरोबर हसायची, बोलायची, त्याला जोक्स सांगायची. त्याचे मन दुसरीकडे वाळवायला मदत करायची.
मी पण हॉस्पिटलमध्ये रोजच जात होतो. मंदारचे बाबा दोनवेळा येऊन मुलाला पाहून गेले.
डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि मारियाचे मनाला केलेले उपचार यांनी मंदारची दारू सुटली.. आता तो व्यवस्थित जेऊ लागला.. झोपू लागला.
पण माझ्या लक्षात येऊ लागले मारिया जराकुठे आजूबाजूला गेली की तो डिस्टर्ब होऊ लागला. तिने समजावले की तो शांत होऊ लागला.
शेवटी माझा अंदाज खरा ठरला. मंदार मला म्हणाला 
"शामू, या दुःखातून मला बाहेर काढले ते डॉक्टरापेक्षा मारियाने. तिने मला समजून घेतले. शामू, मला मारिया आवडू लागलीय.मला तिच्याशी लग्न करायचे आहे.
", पण मारियाला विचारलस? तिला तू आवडतोस काय हे?
"ते तू विचार शामू.. तूझ्याएव्हडं मला कोणच ओळखत नाही..
"ठीक आहे पण मंदार तूझ्या बाबांना हे अजिबात आवडणार नाही..
"त्त्यांचा मी फारसा विचार करत नाही.. तू मारियाला विचार.
मी मारियाला गाठले आणि मंदारचे मत सांगितले. मारिया आंनदीत झाली.
"त्याच्यावर उपचार करता करता मी त्याच्या प्रेमात पडले.. तो आहेच तसा लोभस.. खुल्या मनाचा.. हळवा.. त्याचेवर वाईट प्रसंग आले म्हणून तो व्यसनाच्या आधीन झाला.. हे खरे असले तरी मी त्याला शोभेन का? सर्वच बाबतीत तो मोठा आहे, मी वरळीच्या चाळीत रहाणारी.. माझे वडील सफाईकामगार. घरची गरिबी. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी..
   "ते सर्व माझ्यावर सोड मारिया.. तू फक्त हो म्हण..
मारिया लाजली आणि हो म्हणाली.
मी मंदारच्या बाबांना भेटलो आणि मंदार मारियाबरोबर लग्न करू इच्छितो, हे त्यान्च्या कानावर घातले. ते चिडले. त्यानी मंदारला घराबाहेर घालवण्याची धमकी दिली. पण मंदार बधला नाही. शेवटी एका लहान हॉलमध्ये मंदार मारिया विवाहबद्ध झाली. मंदारचे बाबा लग्नाला आले नाहीत पण त्यानी त्त्यांचे वांद्रयचे अपार्टमेंट मंदारला भेट दिले.
आता मंदार मारिया यांनी वांद्र्याच्या घरात संसार थाटला. मारिया हौशी, तिने अनेकठिकाणी फिरून सुंदर फार्निचर आणले, उंची कार्पेट्स आणली.
मंदार आता नियमित त्यान्च्या कंपनीत जाऊ लागला. मिटींग्सना हजर राहू लागला. निर्णय घेऊ लागला. त्यामुळे त्याचे बाबा पण खूष होते. मी पण मंदारच्या कंपनीत अकाउंटविभागात नोकरीला लागलो आणि कंपनीतील सहकारी स्त्रीसोबत विवाहबद्ध झालो.
मंदार रोज लवकर घरी पोचू लागला आणि मारियाला घेऊन फिरायला न्यायला लागला.काहीवेळा मी आणि माझी पत्नीपण सोबत असू. कधी मोठया हॉटेल्समध्ये कधी मॉलमध्ये कधी गार्डन्स पण बहुतेकवेळा बँडस्टॅन्डच्या समुद्रकिनाऱ्यावर. हा समुद्रकिनारा मंदारच्या आवडीचा. शिल्पासोबत तो इथेच यायचा. मग शिल्पा गाणे म्हणायची...
 "जिथे सागरा.. धरणी मिळते...
मंदार मारियाला हेच गाणे म्हणायला सांगायचा.. मारियाचा आवाज भलताच सुंदर आणि कातर होता.. त्यात भावुकता होती.. मारिया छान गाणे म्हणायची..
  "जिथे सागरा.. धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते.... वाट पहाते...
जिथे सागरा........
मंदार मजेत होता. मारियाने त्याला खूश ठेवलं होत. शिल्पाच्या लग्नामुळे त्याला जो धक्का बसला होता, त्यातून तो पूर्णपणे बाहेर पडला होता.
अचानक संपूर्ण जगावर करोना विषाणूची दहशत आली. सारे जग स्तब्ध झाले. मुंबई बंद झाली. आम्ही सारे घरात अडकलो.
एक दिवस मंदारचा खुप आनंद होऊन फोन आला.. मारियाला दिवस गेले होते. तो प्रचंड खूष होता. पण घरात मोठे कोण नव्हते. या परिस्थितीत कुणाची सोबत हवी होती.मारियाची आई मग सोबत आली. मग मारियाला भेटायला तिच्या माहेरची काही लोक आली.मंदार मारियाला डॉक्टरकडे नेत होता. काळजी घेऊनही मारिया करोना पॉझिटिव्ह आली. तिचा खोकला कमी होईना. त्यात गरोदर.
शेवटी मंदारने मारियाला खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.
     मंदार काळजीत पडला. मला सतत फोन करत असे. मी पण घरात अडकलो होतो.मी हॉस्पिटलमध्ये फोन करुंन मारियाची चौकशी करत होतो.
शनिवारी सायंकाळी मारियाची ऑक्सिजन लेव्हल खूपच खाली गेली. उपचार सुरूच होते. मी देवाकडे प्रार्थना करत होतो, मारिया सुखरूप बाहेर येऊ दे. रात्री दहा वाजता मी माझी जुनी स्कुटर बाहेर काढली.. पोलिसांनी ठीकठिकाणी नाकेबंदी केली होती, तशा परिस्थितीत लपतछपत गल्ली बोळातून जात मंदारच्या घरी पोहोचलो.
मंदार काळजीत होता. आत बाहेर करत होता. घरी कुणीच नव्हते -मी आल्याने त्याला बरे वाटले. बाहेरून डबा यायचा. तो घराबाहेरच होता. मी डबा आत आणला आणि मंदारला चार घास खायला लावले.
रात्री बारावाजता दुसरा मेसेज आला. ऑक्सिजनलेव्हल वर येत होती. आम्ही खूष झालो. झोपण्यासाठी गादीवर पडलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा मारियाची तब्येत वरखाली होत होती. सायंकाळी चार वाजता लेव्हल खाली जात असल्याचा मेसेज आला, आम्ही काय करावे याचा विचार करत असताना मारिया मृत झाल्याचा फोन आला.
    मंदार कोसळला. त्याला सांभाळणे मला कठीण झाले. मी मारियाच्या बाबांना कळविले तसेच मंदारच्या बाबांना कळविले. बॉडी मिळणार नव्हती, त्यामुळे अखेरच दर्शन पण शक्य नव्हते.
मी एकबाजूने मंदारला सांभाळत होतो आणि दुसऱ्या बाजूने डोक्यात विचाराचा कल्लोळ माजला होता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या मंदारने लहान वयात आई, तारुण्यात प्रेयसी आणि आता लग्नाची बायको गमावली होती. ज्या ज्या स्त्रियावर त्याने जीव लावला होता, त्या स्त्रिया त्याला चटका देऊन दूर गेल्या होत्या.
आयुष्य म्हणजे तरी काय? देव मंदारची पुन्हा पुन्हा का परीक्षा पहातो आहे? एकाच माणसाने किती सोसायचं? पैसे खुप असले म्हणजे सुख मिळतं? मी सर्वसाधारण परिस्तितला, पण मी सुखी म्हणायला हवं.. माझे आईवडील माझ्यासोबत आहे.. पत्नी व्यवस्थित घरी आहे.. सर्वजण एकत्र जेवतो, बोलतो... आणि मंदार?
रडणाऱ्या मंदारला मी थोपटत होतो. त्याची कशी समजूत काढावी हे समजत नव्हते. 
रात्रीचे दहा वाजले. अचानक मंदार म्हणाला
"शामू, बँडस्टॅन्डला जाऊ.. त्या किनाऱ्यावर..
मी बाहेर पाहिलं. मुंबई शांत होती.. पोलिसांची वर्दल थोडी कमी होती. मी म्हंटल "चल, माझ्या स्कुटर वरुन जाऊ. आम्ही दोघे माझ्या जुन्या स्कुटरवरुन गल्ली बोळातून बँड स्टॅन्ड च्या वाळूत बसलो.
समुद्राच्या लाटा कोसळत होत्या, त्या किनाऱ्यावर चिटपाखरूही नव्हते. लांबून हॉटेल्स मधील मंद दिवे तेव्हढे दिसत होते. ज्या ठिकाणी शिल्पा, मारिया बसायच्या त्याच ठिकाणी आम्ही बाजबाजूला बसलो. रडवेला मंदार बोलू लागला..
"शामू, तू माझा लहानपणापासूनचा मित्र.. मला पहात आला आहेस.. माझे डॅडी कधीच जवळ नव्हते.. होती जवळ आई.. मी लहानाचा मोठा तिच्यासमोर होत होतो आणि ज्या वेळी मला गरज होती... त्यावेळी ती तिच्या प्रियकरासोबत गेली, परदेशी गेली.. तिला माझी जरसुद्धा आठवण आली नाही? काय करील हे पोर, असं वाटलं नाही? रस्त्याच्या बाजूला भीक मागणाऱ्या भिकारणी सुद्धा त्यान्च्या बाळांना जवळ घेउंन बसतात.. साने गुरुजींनी' 'शामची आई' लिहिलं.. का? आईची महती जगाला कळावी म्हणून? आपल्या बाळासाठी आपल काळीज काढून देणाऱ्या आईची गोष्ट मी ऐकली होती.. आणि माझी आई?"हॅम्लेट नाटकात दुसरे लग्न करून हॅम्लेटला पोरक करणाऱ्या आईचा हॅम्लेट खून करतो. आपल्या विषयवासने साठी पोरक्या पोराला टाकून जाणाऱ्या स्त्री ला काय शिक्षा करायची? आणि मीच तिचा पोरगा का झालो?
"शांत हो मंदार... शांत हो..
"कसा शांत होऊ शामू.. या किनाऱ्यावर आणि अनेक पार्क्स मध्ये हातात हात घेऊन प्रेमकुन्जन करणारी प्रेमी युगुल पहातो ना.. तेंव्हा काळीज जळत.. आयुष्यभर साथ देणारी प्रेयसी अनेकांना मिळते पण मला... याची आई आपल्या प्रियकरा बरोबर पळाली म्हणून असला जावई नको म्हणणारा बाप माझ्या प्रेयसीचा आणि माझी प्रेमिका दुसर्याबरोबर लग्न करून गेली सुद्धा... आणि मला म्हणते"विसर मला.... अग, विसरायचं  होत तर प्रेमच का केलंस?
पण मारिया वेगळी.. तीन वर्षे तिने साथ केली.. खऱ्या अर्थाने माझ्यात एकजीव झाली, मारियानेच समजून घेतलं मला... आता कुठे मला प्रेम मिळतंय तोच.. तोच.. ती पण गेली मला सोडून? बाई ग, तुला जायचंच होत मग का आलीस माझ्या आयुष्यात? का आलीस.. बोल?
 मी थकलोय रे शामू.. थकलोय मी.. कुणासाठी जगायचं? कुणासाठी जगायचं?
"शांत हो मंदार.. शांत हो..
"शामू, एक करशील.. याच ठिकाणी, याच वाळूत बसुन शिल्पा गाणे म्हणायची.. मग मारिया म्हणायची.. या सागराकडे पहात.. त्याची गाज ऐकत.. अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पहात.. त्या शुक्र चांदणीकडे पहात.. ते गाणे म्हणशील माझ्यासाठी?
   मी गाणे म्हणू लागलो..
"जिथे सागरा.. धरणी मिळते.
तेथे तुझी मी वाट पहाते.. वाट पहाते..
"परत म्हण शामू.. म्हणत राहा.. म्हणत राहा..
मी कितीवेळा गाणे म्हंटले कोण जाणे. मंदारला झोप लागली. माझे पण डोळे जड झालेले.. पटकन झोप लागली.
पायाला पाण्याचा स्पर्श झाला म्हणून जाग आली.. बहुतेक भरती सुरु झाली होती.. पाय पाण्यात होते  ते वर केले.. वर शुक्राची चांदणी चमकत होती.. त्या प्रकाशात बाजूला पाहिले -मंदार जाग्यावर नव्हता.. मी पटकन उठलो.. आजूबाजूला पाहिलं.. मंदार कुठेच नव्हता.. मी पटकन स्कुटर चालू केली.. संपूर्ण किनारा पालथा घातला.. मंदार कुठेच नव्हता. मी स्कुटर घेऊन रस्त्यावर आलो.. पुढे मुख्य रस्त्यावर आलो.. मंदारच्या बिल्डिंगपर्यत पोहोचलो.. त्याच्या मूळ बंगल्यावर गेलो... मंदार कुठंच नव्हता.. त्याच्या वडिलांना फोन करुंन सांगितलं.. त्यानी मुंबई पुलिसमध्ये तक्रार दिली.. त्यानी मुंबई पिंजून काढली..टीव्ही वर फोटो माहिती दिली, पेपरमध्ये जाहिरात दिली..
मंदार किंवा मंदारची बॉडी कुठेच मिळाली नाही.
   ही कहाणी मंदारची.. माझ्या सख्या मित्राची.. पाच वर्षे झाली.. मी अजून मंदारची वाट पहातोय.. ही अधुरी कहाणी..

 प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299.

1815. सुरेश भटांचे शेर

 (अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

(ई)
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?

(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो 
ऐकण्यासाठी सुना बाजार होता

(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले

(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’

(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!

(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाकट्यांचे करावे?

(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही!

(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी
मातीत पावलांचे काही ठसेच होते!

(ट) 
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण जाणे,हारलो की जिंकलो मी

(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही

(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता

(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणाऱ्या  कसलीच खंत नाही.

(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?

(न) 
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा

(प) 
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!

(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते !

(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले

(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !

(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...

(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...

(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....

(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...

(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....

(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती..

(ह)
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा..

(ज्ञ)
ज्ञानदेव लिहूनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी.... ते

       🌹कवी-सुरेश भट 🌹
सर्वांना नक्कीच फॉरवर्ड करा

1814. पती प्रशंसा दिवस

 आज पती प्रशंसा दिवस आहे.
चला, दोन मिनिटे शांतता पाळू आणि थोर व्यक्तींच्या काही सुविचारांचे वाचन करू.
पहिला सुविचार
"लग्नानंतर नवरा आणि बायको हे नाण्याच्या दोन बाजूंसारखे होतात. ते एकमेकांसमोर येऊ शकत नाहीत, पण तरीही कायम एकत्र राहतात."
– अल गोर
"एक चांगली पत्नी आपल्या नवऱ्याला तेव्हाच माफ करते, जेव्हा चूक तिची असते."
– बराक ओबामा
"प्रेमात चमत्कार घडतात. पण लग्न झाल्यावर, नेमकं काय झालं, हेच कळत नाही."
– स्टीव्ह जॉब्स
आणि सर्वात उत्तम सुविचार...
"लग्न हे असे अदभुत जंगल आहे, जिथे सुंदर हरणीं, शूर सिंहाना, ठार म्याव करूनटाकतात ."
– ब्रॅड पीट

---
राष्ट्रीय पती प्रशंसा दिवस !! 💐😀
हसण्याचा डोस – Laughter Therapy
लग्नाच्या वेळी बहुतांश नवरे मुलीच्या पालकांना सांगतात,
"मी तुमच्या मुलीला आयुष्यभर आनंदी ठेवीन."
कधी ऐकलंय का की मुलगी नवऱ्याच्या पालकांना असं म्हणते –
"मी तुमच्या मुलाला आयुष्यभर आनंदी ठेवीन."
नाही ना...? कारण स्त्रिया खोटं बोलत नाहीत !

---
पती-पत्नीचे गुपित
पत्नीला नवऱ्याचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तिला फक्त दु:खी आणि अस्वस्थ दिसायचे असते.
आणि नवऱ्याला पत्नीचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर त्याला फक्त आनंदी आणि आरामात दिसायचे नसते.

---
तत्वज्ञानी नवरा म्हणतो:
प्रत्येक पत्नी ही नवऱ्याची ‘Mistress’ असते…
"पहिल्या वर्षी Miss आणि उरलेल्या आयुष्यात Stress!"

---
नवऱ्याची अवस्था
नवरा म्हणजे Split AC सारखा असतो –
बाहेर कितीही मोठ्या आवाजात बोलत असला तरी, घरात मात्र शांतच असतो.

---
हे शेअर करा आणि इतरांनाही हसवा...!
हसणं हे औषधासारखं काम करतं!
"आज जागतिक पती दिवस आहे... सर्व नवऱ्यांनी आनंदी राहा...
किमान एक दिवस तरी तुमच्या नावाने राखीव आहे..!" 😍

1813. डेटींगचे आकर्षण आणि मीट्सअपची क्रेझ

 ( जहा आप हो वहा ॲप की क्या जरूरत ??)
      आधी आध्यात्मिक अंगाने बोलते.. जेव्हा एकटे असाल तेव्हा भगवंताशी बोला आणि समुहात असाल तेव्हा भगवंताविषयी बोला.. हे इतकं सुंदर , कुठलीही फसवणूक न होणारं ॲप असताना या कलियुगात सोशल मिडीयावर वेगवेगळी ॲप्स आली आहेत .. हे चांगलं कि वाईट यात मला जायचं नाही पण आपली प्रेमाची माणसं सोडून ही मंडळी अनोळखी लोकांना भेटतात .. त्यांच्या सोबत वेळ घालवतात.. आजी आजोबा नकोत...आईवडील नकोत..नातेवाईक नकोत.. आपला मित्रपरिवार सोडून अनोळखी लोकांसोबत जाऊन तिथे २०० ते १००० रुपये भरुन , त्यांच्या जोडीला व्यसने करुन या पिढीला खरच आनंद मिळतो का ?? .. कि ही पळवाट आहे ?? आपल्या आयुष्यात असलेला मौल्यवान वेळ आपण असा वाया घालवून या पिढीला काय साध्य करायचे आहे ??..सुंदर साहित्य असताना आपण पुस्तकाशी बोलूं शकताना ही संकट ओढवणारी फ्याडं मिरवण्यात खरच शहाणपण आहे का ??
यांना कुठलीही कमीटमेंट नको , जबाबदारी नको , चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या नाहीत आणि वाईट गोष्टी मार्केटमधे आल्या कि त्याच्या आहारी जाऊन आयुष्याची माती करुन घ्यायची..
     माझ्या ओळखीत एक २८ वर्षांची मुलगी आहे.. भरमसाठ वाढलेलं वजन, मंद हालचाली , कशातही रस नाही , समोर उद्दिष्ट नाहीत , स्वप्नं नाहीत , नवीन काही शिकण्याची तयारी नाही फक्त रोज एका नवीन मित्रासोबत हिंडायचं , खायचं , प्यायचं आणि आलेला प्रत्येक दिवस पुढे ढकलायचा .. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न नाहीत , व्यायाम नाही , वाचन नाही , नोकरी नाही.. खरच वाईट वाटतं आणि किव येते.. स्वतःचं घर आहे , वडिलांनी ठेवलेले पैसे आहेत त्यामुळे आर्थिक गरज नाही म्हणुन मुलांना अति प्रॉपर्टी देउ नये.. आयतं मिळालं कि मुलं कष्ट करत नाहीत..
      गेल्या आठवड्यातली एक गोष्ट , माझा ५८ वर्षाचा मित्र मला या अशा ॲप बद्दल विचारत होता.. मी त्याला म्हटलं मला कुठल्याही ॲपबद्दल काहीही माहित नाही.. त्याला म्हटलं , तुला कशाला हवय रे ॲप ??.. त्यावर तो म्हणाला , अगं बायको तिच्या व्यापात , मुलगा बाहेर देशात गेलाय तुला माहीत आहे कि त्यामुळे कधीकधी एकटं वाटतं...त्याला म्हटलं , आम्ही आहोत कि.. त्यावर तो म्हणाला , सोनल तुला माहित आहे कि मला जास्त मित्र नाहीत .. त्याला म्हटलं, मित्र कर ना .. मित्र परिवार हवाच..  त्यावर तो म्हणाला , अगं मित्र म्हटलं कि रुसवे फुगवे , देणं घेणं आलं.. इथे बरं ना २००/५०० रुपये दिले , आनंद घेतला कि झालं.. पुन्हा  नवा गडी नवं राज्य.. ऐकून कमाल वाटली .. म्हणजेच काय तर तरुण पिढीच नाही तर ६० च्या घरातील मंडळीही आप से  बढकर ॲप म्हणू लागली.. मग वृध्दाश्रम  आणि एकाकीपण आलं तर दोष कोणाला द्यायचा??.. तरूण पिढिला कि या माझ्या मित्रांना ??.. 
सगळच भंजाळलय राव.. काय बी कळेना झालय..
( आप ( वाचक मित्र  ) हो त्यामुळे मला तरी या ॲपची गरज नाही.. आणि तुम्हाला ???)

1812. पोलीस प्रशासन यांचे आवाहन

     "शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे,"
 शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांच्या केसांच्या शैली आणि वर्तनाबाबत कितीही कडक नियम असले तरी, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही.  शिक्षक निराशेने फक्त पाहत राहतात पण काहीही करू शकत नाहीत.
 जर पालकांनी मुलांवरील लक्ष आणि नियंत्रण गमावले तर ते अशा प्रकारचे लोक बनतात.
 शिस्त केवळ शब्दांनी येत नाही;  थोडी भीती आणि शिक्षा देखील आवश्यक आहे.
 मुलांना शाळेत भीती वाटत नाही,
 घरी परतल्यावरही मला भीती वाटत नाही,
 म्हणूनच आज समाज घाबरत चालला आहे.
 आज तीच मुले गुंड बनली आहेत आणि लोकांवर हल्ला करत आहेत.
 त्याच्या वागण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
 त्यानंतर त्यांना पोलिसांनी पकडले आणि न्यायालयात शिक्षा झाली.
 "जो समाज आपल्या गुरूंचा आदर करत नाही तो समाज नष्ट होतो."
 "हे खरे आहे"
 गुरुबद्दल ना भीती आहे ना आदर.  अशा परिस्थितीत शिक्षण आणि मूल्ये कशी येतील?
 “मला मारू नको!  शिव्या देऊ नका!  ज्याला स्वतःचा अभ्यास करायचा नाही त्याला प्रश्न का विचारायचा?  जर वाचनावर किंवा काम पूर्ण करण्यावर भर दिला गेला तर ती शिक्षकांची चूक असेल!”
 पाचवीपासून मुलांना विचित्र केसांच्या शैली, फाटलेल्या जीन्स, भिंतींवर बसणे आणि जवळून जाणाऱ्या लोकांची चेष्टा करणे अशा सवयी लागतात.
 जर कोणी म्हटले, "अरे साहेब येत आहेत!"  तर उत्तर आहे, "ते येऊ द्या!"
 काही पालक तर म्हणतात, "आमच्या मुलाने अभ्यास केला नाही तरी काही फरक पडत नाही, पण शिक्षकांनी त्याला मारहाण करू नये."
 "तुझे केस कोणी कापले?" असे विचारले असता?  मग उत्तर येते, "आमच्या वडिलांनी ते असेच करून दाखवले, साहेब."
 मुलांकडे अभ्यासाचे साहित्य नाही.  जर पेन असेल तर पुस्तक नाही, जर पुस्तक असेल तर पेन नाही.
 भीतीशिवाय शिक्षण कसे शक्य आहे?
 शिस्तीशिवाय शिक्षणाचे कोणतेही परिणाम होत नाहीत.
 "ज्या कोंबडीला भीती नसते ती बाजारात अंडी घालत नाही."
 आजकालच्या मुलांचे वर्तनही असेच झाले आहे.
 शाळेत, जर एखाद्याने चूक केली तर त्याला शिक्षा करता येत नाही, फटकारता येत नाही किंवा गंभीरपणे समजावूनही सांगता येत नाही.
 आजच्या पालकांना प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्ण वातावरणात सांगायची असते.
 हे शक्य आहे का?
 समाजही असेच करतो का?
 पहिली चूक माफ करतो का?
 आता शिक्षकांना कोणतेही अधिकार उरले नाहीत.
 जर शिक्षकाने मुलाला थेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो.
 पण जर तेच मूल मोठे होऊन चूक करत असेल तर त्याला मृत्युदंड दिला जाऊ शकतो.
 पालकांना एक विनंती:
 मुलांचे वर्तन सुधारण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.
 काही शिक्षकांच्या चुकीमुळे सर्व शिक्षकांचा अपमान करू नका.
 ९०% शिक्षकांना फक्त मुलांचे चांगले भविष्य हवे असते.
 हे खरे आहे.
 म्हणून आतापासून प्रत्येक छोट्या चुकीसाठी शिक्षकांना दोष देऊ नका.
 आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा काही शिक्षक आम्हाला मारहाण करायचे.
 पण आमचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना प्रश्न विचारत नव्हते.
 त्याला फक्त आमच्या कल्याणाची काळजी होती.
 प्रथम, पालकांनी आपल्या मुलांना गुरुचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
 एकदा तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा.
 मुलांच्या बिघडण्याची ६०% कारणे मित्र, मोबाईल आणि मीडिया आहेत.
 पण उरलेले ४०% पालकांमुळे!
 अति प्रेम, अज्ञान आणि अंधश्रद्धा मुलांना हानी पोहोचवतात.
 आजच्या ७०% मुलांमध्ये -
 👉 जर पालकांनी गाडी किंवा बाईक स्वच्छ करायला सांगितले तर ते ते करत नाहीत.  आणि ते अशा महागड्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरतात ज्यांचा कोणताही उद्देश नाही,
 👉 बाजारातून माल आणायला तयार नाही.  आता आम्ही ते फक्त ऑनलाइन ऑर्डर करतो.  मला खरेदीचा अनुभवही नाही.
 👉 शाळेचे पेन किंवा बॅग योग्य ठिकाणी ठेवू नका.
 👉 घरकामात मदत करत नाही.  आणि टीव्हीवर काहीतरी ना काही पाहत राहा.
 👉 रात्री १० वाजेपर्यंत झोपण्याची आणि सकाळी ६-७ वाजता न उठण्याची सवय ठेवू नका.
 👉 जेव्हा कोणी गंभीर काहीतरी बोलतो तेव्हा तो उलट उत्तर देतो.
 👉 फटकारल्यावर वस्तू फेकतो.
 👉 जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा आपण ते जेवण, आईस्क्रीम आणि आपल्या मित्रांसाठी भेटवस्तूंवर खर्च करतो.
 👉 अल्पवयीन मुले दुचाकी चालवतात, अपघातांना बळी पडतात आणि केसेसमध्ये अडकतात.
 👉 मुली दैनंदिन कामात मदत करत नाहीत.
 👉 मला पाहुण्यांना एक ग्लास पाणीही द्यावेसे वाटत नाही.
 👉 काही मुलींना २० वर्षांच्या वयातही स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही.
 👉 योग्य कपडे घालणे देखील एक आव्हान बनले आहे.
 👉 फॅशन, ट्रेंड आणि तंत्रज्ञानाच्या मागे धावणे.
 या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत.
 आपला अभिमान, प्रतिष्ठा आणि प्रभाव मुलांना जीवनाचे धडे शिकवू शकत नाही.
 "ज्या व्यक्तीने दुःख अनुभवले नाही तो जीवनाचे मूल्य समजू शकत नाही."
 आजचे तरुण वयाच्या १५ व्या वर्षी प्रेमकथा, धूम्रपान, दारू, जुगार, ड्रग्ज आणि गुन्हेगारीमध्ये अडकत आहेत.
 इतर आळशी होतात आणि त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते.
 मुलांचे जीवन सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
 जर आपण काळजी घेतली नाही तर येणारी पिढी उद्ध्वस्त होईल.
 मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला बदल करावे लागेल.
 🙏 हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकाने कृपया तो तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा.
 "मला वाटत नाही की सगळेच बदलतील..."
 पण मला खात्री आहे की किमान एक व्यक्ती बदलेल.” 
 शिक्षक दया दाखवू शकतात पण पोलीस करू शकत नाहीत.
 "पोलिसांकडून मारहाण आणि नंतर न्यायालयात पैसे खर्च होतात, पण शिक्षकांकडून फटकारण्यावर काही खर्च होत नाही"
 
वास्तव हेच आहे की "पालकांनो वेळीच जागे व्हा" अन्यथा येणारा काळ खूप भयानक आहे. आपला पाल्य काय करू शकेल याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही.
  
सौजन्य..
"पोलीस प्रशासन"

1811. माणसाचं आयुष्य

 माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात कित्येक माणसं येतात, काही सोबत राहतात, काही वाटेतच सोडून जातात. कोणी प्रेम देऊन जातं, तर कोणी फसवून. कोणी आपलं म्हणतं, तर कोणी विश्वासघात करतं. पण आपण काय करतो? त्या फसवणुकीचा, त्या वाईट आठवणींचा बोजा उराशी घट्ट धरून ठेवतो.
सतत विचार करत राहतो- "तो असं का वागला?", "तिने माझ्यासोबत असं का केलं?", "मी काय चुकलो?"
पण यातून आपण काय मिळवतो? फक्त त्रास, दुःख आणि मनस्ताप.
प्रत्येक नातं टिकतंच असं नाही...
लोक येतात आणि जातात. काही कायमचे राहतात, काही तात्पुरतेच असतात. पण आपण मात्र लोकांनी सोडून गेल्याचं, त्यांनी दिलेल्या वेदनांचं ओझं उगाचच उचलत बसतो.
❌ मित्राने पाठ फिरवली? – हरकत नाही, त्याला नवीन मित्र सापडले असतील.
❌ एखाद्याने फसवलं? – हरकत नाही, त्याच्या स्वभावाचं प्रतिबिंब आहे ते.
❌ कोणी नात्यात विश्वासघात केला? – हरकत नाही, त्यांनी स्वतःला गमावलं.
समाज आपल्याला शिकवत राहतो की, "लोकांनी तुमच्यावर अन्याय केला तर ते विसरू नका."
पण खरं सुख ह्यात आहे की, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढे चालायला शिका.
स्वतःला सुधारायला विसरू नका
लोकांच्या चुकीकडे बोट दाखवणं सोपं आहे, पण आपण कुठे चुकलो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेदना ही शिकवण असते. प्रत्येक धोका ही एक शिकवणूक असते. म्हणूनच,
✔️ स्वतःला प्रश्न विचारा – मी कुठे चुकलो?
✔️ मी लोकांवर अती विश्वास तर ठेवत नाही ना?
✔️ मी स्वतःला गृहित धरून घेत नाही ना?
✔️ मी योग्य लोकांना माझ्या आयुष्यात स्थान देतोय का?
ही उत्तरं शोधली, की तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकाल आणि भविष्य अजून सुंदर बनवाल.
पुढे जायचं तर जुनं मागे टाकावं लागेल.
कोण कसं वागलं ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, पुढे कसं वागायचं, कसं सुधारायचं ह्यावर लक्ष द्या.
"लोकांचे मुखवटे पाहून रडण्यात वेळ घालवू नका, तुमचं खरं हास्य कोणासाठी राखायचं हे ठरवा."
आणि शेवटी, ज्यांना जावं वाटतं, त्यांना जाऊ द्या.
स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा. कारण तुमची खरी किंमत समजणारेच तुमच्या आयुष्यात खऱ्या जागेचे हक्कदार असतात.

1810. मोहजाल

      प्रियांका एक मध्यमवर्गीय मुलगी उच्च शिक्षणासाठी मुंबईत वनरूम फ्लॅटमध्ये राहणारी. कॉलेज, क्लास नंतर उरलेल्या वेळात विरंगुळा म्हणून तिला चॅटिंगचा नाद लागला. चॅटिंग करता करता राहुलशी तिची ऑनलाइन भेट, मैत्री झाली. म्हणजे त्याने तरी त्याचे नाव राहुल असे सांगितले. पुढे पुढे त्याच्याशी चॅटिंगचे तिला एवढे व्यसन जडले कि ती आपला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन कायम ऑन मोडवर ठेवू लागली. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती राहुलशी चॅटींग करत असे. एक दिवस राहुलने तिला चॅट विंडोमध्ये एक लिंक पाठवून त्याचा पर्सनल ऑनलाइन अल्बम बघण्यास सांगितले. अल्बममधील राहुलचे फोटो बघून ती अधिकच प्रभावित झाली. पुढच्या चॅटिंगच्या वेळेस तिने राहुलला समक्ष भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. आपण बाहेरगावी जात आहोत असे सांगून राहुलने तिला टाळले. त्या दिवशीपासून तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि तिचा लॅपटॉप  प्रोसेसिंगसाठी जास्त वेळ घेत आहे. राहुलशी तिचे चॅटिंग चालूच होते पण समक्ष भेटण्याची इच्छा जाहीर केल्यास तो काही करून ते टाळत होता. बऱ्याचदा वेबकॅम ऑन करून ती त्याच्याशी चाट करत असे तो मात्र आपल्या लॅपटॉपचा  वेबकॅम खराब झाला आहे असे सांगत असे. असे पाच सहा महिने लोटले दरम्यान प्रियांकाचा कोर्स पूर्ण झाला तिने नोकरीसाठी अप्लाय करायला सुरुवात केली. एका कंपनी कडून तिला नोकरीसाठी इंटरव्ह्यू कॉल आला.  पूर्ण तयारीनिशी ती इंटरव्ह्यूला हजर झाली. इंटरव्ह्यू घेणारा मध्यम वयीन  व्यक्ती तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. इंटरव्ह्यू अपेक्षेपेक्षा छान झाला बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं प्रियांकाने बरोबर दिली. आता ही नोकरी आपल्यालाच मिळणार अशी तिला खात्री वाटू लागली. चार दिवस तिने वाट पाहिली. पाचव्या दिवशी तिने त्या कंपनीला फोन करून चौकशी केली. इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीने तिला समक्ष भेटण्यास बोलावले. त्याने तिला जे सांगितले त्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसला. कशीतरी ती आपल्या फ्लॅटवर आली. त्या माणसाचे शब्द वारंवार तिच्या डोक्यात घणाघात करत होते. "तु हुशार, स्मार्ट आहेस पण पोर्न साइटस् वर वारंवार  दिसणाऱ्या मुलीला आम्ही नोकरी देऊ शकत नाही".
      एक एक संदर्भ तिच्या लक्षात येऊ लागला राहुलचे समक्ष भेटण्यास टाळाटाळ करणे,अशात ऑनलाइन कमीत कमी येणे, तिला पाठवलेले लिंक क्लिक करताच लॅपटॉपचे प्रोसेसिंग स्लो होणे. एक एक धागा जुळत गेला. विचार करून मेंदूचे तुकडे पडायला आले. गुगलवर सर्च केल्यावर तिच्या विचारांना पुष्टी मिळाली. तिने गुगल वर सर्च करून  सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटचा नंबर मिळवला आणि त्याला भेटायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी ती सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये आपल्या लॅपटॉपसोबत हजर झाली. त्याने सुमारे अर्धा तास लॅपटॉपचे आणि चाटस् चे  डिटेल्स बघून, आपल्या जवळील अँटी व्हायरस, अँटी स्पायवेअर आणि इतर साँफ्टवेअर वापरून, काही ठोकताळे मांडून तिला सांगितले की राहुलने तिला चॅटिंग करताना जी लिंक पाठवली होती ती त्याच्या ऑनलाइन अल्बमची तर होतीच पण त्याचबरोबर ट्रोजन लिंकही होती ट्रोजन हा व्हायरस सारखाच छुपा प्रोग्रॅम असून  जास्त पॉवरफुल असतो म्हणजे तो तुमच्या लॅपटॉपचा वेबकॅम सुद्धा ऑटोमॅटिकली ऑन करू शकतो. ट्रोजनचं डिटेक्शन अँटीव्हायरस लगेच करतो पण प्रियांकाच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस, अँटी स्पायवेअर काहीही नव्हते. प्रियांकाच्या एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली वनरूम फ्लॅट  त्यात आपला लॅपटॉप इंटरनेट सहित कायम ऑन असणे, राहुल शी वेबकॅम ऑन करून मारलेल्या गप्पा. तिच्या हाता पायातले त्राण गेल्यासारखे झाले. तिचे फोटो आणि तिच्या अॅक्टिव्हिटीज रेकॉर्ड करून त्यांच्याशी फोटो एडिटर वापरून  छेडछाड करून त्याने तिचे  पोर्न फोटोज् आणि  व्हिडिओज्  बनवून तसल्या साइटस् वर अपलोड केले होते. हे फारच धक्कादायक होते. शहर पोलिस सायबर सेलला तिने रीतसर कम्प्लेंट नोंदवली. 
     आज या घटनेला दोन वर्षे झाली पण राहुल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. कारण सायबर क्राईम करणारे  स्वतःचा ट्रेस लागू न देण्याची खबरदारी जरूर घेतात. तेव्हा मित्रमैत्रिणींनो  सावध, सतर्क रहा. अनोळखी लोकांशी कधीही चॅट करू नका. कुठलिही लिंक ओपन करु नका. आणि चांगले इंटरनेट सेक्युरीटी अँटीव्हायरस आपल्या संगणकावर, लॅपटॉप वर जरुर ठेवा.

कविता दातार
Cyber Security Consultant
ज्यांना ज्यांना हा मेसेज प्राप्त होईल त्यांनी लपटॉपशी संबंध येणाऱ्या आपल्या मुली, भाच्या, पुतण्या, आणि परिचयातील सर्व व्यक्तींच्या लपटॉपचा वापर करणाऱ्या मुली यांच्यापर्यंत पोचवून सर्व मुलींना आणि महिलांना सावध करा.

1809. गुढी पाडवा आणि संभाजीराजेंची हत्या समज गैरसमज

 छ्त्रपती संभाजीराजांच्या मृत्यूपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातोय.
      गुढी पाडवा आला की, कधीही संभाजीराजांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवाहन शकाचा वर्षातील पहिला दिवस आणि संभाजीराजांची पुण्यतिथि 11 मार्च मराठी महिन्यांनुसार फाल्गुन कृ. 15 म्हणजेच आमवस्या.  याचे मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीही यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते. इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात राजांच्या हत्येनंतर गुढी उभी करण्याचा प्रघात सुरू झाला असा कुठलाही संदर्भ नाही. यासाठी खुले आवाहन दिलेतरी ते वावगे ठरणार नाही. संभाजीराजेंच्या हत्तेपुर्वी किमान 500 वर्षे अगोदरपासून गुढीपाडवा साजरा केला जातो.
वाद घालण्यापेक्षा गुढी पाडव्याचे पुढील संदर्भ वाचल्यास यामागची सत्यता ध्यानात येऊ शकेल. 

 1. गुढी आणि शंकरपार्वती- डॉ. आ.ह. साळुंके 
कानडी भाषेतील गुढीचा उल्लेख 
महात्मा बसवेश्वर ( कालखंड 1105 ते 1167 )
ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी | याचा अर्थ जेष्ठांचे म्हणजेच शरणाचे आगमन होता गुढ्या उभारून तोरणे बांधा.  

2. चोखामेळा ( कालखंड 1270 – 1350 )
टाळी वाजवावी, गुढी उभरावी |
वाट ही चालावी पंढरीची || 

 3. संत ज्ञानेश्वर ( 1275-1296 ) अध्याय 4, 6 आणि 14 
अवधर्माची अवधि तोडी | दोषांची लिहिली फाडी |
सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवि |

 4. लिळा चरित्र - म्हाइंभट  (1278- 1300  )
चौक रंगमाळीका भरविलिया, गुढी उभविली ||
 5. संत एकनाथ ( 1333 – 1599 )
उभावूणी सायुज्याची गुडी | परापरथडी पावले || 

 6. संत जनाबाई ( 1258 -1350 )
राया प्राप्ती जाला पट | गुडी उभवि वाशिष्ठ ||

 7. तुकाराम (1608- 1650 )
पुढे पाठविले गोविंदा गोपाळा | देऊनी चपळा, हाती गुढी || 
या संतांच्या अभंगाबरोबरच शिवकालीन संदर्भातही गुढी पाडव्याचा उल्लेख अनेकवेळा आलेला आहे. 
 *
 1. शिवपुत्र संभाजी – कमल गोखले, पृष्ठ कृमांक 74 
* छ्त्रपती शिवरायांच्या निधनानंतर ( 3 एप्रिल 1680 ) 19 दिवसांनी म्हणजेच 21 एप्रिल 1680 या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राजाराम महाराजांचे मंचकारोहन  करण्यात आले. अशा प्रकारे विविध मुहूर्त साधले जात होते.

 2. शिवकालीन पत्रसार संग्रह खंड कृ. 2 – केळकर आणि आपटे द.वि. शिवचरित्र कार्यालय पुणे, लेखांक 1625, पृष्ठ कृ.477 
“ चैत्र शु. 8, शके 1596, 4 एप्रिल 1674 इंग्रजांचा दुभाषी व वकील नारायण शेणवी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र लिहितो की, मंगळवार दि. 24 मार्च रोजी रायरी ( रायगड ) ला पोहोचलो. त्याचदिवशी निराजी पंडिताची भेट घेण्याकरिता पाचाड गावी गेलो. तेव्हा निराजी गडावर होता असे समजले. मध्यंतरी निराजी पंडित पाडव्याकरिता ( 28मार्च 1674 ) आपल्या घरी आला. दुसर्‍यादिवशी त्याने मला आपल्या बरोबर नेऊन एका प्रशस्त घरात माझी सरबराई केली. तेथे आणखी पाच दिवस राहिलो.”

 3.मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध – डॉ. जयसिंगराव पवार, पृष्ठ कृमांक 135 
2 मार्च 1700 ला छ्त्रपती राजारामाचे निधन झाल्यानंतर महाराणी ताराबाईनी मुद्दामहून मुहूर्त काढून आपले चिरंजीव दुसरे शिवाजी यांना 10 मार्च 1700 ला चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी मंचकरोहन केले. 

 ४. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड कृमांक 20 – वि. का. राजवाडे, लेखांक 176, पृष्ठ कृमांक 239 
प्रा || वाई येथील कौल, एकूण कलम १ 
१. शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्त कसबे वाई यांनी ग्रहणकाली कडत जोसी को | मा|र ( मजकूर ) यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू गुढीयाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हनोन पत्र लेहून दिलहे यास वर्षे आज ता || १४८ होतात कलम १.    
 
 ५.शिवचरित्र साहित्य खंड १ - पोतदार द.वा.  व इतर , लेखांक ४१, पृष्ठ कृमांक ५९ ते ६५* 
 मार्गशीष शुद्ध १ विरोधीनाम सवंस्तर शके १५७१ अथवा सुहूर सन खसेन अलफ 
 म्हणजे २४ नोव्हेंबर १६४९ , सोमवार दिवसी राजेश्री नीलकंठराऊ यासी.    
 कासाराचे  घरी गुढीयाचा पाडवा व चैत्री पुनीव व स्रावणी पिणीव व कुलधर्म करील 
 तेथे हाक उतपन फळावर येईल तो तिघी जणी वाटोण घेणे.

 6.गुढी आणि शिवपार्वती- डॉ. आ.ह. साळुंके  
नवीन वर्ष साजरा करण्याचा त्या त्या भागातील विविध पद्धती आहेत. कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात याला उगादि, राजस्थान व हरियानात याला थपना, हिमाचलमध्ये चैत्ती तर कश्मीरमध्ये नववर्षाला नवरेह म्हणतात. तर याचदिवशी शालिवाहन शक नावाने कालगणना सुरू झाली. चैत्र म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढी उभा करण्याची पद्धत रूढ झाली. फार पूर्वी कुठल्याही फार मोठ्या यशप्राप्तीनंतर गुढी उभी केली जाऊ लागली.गुढी हा शब्द स्त्रीलिंगी असून पर्वतीच्यारूपातील तो संपूर्ण देह आहे. 
 
 7. मराठी विश्वकोश खंड क्रमांक 5 
      हा दिवस हिंदूच्या साडेतीन मुहूर्तार्पैकी एक मुहूर्त असून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रात याचदिवशी शालिवाहन शकाला इ.स. 78 मध्ये सुरुवात झाली असून शालिवाहन हा सातवाहनांचा अपभ्रंश असावा.परकीय शकावर शालिवाहनांनी विजय मिळविला तो दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन म्हणूनही गुढी पाडवा साजरा केला जातो.

 8.भारतीय संस्कृती कोश खंड क्रमांक 3 
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लोक वर्षप्रतिपदाही म्हणतात. याचदिवशी गुढीपाडवा हा सन साजरा केला जातो. याचदिवशी ब्रम्हदेवाने  जगाची निर्मिती केली असे मानले जाते. अशाप्रकारे हिंदूंच्या नववर्ष्याच्या स्वागतासाठी गुढी उभी केली जाते. गुढी या शब्दाचा दूसरा अर्थ ध्वज अथवा पताका असाही होतो. शालीवहान म्हणजेच सातवाहनाची सत्ता ज्या भागात होती त्या भागात गुढीची प्रथा सुरू झाली. गुढीऐवजी भगवा झेंडा उभा केला जातो ते अयोग्य वाटते कारण झेंड्याला खाली उतरून विसर्जन करणे राजधर्मात बसत नाही.या संपूर्ण विवेचनात कुठेही संभाजीराजांच्या मृत्यूनंतर गुढी उभी करण्यास सुरुवात झाली असे म्हणणे किती आधारहीन आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे गुढी पाडव्याचा सन म्हणजेच हिंदूच्या नवीन वर्षाचे स्वागत असून ते कसे साजरे करावे हे ज्याचे त्याने ठरवावे मात्र गुढीचा संबंध छ्त्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडणे म्हणजे इतिहासाची मोडतोड आहे. राजांचा शिरच्छेद करून डोके मिरविल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्यास एका ठराविक पंडितांनी सुरुवात केली म्हणणेही साफ चुकीचे असून राजांची हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रात असा कोणता महान पंडित होऊन गेला की अगदी संपूर्ण मराठा माणूस त्याचे ऐकून गुढी उभा करू लागला? दुसरे म्हणजे राजांची हत्या पाडव्याचा आदल्या रात्री म्हणजेच अमावास्येला झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी असे कोणते दळणवळनाचे साधन होते की एका रात्रीत गुढी उभी करण्याचा संदेश महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात गेला? 
  
दूसरा विषय असा की, राजांची हत्या कुठल्यातरी हिंदूच्या सांगण्यावरून  झाली यालाही कुठलाच आधार नाही, याउपर औरंगजेबाच्या दरबारी इतिहासकारांनी याबाबत पुढील माहिती लिहून ठेवलेली आहे त्याचाही थोडासा परामर्श घेणे गरजेचे आहे. 
 1. मासिरे अलामगिरि मूळ लेखक साकी मुस्तेदखान ( भाषांतर सेतुमाधव पगडी ) - मराठे व औरंगजेब , 1963, पृष्ठ क्रमांक 41 
"त्याला ( संभाजीला ) जीवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा ( इफनाय ) करणे बरे असे बादशहाचे मत झाले. धर्मशास्त्रज्ञांनी फतवा दिला. त्याचबरोबर अमीर उमरवानीही हाच सल्ला दिला. त्यास अनुसरून त्या लुटारुचा ( काते अल्तरिक ) वध करणे आवश्यक आहे असे ठरविण्यात आले. त्यानुसार 11 मार्च 1689 ला संभाजी आणि कवि कलसला तल्वारीच्या योगे नरकात ( दरके असफल ) पाठविण्यात आले." ( काफरबच्चा जहन्नमी रफ्त )

 2. तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना पृष्ठ क्र. 99 
"बादशहाने प्रार्थना करुन परमेश्वराचे आभार मानले. संभाजीच्या डोळ्यात सळई फिरविण्यात आली. दोन तीन दिवसानंतर संभाजी आणि कविकलस यांचा शिरच्छेद करण्यात आला." ( 11 मार्च 1689 )

 3. श्री छ्त्रपती संभाजी महाराज - वा. सी. बेंद्रे पृ. 668 
"11 मार्चला संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारण्यात आले. शिर कापून त्याचे प्रदर्शन करून हिंदूत घबराट उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला असावा."

 4. औरंगजेबनामा - खेमराज श्रीकृष्ण दास, पृ. 66 
"संभा सन 1100 हिजरी , सवंत 1746, सन 1689 ई.
उस बेदिन का फसाद करना और मुसलमानोके शहरोंको लुटना उसके जिंदा रखने से बढा हूआ था, इसलीये शरीयतवालो काजीओ और मुफतियो के फतवा ( व्यवस्था ) और दिनदौलतवालो ( अमीर वजिरो ) की सलाहसे उनको मारना वाजिब ठ्हरा इसलीये 21 जमादिउलअव्वल सन 32 को कोरागाव ( फतहाबाद ) मे मुकामहोने के पिछे ( चैतसुदि 1 / 12 मार्च ) को वह कविकलशसमेत, जो सब जगह उसके साथ रहा था , काफरों की मारनेवाली तलवार से मारा गया."

 5. औरंगजेब का इतिहास- जदूनाथ सरकार पृ. 652 
"मराठ्यांच्या राजाचे अपराध आता क्षमेच्या पलीकडे गेले होते. त्याचदिवशी संभाजीचे डोळे काढण्यात आले. आणि दुसर्‍यादिवशी कविकलस याची जीभ छटण्यात आली. मुसलमानांना ठार मारणे, कैद करणे आणि त्यांची अब्रू घेणे (हा शब्द बेइज्जत करणे या अर्थाने वापरला असावा.) व त्याचप्रमाणे इस्लामची शहरे लुटून फस्त करणे, या अपराधाबद्दल संभाजीला मृत्युची शिक्षा देण्यात यावी असा फतवा मुसलमान धर्ममार्तंडानी काढला. संभाजीला ठार करण्याच्या सुचनेला बादशहाणे समती दिली. पंधरवडाभर कैदयाचे हाल हाल करण्यात आले. आणि त्यांचा वाटेल तसा अपमान करण्यात आला. त्यानंतर 11 मार्चला अतिशय क्रूररीतीने आणि भयंकर हाल करून ठार मारण्यात आले. त्यांचे एक एक अवयव कुर्‍हाडीने तोडण्यात आले. आणि त्यांचे मास कुत्र्यापुढे फेकण्यात आले."
एकंदरीतच  औरंगजेबाने राजेंची कशाप्रकारे हत्या केली हे स्पष्ट होते. दुसरे हत्या झाली तो दिवस अमावस्येचा असुन दुसऱ्यादिवशी गुढीपाडवा होता हे खरे असले तरी हिंदु परंपरेनुसार एकच वर्ष दुखवटा म्हणून सण साजरा केला जात नाही. माञ दुसऱ्या वर्षापासून साजरा केला जातो. शिवाय राजेंच्या हत्तेनंतर कुणाच्यातरी सांगण्यावरुन गुढी उभा करण्याची प्रथा सुरु झाली हे साफ खोटे आहे. महाराष्ट्रातील देशपरदेशात विखुरलेले मराठी बांधव त्या त्याठिकाणी कित्येक वर्षापासून गुढीपाडवा साजरा करतात. त्यामुळे छञपती संभाजीराजेंची हत्या आणि गुढीपाडवा या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. विशेष म्हणजे छञपतींच्या सातारा आणि  कोल्हापूर येथील दोन्ही गाद्या व संभाजीराजेंच्या मामाचे गाव फलटणचे निंबाळकर घराणे दरवर्षी गुढी उभी करतात. 
     जाता जाता एकच अशाचप्रकारे सेनापति संताजी घोरपडेची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने संताजीचे शिर भाल्यावर लटकाऊन सर्वत्र फिरविले होते. त्यावेळी कुठला सन साजरा केला ?  येवढे वाचल्यानंतर प्रत्येकाने ठरवावे गुढी पाडव्याचा सण कसं साजरा करावा. 

टिप - साडी वर उलटा तांब्या, लिंबाचा फांदी हे कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिक आहेत. तरीपण अशा निरर्थक प्रश्नाच्या उत्तरासाठी मा. आ. ह. साळुंकेसरांचे गुढी आणि शंकरपार्वती हे पुस्तक पहावे.
Don’t copy without Author name  

 *( *प्रा. डॉ. सतीश कदम, तुळजापूर जि.उस्मानाबाद 9422650044)
लेखक अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष ,इतिहासाचे अभ्यासक व प्राध्यापक आहेत.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...