मंगळवार, १८ मार्च, २०२५

1795. स्नेक अँड लॅडर आणि ज्ञानेश्वर

 खेळता खेळता छोटी नात धावतच माझ्याकडे आली आणि साप-शिडीचा पट खाली आपटत म्हणाली. बाबा,या दुष्ट सापाला मारून टाका. बघाना सारखा मला गिळतोय. तिची बालसुलभ तक्रार ऐकून हातातली काठी उगारत मी म्हणालो. थांब हं थोड. आता त्या सापाला या काठीनं मारूनच टाकतो. मी दिलेल्या आश्वासनामुळे नात निश्चिंत झाली आणि तिनं पुन्हा आपल्या खेळाकडे धूम ठोकली. आता माझ्या समोर साप-शिडीचा पट होता.का कुणास ठाऊक पण त्यावरचा लांबलचक साप उगाचच माझ्याकडे बघून हसतोय अस मला वाटलं आणि माझ्या मनात एक प्रश्न डोकावून गेला. कुणी शोधून काढला असेल हा साप-शिडीचा खेळ.
मग मोबाईल वर नुकताच डाऊनलोड केलेला चाटजीपीटी ओपन केला आणि टाईप केलं.
महोदय, कृपया साप-शिडी अर्थात स्नेक अँड लॅडर या खेळा सबंधीची माहिती द्या.
क्षणार्धात साप-शिडी संबंधी खूप सारी माहीती माहीती माझ्या मोबाईलवर दिसू लागली आणि सगळ्यात शेवटी लिहलं होत स्नेक अँड लॅडर या खेळाचा शोध १३ व्या शतकात भारतात लागला. 
बापरे ! 
आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मी वेगवेगळे संदर्भ पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे वाचता वाचता अस लक्षात आल की ज्याला आपण साप-शिडी किंवा स्नेक अँड लॅडर म्हणतो त्या खेळाचा शोध १३ व्या शतकात लागला हे खरंच होतं पण या खेळाच्या शोधाच श्रेय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरां यांच्याकडे जातं. हो तुम्ही अगदी बरोबर वाचताय आपली ज्ञानेश्वर माऊली या साप-शिडी खेळाची जन्मदात्री आहे. 
कस घडलं हे सारं. हे ऐकणही खूप मनोरंजक आहे.म्हणजे त्याच अस झालं की. 
एकदा मुक्ताबाई आणि तिची भावंड दुपारच्या प्रहरात अंगणात चेंडून खेळत होती.नेहमी प्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लिखाणात गढून गेली होती.ऊन्ह खूपच वाढू लागलं तशी मुक्ताबाई अस्वस्थ झाली आणि धावतच ज्ञानेश्वर कडे येऊन म्हणाली.
दादा,अरे बघ तर बाहेर, सुर्य कसा आग ओढतोय.
आता तूच सांग असल्या उन्हात आम्ही कसे खेळणार?
त्यापेक्षा तूच अस काहीतर कर ना की ज्या मुळ आम्हाला  घरातल्या घरातच  खेळता येईल. आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट पुरविण्यासाठी काहीही करायला तयार असणारे ज्ञानेश्वर क्षणभर विचार करतात आणि एक नविनच खेळ मांडून देतात ज्याच नाव होत साप आणि शिडी. कधीही,कुठेही खेळता येणाऱ्या या साध्या सुध्या खेळात  मानवी जीवना सबंधी खूप काही सांगणार तत्त्वज्ञान भरून राहील आहे.
      साप-शिडीचा पट हाच मुळातच प्रत्येकाचा जीवनपट आहे. २० X २० इंच आकाराच्या या पटात ५० चौकोनी घरे असतात. पहिलं घर असत जन्माचे आणि शेवटचे घर असत मोक्षाचे. जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने मोक्षातच असत या मध्यवर्ती कल्पनेवर या पटाची मांडणी केलेली आहे. 
या खेळात स्वतः तुम्ही, साप आणि शिडी ही पात्र केंद्र स्थानी असतात आणि तुम्ही प्रत्येक कवड्यांनी दिलेल्या दानाच्या अधीन असता. या कवड्या म्हणजे जणू काळाच स्वयंप्रेरित रूपच असत म्हणूनच त्या खेळाव्याच लागतात आणि जर तुम्ही खेळला नाही तर तुमचा जीवन प्रवास इथच संपतो. जीवनातील विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवानी वेगवेगळी नावे दिलेली आहेत जशी की सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, प्रेम, सद्बुद्धी तर यातील सापांना नावे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर.  या खेळात कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर बोनस दान मिळते म्हणजे तुमची कृती अर्थात कर्म उत्तम झाले तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळते. 
     नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीच एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच परंतु शब्दाकिंतही आहे म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्‍या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमक कस वागाव यासंबंधीच भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळत. उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाच महत्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयान कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो. समजा तुम्ही हा साप शिडी चा खेळ,खेळता-खेळता खेळतच राहीला तर याचा अर्थ तुम्ही जो पर्यंत शेवटच्या मोक्षाच्या घरासाठी पात्र होत नाही तो पर्यंत जन्म-मृत्यूच्या चौर्‍याऐशी लक्ष योनीत भरकटतच राहणार. 
    जीवन प्रवासाच वास्तविक दर्शन घडविणारा आणि खेळता खेळता नकळत आध्यात्माकडे प्रवाहीत करणारा हा साप शिडी चा खेळ खरोखर अद्भूत आहे याची प्रचिती येते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या साप-शिडीच्या खेळाच  मोक्षपट अस समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलेल आहे. काळाच्या ओघात बरेचसे संदर्भ धुसर होत चाललेत हे खरंच आहे. डॉ.एरिक सँड यांचे एक विद्यार्थी सर जेकॉब हे मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ या विषया वर संशोधन करत होते. त्यावेळी त्यांच्या ध्यानात अस आल की भारतात १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी साप-शिडी खेळाची निर्मिती केली. या सबंधीचा संदर्भ पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे. इंग्रजांच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धीबळा प्रमाणेच साप-शिडी हा खेळ खूप आवडला. हळू हळू तो इंग्लंड पर्यत पोहचला. मग इंग्लंडच्या राणीने त्यात काही बदल केले आणि त्याच आधुनिक स्नेक अँड लॅडर’ अस नामकरण करून टाकलं. 
     माणसाच्या जन्मापासून मृत्यू पर्यतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे. जिज्ञासे पोटी माझ्या माहितीत आलेली ही रंजक माहीती मला खूपच उद्बोधक वाटली आणि ती आपल्या पर्यत पोहचावी यासाठीच हा लेख प्रपंच

राजन पोळ
7588264328

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...