शुक्रवार, २१ मार्च, २०२५

1800. रंगात रंगुनी

      एक दिवस भगवान कृष्ण मथुरे मधील एका रंगारी कडे गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत. मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी. हा रंगारी कृष्ण भक्तीत आधीच रंगला होता म्हणुन त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली. ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरे मधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडुन म्हणु लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे.  ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी "फुकट" ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही.
      हळु हळु लोकांची गर्दी वाढु लागली. कोणी आपले धोतर. तर कोणी आपली साडी. कोणी आपले उपरणं.
 तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल... तर कोणी पिवळा... कोणी निळा तर कोणी गुलाबी... भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवुनही देत होता. असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलुन निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणुस भगवंतासमोर हात जोडुन अत्यंत नम्रपणे उभा राहिला. 
तो म्हणाला माझे ही एक वस्त्र रंगवुन हवे आहे. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझे वस्त्र... कोणत्या रंगात रंगवुन हवे आहे...??
 तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला. त्याच रंगात रंगवुन दे जो रंग या बादलीत आहे.
 अरे कृष्णा. हे भगवंता..सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत मी बघतो आहे की तुझ्या जवळ बादली एकच आहे पण या बादली मधुन तु सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग. पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. कारण 
कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे.
माझा रंग अहंकाराच्या पुर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे.
माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभुतीचा आहे.
 म्हणुन "जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा" तुझ्या शिवाय माझे काय अस्तित्व. तु आहेस तरच मी आहे, तु नाही तर मी नाहीच. म्हणुन संतांनी लिहीले की.

उसी रंग में रहना रे बंदे, 
उसी रंग में रंगना.... 
जिस रंग में परमेश्वर राखे, 
उसी रंग में रंगना....!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...