सोमवार, ३ मार्च, २०२५

1750. रुक्मिणी

      खूप उच्चभू लोकांची वस्ती ती. माझ्या नवऱ्याचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिझिनेस होता. आम्ही इथे येऊन थोडेच दिवस झाले होते. घरकामाला रुक्मिणी होती.
   रुक्मिणीचे काम कपडे, भांडी, लादी, आणि वरचे सगळे आवरायचे. जेवण मात्र गीताबाई बनवायच्या. गीताबाई तश्या जेवण छान बनवायच्या. पण इथे घरात जेवत कोण होत जास्त. सगळ्या पार्ट्या चालायच्या. यांच्या बरोबरीने मी सुध्दा जायचे. 
मग काय ?
ड्रिंक, स्मोकिंग, डान्स, लेटनाइट पार्ट्या . सुमेध आमचा मुलगा. त्याला सांभाळायला एक  मुलगीच ठेवली होती. वेळच नसतो ना त्याच्याकडे बघायला?
काय करणार?
       खरच खूप busy असतो आम्ही. त्यात माझ्या तर बाई किटी पार्ट्या. मग काय, त्या पार्टीसाठी पेहराव, चप्पल,  पर्स . दोन दोन दिवस शॉपिंग संपत नाही. त्यात मला दागिन्यांची भारी हौस. माझ्या सारखे अँटिक दागिने कोणाकडे शोधून सापडणार नाही. मैत्रिणी हेवाच करतात माझा. आजही अशीच किटी पार्टी होती. गीताबाई जेवण बनवायला आल्याच नाही. त्या सुमेधला डबा काय देतात हे ही मला माहित नाही. कसाबसा ब्रेड बटर तयार केला. डब्यात घालून दिला. पाठवले एकदाचे सुमेधला शाळेत. दुपारीच जायच ठरल आमच पार्टीला. लंच, डिनर बाहेरच. नवराही गेला होता विदेशात. पार्टी करून मी घरी आले. गीताबाई संध्याकाळी पण जेवण बनवायला आल्याच नाही म्हणे. आणि दुपारी सुमेधने डब्यातले ब्रेडबट्टर पण खाल्ले नाही. तो अजून जेवला सुद्धा  नाही. आल्याआल्या त्याला सांभाळणाऱ्या राधाने सांगितले. मी त्याला डाळभात करून दिला तर नाही म्हणतो. खूप समजावले पण नाहीच जेवला. तुम्हीच बघा ताई आता. मी सुमेधला जवळ घेतले. 
"सुमेध" का नाही जेवला बाळा"? 
काय झाले?
‌तुला बरं वाटत नाही का? मम्मा मला नाही जेवायचे. काय झाले राजा?
राधा सांगते की तू दुपारचा डबा सुद्धा नाही खाल्ला. खाल्ला मी दुपारी डबा. फक्त तू दिलेला डबा परत आणला एवढंच. मला ब्रेड बटर नाही आवडत. 
किती वेळा सांगितलं? 
पण गीताबाई नसेल तर तू तेच देणार. बरं आता नाही देणार. पण आता मला सांग. 
काय खाल्लं तू दुपारी ?
सांग ना रे  राजा. कसले तरी पराठे होते. पण खूप टेस्टी होते. 
खूप झोप येते मम्मा मला झोपतो मी असे बोलून तो घुस्यातच कुस बदलून झोपी गेला. गीताबाई दुसऱ्या दिवशी सकाळी पण आल्याच नाही. जेवण बनवायला. 
बापरे ।  काय करावे. ?
काय देऊ डब्यात?
इतक्यात मॅग्गी ची आयडिया सुचली. राधाला भाज्या चिरून मागितल्या आणि दिली मॅग्गी बनवून. मॅग्गी त्याला तशीही खूप आवडते. आईने आज डब्यात मॅग्गी दिली या उत्साहातच तो शाळेत गेला. दुपारी जेवणाचा डबा काढून . दिनेश जवळ बसला. काय आणले दिनेश तू आज डब्यात ? 
फोडणीच्या शेवया. ते काय असते बघू आणि दिनेशने डबा उघडला. अरे दिनेश मॅग्गी आहे ही. ही बघ. सेम माझ्या पण डब्यात आहे आणि दोघांनी डबे जवळ जवळ ठेवले. मॅग्गी खाणे दूरच. त्याचे निरीक्षण सुरु झाले. दिनेश म्हणाला कसली रे ही तुझी मॅग्गी?  गांडुळच दिसते रे ! 
ते काय असते रे दिनेश ?
अरे अर्थवॉर्म सारखे. माझी मॅग्गी बघ कशी छान बारीक आहे. बरं चल ,जाऊदे आपण टेस्टच करून पाहुया. कोणाची मॅग्गी बेस्ट ? 
दिनेश म्हणाला माझीच बेस्ट असणार. 
कशी काय रे  दिनेश?
 अरे माझी आई घरी बनवते न मॅग्गी.
 वो दिनेश राव ! मॅग्गी माझी आई पण घरीच बनवते. हे काय हॉटेलचे पार्सलबिर्सल वाटले की काय तुला ?
 नाही रे माझ्या दोस्ता. तुझा काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे रे. अरे हे जे बारीक बारीक दिसतात न . काडी सारखे. ते माझी आई घरी बनवते. 
काय ?
होय. शेवया म्हणतो आम्ही त्याला. माझी आई हातावर बनवते. अरे त्याचे धागे मोजायला जॅम मज्जा येते. खूप दिवसापूर्वी मी तुझ्याच डब्यात मॅग्गी खाल्ली होती. खूप नाही. पण जराशी आवडली. मी घरी जाऊन आईला हट्टच केला. मला सुमेधच्या आई सारखी  मॅग्गी करू दे . मी आईला सांगितले तुझ्या मॅग्गीत
काय काय टाकले ते?
       माझी आई नेहमी साध्या फोडणीच्या शेवया करायची. मग मी सांगितल्यावर आईने मस्त शेवयाचा डबा काढला. कोणीतरी गावी चालले होते. आठ दिवसासाठी तर कोबी, सिमला मिरची, गाजर दिले आईला खराब होतील म्हणून आणि घरात कांद्याची पात होती. सगळे मस्त बारीक चिरून, शेवयात टाकून,मॅग्गी करून दिली. खूप आवडली मला. आता माझी आई अशीच करते. हि मॅग्गी नाही आवडत मला. तू पण खाऊन बघ आणि नक्की कोणाची टेस्टी ते सांग. सुमेधने दिनेशची मॅग्गी खाल्ली. खूप खूप आवडली त्याला. म्हणाला. दिनेश, तुझ्या आईची मॅग्गी बेस्टच . दोघांनी मस्त फोडणीच्या शेवयावर ताव मारला. घरी येऊन आता याने हट्टच धरला. मम्मा तू पण मला दिनेशच्या आईसारखी मॅग्गी करून दे. त्या दिवशी रुक्मिणी उशिरा येणार होती . काहीतरी बाहेर काम आहे म्हणाली. खरतर येणारच नव्हती. मीच म्हणाले रुक्मिणी अगदी उशिरा ये पण ये ग. कारण गीताबाई पण नाही. म्हणून  रुक्मिणी आली. सुमेधचा हट्ट सुरूच. मला दिनेशच्या आई सारखी मॅग्गी करून पाहिजे. रुक्मिणी हे सगळे ऐकत होती. तिला आजपर्यंत माहित नव्हते. सुमेध कोणत्या शाळेत आणि कोणत्या वर्गात आहे. हळूच सुमेध जवळ गेली, म्हणाली सुमेध बाळा हा दिनेश कोण आहे? 
माझ्या वर्गात आहे. आज मी त्याची मॅग्गी खाल्ली .खूप आवडली मला.
पूर्ण नाव काय दिनेशचे? दिनेश तुकाराम देशमुख
काय? 
 होय त्याच्याच डब्यातली मॅग्गी खाल्ली मी आज .आणि हो, काल पराठे पण मस्त होते. सुमेध बाळा दिनेश माझाच मुलगा आहे. तिथेच ऊभ्या असलेल्या सुमेधच्या आईला रुक्मिणी म्हणाली. बाईसाहेब ! 
बाईसाहेब ! दिनेश माझा मुलगा. सेंट मेरी स्कूल मध्यें चौथीत आहे. सुमेध बेटा तू पण त्याच शाळेत, त्याच्याच वर्गात आहे का? 
होय रुक्मिणी मावशी मी दिनेशच्याच शाळेत, त्याच्याच वर्गात आहे. 
पण दिनेश खरंच तुमचा मुलगा आहे? 
तेवढ्यात सुमेधची आई जोरातच किंचाळली. अग कस काय शक्य आहे? महिन्याची फी किती आहे माहिती आहे का तुला त्या शाळेची?
 नाही बाईसाहेब, मला खरच माहित नाही. काय फी आहे ती? मग तो त्या शाळेत कसा काय जाऊ शकतो?बाईसाहेब, आहे एक देव माणूस. तोच करतो माझ्या मुलाचा सगळा खर्च. वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म, पेन्सिल पासून रबरा पर्यंत.
काय?
होय बाईसाहेब. माझ्या मुलाचे पेपर सुद्धा तेच बघायला जातात. इतकेच काय अभ्यास पण तेच घेतात.
आताही माझा मुलगा त्यांच्याकडे अभ्यासच करायला गेला.
 रुक्मिणी अग काय सांगतेस?
होय बाईसाहेब अगदी खरं. चंद्रभान लिखार त्याचे नाव. त्यांना मुलबाळ नाही. मी माझ्या आईसोबत त्यांच्या कडे कामाला येत होती. माझे लग्न झाले. दोन वर्षात नवरा दारूने मेला.
दहा महिन्याचा मुलगा घेऊन. पुन्हा आईकडे आली. थोडयाच दिवसात आईसोबत चंद्रभान काकांकडे कामाला येऊ लागली. बाबा आजारीच होते. काम नाही जमायचे. मग माझ्या मुलाला घरातल्या घरात  तेच सांभाळत होते. आई आणि मी कामावर असतांना. एक दिवस बाबा ताप यायचे निमित्य झाले अन् देवाघरी  गेले. या धक्याने आई खूप थकली. मीच म्हणाले  मग तिला ,तू आता दिनू ला सांभाळ. मी कामाला जाते. पण दैवाने पुन्हा माझी परीक्षा घ्यायचे ठरवले आणि दोन वर्षात आई पण गेली. कामाला जाऊ का दिनूला पाहू? खूप मोठा प्रश्न होता. चंद्रभान काकांनी लगेच त्यावर तोडगा काढला. म्हणाले रुक्मिणी हे बघ, तुला आता घरी बसून चालणार नाही आणि दिनूला सोडून तू कामाला जाऊ शकत नाही. माझ्याकडे एक उपाय आहे. तुला पटते का बघ. बोला न काका. काय म्हणणे आहे तुमचे? हे बघ बेटा ! तू दिनूला घेऊन आमच्याकडे कामाला येत जा. काम करता करता त्याच्याकडे लक्ष राहील. मी आणि काकू पण आहेच की खेळू आम्ही त्याच्यासोबत. तूर्तास बाकीचे काम बंद कर. जेवण इथेच कर. भागेल तुझे. तो शाळेत जायला लागेल तसे पुन्हा काम सुरु कर आणि हो त्याला कोणत्या शाळेत घालायचे. त्याचा सगळा खर्च मी करणार. मी त्याला चांगल्या शाळेत शिकवेन. शब्द देतो तुला. नाहीतर एक काम कर. इतके मोठे घर आहे. इथेच राहा एका खोलीत. आम्हालाही आधार. मी अजून चंद्रभान काकांकडे राहायला नाही आले. पण माझा मुलगा शाळेतून आला की त्यांच्या कडेच अभ्यास करतो. बाईसाहेब वर्गात दुसरा , तिसरा नंबर असतो त्याचा कायम.
अग काय सांगतेस काय? तेवढ्यात सुमेध म्हणाला खरच मम्मा ,दिनेश खूप हुशार आहे. वर्गात पण हुशार, आणि स्पर्धेत पण हुशार. सगळी पहिली बक्षीस त्यालाच असतात मम्मा. वर्गात सगळ्यांचा लाडका आहे तो मम्मा. टीचर तर दिनेशचे खूपच कौतुक करतात. 
मी खूपदा दिनेशला विचारले सुद्धा .
ते म्हातारे काका तुझे कोण रे ? तर माझे आजोबा इतकेच बोलला तो. मग आम्हाला वाटले असेल त्याचे आजोबा. हे मात्र आजच समजले. रुक्मिणी मावशी, दिनेशला घेऊन एक दिवस ये ना ग आमच्याकडे. मला त्याच्या सोबत खूप खेळायचे आहे. आणि हो अभ्यास कसा करतो तेही विचारायचे आहे. मम्मा तू सांग ना रुक्मिणी मावशीला. एक दिवस दिनेशला घेऊन यायला.
‌खरच रुक्मिणी एक दिवस रविवारी घेऊन ये दिनेश ला. इकडेच जेवा  दोघे. खूप खेळ, थोडा अभ्यास, करू दे धमाल एक दिवस.  रुक्मिणी पुढच्याच रविवारी दिनेशला घेऊन आली. येतांना शेवया घेऊन यायला विसरली नाही. दोघांना मस्त मॅग्गी करून दिली. मॅग्गी खाऊन दोघे बागेत खेळायला गेले. घसरगुंडी वरून घसरतांना दोघांची टक्कर झाली आणि एकमेकांवर आदळले. दिनेशला खूप लागलं आणि सुमेधला थोडे घरचटल रडतच दोघे घरात आले. सुमेधच्या आईने दार उघडले. रडण्याचा आवाज एकूण रुक्मिणी पण बाहेर आली. दिनेशचा गुडघा फुटला होता. सुमेधला थोडे खरचटले होते. सुमेधची मम्मा first edd बॉक्स आणायला आत गेली. तेवढ्यात रुक्मिणीने जखम पुसून, त्यावर घरातली हळद लावून आपल्या साडीचा पदर फाडून पट्टी बांधली सुद्धा. सुमेधची मम्मा रुक्मिणीला बोलली. 
अग ! अग ! काय  हे ? 
आणि काय ग?
काय बांधले त्या जखमेवर ! आणि हे फडक कुठून आणलं रुक्मिणी ? 
अग अशाने सेपप्टिक होणार? 
नाही होणार बाई साहेब. अहो जखम पुसून त्यावर हळद लावली मी.
 बाईसाहेब, हे फडक नाही हो ! माझ्या शेवाचा पदर आहे हा. काय? 
ते काय असते रुक्मिणी? रुक्मिणीने लगेच आपल्या खांद्यावरच्या पदर पुढे घेऊन दाखवला. हा, हा शेवाचा पदर बाईसाहेब. याची चिंधी फाडून बांधली. बाईसाहेब. जखम फार खोल नाही ? लगेच उद्या धावायला लागेल बघा. अहो बाईसाहेब आईच्या मायेत, आणि ह्या शेवाच्या पदरात लय जादू  असते बघा. कधी लेकराचे तोंड पुसायला, तर कधी हात पुसायला. कधी घाबरला तर याच पदराआड लपायला, कधी गळणार नाक पुसायला आणि कधी जखमेवर पट्टी सुद्धा बांधायला . खूप महत्व आहे ताई या शेवाचा  पदराला.
मी लहान होती न बाईसाहेब . तर जेवण झाले की आईच्या पदरालाच हात पुसायची. माझा दिनू पण पुसतो खूपदा. तोंड पुसतो तेव्हा हमखास म्हणतो "आई किती मऊशार आहे ग तुझा पदर."
 बाईसाहेब माझा दिनू जेव्हा शाळेतून बक्षिस घेऊन येतो ना तेव्हा हाच पदर त्याची नजर पण काढतो. पहिल्यांदाच हे सगळे डोक्यावरून गेल्याने. मी कधी हातातला तो first add बॉक्स तर कधी रुक्मिणीला पाहतच राहिले.
   डोळ्यासमोर तिने घेतलेला पदर दिसू लागला. ‌ संध्याकाळी रुक्मिणी आणि दिनेश घरी गेले. पण मी मात्र जरा अस्वस्थ झाले. सारखी रुक्मिणी डोळ्यासमोर दिसत होती. तिची काम करण्याची सचोटी. मुलावर भरभरून प्रेम करणं. तिचे ते पदर पुराण. डोळ्यासमोरून रुक्मिणी हलत नव्हती. रुक्मिणीचा विचार करतच झोपी गेले.
.आठ, दहा दिवस झाले. गीताबाईचा पत्ताच नव्हता...सुमेधचा डबा.. रुक्मिणी दिनेश सोबत रोज देत होती...रुक्मिणीच्या हाताच्या जेवणाने सुमेध जॅम खुश होता...गीताबाई अजून आल्याचं नाही...काय झाले असावे असा विचार करत असताना ...?फोन ची घंटी वाजली ...फोन गीताबाईचाच होता...हॅलो मॅडम.....मी गीता बोलते...मॅडम मी गावी आली आहे....कोकणात...इकडे माझे सासू सासरे असतात...सासू खूप आजारी आहे...त्यामुळे मी सध्याच जेवण बनवायला नाही येऊ शकत.....
 ‌    मग माझ्या डोळ्यासमोर रुक्मिणी दिसली. दुपारी ती काम करायला आली. मी लगेच तिला म्हणाले रुक्मिणी तू जेवण बनवशील का आमच्याकडे? अग गीताबाई इतक्यात येणार नाही बोलतात...तूच बनव ग जेवण. तसेही सुमेधला तुझे जेवण फार आवडते...हो नाही करता करता रुक्मिणी जेवण बनवायला तयार झाली...सुमेध खूप खुश होता...रुक्मिणी त्याला छान छान पौष्टीक पदार्थ करून खाऊ घालत होती...आता तर काय ...तो तिच्या मुलाचा मित्रच होता...रुक्मिणी जेवण बनवायला येऊन पंधरा दिवस होत आले...नवऱ्याला पण खूप आवडले तिचे जेवण...कधीतरीच असायचा जेवायला...पण खूप तारीफ करायचा...आज दुपारी सुमेधला सांभाळणाऱ्या राधाने नवीनच बॉम्ब टाकला...म्हणाली ताई आईने गावाला बोलावले आहे...पंधरा दिवसासाठी ...लग्न ठरले माझ्या ताईचे ...माझ्या आत्याच्या जावेचाच मुलगा आहे...आत्तेघरी भाची देतात आमच्यात ...पण माझ्या आत्याला दोन मुलीच आहे...मग तिच्या पुतण्याला दिले  ताईला ...एक दोन दिवसात येऊन जा असे आई बोलली...ते सगळे खरे आहे राधा ...पण मला सांग...इतक्या कमी वेळात मी सुमेधला सांभाळायला बाई कुठून आणू...दुसऱ्या बाईचा बंदोबस्त होईस्तोवर थांब तू....मी बोलते तुझ्या आईशी...ठिक आहे...पण दुसरी बाई येइपर्यंत थांब बाई...हो ताई नक्की थांबते...ताई एक सुचवू का...?काय ग...?बोल ना...? काय सुचवायचे आहे तुला...ताई दिनेशच्या आईला विचारून पाहता का...?माझ्यासारखे इथेच राहा म्हणावे...तुझी कल्पना काही वाईट नाही राधा...खरच विचारून पाहायला काही हरकत नाही...आणि सुमेधला पण छान दिनेशची सोबत होईल...आजच दुपारी आली की विचारते....
‌        रुक्मिणी आल्या आल्या मी तिला  म्हणाली....रुक्मिणी माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला ग.. काळजीच्या सुरात रुक्मिणी म्हणाली...काय झाले बाईसाहेब? बोला न लवकर...मला बाई असं काही ऐकलेकी खूप धडधड होते...सांगान बाईसाहेब काय झाले.? अग हि राधा पंधरा दिवसासाठी गावी जाते म्हणते...आता ओ बाईसाहेब...सुमेध बाबाला कोण सांभाळणार...?होना तोच प्रश्न पडला मला...रुक्मिणी मी काय म्हणते...? बोला न बाईसाहेब...रुक्मिणी अग आपण असं केलं तर नाही जमणार का....?ताई तुम्हाला काय सांगायचे ते स्पष्ट सांगा...मिळेल बाईसाहेब कोणीतरी बाई....नका काळजी करू...मीही सांगून ठेवते माझ्या ओळखीच्या बायकांना...रुक्मिणी असं नाही होऊ शकत का..?सगळे होऊ शकते बाईसाहेब...आपण करू काहीतरी... पण रुक्मिणी मी काय म्हणते...बोला न बाईसाहेब...तूच का नाही येत इथे राहायला? हे सारखे बाहेरगावी असतात...असल्यावर उशिरा घरी येतात...त्यामुळे खूप विश्वासातील बाई पाहिजे ग आम्हाला... सुमेध  तिच्याच कडे असणार. मीही यांच्या बरोबर बाहेरच असते. बघ ...विचार करून सांग... घाई नाही...बाईसाहेब..तुमचे सगळे बरोबर आहे ...पण मी चंद्रभान काका ,काकूंना विचारल्या शिवाय काहीच करू शकत नाही...आणि त्याचे काम...ते सोडायचा प्रश्नच येत नाही...मग मी इकडे आल्यावर कसे जमेल...तेही खरच ग...ठीक आहे... दुसरीच बाई शोधावी लागेल म्हणजे..आणि आमची बाई शोघायची मोहीम जोरात सुरु झाली...रुक्मिणीने दोनच दिवसात बाई शोधून आणली...तिच्याच गल्लीत मागच्या बाजूला ह्या मावशी राहतात...शांताबाई नाव त्यांचे ...शांता मावशी राहायला आल्या...आणि घराचा आणि सुमेधचा नूरच पालटून गेला...संध्याकाळ झाली होती...दिवे लागणीची वेळ...शांता मावशीने सुमेधला विचारले...सुमेधबाळा तुम्हाला शुभंकरोती येत का म्हणायला...? ते काय असते मावशी..?आणि तिने सुमेधाचा हात धरला. सरळ देवघरात घेऊन गेली. देवाजवळ. तुळशीजवळ सांजवात केली...आणि आधी आपण... मग मागून सुमेधला शुभंकरोती म्हणायला लावले. देवाला नमस्कार करून माझ्या पाया पडायला लावल्या ...आणि म्हणाल्या जा. तुम्ही आता तुमचा होमवर्क करा आणि काय आश्चर्य. सुमेध शहण्या बाळा सारखा अभ्यास करायला बसला. दुसऱ्या दिवशीच शांता मावशीने. देव, देव्हारा मस्त घासूनपुसून लख्ख केला. वेगळीच झळाळी आली घराला...सात ,आठ दिवस झाले आणि शांतामावशीला खूप ताप भरला...डॉक्टर कडे गेली...आराम करायला संगीतला...खूप विनंती केली मावशी इथेच रहा म्हणून ...पण नाही ऐकले...दोन दिवसात येते बोलून गेली...रुक्मिणी ला म्हणाली ...मी परवा सकाळीच येते...पण आज जाऊ द्या...गेली...
‌      इतके मोठे घर...मी एकटी कधीच राहिले नाही...राधा असायचीच सोबतीला...बापरे मला तर भीतीच वाटायला लागली...शेवटी रुक्मिणीला म्हणाले ...रुक्मिणी काही कर पण दोन रात्री काढून दे...मी एकटी कधीच नाही राहिले ग...सुमेध बरोबर दिनेश जाईल शाळेत...आणि कामापूरते सामान आणि दिनेशची पुस्तकं घेऊन रुक्मिणी आली सोबतीला...रात्रीचे जेवण झाले...मी सुमेधला घेऊन झोपायला गेली...बाजूच्या खोलीत रुक्मिणी आणि दिनेशची झोपायची वेवस्था केली ...मुद्दाम माझ्या जवळची बेडरूम दिली झोपायला त्या दोघांना...खूप भीती वाटत होती मला...रुक्मिणीच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता...मी हळूच उठले...दाराला कान देऊन ऐकू लागले...रुक्मिणी शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा दिनेशला सांगत होती...थोड्याच वेळात... अंगाईचे सूर कानावर आले...सुमेध सुद्धा उठून दाराजवळ आला...ते अंगाईचे सूर एकूण म्हणाला...मम्मा ...तू कधीच नाही अंगाई गाऊन झोपवत मला...रुक्मिणी मावशी किती छान गाते बघ...?मी पण जाऊ तिच्याकडे झोपायला...?आणि दार वाजवायला सुरवात केली...रुक्मिणीने दार उघडले...हा धावतच बेडवर जाऊन झोपला...खूप म्हणाले चल झोपायला नाहीच आला...मी कॉटवर येऊन पडले...पण झोप मैलो दूर गेली होती...कारण आज मला कळून चुकले...पैसे हे सर्वस्व नक्कीच नाही...खूप महागडी खेळणी...मागेल ते दिले आम्ही सुमेधला...पण रुक्मिणी सारखी माया देऊ शकलो नाही...वेळ देऊ शकलो नाही...तो नेहमी म्हणायचं पप्पा या बर्थडे ला तुम्ही नक्की या...हो म्हणायचा... पण कधीच आला नाही...महागड्या गिफ्ट मात्र दिल्या...आत्ता कळतंय तो त्याला कधीकधी हात सुद्धा लावायचा नाही...मीही वेगळे काय केले...?यांच्या बरोबर पार्ट्या...ड्रिंक...कधीकधी तर अक्षरशः झिंगत आलो आम्ही घरी...काय परिणाम झाला असेल त्याच्या बालमनावर...शी...! विचार करते तरी लाज वाटते माझी मलाच...पैस्या सोबत या मोहमायेत ...आपण नुसते गुरफटत गेलो...कित्येकदा त्याच्या समोर घरी पार्ट्या केल्या...सिगार फुकल्या... दारू प्यायलो...ग्लासावर ग्लास आदळले...चिअर्स साठी...हा मुकाट सगळं बघायचा....अंगाई गीत ऐकायचे दिवस त्याचे...खूप प्याल्यावर आमच्या भांडणाने मुकाट घाबरून झोपायचा...मला तर आठवत पण नाही...शेवटची आणि पहिली अंगाई कधी गायली. विचारातच झोप कधी लागली कळलेच नाही.
‌    सकाळ मात्र माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देऊन गेली...छान सकाळी उठले...आज पहिल्यांदा स्वतः साठी चहा केला..सुमेध आणि दिनेश साठी दूध गरम केले...आणि हो रुक्मिणीला पण चहा ठेवला...पेपर वाचून आंघोळ केली...मस्त एक साधीच साडी नेसले... देवपूजा केली...रुक्मिणीने मुलांसाठी डबे बनवले...माझे हे रूप तिला नवीन होते... जीन्स, मिडी, मिनी घालणारी मी चक्क साडीत...रुक्मिणी म्हणाली बाईसाहेब खूप छान दिसतायं... अगदी लक्ष्मी सारख्या...खरंच रुक्मिणी ...हो बाईसाहेब...बाईसाहेब थांबा हं.. माझीच मेलीची नजर लागेल...आणि तिने तिचा तो शेवाचा पदर...तीन वेळा माझ्यावरून उतरवत.. काहीतरी पुटपुटली...आज तिच्या अडाणी विचारात मला बरंच काही  हरवलेल गवसू लागलं...त्यात सगळ्यात पहिले माझ्या सुमेधचे हरवलेलं बालपण होत...दोन दिवसाने शांता मावशी आल्या...माझे पालटले रूप पाहून म्हणाला...ताई दोनच दिवसात या घराला घरपण आल्यासारखे  दिसते...काय चमत्कार झाला ते तरी सांगा? साहेब आले का विदेशातून? त्यानीं केला वाटते बदल...?मी कुतूहलाने विचारले खरच शांता मावशी...तुम्हाला जाणवतोय बदल ...होय ताई...खूप वेगळेच रुपडे दिसते तुमचे...खरं सांगू का? अगदी लक्ष्मी सारख्या दिसत आहे....आणि मी शांता मावशीला नमस्कार करायला वाकले...मावशी थोड्या दूर झाल्या. म्हणाल्या. ताई असलं पाप नका करू....तुम्ही मोठी माणसे...मावशी ...तुमच्या सातआठ दिवसाच्या संगतीने...आणि रुक्मिणीच्या दोन रात्रीच्या सहवासात... जे शिकले ते...कोणत्याच पुस्तकात नाही सापडणार...खरंच तुमच्या मुळे वेळीच डोळे उघडले...जीवनाचा खरा अर्थ तुमच्या दोघींमुळे कळला...पैसे आणि प्रेम दोन्ही खूप मायने ठेवतात. पण प्रेमाचं पारडं जड असत...हा बोध मात्र नव्याने झाला...तुमच्या दोघींमुळे... ‌तुम्हा दोघीचे शतशः आभार. पुन्हा शांता मावशीला नमस्कार करायला डोके तिच्या पायावर आपसूकच झुकले.
 गरीब श्रीमंताची दरी या दोंघींमुळे नष्ट होऊन. फक्त माणूस आणि माणुसकीचा अर्थ आज नव्याने मला समजला होता रुक्मिणीमुळे.

सौ प्रभा कृष्णा निपाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...