सोमवार, ३ मार्च, २०२५

1747. जिवनसाथी साथ मे रहना

 महेश आणि मृणाल यांचे 
लग्न होते अगदी ॲरेंज मॅरेज
तर महेश आणि मृणाल.
( म्हणजे आताच्या पिढी मधले 
आजी आणि आजोबा.)

आता खूप वर्ष झाली असतील
त्यांच्या लग्नाला. बघूया कशी 
उमगत गेली मृणाल त्यांना.

महेश आणि मृणाल यांचे 
लग्न होते. पण महेश कधीच 
तिला मनाने आपल मानत नव्हता.

महेशच एका मुलीवर प्रेम होते
आणि त्याला तीच्याशीच लग्न 
करायचे होत पण त्या काळी 
जात- पात पाळत असत.

आणि राधा दूस-या जातीची 
असल्यामुळे महेशच्या बाबांनी 
नकार दिला आणि त्या काळी 
मोठ्या माणसांच्या शब्दाला 
खरोखर किंमत होती.
त्यांचा शब्द अखेरचा.

गोखलेकाकांनी लगेच मृणाल 
हिला पसंद केले आणि त्यांचे 
लग्न झाले अगदी आठ दिवसात.
त्यामुळे खूप घाई मध्ये 
एकमेकांना नीट बघितलं ही 
नव्हते. म्हणा त्या काळी तशी 
पद्धत नव्हतीच. मोठे ठरवतील 
तसे आणि तेच व्हायचे.

मृणाल गोखले कुटुंबाची सून 
झाली. पण काका मोठे हूशार 
होते. महेशने तीचा बायको 
म्हणून स्वीकार करेपर्यंत तिला 
गावाकडे ठेवली. हळू हळू तें 
जवळ आले पण मनाने नाही 
हे मृणालला जाणवत होत.

पण तेव्हा नवऱ्याला असे 
बोलणे, जमत नसे आणि 
तिने कधी प्रयत्न पण केला 
नाही तसा. खूप साधी होती.

महेशला आवडू लागली होती
पण काहीतरी कमी आहे असे 
मृणालला नेहमीं वाटे. पण कधी 
बोलायची वेळ आली नाही.

आणि मग् चाहुल लागली 
बाळाची. गोखलेकाका खूप 
खुश. त्यांनी महेशला सांगितलं 
आता तुम्ही बाळ झाल्यावर 
सूनबाईला घेऊन जाऊ शकता.

पण झाले उलट महेशची नोकरी 
गेली. महेश पूर्ण खचून गेला.
काका खूप चिडले.
पण ती मात्र खंबीर होऊन 
महेशरावांना धीर देते. तेव्हा 
ती त्यांना नव्याने उमगत जाते.

सासूबाई तिला पांढ-या पायाची 
म्हणाल्या. तिचे हाल केले.
अनेकदा मृणालला उपाशी ठेवले.
खूप काम करून घेत. पण 
तिने कधीच तक्रार केली नाही.

त्यातच अशी अवघडलेली.
तरी तिने कधीच शब्द काढला 
नाही. कायम मृणालने साथ दिली 
महेशला आणि गावातच 
माहेर असले तरी कधी आई 
बाबांना सांगितलं नाही.

पण एकदा काही काम 
निघाले म्हणुन ती दोघे रस्त्याने 
जात होते. वाटेत तिचे घर आले 
म्हणुन त्यांनी टांगा थांबवला.
आणि समोर आई दिसल्यावर 
तिला भरून आले.

महेश म्हणाला मी जाऊन येईपर्यंत 
थांब इथे. आता तो मृणालच्या 
एवढ्या जवळ आला होता की 
न बोलता सर्व त्याला समजत 
होते. मृणाल त्याला उमगत जात होती.

मृणालला आनंद झाला आणि घरात 
आल्यावर तिने आईला सांगितलं 
की खूप भूक लागली आहे.
पोरगी एवढ्या दिवसांनी आली 
म्हणून आईला बरे वाटले किती 
डोहाळे पुरवु असे झाले.

तेवढ्यात पिशवी राहिल्यामुळे 
महेश अर्ध्यातून आला आणि 
समोर बघितल्यावर मृणालने 
जेवताना नजर चोरली त्याला 
जे समजायचं तें समजले.
आणि.
ती त्याला नव्याने उमगत गेली.

त्यानंतर महेश थांबू लागला 
तिच्यासोबत जेवायला.
तेव्हा आतापर्यंत तिने सहन 
केलेल्या गोष्टी समजू लागल्या 
आणि मृणालचे नविन रूप त्याला 
उमगत गेले.

पहिली मुलगी झाली सासूबाईनी 
नाक मुरडले. पण महेश मात्र 
अगदी खूप लाड करी 
पहिली बेटी धनाची पेटी.
म्हणुन खूप कौतुक करी.
पण वेळीच तिने उदाहरणासह 
शिस्तीचे महत्व पटवून दिले.
तेव्हा ती त्याला नव्याने उमगत 
गेली.

लवकरच अविरत मेहनतीने
महेशचा धंदा खूप वाढला.
तरी स्वतःपेक्षा घर, संसार, 
घरातले यांचा विचार करताना 
महेशला मृणाल नव्याने उमगत गेली.

शहरा मधून येताना महेशच्या 
गाडीला अपघात झाला.
लागले नाही पण तरी ही रात्री मिठीत शिरून 
सारखी त्याला कवटाळत
घाबरून भडभडून रडणारी 
मृणाल त्याला नव्याने उमगत गेली.

सगळ्यांशी प्रेमाने वागणे, 
काळजी घेणे, प्रत्येक कर्तव्य 
पार पाडत असतांना 
मृणाल त्याला नव्याने उमगत गेली.

मग् परत गोड बातमी आली.
आणि सर्व जण आता भाऊ 
येणार असे छकुलीला सांगत 
होते. तेव्हा कूणी पण होऊ दे 
त्याला कसे आपले मानायचे.
प्रेम करायचे. याचे धडे तिला 
देत होती. तेव्हा परत मृणाल 
त्याला नव्याने उमगत गेली.

मधल्या काळात बऱ्याच गोष्टी 
घडून गेल्या पण प्रत्येक वेळेस 
मृणाल त्याच्यामागे खंबीर होती. 
तेव्हा मृणाल त्याला नव्याने 
उमगत गेली.

त्याच्या बहिणीचा नवरा गेला.
भावाच्या बायकोने नणंद घरात 
नको म्हणून भांडण करायला 
सुरुवात केली आणि तीच्या 
आणि दिरावर संशय घेतला 
आणि काडीमोड घेतला. पण 
या सगळ्यातून जाताना मृणाल 
डगमगली नाही. तर पूर्ण घर 
सांभाळून सर्वाना हसत खेळत 
केले. तेव्हा मृणाल त्याला नव्याने 
उमगत गेली.

आणि सगळे सुरळीत झाल्यावर
स्वतःचे कर्तॄत्व सिद्ध करण्या
साठी धडपड करणारी मृणाल.
ती त्याला नव्याने उमगत गेली.

तिचा स्वाभिमान पदोपदी 
दिसत होता त्याला.
कुटुंबात आलेल्या संकटांचा 
धसका घेऊन सासूबाई आजारी 
पडल्या. तेव्हा तिला छळणा-या
त्यांच्यासाठी दिवसरात्र देवा 
समोर समई तेवत ठेवणारी.
ती त्याला नव्याने उमगत गेली.

हे सर्व करताना मृणाल एक उत्तम 
आई, गृहीणी, सून तर होतीच 
पण वेगळे काहीतरी कार्य 
करून समाजात पण छान नाव 
कमावले मृणालने आणि ती 
त्याला नव्याने उमगत गेली.

हळू हळू काळ पुढे गेला.
मुले मोठी झाली. मग् स्वतःला 
वेळ देऊन स्वतःचे सर्व छंद 
मृणाल उत्तम सांभाळत होती.
प्रत्येक वेळेस मृणालच्या मध्ये 
असलेली नवीन कला महेशला 
समजत गेली. आणि मृणाल 
त्याला नव्याने उमगत गेली.

हळू हळू संसार पुढे गेला तरी 
मृणालची प्रेमळ साथ आणि महेशच्या 
हातांत असलेला तिचा हात 
मात्र अगदी तसाच होता.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मृणाल 
त्याला नव्याने उमगत गेली.

सून, जावई आल्यावर सासू 
म्हणून, आजी म्हणून जबाबदारी 
पार पाडताना ती त्याला 
नव्याने उमगत गेली.

आणि शेवटी तिच्यात असलेली 
अभिनय कला वापरून मृणालने 
स्वतःला झालेला आजार सर्वां 
पासून लपवून ठेवला आणि 
सोडून गेली महेशला त्याच्या 
हातांत एक पत्र देऊन. तेव्हा 
मृणाल त्याला नव्याने उमगत गेली.

पत्र वाचून त्याला समजले की 
तीच्या शेवटच्या श्वासांपर्यंत 
तीच्या मनात फक्त त्याचा 
विचार होता.
त्याने त्याच्या काही गोष्टीमध्ये 
कसा बदल करावा ती गेल्यावर
ते तिने पत्रामध्ये लिहिले होते.
म्हणजे दुसऱ्या कूणाला त्याचा 
त्रास होणाऱ नाही.. तेव्हा ती 
त्याला नव्याने उमगत गेली.

पत्रा मध्ये तिने जाताना 
राधाची जागा घेऊ 
शकले कां हो मी.? 
असा प्रश्न विचारला आणि 
मृणाल मला नव्याने उमगली.

जाताना राधाबद्दल विचारणे.
तिच्याशी लग्न करा परत
मी सांगते म्हणून आणि तिचा 
फोटो आणि पत्ता देऊन गेली 
तेव्हा मला ती नव्याने उमगली.

आणि मी लपवून ठेवले पण 
तिने कसे शोधून काढले. 
ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच 
मृणाल सोडून गेली.
खुप् रडायला आले.
पण सावरायला ती नव्हती.
आणि मृणालचे महत्व परत नव्याने उमगले.

दोन घडीचा डाव
याला जिवन ऐसे नाव

फूलटूस डाॅक्टर .... 🩺
समाप्त.....
🍁🌈🛕⛱️🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...