My Father is the Best Mother on Earth !!
हे वाक्य उच्चारल्या बरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आजुबाजुला पाहिलं तर अख्ख ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेल होत. त्या टाळ्यांच्या Rhythm मध्ये मीही सहभागी झाले होते. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे अनेकांचे पाणावलेले डोळे....माझ्यासह...।। प्रसंग होता एका आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शाळेत साजरा होणारा....MOTHERS DAY CELEBRATION चा. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून असे कार्यक्रम घेतले जातात.
आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या शाळेतल्या हिरवाईनं सजलेल्या, विविध व्रुक्षसंपदा असलेल्या बगिच्यातील झाडांना उन,धूळ याची पर्वा न करता "तो" पाणी देत होता. तेवढ्यात शाळेच्या शिपायाने त्याला सांगितले.
गंगादास. प्राचार्य मँडमनी तुला बोलवलयं.आत्ता लगेचच. शेवटल्या दोन शब्दावरचा जोर निरोपाची तीव्रता अधोरेखीत करत होता. हात स्वच्छ करुन गंगा निघाला मँडमच्या केबीनकडे. त्याची छाती धडधडत होती.रोजचा पायाखालचा रस्ता संपता संपत नव्हता. डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.
कशासाठी बोलवलं असेल मॅडमने ? खूप शक्यता पडताळून पाहिल्या गंगाने..🤔🤔🤔
All permutations, combinations...पण छे !आपल्या कामात चोख होता तो.
टकटक...टकटक...त्यानं दार वाजविले...
बाहेरुनच विचारले....
मॅडम, तुम्ही मला बोलवलत ?
आत ये...आतून एक जरब असणारा आवाज ..
तो आणखीनच Nervous...
दार लोटून तो आंत गेला.
करडे, रुपेरी केसांची फ्रेंच नॉट घातलेली आणि धारदार नाकावरचा आकर्षक फ्रेमचा चष्मा असलेल्या प्राचार्यांनी त्याच्याकडे बघीतले आणि टेबलवरच्या एका कागदाकडे बोट दाखवले...
म्हणाल्या..
वाच हे !
गंगा बावचळला पण लगेच म्हणाला.
मॅडम अहो मी निरक्षर माणूस, मला लिहता वाचता येत नाही आणि इंग्रजी तर फारच लांबची गोष्ट. माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा. एक संधी द्या मॅडम मला. मी आजन्म ऋणी राहीन तुमचा. तुमच्या या बड्या शाळेत तुम्ही माझ्या मुलीला फुकटात शिकण्याची संधी दिली. मी तर स्वप्नातही हा विचार केला नव्हता. तो थरथर कापत, स्फुंदून स्फूंदून बोलत होता.
थांब जरा तू. शांत हो. खूप गोष्टी ग्रुहीत धरल्यास तू. तुझ्या मुलीला शिक्षणाची संधी आम्ही दिली कारण ती खूप हुशार आहे आणि तू आहेस आमच्याकडचा आज्ञाधारक Gardner...माळी.....🏝️🏝️🏜️🏕️🌲🌱🌴🌳🌿 थांब जरा.
बेल वाजवून शिपायाला त्यांनी एका शिक्षिकेसाठी निरोप धाडला.ही शिक्षिका आली की वाचून दाखवेल आणि अर्थही सांगेल तुला. कागदाकडे निर्देश करीत म्हणाल्या, की हे तुझ्या मुलीनं लिहलयं आणि मला वाटत होत की तू हे वाचावस. तेवढ्यात टीचर आल्याच. टीचरने वाचायला सुरवात केली आणि प्रत्येक ओळीचं हिंदी भाषांतर करत वाचलं. ते लिहलेलं असं होतं....।
आज आम्हाला आमच्या "आई "बद्ल लिहायला सांगितले.... कारण Mother's day..👩👩
बिहारमधल्या एका छोट्या खेड्यातून मी आले. शिक्षण आणि आरोग्य सुविधांची वानवाच तिथे. कित्येक माता बाळांना जन्म देतांना मृत्युला कवटाळतात. माझी आई त्यातलीच एक. मी या जगात आल्यानंतर मला कौतुकानं कवटाळताही आले नाही तिला. माझा बाबा हा पहिला व्यक्ती होता ज्यानी मला हातात घेतलं आणि कदाचित एकमेव. प्रत्येक जण दुःखी होता. कारण कारण। मी अशी मुलगी होते जीनं जन्माला येतांना आपल्या आईला खाल्लं. माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे म्हणून सगळ्यांनी प्रयत्न केले. पण त्यांनी लग्न केले नाही. माझ्या आजी आजोबांनी नैतिक, अनैतिक, भावनिक रित्या बाबांना प्रवृत्त करण्याचा कसोशिने प्रयत्न केला, पण बाबा ठाम राहिले. शेवटी तर आजीआजोबांनी Ultimatum दिला....😡😡
तू जर आमचे ऐकले नाहीस तर ही शेती,जमीनजुमला,घर यातला छदामही मिळणार नाही, या सर्वातून तुला बेदखल केले जाईल.🤢
बाबा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठी सुद्धा थांबले नाहीत आणि क्षणार्धात सगळ्यावर पाणी सोडले. सुखी आयुष्य आणि विशेषतः ग्रामीण जीवनाच्या सुखी जीवनावर पाणी सोडले व मला घेऊन या मोठ्या शहरात एक सडाफटींग माणूस म्हणून अतिशय कठीण, कष्टप्रद जीवन स्विकारलं. रात्रंदिवस काम करुन मला वाढवलं,जपलं,प्रेमानं माझी काळजी घेतली. आता मोठं झाल्यावर माझ्या लक्षात येतं की अनेक चांगल्या गोष्टी त्यांना का आवडायच्या नाहीत. ज्या मला आवडायच्या !
पानात एखादा तुकडा राहिला आणि मला आवडत नाही असं त्यांनी म्हंटलं की तो मीच संपवायचे. कारण एकच की हा पदार्थ बाबांना आवडत नाही. खरी ग्यानबाची मेख इथच होती. त्यांच्या समर्पणाची. त्यांच्या आवाक्याबाहेरचे,पण जे जे चांगले आहे ते त्यांनी मला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या शाळेनं मला आश्रय दिला आणि सर्वात महागडे बक्षीस दिले ते म्हणजे मला इथं प्रवेश दिला.
Love,Care..defines Mother. म्हणजे प्रेम आणि काळजी ही बाब आईसाठी असेल तर माझा बाबा यात फिट्ट बसतो.
Compassion....म्हणजे करुणा म्हणजे जर आई असेल,तर माझा बाबा यात फिट्ट.
Sacrifice...समर्पण हे आईचे रुप असेल तर माझ्या बाबाचं प्रभुत्व आहे यावर..
संक्षेपात......
आई जर प्रेम, काळजी, करुणा, समर्पण यांची मुर्ती असेल तर.
MY FATHER IS THE BEST MOTHER ON EARTH THEN...
ON Mother's day I Salute him and say it with great Pride that, the hardworking GARDENER working in this School is
MY FATHER...
On Mothers day..या प्रुथ्वीवरचा एक सर्वोत्तम पालक म्हणून मी माझ्या बाबांना शुभेच्छा देते.
कदाचित शिक्षकांना मी हे लिहलेलं आवडणार नाही पण ही तर अगदी छोटी गोष्ट आहे माझ्याकडून माझ्या बाबांसाठी ज्यानी माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम केले.
टांचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता खोलीत पसरलेली. आवाज काय तो फक्त गंगादासच्या कोंडलेल्या हुंदक्यांचाच. बागकाम करतांना तळपत्या उन्हाने कधीही घामाघुम न झालेला गंगा. आपल्या मुलीच्या या मृदु मुलायम शब्दांनी त्याची छाती अश्रुंनी भिजून चिंब झाली. तो हात बांधून उभा होता. शिक्षकाच्या हातातून गंगानं तो कागद घेतला आणि ह्रदयाच्या जवळ धरला. अद्यापही हुंदक्यांनी त्याचं शरीर थरथरत होत. प्राचार्य मॅडम खुर्चीतून उठल्या. गंगाला त्यांनी खुर्चीत बसायला सांगितले, पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाल्या..
आवाजातला प्रशासकीय करड्या स्वराची जागा आता मुलायमतेनी घेतली होती.
गंगा अरे तुझ्या मुलीला 10/10 गुण मिळाले. शाळेच्या इतिहासात मदर्स डे च्या दिवशी आईवर लिहलेला हा सर्वोत्कृष्ट निबंध आहे. आपल्या शाळेत Mother's Day निमित्त उद्या एक मोठा समारंभ आयोजित केला आहे.शाळेच्या व्यवस्थापनाने या साठी मुख्य अतिथी म्हणून तुला बोलवण्याचे ठरवलेयं. आपल्या मुलांना वाढविण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेम आणि समर्पण करणाऱ्या व्यक्तिचा सन्मान आहे हा. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळी तुझ्या मुलीनं तुझ्याबद्दल दाखविलेल्या विश्वासाला Appreciate केलं तर तिलाही अभिमान वाटेल आणि शाळेलाही, आपल्याकडे असणाऱ्या सर्वोत्तम पालकाचा. खरंतर एका अर्थाने बागशिल्पकारच तू. A Gardner. बागेतील झाडांची काळजी घेतोस,जपतोस एवढच नाही तर तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फुलाचं निरोगी संगोपन, पालन पोषण अप्रतिम पद्धतीने करतोयस.
""""So Ganga .....
WILL YOU BE THE CHIEF GUEST FOR TOMORROW'S EVENT. ?🎖️🎖️
©️ ज्ञानदा कुळकर्णी. 🙏🙏😢😢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा