शनिवार, ८ मार्च, २०२५

1768. मातृत्व

      रामदासचे लग्न झाले. त्याला पाठोपाठ दोन मुलीच झाल्या. तेवढ्यात धाकटा भाऊ लग्नाला आला. घरात लग्नाचा विषय निघाला. तसं तो म्हणाला. मी मुलगी पाहून ठेवली आहे. मुलगी गावातील, आपल्याच जातीची आहे. कारण आपल्या खेड्यात लग्न करतांना नेहमी जात आडवी येते. मागे  शांताराम काकांच्या मुलीने वरच्या जातीच्या मुलाशी प्रेम केले. किती भोगावे लागले बिचार्यांना. इथे तो प्रश्नच नाही. ती आपल्याच जातीची आहे. त्यामुळे जात या वादावर निदान  पडदा पडला आहे. आता महत्वाचे. तुम्ही सगळेच त्या मुलीला ओळखता.असे म्हणताच सगळेच अचंबित झाले.
काय..? आम्ही त्या मुलीला ओळखतो.
हो दादा, वहिनी , आई , बाबा...तुम्ही सगळेच तिला ओळखता.
अरे..! अशी कोण मुलगी आहे..! जीला आम्ही सगळेच ओळखतोआणि  का इतका कोड्यात बोलून सांगतो? 
कोड्यात नाही आई...अगदी स्पष्ट सांगतो...हं सांग बाबा  एकदाचा..! 
कोण ती भाग्यवान मुलगी..! 
मग रमेश आईच्या जवळ जाऊन बसला. खरतर मोठ्या पेक्षा धाकट्यावर आईची विशेष माया होती. त्यामुळे तो आईला  म्हणाला....
आई..!  अग ती आपली सुमन मावशी आहे न शेजारी...!
हं..!  तिच्या शेजारी असन्याचं काय रे बाबा..? 
ती काय आज आपल्या शेजारी आली राहायला? लग्न होऊन आली तशी इथंच आहे...! 
आता त्या सुमन मावंशीच काय ते सांग..! पट्कन..! 
तर आई  आपल्या सुमन मावशीची मुलगी आहे न गीता..! हो रे बाबा..!
अख्या गावाला माहित आहे... सुमन मावशी अन तिची एकुलती एक मुलगी गीता..! 
पुढे काय..? 
ते तर बोल..! 
जरा अजूनच आईकडे सरकून म्हणाला...अग... तिचीच मुलगी गीता...! जी मी पसंद करून ठेवली आहे...
सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव...
गीता..! 
काय..? 
गीता..! 
  अरे ती तर जवळ जवळ रोजच आपल्याकडे येते. तू असतांना, नसतांना सुद्धा येते. कधी तसं जाणवू दिलं नाही रे...!  तू आणि तिने पण..!
हो आई नाही जाणवू दिलं. कारण तुम्हाला संशय आला तर तिच्या गरीब परिस्थिती मुळे तुम्ही तिला नकार देणार. हि भीती आम्हा दोघांनाही होती म्हणून मग ठरवलं वेळ येईल तेव्हाच बोलू. आता घरात माझ्या लग्नाचा विषय निघाला म्हणून स्पष्ट काय ते सांगून टाकले. हेही सांगून ठेवतो.
 "लग्न करेन तर गीताशीच ..."!
 सगळेच आ..! वासून त्याच्याकडे बघतच राहिले...
 रमेश म्हणाला. आई तुला माहित आहे. ती मुलगी गरीब घरची आहे. पण मन मिळवू आहे. चवथी शिकलेली आहे.  आपल्या आई बरोबर दुसऱ्याच्या शेतात काम करते .इथे तर आपल्या घरी पाच एकर शेती आहे. आपल्याच शेतात माझ्या बरोबरीने काम करायला तयार आहे. खूप चिकाटी आहे कामाची. ती नेहमी म्हणते.
"कष्ट केले की...शेतकऱ्याचं घर धनधान्याने ओसंडून वाहत..."
"कष्ट करणाऱ्याच्या मदतीला देव नक्की धावून येतो..." 
"पाच एकराचे पंचवीस एकर वाहायला वेळ लागणार नाही.."!
अशी अनुरूप आणि मला समजून घेणारी पत्नी असेल तर मला हिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल आणि आई तसाही मी चार वर्ग शिकलेलो, शेतात राब राब राबनार. त्यामुळे ही चार वर्ग शिकलेली बायको काय वाईट आहे. मला कोणती मोठी एखादी मास्तरीन बायको मिळणार आहे.
" हे बरं नं , चारास चार.."!
कोणताच वाद नाही..
" मी जास्त शिकली...! तू कमी शिकला..!"
अरे रमेश...पण थोडा विचार कर. स्वभावाने खरचं चांगली मुलगी आहे ती. पण दिसायला...!
दिसायला काय आई...! 
दिसायला ती तुझ्या तोडीची नक्कीच नाही रे...! तू शेतात राबून पण कसा हँडसम दिसतोस...! इतकी शोभत नाही रे तुला...! खरतर डावीच आहे तुझ्यापेक्षा..!.
रमेश म्हणाला...
आईबाबा हे सगळं मला मान्य आहे. पण अनोळखी मुलगी या घरात आणून जर तिने आपल्या सगळ्यांना सांभाळून नाही घेतले तर? कारण मी हिला आधीच सागितलं. माझा भाऊ रिक्षा चालवतो. घरच्या म्हशी आहेत. तिचे दूध शेजारच्या जिल्ह्यात नेऊन तिथेच आपला रिक्षाचा धंदा करतो. फारसं त्याचं उत्पन्न नाही. त्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी तिला हेही सागितलं काही झालं तरी मला एकत्र कुटुंबात राहायला आवडतं. वेगळं राहणं मला कधीच जमणार नाही...!  तुम्ही  तर पाहताच...दादाची बायको...
नलू...!  
खूप समंजस आहे..! हे घर एकसंघ राहावं म्हणून जीवाचा आटा पिटा करते...
तसंच हि सुद्धा हे घर एकसंघ ठेवनार. नुसता विश्वास नाही तर खात्री आहे आई मला. आई जेव्हा मी हे बोललो. तेव्हा ती काय म्हणाली माहित आहे.
   ती म्हणाली. रमेश लहानपणा पासून खूप कष्ट केले. कष्ट करता करता मोठी कधी झाले हेही कळलं नाही. लोकांच्या शेतात काम करून करून कंटाळा यायचा, पण पोटाची खळगी भरण महत्वाचे होत. बाबा गेले तेव्हा.चौथीत होते मी. त्या धक्याने आईच आजारी पडली. मग आईने शाळेत पाठवलेच नाही. तिच्या बरोबर मग शेतात राबू लागली. ती तरी काय करणार. तिची सुद्धा बाबा गेल्यापासून तब्बेत ठीक नसते. मलाच आता तिचा आधार व्हायचं आहे. म्हणून अगदी चवथी पासून निंदन, खुरपण, कापूस वेचनं, तुरीच्या शेंगा तोडणं, चिखलात भाताची रोवणी सुद्धा केली रे मी. घरी आईला घरच्या सगळ्या कामात मदत करून तिच्या सोबतच जाते कामाला.     मी तुझं घर आणि शेत दोन्ही जबाबदाऱ्या हिरीरीने पाड पाडेन. त्याबद्दल तू निश्चित राहा.
   मग मला सांगा अशी गुणी मुलगी जी रोज आपण आपल्या डोळ्यादेखत पाहतो ती या घरची सून का नाही?
     वडील आता बोलले. रमेश अगदी बरोबर बोलतो तू. खरंच काहीच वाईट नाही त्या मुलीत. उलट दारूच्या व्यसनापाई बाप गेल्यावर पोरगी आईला बरं नाही म्हणून तिच्या बरोबरीने कष्ट करते. एकदा तिची आई आजारी पडली होती. तेरा चौदा वर्षाची पोर ती. काय समर्थ पणे तिने जबाबदारी पेलवली. डॉक्टर...औषधी... सगळं केलं एकटीनं...तेव्हा विचारले होते.
गीता काही मदत लागली तर हक्काने हाक मार..! 
पण पोर स्वाभिमानी..!  
एक रुपया कोणाकडून नाही घेतला. म्हणाली काका आहेत माझ्याकडे साठवलेले पैसे.
इतकं करून पुन्हा दुपारची शेतात. आईच्या बाजूला पाणी गोळ्या सगळं ठेऊन.
जातांना शेजारी सांगून जायची...मावशी... मध्ये मध्ये एक चक्कर माराल आईकडे...म्हणजे मी निश्चिन्त...
मला तरी गीता सून म्हणून पसंत आहे. रमेशच्या आई  काय विचार करता? द्या होकार पोरीला...! 
आणि सगळेच या लग्नाला तयार झाले. आपल्याकडे म्हंण आहे.
"अच्छे काम के लिये देरी नही करने की..."
त्यानुसार तिच्या आईला आणि तिला तेव्हाच बोलावले..चार घर बाजूला तर राहायचे. रात्री साडेनऊ वाजता. रमेश च्या घरून बोलावणे. सुमन थोडी घाबरली.
कुणी काही आजारी तर नाही ना? ...
काय काम असेल आपल्या गरिबाकडे... ? 
ना पैसा ना अदला...? 
    हे मात्र नक्की. कुणी कधी भांडी घासायला बोलवायचे तर कोणी पाहुणे राहूने आले तर पोळ्याबीळ्या करायला बोलवायचे पण आता तर खुप उशीर झाला होता. बघू काय असेल ते. असं मनाशी ठरवून गीताला सोबत घेऊन ती रमेश सोबत त्याच्या घरी आली. अगदी आदरतिथ्याने तिला पाटावर बसवले. नेहमी ती जमिनीवर बसायची. गीता उभीच राहिली.
 रमेशचे बाबा म्हणाले...इतक्या रात्री तुम्हाला का बोलावले...आश्चर्य नाही वाटलं का...? 
गीताची आई बोलली...
हो... ना... हो...
सारखी धाकधूक लागून राहिली का बोलावले असेल म्हणून...? 
गीताची आई तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे...
काय ...? खुशखबर...?  आणि मला..? रमेशचे बाबा...काय झाले..?
निराधाराचे पैसे बियसे मिळणार आहे की काय...?
मागे रमेश ने फॉर्म भरला होता...म्हणाला होता मावशे तुला पाचशे रुपये मिळतील. आलं की काय ते..! बरं होईन बाबा...!   तेवढाच फाटक्या संसाराला आधार..!
    तेवढ्यात रमेशची आई बोलली. सुमनबाई असं काही नाही. कोणत्याच निराधारचे पैसे अजून आले नाही...
   आणि सरकारी काम ते. इतक्या लवकर होते का कधी?  हि गुड न्युज वेगळीच आहे...
 रमेशच्या आई आता कोणती वेगळी न्युज हो. काय माझ्या गीताला कोणतं स्थळ बीळ सांगून आलं का काय तुमच्याकडे? 
 हं...! अगदी बरोबर ओळखले..! काय..?  
 काय म्हणाल्या तुम्ही रमेशची आई..? 
 माझ्या गीताला स्थळ सांगून आलं...! 
 काय करतो पोरगा...! 
 कोणत्या गावचा आहे...!
 तुम्ही कसं ओळखता...! 
     शेवटी रमेशचे बाबा म्हणाले. सुमनताई..! मुलगा आपल्याच गावचा आहे. शिवाय तुम्ही त्या मुलाला खूप चांगले ओळखता. इतकच नव्हे तर त्या मुलाच्या संपूर्ण घराला ओळखता.
काय ...? काय ...म्हणालात तुम्ही... 
रामेशचे बाबा बोलले ...तुम्ही जे ऐकलं तेच...
अहो पण असा कोणाचा  मुलगा आहे हे तरी सांगा,...
मग रमेशचे बाबा... रमेश कडे बोट करून म्हणाले...हाच तो मुलगा,...दोन मिनिटं ती माऊली स्थब्ध होती. भानावर आली...तसे रमेशचे बाबा बोलले...सुमनताई...तुमची गीता आमच्या पदरात घाला...हेच स्थळ सांगून आलं तुमच्या लेकीला...
काय..? काय... म्हणालात तुम्ही रामेशचे बाबा...
होय गीताची आई. आताच रमेश बोलला. लागलीच तुम्हाला बोलावणे धाडले...!   बोला घालताय का तुमची पोरगी आमच्या पदरात..!
   सुमंताईने उठून नमस्कार केला...! 
 म्हणाल्या कोणत्या तरी जन्माचं फळ हे...! माझी पोरगी तुमच्या घरची सून होणार..! देवा कसे आभार मानुरे बाबा या देव माणसांचे...!  खरंच.... आहेस तू...!  नवरा मेला तेव्हा खूप खचून गेली होती...! याच शेजाऱ्यांनी उठून उभं केलं...! आणि आत्ता...! आत्ता तर माझी पोरंगीच पदरात घेताय. सुमन हात जोडून उभीच राहिली... काय आणि कसं बोलावं सुचत नव्हतं. रमेशचे बाबा म्हणाले...काही बोलू नका...आता आपण लग्नाची तयारीच करू...आणि कृतीतून बोलू. 
काय गीता...? रमेश..? खुश ना...!    आणि दोघांनीही सर्वांना नमस्कार केला...
   खुशीच्या मारे सुमनची झोप कोसो दूर गेली होती. नवऱ्याच्या फोटो जवळ उभी राहून म्हणाली.
    अहो ऐकलं का..?    आपल्या गीताचे लग्न ठरले..!    आज तुम्ही पाहिजे होते हो...! पण ...पण...ह्या दारूने सगळा विनाश केला. किती वेळा शपथ खायचे हो...म्हणायचे सुमन आजच शेवटचं. यानंतर दारूला कधीच शिवणार नाही. पुन्हा नशा उतरली की...येरे माझ्या मागल्या...आणि हि दारू तुमचा शेवटचं करून गेली.    पोरीचं भाग्य थोर...रमेशच्या बाबांनी मोठ्या मनाने  पोरगी पदरात घेतली...बघताय न तुम्ही वरून...विचारात झोप कधी लागली कळलेच नाही.
   लगेच ब्राम्हण बोलवून... एक चांगला मुहूर्त काढून लग्न झाले...चार घर आड गीताचे घर...त्यामुळे या घरापासून...त्या घरापरंत मंडप घातला...अर्थात सगळा खर्च रमेशच्या बाबांनी केला...सुमनताई ने ऐपती प्रमाणे थोडंफार केलं.  चार घर सोडून पोरगी सासरी नांदायला आली.    गीता आधीच गुणी...त्यामुळे घरी सगळ्यांचे मन जिकुंन घेतले. बघता बघता लग्नाला तीन वर्षे झाले...पण पाळणा काही हलेना...शेवटी रमेशच्या आई म्हणाल्या...सुमनताई...पोरांना डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. एव्हाना बाळ राहायला पाहिजे...मी आडून आडून विचारले काही वापरता का...? तर नाही म्हणाले...तुम्हाला काय वाटते..?
 अगदी बरोबर बोलता तुम्ही रमेशची आई...आपण उद्याच घेऊन जाऊ .. जिल्ह्याच्या ठिकाणी...आता औषधपाणी करायलाच पाहिजे आणि दुसऱ्याच दिवशी...ह्या दोघी आणि ते दोघे..डॉक्टर कडे गेले...सर्व तपासण्या झाल्या...रामेशचे रिपोर्ट नॉर्मल होते...पण...पण ...गीता कधीच आई होऊ शकणार नव्हती...तिच्या गर्भाशयाची रचना खूप लहान होती...त्यामुळे बाळ राहू शकत नव्हतं. गीता ला हा धक्का सहन झाला नाही...ती बेशुद्ध झाली...डॉक्टरांनी तिला शुद्धीवर आणले. खूप समजावले..! 
  बाळ दत्तक घेण्याची कल्पना दिली..!   पण ही काही समजायला तयार नव्हती.    रस्त्यात कोणाशीही काही बोलत नव्हती..! घरी आली...कसेबसे चार घास पोटात टाकले...आणि जाऊन झोपली.. 
   रमेश खोलीत गेला...ती कुशीवर झोपून अश्रू ढाळत होती...रमेशने अलगद तिच्या अंगावर हात ठेवला...गीता उठून बसली...
म्हणाली रमेश तुम्ही दुसरं लग्न करा...मला माझं बाळ हवं आहे...
रमेशने शांत पणे तिला समजावले...म्हणाला गीता...आज तुझ्यात कमतरता आहे... म्हणून तू मला दुसरं लग्न करायला सांगते...समजा हे माझ्या बाबतीत झाले असते...तर काय तू दुसरे लग्न केले असते...बोल...मला सोडून गेली असतीस...!
बोल गीता...! बोल..!
गीताने त्याला घट्ट मिठी मारली...रडून मोकळी झाली...
रोजच रुटीन सुरु झालं...पण आतून ती फार दुखावली होती...
तेवढ्यात एक गुड न्यूज घरात आली...नलू वहिनी पुन्हा गरोदर राहिली...
   बस आता गीता ने ठरवले...हेच ते आपले बाळ...नलू ताई जवळ गेली...म्हणाली ताई...मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे...
   अग बोल ना...इतका का संकोच ताईंशी बोलायला...ताई थोडं अवघड आहे...पण तुम्ही समजून घेतलं तर सगळं खूप सोप्प होईल...
    शेवटी नलू  बोलली...गीता काय ते स्पष्ट बोल...? तुला तर माहित आहे...मी छोट्या बहिणीप्रमाणे तुझ्यावर माया करते...आणि तुही मोठी बहीण समजते...जावा जावा असं कधी आपण वागलोच नाही ग...
     सगळा धीर एकवटून गीता बोलली...ताई तुमचं हे होणार बाळ...जीभ अडखळत पुन्हा  बोलली...ताई ...तुमचं हे होणार बाळ...शेवटी नलू वैतागून म्हणाली...गीता पुढे बोलशील का..? जेणेकरून मला काय ते  समजेल...?
     गीता म्हणाली...ताई तुमचं होणार बाळ...झाल्या बरोबर माझ्या ओटीत घालाल...? 
    अगदी झाल्या दिवसापासून मी तिची किंवा त्याची आई होईल ...जे होईल ते...
     ताई मी आई होऊ शकत  नाही...मग दुसरी कडून मुल दत्तक घेतल्या पेक्षा...तुमचं हे बाळ का नाही...? बघा ताई...माझी आई होण्याची इच्छा पूर्ण होईल... हे बाळ तुमच्या  उदरात माझं म्हणून  वाढेल...
    सगळं खरं गीता..! पण आपल्याला घरी या विषयी बोलावे लागेल...ताई तुम्ही नका टेंशन घेऊ...मीच बोलते...
  संध्याकाळी सगळे घरी आले...जेवण आटोपली...भांडीकुंडी खासून सगळे बाहेर अंगणात बसले...
    गीता म्हणाली आई, बाबा , दादा आणि रमेश मला तुम्हाला काही सांगायचे आहे...माझे म्हणणे पटले तर नक्की विचार करा...आणि तिच्या डोक्यातला प्लान सगळ्यांना सांगितला....
   आणि तो सगळ्यांना आवडला...कारण बाहेरून दत्तक घेतल्यापेक्षा..हे जास्त योग्य वाटले सगळ्यांना...
   रमेश आणि गीता दोघेही खुश झाले...नलू गरोदर होती...पण गीता आपणच गरोदर आहे असा आभास निर्माण करत होती...नलूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होती...चार महिने होत आले...बाळ आता पोटात हातपाय हलवायला लागले...नलू सुद्धा...तिचा हात आपली पोटावर ठेऊन प्रत्येक स्पर्श तिला अनुभवायला देत होती...मग एकांतात ती आपल्या पोटावर हात ठेवून...तशीच जाणीव करून घ्यायची..
     नववा सरला...आणि नलू बाळंत झाली...यावेळी मुलगा झाला...सगळ्या प्रसववेदना नलू प्रमाणे गीताने सुद्धा अनुभवण्याचा प्रयत्न  केला...
     आणि आज ते एक दिवसाचे पोरं...नलुने गीताच्या हातात दिलं...म्हणाली गीता ...सांभाळ तुझ्या लेकाला...तूच त्याची जन्मदात्री...मातृत्वाने गीताचा ऊर भरून आला...नॉर्मल डिलिव्हरी ...त्यामुळे संध्याकाळी लगेच घरी आणले... आई जरी गीता झाली...तरी बाळंत नलू झाली होती...त्यामुळे एका बाळंतिणीचे करावे तेवढे कोडकौतुक नलुचे पण केले...
  पंधरा दिवस तिने बाळाला दूध पाजले...मग ती म्हणाली गीता आपण एक गाय घेऊ...त्याच दूध बाळाला पाजू... जास्त दिवस पाजत राहिले तर...हि मोहमाया फार वेडी आहे...नजानो पुढे माझीच तुला बाळ देण्याची तयारी होणार नाही...
   आणि एक दुभती गाय घेतली...आता बाळाला वरचे दूध लावले...पण गीता जेव्हा जेव्हा बाळाला छातीशी घ्यायची ...तेव्हा तेव्हा एक अनामिक बदल तिला जाणवायचा...
    आज असच तिने बाळाला मांडीवर घेतले...भुकेने तो व्याकुळ झाला होता...तिच्या छातीशी तोंड घासायला लागला...आणि अगदी अनपेक्षित तिच्यात कडून ब्लाउजच्या बटन उडघडल्या गेल्या...
     बाळाला छातीशी लावलं...आणि काय आस्चर्य...तिची छाती गच्च भरून आली...अचानक वेदना होऊ लागल्या...जस बाळाचं तोंड आईच्या निप्पल ला लागलं...बाळ सुकुसुकु दूध ओढायला लागलं...गीतला छाती हलकी होती आहे असं जाणवलं...
  मुद्दाम दुसऱ्या बाजूने पण लावलं...तसंच वाटलं...बाळाने निप्पल मधून तोंड बाहेर काढले...आणि काय आश्चर्य ...त्याच्या तोंडाला दूध लागलं होतं...चक्क आईच्या दुघाचा एक वेगळाच गंध तिला आला...
  तसंच बाळाला घेतलं...नलू ताईकडे गेली...
    म्हणाली ताई....बाळाच्या तोंडाचा वास घे ग....खरतर नलू घाबरली...काय झालं बाळाला ..? कसला वास...? तेव्हा गीताच म्हणाली...ताई मी बाळाला छातीशी लावलं...तर मला जाणवलं...की माझ्या स्तनातून दुधाच्या धारा निघत आहे...म्हणून मग मी बाळाला पाजून झाल्यावर...त्याच्या तोंडाचा वास घेतला...आईच्या दुधाचा येतो तसा सुगंध आला...
   ताई प्लीज बघानं ...तुम्हाला सुद्धा असं जाणवत का...? आणि नलूने...बाळाला मांडीवर घेतले...खरंच आईच्या दुधाचा वास येत होता...
  नलू म्हणाली...गीता...! आज खऱ्या अर्थाने तुला मातृत्व लाभलं..! सांभाळ तुझ्या लेकाला...हे बाळ पूर्णपणे तुझं आहे....आता मी यशोदा आणि तू त्याची देवकी ग...नावही छान ठेवलं...
        "   मुरली..."


काव्यप्रभा पेज वरून....  
      सौ प्रभा कृष्णा निपाणे             कल्याण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...