1. आयुष्यात एका क्षणाला आपणाला अशी जाणीव होते की आपला मार्ग चुकला आहे. जर मला त्यावेळी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक हातभार लाभला असता तर आज मी एका वेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करून शकलो असतो. यामध्ये तुमची काही चूक नाही. कारण तुमच्यासारखे कितीतरी कोट्यावधी मुलं-मुली आणि आई- वडील आपल्या आयुष्याचा मार्ग चुकलेले आहेत आणि चुकतही आहेत. कदाचित त्यावेळची परिस्थिती,भेटणारे लोक, समाज आणि शेवटी आपण घेतलेला निर्णय यामुळे आज तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच आहात. ज्यावेळी तुम्हाला जाणीव होते की आपला मार्ग चुकला आहे त्यावेळी कदाचित तुम्ही निम्मे आयुष्य किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्य पार करून पुढे आलेले असता. या गोष्टीची खंत मनात अजिबात ठेवू नका की मी काही करू शकत नाही. कारण ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मार्ग चुकल्याची जाणीव होते कदाचित ती जाणीव म्हणजे तुम्ही काहीतरी धाडसाने, योग्य नियोजनाने आणि सर्व बाजूने विचार करून एखादा ठोस निर्णय घेऊन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करावी जेणेकरून जितकी जास्त माणसे जोडून तुम्ही नाती तयार कराल तितके तुम्ही चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी जसे आहात तसेच रहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी ती व्यक्ती तुमची होणार नाही. म्हणून लोकांचा जास्त विचार करत जाऊ नका.
2. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. तुमचे ध्येय लहानपणीच म्हणजे दहावीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी निश्चित करून ठेवा. पदवीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला नेमके कोठे जायचे आहे? किंवा काय साध्य करायचे आहे? हे ठरवा आणि त्या पद्धतीने वाटचाल सुरू करा. हे सर्व करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतील. मग ती अडचण आर्थिक असेल, समाज विरोधात असेल किंवा आणखी काहीही असेल. तुम्ही माघार घेऊ नका. क्षेत्र कोणतेही असो नेहमी विजेते राहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही आणि या जगातील जगत असणारे इतर जीव यांच्यामध्ये कोणताही फरक असणार नाही. आपण बरेच वेळा असे पाहतो की वयाच्या 21 ते 25 या दरम्यान बरीच मुले मुली मोठ्या अधिकारी पदावर काम करत असतात. हे सर्व त्यांना कशामुळे शक्य झाले? कारण त्यांनी स्वतःला सुरुवातीपासूनच त्यामध्ये झोकून दिलेले असते. बऱ्याच गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून नेहमी सतत कष्ट केलेले असतात. आपले प्रयत्न जर 100% प्रामाणिकपणे असतील तर निसर्गाची साथ आपणाला नक्कीच लाभते. जे नशिबात आहे ते होणारच हे वाक्य त्रिकालवादी सत्य असले तरी त्याला प्रयत्नांची साथ नक्कीच हवी. जे झाले ते झाले आणि जे होणार आहे ते होऊनच जाईल. फक्त तुम्ही तुमचा स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा. तरच तुम्हाला सर्व जग आणि तुम्ही स्वतः चांगले दिसाल. जशास तसे वागण्याची वृत्ती अंगात बाळगून ठेवा. कारण चांगल्या वृत्तीच्या लोकांची संख्या फार कमी होत चालली आहे. ज्या गोष्टी आयुष्यात फुकट मिळतात त्या गोष्टींची किंमत सहजासहजी कोणत्याही व्यक्तीला समजत नसते. मग तो पैसा असो, नाते असो, वेळ असो किंवा आणखी काहीही असो.
3. आयुष्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात. आयुष्यात खूप चुका झाल्या तरी अभिमान मात्र एका गोष्टीचा नेहमी असायला हवा की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा घेतलेला नसावा. आयुष्याचा प्रवास करत असताना ज्या व्यक्ती, वस्तू आपणाला भेटतात त्याचा आनंद योग्य त्या वयात घ्यायला आपण शिकले पाहिजे नाहीतर त्याचं महत्त्व शून्य होत असतं. आपल्या जवळ संपत्ती असणे खूप महत्त्वाचे आहे. हे जेवढे महत्त्वाचे आहे तितकेच हे पण महत्त्वाचे आहे की आपली संतती सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. जर आपली संतती चांगली नसेल तर आयुष्यभर कष्ट करून सुद्धा तुमची संपत्ती संपायला वेळ लागणार नाही. आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याने तुम्हाला संधी दिली त्याचा कधीही विश्वासघात करू नका आणि ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्याला परत कधी संधी देऊ नका. कोणतेही नवीन कार्य करण्याच्या बाबतीत जर सल्ला घ्यायचा असेल तर यशस्वी आणि अयशस्वी या दोन्ही लोकांचा घेणे गरजेचे आहे. कारण यशस्वी लोक काय करावे? हे सांगू शकतात आणि अयशस्वी लोक काय करू नये? हे सांगतात. फक्त उच्च प्रतीचे शिक्षण घेतले म्हणजे शहाणपणा येईलच आला असे कधीच नसते. जर समजूतदारपणा अंगी घ्यायचा असेल तर कोणाबरोबर, कोणत्या क्षणी, काय आणि कसे बोलावे? हे समजायला पाहिजे. ज्या ठिकाणी तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशा ठिकाणी अपेक्षा ठेवणे योग्य असते. फक्त सोने अंगावर घातले म्हणजे माणूस मौल्यवान होतो असे काही नाही. कारण तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी. जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाची संपूर्ण लंका सोन्याची असताना मात्र अशोक वनात प्रभू श्रीरामांची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळाले. त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका. ते सोन्यापेक्षा कमी नाही. त्यात आनंद घ्या आणि जर जे नाही त्याचा मोह केला तर दुःख पदरी पडणारच. मनुष्याला नेहमी असे वाटत असते की माझ्यासारखा दुःख आणि संघर्ष कोणीच केलेला नाही परंतु हे सर्व वाटायच्या अगोदर हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की अगोदरही कोणीतरी हे सर्व भोगले आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर भगवान श्रीकृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या आहेत. जन्म होताच देवकी वासुदेव, मग नंद यशोदा, प्राणापेक्षा प्रिय राधा गमावली. गोकुळ तुटलं, मथुराई सुटली. जे गमावलं नाही ते होतं देवत्व आणि चेहऱ्यावरचा हसू. कृष्णाचं संपूर्ण आयुष्य दुःख आणि परीक्षांनी भरलेलं होतं. कधी चोरीचा आळ लागला तर कधी अपमान सहन करावा लागला. तरी कृष्ण कधीच रडत नव्हते. त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली. द्वारकेचा राजा असले तरी अर्जुनाचे सारथी झाले. बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्करला. सुदामाच्या भेटीसाठी अनवाणी पायाने धावत गेले. कृष्ण फक्त प्रेम किंवा विरहाची प्रतिक नव्हे ते मनोबल व सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सर्व गमावल्यानंतरही आनंदी कसं राहावं हे श्रीकृष्ण पेक्षा उत्तम कोणीच शिकवू शकत नाही.
4. आयुष्यात मैत्रीचे नाते हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय असे कोणत्याही स्तरातील मित्र असू शकतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की श्रीमंत मित्र सोबत असताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे. आणि गरीब मित्र सोबत असताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हा मैत्रीचा खरा धर्म आहे. कारण जेव्हा आपण ताण तणावात असतो तेव्हा तू टेन्शन घेऊ नको आपण काहीतरी जुगाड करू असे म्हणणारे मित्र आपल्या आयुष्यात नक्कीच असतात. देव आपल्याला शरीर देतो, बुद्धी देतो. आयुष्य जगण्यासाठी आयुष्य घालवण्यासाठी लागणारी सर्व साधने देतो. प्रश्न हा आहे की त्याचे आपण काय करतो? त्यातून आपण काय घडवतो? दिलेल्या मातीचा चिखल करायचा की त्या मातीतून सुंदर मूर्ती घडवायची हे आपलं कर्तुत्व आपलं कर्म ठरवत असते. देव देण्यात कधीच कमी पडत नाही आणि आपण घडवण्यात किंवा घडण्यात कमी पडता कामा नये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. यावरून पराभवाने माणूस कधीच संपत नाही. तो जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हाच तो संपतो. जेव्हा माणसाची नक वाढतात तेव्हा माणूस आपली नक कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा माणसाने आपला अहंकार तोडला पाहिजे, नाती नाही. निर्मळ मनाने प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी असते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. त्यामुळे राग आल्यावर थोडसं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडंसं नमतं घेतलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक शिकवण आहे की राज्य छोटे असले तरी चालेल पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःच अस्तित्व निर्माण करा. तरच जग तुमचा आदर करेल.
5. आयुष्यात व्यक्तींची पारख समजणे खूप गरजेचे आहे. जर आपणाला मुलग्याची पारख ओळखायची तर ती लग्नानंतर समजते. लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत कसा वागतो? कोणत्या पद्धतीने व्यवहार करतो? यावरून तो कसा आहे हे समजते. मुलगीची पारख ती तारुण्यात असताना तिच्या वागण्यावरून आणि संस्कारावरून दिसून येते. पतीची पारख पत्नीच्या आजारपणात पाहावयास मिळते. पत्नी जेव्हा आजारी असते त्यावेळी पती तिला कोणत्या प्रकारे सांभाळतो किंवा आधार देतो हे महत्त्वाचे. पती ज्यावेळी आर्थिक संकटात असतो त्यावेळी पत्नीचे खरे रूप समजते. त्यावेळी पतीला पत्नीकडून फक्त आधारची गरज असते. ज्यावेळी भांडणे लागतात त्यावेळी भावाची ओळख चांगल्या प्रकारे होते. जर भांडणाच्या वेळी भाऊ आपल्या मदतीसाठी धावून येत असेल तर नाते चांगल्या प्रकारे टिकू शकते. कोणत्याही प्रकारचे संकट ज्यावेळी येते त्यावेळी मित्राची पारख होते. ज्यावेळी आर्थिक बाबतीत संपत्तीचे वाटप केले जाते त्यावेळी बहिणीला ओळखता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या म्हातारपणामध्ये आपली संतती कोणत्या प्रकारे काळजी घेतात यावरून त्यांची पारख करता येते. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत तो तोडताना दहा वेळा विचार करतो. फुकटाचे मिळाले की माणूस एका झटक्यात तोडतो मग ती झाडे असोत किंवा नाती. माणसाने आयुष्य जगताना मिठासारख जगाव, महाग नसावं पण महत्त्वाचा असाव. गाय कचरा खाऊन सुद्धा दूध देते तर साप दूध पिऊन देखील विष देतो. अगदी त्याप्रमाणे काही लोकांचं असं असतं की तुम्ही त्यांना मदत केलेली असते. त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात आणि जे कृतघ्न असतात, ते तुमच्या विरोधात कारवाया करतात. हा त्यांच्यावरील संस्काराचा सोबतीचा आणि त्यांच्या प्रवृत्तीचाच प्रभाव असतो. जेव्हा आपल्याकडे द्यायला काहीच नसतं तेव्हा आधार द्यावा, समोरच्याला ताकद मिळते. काहीजण काळजी, प्रेम, आदर आणि विश्वास हे फक्त गरजेपुरतं दाखवतात. एकदा गरज संपली की या सगळ्या भावना संपून जातात. आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणार डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात. माणसं बदलायला लागली की समजायचं या वाटेवर तुमची गरज कदाचित संपली. संकटाच्या वेळी किंवा अपमानाच्या वेळी प्रत्येक वेळी लगेच उत्तर द्यायचे नसते. कधी कधी आपल्या मेंदूचा वापर करून योग्य वेळी बॉम्ब फोडायचे नियोजन लावावे लागते. हेतू आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय प्रमाणापेक्षा जास्त केलेले कष्ट आणि धाडस पुरेसे नसते. कर्म व निसर्ग नियम हे माणसाला चुकवता येत नाहीत. आपण कर्म करू लागलो की निसर्ग नियमांना गती मिळवून निसर्ग नियम आपले काम करत असतात. संचित व प्रारब्ध हे कर्मातून निर्माण होते. कर्मातून पाप पुण्य निर्माण होते. पाप पुण्यतून नियती निर्माण होते. नियतीतून सुख-दुःख निर्माण होते व सुख-दुःखातूनच आपण आपलं नशीब निर्माण करतो. एक वेळ नशीब धोका देईल पण मेहनत नाही. काही ठिकाणी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता ही येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ देऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगले.
6. अहंकारासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले. आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारा जोडीदार भेटणं नशिबात असावं लागतं. नाती उगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. नाती सांभाळून आणि टिकवून ठेवायची असतील तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडे काहीच मागत नाही. कारण तुमचा मिळणारा वेळ आणि तुमचं मिळणारे प्रेम हेच पुष्कळ असतं त्यांच्यासाठी. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रमच असतो. जे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात, ते आपल्याला सुद्धा दुसऱ्यांसमोर नावे ठेवू शकतात . स्वतःला स्वतःचा अभिमान वाटेल एवढा आनंद हवा असेल तर तेवढा संघर्ष ही करावा लागतो. जर नात्यांवर धूळ पडली असेल तर ते नाते असले काय? आणि नसले काय? काहीच फरक पडत नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्लेच असतात. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागील माणसाचा खरा चेहरा ओळखणे. रस्ता चुकणं, चुकीचं नसतं. मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीच असतं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो मग तो आधारचा शब्द असो किंवा मदतीचा हात. खरं बोलण्याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की काहीच लक्षात ठेवावे लागत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचे समजणे आधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. जास्त चांगलं असणं पण काही वेळा चांगलं नसतं. कारण काही माणसांच्या बरोबर जशास तसे वागायला लागतच. चारही बाजूने पाणी असले तरीही जहाज पाण्यात बुडत नाही. जहाज पाण्यात तेव्हाच बुडते ज्यावेळी पाणी जहाजाच्या आत येते. तुमच्या चारही बाजूंनी तुमच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत जे चुकीचे, नकारार्थी, अयोग्य, अपमानास्पद होत आहे त्याला तुमच्या मनामध्ये आता येऊ देऊ नका. एकदाच जर ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आल्या, तर तुम्ही सुद्धा जहाजाप्रमाणे बुडून जाल. इतिहासात भविष्य शोधायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा, कारण आज काल काही लोक विचारतात की तू केलेस तरी काय माझ्यासाठी? आपण ज्यावेळी एखादी गोष्ट जमत नाही असे म्हणतो त्यावेळी खरंतर आपले कष्ट कमी पडतात हे त्यामागील खरे कारण आहे. अशा ठिकाणी जाऊ नका जिथे लोक तुम्हाला सहन करत असतील. तर अशा ठिकाणी जावा की जिथे लोक तुमची वाट बघत असतील, आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहाल. स्वतःच्या भावाला किंमत आणि हिम्मत दिली की लोकांच्या आधाराची गरज भासत नाही. आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी लागते. माणसं गमवायची भीती बाळगू नका. कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि थांबणाऱ्याला इच्छा लागते. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही तर ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्याचही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही.
7. रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी जुना वाईट विसरा हा आयुष्य जगण्याचा एक छोटासा नियम आहे. आपण कितीही बोलके असलो तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची सोबत लागते. ओळख मोठ्या लोकांसोबत नाही तर साथ देणाऱ्या लोकांसोबत असली पाहिजे. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल. पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. काळानुसार बदलणे खूप महत्त्वाचे आहे, कारण काळ बदलायला शिकवतो थांबायला नाही. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. देव कोणाचे कधीच वाईट करत नाही. पण दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही. शब्दांची भाषा चांगली असेल तर माणसांची नाती कधीच तुटत नाहीत. काही माणसं ढोलकी प्रमाणे असतात. कळतच नाही की कोणत्या बाजूने वाजवतात. आपल्या तोंडावर आपली स्तुती करतात,तर दुसऱ्याच्या तोंडावर आपली निंदा करतात. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील किंवा नसतील पण नाव मात्र राहील पाहिजे. आयुष्याच्या संघर्षात बऱ्याच वेळा नको असलेल्या अनेक गोष्टींवर माणसाला निर्णय घ्यावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. आयुष्यात कठीण प्रसंग येणे देखील आवश्यक असतं. कारण तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतो तर कोण हात धरून चालतो. परमेश्वराला घाबरू नका पण आपल्या वाईट कर्माला नक्कीच घाबरा. कारण परमेश्वर माफी देतो परंतु कर्म कधीच माफ करत नाहीत. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे जमले त्याला दुसरे कोणतेही पुण्य कमावण्याची गरज नाही. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं. जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येत. पण जो अभिमानी,गर्विष्ठ आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळेच समजावून सांगू शकते. संयम ठेवणे ही कमजोरी नसते. ही ती ताकद आहे जी प्रत्येकात नसते. मदत करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. परिस्थिती किती पण वाईट असू दे पण माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे. स्वतःच्या नजरेत चांगले रहा. लोकांचं काय? ते तर देवाला पण नाव ठेवतात. आनंदाचा सर्वात मोठा भाग आपल्या स्वभावावर अवलंबून असतो, आपल्या परिस्थितीवर नाही. कारण रडणारा मोठ्या बंगल्यातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो. रावण ब्राह्मण असून देखील राक्षस समजला गेला आणि शबरी दलित असून देखील देवी. तुमची जात फक्त जन्मापेक्षा तुमच्या कर्मांवर अवलंबून असते. माणसाने स्वतःला कितीही मोठ समजाव पण समोरच्याला कधीच कमी समजू नये. शर्यतीमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतच नसतं. त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या आकांताने पळत असतो. जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढे अडचणी आणि यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी टेन्शन ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही. तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही अजून शिल्लक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर आपला मुद्दा मांडायचा असतो त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा या व्यक्तीची बौद्धिक वैचारिक पातळी खरच एवढी आहे का की माझ्या दृष्टिकोन ती व्यक्ती समजू शकेल? जर उत्तर नाही असेल तर त्याच्या समोर कितीही डोकं आपटलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नसतो. अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केले नव्हते तरी कर्ण अर्जुनाचा शत्रू बनला. तसेच कधी कधी तुमचा काही दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे, आणि सत्य बोलण्यामुळे लोक तुमचे शत्रू बनतात. तो त्यांचा दोष असतो. देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता? यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता? यावर बरेच गोष्टी अवलंबून असतात. आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात. ज्याला दुसऱ्याला किंमत देता येत नाही त्यांनी स्वतःला किंमत मिळेल याची अपेक्षा ठेवू नये. चक्रव्यू तयार करणारे आपलेच असतात हे काल पण सत्य होते आणि आज पण सत्य आहे. फक्त श्रीकृष्णासारखा मित्र सोबत घ्या विजय निश्चित तुमचाच होईल. आपलं मन नेहमी हळव असाव पण दुबळ नसावं कारण हाळव्या मनास भावना कळतात तर दुबळ्या मनाला नेहमी वेदना छळतात. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. पंगत चुकली की एक वेळचे जेवण चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसाबरोबर असण गरजेचं असतं. आपण प्रत्येकाला प्रामाणिकपणे साथ द्यायची. मग त्यांनी साथ द्यायची की घात करायचा? त्याचं त्याने ठरवावे.
8. समोरच्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळी कारण तयार असेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला तुमची किंमत राहिली नाही. आयुष्यातले काही दिवस अगदी स्वतःसाठीच जगाव. विचार करून दिवस घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस कदाचित खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. वेदना दिसत नाहीत तरी काही वेदना रडवून जातात. आठवणी कधीच थांबत नाहीत तरी कोणाच्यात तरी जीव गुंतवून जातात. मन हे लवकर समजून येत नाही तरी कोणाची तरी जाणीव करून देते आणि हृदय हे कधीच दिसत नाही तरी काही लोक त्यामध्ये घर करून जातात. पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. जेव्हा आपण कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक गोष्ट नक्की समजते. एक आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक अनुभव. स्वप्नपूर्तीसाठी इतके कष्ट करा की एक दिवस तुम्हाला भेटणं हे इतरांचं स्वप्न असले पाहिजे. ज्या गोष्टींचं तुमच्या समोर आव्हान असतं त्याच गोष्टी तुमच आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलून टाकतात. आशीर्वाद वाया जात नाहीत फक्त योग्य वेळ आल्यावर मान्य होतात. आवडत्या व्यक्तीसोबत राहिल्यावर सुद्धा ताकद वाढते आणि नवीन चांगले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा एकटा असतो आणि त्याला बाद करायला अकरा जण टपून असतात. तसेच समाजामध्ये सुद्धा चांगलं काम करणारा एकटा असतो पण त्याला बदनाम करणारे लाखो असतात. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. स्वतःचं मन मारून कष्ट करणारे शरीर आणि काळजी करणारं मन म्हणजे बाप. मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडत नाही. वापरायचं किती? ते आपल्यालाच ठरवावे लागतं. आयुष्याची चवही ज्याची त्याने सांभाळायची असते. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मने जिंकावी लागतात. भावना कळायला मन लागतं. वेदना कळायला जाणीव लागते. देव करायला श्रद्धा लागते आणि माणूस करायला माणुसकी लागते. चांगलं करायला सुंदर विचार लागतात तर भरपूर जगाला पैसा नाही आयुष्य लागतं. फायदा घेणारे घेत राहतील, आपण तत्व बदलायचे ना निष्ठा. ठेवायचा फक्त तो संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्यांनी काय गमावले? संपत्ती गोळा करताना हा विचार आवश्यक करावा की आपल्या मुलांना आयतं काही देण्यापेक्षा त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवून समाज आणि देशाच्या कार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील. यामुळे देश, समाज आणि आपल्या मुलांचाही विकास होईल. जे तुम्हाला विसरले, तुम्ही त्यांना विसरा. बोलताना पण असे स्पष्ट बोला की समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. मन आणि स्वभाव निर्मळ व स्वच्छ असेल तर परमेश्वर त्या व्यक्तीला कोणाच्या नजरेमध्ये किंवा पायावर झुकायची वेळ येऊ देत नाही. माणूस जेवढा आजाराने थकत नाही तेवढा तो मानसिक ताणतणावाने थकतो. गोष्टी बुद्धीच्या बाहेर गेल्या की परमेश्वराची जाणीव होते. देव आपणाला काहीतरी देईल म्हणून मंदिरात कधी जाऊ नये. तर देवाने आपणाला बरंच काही दिलं आहे याची जाणीव ठेवून मंदिरात प्रवेश करावा. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते इतरांना हरवण्यासाठी नाही. माणसाने श्रीमंतीचे कौतुक जरूर करावे पण साधेपणाला दारिद्र कधी समजू नये. सगळ्यांची मन जपण्याचा करार घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाच आपणच विसर्जन करणे. सिंहासारख्या मित्रांसोबत नेहमी रहा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला योग्य व्यक्तींबरोबर भेटवतो ज्यांच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जात असता. शांतता नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. राजकारणात भाग न घेण्याचा तुमचा निर्णय महागात पडू शकतो. याचे कारण तसे केल्यास तुमच्यापेक्षा कमी क्षमता असलेले लोक तुमच्यावर राज्य करतील. मनातली माणसं आणि पायातले बूट इजा करत असतील तर समजून घ्या की ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला एक मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलट बोलत नाही याचा अर्थ ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नसतो. कधी स्वभाव; कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक हा आडवा येत असतो. मृत्यू अटळ आहे पण आयुष्यात असं काही कर्म करून जावा की गेल्यानंतर जेव्हा आपला विषय निघेल तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असेल. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. आपले विचार सरळ असले की मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही.
9. कुठलंही काम तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढेच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च मर्यादित ठेवा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्व वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या अशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको, आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांना माहिती असतं. तरीही आपण जीवाचा आकांत करून धाव धाव धावतच असतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
10. प्रतिष्ठा मिळवायला खूप वर्ष लागतात आणि ती गमवायला फक्त पाच मिनिटे. जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने कराल हे निश्चितच आहे. हजार माणसं भेटण्यापेक्षा माणुसकी जिवंत असलेला एक व्यक्ती भेटणं खूप महत्त्वाचं असतं. प्रामाणिकपणा आणि घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. त्याचे फळ उशिरा का होईना पण नक्की भेटते. आजच्या पिढीचे एक सत्य असे आहे की व्यवसाय सुरू करायचा म्हटले तर माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर येते. 50 हजाराचा आयफोन मोबाइल घ्यायचा म्हटलं तर मी नक्कीच घेणार. नवीन काही कौशल्य शिकायची म्हटले तर माझ्याकडे वेळ नाही आणि नवीन वेब सिरीज आलेली आहे तर चला लगेच बघू अशी उत्तरे येतात. आजच योग्य निर्णय घ्या कारण आजचा निर्णय उद्याचे भविष्य घडवत असतो. आवश्यकतेपेक्षा जास्त कधी परमेश्वराकडे मागू नये आणि आवश्यकतेपेक्षा कमी परमेश्वर कधीच देत नाही. 70 हजार पगार असलेला सरकारी अधिकारी जेव्हा महिन्याला सात हजार रुपये कमावणाऱ्या मजुराकडून लाच मागतो तेव्हा माणुसकीचा अंत्यविधी होतो. दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग आल्यानंतर सुद्धा काही वेळ शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं,यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा.
11. काही चुकांची शिक्षा मृत्यूपेक्षाही भयंकर असते. कोणतेही पाणी सर्व पिकाला सारखेच असली तरी कारलं कडू, ऊस गोड आणि चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बिजाचा आहे. त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे पण दोष फक्त कर्माचा असतो. हातातले गेले तरी नशिबातले कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःच अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. नात्यांची गरज असावी पण गरजेपुरते नाते नसावे. प्रेम करा पण प्रेमाचं नाटक करू नका. कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लागते. दुसऱ्याची चुकी असताना स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे राग. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री केल्यामुळे अनुभव न घेताही आयुष्यात खूप काही शिकायला मिळते. प्रत्येक लढाई ही फक्त जय-पराजयासाठी लढली जात नाही. काही ठिकाणी प्रश्न अस्तित्वाचा असतो. आयुष्यात कोणतीच वेळ गेलेली नसते. जिथून तुम्ही सुरुवात करता तिथून तुमची चांगली वेळ चालू होते. जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास असतो तो इतरांना आपल्या विषयी काय वाटतं? याने काहीच फरक पडत नाही. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात. एकदा का तहान लागली की पाण्याची चव आणि काही माणसांची नियत दोन्ही आपोआप बदलते. मैत्री मजबूत असेल तर जरी समाजाने तुम्हाला मुळापासून कापून टाकले तरी मित्र खाली पडू देणार नाहीत. आयुष्य नेहमी आनंदात जगले पाहिजे कारण ते किती शिल्लक आहे? हे कोणालाच माहीत नसते. माणूस बोलण्यात नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो. मी आहे ना हे आधाराचे शब्द मनाला संजीवनी देतात. ज्या व्यक्तीने दरवाजा पाहून अतिथीचे स्वागत केले, घड्याळ पाहून काळाची पाऊले ओळखली, खिडकी बघून दूरदृष्टी आणि जगाचे भान ठेवले, छप्पर पाहून उच्च विचार आणि आकांक्षा ठेवल्या आणि आणि जमीन पाहून पावले मात्र जमिनीवरच ठेवली तो कधीच मागे राहत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलेला कधीच नाव ठेवू नका. कारण आज भाकर आहे, तिनेच काल पोट भरलं होतं आणि आज चप्पल तुटकी आहे, तिनेच काल आधार दिला होता. आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं? ते शिकवतात. म्हणून माणसांचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत किंवा जाणारे. जे जे ज्यावेळी करायचे ते ते त्यावेळी करायचे. कारण आयुष्यात पैसा, मैत्री,नाव, प्रसिद्धी, नोकरी, माया, प्रेम सगळं काही परत मिळवता येतं. मात्र एक गोष्ट परत कधीच मिळवता येत नाही ती म्हणजे गेलेली वेळ. व्यसन करायचे असेल तर चांगल्या मार्गाने,कष्टाने आणि प्रामाणिकपणाने पैसे मिळवण्यासाठी करा. जर सवयच लागून गेली तर गरीब नाही, करोडपती बनाल. आयुष्यात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअरविषयक ध्येय उराशी बाळगू नका. सारे आयुष्य सुंदर, समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष्य व ध्येय निश्चित करा. म्हणजे तुमचे आरोग्य, नातेसंबंध, मानसिक स्वास्थ्य सर्वच उत्तम राहील अशा दृष्टीने आयुष्याची बांधणी करा. तसे बनवण्याचा प्रयत्न करा,तरच आयुष्याला खरा अर्थ आहे ज्या दिवशी तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे आणि त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग? तुम्ही महाग चार चाकी गाडीचे ड्रायव्हिंग करत असताना तुमची पाठ दुखत असेल तर ड्रायव्हिंगची मजा येणार नाही. तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये गेला असताना जर मनात खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही. आयुष्य गांभीर्याने जगा पण अति गांभीर्याने जगू नका. आयुष्य हे काळजी करून जगण्यासाठी मुळीच नाही. मुळातच आपण या भूतलावावर कायम राहण्यासाठी आलेलो नाही. येथे तुमचे अस्तित्व काही काळासाठीच आहे याचे सतत भान ठेवा. मोबाईल फोन मधील प्रीपेड कार्ड सारखीच आपली मर्यादा येथे तात्पुरती आहे. काही परीक्षेतील पेपरमध्ये गुण कमी मिळाले तरी हरकत नाही. एखाद्या रोबोसारखे यंत्रवत काम करू नका. आयुष्य सहजतेने जागा, आनंदाने जगा, त्याची मजा लुटा. आजूबाजूच्या लोकांना आणि कुटुंबीयांनाही आनंद द्या. जोपर्यंत एक दुसऱ्याची मदत करत रहाल तोपर्यंत कोणीच खाली पडणार नाही.मग तो व्यवसाय असो, कुटुंब असो किंवा समाज असो. माणसाने आयुष्यात कुठून पण उतरावे फक्त नजरेतून उतरु नये कारण मोडलेल्या हाडांवर इलाज होतो पण मनावर नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्याच धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास एकट्याला करायचा आहे, तो क्षण तुमच्या आयुष्य बदलून टाकणारा असतो. आहे ते टिकवता आलं की, पाहिजे ते मिळवता येतं. आपण कसे आहोत? हे फक्त दोघांना माहिती असते एक आपण स्वतः आणि दुसरे परमात्मा. आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण आपला दुःखी चेहरा पाहिल्यावर "काय झालं ते आधी सांग?" असा हक्काने विचारणारा मित्र किंवा मैत्रीण जरूर असावी. वय किती होऊ दे पण शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं एकच असतं आणि ते म्हणजे मैत्रीचं. आपल्या आत्म्याचे नियंत्रण म्हणजे सगळ्या दुःखांचा अंत आहे. ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण. जर माणसं बदलू शकतात तर नशीब कोणती गोष्ट आहे? आपणाला जग कोणत्या नजरेने बघते हे आपण कधीच बघू नये. पण हे जग च्या परमेश्वराने निर्माण केले तो परमेश्वर आपल्याकडे चांगल्या नजरेने बघतोय. आज पर्यंत त्याने आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही हे अनुभवायला नक्कीच भेटेल. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधी एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलं. कारण मैत्री हे जगातील एकमेव असं नातं आहे जे रक्ताच नसलं तरी खात्रीच असतं. झाड तोडता तोडता त्याच झाडाखाली तो झोपला. झाडाचा मरणं समोर दिसत असूनही झाडाने आपला धर्म नाही सोडला. झाड त्याला म्हणाले की, तू काय करावं? हे मी सांगणार नाही. पण सावली देण्याचा धर्म मी सोडणार नाही. वेळ कधी पलटेल सांगता येत नाही. कारण ज्या दिवशी प्रभू श्रीराम यांना राज्य मिळणार होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी वनवास भेटला. दोघांपैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तर ज्यांची आपल्याला गरज आहे त्यांची निवड न करता ज्यांना आपली गरज आहे त्यांची निवड करावी. जर समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. स्वतःवर कधीच अहंकार ठेवू नका. कारण तुम्ही जसे आहात तसे कायमचेच राहणार नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची किंवा गमवायची गरज उरत नाही. ज्यावेळी तुम्हाला बघून समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी संपत्ती आपण गमावली आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं. कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेले चांगलं असतं. परमेश्वराने तयार केलेले हे जग आहे. यामध्ये अतिशय मौल्यवान असे खजाने आहेत आणि एक पण चौकीदार नाही. व्यवस्था अशी केली आहे की जगामध्ये दरवर्षी कोट्यावधी व्यक्ती येतात परंतु इथून एक तीळ सुद्धा सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. किती वेळा मागितले तरी सुखं उसण मिळत नाही आणि एखाद्या जागेवर बसून ध्येय कधीच गाठता येत नाही. आपल्या देवावर निसंकोच विश्वास आणि अपार कष्ट चालू ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही.
12. नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घ्यायची मानसिकता हवी. आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. ताकद आणि पैसा ही जीवनाची फळं आहेत. पण कुटुंब, नाती, प्रेम आणि मित्र ही जीवनाची मुळं आहेत. जी माणसे तुम्हाला अडचणीत जपतात त्या माणसाला तुम्ही अडचणीत जपा. त्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर जपेल. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे आहेत? हे सांगता येत नाही म्हणून आयुष्य हसत जागा. विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहिरीतील दगडांकडे नसते, तर त्या दगडांमध्ये ही कुठेतरी पाणी दिसतं का? हेच ते पाहत असतात. अगदी अशाच प्रकारे आयुष्यात येणारे लोकांचे निरीक्षण करतानाही त्यांच्यातील वाईट गोष्टी ऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा, नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा सापडतील. राग हा एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षण घेऊन जातो. संयम सुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची? हे आपणच ठरवायचे असते. जगणं खूप सोपं आहे फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत. हळूहळू वय निघून जातं,आयुष्य आठवणींचं पुस्तक बनून जातं. कधी कुणाची आठवण खूप सतावते तर कधी आठवणींच्या आधारे आयुष्य निघून जातं. काही वेळा माहिती होत नाही, आयुष्यात काय चालू आहे?पण जे काही चालू आहे त्याने अनुभव मात्र नक्कीच भेटतो. जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या जगण्याची लढाई रोजच लढत आहेत. ज्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात, त्या गोष्टींसाठी कित्येक लोकांना संघर्ष करावा लागतो. आपण छोट्या छोट्या समस्यांना घाबरून जातो. नको त्या गोष्टींचा टेन्शन घेऊन बसतो. आयुष्यातले बरेचसे क्षण खोट्या अभिमानात आणि कडवटपणात वाया घालवतो. जर वेळ मिळाला तर कधीतरी हॉस्पिटलमध्ये सहज जाऊन बघा की, कित्येक लोक आपल्या जीवन मरण्याची लढाई रोजच लढत असतात आणि आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या शुल्लक गोष्टींसाठी रडत बसतो. दरवाजावर शुभ-लाभ लिहून काहीही होणार नाही. विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो. एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण या दोन व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात. किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो. जळणाऱ्यांच्यावर आणि चिडवणाऱ्यांच्यावर कधीच लक्ष द्यायचे नाही. कारण जळणारे लाकडासारखे असतात आणि चिडवणारे माकडासारखे असतात. जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळ पुरते मर्यादित आहेत. ज्या व्यक्तीने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते. कारण आनंदाची किंमत त्याच्याएवढी कोणालाच ठाऊक नसते. शरीरातील मन बाजूला काढता येत नाही आणि मनातून शरीर बाजूला काढता येत नाही. दोघांची एकमेकांवर नियंत्रण असेल तर मानवी जीवनाचे कल्याण होत असते. कदाचित पुरुषांमध्ये एवढी हिंमत नाही की तो एका चरित्रहीन स्त्रीवर प्रेम करेल आणि तिला चांगल्या मार्गाला लावेल पण अशी कित्येक उदाहरण आहेत ज्यात चरित्रहीन पुरुषांवर स्त्रियांनी प्रेम केले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना साथ ही दिली आहे. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणे आणि अयोग्य व्यक्ती समोर मौन पाळणे नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते. वडील सोबत असतील तर समुद्राचे पाणी सुद्धा आपण पाठीमागे टाकू शकतो. वडिलांचे असणे धाडसाच्या बरोबरीचे आहे. जो कुठेही हारत नाही तो आपल्या मुलांसमोर हारतो. कोणी नसेल कोणाच म्हणून जगणं थांबत नाही, आणि कोणी असेल कोणाचा म्हणून मरण लांबत नाही. स्वाभिमान जिवंत असलेला माणूस केव्हाच दुसऱ्यावर अवलंबून नसतो. उतरत्या वयात ही मेहनत करून खातो. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त राहील,तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा. स्तुतीत लपलेलं खोटं आणि तिकीट लपलेलं सत्य ज्याला कळालं त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींची ओळख आपोआप समजते. माणूस एका क्षणात संपूर्ण डाव बदलू शकतो फक्त स्वतःचं हात कोणाकडे गहाण ठेवलेले नसावेत. आशा कधीच गमवू नका कारण तुम्हाला कधीच माहिती नसते की उद्या तुमच्यासाठी काय मिळणार आहे? नेहमी गुणवत्ता पूर्ण किंमत राखून जगा. जर दुसऱ्यांसाठी कायम उपलब्ध बनून राहिला तर जग तुमचा वापर करून घेईल आणि तुम्हाला असे फेकून देईल की तुम्ही स्वप्नातही कधी त्याचा विचार केला नसेल. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा, मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखे होईल. मनापासून दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरील सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात.पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतुट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. प्रेम अस द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचा भान नसावं आणि आयुष्य असं जगाव की मृत्यूने म्हणावं जग अजून मी येईन नंतर. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट विचार करून घेऊ नका. दुसऱ्यांचे विचार आपल्याला मान्य नाहीत याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी? हे आपला संयम आणि संस्कार ठरवतात. आपले दुःख मोजक्या एक टक्का माणसांजवळ व्यक्त करा. कारण 50 टक्के लोकांना त्याची परवा नसते आणि 49 टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसले तरी संकटाचा सामना करणे माणसाच्या हातात असतं. आयुष्य हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाच-खळगे पार करावे लागतीलच. तुमचं क्षेत्र कोणतेही असू द्या, तुमचा चांगला प्रभाव वाढू लागला की काही ठिकाणी बदनामी ही अटळ आहे. फक्त धैर्य ठेवून संयम राखून तुमचे कार्य करीत रहा. जगाने तुम्हाला संपवण्यासाठी कितीही उलाढाली केल्या तरी काहीही फरक पडत नाही. पराभव हा आयुष्याचा भाग आहे पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. गती हळू असली तरी चालेल पण प्रगतीकडे असली पाहिजे. आधार असला की आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळतं. कष्ट करणाऱ्यांची स्वप्न कधीच नष्ट होत नसतात पण स्वप्न अपूर्ण राहिली तरी चालतील, ती पूर्ण करण्यासाठी कधी चुकीच्या मार्गांनी जाऊ नका. गरिबांची कधीच चेष्टा करू नका कारण नशीब पलटायला आणि गरीब व्हायला वेळ लागत नाही. चूक नसतानाही जवळचे जेव्हा विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची अशी तयारी करा की आयुष्यात पुन्हा त्यांनी तुमचा कधीच नाद नाही केला पाहिजे. आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या. जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते पण परमेश्वराची नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की अति केलं तरी माती होत नाही. घर खूप सुंदर असल तरी खूप छान. पण त्या घरातील माणसे शांत आणि समजूतदार असतील तर घराचा गोकुळ होतं. आणि सगळ्यांचे एकमत असेल तर प्रत्येक वर्षी नवीन पाऊल पुढे पडतं. कारण पैसा असेल तर माणूस कोणताही निर्णय एका सेकंदात घेतो पण संस्कार मात्र लहानपणापासूनच करावे लागतात. जेव्हा माणसं समजून घेणं कठीण असतं तेव्हा परिस्थिती समजून घ्यावी. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते. मन निर्मळ व स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणारा कोणीही असला तरी वाचवणारा परमेश्वर असतो. आयुष्याचा जोडीदार गरीब असला तरी चालेल पण तो तुमची इज्जत करणारा असावा. कारण गरिबी सोबत जगता येतं पण वाईट व्यक्ती सोबत जीवन जगता येत नाही. एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. एक मित्रच असे आहेत की जे कसं काय चाललंय? ते विचारतात. नाहीतर मुलं वारसचा हक्क विचारतात आणि नाती पात्रता विचारतात. कधीच स्वतःला कमी समजायचं नाही आणि अहंकाराने फुलून पण जायचं नाही. नेहमी कष्टाने कमवायचे आणि रुबाबात जगायचं. वेळ जरी दिसत नसली तरी खूप काही दाखवते. आपलेपणा खूप जण दाखवतात पण आपलं कोण आहे? ते वेळच दाखवते. काही माणसं मेलेल्यांसाठी रडतात आणि जिवंत माणसाला रडवतात. दुःखाची झळ आणि वेदनांची झळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. ओळख मोठ्या लोकांची नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी असावी. आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसे बसमध्ये व इतर कोणत्याही प्रवासातसुद्धा भेटतात. माणसाने कितीही प्रयत्न केला तरी वृद्धावस्थेत शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देऊ शकत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसचं . जिथे आपणाला ठेच लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला. जगात येताना आपल्याकडे देह असते पण नाव नसते. जग सोडून जाताना मात्र नाव असतं पण देह नसतो मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य. जर समोरच्याने ठरवलेलच आहे की तुमचे नुकसान करायचे आणि तुम्हाला संपवून टाकायचे तर मग तुम्ही सुद्धा साम-दाम-दंड-भेद या सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे. आयुष्यात दोन मित्र असे जोडा की पहिला परमेश्वर श्रीकृष्ण सारखे जे लढणार नाहीत तरीसुद्धा विजय तुमचाच असेल दुसरा मित्र कर्णासारखा ज्याला माहित आहे की तुमची हार निश्चित आहे परंतु तुमची साथ सोडणार नाही. उधार आणि आधार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. नारळ आणि माणूस दिसताना किती चांगले असले तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय समजत नाही. नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच. आणि ज्या क्षणी आपण त्याला प्रमाणापेक्षा जास्त व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करतो त्यावेळी त्याचा पराभव निश्चित होतो. एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका, एन्जिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. चुकीच्या थाटात कधीच राहू नये कारण वेळ कधी कानफाटात मारेल सांगता येत नाही. आयुष्य एकदाच असते. त्यात दुसऱ्याचा नोकर होण्यापेक्षा स्वतःच्या दुनियेचे मालक होण्याचा प्रयत्न केला तरी काही हरकत नाही.
13. हजारो लोक येऊन तुमचे कान भरून जातील पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो. ज्या नात्यात तुलना केली जाते त्या नात्यांमध्ये दुरावा निश्चित. तलाव हा विहिरीपेक्षा शेकडोपट मोठा असून लोक विहिरीचीच पाणी पितात. कारण विहीर खोल असून पाणी शुद्ध असते. त्याचप्रमाणे माणूस मोठा असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या व्यक्तिमत्वात सखोलता आणि विचारात शुद्धता असेल तरच तो महान ठरतो. दोन अक्षरांचे "लक", अडीच अक्षरांचे "भाग्य", तीन अक्षरांचे "नशीब" उघडण्यासाठी चार अक्षरांची "मेहनत" उपयोगाला येत असते. पण एक अक्षराचा "मी" पणा माणसाचे आयुष्य नष्ट करतो. एक श्रीमंत बाई साड्यांचे दुकानात जाते. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते मला एक स्वस्तातली साडी द्या. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे. बाई साडी घेऊन निघून जाते थोड्यावेळाने दुकानात एक गरीब बाई येते. ती दुकानदाराला म्हणते, मला एक एकदम भारी साडी द्या. मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे तिच्या मुलाच्या लग्नात. यावरून खरा श्रीमंत कोण? भावना तिथेच व्यक्त करा जिथे त्यांचा आदर केला जाईल. नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रू सुद्धा काही लोकांना फक्त पाणी वाटतं. कुठल्याही क्षेत्रात आपलं काम प्रामाणिकपणे करत नसाल तर तोही एक भ्रष्टाचारच. परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात रहा, आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. एखाद्याच्या संगतीत आपल्या मनाला काही वेळ शांती मिळाली, आपला मी पण थोडा तरी कमी झाला, मन निर्मळ झाले निदान निर्मळ राहावे असे वाटू लागले तर तो संत पुरुष आहे असे समजावे. म्हातारपणी आधार होईल असं स्वप्न उराशी बाळगून लहानाचं मोठं केलेलं पोर बाहेर देशात नोकरी करतंय आणि दवाखान्याची पायरी चढायला शेजारचं पोर हात धरतय. जिथं मन हलकं करता येतं त्या इतकं सुंदर नातं कुठलच नाही. जगणं कोणाचच सोप नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांच चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः विषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील. मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावे. कारण गरज कधी ना कधी संपते पण सवय सुटत नाही. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमल तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. जर समजावून लोक समजली असती तर परमेश्वर श्रीकृष्णाने महाभारत होऊ दिलं नसतं. रोज सकाळी उगवणारा सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही. सकाळ झाली की तो संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, झोपलेल्यांना जागे करतो आणि सांगत असतो की दिवस कष्ट करण्यासाठी आहे, झोपण्यासाठी नाही. त्यामुळे माझ्याबरोबर चालत रहा. आयुष्यामध्ये ज्याला यशस्वी व्हायचा असेल अशा व्यक्तीने कधी कुणासाठी थांबू नये. उगवत्या सूर्याप्रमाणे रोज प्रामाणिकपणे कष्ट करत रहावे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमान सोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. लक्षात ठेवा कष्टाला पर्याय नाही हे जितक्या लवकर माणूस स्विकारतो तितक्या लवकर तो त्याच्या सुखी आयुष्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे विचार करण्यात दिवस वाया घालण्यापेक्षा प्रयत्न करून वेळ सार्थकी लावा. विचार करून माणूस मनातून थकतो, परंतु प्रयत्न करून तो प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे. कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी,वागण्यात लाचारी, बोलण्यात लबाडी जी माणसं करतात अशा माणसांपासून चार हात लांब राहा. त्यांच्यापासून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. घमंड म्हणून नाही तर जीवनात कधी कधी आत्मसन्मानासाठी काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. कष्ट करण्याच्या वयामध्ये जर तुम्ही आराम करत बसला तर आराम करण्याच्या वयामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील. खोटी शपथ घेतल्याने माणूस मरतो का नाही? हे माहिती नाही पण विश्वास मात्र नक्की मरतो. आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. उध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे आणि जिंकलो तरी स्वतःच्या दमावर. पोटापाण्यापुरता स्वार्थ जरूर असावा मात्र कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल एवढेही माणसाने स्वार्थी नसावं. गर्दीत हरवण्यापेक्षा एकांतात हरवलेलं बरं असतं. कोणी आपला शोध घ्यावा अथवा न घ्यावा परंतु आपला भगवंत आपल्याला शोधून एकटं सोडत नसतो. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. माणसांनी साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका. स्वप्न तुमची आहेत, प्रयत्नही तुम्हालाच करावे लागतील. पराभवाची भीती अजिबात बाळगू नये. कारण एक मोठा विजय मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. कमळ हे फुल सांडपाण्यातून जन्म घेते. मात्र हेच सांडपाणी कधीच कमळाच्या स्वच्छतेला आणि सुंदरतेला स्पर्श करत नसतं. तसेच तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. वर्तमान कितीही बिकट असो, कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते अगदी कमळाच्या फुलासारखं. थोडंसं का होईना, स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. अन्यथा जबाबदारी कधीच म्हणणार नाही थोडीशी विश्रांती घे, हे अति होतंय. योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने बोलायला शिका. कारण अन्याय हा नेहमी शांती व्यक्तिवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. शब्दाला दात नसतात पण शब्द जेव्हा अंतकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात. आणि शब्दांचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य संपून जातं, पण घाव भरत नाही. आयुष्यात काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. म्हणजे उद्याला कोणी म्हणायला नको की याला मी मोठे केलं आहे. चुका हा माणसाच्या आयुष्यातील भाग आहे परंतु त्या स्वीकार करण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये असते. समाधान असेल तरच पैसा सुख देतो नाहीतर कितीही कमावला तरी कमीच पडतो. आपण अशा समाजात राहतो जिथे सौंदर्यतेला रंगावरून बघितले जाते. शिक्षणाला मिळालेल्या टक्केवारीवरून बघितले जाते आणि काही ठिकाणी सन्मान पैशाच्या परिस्थितीवरून दिला जातो.
14. आपल्या संततीला असे संस्कार द्या की तो किंवा ती स्वतःचा देव, देश, धर्मप्राप्तीसाठी कोणतेही चांगले कार्य करेल. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. त्याचप्रमाणे आपण डोक्यात सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सहनशक्तीचा कधीच अंत पाहू नये. कारण जर त्याने सहनशक्ती सोडली तर त्याच्या एवढा विनाश कोणीच करू शकत नाही. अशी नाती जोडण्यात काहीच अर्थ नसतो जिथे आपल्याकडे पर्याय म्हणून पाहिलं जातं. सुंदर असणं गरजेचं नाही तर आपण कोणासाठी गरजेचं असणं खूप सुंदर आहे. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला दिली की आपण उघडे पडतो. टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगत राहायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्यातरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नसतो. आज काल लोकं देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही-आम्ही कोण? आयुष्यात कधी कधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की त्यानंतर कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटत नाही. कोणाला वाईट वाटू नये असे मन ठेवा. कुणाला दुःख होऊ नये असे हृदय ठेवा आणि नाते असे जपा की त्याचा अंत होणार नाही. कोणतीही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनून जगामध्ये येत नाही. आपला व्यवहार आणि शब्दच लोकांना मित्र किंवा शत्रू बनवतात. तुमच्या हसण्या मागचं दुःख, तुमच्या रागामागचं प्रेम, तुमच्या शांतते मागील कारण हे ज्या लोकांना न सांगता समजते त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तरी चालेल. कारण ज्यांना आपला श्वास कळतो त्यांना शब्दाची गरज नसते. संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो हा विचार आपण रोज करतो. परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल हा देखील विचार आपण रोज केला पाहिजे. निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे एकदा का तोल चुकला तर आयुष्य चुकायला वेळ लागत नाही. म्हणून वेळ हातातून जाण्यापूर्वी घेतलेला योग्य निर्णय कधीही चांगला असतो. आई-वडिलांची जेवढी गरज आपल्याला लहानपणी असते त्यांना पण आपली तेवढीच गरज त्यांच्या म्हातारपणी असते. चार पैसे कमी कमवले तरी हरकत नाही पण माणुसकी आणि माणसं भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या सरत्या शेवटी माणूस माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. नातं असो किंवा मैत्री त्यामधली भावना चांगली असली की आपोआप जपल जातं. लवकर राग येणारी आणि शांत होणारी माणसे मनाने खूप चांगली असतात. कारण त्यांना आपल्या भावना लपवता येत नाहीत. जे काय असेल ते तोंडावर बोलतात. ज्यांनी आपल्या आई-वडिलांमध्ये देव पाहिला त्यांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याची किंवा कोणत्याही देवाची पूजा करण्याची गरज नसते. कारण जिवंत देवाचे दर्शन त्यांना न मागता मिळालेलं असते. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा कोणतीही साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते. आनंदी राहण्याचा एक सरळ साधा उपाय आहे तो म्हणजे कोणतीही अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नको. कारण अपेक्षाभंगाचे दुःख फार वाईट असतं. चुका ह्या माणसाच्या जीवनातील एक भाग आहे. परंतु त्या स्वीकार करण्याचे धाडस तुमच्यात असायला हवे. कोणतीही संधी कधीच चुकवू नका. कारण ज्या संधी आपण चुकवल्या आहेत, शेवटी फक्त त्याबद्दल पश्चातापच होतो. जगण्यात थोडा वेडेपणा असावा, कारण जास्त समजूतदारपणा सुद्धा आनंद हिरावून घेऊ शकतो. कधी कधी मोठ्यांनी छोट्यापणा आणि छोट्यानी मोठेपणा दाखवला तर नात्यांमध्ये आदर टिकून राहतो. जन्माला आल्यावर नाळ कापताना दुखत नाही आणि मेल्यावर लाकडावर जळताना दुखत नाही. देवाने एवढी काळजी घेऊनही आयुष्य जगताना काही लोक देवावरच खापर का फोडतात? हे समजून येत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः मनातून आनंदी नाही तोपर्यंत इतर सर्व गोष्टींची किंमत शून्य असते. एका यशस्वी माणसाच्या पाठीमागे स्त्री नसून एका वडिलांचे पूर्ण आयुष्य असते. रुबाब नेहमी असा ठेवा की तुम्हाला बघून समोरच्याची जळाली नाही तर करपलीच पाहिजे. कोणीही एका दिवसात यशस्वी होत नसते म्हणून संयम महत्त्वाचा असतो. कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांना दिसते. माणुस किती आपला व किती आतला योग्य वेळ आल्यावर कळते. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे आपले विचार. कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे. प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतच असं नाही. परंतु कधीकधी सहन करून शांत राहायला सुद्धा खूप सामर्थ्य लागतं. आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा मोठा विचार करा. कारण जर मोठा विचार केला नाही तर मोठे कसे काय करणार?
15. लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नियतीसमोर हातभार झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात. दारू पिणारा फक्त दारू पीत नाही तर तो आईचा आनंद, पत्नीची मनस्थिती, मुलांचे स्वप्न आणि वडिलांची प्रतिष्ठा एका घोटात संपवतो. व्यसन करायचं असेल तर कष्टाचं करा, रोग झालाच तर यशाचा होईल. जर पाडनारे आपले असतील तर सांभाळायला वेळ हा लागतोच. माणूस कपड्याने मळकट असला तरी चालतो. पण माणुसकीत बळकट असावा आणि विचारांनी हलकट व घाणेरडा नसावा. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. आपलं वर्चस्व नसलं तरी चालेल पण अस्तित्व नक्कीच असलं पाहिजे. फक्त शरीरावर प्रेम करणारे एकमेकांचे जास्तीत जास्त वाट पाहत नसतात. एकमेकांच्या मनावर प्रेम करणारे, एकमेकांची काळजी करणारे संपूर्ण आयुष्यभर वाट पाहायला तयार असतात. मनात उतरणे आणि मनातून उतरणे यामध्ये खूप फरक आहे. एखाद्याच्या मनामध्ये उतरण्यासाठी त्याला शक्य होईल तेवढं समजून घेऊन सांभाळायचे असते. एकमेकांना विश्वासात घेऊन कठीण परिस्थितीत साथ द्यायची असते. जेव्हा विश्वासघात होतो, चुकीचे काहीतरी घडते तेव्हा व्यक्ती मनातून उतरते. एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरी ती पहिल्यासारखी मनात जागा कधीच मिळवू शकत नाही. माझे चांगले व्हावे ही अपेक्षा नक्की असावी पण दुसऱ्याचं लबाडून खाणारी नियत नसावी. गेलेला काळ दु:खात गेला तरीही येणारा काळा सुखाचा असणार या आशेवर आयुष्य जगणं म्हणजे आयुष्य होय. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. तर भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळालं आहे त्यालाच ते चांगलं बनवतात. कारण मनासारखं घडायला भाग्य लागतं. पण जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान आणि शहाणपण लागतं. माणसाची खरे रुप ओळखायचे असेल तर गरज नसताना फक्त काही रक्कम त्या व्यक्तीकडे उधार मागून पहा. जर त्या व्यक्तीने मनात कोणतीही शंका, संशय न घेता तुम्ही मागितल्याबरोबर रक्कम हातात दिली तर त्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि जर नाही दिली तर त्याचे खरे रूप तुम्हाला लगेच समजेल. आईचा सांभाळणारा हात आणि बापाचा कमावणारा हात ज्याला समजतो तो आपोआप चांगल्या कर्माकडे वळतो. पैसे कमवायला हुशारी असावी लागते. पण सन्मार्गाने पैसे कमवायला हुशारीबरोबर चांगली नियतीही असावी लागते. पैसे खर्च करायला सुद्धा हुशारी असावी लागते. पण पैशाची बचत करायला आपल्या मुलाबाळांच्यावर खरं प्रेम असावं लागतं. पैसे किती कमावले? यापेक्षा ते कसे कमावले? हे महत्त्वाचे असते. कारण त्यापासून समाधान मिळणार की दुःख आणि चिंता मिळणार हे अवलंबून असते. जगामध्ये फक्त दोनच खरे ज्योतिषी असतात. एक मनाला सांभाळून घेणारी आई आणि दुसरा भविष्याला समजावून घेणारा बाप. कष्ट केले तर धन मिळेल, संयम राखला तर काम होईल. चांगली वाणी असेल तर ओळख होईल आणि आदर केला तर नाव होईल. मोठ्याने बोललं म्हणून तुमची बाजू सत्य आहे हे सिद्ध होत नाही. हळू आवाजात पण मुद्देशीर बोललं की सत्य बरोबर टोचत. आयुष्यात फक्त पैसा आणि काम हे ध्येय नसावे हे लक्षात ठेवा. आपण आपल्यासाठी तसेच कुटुंब, आरोग्य, लोकांच्या भेटीगाठी यासाठी पुरेसा वेळ काढलाच पाहिजे. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकण दोन्हीही व्यर्थ आहे. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात करावं. त्यामुळे नातं जास्त टिकतं. नाती प्रेम आणि संपत्ती वेळ जाण्यापूर्वी जपा. तसे नाही केले तर तुम्ही संपून जाल. प्रत्येकवेळी वेळ चुकीची नसते. काही वेळा कुठेतरी आपण सुद्धा चुकलेलो असतो. बेधुंद जगणाऱ्याला आयुष्याबद्दल कसल्याही तक्रारी नसतात. नात्यांसोबत आनंदाने जगण्यासाठी नाती जपता आली पाहिजेत. कारण झाडाचं पान आणि माणसाचं मन एकदा तुटलं की परत जोडता येत नाही. कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुलेच वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध दरवळत राहतो. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच दिसत नाही आणि दुसऱ्यांनी सांगितलेले चांगले विचारही कळत नाहीत. लोखंडाला लागलेला गंज जसे लोखंडाला संपवितो तसेच माणसांमधील घमेंड माणसाला संपवते. आयुष्यात चार वेदांचा अर्थ माहित नसला तरी चालेल पण समजूतदारपणा, जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि दुनियादारी या चार शब्दांचे अर्थ समजले तरी जीवनाचे सार्थक होते. चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते. एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगण्याची सवय असते. संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. आज तुमच्याजवळ काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत तेच खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होतात. जर तुम्ही चुकीचे असाल तर स्वतःला बदला. मग त्यामध्ये कितीही वर्ष जाऊ दे किंवा लोकं बदलू देतं,काही फरक पडत नाही. परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं? आणि वागायचं कसं? हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणीच सांगू आणि शिकवू शकत नाही. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळत असते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध नाही. रडणारा बंगल्यातही रडतो आणि हसणारा झोपडीतही असतो. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची सुवर्णसंधी.
16. एखाद्याने 22व्या वर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला पाच वर्षे लागली. एखादा पंचविसाव्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी वारला. एखादा वयाच्या पन्नासाव्या वर्षी मोठा उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 95 वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं आणि दुसऱ्याचे 40 व्या वर्षी झालं तर अजून एखादा अविवाहित आहे. बराक ओबामा पंचनव्या वर्षी रिटायर झाले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तराव्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या "टाईम झोन" मध्ये काम करत असतो. काही लोकं आपल्या किती पुढे गेलेत? असं वाटत राहतं तर काही लोकं आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरे सांगायचं झालं तर येथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट "टाईम झोनमध्ये" धावत असतो जिथे तुम्ही एकटेच पळताय. तुम्ही कुणाच्याच पुढे नाही आणि तुम्ही कुणाच्याच मागे नाही. संघर्ष अवश्य थकावतो पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. माणसाने सर्व खेळ खेळावे पण कधी कोणाच्या भावनांशी खेळू नये. कारण या खेळाचा शेवट काय होईल? हे कोणालाही माहिती नसतं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात. फक्त तुमच्यात सहनशीलता पाहिजे. निराश आणि हताश होणं मनाचा स्वभाव आहे आणि चांगल्या गोष्टींची दखल घेणे निसर्गाचा स्वभाव आहे. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंत:करणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. आई-वडील, वेळ, झोप, आशा, भूक, प्रेम, स्वप्न, विश्वास, सुख आणि चांगले मित्र या दहा गोष्टी आपण पैशांनी विकत घेऊ शकत नाही. काही माणसे स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतात आणि गरजानुसार नाती. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची प्रमाणापेक्षा घेतलेली काळजी सोडली की वर्तमान काळातला सुंदर आनंद हा मूल्यवान असतो त्याने आयुष्याचा यशस्वी प्रवास होतो. कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मागे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणा-या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबत ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कोणावाचून कोणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे येत असतात ते तुमची देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा हसतो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीच झोपत नाही यालाच आयुष्य म्हणतात. निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला लावलेला जीव म्हणजे प्रेम. त्याच्याकडून काही भेटेल हे न विचार करता त्याच्या एका स्मितहास्य साठी काहीही करणं म्हणजे प्रेम. काही गोष्टी समजून घेणे, काही समजावून सांगणं म्हणजे प्रेम. न लपवता सगळं काही एकमेकांना वाटणी करणे म्हणजे प्रेम. कितीही भांडण झाले तरी अहंकार बाजूला ठेवून स्वतः माफ करा म्हणणं म्हणजे प्रेम. दुसऱ्यांनी स्वीकारावं म्हणून स्वतःला कधीच बदलू नका. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करत बसण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. निवडलेला रस्ताच जर प्रामाणिकपणाचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कोणी असो किंवा नसो. जन्माला आलं म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा. मग बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखा असावं. पाहिले तर दिसत नाही पण नसलं तर जेवणच जात नाही. कोणाचे दुसऱ्याचे दुःख बघून जर तुम्हाला सुद्धा त्रास होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आत्म्यामध्ये परमात्मा विलीन आहे. समोरची व्यक्ती आपल्याला काय समजते? हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती जपत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. वेळेला केलेला एक रुपयाही लाख मोलाचा असतो आणि वेळ निघून गेल्यावर लाखभर जरी दिली तरी त्याची किंमत शून्य असते. म्हणून योग्य वेळी, योग्य माणसाला योग्य पद्धतीने शक्य होईल तेवढी मदत करा. सोबत किती होते? यापेक्षा सोबत कोण होते? यावर माणसाचा विजय निश्चित असतो. मतलबी माणसं जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आयुष्यातून आपोआप बाजूला होतात. जर कधी ओंजळभर सुख आईच्या पदरात टाकायची संधी मिळाली तर ती चुकू नका. कारण स्वतःच मन मारून ती आयुष्यभर तुमच्यासाठी जगत असते. सौंदर्य, श्रीमंतीचा गर्व आणि मी पणाचा अहंकार हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे तीन शत्रू आहेत.
17. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका. कारण बदनामीची भीती त्या लोकांनाच ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिम्मत नसते. जेव्हा संकट तुमच्या आयुष्यात मुसळधार पावसाप्रमाणे कोसळत असतं, तेव्हा परमेश्वर एखाद्या छत्रीप्रमाणे तुमच्या सोबत चालत असतो. फक्त आपला परमेश्वरावरती इतका ठाम विश्वास असला पाहिजे की, काही झालं तरी तो माझ्यासोबत आहे. जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्षांना झोपेतही कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल? माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचे काय, लोक तर देवात पण चुका काढतात. चुका त्यांच्या हातूनच होतात जे जबाबदारी घेऊन काम करतात. बिन कामाच्या लोकांचे आयुष्य तर दुसऱ्यांच्या चुका काढण्याचे संपून जाते. चुका शोधणे चुकीचे नाही पण सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला स्वतःच्या चुका लक्षात येतील त्यावेळी दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळ भेटणार नाही. जो ज्ञानी असतो, तो समजून घेतो. जो अज्ञानी असतो, त्याला समजावता येतं पण जो स्वतःचा शब्द खरं मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. पण त्याचे दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तुत्व जन्माला येतं आणि जेव्हा अहंकार रूपांतर गर्भात होतं तेव्हा फक्त विनाशाला निमंत्रण होतं. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते तशी वाईटही नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण तर काही दोष हे निसर्गतः आपोआप असतात. या सर्वांचे मिश्रण म्हणजे माणूस. योग्य ठिकाणीच तुमचं मूल्य योग्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. ज्यांना आपलं मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या. अशा व्यक्तीपासून दूर राहा ज्यांना आपली किंमत नाही. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेले मन हे माणसाला आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी महत्त्वाची आणि मोलाची असते. जिथे सर्व संपले याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. अडचणी मार्ग कसा काढायचा? ते शिकवतात. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटांवर आपल्या पंखाचे रंग देते. काही माणसे ही अशीच असतात. कोणी त्यांचे कितीही वाईट करायला बघितले तरी ते समोरच्या व्यक्तीच चांगलेच व्हावे या भावनेने जगतात. मेंदू कधी कधी काही गोष्टी आठवू शकत नाही पण हृदय काही गोष्टी कधीच विसरू शकत नाही. मग त्या गोष्टी चांगल्या असो किंवा वाईट. मरता केव्हाही येतं पण चांगलं जगता आलं पाहिजे. सुख उपभोगायला केव्हाही येतो, पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशान माणूस उंच जातो, पण पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. पाप काय कसही करता येतं, पण पुण्य कमावता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं पण जरा जपून सन्मान देऊन वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, पण ती सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. कधी कधी शहाण्याचं सोंग घेऊन वेडे सुद्धा होत आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचे मिश्रण करून समाधानी राहता आलं पाहिजे आणि भरभरून जगता आलं पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितले. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा आहे असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो.पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे. कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतात. सहन करणं हीच महिलांची खासियत आहे. जर स्त्रियांनी काही ठराविक गोष्टी सहन करायच्या सोडल्या तर अनेक संसार उध्वस्त होतील. जोपर्यंत तुमची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही शांत रहा. हिशोब ठेवत चला. कारण वेळ निघून गेली की काही लोक विचारतात की तू माझ्यासाठी काय केलेस? प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल नक्कीच घडेल. मग ती परिस्थिती असो किंवा मनस्थिती. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं समजलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याला न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एक जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ निघून जाते किंवा घाण निघून जाते. हवा आली की उष्णता निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. आयुष्यात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घेतलेलं कधीही चांगले. कारण पूर्ण जगाला कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलेच पाहिजे. तेव्हाच तर कळतं कोण हसतं? कोण दुर्लक्ष करतं? आणि कोण सावरायला येते? कधी कधी शांत राहणे खूप गरजेचे आहे. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकून ठेवू शकत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवत त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य म्हणतात. माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो. कारण काही वेळा तो आपला स्वभाव बदलायला तयार होत नाही.
18. जबाबदारी घ्यायला हिम्मत लागते. जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी उभे राहायला धाडस लागते आणि जबाबदारी टाळायला फक्त कारण लागते. विचार मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्यांचा चिखल तयार होतो. वेळ लागला तरी चालेल पण जे काही चांगले मनात आहे ते सत्यात उतरल्याशिवाय थांबायचे नाही. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. ज्या नात्यात आपल्या चुका माफ असतात त्याचं नाव फक्त मैत्री. एखाद्या चुकीच्या घटनेबाबत किंवा गैर वर्तवणूक बाबत जी व्यक्ती तुम्ही वारंवार सांगून सुद्धा तुम्हाला समजून घेऊ शकत नाही तेव्हा तुम्हीच समजून घ्या की त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व शून्य आहे किंवा काहीच नाही. परिस्थिती आयुष्याचा आरसा दाखवते आणि अनुभव त्याच आयुष्यात कसे बदल करावेत? हे शिकवतात. विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, कधी सापडली तर नक्की सांभाळून ठेवा. थोडा विश्वास वेळेवर पण ठेवावा. कारण वेळ भल्याभल्यांच्या चेहऱ्यावरील बनावट मुखवटा काढून टाकते. इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात. इंद्रधनुष्याचे रंग डोळ्यांनी पाहता येतात व माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री किंवा प्रेम म्हणतात. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जिथे माणसं आपली असतात तिथे नाती ना कोणाच्या सांगण्याने जुळतात, ना कुणाच्या बोलण्याने तुटतात. ओवता आल पाहिजे, विनता आपोआप येतं धागा असो व नातं. गेलेला काळ दुःखात गेला तरी येणारा काळ हा सुखाचाच असणार या आशेवर आयुष्य जगणं म्हणजे आयुष्य होय. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्ने असली पाहिजेत. आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात ज्याच्या सोबत माणूस स्वतःशीच आतल्या आत लढत असतो कोणाला काही न बोलता. मग ते घरचं टेन्शन असो, करिअरचं टेन्शन असो, जीवनसाथी सोबत असो किंवा दुसरं काहीही असो. आयुष्यात एक वेळ अशी येते की काहीच ठीक घडत नसते. लढायची ताकद संपलेली असते. मन तुटलेलं असतं, वेदना सहन करत असतो पण आपण चालत असतो. हे सर्व होत असताना काही लोक आपली ही अवस्था बघून आपली तुलना करतात. कधी कधी तर सहन करण्या पलीकडे होते आणि आपण स्वतःला संपवायचा विचार करायला लागतो. पण एक आपण विसरतो की, आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की कोणाचा आधार नसताना आपण ही गोष्ट इथपर्यंत सहन करून आलोय. जेव्हा आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ तेव्हा आपण असे एक व्यक्ती बनलेलो असो की, पुन्हा कधीच हातबल होणार नाही. कदाचित आपल्या आयुष्यातला हा सर्वात मोठा विजय असू शकतो. काही काळासाठी जगाला विसरून आपली पूर्ण ताकद एकवटून हा काळ पार करून जाणे बस. एक दिवस ही वाईट वेळ पण निघून जाईल. तुम्ही स्वतःला अजून मुक्त अवस्थेत अनुभवाल. साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये नाहीतर तुम्हाला मूर्खांचे गुलाम व्हावे लागेल. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. या जगात कोणताच व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. छोटी असते ती फक्त आपली मानसिकता. नातं कधीच संपत नाही. बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तरी मनात राहतं. पण काही वेळेला त्यांचे सुद्धा एक वय असतं. काही नाती मरेपर्यंत टिकतात तर काही नाती जिवंत असताना सुद्धा मरतात. मानवी नाते हे नैसर्गिकरित्या कधीच तुटत नाही. मनुष्यच त्याला संपवतो. कारण ते मरते एक तर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. त्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. प्रेम तर कोणी पण करू शकते पण वाट पाहणे आणि प्रामाणिक राहणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही. प्रेमामध्ये वाट तोच पाहू शकतो ज्याने शरीरावर नाही तर मनावर प्रेम केलेलं असतं. जर कोणी तुमची चूक तुमच्या तोंडावर तुम्हाला सांगण्याची धाडस करत असेल तर त्या व्यक्ती पेक्षा तुमचा दुसरा कोणीही चांगला मित्र असू शकत नाही. फक्त श्वास थांबला म्हणजे मेलो असे होत नाही. तर ती प्रत्येक व्यक्ती मेलेली आहे जी बरोबर ला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणू शकत नाही. जे प्रामाणिकपणे अपार कष्ट करतात त्यांना हातावर भाग्य शोधायची गरज लागत नाही. मनाने जिंकलेली आपली माणसे दिवसातून एकदा तरी आठवतात. चालून थकल्यावर समजतं की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराच प्रवास अवलंबून असतो. मग तो प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला आयुष्यात अडचणी नक्की येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा जास्त विचार करायचा नाही मग ती वस्तू असो किंवा चुकीची माणसे. निसर्गाने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच पर्याय ठेवले आहेत. एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. जगामध्ये प्रेम अजून जिवंत आहे कारण एकतर्फी प्रेम अजूनही प्रामाणिक आहे. एकमेकांना समजून घेणारे असले की शब्दांनी मन दुखवली गेली तरीही दुरावा निर्माण होऊ शकत नाही. तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथे तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. पाय ओढणाऱ्या खेकड्यांच्या जगात पडद्यामागचे कलाकार होऊन प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. जसे लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाहीत. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. जेव्हा आपण त्या ओलांडतो तेव्हा मात्र फक्त दुःख वाट्याला येते. निसर्ग कोणालाही दुःख देत नाही, आपल्या चुकीच्या सवयी आपल्याला दुःख देतात. जाऊ दे ह्या दोन शब्दात कितीही कठीण परिस्थिती हाताळनेची ताकद असते पण हे दोन शब्द म्हणण्याचे धाडस प्रत्येक व्यक्तीमध्ये असते असे अजिबात नाही. एकदा निर्णय पक्का झाला आणि मन खंबीर आणि भक्कम झालं की शरीराची सर्व यंत्रणा एकजुटीने कामाला लागते तुम्हाला तुमच्यात ह्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. कितीही चालले तरी पाय तक्रार करीत नाहीत. हात कितीही कष्ट केले तरी थांबत नाहीत. मेंदू सकारात्मक विचाराने तुम्हाला योग्य वाट आणि योग्य दिशेने घेऊन चालतो. डोळे नेहमी मार्गात येणाऱ्या अडचणीवर नजर ठेवून पहारा देतात. म्हणून आयुष्यात नेहमी मनाने खंबीर आणि भक्कम रहा. मग तुम्हाला आयुष्यात कोणीही अडवू शकणार नाही. स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे आपल्या माणसांसाठी जी आपल्या जीवाला जीव देतात त्यांच्यासाठी वेळ काढा. कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची. मिळालेल्या वेळेला चांगले बनवा. कारण चांगल्या वेळेची वाट पाहत बसाल तर कदाचित संपूर्ण आयुष्य कमी पडेल. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपले आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्रही सुनेची ठेव आहे. कन्या जावयाची ठेव आहे. आयुष्य हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल. आयुष्य मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. आयुष्यात सर्वात मोठा गुरु काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवू शकत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असला तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे? हे जर माहित नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंत:करणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याच हिसकावून खाणाऱ्याच पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. आज असलेला माणूस उद्या असेल का? माहित नाही. हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का? माहित नाही. अचानक जातं निघून कोणीतरी कायमचं. मग गेल्यानंतर रडत बसून स्वतःला त्रास देऊन काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच आहे त्याला जर जपलं तर आयुष्याला अर्थ आहे. आयुष्य जगताना सोबत ही खूप महत्त्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाणी फाटून जातात. याउलट चंदनाच्या शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासातून हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहण्याचा, वागणीचा परिणाम नकळत आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ किंवा दूषित होतात. विषय तिथेच सोडून द्यावा जिथून स्वतःला त्रास होणं सुरू होतं. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कोणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर इतक्यात कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या देशात नेमक्या त्याच व्यक्तीशी आपली ओळख का होते? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. जी नाते तयार होतात ती आपण जिवापाड जपावी. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसं. रक्ताच्या नात्यांना काही पर्याय नसतो. पण आपलेपणाच्या नात्यात तसे नसतं. मन जुळले की आपलेपणाच नातं तयार होतं. जे बंद खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. कागदावर एखादा शब्द लिहिला आणि पुन्हा त्या शब्दावर गिरवलं तर तो शब्द ठळक होतो. पुन्हा एकदा गिरवलं की अधिक ठळक होतं. पण वारंवार असे केल्याने तो शब्द गालिच्छ रूप धारण करतो आणि शेवटी कागद फाटतो. त्या फाटलेल्या कागदाकडे मग सगळेजण दुर्लक्ष करतात. दुःखातही असंच असतं. जास्त गिरवत बसलो की दुःख मनावर खोलवर रुजू जातं आणि शेवटी मन उध्वस्त करतं आणि आपल्या उध्वस्त झालेल्या मनाची गत त्यात फाटलेल्या कागदासारखी होते. दुर्लक्षित केलं जातं इतरांच्याकडून. म्हणून दुःख गिरवत न राहता आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी करत राहावा. जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतय हे महत्त्वाचं. कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी असलेली माणसं कमवावी लागतात. नापास होणे हा शिक्षणाचा अपमान नाही. परंतु क्लास वन ऑफिसर होऊन नापास मंत्र्यांना साहेब साहेब म्हणावे लागणं हा शिक्षणाचा शंभर टक्के अपमान आहे. स्त्रीचे प्रेम हे जगातील सर्वोच्च संपत्ती आहे तिला मिळवण्यासाठी तिच्या मनात उतरावं लागतं. आईमुळे जन्म मिळतो तर वडिलांमुळे अस्तित्व. आई नऊ महिने पोटात ठेवून पोसते तर वडील आयुष्य संपेपर्यंत पोसतात. हजारो काय लाखो वेदना सहन करून जन्म देते ती आई तर आयुष्यभर लाखो वेदना सहन करून भविष्य बनवतात ते वडील. जगभर प्रेम करते ती आई तर आभाळा एवढे प्रेम करतात ते वडील. आपण जगात जे पाहतो ते आपल्या मुलांनी पहावे म्हणून कडेवर घेते ती आई तर आपण जगात जे पाहिले नाही ते आपल्या मुलांनी पहावे म्हणून खांद्यावर घेतात ते वडील. प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही.
19. जिथे सत्य आहे, तिथे संघर्ष निश्चित आहे. कोण आपल्याशी कसं वागत हे आपल्या हातात नसतं. पण त्यांच्या वागण्याचा आपण आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा? हे आपल्या हातात असतं. जी गोष्ट पटत नाही ती त्याचवेळी योग्य पद्धतीने व शांत समजुतीने बोलून दाखवायची. त्यातूनही जर कोणाला वाईट वाटले तर वाटू द्या. कारण ज्यांना आपल्या आयुष्यात राहायचं आहे ते राहतील नाहीतर निघून जातील. असेही म्हणतात ना अर्ध्यावर सोडून जाणारी माणसं कधीच आपली नसतात. जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत. जेव्हा ठेच लागून सुद्धा आपण पडत नाही तेव्हा समजून घ्या की कोणाच्यातरी आशीर्वादाने आपणाला पडण्यापासून वाचवल आहे. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख विचार आणि कर्मांनीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये. कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. चांगल्या वागणुकीची आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते. मनाला फार मोकळ सोडायचे नाही आणि फार आखडून ठेवायचे नाही. कारण मन फार मोकळ सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आखडून ठेवले तर घमंडी आहे असे म्हणतात. म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. काही लोक स्टेटस मध्ये सुद्धा आपल्या मनातले आनंद आणि व्यथा वाटून घेतात तर काही लोक गीतेवर हात ठेवूनही खरे बोलत नाहीत. वाद शक्यतो टाळायला बघा. कारण त्यातून क्वचितच प्रश्न सुटतात पण नको ते प्रश्न निर्माण मात्र नक्की होतात. एक दगड कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच आहे. फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. एकीने रहा यश हे बरोबर आपल्या मागे येईल. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य पद्धतीने अचूक असे बोलायला शिका. जर असे नाही केले तर दुसऱ्याचे आयुष्यभर ऐकावे लागेल. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा जो श्रीमंताच्या बंगल्यात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखाच प्रकाश देतो. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचे नसून तो अंधारात प्रकाश किती देतो? हे महत्त्वाचं आहे. रावण जेव्हा मृत्यूशी झुंज देत होता तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना एक गोष्ट त्यांनी सांगितली होती की मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे. वयाने, बुद्धीने, ताकतीने, माझं कुटुंब सुद्धा तुझ्या कुटुंबापेक्षा मोठा आहे. हे एवढं सगळं असताना सुद्धा मी हरलो कारण तुझा भाऊ तुझ्याबरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता. याचाच अर्थ की आपण कौटुंबिक एकता ठेवली पाहिजे. कारण जेव्हा कुराडीच्या पाठीमागे झाडाचा एक भाग असतो तेव्हाच झाड तुटले जाते. म्हणजेच आपणच जर आपल्या माणसांपासून दूर गेलो तर कुटुंब तुटायला वेळ लागत नाही. यशस्वी होणे हे चांगल्या विचारांवर अवलंबून असते आणि चांगले विचार हे चांगल्या लोकांच्या संपर्कातून येतात. कोणताही नातं टिकवण्यासाठी मनापासून केले जाणारे प्रयत्न हे दिलेल्या वचनांपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. कारण फक्त आश्वासन देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. जग तुम्हाला विकायला बसलंय पण तुम्ही फक्त टिकायला शिका. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. चांगल्या गोष्टी घडत नसतात तर त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी, योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेली मदत आणि दिलेला शब्द तसेच उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात. जर कष्ट करायच्या वयामध्ये विश्रांती घेत राहिला तर विश्रांती घ्यायच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. अडचणी कितीही येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की वादळात दिवा लावण्याचे स्वप्न असावे, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. जीव लावल्यावर मुके प्राणी सुद्धा आपले होतात. फक्त काही माणसांना हा नियम लागू होत नाही. कारण काही स्वार्थी माणसं फक्त कामापुरतीच चांगले राहत असतात. नातेवाईकांपैकी जर एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर तो इतर सर्व नाती खराब करून टाकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा खराब विचाराच्या नातेवाईकांपासून दूर राहिलेले कधीही चांगलेच. संयम ठेवा, योजना गुप्त ठेवा. योग्य वेळ येऊ द्या आणि मगच जगासमोर स्वतःच अस्तित्व दाखवा. वडिलांच्या संपत्तीवर गर्व करण्यात काहीही अर्थ नसतो. कारण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा कष्टाने प्रामाणिकपणाने घाम गाळून संपत्ती तुमची असते तेव्हा अभिमान वडिलांना होतो. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे. कोणत्याही बाबतीत तुटून पडणे म्हणजे पूर्णपणे संपणे असे होत नाही तर पुन्हा त्यातून उभा राहणे ही सुद्धा आयुष्याची सुरुवात असू शकते. संयम बाळगा. कारण काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. जर निभावणारे कट्टर असतील तर मग विष घालणारे, ओकणारे किंवा आणखी काही करणारे तुमचे काही बिघडू शकत नाहीत. कधी आणल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर परमेश्वराचे आभार माना. कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केली आहे हे लक्षात ठेवा. लिहिलेलं त्या भावनेने वाचन ही पण कला असते. पण काहीजण फक्त शब्दच वाचतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणार कोणी असेल तर मार्ग नक्की सापडतो. मदतीची परतफेड करता आली नाही तरी चालेल पण मदत करणाऱ्याला कधीही विसरू नये. आई-वडिलांचं दिसणं नाही तर असणं महत्त्वाचं असतं. जर संगत करायचीच असेल तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्या माणसांची करा. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत आणि येऊ शकत नाहीत. पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट होतो. निर्मळ मनाने प्रेम व आनंद देणारी व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही देखील निसर्गाची देणगी असते. आयुष्यात कधी एकट्याने चालायची वेळ आली तर कधीही घाबरून जाऊ नका. कारण आपण येताना एकटेच आलो आणि जाताना पण एकटेच जाणार आहोत. बाकी सर्व मायेचा पसारा आहे. म्हणून फक्त आपले लक्ष नजरेसमोर ठेवून चालत राहायचं हेच खरं आयुष्य आहे. आयुष्यात दोन व्यक्तींपासून लांब राहावे एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ. कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलतो आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलबानुसार आठवण काढतो. नाते मनापासून पाहिजे शब्दांपासून नाही आणि नाराजी शब्दांपासून पाहिजे मनापासून नाही. रस्ता कितीही स्वच्छ असला तरी त्याच्यावर धूळ पडते आणि माणूस किती पण चांगला असला तरी नकळत त्याच्याकडून चूक होऊन जाते. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव जो दिसतही नाही आणि भेटतही नाही. पण मनापासून श्रद्धेने आणि ताकतीने हाक मारा धावून आल्याशिवाय राहत नाही. संसाराची कर्तव्य पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा उरलेलं आयुष्य निवांत काढायचं असतं. पण काहींच्या वाट्याला इतका संघर्ष असतो की तो आयुष्याच्या शेवटपर्यंत संपत नाही. जबाबदारीची जाणीव झाली की अंगातली मस्ती आपोआपच कमी होते. व्यापता न येणार अस्तित्व आणि मापात न बसणार प्रेम म्हणजे मातृत्व. माणूस जेव्हा गैरसमजातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या सोयीनुसार स्वतःच तयार करतो तेव्हा नात्यांची दोर कमजोर होत जाते. बऱ्याचदा दिवा तेलाच्या कमतरतेमुळे विझतो पण आपण अनेकदा दोष वाऱ्यालाच देतो. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन तेच लोक येतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते निर्लज्ज असतात. देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे. पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्यांनी समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. काही गोष्टी मिळायला उशीर झाला की आपण लगेच घाई घाईने नको तो मार्ग स्वीकारतो. कारण संयम कुठवर ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो. परमेश्वर कधीही कोणतेही गोष्टीला उशिर करत नाही आणि केलाच तर त्याला भरून काढल्याशिवाय राहत नाही फक्त आपला संयम हवा. खरी कसोटी विश्वासाची आहे. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते.काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारा वेळ काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थितंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजूत काढत तर कोणी हसून आपलं दुःख लपवत. कुणी नशिबाला दोष देत राहतं तर कोणी जो भी होगा देखा जायेगा म्हणत आपल्याच मस्तीत जगत. वेगवेगळे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती आणि त्या अनुषंगाने येणारे ताण-तणाव, आजार, दुखणी : खुपणी, कुणाचे कुणाला सोडून जाणं. आयुष्यातल्या प्रवासातले ही सारी स्थितंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगाचे दुःख येत. आयुष्य जगताना खरंतर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीच आपलं नाही. रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बस ही आपली नाही. बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केले की झालं. पाण्यात पडल्यामुळे कुणाचा मृत्यू होत नसतो.मृत्यू तेव्हाच होतो जेंव्हा पोहायला येत नाही. अगदी अशाच प्रकारे परिस्थिती कधीच अडचण असू शकत नाही. अडचण तेव्हा तयार होते जेव्हा परिस्थितीला विचारपूर्वक विचारपूर्वक सामोरे जाता येत नाही. रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. मनाला मनाने मनोमन मनवलं की मन ही मनाचं मानत. बडबड विनाकारण असू शकते पण शांततेला मात्र नेहमी कारण असतं. मैत्री मजबूत असली पाहिजे. कारण समाजाने किती पण खड्डा खोदला तर खरे मित्र त्यात तुम्हाला पडू देत नाहीत. आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका. कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचे प्रेम बदलू शकते पण आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. वाईट काय असतं एकदा कळाले चांगलं काय करावे याचा विचार करावा लागत नाही. आपोआप आपल्या हातून चांगलं होतं. नकळत आपल्यामुळे कोणीतरी दुखावले ही भावना स्वतःसाठी ही तितकीच दुखावणारी असते. प्रत्येक आठवड्यात असे दोन दिवस असतात त्याविषयी चिंता करायची गरज नसते. एक म्हणजे कालचा दिवस आणि दुसरा म्हणजे उद्याचा दिवस. जो काळ निघून गेला त्याला तुम्ही बदलू शकत नाही आणि उद्या काय होईल याचा नियंत्रण तुम्ही करू शकत नाही. म्हणून शक्य होईल तेवढं मजेत आणि निवांत राहण्याचा प्रयत्न करा. सहज वर आकाशात पाहिलं तर अर्धवट असूनही चंद्र किती सुंदर दिसत होता. ते पाहून जाणवलं पाहिजे की आयुष्यात सर्व काही मिळालं पाहिजे असं नाही. जे आहे त्यातही सुंदर आयुष्य जगता येतं. आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका. कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाहीत. सोबत कितीही लोक असू द्या, काही वेळा शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. सगळं जवळ असून मोगल हरत होते आणि काहीच जवळ नसताना मराठी जिंकत होते. याचं कारण म्हणजे मोगल लढत होते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठे लढत होते स्वराज्यासाठी. भूतकाळाला कवटाळून स्वतःच्या अस्तित्वाची राख रांगोळी करत बसण्यापेक्षा वर्तमानात जे मिळाले त्याची कदर करता आली पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात निस्वार्थ प्रेम करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. प्रेम नवस आवस करून मिळत नाही. त्यासाठी स्वतःला विसरून समोरच्या व्यक्तीमध्ये हरवून जावं लागतं. आजच्या कलियुगात निस्वार्थ प्रेम करणारी माणसं मिळणे म्हणजे दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. स्वतःला हरवून प्रेम करणं म्हणजेच खरं वेड. प्रत्येक जण स्वतःचे निष्कर्ष वापरून आयुष्याकडे बघतो म्हणून जगात एका वृत्तीची व्यक्ती एकच असते. वेळ आणि नशीब दोन्हीही परिवर्तनशील आहेत. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहेत. काळजी करू नका. करता आणि करविता वर बसला आहे. तो योग्य वेळी तुम्हाला पाहिजे ते देतोच. समजून घेणे नेमकं आपल्या वाटेला येतं कारण आपण समजूतदार असतो. जर कोणी तुमच्याकडून अपेक्षा करत असेल तर ते त्याचा नाईलाज नसून तुमच्याबरोबर असलेली ओढ आणि विश्वास आहे. जास्त पैसे असणे म्हणजे श्रीमंत होणे नव्हे तर असलेले पैसे योग्य ठिकाणी कामाला लावणे म्हणजे श्रीमंती होय. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी. हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसऱ्यांदा संधी देईल तेव्हा पूर्वी झालेल्या चुका पुन्हा करण्याची चूक कधीच करू नका. चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवानीच कळतं आणि अनुभव हे आपण काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत रहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखा असावं जे क्षणात निघून जावं. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असत. कारण जोपर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक कदाचित लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपणा लागतो. आयुष्यात चुका अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. बिना मुहूर्त जन्माला येऊन आयुष्यभर शुभ मुहूर्त शोधण्यात असलेला माणूस एक दिवस बिना मुहूर्तच या जगाचा निरोप घेतो. वाईट परिस्थितीत नेहमी स्वतःला एक सांगत रहा सध्याची परिस्थिती हा माझा शेवट असू शकत नाही. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. माणसं समजण्या पलीकडे गेली की त्यांचा नाद सोडायचा. खूप सोपा मार्ग आहे डोक्याचा ताप कमी करायचा. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. याउलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचा अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगल असतं. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तात नसतं. ती खरच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून आयुष्यात आपण बाकी काही शिको अथवा न शिको पण माणसं वाचायला नक्की शिकलेच पाहिजे. माचिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा. घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही. आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगू शकतो.
20. आपली बाजू खरी आणि न्याय असताना सुद्धा फक्त वादविवाद होऊ नये म्हणून माघार घेणे हे जरी त्या परिस्थितीत योग्य असले तरी प्रत्येक वेळी अन्याय सहन करत जगणे लान्चनास्पद असते. किंमत मिळत असेल तरच किंमत देणे व्यवहारी होईल. चूक करणाऱ्याला शरम वाटत नसेल तर बरोबर असणाऱ्याने का लाजावे? आयुष्यात तडजोडीला मर्यादा असावी. ती मर्यादा संपल्यानंतर स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची तयारी असावी. आयुष्यात कधीही कोणाबरोबर तुमची तुलना करू नका. तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात. स्वभाव मधील स्व जेव्हा भाव खायला लागतो तेव्हा त्याचा भाव घसरतो. जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडांमध्ये भाव कधीच सापडणार नाही. माणूस गॅरंटी मागतो. त्यामागे खरंच काय धारणा असेल? चपलेचा अंगठा शिवून देणाऱ्या चांभाराकडेही एक रुपयाच्या बदल्यात काहींना हमी हवी असते. तो चांभार शांतपणे सांगतो की साहेब चपलेचा अंगठा किती टिकेल ते चालण्यावर अवलंबून आहे. हे उत्तर काही जणांना व्यावसायिक चातुर्याचे वाटतं. आपण कसेही चालतो चप्पल कशीही वापरली तरी ती टिकली पाहिजे हा चप्पल घेणाऱ्याचा हेतू असतो. चप्पल काय आणि संसार काय तो कोणाच्या हातात पडतो त्यावर अवलंबून. बायकोचा उपयोग मी कसाही करीन. तिने चांगलेच वागण्याची गॅरंटी दिली पाहिजे असे काहींचे मत असते. कठीनातल कठीण लाकूड भोंगा पोकरू शकतो. पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भोंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधीक शक्तिशाली असते. विंचू एक छोटासा प्राणी आहे. बिचारा छोटासा आहे काय करेल असं म्हणून आपण त्याला नाही न उचलून घेतं. समजा घेतलं तर त्याच्या गुणधर्मानुसार तो डसल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना? आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यवृत्ती विंचू असतात. त्यांचे दुःख बघून, त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं, प्रेम दिल, सोबत केली की एक दिवस ते त्यांची औकात दाखवतातच आणि आपल्याला असे काही डसतात की आपण सुन्न होऊन जातो. तात्पर्य काय तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे एका ठराविक सीमारेषेपुढे कोणालाही येऊ द्यायचं नाही. काही वेगळे करायचे असेल तर गर्दीपासून जरा लांब चालले पाहिजे. गर्दीमध्ये धाडस तर होते पण आपले अस्तित्व संपून जाते. जर वादळ जास्त असेल तर जहाज बुडून जहाजाचा नाश होतो आणि अहंकार जास्त असेल तर माणसाचा नाश होतो. जेव्हा काही माणसे म्हणतात की आता काही होऊ शकत नाही, तेव्हा योग्य वेळ असते काहीतरी करून दाखवण्यासाठी. क्षमता प्रत्येकामध्ये असते पण यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्टा करतो. देवाने सगळ्यांनाच हिऱ्यासारखा आयुष्य दिलं आहे. फक्त अट एकच घातली आहे जो झिझेल तोच चमकेल. जगामध्ये कष्ट केल्याशिवाय काहीही भेटत नाही. आपली सावली सुद्धा उन्हात आल्याशिवाय दिसत नाही. चुकून मागील कारण जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूने नाही. आयुष्यात कोणतेही चांगले कार्य व्यर्थ जात नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते पुन्हा परत येते. मी पणा पासून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष आहे. काही ठराविक वेळेनंतर अनुभव घेऊन व शांत डोक्याने विचार करून स्वतःच्या क्षेत्रात मोठे व्हायला शिका. दुसऱ्याच्या ठिकाणी कितीही काम केले तरी आपण तिथे फक्त नोकर होऊ शकतो, मालक नाही. ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्याच्या हाताचे बाहुले बनत नाही. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला ते महत्त्वाचं आहे. रात्रभर जागून विचार करणं म्हणजेच प्रेम नसतं, स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं. हातात हात धरून चालणं म्हणजे प्रेम नसतं तर ती नसताना तिचं असणं प्रेम असतं. गुलाबाचं फुल देणं म्हणजेच प्रेम नसतं तर त्या फुलाच्या पाकळी सारखं तिला जपणं प्रेम असतं. तिला नेहमी हसवण प्रेम नसतं, तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं. तिला नेहमी सांगतो करणार प्रेम नसतं तिच्या संगे कधी रडणं सुद्धा प्रेम असतं.
21. एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची तळमळ चालू होते यालाच ओढ म्हणतात. आयुष्य हे जबरदस्त आहे, ते जबरदस्तीने जगू नका. जबरदस्तपणे जगा. मानली तर मौज आहे नाहीतर समस्या रोजच आहेत. आयुष्य आणि घरामध्ये आपल्यांच असणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर कितीही रंगरंगोटी केली तरी भिंती काही बोलत नाहीत. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं. आयुष्यात काही नाती अपुरीच लिहिलेली असतात पण त्यांच्या आठवणी अतिशय सुंदर असतात. नातं असो किंवा नसो मन चांगलं असल्यावर जीवाला जीव लावणारे नक्कीच भेटतात. ज्या व्यक्तीशी आपण मनापासून मैत्री करतो त्या व्यक्तीने आपल्याला कितीही दुखावलं तरी पुन्हा त्याच व्यक्तीशी बोलावसं वाटणे म्हणजे निस्वार्थ मैत्री. जेव्हा कष्ट करून सुद्धा ध्येय पूर्ण होत नाही तेव्हा मार्ग बदला पण सिद्धांत नाही. कारण झाडे नेहमी पाने बदलतात, मुळे नाही. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं. लोक काय म्हणतील? याचा विचार करणं म्हणजे थोडक्यात भूक असूनही उपाशी बसणं आहे. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पान झाकत जाणं म्हणजे आयुष्य. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात. कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. कोण म्हणतं माणसाचा स्वभाव आणि सही बदलत नाही. फक्त एका घावाची गरज असते. जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर माणसाचा स्वभाव बदलतो. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त वाट दाखवणारे कोण? आणि वाट लावणारे कोण? हे समजायला हवं. सुरू करायला कधी मागे हटू नका. लहान दिसण्याची लाज कित्येक लोकांना मोठे होऊ देत नाही. जी माणसं आज मोठी आहेत, ती सर्व कधीतरी छोटी होतीत. तुमची सर्वात मोठी धनदौलत तुमची वेळ आहे. ज्याला देत आहात विचारपूर्वक द्या, परत येणार नाही. आयुष्यात काही लोक जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मृत व्यक्तीला उचलण्यासाठी कमालीची एकता दाखवतात. वेळ लावू नका की तुम्हाला काय करायचे आहे? नाहीतर वेळ ठरवेल की तुमचे काय करायचे आहे? प्रत्येक नात्यांमध्ये एक विशिष्ट अंतर असले पाहिजे नाहीतर ओढ आणि जखम कधीच विसरता येत नाही. स्पर्धा करून खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे. रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकी असली पाहिजे. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यास कधीच चुकू नये. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही. विरोधक नाही तर प्रगतीही नाही. स्वीकार करण्याची हिम्मत आणि सुधार करण्याची नियत असेल तर मनुष्य बरच काही शिकू शकतो. एकच आयुष्य आहे. मेल्यावर काय होते माहित नाही. जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर दुरावा वाढतो आणि अंतर वाढते. यामध्ये काही वेळा चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते फक्त वेळेची कमतरता असते. यावर एकच उपाय आहे. त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की, तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणांवर भारी पडतील. जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात. त्यांना असे गमवू नका. आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. घरात काजू, बदाम आणि खारका यांची डबे भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडा मांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तो पर्यंत त्यांचा काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात होत नाही तो पर्यंत हे ज्ञान व्यर्थ आहे. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
22. बुद्धिमान आणि मूर्ख यांच्यात थोडा फरक असतो. बुद्धिमान काम पूर्ण होण्यापूर्वी कधीच बोलत नाही. ते विचार करतात. त्याउलट मुर्ख काम होण्याआधीच बोलतात. ते विचार करत नाहीत. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. या जगात सर्वात मोठी संपत्ती "बुध्दी" सर्वात चांगल हत्यार "धैर्य" सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास" सर्वात चांगले औषध "हसू" आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे". चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं. आई- वडील वयानं नव्हे, तर काळजीनं म्हातारे होतात. जेव्हा बाळ रडतं तेव्हा पुऱ्या बिल्डिंगला समजतं पण जेव्हा आई- वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही, ही जीवनातली सत्यता आहे. कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो. सगळीच वादळं काही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाहीत, तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात. ते दिवस खूप छान होते, घड्याळ एखाद्याकडेचं असायचे, आणि वेळ सर्वाकडे. आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ कुणाकडेच नाही. सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार. कारण, उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती अफाट आहे. अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात रहातात, आणि वाचली तर अधिक समजतात. माणसाणे शिक्षणा आधी संस्कार, व्यापार आधी व्यवहार, आणि देवा आधी आईवडीलांना समजुन घेतले तर, जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य आणि निःस्वार्थवृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधात उभे राहिले, तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकतो. प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा".
23. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही नॉलेज घ्यायचं ज्ञान मिळवायचं कौशल्य प्राप्त करायचं हे विचार आणि कृती अपयशावरचा जालीम उपाय आहेत अपयशातुनच यश जन्माला येतं प्रत्येक दिवसाला रात्रीचा शाप असतो सुखाला दु:खाचा तर सावलीला उन्हाचा त्रास असतो मंद वाऱ्याला वादळाचा तर आनंदाला उदासिनतेचा शाप असतो बहराला पानझडीचा तर बाल पणाला वार्धक्याचा शाप असतो ताणतणाव नेहेमीचेच असतात त्यातील प्रमाण आणि कंगोरे बदलत असतात ओढाताण आणि दडपण वाढतं तेंव्हा त्यावर मात करण्यासाठी शांत मनाने समंजसपणाने परिस्थितीला सामोरं जायचं असतं अभ्यासाचं टेन्शन प्रवासाचा त्रास ऑफीस कामाचा ताण अशा अनेक तणावातून प्रत्येकाला जावं लागतं या तणावाचं नैराश्यात रुपांतर होण्याची शक्यता असते परीणामी एकलकोंडेपणा ताणतणाव नकारात्मक विचार आणि शेवटी आहारावर परीणाम होतो हे परीणाम गंभीर असतात प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी कोणाच्या मनात काय आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही जीवनाचा खरा अर्थ माणसाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अनर्थाशिवाय त्याच्या पदरात काहीही पडणार नाही हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असे नसते करार असतात काही या आयुष्याचे निमुटपणे सहन करायचे माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्विकारावाच लागतो. हसतमुख माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत लोक सहज म्हणतात कोणी कुणाचे नाही पण स्वतःला विचारण्याचे विसरून जातात की आपण कोणाचे आहोत लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर जेवण जातच माणसाचे यश हे कोणाच्याही आधारावर नसते तर ते चांगल्या विचारांवर असते कारण आधार कायम नसतो पण चांगले विचार कायत सोबत राहतात चांगले व्यक्तीमहत्त्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावे लागते आपल्या सोबत दुसऱ्यांचं ही भल व्हाव अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नसतं स्वता: ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वत: चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आपल्या स्वत:च्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते जसे विराट जंगलात धान्याचे पिक नाही होऊ शकत तसेच वाईट लोकांच्या संपर्कांत असल्याने चांगले संस्कार नाही होऊ शकत काही माणसं राग मनात ठेऊन गोड बोलतात त्यांच्या पेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खुप चांगली गंगेत तीच पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. ज्याच्या जवळ स्वत:ची बुध्दी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असत तो कधीच दुसऱ्यांच्या हातचं बाहूली बनत नाही डोक्यात चागले विचार सूचणे आणि ते लिहून व्यक्त करणे हे पण आपल्यातले चांगले संस्कार आहे आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल पण हिमंत कधीच हारू नका कारण हिच हिमंत तुम्हाला शुन्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते कारले कडू असते पण गुणकारी औषधी असते. साखर गोड असते पण हानीकारी व विषारी असते गोड बोलणारी लोकं आतल्या गाठीचे असतात कटकारस्थान असतात दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळ खेळणारी धातक लोकं असतात कडू आहे पण सत्य आहे मन फारच विचित्र असतं आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो जीवन जगतांना काळजी घेणारं कुणी तरी सोबत असेल तर चार क्षण आणखी जगावसं वाटतं जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरवात केली तर तोही एक कंगाल बनू शकेल शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोष मुक्त आहे हे समजले जाऊ नये तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता हसणे फार सुंदर आहे दुसऱ्याला हसविणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे जीवनात हसणे रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही तो फक्त गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी राबत असतो व्यक्तीमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते जबाबदारीला ना कोणतं गाव असतं ना कोणतं नाव ते फक्त निभावणं हेच एक कर्तव्य असतं वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पहायला हवं प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं प्रत्येक वेळेत समाधान व आनंद आहे तसं जगायला हवं.
24. नेहमी बडबड करणारे, बोंबाबोंब करणारे खरतर काहीच करत नसतात. शांत राहणारे, कमी बोलणारे व जास्त ऐकणारे वेळ आली की आपली क्षमता दाखवतात. लक्षात ठेवा सिंहाला कधीच सांगावे लागत नाही की तो जंगलाचा राजा आहे. सिंह जर टेकडीवर बसला तर ती टेकडी सुद्धा सिंहासन म्हणून ओळखले जाते. म्हणून सिंहासन प्राप्त करायसाठी नाही तर सिंह बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेथे कोठे बसाल तेथे सिंहासन स्वतः बनून जाईल. आयुष्यात आभाळाएवढी उंची गाठा पण कधीच जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका. परमेश्वराच्या निर्णयावर कधीच शंका घेऊ नका. कारण जर शिक्षा मिळत आली असेल तर गुन्हाही झालेला असणारच. नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. आयुष्यात कधी उदास होऊ नका. हातावरच्या रेषांवर विश्वास ठेवू नका. कारण भविष्य तर त्यांचेही असतं ज्यांचे हातच नसतात. आयुष्यात नेहमीच सल्ल्याची गरज नसते. तर कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करत असतो त्या व्यक्तीकडून एकच अपेक्षा असते की त्याने आपलं मन कधीही दुखावू नये. नात्यांमध्ये काही वेळा भांडण होणे फार गरजेचे असते. कारण तेव्हाच तर माहित पडतं समोरचा आपली किती कदर करतो? आणि आपल्याबद्दल काय विचार करतो? दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा आहे. अभ्यास करण्याच्या वयात प्रेम करत बसाल तर संसारात प्रेम करण्याऐवजी मोलमजुरी करावी लागेल. पोट कसेही भरता येऊ शकतं पण काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो. कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ती माणसं आयुष्यात कधीच सुखी राहत नाहीत. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका. कारण काडी टाकून आग लावणे आणि नंतर स्वतःच अंग शेकत बसणे ही काही माणसांची रीत आहे. वडिलांच्याद्वारे रागावलेला मुलगा, गुरुच्याद्वारे रागावलेला शिष्य आणि सोनाराच्या द्वारे बडवलेले सोने हे नेहमी आभूषण बनतात. आयुष्यात काही प्रामाणिक कामे अशी झाली पाहिजेत की परमेश्वराशिवाय त्यांचा साक्षीदार दुसरा कोणीही असणार नाही. वरवर सगळं शांत वाटलं तरीही प्रत्येक माणसाच्या मनात एक एक महाभारतासारखा ग्रंथ आहे. कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो. नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. भेटणारी सगळीच माणसं सारखी नसतात म्हणूनच आयुष्याला अनुभवाचे भिन्न पैलू पडतात. काही वेळा काही लोकांना असे दाखवा की तुमच्याकडे काहीच उद्दिष्ट नाही. कारण त्या काही लोकांना आपली प्रगती झालेली दिसली की आपल्याला मागे खेचायला वेळ लागत नाही. म्हणून आपल्या योजना कोणालाही सांगू नका. त्यांना प्रत्यक्ष तुमचा निकाल दाखवा. सर्वच लोक नशेत असतात. कोण विचारांच्या नशेत असतो, कोण पैशाच्या नशेत असतो, कोण सत्तेच्या नशेत असतो. दारू पिणाऱ्याचा फक्त तोल जातो म्हणून तो बदनाम होतो. नशा कुठलीही असो, तोल गेला की मनुष्य बदनाम होतो. काही नाती अशी असतात ज्यांना कोणतच नाव नसतं. तरीसुद्धा ती स्पेशल असतात. माहीत असतं आयुष्यात पुढे जाऊन कधीच आपण एकत्र येऊ शकत नाही तरीसुद्धा दिवसेंदिवस प्रेम अधिकच वाढत जातं. काही लोक या नात्याला वेडेपणा किंवा मूर्खपणा म्हणतील पण हे नातं नक्की त्या दोघांसाठी काय आहे हे फक्त त्या दोघांनाच माहीत असते आणि हेच पुरेसे असते आयुष्यात सुखी राहण्यासाठी.
25. झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी कधी फांदीत तुटेल या भीतीने घाबरत नाही. कारण त्याला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो. अशा पद्धतीने आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा. उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही. पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर दिसतं. मन आणि विचार सैरभैर असताना मार्ग मिळत नाही. शांत व्हा. मन एकाग्र करा. मार्ग नक्की सापडेल. हे गरजेचे नाही की माणसाने दररोज मंदिरात जायला पाहिजे. त्या ऐवजी आपले कर्म असे असले पाहिजे की तो माणूस जिथे कुठे जाईल तिथे मंदिर तयार होईल. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला तर इथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. अंतर्मनात किती संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणे हाच आयुष्यातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशीबाचा खेळ आहे. पण प्रयत्न आणि कर्म इतके चांगले करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. ज्याने स्वतःचे मन जिंकले त्याने जग जिंकले. वडिलांनी घरी आल्यावर आपल्याला पूर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडिलांनी टीव्ही बंद करून आणि स्मार्टफोन बाजूला ठेवून मुलांना दिलेला शंभर टक्के वेळ हे मुलांचे "धन". वैवाहिक आयुष्यातील वीस वर्षे पूर्ण झाल्यावर सुद्धा जो आपल्या पत्नीला तिच्या गुणदोषासकट स्वीकारून सांगतो माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे तो क्षण म्हणजे पत्नीचे "धन". आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वर्धक यामुळे थकलेल्या आई-वडिलांना जेव्हा वाढते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पूर्ण करतो तो क्षण माझे आई-वडिलांचे "धन". ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान". प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. पैसा तर सर्वजण कमावतात, आशीर्वाद सुद्धा कमवा. आशीर्वाद तेथे कामाला येतो जेथे पैसा कामाला येत नाही. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. कारण इथला मुक्काम केव्हा संपेल सांगता येत नाही. जर कोणी पुन्हा पुन्हा मोळा बनवून टोचू लागलं तर एक वेळ हातोडा बनून त्याला ठोकून व्यवस्थित करणे हाच उपाय राहतो. नसल्याने फरक पडत असेल तरच असण्याला किंमत आहे. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. आयुष्यात निष्ठेने आणि तत्वाने जे मिळते तेच आयुष्याच्या बेरजेला राहते बाकी नियतीच्या वजाबाकीत गायब होते. संसाराचा खेळ जर जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं असतं. प्रशंसा कर्तुत्वाची होत असते नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. माणसाने समोरच्या व्यक्तीच्या मनात उतरावे,मनातून उतरू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण संपवून स्टेज खाली आले त्यावेळी एक विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला "साहेब, मला तुमचे विचार पटले आहेत. मी तुमच्या पक्षात काम करू इच्छितो." बाबासाहेब त्याला लगेच म्हणाले, "अगोदर शिक्षण घे, पोटाचा प्रश्न सोडव आणि मग कार्यकर्ता बन. उपाशीपोटी झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो." जबाबदारी एकटी येत नाही, सोबतीला शहाणपण घेऊन येते. एकदा 'मी' पणा विकून तर बघा कोणीही घेणार नाही. तेव्हा समजेल किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस स्वतःकडे बाळगतोय. योग्य दिशा दाखवणारा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे अनुभव. काहीतरी मिळवण्याची अस्वस्थता आणि काहीतरी गमावण्याची भीती एवढाच असतो माणसाचा आयुष्य प्रवास. स्वतःच्या स्वार्थासाठी जे दुसऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करतात ते पैशाने कितीही श्रीमंत होऊ द्या तरी पण मानसिक सुखाच्या बाबतीत ते नेहमी असमाधानी असतात. आयुष्याच्या बाबतीत एवढा विचार करू नका. ज्याने तुम्हाला आयुष्य दिले आहे त्याने तुमच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवला असणार. तुम्ही चांगले आणि वाईट असल्याचा जगाला काही फारसा फरक पडत नाही. फरक पडतो तर तुमच्या कुटुंबीयांवर की जे तुमच्या असण्यावर अभिमानाने समाजात मान उंचावून चार चौघात फिरतात. तुमचं कौतुक करतात आणि हीच कुटुंबाची खरी संपत्ती आहे. तिला जपता आले तर नक्कीच जपा. आयुष्य सुंदर आहेच फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच फक्त कुठे ताणायच आणि कुठे सोडायचं हे समजायला हव. आयुष्य सुंदर आहेच फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे समजायला हवं.
26. आपल्या मुलांना आज भागवत गीता वाचून दाखवा. कारण भविष्यामध्ये कोणत्यातरी कोर्टामध्ये गीतावर हात ठेवायची वेळ येऊ नये. संस्कार गुन्हा थांबू शकतात, प्रशासन नाही. कर्म चांगले करा, या जगात काहीच तुमचं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा. कलीच युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी करून करून मरणार. कोणी रोगराईने तर कोणी महामारीने. करोडो रुपयांचा बंगला असला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर. लाखोंची गाडी असली तरी चार बांबू वरच जायचं असतं. कितीही सोन असलं तरी तोंडात फुटका मणी. कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं. आणि हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिलं. म्हणून शक्य होईल तेवढे भक्तीत रहा. अजूनही वेळ गेली नाही. परमेश्वराचा जप करत रहा. बाकी करता आणि करविता परमेश्वर आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्यांची असो अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचे हे असंच असतं. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ घट्ट बसते. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका. ओढ म्हणजे तरी काय? एखाद्या व्यक्तीची आठवण काढून त्या व्यक्तीला सारखेच आठवणीत साठवून ठेवणे त्यालाच ओढ म्हणतात. ओढ म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी नसते. आपल्या आयुष्यातील काही स्पेशल व्यक्ती असतात ना फक्त त्यांच्यासाठीच असते. आपल्या आयुष्यात असंख्य नाती गोती असून देखील तर ज्या व्यक्तीकडे मन ओढ घेत असेल तर त्या व्यक्तीबद्दल किती प्रेम असेल आपल्या मनात. आयुष्यामध्ये श्रीमंती कमवली म्हणजे सगळे कमावले असे नसते. आयुष्यामध्ये कोणाच्यातरी मनात पवित्र स्थान कमावले तर ते सुद्धा एक प्रकारचे सुख आहे. त्रास त्या व्यक्तीला होतो ज्याने प्रत्येक नाते मनापासून निभावलेले असते. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला कुठलेही विष मारू शकत नाही आणि नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीला कुठलेही औषध वाचवू शकत नाही. उडी कितीही उंच घेतली तरी आभाळाला हात टेकत नाहीत. हवेत उडण्यापेक्षा जमिनीवर ठीक चालायला शिका. कोणतीही काम करताना क्षेत्र निवडताना आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमतांचा विचार करा. योग्य वाटेची निवड करा आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अवास्तव मोठेपणा करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याला अनुसरून निर्णय घ्या. जगायला माणसं लागतातच पण आतल्या वर्तुळात कोणती माणसे घ्यायची आणि बाह्य वर्तुळात कोणती माणसं ठेवायची याचं गणित एकदा का जमायला लागलं की जगणं सोपं होतं.
27. शुभ कपडे असो किंवा चारित्र्य त्यावर डाग पाडण्यासाठी कितीतरी हात पुढे सरसावतील. कारण स्वच्छ चारित्र्य निर्माण करण्यासाठी अतोनात कष्ट लागतात. चारित्र्यावर डाग पाडण्यासाठी फक्त घाणेरडी मानसिकता ही पुरेशी असते. कोणाला बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं की कोण कसं वागतोय आणि काही कालांतराने योग्य वेळी योग्य पद्धतशीरपणे त्याच्यावर पलटवार करायचा जेणेकरून त्याने पुन्हा चुकीचे काही केले नसले पाहिजे. काही लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून वाईट होतो. क्षणिक सुख पाहिजे असेल तर आवडते गाणे ऐका. एका दिवसाची सुख पाहिजे असेल तर सहलीला जा. एका आठवड्याचे सुख पाहिजे असेल तर यात्रेला जावा. एक दोन महिन्याचे सुख पाहिजे असेल तर लग्न करा. काही वर्षांचे सुख पाहिजे असेल तर चांगल्या मार्गाने पैसा कमवा. पण जर पूर्ण आयुष्यभर सुख पाहिजे असेल तर आपल्या कामावर प्रेम करा. संकटाचा काळ हा ठरलेला असतो. तो कधीच कोणाकडे कायमचा मुक्कामला नसतो. दिवस नक्कीच बदलतात. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. गरज असली की आठवण काढणारे आणि गरज संपली की अडचण वाटणारे लोक आयुष्यात कधीच समाधानी राहत नाहीत. मदत करण्याची जिद्द पाहिजे. अडचणीत आपले असो वा परके रक्तात फक्त माणुसकी पाहिजे. काही माणसांना सांभाळायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. मध्यमवर्गीय कुटुंबात नेहमी पगार झाला की बघू या वाक्यातच कितीतरी स्वप्न ताटकळत उभी असतात. आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका म्हणजे त्रास होत नाही. नात्यांचे पण एक वय असते. काही मरेपर्यंत साथ देतात तर काही जिवंत असताना सुद्धा मरतात. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते पण सर्वच नाही. कारण जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथे तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे. याच्यात जो अडकला तो सत्व, तत्व, मैत्री, नातं, माणुसकी, नम्रता हे सर्व विसरून जातो. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मन धरणी करत बसायचे नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचे नाही आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचे नाही. एखाद्याची साथ जबरदस्ती मागू नका, कोणी स्वतःहून सोबत असल्याने वेगळाच आधार असतो. नेहमी आवडणारी कामं वाटणीला येतात असं नाही. काही कामं कर्तव्य म्हणून करायची असतात. कधीही नाराज होऊ नका, कारण आयुष्य कुठूनही अचानक चांगले वळण घेऊ शकते. काही वेळा वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. जन्म हा थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखा असतं. प्रेम एका त्रिकोणासारखा असतं. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात. कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो. अडचणी बघून आयुष्यात कधी हार मानू नका. काय माहिती ह्याच अडचणीच्या आत तुमची एक मोठी सुरुवात लपलेली असू शकते. जर कष्ट जास्त आहेत तर यश पण मोठे मिळणार. आपल्या वाईट वेळेला धन्यवाद म्हणा. कारण त्याच वेळेने तुम्हाला मजबूत बनवलं आहे. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे नातं. आपणच आपल्याला जपायचे कारण आपल्याकडे फक्त आपणच तर असतो. दुसऱ्याची चांगल्या हेतूने विचारपूस करणे हे भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. चुकीच्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही थोडं तिरक होत नाही तोपर्यंत काही लोक सरळ होत नाहीत. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. काय बोलतो हे जसं महत्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं ते कसं बोलतो हेही आहे. लायकी आणि योग्यतेपेक्षा केलेल्या मोठेपणाचे दिखावे माणसाला कर्जात बुडवितात. चार पैसे कमी मिळाले तरी चालतील पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा देतो, पैसा नाही. आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची आहे. ज्याच्याकडे शिस्त आहे त्याचे आयुष्य मस्त आहे. म्हणून मस्तीत जगण्यापेक्षा शिस्तीत जगा. तेव्हाच आयुष्य मस्त होईल. हजारो शब्दाने जेवढा बदल होणार नाही तितका आपण केलेल्या एका कामाने होईल. स्वार्थी माणसांची आयुष्यातून वजाबाकी करून प्रेमळ माणसांची बेरीज केली तर आयुष्यात जास्तच आनंद मिळतो. ज्या माणसाच्या जवळ सत्य पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील त्या माणसाचा नाश करण्याचे क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या तीन गोष्टी असल्यावर सगळे विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊन सामोरे जाऊ शकतो. टीका करणारे सगळे विरोधकच असतील असं नाही. काहीजण स्पष्ट बोलणारे तुमचे हितचिंतक हे असू शकतात. आयुष्याच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आले की समजायचं आपण पास झालो. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे. कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान. त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. वेळोवेळी मिळालेले अनुभवातून माणसाची मानसिकता भक्कम होत जाते. चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. एखाद्या व्यक्तीच्या मनात प्रेमाची भावना निर्माण करून त्या व्यक्तीला अर्ध्यावर सोडून देणं हे एखाद्याची हत्या करण्या समान आहे. तोंडात गोड आणि मनात खोड अशा लोकांपासून नेहमी दूर राहावं कधी घात करतील सांगता येत नाही. तुटेल इतकं ताणू नये. ताणल्यासारखं वागू नये. वागायचं कसं कुणी सांगू नये. सांगायला लागण्याची वेळ आणू नये. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाली करू द्या, काहीही फरक पडत नाही.
28. जर एखाद्यावर खरच मनापासून निस्वार्थपणे प्रेम केले असेल आणि त्यामध्ये शारीरिक आकर्षणापेक्षा भावना जास्त समजून घेतल्या असतील तर मागणी घाला. जर शांत राहिलात तर आयुष्यभर कदाचित पश्चातापाची वेळ येईल. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरचे सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उदारमन आयुष्यातील चिंता घालवतात. कापून टाकने म्हणजेच सर्व समस्यांचा पर्याय होऊ शकत नाही. कोणासाठी तरी थोडीशी माघार घेणे गरजेचे ठरू शकते तेव्हा नाते पण वाचते आणि मार्ग पण निघतो. मित्रच फक्त कसा आहेस? म्हणून विचारतात नाहीतर मुले कागदपत्रे विचारतात आणि नातेवाईक लायकी विचारतात. संस्कृती कपड्यांमधून नाही विचारांमधून दिसते आणि संस्कार पैशावरून नाही वर्तवणुकीमधून कळतात. आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमध्ये तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. दगडा सारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्ति सारखी सुंदरता आयुष्याला लाभते. आपल्या मागे कोण काय बोलतो याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच ते मागे बोलतात, पुढे नाही. साध्या व्यक्तीबरोबर केला गेलेला अन्याय विनाशाचे सर्व दरवाजे उघडू शकतो त्यावेळी तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळाचे खेळाडू असला तरीही. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. काय काय सांभाळायचं हे कळणं जसं आवश्यक आहे तसंच काय काय सोडून द्यायचं हे कळन अति आवश्यक आहे. नाही म्हणता यायला सुद्धा खूप मोठे सामर्थ्य लागतं. ज्या माणसाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य व्यक्तीला, योग्य कारणासाठी नाही म्हणता येते त्याच्यासारखा सुखी माणूस तोच. काही वेळा या कलेचा प्रयोग स्वतःवर सुद्धा करता आला पाहिजे. आपण आहोत हे असे आहोत आणि आपल्याला त्याची खंत नाही. आयुष्य इतकं झपाझप संपतंय खंत करायला सवड आहे कुठे? एखादी व्यक्ती आवडली की जोडली आणि नाही पटली की तोडली. जिथं चूक नाही तिथेच झुकायचं नाही आणि जिथे मान सन्मान नाही तिथे थांबायचं नाही. जखम बरी झाली तरी काही प्रसंग विसरता येत नाहीत. गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं, माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलवावे लागले तर तुम्ही आम्ही कोण? कागद आपल्या नशिबावर हवेत उडत आणि पतंग आपल्या योग्यतेनुसार हवेत उडतो म्हणून नशीब साथ देईल अथवा नाही देईल परंतु योग्यता साथ नक्कीच देते. कोणाचा बदला घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. कारण ज्यांनी तुम्हाला दुःख दिले ते स्वतः आपल्या कर्मानुसार दुःखाला सामोरे जातील. आव्हाने स्वीकारा, आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा. आवडत्या लोकांना वेळ द्या. पोट दुखेपर्यंत हसा, मनसोक्त नाचा अगदी लहान बाळासारखे जगा. कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा तोटा नाही. तोटा तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो. मनाचा गाभारा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या भल्यासाठीची प्रार्थना असते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा की आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा फार मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कितीही संकटे आली तरी हाती घेतली गोष्ट अपूर्ण न ठेवता हिमतीने जशी जमेल तशी पुढे सुरू ठेवा. भले मग कासवाची गती का असेना. एक दिवस तुम्हाला जसे हवे तसे यश नक्की मिळेल आणि मग आयुष्यात मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल अरेच्चा कसे काढले मी ते दिवस? इतक्या अडचणीतून खरच मी मार्ग काढला. तुमचे विचार साधे सकारात्मक आणि चांगले असतील तर तुमचा स्वभाव हा विचारानुसार साधा सरळ आणि चांगला बनतो. तसेच तुमचे विचार रागीट तामसी आणि कपटी असेल तर तुमचा स्वभाव ही तसाच बनतो. कारण आपला स्वभाव हा आपल्या विचाराचे प्रतिबिंब असतो. म्हणून स्वभाव हा नैसर्गिक असला तरी विचारात बदल घडवून आणला तर स्वभावात नक्कीच बदल होतो. कोणतेही नाते आपल्या इच्छेनुसार जुळत नाही. कारण तुम्हाला कोठे? केव्हा? आणि कोणाबरोबर भेटायचे आहे हे फक्त परमेश्वरालाच माहीत असते. प्रामाणिक असावं स्वतः सोबत, स्वतःच्या विचारांसोबत, स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वासोबत. जिथे काम करत असाल तिथे प्रामाणिकपणे काम करायला हवे. जिथे जाल तिथे नाव निघालं पाहिजे. जसे पेराल तसे उगवेल. वाईट काम करत असाल तर वाईट ठिकाणी नाव निघेल. चांगले काम कराल तर चांगल्या ठिकाणी नाव निघेल. आपलं आयुष्य पैसे कमवण्यातच जाणार आहे. त्यासोबत काही माणसेही कमवा. जिथे पैसा कामाला येत नाही तिथे माणसे कामाला येतात. पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ द्यायला परत येत नाही. तसेच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असल्याने कदाचित काही फरक पडणार नाही. पण त्यांच्या नसल्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा. कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये कदाचित ते कधी पुन्हा येणार नाहीत. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतारा वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. तरीसुद्धा आपण अहंकार दाखवितो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम सत्य आहे. मी का बोलू? मी का फोन करू? मी का कमीपणा घेऊ? मी का नमते घेऊ? मी का नेहमी समजून सांगायचं? मी का कमी आहे का? असे बरेच मी आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा. ज्यांना तुम्ही असण्याची किंमत जाणवत नाही त्यांना तुम्ही नसण्याची किंमत जाणवू द्या. परमेश्वरा त्यांची काळजी घे जे आपल्यावर तिरस्कार करतात. प्रेम केले नाही तर तिरस्कार सुद्धा ठीक आहे. कारण काहीतरी आहे जे फक्त आपल्यावर करतात. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती कशी आहेत हे समजत. आयुष्याच्या वाटेवर एका चुकीने साथ सोडणारे भरपूर असतात पण तीच चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे लाखात एक असतात. पुस्तक वाचत असाल, सातत्य ठेवा. व्यायाम करत असाल, सातत्य ठेवा. एखादी नवीन गोष्ट शिकत असाल, सातत्य ठेवा. ध्येयाचा पाठलाग करत असाल, सातत्य ठेवा. जर तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर इतर लोकांच्याकडे नसणारी एक गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे सातत्य. या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं माणसाचा मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे नाही. संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधने ही वयानुरूप, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखा मागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्याचं एकच होतं तेव्हा घर उभा राहत. स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव काही वेळा बदलता येत नसतो अथवा देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणार कर्ज असत आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव असते. आयुष्य जगायचे आहेत तर त्रास तर होणारच. कारण मेल्यानंतर जळण्याची जाणीव सुद्धा होत नाही. परिस्थितीला आपण नेहमीच दोष देतो. खरं तर परिस्थिती ही सगळ्यात मोठा गुरु असते. कारण जगायचं कसं? आणि कोणाशी कसं वागायचं? हे परिस्थिती शिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. म्हणून ज्या परिस्थितीत आपण आहोत ती चांगली असो वाईट त्यातून धडा घेण्याचा, अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. आयुष्यात अनेक प्रकारचे संघर्ष करावे लागतात. अशा संघर्षात प्रत्येक वेळी विजय मिळतोच असं नाही. पराभव आहे आयुष्याचा एक भाग असतो. त्यामुळे प्रत्येक पराभवानंतर संघर्षासाठी पुन्हा सज्ज होणे हे जिवंतपणाचे लक्षण असते. लक्षात ठेवा अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक विलक्षण आणि प्रतिकूल काळ येत असतो. तो काळ म्हणजेच आपण स्वतःला सिद्ध करण्याचा काळ असतो. त्याला धैर्याने सामोरे जा आणि स्वतःला सिद्ध करा. परिस्थिती गरीब असली तरी चालेल परंतु विचार भिकारी नसले पाहिजेत. जगातलं सर्वात कठीण काम म्हणजे चेहऱ्या मागचा चेहरा ओळखणे. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाहीत. आयुष्यभर तडजोड करण्यापेक्षा एकदा स्वीकार करावा माणसाने. जर कोणी तुम्हाला चांगलं वाटत असेल तर चांगली व्यक्ती ती नाही तुम्ही आहात. कारण त्यांच्यात चांगलेपणा बघण्याची दृष्टी तुमच्याजवळ आहे. शरीरावर केलेलं प्रेम क्षणात कुस बदलल्यावर आपण विसरून जातो. कारण स्पर्श हा कधी साठवून ठेवता येत नाही आणि मनावर केलेले प्रेम शेवटपर्यंत राहत. कारण त्या आठवणी आणि त्या भावना हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात जपल्या जातात. नातं तुटताना होणाऱ्या वेदनेपेक्षा नातं जोडताना गुंतवलेल्या भावना जास्त महत्त्वाच्या असतात. कारण जेव्हा भावना दुखवतात तेव्हाच तर वेदना जन्म घेतात. काही माणसांना कितीही दुखावलं तरी ती वेळेवर साथ नक्कीच देतात. कारण त्यांच्यातली माणुसकी अजून जिवंत असते. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो. तर तो कसा आहे? हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो. देव एवढा वेडा नाही की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सगळी दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला दोन हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावं लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर माझा त्याची प्रतिष्ठा इतकी ढसाळते की तो पाय धुण्याच्या लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते. तो नष्ट होतो. कमळाच्या पानांवर पडला तर मोत्यासारखा चमचम चमकतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो.थेंब तोच परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पद, प्रतिष्ठा अवलंबून असते. त्याचप्रमाणे माणूस हा एकच आहे परंतु त्याचा सहवास कोणासोबत आहे यावर त्याचं अस्तित्व, त्याची पत, प्रतिष्ठा अवलंबून असते. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केला. मरणारा तर मेलाच नंतर मारणाराही गेला. पण तो दगड मात्र तिथेच पडलाय. जगाला ओरडून सांगतो की किती पराक्रम केला दोघांचाही जीव घेतला. सावधान समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात, एकमेकांची डोके फोडायला लावतात. नुकसान आपले होते. बरबाद आपण होतो आणि दगड मात्र बाजूला होतात. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की इथल्या तरुणांना आणि जनतेला स्वतःच्या भविष्यापेक्षा नेत्यांच्या भविष्याची जास्त चिंता आहे. समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबांमध्ये हिम्मत नसते. मध्यमवर्गीयांना वेळ नसतो, आणि श्रीमंतांना गरज नसते.
29. देशामध्ये राजा, समाजामध्ये गुरु, कुटुंबामध्ये वडील, घरामध्ये स्त्री ह्या व्यक्ती कधी साधारण नसतात. कारण निर्माण आणि प्रलय यांच्या हातामध्ये असतो. जगण्यात प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात याने काही फरक पडत नाही. एकटा उभा राहण्याची धमक ठेवा. कारण जग ज्ञान देते, साथ नाही. आई-वडिलांच्या जीवावर उड्या मारू नका. स्वतःच्या जीवावर मारा. काही लोकांना आपलं ठेवणार झाकून आणि दुसऱ्याचं बघणार वाकून अशी सवय पडली आहे. त्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. लोकांनी कितीही नाव ठेवले तरी आपण आपल्या धुंदीत जगायचं. कारण आयुष्य आपलं आहे, लोकांचं नाही. माणसं जपता आधी पाहिजे. पैसा आज आहे तर उद्या नाही पण माणूस एक वेळेस गमावला तर परत भेटत नाही. जे बदलता येईल ते बदला आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा पण स्वतःला आनंदी ठेवा. अडचणीत असताना अडचणी पासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. त्याच लोकांवर विश्वास ठेवा जे सोबतीच्या लायकीचे आहेत. नाहीतर काही क्षणांची सोबत तिरडी उचलणारे सुद्धा देतात. कोणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या. कारण आज काल दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. अशा लोकांना वेळीच ओळखा व त्यांच्यापासून चार पावलं दूर राहा. वर्ष संपत जातं परंतु संघर्ष कधीच संपत नाही. राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात. रोज तुम्ही जी गोष्ट करत आहात त्यावरती उद्याचा दिवस अवलंबून असतो. जर तुम्हाला उद्याचा दिवस बदलायचा असेल तर आज तुम्हाला धाडसी निर्णय घेण्याची खूप गरज आहे. नाहीतर कालचा दिवस जसा आहे तसाच उद्याचा दिवस ही जाईल. जाताना काय घेऊन जायचं असं म्हणणारी माणसं मात्र दुसऱ्याला गरज असताना त्यांच्या जवळचे काही सोडत नाहीत. सुख दुःखात जास्त अंतर नसते. जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं. आहे पेक्षा मोठे प्रेमळ आणि वडिलांपेक्षा मोठा सहप्रवासी कोणीच नसतो. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोस होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं. जे चांगले वाटते ते ग्रहण करा आणि जे वाईट वाटते त्याचा त्याग करा. मग तो विचार असो, कर्म असो, किंवा मनुष्य असो. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका. कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात. व्यवहारात रोख आणि कर्मात चोख असणारी माणसे जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. आपल्यावर आलेल्या संकटाला आणि मृत्यूला सुद्धा चकवा देता येतो फक्त हिम्मत आणि संयम आपल्यात असला पाहिजे. ज्या ज्या व्यक्तींचे मन चांगलं असतं प्रत्येक व्यक्तीला मदत करीत असतं अशा व्यक्तींना दुःख का असतं? कारण श्रीराम देव असून राजवाडा असूनही 14 वर्षे वनवास सोसावा लागला. श्रीकृष्णही देवासम जन्म माता तुरुंगात झाला आणि मामा कंस पासून जिओ वाचा म्हणून जन्म घेतल्यावर आई-बाबा पासून दूर गेला. मग या देवांना आपला नशीब बदलता आलं नसतं का? दैवी शक्ती असून देवाचं आयुष्य असं. आपण तर सर्वसामान्य व्यक्ती. समजून जा ज्या ज्या व्यक्तींना दुःख आहे आणि संकट आहेत हीच माणसं देव माणसं असतात. आयुष्य सोपं नसलं तरी चालेल पण ते पोकळ असू नये. डोळे तर जन्मजात मिळालेले असतात कमवायची असते ती नजर चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्याची. दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस किती परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. तुमच्या पतीचा वर्षाचा इन्कम वीस लाख किंवा तीस लाख असू दे याने काही फरक पडत नाही. जर तुमच्यासाठी त्याच्याजवळ वेळ नसेल तर त्याची किंमत शून्य आहे. दिवस सगळ्यांचेच येतात. फरक फक्त हाच की काहींचे लवकर तर काहींचे उशिरा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. आपल्या आयुष्यात येणारी माणसेही झाडांच्या अवयवांसारखे असतात. काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानं सारखी अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळासारखी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. मोजकेच पाहिजे पण जीवाभावाचे पाहिजे.
30. आयुष्य आणि जेवण सगळा पोटासाठी चा खेळ आहे. कोणी उपाशी तर कोणी तुपाशी हा तर नियतीचा डाव आहे. लढला तो जगला, हरला तो संपला. इथे तर जगण्याला भाव आहे. एका गाढवाने स्वतःच्या सवयीप्रमाणे नावाड्याला नावाडी बेसावध असताना लाथ मारली आणि पाण्यात ढकलून दिले आणि नावेवर कब्जा केला. पण त्याला हे माहित नाही की नाव पुढे कशी न्यावी . फक्त आता लाटेवर आणि पाण्याच्या प्रवासासोबत नाव जिकडे जाते तिकडे जाणे त्याला भाग आहे. आपण सर्वजण सुज्ञ आहोत याचा संबंध कशाशीही लावू शकतो. घमेंड म्हणून नव्हे तर आत्मसन्मानासाठी कधीकधी काही लोकांपासून दूर होणे आणि दूर राहणे महत्त्वाचे असते. ज्यांचे मन स्वच्छ आहे तेच हृदयामध्ये असतात. कारण सुईमध्ये दोरा तेव्हाच जातो जेव्हा त्या दोराला कोणतीच गाठ नसते. हवा तर भंगार विकून आयुष्य जगावं पण आयुष्याला भंगार होऊ देऊ नये. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा पडत नाही तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते. तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी आयुष्य जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवू शकतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. लग्न झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यावर प्रेम करणे जर चुकीचे असेल तर प्रेम झाल्यावर सुद्धा पुन्हा दुसऱ्या बरोबर लग्न करणे सुद्धा चुकीचे आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी झटत राहा म्हणजे इतरांचे दोष शोधण्यासाठी वेळ मिळणार नाही. कारण जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही. चांगुलपणाचा आव आणि काळजावर घाव घालणाऱ्या व्यक्ती या आपल्या जवळच्याच असतात. जो माणूस आदर्श मुलगा असतो तोच तारुण्यात प्रेमळ पती होतो. त्याचाच एक पालन करता बाप होतो आणि वात्सल्यपूर्ण आजोबा होतो. झेप घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर जेष्ठ व्हावे म्हातारे नाही. कारण म्हातार पण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात. संस्कार हे असं प्रतिजैविक आहे की तुम्ही कितीही चुकीच्या माणसांबरोबर फिरा, वाईट लोकांच्या संगतीत राहा तरी त्यांच्यातील एकाही दुर्गुणाला तुमच्या शरीरात प्रवेश करू देत नाही. खिशात कितीही नोटा असल्या तरी नशिबाचा टॉस करायला रुपयाच लागतो. पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत केला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात. बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. माणसांची मने विनाकारण दुखावली जातात. आपल्यासाठी माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्त्वाचीच आहेत. माणसाच्या मनावर झालेले काही शब्दांचे घाव दिसून येत नाहीत. पण त्याच शब्दाने मनावर झालेल्या जखमा मात्र खूप खोलवर उमटतात. शाळेच्या कवायतीमध्ये "पीछे मूड" बोलता क्षणी पहिला विद्यार्थी शेवटी आणि शेवटचा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचे दुःख कधीच मानू नये माहित नाही हे आयुष्य कधी म्हणेल "पीछे मूड". पुस्तकातील गणित सोडवायला सूत्र आणि आयुष्यातील गणित सोडवायला मित्र हवे असतात.
31. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. इच्छा पूर्ण होण्याच्या नादामध्ये माणूस बरच काही गमावून बसतो. तो हे विसरतो की अर्धा चंद्र सुद्धा सुंदर असतो. आयुष्यात श्वास आणि विश्वासाची एकसमान गरज असते. श्वास संपला तर आयुष्य संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो की आई वडील. पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नका. कारण काही वेळेला सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून करावी लागते. डोळ्यांना न दिसणारा विषाणू तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर मग डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? वेळ जेव्हा पलटते ना तेव्हा ती सर्व पालटून ठेवते. त्यामुळे चांगल्या काळात अहंकार ठेवू नका आणि वाईट काळात संयम सोडू नका. तुमच्या भल्यासाठी किंवा हितासाठी जर कोणी तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत करत असेल तर त्या व्यक्ती पेक्षा तुमचा दुसरा कोणीही चांगला आणि सच्चा मित्र असूच शकत नाही. शब्दाला दात नसतात पण शब्द जेव्हा अंतकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात आणि शब्दांचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं पूर्ण आयुष्य संपून जातं पण घाव मरत नाही. तेव्हा बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. थोडेच बोला पण नीट बोला. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. स्वीकारावं लागतं कधी कधी काहीच परत पहिल्यासारखे होणार नाही. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. म्हणून आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधी वागू नका. तुम्ही आमचे होऊ शकणार नाही याचे वाईट वाटत नाही. फक्त दुःख एवढेच आहे की आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. माणूस मनाने श्रीमंत असेल तर आर्थिक गरिबीचा त्यावर खास फरक पडत नाही. त्याला घेणे कमी देणे जास्त माहीत असते. फक्त काही वेळा चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कटू वाटत असला तरी तोच खरा योग्य मार्ग दाखवत असतो. विचार कितीही सुंदर असू द्या जोपर्यंत ते व्यवहारांमध्ये आचरणात येत नाहीत तोपर्यंत त्यांची किंमत शून्य असते. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवण यात फार मोठं अंतर आहे. साठवले जाते ती रक्कम असते आणि जपली जातात ती आपली माणसं असतात. जळणारे आणि छळणारे यांचं कधीच भलं होत नाही. कारण ते स्वतःचा वेळ लोकांचा शाप मिळवण्यातच खर्च करत असतात. वारस केवळ संपत्ती आणि मालमत्तेचा का असावा? गुण आणि संस्काराचा का नाही? कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचा का नसावा? संस्कारच गुन्हेगारी संपू शकतात, सरकार नाही.
32. नात्यांना नेहमी बोलकच ठेवा. कारण अबोल नात्यात गैरसमज जास्त होतात. मग ते नातं कोणतंही असो. डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही. कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही. मग ते एप्लीकेशन असं किंवा नाती. आठवणीत जपून ठेवलेली चित्र आयुष्यात निवांतपणा आणि सुख शोधण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. पैंजण जरी सोन्याचे असले तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयांची असली तरी ती कपाळीच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. आयुष्यात संपत्ती ही कधीही आणि कितीही कमावता येते. पण माणसं कमावण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. माणसाच्या पैशांची जागा फक्त तिजोरीमध्ये तात्पुरती राहते. पण माणसाच्या माणुसकीमुळे त्याचीही जागा ही लोकांच्या मनात कायमस्वरूपी राहते. नात्याची काळजी करायची असेल तर जिवंतपणी करा. कारण मेल्यावर शत्रूचेही डोळे पाणवतात. प्रामाणिकपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान असतो. हा गुण ज्याच्याकडे असतो त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. भूतकाळात कितीही वाईट गोष्टी घडल्या तरीही चांगल्या भविष्याची आशा नेहमी असावी. सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते. आयुष्यामध्ये सर्व काही सोडून द्या परंतु स्मितहास्य करणे आणि आशा कधीच सोडू नका. गर्दीत हरवण्यापेक्षा एकांतात हरवलेलं बरं असतं. कोणी आपला शोध घ्यावा अथवा न घ्यावा परंतु आपला परमेश्वर आपल्याला शोधून एकटं सोडत नसतो. काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्यावाचून राहत नाही. उधार द्या पण विचार करून. कारण आपलेच पैसे भिकारी बनून आपल्याला मागावे लागतात आणि समोरचा स्वतःला मालक समजून तारीख वर तारीख आपल्याला देत राहतो. सूर्यास्त हेच सांगून जातो की काही गोष्टींचा शेवट पण खूप सुंदर असू शकतो. वडिलांचं आयुष्य मुलाचे आयुष्य बनवण्यासाठी खर्च होते आणि काही मुले म्हणतात माझी पत्नी माझ्या आयुष्य आहे. असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही परवा अथवा भीती नसते. जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची जाणीव होत नाही. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खरंच मन खूप मोठं असावं लागतं. माणसं जोडण्याआधी त्यांना ओळखायला शिका. आयुष्यात धोका मिळण्याची शक्यता कमी होईल. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. जो पेपर सकाळी पाच रुपयाला असतो तोच पेपर रात्री पाच रुपये किलोने रद्दीत असतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण निघून जाण्याअगोदर जगून घ्या. कारण आठवणी परत येतात परंतु वेळ नाही. संयम म्हणजे आपल्या रागाविरुद्ध स्वतःचे एक युद्ध असते. राग आणि संयम आयुष्यात एकटेच येतात. पण राग सगळे घेऊन जातो आणि संयम सारं परत मिळवून देतो. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत. आपलेपणा जिव्हाळा फक्त बोलण्यातून नाही तर तो कृतीतून सुद्धा दिसला पाहिजे. कारण शब्दांच्या तुलनेत कृतीचे पारडे नेहमीच जड असते. नात्याचा मोल जपावं, नात्यात एकमेकांचा आदर करावा पण तो वेळेतच. कारण नंतर दिलेला आधार, माणसांना दिलेला वेळ म्हणजे जणू सुकलेल्या झाडाला पाणी घालून हिरवाईची अपेक्षा करण्यासारखं आहे. हक्काच्या माणसाच्या मिठीत सुख असतं. नातं कोणतंही असो. त्यात प्रेम, हक्क, राग, स्नेह, नाराजी, आपुलकी, चिडणं, चिडवणं, भांडण, हसणं, रडणं, समजूतदारपणा आणि कधीही न संपणारा विश्वास असायला हवा. त्याशिवाय त्या नात्याला परिपूर्णता येत नाही. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. आयुष्याला सोप नाही फक्त स्वतःला मजबूत बनवावे लागते. योग्य वेळ कधीच येत नाही, फक्त वेळेला योग्य बनवावे लागते. पैसा नसलेल्या माणसापेक्षा ध्येय नसलेला माणूस सर्वात गरीब असतो. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजण्यासाठी नाही तर अनुभव, नाते, मान-सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाई मध्येच मोजले जातात. आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका. कारण गैरसमजुतीने एकदा का नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य. वाक्यातले वजन आणि संवादातले भाव कळायला वय नाही तर मन असावे लागते. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे तो म्हणजे परमेश्वर. खेळ तर चालूच राहणार प्रश्न आहे की तुम्ही आयुष्याबरोबर खेळत आहात की आयुष्य तुमच्याबरोबर? नेहमीच शांत राहणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं. वेळेची गरज ओळखून स्वतःचे मत मांडणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपलीच माणस आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात. आयुष्यात खेळ कोणताही खेळा पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्यांच्या भावनांचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. आयुष्यात एक नियम ठेवा. सरळ बोला, खरे बोला आणि समोर बोला. म्हणजे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप दूर होत जातील. वाईट गोष्ट आहे की वेळ कमी आहे आणि चांगली गोष्ट आहे की अजून सुद्धा वेळ आहे. गुंतवणूक अशा ठिकाणी करा की जिथून फायदा नाही मिळाला तरी चालेल पण नुकसान होता कामा नये. मग ते नातं असू दे किंवा व्यवसाय. कधी कधी कोणी आपल्याला वाईट समजलं तर समजू द्या. शेवटी आपल्यासाठी आपल्या भावना महत्वाच्या आहेत. ज्या दिवशी माणसाला समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत त्या दिवशी आयुष्यातील अनेक गैरसमज दूर होतील. मोह नसावा पैशांचा आणि गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा. तरच आयुष्याला अर्थ आहे नाहीतर सगळं व्यर्थ आहे. सल्ले देणारे बरेच भेटतात पण लढायला एकट्यालाच लागतं मग ते मैदान असो किंवा आयुष्य एकदाच असतं. बरं झालं सोबत काही नेण्याची देवाने परवानगी दिली नाही. कितीही कमावलं तरी येथे सोडून द्यावं लागतं. जर सोबत काही नेता आला असता तर माणसं कशी वागली असती आणि कोणत्या थराला गेली असती याचा विचार करूनच अंगावर काटा उभा राहतो. आयुष्य काय असतं हे त्यांना विचारा ज्यांचा श्वास सुद्धा फुग्यात विकला जातो. शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ते आयत्या पिठावर रेघा मारण्यात नाही. विज्ञान कितीही प्रगत झाला तरी नीतीच्या होणाऱ्या खेळाला थांबवू शकत नाही. काही विषयांच्या खोलात न गेलेलं बरं. बोलण्यासाठी मुद्दा गरजेचा नाही. भावना असणे गरजेचे आहे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. स्वभाव असा ठेवा की आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आपल्याला विसरली नाही पाहिजे. दुसऱ्यांबद्दल वाईट तेवढेच बोला जेवढं स्वतःबद्दल वाईट ऐकू शकाल. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची हिम्मत पाहिजे. आनंद पैशावर नाहीतर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो. जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला चांगल्या नात्याला जपा. नेहमी तीच माणसं तुमच्याकरता धावत येतील. आपला माथा तिथेच झुकवा ज्यांची पावलं तुमच्या सुखदुःखात न कळवता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचतात. प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते. पण भाकरीचे पीठ हे प्रत्येक घरात सारखेच असते. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये. वडिलांची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. तो दिवस नक्की आणेण ज्या दिवशी माझे विरोधक पण मला फॉलो करतील. जर लोकांना तुमच्याशी काही अडचण असेल तर लक्षात ठेवा की ती त्यांची अडचण आहे तुमची नाही. आयुष्य म्हणजे तुमच्या हातातून निघून जाणाऱ्या वाळू प्रमाणे आहे. याच आठवणीत राहणार फक्त तुमचा स्वभाव आणि तुमची वर्तवणूक. वेळ सगळ्यांवर येथे आणि वेळ सगळ्यांची येते. म्हणून वेळेची सगळ्यांनी वेळोवेळी आठवण ठेवावी. विश्वास घातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. अपेक्षा करणं चुकीचं नसतं तर चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणं चुकीचं असतं. काही गोष्टींची किंमत माणसाला वेळ गेल्यानंतरच कळते. जर नात्यांमध्येच धूळ पडली असेल तर ते नाते असले काय नसले काय काही फरक पडत नाही. जर माता पार्वतीने तपस्या केली असेल तर भगवान महादेव वाट पाहत असतील. जर डोळ्यांमध्ये अश्रू सीता मातेचे असतील तर तडप श्रीरामांची पण असणार. राधा कृष्णाला कधी मिळू शकली नाही तर त्याच्याशिवाय श्रीकृष्ण सुद्धा अपुरे राहिले. आयुष्य जर परमेश्वराला सुद्धा सरळ नव्हते तर आपणाला कसे काय सरळ असेल? स्वतःला समजवणारा आपल्यामधील स्वतः हरवता कामा नये. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचे ज्ञान. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यात जमीन आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं. माणसाच्या पडण्यामागे त्याची हार नाही. तो माणूस आहेस अवतार नाही. पड, उभा रहा, चाल, पुन्हा पळ. माणूस कितीतरी वेळा हारेल परंतु प्रत्येक वेळेला नाही. दिन दुबळ्यांना गरिबांना कधीही त्रास देऊ नका. कारण तो कोर्टात किंवा कचेरीत जाऊन न्याय मागत नाही. तर तो देवाच्या दारात जाऊन न्याय मागतो आणि देव जेव्हा न्याय करतो त्यावेळी तेथे कोणताही पुरावा साक्षीदार किंवा लाच चालत नाही. शोधायचा असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका. कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे पवित्र असतो? फुलात सुद्धा किडे असतात. दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा. माणसातसुद्धा देव दिसेल. एखाद्या माणसाच्या हातून एखादे काम चुकीचे होत असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करता येतो. परंतु एखाद्या कामासाठी माणूसच चुकीचा निवडला असेल तर काहीच करता येत नाही. प्रत्येक वेळी जाऊदे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजे. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत की त्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळले की मैत्री होते आणि कोणी मनात शिरले की प्रेम होते. दुसऱ्याला चुकीचे समजण्याआधी स्वतः किती बरोबर आहात हे अगोदर बघायला शिका. प्रत्येक चुकीला माफी नसते, काही चुकांना शिक्षाही द्यावेच लागते. माणसाला वेद वाचता नाही आले तरी चालतील परंतु माणसाच्या वेदना वाचता आल्या पाहिजे. अशा माणसांना जपावे जी शिंपल्यासारखी खूप कमी असतात या जगात जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाही. ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे जाण्याची चाल दिली त्याला कधीही कमी लेखू नका. तुमच्यापेक्षा जास्त कुवत असूनही तो फक्त तुमच्यासाठी मागे थांबलेला असतो याची जाणीव ठेवा. आयुष्यात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील. कारण नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात. भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊ देईलच याची खात्री नसते प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची. भावनाप्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना आधार ठरतो. कसलेच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नाही. मनाने विचार करणे म्हणजे भावनांचा खेळ आणि बुद्धीने विचार करणे म्हणजे आयुष्याचा मेळ. मन आणि बुद्धी या दोन्ही अंगाने विचार करणे म्हणजे आयुष्यात साधला जाणारा ताळमेळ.
33. यश मिळवायचं असेल तर ध्येयावर लक्ष केंद्रित करा, अडथळ्यांवर नाही. प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधुळ नसते. सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुले सर्वात जास्त पायदळीच तुडवली जातात पण तरीही ते ओंजळीना आणि पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही सारखाच सुगंध देतात. कदाचित ती आपल्याला शिकवून जातात की पुढच्याला वागायचं तसं वागू देत पण तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम रहा. आपल्या अस्तित्वाचा परीघ लहान असला तरी हरकत नाही पण तो स्वकर्तृत्वावर तयार झालेला असावा. राजकारण हा एक असा खेळ आहे जो हुशार माणसे खेळतात आणि मूर्ख माणसे दिवसभर चर्चा करून आपल्याच मित्रांच्या बरोबर संबंध खराब करतात. आयुष्यात काही निर्णय अतिशय कठीण असतात आणि हेच कठीण निर्णय एक दिवस आयुष्य बदलून टाकतात. जगाबरोबर लढू शकतो आपण, आपल्या माणसांबरोबर नाही. आपल्यासोबत जिंकायचं नसतं, जगायचं असतं. चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत. पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. आयुष्याच्या शेवटी जे मिळालं त्यातच आनंदी राहायला शिकलं पाहिजे. कारण हातातील बोट सुद्धा शिकवतात की एक सारखं कोणी नसतं. हात पकडताना दोन्ही कडून विश्वास असावा लागतो मग ते प्रेम असो किंवा मैत्री. रथाला योग्य सारथी तसा आयुष्याला योग्य साथी लाभला तर पराभव कधीच होत नाही. चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं होत नाही. त्यासाठी मन सुंदर असावं लागतं. आयुष्याच्या मैदानात उतरल्यावर प्रत्येक वेळी जिंकण्याचा हट्ट नसावा. काही गोष्टी शिकण्यासाठी असतात,थोडा त्यातही आनंद घ्यावा. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही आणि ती म्हणजे आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा. आयुष्यात आपली माणसं खूप असतात पण त्यात आपलेपणा असणारी मोजकीच असतात. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी. कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो. प्रत्येकामध्ये काही ना काही हुशारी असते त्यामुळे कोणालाही कमी समजू नका. मित्राला खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो. पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. जेव्हा काही लोकांना तुमचा चांगलेपणा सहन होत नाही तेव्हा ते जगाला तुमचा वाईटपणा सांगत फिरतात. उपवास नेहमी अन्नाचाच का असावा? कधी कधी स्वार्थ, चाडी, खोटे, क्रोध, कुविचार यांचा सुद्धा असला पाहिजे. अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. आपल्याला पंखासाठी म्हणून कधीच उडावे लागत नाही पण उडण्यासाठी मात्र पंख लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते. भूमितीच्या पुस्तकात त्रिकोण आणि सगळे कोण सापडतात पण दृष्टिकोन सापडत नाही. कारण तो भूमितीत नसतो, भूमिकेत असतो. हे जग एक रंगभूमी आहे. आपण सारी मंडळी रंगभूमीवरील विविध भूमिका करणारी पात्र आहोत. चंद्र, सूर्य, तारे, प्रकाश योजना आणि निसर्ग उत्तम संगीत संयोजक आणि तो सर्व साक्षी परमेश्वर कुशल निर्माता दिग्दर्शक असतो. प्रत्येक पात्राची सुरुवात आणि शेवट हे तोच ठरवत असतो. नियतीच्या हातात लेखणी शोभून दिसते. अंतिम सत्य हेच आहे की प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली भूमिका प्रामाणिकपणे करायला हवी एवढेच. तोल सांभाळता आला नाही तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. कारण याच तोंडामुळे कामं घडतात पण आणि बिघडतात पण. एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती? गाड्या किती? बँक बॅलन्स किती? परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे? म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. संघर्ष हे प्रगतीच आमंत्रण असते. जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो तलवारीचे सुद्धा एका वाघ नखांवर जिंकता येते. वय थकवू शकत नाही आणि धक्के पाडू शकत नाहीत. जर जिंकायची जिद्द असेल तर हार सुद्धा हरवू शकत नाही. प्रत्येक जण स्वतःचे निकष वापरूनच आयुष्याकडे पाहतो म्हणूनच जगात एका वृत्तीची एकच व्यक्ती असते. चेहरा पाहण्यापेक्षा कर्तुत्व पहा कारण कर्तुत्वाला दिखावा करता येत नाही. समजूतदार व्यक्तीसोबत थोड्या वेळासाठी केलेली चर्चाही हजार पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. मनातला कचरा रोजच्या रोज साफ करता आला तर हलकेफुलके जगता येते. नातं कोणतंही असेल रुजते तिथेच जिथे त्या नात्याला वेळ आणि किंमत असते. आयुष्यात काही प्रश्नांना वळसा घालून पुढे जाणं म्हणजेच समाधानला जवळ करणे. दिशादर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर मार्ग चुकण्याचा प्रश्नच येत नाही.
34. काही वेळा खूप संयम लागतो नाती टिकवायला नाही तर जग तयारच आहे महाभारत पाहायला. समज हा साखरेप्रमाणे असतो आणि गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो. आयुष्याच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तुम्हाला बुडवायला जगात अशीही काही माणसं बसली असतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलं होतं. आपलेच आपल्यावर उलटतात यात काही शंका नाही. कोणीतरी उलटलं म्हणून आपण त्यांना आपलं म्हणणं सोडत नाही. उलटणारा आपली लायकी दाखवत असतो आणि आपण आपला चांगला स्वभाव. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. जुने कपडे, आई-वडील, गरीब मित्र आणि साधारण राहणीमान या चार गोष्टींची लाज आयुष्यात कधीच वाटू देऊ नका. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करू शकतो पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उखडून टाकत. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास. कारण तो जमिनीवर नाही तर मनावर वाढतो. आयुष्यात पैशाला ठराविक महत्त्व आहे आणि माणसाला कायमचं महत्त्व आहे. पैसा भरपूर असला म्हणजे भाकरी ऐवजी पैसा खाऊ शकत नाही. पण पैसा नसला तरी माणूस कष्ट करून भाकरी खाण्याएवढं कमवू शकतो. म्हणून आयुष्यात माणसाला महत्त्व द्या. कारण पैसा पाहुणा आहे आणि माणूस कायम पाठीशी उभा आहे. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नाही. आजारी पडेल इतके खाऊ नये. कर्ज होईल इतके खर्च करून नये. भांडण होईल इतके बोलू नये आणि पुढील पिढी आळशी होईल इतके कमवू नये. शांत राहणे म्हणजे माघार घेणे आणि निमुटपणे सहन करणे होत नाही. तर ज्या गोष्टी आपण मेंदूच्या आणि ताकदीच्या बळावर बदलू शकत नाही त्या गोष्टींशी लढण्याचा सर्वोत्तम अचूक आणि एकमेव शेवटचा प्रभावी स्वीकारलेला मार्ग म्हणजे शांतता होय. शांत राहणारा माणूस हा कमजोर नसतो तर तो शांततेला ढाल बनवून प्रत्येक परिस्थितीला समर्थपणे तोंड देत असतो. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडाव लागत. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं.हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागत. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशी जुळवून घ्यावे लागतं. खूप प्रयत्न करूनही आपण कुठेतरी कमी पडत जात असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो.सारे स्वप्न पूर्ण करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात. माणूस जपत गेलो तर आपली स्वप्न स्वतः तोडावी लागतात. कुठेतरी जिंकत असताना कुठेतरी हरत असतो. काहीतरी कमवत असताना काहीतरी गमवत असतो. हेच आयुष्य आहे. येथे आपण जगत कमी आणि लढत जास्त असतो. चूक होत असते पण एकच चूक परत परत करत नाही तो यशस्वी होतो. जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्यांना कळतो त्यांच्या आयुष्याविषयी फारशा तक्रारी नसतात. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही. क्षमा शब्द जरी लहान असला तरी करायला मन मात्र मोठं लागतं. दुःख शब्द जरी लहान असला तरी पचवायला मन मात्र मोठं लागतं. चूक शब्द जरी लहान असला तरी मान्य करायला मन मात्र मोठं लागतं. आधार शब्द जरी लहान असला तरी द्यायला मन मात्र मोठं लागतं. सुख शब्द जरी लहान असला तरी वाटायला मन मात्र मोठं लागतं. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही म्हणून आयुष्य हसत हसत जगा. वेळ, तब्येत, नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते. पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. काही वेळा जशी वळणं येथील तसं वळावं लागतं. आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात. चढ आणि उतार हे येतच राहतात. फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही. तुमचं नाणं फक्त खरं असून चालत नाही. त्याला वाजून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी असायला हवी. नशिबाने किंवा कष्टाने मिळवलेल्या पदाचा गैरवापर करू नका. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच लायकी पेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही. स्वतःवर कधीही अहंकार करू नका देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं. जो प्रामाणिकपणे काम करतो चुका त्याच्याकडून नकळत होतात. रिकामटेकड्या लोकांचे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच जातं. निसर्ग जेवढे आवश्यक आहे तेवढ्या गरजा पूर्ण नक्कीच करतो. पण काही माणसांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे त्या अपूर्ण राहतात. खपण्यासाठी खूप पुस्तके छापली जातात. आपल्याला जपण्यासाठी एखादं छानसं पुस्तक निवडता आलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसे जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला अर्थ आहे. डोळे वाचता आले पाहिजेत कारण प्रत्येक जण आपले दुःख शब्दांमध्ये सांगू शकत नाही. हिरा आणि काचेत फरक काय असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. आपल्या आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे आली तरी थंड रहा. कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात देतो तोच हिरा ठरतो. आयुष्यात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्त्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला. कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. शिक्षा द्यायला आम्हाला पण येते परंतु तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही शांत आहे. समजून घेणारा डोळ्यात पाहून सुद्धा समजून घेईल आणि समजून न घेणारा त्याला निबंध सारखं जरी लिहून दाखवलं मनातलं तरी त्याला निबंधाचा विषय पण समजणार नाही. मनातून उतरलेल्या चुकीच्या, वाईट, स्वार्थी लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवायचे नसते. देवाने दिले त्यातलं थोडसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. पत्त्यांमधला जोकर आणि जवळच्या माणसांनी दिलेली ठोकर कधीही डाव बदलू शकतात. बहुतेक वेळा आपण व्यवस्था करण्यातच एवढे व्यस्त असतो की आपली अवस्था काय झाली आहे ते लक्षातच येत नाही. या जगात एकच असे न्यायालय आहे जिथे माणसाने आयुष्यभर जोपासलेला "मी" पणा स्वतः सोबत काही क्षणात जळून खाक होतो ते म्हणजे स्मशानभूमी. अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल. कारण तुमची भावी पिढी तुमच्या मृत्यूचा बदला घेईल. परंतु अन्याय सहन करून मराल तर तुमची भावी पिढी तुमच्याप्रमाणेच गुलामच राहील. जीवाच्या आकांताने घेतलेली झेप आयुष्य तारते. तशी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जीव ओतून करणारे नेहमी यशस्वी ठरतात. चुकीचं शिकणे महत्त्वाचे आणि थकून टिकणे महत्त्वाचे. रडून घडणे महत्वाचे आणि पडून धडपडणे महत्त्वाचे. उरून पूरणे महत्त्वाचे आणि हारून बहरने महत्त्वाचे. आपला सहवास सोबतच्या व्यक्तीला कैद वाटू लागला की भावनांचे पाश तोडून त्या व्यक्तीला मुक्त करणे दोघांच्याही हिताचे असते. स्वतःचे कष्ट, अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले रहस्य दुसऱ्या स्वार्थी मतलबी आणि विश्वासघातकी लोकांना सांगू नका. कदाचित हे तुमच्या विध्वंसाचे कारण बनू शकते. कोणत्याही यशामध्ये कधीही रहस्य वगैरे नसते तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यातून ते यश साध्य करता येते. समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे सुद्धा कळत नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. जो मनातूनच स्वच्छ आहे तोच बाहेर चमकतो. माणसाने नेहमी तयारीतच राहावे कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही. आगमनाचा बदला भांडण करू नव्हे तर समोरच्या व्यक्ती पेक्षा जास्त यशस्वी बनवून घेतला जातो. ज्यावेळी वेळ आणि परिस्थिती खराब असते त्यावेळी बरेच काही ऐकावे आणि सहन करावे लागते. आयुष्याच्या शेवटी जेवढे आहे तेवढ्यातच समाधानी राहिले पाहिजे. कारण प्रमाणापेक्षा जास्त उजेड माणसाला आंधळा बनवतो. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भेटीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदलल्या तरी चालतील पण आपल्या गरजेप्रमाणे माणसं बदलू नका. आयुष्य जगताना खरंतर कण्डक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बस आपली नाही. बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सुपूर्त केले की झालं. कौशल्य बघून कोणीही प्रेम करू शकतात. आयुष्यात जागा त्याला द्या जो तुमच्यामध्ये कमतरता असून सुद्धा तुमची साथ कधीच सोडणार नाही. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या आयुष्यात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. म्हणूनच आयुष्यात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी नक्कीच मैत्री करावी कारण कधीही संख्यांपेक्षा गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. गैरसमज हा खूप मोठा आजार आहे. याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व नातेवाईकांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. माणसं बदलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली परिस्थिती बदला म्हणजे बाकी सगळे आपोआप बदलेल.
35. डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा तो ताठपणे उतरतो. हा निसर्गाचा नियम आहे. कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे. अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो, अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो. सत्य स्वीकारणारी, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचा मोठेपण मान्य करणारी, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कोणाच्याही संकटात धावून जाणारी, कोणाच्या मार्गात अडथळा न आणणारी आणि आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी माणसे देव नसली तरी देव माणूस असतात. जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते. कारण शांत मनाची अमर्याद शक्ति ही तोच व्यक्ती अनुभव शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार म्हणत नाही, सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो. नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे. कारण पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडतं. पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज. सोबत काही येत नाही. स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता येत नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसे कमवा. आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे माणसाचे मन खचून जाणे. एकदा मन खचले की त्याला उभारी घ्यायला फार कठीण असते. म्हणून माणसाने कधीही खंबीर राहणे आवश्यक असते. आयुष्यात अडचणी अनेक येत असतात. त्याला तोंड देऊन जगणे हेच आयुष्याचं तत्व असते. जोडणं खूप सोपं असतं परंतु जपणं फार कठीण असतं. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच, आपण काय शोधतो? हे महत्त्वाचे. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. स्वतः कडून झालेल्या चुकांची कबुली स्वतःच देणे यापेक्षा छान गोष्ट कोणतीच नाही. आयुष्यात हे ज्या व्यक्तीला जमते तोच व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या विश्वासाला पात्र असतो. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका. इतिहास पण साक्षी आहे माणसाचे डोळे तीच लोक उघडतात ज्यांच्यावर माणूस डोळे झाकून विश्वास ठेवतो. माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतः करून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं आयुष्य आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देवू शकत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमीच सुख देऊन जातं. आपलं आयुष्य हे एखाद्या सरळ रेषेप्रमाणे कधीच नसते. दररोज छोटे किंवा मोठ्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागत असते. बदल होणे हे जर अटळ असेल तर मग अटळ गोष्टी आपण स्वीकारताना आपला दृष्टिकोन हा सकारात्मकच असायला हवा. आयुष्यात एकच गोष्ट शाश्वत आहे ती म्हणजे बदल. आपण जर हा झालेला बदल जसाच्या तसा स्वीकारला नाही तर विनाकारण आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो. आपल्या आयुष्यात जे काही बदल होणार आहेत ते कधी फायद्याचे असतील किंवा नुकसान करणारे असतील हे दोन्हीही बदल आपण जितक्या लवकर स्वीकारता येतील तितक्या लवकर स्वीकारायला पाहिजेत. चांगली माणसं आपल्यासोबत वाईट वागतील असे होऊ शकते. चांगली असणारी नोकरी धोक्यात येऊ शकते. चांगला चालत असणारा व्यवसाय कधीकधी बंद पडण्याची शक्यता असू शकते. खूप चांगला अभ्यास करूनही आपण कधी कधी अपयशी सुद्धा होऊ शकतो. आपल्या हातात फक्त झालेला बदल स्वीकारणे व पुन्हा एकदा प्रयत्न करणे हेच आहे. म्हणून आपल्याला आयुष्यात झालेला बदल लवकर स्वीकारता यायला हवा तसेच त्या बदलांसोबत लवकर जुळवून सुद्धा घेता यायला हवे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो माणुसकी विसरतो. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलो. फायदा कायम संधीचा घ्यावा, विश्वासाचा नाही. माणसाला परके कोण आहेत हे कळण्यापेक्षा आपले कोण आहेत हे कळायला जास्त वेळ लागतो. हक्काचे माणसं कारण नाही वेळ देतात. खूप कमी माणसं मिळतात ज्यांच्या सोबत मनमोकळे करता येते. जेव्हा मेंदू व मन दोन्ही शांत असतात तेव्हाच मनुष्याला मन:शांती मिळते. आर्थर ash हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता. 1983 मध्ये त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्याने त्याला कॅन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पत्रे येत राहिली. त्यातील एका पत्रात म्हटले होते की इतक्या वाईट आजाराने देवाने तुलाच का निवडले? या पत्राला उत्तर देताना आर्थर म्हणतो, पाच कोटी मुले टेनिस खेळाडू लागली. पन्नास लाख मुले टेनिस खेळायला शिकली. त्यातील पाच लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली. त्यातील पन्नास हजार मुले टेनिस सर्किटमध्ये दाखल झाली. त्यातून पाच हजार मुले ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी निवडली गेली त्यातील. फक्त 50 टेनिसपटू विंबलडनसाठी निवडले गेले. त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत पोचले. त्या दोघांच्या नंतर मी जेव्हा विंबलडणासाठी विजेतेपदाचा करंडक उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले नाही की माझीच निवड का केलीस? मग आत्ताच वेदना होत असताना माझीच निवड का केली असे मी देवाला कसे विचारू?" सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हाला माणूस बनवते. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. एखाद्याला शब्द दिला की निर्माण होते ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनण हे गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणार ठरत. कोणाच्यातरी दुःखाचे औषध बनण्याचा प्रयत्न करा, जखमा तर काय कोणीही देत. ज्याला प्राप्त करू शकत नाही, आवश्यक नाही की त्याच्यावर प्रेम करणे सोडून द्यावे. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. खूप धाव धाव करावी लागते आयुष्याची गाडी नेमक्या फलटावर आणण्यासाठी. मरेपर्यंत कष्ट नावाचा प्रवास करावा लागतो कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी. बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळंच आठवतं. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणे हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे गुदमरणच. भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडीत समाधान कमी आणि कुरकुर जास्त असते. हक्क गाजवणे अगोदर त्या नात्याची कर्तव्ये पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. आपल्याला समजून घेणं प्रत्येकाला जमलेच असं नाही. पण ज्याने तुम्हाला समजून घेतलं त्यांची साथ कधीच सोडू नका. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नसते. कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. त्यामुळे वाईटा ची संगत नुकसान करत असते. शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराचा गुन्हा सिद्ध होताच पुढच्या क्षणी गुन्हेगाराचा चौरंग केला जायचा. चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि पाय तोडून टाकणे. जर शिवकालीन शिक्षा कायद्याने अमलात आणली तर बलात्काराची शक्यता कमी होईल. मदत त्यालाच करावी जो त्या मदतीची जाणीव ठेवतो. ज्याच्या मनात तुमच्याबद्दल वाईट आणि घाणेरडे विचार आहेत त्याला मदत अजिबात करू नये. आवड आणि प्रेम यामधील फरक काय? जेव्हा तुम्हाला एखादा फुल चांगलं वाटतं आणि तुम्ही ते तोडता ती आवड. पण जेव्हा एखादा फुल चांगलं वाटतं आणि तुम्ही त्याला पाणी घालता ते प्रेम. कर्माजवळ कागद नाही, पुस्तक नाही. तरी त्याच्याजवळ सर्व जगाचा हिशोब असतो. स्वतःच्या मेंदूच्या घोड्याला फक्त एकाच दिशेमध्ये पळवण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. नाहीतर भरकटून कुठेतरी दुसरीकडे जाल. आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही स्वतःचे अंतकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई आणि स्वतः दुखी राहून दुसऱ्याला हसवणारा देव माणूस म्हणजे बाप. काही नाती यामुळे नष्ट होतात की एक फक्त वाट बघतो आणि दुसऱ्याला त्याची अजिबात किंमत नसते. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो. समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. संयम आणि वेळ या दोनच शब्दात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहे. कर्तुत्वान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले डंख हे नवे पंख देऊन जातात. काटा रुतल्या शिवाय वाटा सापडत नाही हा यशाचा सिद्धांत आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे कौशल्य वाढवणे म्हणजे सुख. माणूस माणसाशी मोकळेपणाने बोलला तर निम्म्याहून जास्त संसार सुखी होतील. आज आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करतोय. भावनात्मक माणसे संबंधांना सांभाळतात, व्यवहारीक माणसे संबंधाचा फायदा घेतात आणि काही मोठी माणसे फायदा बघून संबंध ठेवतात. आईच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी हा तिच्यासाठी सर्वात मोठा दागिना असतो. कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका. कारण त्यांना झालेला त्रास ते बोलून दाखवत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात. काही माणसांना घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर ती माणसे सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतात. खरंच किती छान असतं ना, आपण कोणाला तरी आवडण. कुणीतरी तासन तास आपलाच विचार करणं. कोणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं. कुणीतरी आपला विचार करत पापणीवर पापणी अलगत टेकवण. झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं. काळजात साठवण. कोणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटण कोणाच्यातरी वैयक्तिक डायरीत आपलं नाव असणं. देवासमोर ही स्वतः आधी आपलं सुख मागणं, किती छान असता ना ! ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकाल त्या दिवशी या जगात तुम्हाला हरवणारा कोणीच उरणार नाही. आजकाल काही लोकांना खड्ड्यातून बाहेर काढणाऱ्या लोकांच्या विचारापेक्षा खड्ड्यात टाकणाऱ्या लोकांचे विचार जास्त पटतात. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्यासमोर नाहीत तर त्याच्या जागी उभं रहावं लागतं. काही वेळा आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला आपल्या स्वतःसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच तेच करून काहीही होणार नाही. विचार बदलावे लागतील. धाडस करावे लागेल. जमणार नाही ते जमवावे लागेल. मार्ग बदलावा लागेल. काही स्वार्थी माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळू शकाल. दुःखाचा विचार करत बसलो की समोर उभं असलेले सुख पण डोळ्यांना दिसत नाही. व्यवसाय कोणताही असो फक्त गुणवत्तेकडे लक्ष असणं गरजेचं असतं. काही वेळा स्वस्तात मिळाल्यामुळे थोडे ग्राहक दुसरीकडे जातात. परंतु कायमस्वरूपी जात नसतात. कारण गुणवत्तेमुळे मिळालेला ग्राहक कायमस्वरूपी समाधानी असतो. तो किमतीपेक्षा गुणवत्तेचा आणि सेवेचा विचार करतो.
36. समजून घेतल्याशिवाय कोणाचीही निवड करू नका आणि न समजून घेता कोणालाही गमवू नका. कारण मोह हृदयामध्ये असतो शब्दांमध्ये नाही आणि क्रोध शब्दांमध्ये असतो हृदयामध्ये नाही. अगरबत्तीचा सुगंध त्याचवेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते. पद सुद्धा एक दिवस निघून जाते. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे दोन सुखाचे घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत असतोच. जेव्हा संधी येते तेव्हा तयार रहा. कारण तयारी आणि संधी यांची भेट होते तेव्हा नशीब बदलते. कधीच नुसतं ऐकलेल्या वाक्यावर विश्वास नाही ठेवायचा कारण ऐकलेल्या गोष्टीत तीन पैलू असतात. त्यांचं, तुमचं आणि सत्य. मन वाचता आलं की शांततेला सुद्धा वाचा फुटते. ज्या लोकांनी वाईट वेळ आणि वाईट परिस्थिती खूप पाहिली आणि अनुभवली आहे त्यांना एखाद्याचं वाईट व्हावं असं मनात कधीच येत नाही. जर कोणी स्त्री-पुरुष एकमेकांचे चांगले मित्र असतील तर आवश्यक नाही की त्यांच्यात काही वाईट संबंधच असतील. कारण काही नाती ही खूपच पवित्र असतात. फक्त आपण त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहायचे हे आपल्या विचारांवरच अवलंबून असते. आयुष्य जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते. आयत्या सुखाला किंमत नसते. स्वकष्टाची भाकरीच गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या. आयुषभर मुलं बसून खातील इतका मागे ठेवूच नका. जसे अती पाणी रोप कुजवते, तसे अति प्रेम मुलांना अपंग बनविते. कोणासाठी अश्रू येणं ही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी अंतकरणापासून प्रेम असावं लागतं. ज्यांनी आपल्यासाठी काय काय केले याची जाणीव असेल तर नक्कीच मन त्या व्यक्तीसाठी दुखी होतं. उगीच कोणासाठी कोणी रडत नसतं. पैशांना फक्त माणसाचं राहणीमान बदलू शकतं पण त्याची नियत, नशीब आणि लायकी नाही. ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाही. उलट आपल्यालाच चुकीचे ठरवतात. आयुष्यात व्यस्त आणि गर्विष्ठ लोकांपासून नेहमी लांब रहा. कारण व्यस्त लोक त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार बोलतात तर गर्विष्ठ लोक त्यांच्या स्वतःच्या मतलबानुसार बोलतात. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदण जास्त महत्त्वाचं असतं. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. आयुष्यात स्थिर असे काहीच नाही. म्हणून स्वतःला अधिक तणावामध्ये ठेवू नका. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी नक्कीच बदलते. विश्वास जपणं खूप महत्त्वाचा असतं. कारण एकदा दिलेला शब्द खाली पडला की माफ करा या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देता आली पाहिजे. मग वेळ खराब असो किंवा चांगली तर ते प्रेम खरं मानलं जातं. ज्यांना स्वतःच्या किमतीचा अंदाज नसतो त्यांना हे जग स्वस्तामध्ये लुटते. एखाद्याचे सुख पाहून ते आपल्या वाट्याला नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही याच समाधान मानलं तर आयुष्यात कधी दुःखी न होता सुखी आयुष्य जगता येते. दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास आयुष्याकडून मिळत असतात. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचा की आलेले क्षण जगायचे हे आपणच ठरवायचे असते. कात्रीची धार गेली तर एकवेळ कापड कापलं जात नाही. पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमखास कापल जातं म्हणून नातं विश्वासावर चालतं. देव अनेक रूपात मदतीला येतो. त्याला शोधू नका तर ओळखा. स्वतःला असं घडवा की लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते, तिथून आपली सुरू झाली पाहिजे. प्रसिद्धी इतरांच्या जीवावर नाही तर आपल्या कामाने आणि स्वकर्तुत्वाच्या बळावर झाली पाहिजे. रक्तात निष्ठा आणि शब्दात बेईमानी नसेल तर ते शक्य आहे. मी मोठा की तू मोठा यातच काही जणांचं आयुष्य संपून जातं. आयुष्याला श्रीमंतीचा साज असावा पण त्यात संपत्तीचा माज नसावा. कारण आपण सर्वच सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. पाहुणचार संपला की कळणार सुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी, काही भावुक क्षण विश्वासाने सांगत असेल तर त्यांचा विश्वास कायमस्वरूपी टिकवून ठेवणं ही तुमची नैतिक जबाबदारी असावी. कुणा अनोळख्या समोर क्षुल्लक गोष्टीसाठी स्वतःच मोठेपणा दाखवण्याच्या नादात तो विश्वास कधीच गमवू नये. काही चुकीचे निर्णय आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात. तुम्ही किती बुद्धिमान आहात यापेक्षा स्वतःजवळ असलेली हुशारी वेळप्रसंगी तुम्ही कशी वापरता यावरून तुमची बुद्धिमत्ता ठरत असते. नसलेलं मोठेपण दाखवून नावलौकिक मिळवण्यापेक्षा जसे आहात तसेच राहून आपलं माणूसपण जपलेल बरं. पाठ असो कि मन एकदा वळले की बऱ्याचदा काही हाका ऐकू येत नाहीत. कधी कधी शब्द ढाल वाटत असले तरी मौन त्याहीपेक्षा जास्त जहाल असतं. बराच अथक प्रयत्न करून झाल्यानंतर खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आहोत. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत. काही वेळा खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य अगोदर माहीत असतं. जेव्हा सर्व मार्ग संपतात तेव्हा स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण करावा लागतो. आपल्याला झालेला त्रास विसरा पण कोणामुळे झाला हे कधीही विसरू नका. काही काहीवेळा असे होतं की बरे वाटण्यासाठी औषधाची नाही तर काही प्रेमळ शब्दांची आवश्यकता असते. जो रागात काही वेळा म्हणतो मला तुझ्याशी काहीच देणे घेणे नाही तुमची काळजी त्याच्या इतकी कुणालाच नाही. पूर्ण जग जिंकता येते ते संस्काराने आणि जिंकलेले ही निघून जातं ते अहंकाराने. पोटापाण्यापुरता स्वार्थ नक्कीच असावा. मात्र कोणाच आयुष्य उध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात कोणत्याही परिस्थितीतून त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा. परिस्थिती कशीही असो आपल्यात उठून उभे राहण्याची जिद्द असावी. ज्यांच्या आयुष्यात वेळोवेळी संघर्ष, अडचणी, निंदक, विरोधक असतात तीच योग्य मार्गी लागतात. आशा दोन अक्षरांच्या शब्द असला तरी पूर्ण जग या शब्दावर अवलंबून आहे. सांगत अशा लोकांची ठेवा जे तुम्हाला मोठे होण्यासाठी प्रोत्साहन देतील. निस्वार्थ प्रेम आणि अतुल विश्वास ही अशी दोन रूपं आहेत जी कधी कोमजत नाहीत आणि कोमजली तर त्याचा काही इलाज नाही. समजून घेणं चांगलं आहे पण दरवेळी नाही. माणसाने पैसा बरोबर पुण्य कमवावं. कारण पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते पण तसं पुण्याचं नसतं पुण्य जरी दिसत नसल्या तरी वेळ आल्यावर माणसाला उपभोक्ता येतं कमावलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथेच कमावलेल्या पुण्याचं काम चालू होतं. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवाशी बनवा. अहंकाराच्या बंगल्यात कधीच जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. परमेश्वराला दिला गेलेला वेळ कधीच वाया जात नाही. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची. व्यक्तींच मोल समजण्यासाठी काही वेळा एक तर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते. काही गोष्टी तोपर्यंत कळत नाहीत जोपर्यंत त्या स्वतःसोबत होत नाहीत. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. माणसाचा स्वभाव थोडा तिखट असावा. कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात. पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही. तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असला की कोणी वाईट माणसे तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल जगात जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा म्हणजे काही लोकं बरोबर हिशोबात राहतील. नशीबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही तर कष्ट करूनच उघडावे लागते. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्त्वाचे असते ती फक्त जिद्द. म्हातारे झालेले आई-वडील मृत्यूला कधीच घाबरत नाहीत. घाबरतात ते फक्त एकाच गोष्टीला आम्ही मेल्यावर आमच्या लेकरांचं कसं होईल? आयुष्यात अडचणी त्याला येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते. आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत ते जिंकतात किंवा शिकतात. वेळेला महत्व द्या पण जिथे तुम्हाला महत्व नाही तिथे वेळ देऊ नका. एकमेकांसाठी जुने होऊनही जिथे बोलायची ओढ जराही कमी होत नाही हे त्या नात्याचं यश असतं. दुसऱ्याचा भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तलाव हा विहरीपेक्षा शेकडोपट मोठा असूनही लोक विहिरीच पाणी पितात. कारण विहीर खोल असून पाणी शुद्ध असते. त्याचप्रमाणे माणूस मोठा असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात सखोलता आणि विचारात शुद्धता असेल तरच तो महान ठरतो. वाईट वेळेत साथ सोडलेला लोकांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचे नसते. पण ज्यांनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणली त्यांची मोल कधीच विसरायचे नसते. जेव्हा वेळ वाईट असेल तेव्हा कष्ट करा आणि जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मदत करा. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय. मी कोणापेक्षा तरी चांगले करीन याने काहीच फरक पडत नाही. पण मी कोणाचे तरी चांगले नक्कीच करेन याने बराच फरक पडतो.
37. लोकांचा विचार केला तर मनासारखं जगता येत नाही आणि मनासारखं जगायचं ठरलं तर लोकांचा विचार करायचा नाही. लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही, त्याला लागलेला गंज त्याला संपवतो. त्याचप्रमाणे माणसाचे विचार माणसाला घडवतात किंवा नष्ट करतात. योग्य व्यक्तीबरोबर तडजोड आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर वादविवाद जो टाळतो तोच समाधानी आयुष्य जगतो. खोटं बोलून नाते कधीच जुळत नाही आणि जरी जुळले तरी ते कधीच टिकत नाही. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नसतो कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध पाजतात म्हणजेच लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात. माणूस बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो. जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकतो. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधं सरळ आयुष्य जगत आलेले असतात. विमानाला सुद्धा उडण्या अगोदर धावपट्टीवर वेगाची सीमा गाठण्यापर्यंत धावावे लागते. तेव्हा कुठे जाऊन ते आकाशात भरारी मारू शकते, उडू शकते. आयुष्याचा सुद्धा हाच नियम आहे. सुखाच्या आकाशात उडण्या अगोदर दुःखाच्या धावपट्टीवर तुम्हाला सहनशीलतेची सीमा गाठावीच लागेल. त्याशिवाय तुम्ही सहज आनंदाची भरारी घेऊ शकत नाही. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या दोन गोष्टी माणसाला त्याच्या विचाराचे आणि आयुष्याचे प्रवाह बदलण्यासाठी भाग पाडतात. आपले डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. संकटे तुम्हाला अडवायला नाही येतं, उलट तुमची हिम्मत वाढवायला येतात. आपल्या राशीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावर नेहमी विश्वास ठेवावा. कारण राम आणि रावणाची राशी एकच होती पण नियतीने दोघांनाही आपापल्या कर्मानुसार फळ दिले. ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते. सुख दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील. जर आलेच नाही तर आपल्याला अनुभव कसे मिळणार? आयुष्यात खुश राहून जगायला शिका. कारण रोज सायंकाळी फक्त सूर्य मावळत नाही तर आपले मौल्यवान आयुष्य सुद्धा कणाकणाने कमी होत जाते. अडचणी ह्या आयुष्यात नसून आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन म्हणतात. जबाबदारीची जाणीव असली की सकाळी कोणत्याही वेळी उठायचा कंटाळा येत नाही. भलेही आपली प्रगती कमी झाली तरी चालेल पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. खूप चटके सहन केल्यानंतरच कडकपणा येतो मग तो चहा असो किंवा आयुष्य. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगली माणसं कधीच टिकत नाही. काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते. चुकत नाही असा कोणीच मनुष्य अस्तित्वात नाही. कुणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. काल आपल्या बरोबर काय घडलं? याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे? याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. जर प्रत्येकाने स्वतःचा विचार करतेवेळी दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचाही विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. अनुभवातून शिकलेला माणूस नेहमी सावधपणे पाऊल उचलतो. जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो पण जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो. झोपायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेसमोर झुका.पण कोणाच्या शक्ती समोर, कोणाच्या रूपा समोर किंवा कोणाच्या संपत्ती समोर कधीही झुकू नये. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत. कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा निकाल पाहण्यात जास्त आनंद असतो. शरीरापेक्षा मनाचा थकवा जास्त त्रासदायक. कारण शरीर थकलं तर शांत झोप लागते पण मन थकलं तर झोप उडते. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच मग पूर्ण जगाने सुद्धा ते तुमच्याकडून हिसकावूण घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, बाकी जग फक्त मजा घेईल. जो फरक औषधांनी पडत नाही तो दहा मिनिटे मित्राशी बोलून पडतो. निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं असेल. दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल. हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं लागतं? हे सांगावं लागत नसतं. आयुष्य खूप सोपे होऊन जाते जेव्हा ओळखणारे नाही तर समजून घेणारे भेटतात. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून घेतो. चुका नेहमी माफ कराव्यात पण अपमान नाही. कोणासोबत बोलण्यासाठी वेळ नाही लागत, मन असावं लागतं. मन असले की वेळ आपोआप काढता येतो. कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं. तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. जबाबदारीची जाणीव असून नुसतं भागत नाही, ती पेलण्याच सामर्थ्यही असावं लागतं. विषय किती वाढवायचा? कुठे थांबवायचा? कुठे दुर्लक्ष करायचा? हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर डोक्यातील खराब विचारांची सुद्धा लाज वाटायला पाहिजे. सुखाचे अनेक भागीदारी भेटतील पण दुःखाचा एक साथीदार भेटायला माणूस नशीबवान असावा लागतो. घराचा प्रमुख होणे सोपे नाही. त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते जो ऊन, पाऊस, वारा, वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो. परंतु खाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो. ज्या नात्यांमध्ये वेळ आणि प्रेम मिळवण्यासाठी भिक मागावी लागते ते नातं कधीच संपलेलं असतं. फक्त एकमेकांना सांगायचं बाकी राहिलेलं असतं. माणूस किती पण आनंदी असू दे. पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा तो फक्त त्याच व्यक्तीची आठवण करतो ज्या व्यक्तीवर तो मनापासून प्रेम करतो. आयुष्याच्या प्रवासात मृत्यू नावाचं शेवट स्टेशन लागेल. ते स्टेशन येण्याआधी प्रवासाचा आनंद घ्या. बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. नात्यात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे बहुतेक वेळा आपल्याला माहीत असतात. अपेक्षा असते ती फक्त वेगळ्या उत्तराची. काही लोकांना आपण मोठे झालेलो आवडतो पण त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आवडत नाही. स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे अनमोल असलेले नाते नष्ट होणार नाही. आयुष्य म्हणजे काय? जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या. 1. रुग्णालय 2. तुरुंग 3. स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्यापेक्षा या जगात सुंदर काहीच नाही. तुरुंगात गेल्यावर तुम्हाला स्वातंत्र्याची महत्त्व समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. स्मशानभूमीवर गेल्यावर आयुष्याची किंमत तुमच्या लक्षात येईल. आज आपण येथे चालत आलेलो आहोत आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असते. आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा. त्याच्याकडे आभार व्यक्त करा. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. भळभळणाऱ्या जखमा सोबत घेऊन सुखी आहे हे सांगायला आईच काळीज लागतं अथवा कवीचं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य. कौतुक चारचौघात करावं आणि चुका एकांतात सांगाव्यात. नातं जास्त टिकतं. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्याच धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही लोकांना न मिळता आलेल्या गोष्टीवर नशीब नावाचा शिक्का मारायला वेळ लागत नाही. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही. माणसांना समुद्रासारखं रहावं, भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. ज्याला दोन हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. कृष्ण प्रेम नाही, प्रेमातला त्याग शिकवतो. प्रत्येक जखम भरली जाते पण ती जखम कधीच भरली जात नाही जी जखम आपल्या माणसांकडून मिळालेली असते. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती काही ना काही देऊन जाते काही आनंद येतात तर काही अनुभव. लोकांना माहीत असते त्या मार्गाने ते तुम्हाला मदत करतात. तणावातून बाहेर पडण्यासाठी एक मित्र तुम्हाला दारू प्यायला सांगेल तर दुसरा मित्र ध्यानधारणा करण्याचा सल्ला देईल. तुम्ही कोणाकडून दुखावला गेला असाल तर एक मित्र तुम्हाला बदला घेण्यास सांगेल तर दुसरा मित्र समोरच्याला माफ करायला सांगून तुम्हाला आयुष्याला सामोर जाण्याचा सल्ला देईल. तुम्ही कुणाचा सल्ला मानता यावर तुमच्या आयुष्यात बराच फरक पडणार असतो. दुर्योधनाने ज्या शक्यता मांडल्या होत्या त्या त्याच्याच शब्दात काय बरोबर हे मला माहीत होते पण त्या दिशेने जाण्याची माझी इच्छा नव्हती. काही चुकीचे आहे हे देखील मला माहित होते आणि ते मी टाळू शकत नव्हतो. त्याला मार्गदर्शन हवे होते आणि त्यासाठी शकुनी मामा तयार होते. दुर्योधन त्यांच्याकडे गेला आणि त्याची परिस्थिती वाईट ते आणखी वाईट अशी झाली. अर्जुनाच्या शक्यता वेगळ्या होत्या. कर्तव्यापेक्षा वैयक्तिक भावनांचा त्याच्यावर जास्त प्रभाव होता. त्यामुळे योग्य बाजू उचलून धरण्यासाठी तो जबाबदारीपासून पळ काढू इच्छित होता. त्याला मार्गदर्शनाची गरज होती त्याचा मार्गदर्शक होता कृष्ण. परिणाम असा झाला की अर्जुनाने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवले. माणूस म्हणूनही आपल्याला हे जीवनात मार्गदर्शनाची गरज असते. तुमचा मार्गदर्शक कोण आहे यावरून तुमच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. त्यामुळे योग्य ती निवड करा. जास्त अंतरावरून नात्यांची किंमत ओळखता येते नाहीतर डोळ्यासमोर सगळेच प्रामाणिक दिसतात. स्वतःमध्ये बघायला धाडस लागते, दुसऱ्यांच्या चुका सांगायला प्रत्येक जण हुशार असतो. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढेच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही खात्री असावी आणि तुला याची जाणीव असणे ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं. कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. निसर्ग चिमण्यांना अन्न नक्की देतो परंतु घरट्यांमध्ये नाही. समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी लेखलं जातं. आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा. जो देऊ शकतो तो घेऊ पण शकतो. प्रवास आयुष्याचा वा ट्रेनचा. सहप्रवासी चांगले असतील तर तो प्रवास कधीच संपू नये असं वाटत असतं. कोणालाही बदलण्याच्या खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. मागच्या जन्मीचे काही ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात. म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल. शब्दांपेक्षा भावनांचं ओझं नेहमी कमी असू द्या, मन हलकं राहील. सत्य बोलता नाही आलं तरीही चालेल मात्र खोट्याच्या बाजूने उभे राहू नका. चेहरे ओळखता येत नाही आणि स्वभाव ही ओळखता येत नाही. कारण दिसते तसे नसते. प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते. माणूस कसा आहे हे त्याला स्वतःला आणि परमेश्वराला बरोबर माहित असते. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. वयाने आणि शरीराने आपण आपोआप मोठे होत जातो. परंतु जोपर्यंत आयुष्यात अडचणी, अपयश आणि गद्दार लोक भेटत नाहीत तोपर्यंत आपण चतुर, हुशार आणि समजूतदार होत नाही. विष काय आहे? आयुष्यात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाले कि ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भुक असो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन युद्ध जिंकता येत नाही. रणांगणात उतरायला स्वतःला धमक असावी लागते. कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहोत हे समोरून येणाऱ्या प्रतिसादावरून नक्कीच कळते. बहिणीवर प्रेम असणारा कोणताच भाऊ त्याच्या लग्नानंतर ही बदलत नसतो. पण आपल्यासारखाच तोही थोडाफार त्याच्या संसारात गुंतत असतो. कारण आता तो फक्त तुमचा भाऊच नसतो. तर कोणाचातरी नवरा, कोणाचा तरी बापही झालेला असतो.
38. विनाकारण त्रास देणाऱ्या माणसांना जर त्यांच्या लायकीत ठेवायचे असेल तर ज्या-त्या वेळी प्रत्युत्तर द्यायला शिका. एकटे चालूनच मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील सांगता येत नाही. नातेगोते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नको. पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही. म्हणून चांगली नाती जपा. आनंदात काय परके सुद्धा सामील होतात. पण न बोलता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात. कोणासाठी वेळ नसेल इतके व्यस्त होऊ नये आणि कोणीही गृहीत धरावे इतकेही स्वस्त पण होऊ नये. कोणालाही न दुखवता जगणे याच्यासारखे सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला पुण्य कमावण्याची आवश्यकता राहत नाही. काहीजण तुमच्या भावनांशी खेळून जातील आणि तुम्ही मात्र जाऊ द्या आपल्या जवळच्या हक्काचे आहेत म्हणून नाते जपत रहाल. एक दिवस सर्व सोडून जायचे आहे हे माहीत असून सुद्धा काही माणसं अहंकाराला खतपाणी घालतात हे विशेष आहे. जाणून बुजून मेल्यानंतर केलेली स्तुती, आग लावून झाल्यानंतर टाकलेलं पाणी आणि दुःख दिल्यानंतर मागितलेली माफी यांचं महत्त्व शून्य असतं. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर आयुष्यात वाद निर्माण होणारच नाही. आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात. मुखातून निघालेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाहीत. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरी करू शकत नाही. आई म्हणजे परमेश्वराने माणसाला दिलेली एक अनमोल भेट आहे. जो कोणी आईचा अपमान करतात, तिचं मन दुखावतात परमेश्वर त्यांच्यावर नाराज होतो आणि ज्या ज्या गोष्टींचा त्याला गर्व झालाय त्या सर्व गोष्टी हळूहळू त्यांच्यापासून हिरावून घेतो. शेवटी त्याला भिकारी बनवून सोडतो. आपल्या आईचा अपमान कधीही करू नका. तिने असंख्य वेदना सहन करून तुम्हाला जन्म दिला हे विसरू नका. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण राग आल्यानंतर समोरच्यावर चिडणे खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढेच अवघड. स्वार्थी लोकांना पहिल्यांदा चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो. स्वतःला नेहमी खास समजा. कारण देव कोणालाच टाईमपास म्हणून बनवत नाही. एका वेळेस एकाने चिडावे. चूक झाली तर मान्य करावी माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपवाछपवी नको. घरातील प्रत्येकाला लहान मुलांना सुद्धा मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे. आपला नवरा किंवा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे हे भावना पहिल्यांदा काढून टाका. सवलत देणे आणि दिलेल्या सवलतीचा योग्य वापर करणे, अतिरेक न करणे ही ज्याची त्याची जबाबदारी. थोडं दुसऱ्यांसाठी काय केलं तर काहीच फरक पडत नाही. करा पण बोलून दाखवू नका. डोक्याला त्रास देणाऱ्या सहवासापेक्षा आणि सारखं रडत बसण्यापेक्षा आनंदी लोकांच्या सहवासात रहा. माणसाजवळ त्याच्या आयुष्याची कमाई म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही वेळी माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. पण चांगले विचार नेहमी उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करतात. जेव्हा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आपल्या कुटुंबाबद्दल स्वाभिमान आणि निस्सिम प्रेम असते तेव्हा ते कुटुंब कितीही मोठे संकट आलं तरी कोलमडून पडत नाही. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे व्यसन असावं म्हणजे इतर कुठलेही व्यसन लागायची शक्यता कमी असते. रुसल्यानंतर चूक कोणाची का असेना बोलायला पहिली सुरुवात नेहमी तिच व्यक्ती करते ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असते. एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरी ती पहिल्यासारखी मनात जागा कधीच मिळू शकत नाही. समजून घेणारी, जीव लावणारी,वेळ देणारी, काळजी करणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला खूप नशीब लागतं. स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच दुसऱ्याला फसवू शकत नाही. कारण तिला चांगल्या प्रकारे माहिती असतं की कोणाला फसवून तात्पुरतं सुख मिळू शकते. मात्र आयुष्यभर समाधानी राहण्याकरिता प्रामाणिकपणाची शिदोरी आपल्याकडे असावी लागते. आपण कोणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. आयुष्यात हवा तो बदल नक्की जाणवेल. काही क्षण स्वतःसाठी जगा कारण दुसऱ्यांसाठी तर अख्ख आयुष्य खर्च केले तरी त्यांना कमीच पडते. माणसाने किती खेळ केले तरी एक ना एक दिवस उघड होतातच. म्हणून इतकेही खेळ खेळू नका की एक दिवस वरचाच तुमचा खेळ करेल आणि तुमच्या बुडख्याला पण पत्ता लागणार नाही. ज्यांना कामाची लाज नाही आणि पैशाचा माज नाही असे लोक कधीच उपाशी राहत नाहीत. अचानक मन उदास होणं आणि डोळ्यात पाणी येणं ही एका वेदनेची जाणीव असते जी दुसऱ्याला सांगता येत नाही आणि स्वतःला सहन होत नाही. भेटावसं वाटलं तर मनुष्य साता समुद्रा पलीकडून सुद्धा भेटायला येतो आणि भेटायचं नसलं तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. आयुष्यात एवढे व्यस्त होऊन जावा की पश्चाताप, भीती, दुःख आणि तिरस्कारासाठी वेळच राहिला नाही पाहिजे. लक्षात ठेवा आयुष्यात रिकामा व्यक्ती सगळ्यात दुःखी असतो. काही लोकांना खऱ्या प्रेमाची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जात नाही. जगात कुठलीही गोष्ट अति झाली की माती होते पण परमेश्वरचे नामस्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की अति झाली की आत्मा उद्धार होऊन देवाला त्याच्याबरोबर राहावे लागते. श्रीमंताच्या यादीत नाव आलं नाही तरी चालेल पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव अग्रस्थानी झळकलं पाहिजे. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत रहा, अशक्य ही शक्य होईल. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र दीर्घकाळ राहतो. मनातल्या प्रतिमेशी 100% जुळेल अशी व्यक्ती जीवनसाथी म्हणून मिळणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणूनच 99% संसारातून नाईलाजाने जमवून घेणाऱ्या व्यक्ती दिसतात. एका अर्थाने एकमेकांच्या सहनशीलतेवरच संसार उभे असतात. परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल. सुखदुःख शेवटी मनाचाच खेळ आहे. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते. तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी. आपली सोबत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकू सोबत मिसळले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात. पण जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे. माणूस मेल्यानंतर मेलेल्याची आठवण मात्र कधीच मरत नाही. आठवणी शिवाय माणसाकडे दुसरं काहीच उरत नाही. जाणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाचं काहीच राहत नाही. जाणारी पिढी ही येणाऱ्या पिढीला कधीही न संपणारी आठवणच तर देऊन जाते. सत्य आणि अनुभव यापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थितीही. संसाराचा भार दोन्ही बाजूला समान असेल तर येणाऱ्या अडचणी अलगद बाजूला जातील. वयात येणाऱ्या आपल्या मुलांसोबत मोकळेपणाने रहा. त्यांच्याशी गप्पा मारा, मैत्री करा. त्यांच्या आवडत्या विषयावर बोला, त्यांच्यासोबत फिरायला जा. त्यांना जास्त बंधनात ठेवू नका. कोणत्याही विषयाला अनुसरून त्यांच्या मनात घुसमट होणार नाही याची काळजी घ्या. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना वेळोवेळी आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याची नक्कीच जाणीव करून द्या. या सर्व गोष्टींमुळे आपली मुलं वाईट संगती पासून दूर राहून आपोआप सुरक्षित राहतील. दुःख आपलेच लोक देत असतात कारण परक्यांना काय माहित तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होतो. जे मनातून उतरतात ते नंतर खड्ड्यात गेले तरीही काहीच फरक पडत नाही. तुम्हाला रडवून जाणारे तुमच्यापेक्षा जास्त रडणार आहेत म्हणून धीर धरा. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. संसार तर कुठेही कसाही होतो, फक्त आपल्या जोडीदाराची साथ महत्त्वाची असते. जोडीदार देखणा नसेल तरी चालेल, पण त्याच्या जोडीदाराचे आयुष्य सुंदर बनवण्याची हिंमत त्याच्यामध्ये असावी. जोडीदार भलेही पैशाने गरीब असेल पण त्याच्या मनाची श्रीमंती मोठी असावी. स्वप्न दोघांपैकी कोणाचही असो, पण ते पूर्ण करण्यासाठी दोघांचीही धडपड असावी. परिस्थिती कशीही असो, दोघांनाही एकमेकांची सोबत कायम असावी. लांबूनच त्या लोकांना राम राम करा ज्यांनी वेळ पाहून रंग बदलले आणि नात्यापेक्षा पैसा श्रेष्ठ मानला. कुणाचा साधेपणा बघून फसवू नका, तो शांत राहील. पण वेळ मात्र तुमच्या कृत्याची आवर्जून नोंद ठेवते आणि योग्य वेळी तुमचा मागचा पुढचा हिशोब करून तुम्हाला व्याजासकट दाम दुप्पट परतफेड करायला भाग पाडते. ज्या चहात साखर नाही ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्याच्या आयुष्यात मैत्री नाही असे आयुष्य जगण्यात मजा नाही. कोणत्याही संकटाच्या वेळी मी आहे ना एवढे शब्द संजीवनी सारखं काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणार असतं. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण काही दुष्ट व्यक्ती नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतात. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारी माणसं भेटणं म्हणजे जिवंतपणी मिळालेला स्वर्ग आहे. त्रास करून घेऊ नका, कारण प्रत्येकाच्या वाट्याला वाईट वेळ येते. ही वेळ कोणी जगून गेला आहे तर कोणी जगत आहे. कुणी विचारलं तरच सल्ला द्यावा. नाहीतर त्या सल्ल्याची आणि सल्ला देणाऱ्याची दोघांचीही किंमत राहत नाही. यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा. कारण उतरताना ते सर्वजण पुन्हा भेटणार आहेत. घेतलेला श्वास जसा सोडून द्यावा लागतो, अगदी तसंच न पटणाऱ्या गोष्टीही सोडून द्यायला हव्यात. समोरचा व्यक्ती त्याच्या विचारांप्रमाणे आपली पारख करत असतो. मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. आपल्या विरोधात कोणी कितीही असू देत फक्त सोबत असणारा जोडीदार हिम्मत देणारा असला पाहिजे. स्वार्थी लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत म्हणून ते लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले नक्की व्हा. पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त बोलतात. आपली इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही. कारण प्रत्येकाचा आयुष्य प्रवास हा वेगळा असतो. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा पण नेहमी एका गोष्टीचा भान ठेवा. आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा नक्कीच कमवा पण त्यासाठी आयुष्यातील सुंदर क्षण गमावू नका. पैशाची पूजा नक्की करा पण पैशाचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे, पैशासाठी माणूस नाही. आपल्या जिवाभावाची माणसं हेच आपलं धन आहे. त्यांना वेळ काढून भेटा, बोला त्यांच्याशी प्रेमाने वागा. एक गोष्ट लक्षात ठेवा वेड्यासारखं धावण्यापेक्षा विचार करून शांतपणे चालणे हे केव्हाही फायदेशीर असतं. का जगायचं हे ठरल्यावर कसं जगायचं हे आपोआप कळतं. सहनशक्ती एवढी ठेवा की तुम्हाला तोडणारे एक दिवस स्वतः तुटून तुटून विस्कटून जातील. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधीही योग्यच असतो. कपडे फाटले की ते शिवता येतात पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. जगात कोणालाही कमी समजू नये. कारण दोन रुपयांचा पेन सुद्धा दोन कोटींचा चेक लिहिण्याचे काम करतो. आयुष्याचा शेवटचा मुक्काम कोणी पाहिलेला नाही. पण असं म्हणतात की हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो. ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कोणाच्या घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही. मग ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हाताने कसे जाणार? म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या घरी जाताना त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल. कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा कष्ट करून खाणारी माणसं जास्त सुखी असतात. जबरदस्तीने कोणाच्या आयुष्यात राहू नका. कारण एक तर ते आपल्याला दुर्लक्ष करतील नाहीतर जवळ करून ते आपल्याला आपण परक आहोत याची जाणीव करून देतील. एखाद्याच्या भल्यासाठी तुम्ही चंदनासारखे आवश्यक झिझा फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जगातील सर्वात मौल्यमान रत्न म्हणजे कष्ट आणि सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. दिखाव्याचा प्रयत्न करू नका, जेव्हा परिपूर्ण व्हाल तेव्हा स्वतःहून नजरेत याल. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता कष्ट करावे लागते. जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावं म्हणून लिहिणं गरजेचं असतं. थोडाफार सहन करायला शिकलच पाहिजे. कारण आपल्यातही बऱ्याचशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात. रागाला आवरता आलं की नात्याला सावरता येतं. परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात. अश्रूंना वजन नसते पण काही वेळा ते वाहल्यानंतर मनावरील भार निश्चितच हलका होत असतो. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात. आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमावणारा हात ज्याला कळतो तो आपोआप चांगल्या कर्माकडे वळतो. स्त्री कधीच कोणाला सहजपणे आपल्या मनात जागा देत नाही आणि जर कोणाला मनात जागा दिली तरी इतका जीव लावते की जगातला कोणताच पुरुष त्याचा अंदाजही लावू शकत नाही. पण का जर तिच्या नजरेतून आणि मनातून एकदा कोणी उतरलं तर ती परत तुम्हाला कधीच हृदयात जागा देत नाही.
39. जगातल्या प्रत्येक राज्याच्या दरबारात स्त्रीने नाच गाणी सादर केलेली आहेत. पण जगात एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण पर स्त्री ला मातेसमान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊने छत्रपतींना दिली होती. योग्य वेळी चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं तर अयोग्य वेळ आयुष्यात येत नाही. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही ती दोघांनापण असावी लागते. कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं, त्यालाच आयुष्य जगणं समजलं. वेळ ही बदलणारी असते चांगली असो वा वाईट. आज जर वाईट असेल तर उद्या चांगली नक्कीच येणार. नशिबा पेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही. तोंडात गोड आणि मनात खोड असणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहावं. कधी घात करतील सांगता येत नाही. जेव्हा लोक मागे बोलतात, तोंडावर नाही तेव्हा ती खरी दहशत असते. पाय नाही, हात ओढा. कदाचित आपल्यातलाच कोणीतरी वर येईल. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. काही वेळा परिस्थितीच्या विरोधात जाऊन घेतलेले काही निर्णय परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य ठेवतात. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळली नाही. माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात की भविष्यात जर तो प्रसंग आठवला तर मनाचा थरकाप होतो. तो क्षण नक्कीच दुःखाचा असतो. तो कोणाबरोबर शेअर करता येत नाही. शेवटपर्यंत त्या आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात व मनाला रडवीत राहतात. मनुष्य गतप्राण होईपर्यंत माणूस सुख विसरतो पण दुःख शेवटपर्यंत विसरत नाही. शांत एवढं राहायचं की ज्यांना आपली कदर नाही ना ते आपला आवाज ऐकण्यासाठी पण तरसले पाहिजेत. पिंजऱ्यात ठेवलेली पाखरे आणि बंधनात ठेवलेली माणसं कधीच आपली होत नसतात. दागिन्यांनी गळा भरला नसला तरी जेवणाचे दोन घास प्रेमाने भरवणारा जोडीदार हवा. पैसा आणि मीठ आपल्या जीवनात आवश्यक असतात. परंतु गरजेपेक्षा जास्त झाल्यास आयुष्याचा स्वाद बिघडवतात. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं. ना पैसा, ना कसली मदत. फक्त आयुष्यातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठा समाधान मिळवून देते आणि या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल. बायकोवर कितीही विनोद बनवले तरी सत्य हेच असतं की तिच्याएवढी आयुष्याची साथ या जगात कोणीच देत नाही. मनाच्या शांतीशिवाय या आयुष्यात कोणतीच मोठी संपत्ती नाही. चुकीच्या लोकांना तुम्ही कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास देणारच. लेकीच्या आयुष्यात बाप तिच्या आयुष्याचाच विचार करत असतो. पैंजणापासून सुरू झालेला प्रवास मंगळसूत्रापर्यंत येऊन थांबतो. कोणाला साथ द्यायची तर शेवटपर्यंत द्या. कारण एकदा जर विश्वास तुटला ना तर तो पैसे देऊन सुद्धा विकत भेटत नाही. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.
40. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधीच समजली नसती. ज्याला दुःखांची जाणीव असते त्याला सुखाची किंमत ही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे. वय कितीही असो, शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकच असतं ते म्हणजे मैत्रीचं. नाती जर निभवता येत नसतील तर हक्क गाजवण्याचं नाटक पण करू नये. नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. परंतु सर्वात कठीण पाचवी पायरी आहे ती म्हणजे निभावणे. आपला स्वभाव हा प्रामाणिक असावा. कारण ओळख जरी नावाने होत असले तरी आठवण नेहमी स्वभावाचीच होते. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. कारण जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात? त्यावरून त्यांची पात्रता कळते, ते तुमची नाही. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. देखावा करून आणि खोटे बोलून व्यवहार करण्यापेक्षा सत्य सांगून शत्रू बनवले तरी चालतील. तुमच्याबरोबर कधीच विश्वासघात होणार नाही. स्वतःला नेहमी आपण सांगत राहिले पाहिजे की आपली सध्याची परिस्थिती हा शेवट असू शकत नाही. सत्य जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर जग सोबत येते. देवाने तर पहिले सांगून ठेवले आहे की माझ्याकडे मागून मिळालं असतं तर शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला भीक कधीच कमी पडू दिली नसती. त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच कर्म आहे. यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमच्या मार्गावर चालत रहा ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाहीत. पण आई-वडिलांची सेवा करून देव मिळवता येतो. तुमचं घर जरी लाखो रुपयांचं असलं तरी या दोघांशिवाय घरात मजा नाही. उच्च ध्येय समोर ठेवून जगाल तर धाडस व आत्मविश्वास हे गुण आपोआप येतात. मूर्खाशी वादविवाद न करता घेतलेली माघार म्हणजे त्याला पराभव म्हणतात येणार नाही. इतरांसमोर तुम्ही स्वतःचा कचरा न होऊ देता तुमची किंमत आणि प्रतिष्ठा कायम राखली तर हा तुमच्या संयमाचा, विचारधारेचा आणि बुद्धिमत्तेचा विजय आहे. काहीतरी मिळवणे म्हणजे जिंकणे नाही आणि काहीतरी गमवणे म्हणजे हारणे नाही. फक्त वेळेचा प्रभाव आहे आणि परिवर्तन तर वेळेचा स्वभाव आहे. नातं तेव्हाच टिकत जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जाते. शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त जग आहे. रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. प्रत्येक जवळच्या माणसाला आपले रहस्य सांगू नका. कारण जे आज तुमच्या बरोबर आहेत ते उद्या तुमच्या विरुद्ध सुद्धा होऊ शकतात. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधी चुकीचा असू शकत नाही. कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे, अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे. ज्याला रात्री शांत झोप लागते तो सुखी. काही वेळा वाईट वेळ तुम्हाला चांगल्या लोकांना भेटवण्यासाठी येत असते. चांगले मैत्रीला वचन आणि अटींची गरज नसते. फक्त दोन माणसे हवी असतात. एक जो निभावू शकेल आणि दुसरा त्याला समजू शकेल. मैत्री वेड्यांसोबत करावी कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेतात. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत. तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. जीभ कधीच चुकत नाही. रागाच्या वेळी डोक्यामध्ये जे काही चालू असते ते नेहमी जिभेवर येते. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणाचीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे. नात्याला किती वर्ष झाली याला महत्त्व नाही तर त्या नात्यांमध्ये आपलेपणा किती आहे याला महत्त्व असते. ज्याच्या खांद्यावर घरच्या जबाबदार असतात त्याला काही वेळा मन मारूनच जगावं लागतं. नाती जिवंतपणीच सांभाळा,नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही. तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात हे कधीच विसरू नका मग कोणी काहीही बोललं तरीही. कारण जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो ना तेव्हा लोकांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात. त्या पुन्हा भरता येत नाहीत. स्वप्न मोफत असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात मोठी किंमत मोजावी लागते. तुमच्या नशिबावर तुमचा विश्वास फक्त एक टक्का आणि कष्टावर नव्याने टक्के पाहिजे. गुंठा गुंठा करून काय होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामे येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे. तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबारावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहावे माणसाने, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. नातं हे वेळ पाहून पळ काढणार नसावं. तर ते मनाचा तळ गाठणारं, प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणे. मनातील सत्य आणि चांगलेपणा कधीच वाया जात नाही. ती अशी पूजा आहे ज्याचा शोध परमेश्वर सुद्धा घेतो. बरं चाललय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आयुष्यात हे सांगायला जवळचा माणूस लागतो. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. पाण्यासारखं मन कसं स्वच्छ असावं, सहज जरी डोकावलं तरी तळापर्यंत दिसावं. होरपळणाऱ्या कडक उन्हात घरातून बाहेर पडताना एक लहानसा कापसाचा बोळा तुमच्या उजव्या कानात ठेवा. अगदी थोड्याच वेळात डावी नाकपुडी चालू होईल. ती चंद्र नाडी असल्याने तुमचे शरीर आपोआप थंड होत राहते. यामुळे उन्हाने होणाऱ्या हार्ट स्ट्रोक, हाय बीपी, पित्त, मायग्रेन सारख्या विकारांपासून तुम्ही सुरक्षित राहाल. तुमच्याकडे 500 करोड असले काय! आणि वडापाव असला काय? शेवटी तुम्ही किती समाधानी आहात ते महत्त्वाचं. रिकाम्या भांड्यावर झाकणं आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. काहीतरी निसटल्याची जाणीव झाल्याशिवाय काहीतरी जपावं असं वाटत नाही आणि काहीतरी निसटल्याची जाणीव काही वेळा मात्र नेहमी उशिराच होते. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते. जोडीदार छोटा असो वा मोठा वेळ आल्यावर साथ देणारा पाहिजे म्हणजे आयुष्याचा खेळ जिंकता येतो. जो माणूस स्पष्ट शुद्ध आणि सरळ गोष्ट सांगतो त्याची शब्द जरी कठोर असले तरी तो तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाही. आयुष्यात पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आपल्याला जग कोणत्या नजरेने बघते हे आपण कधीच बघितले नाही पाहिजे. परंतु जग ज्या देवाने बनवले आहे तो देव आपल्याकडे चांगल्या नजरेने बघतोय. आज पर्यंत आपल्याला त्याने काहीच कमी पडू दिले नाही हे आपण अनुभवू शकतो. कधीही कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. बरोबर ठरला तर जिंकण्याचा आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो. ज्याने परिस्थितीनुसार स्वार्थासाठी आपल्या लोकांना बदलत असल्याचे बघितले आहे ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकते. माणसाने इतकं ही शांत नसावं की आपल्या आयुष्यात येणारे स्वार्थी कावळे मनसोक्त आपल्या डोक्यावरून नाचून जातील. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं किंवा मुलांनं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीच विसरू नये. आई नावाची संपत्ती एका आयुष्यातून गेली ना, माणसाने नंतर कितीही संपत्ती कामावली तरी भिकारीच राहतो. आत्मविश्वास असलेली माणसे संकटांना घाबरत नाहीत. भीतीवर विजय मिळवतात आणि ध्येयवादी असतात. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवतात आणि जबाबदारी घ्यायला घाबरत नाहीत. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा वेग दुप्पट करा. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते अशा कोणाकडून करायची? आणि विश्वास कोणावर ठेवायचा? सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. अनुभव अत्यंत महान गुरु आहे पण तो अपार गुरुदक्षिणा घेतो. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाहीत. अति प्रमाणात केलेली मस्करी म्हणजे अतिशय हुशारीने केलेला अपमानच. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात. संपत्ती, नाती आणि प्रेम हे काही वेळा निघून गेली की कळते जपले असते तर संपले नसते. आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो जग आपल्याला तसे दिसते.जगाने बदलण्याची गरज नाही तर आपली दृष्टी बदलण्याची गरज असते. काहीजण दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करत बसतात म्हणून त्यांच्याकडे जे आहे त्याचाही आनंद त्यांना मिळत नाही. सगळीच कामे शक्तीने होत नाहीत तर काही ठिकाणी सहनशक्ती ही वापरावी लागते. हजार चुका झाल्या तरी चालतील पण एकच चूक हजार वेळा होऊ नये. कधी कधी आयुष्यातील काही वाईट अपघात आपल्याला योग्य मार्गावर आणत असतात. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. नाहीतर त्याचा डोक्यावर विपरीत परिणाम होतो. आयुष्यात त्याच व्यक्तीसोबत तडजोड करा ज्याला स्वतःच्या अहंकारापेक्षा तुमच्या भावना अधिक महत्त्वाच्या असतील. धर्म फक्त रस्ता दाखवतो परंतु ध्येयापर्यंत तर कर्मच घेऊन जातात. आई कधी साधारण असू शकत नाही. ती तर परमात्माच्या नंतर एक अशी शक्ती आहे जी मृत्यूच्या जबड्यात जाऊन एक नवीन जीवाला जन्म देते. आपण कोणाचे भाग्य बदलू शकत नाही. परंतु चांगली प्रेरणा देऊन कोणाला तरी मार्गदर्शन नक्की करू शकतो. आयुष्यात जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा सारथी बना, स्वार्थी नको. आयुष्य एक महाभारत आहे म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. माणसाचा स्वभावच विचित्र आहे. कारण एखाद्याने माणसाला जनावर म्हटलं तर त्याला राग येतो आणि वाघ म्हटलं तर आनंद होतो. बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाखी चार दिवसच चमकते पण इमानदारी आयुष्यभर. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. आयुष्यात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणते. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचे महत्त्व कमी करून घ्यायची काही गरज नाही. रात्री उशिरापर्यंत जागणं, आलेली संधी सोडणं, व्यायाम करण्यात टाळाटाळ करणं, नकारात्मक विचार ऐकणं, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे आणि आयुष्यातील वेळ वाया घालवणे ह्या सर्व गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेतच. मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवतो. नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांनी जुळली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना आणि स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भाग पडेल. प्रतिकूल परिस्थितीत इतरांना धीर देणारी व्यक्ती स्वतःच्या दुःखात मात्र एकटीच असते. चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात राहल तर दुनिया जळेल. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. सौभाग्याने जे मिळत त्याने सात पिढ्यांचा उद्धार होतो आणि जे हिसकावून मिळवलं जातं त्याने सात पिढ्यांना भोगावे लागतं. बोलताना विचार करून बोलत जा. कारण एखादा शब्द जर समोरच्याच्या मनावर लागला ना तर परत तुम्ही कितीही माफी मागितली तरी ते शब्द विसरता येत नाहीत. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोक्ता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. विश्वासाला तडा देणारी माणसं जो धडा शिकून जातात त्याची पुन्हा उजळणी होणार नाही इतका तुमचा अभ्यास असला पाहिजे. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट विचार करून घेऊ नका. दुसऱ्यांचे विचार आपल्याला मान्य नाहीत याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही. जगावेगळं काही चांगलं करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाही तर स्वतःच्या नियमानुसार काही वेळा जगावं लागतं. आयुष्याच्या वळणावर काटे तर खूप असतात. पण पाय कुठे आणि कसा द्यायचा हे मात्र आपल्यावर अवलंबून असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्याकडे बोटही दाखवतील हे ही स्वीकारावं लागतं.
41. जिथे तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो तिथूनच उगवण्याची क्षमता ठेवा. संपवणाऱ्यांचे हात सुद्धा थरथरले पाहिजेत. एखाद्या क्षणाचा देणं उभ आयुष्य पणाला लावूनही फेडता येत नाही. परिस्थिती कधीच अनुकूल नसते तिला अनुकूल बनवावं लागतं. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळ पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजा की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे. लोकांचे त्यांच्या कृतीनुसार व्यक्ती चित्रण केल्यानंतर त्यांच्या शब्दांद्वारे तुम्ही कधीही फसवले जाणार नाही. पर्याय नसताना जोडीदाराला सांभाळणे आणि पर्याय असतानाही जोडीदाराची साथ न सोडणे यात पर्यायांपेक्षा प्रेम हा महत्त्वाचा दुवा ठरतो. आयुष्यात कधी इतकी पण तडजोड करू नका की लोक विसरून जातील की तुम्हालाही एक मन आहे. आयुष्यात नशिबाला कधीच दोष देऊ नका. माणसाच्या रूपात जन्म मिळाला आहे हे नशीब नाही तर काय आहे? ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. झाडाचे प्रत्येक पान गळताना नेहमी एक सांगत असतं,हसा आणि हसवत रहा. कारण इथे काहीच आपलं नसतं. आपल्या पाठीमागे आपली टिंगल, टवाळी, निंदा करणाऱ्या लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण ती लोकं आपल्या दोन चांगल्या कारणामुळे आपली निंदा करतात. एक म्हणजे आपण त्यांना कवडीचा भाव देत नाही आणि दुसरी म्हणजे आपण त्यांच्या मनासारखा वागत नाही. नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी. आयुष्यात सर्वात कठीण काम म्हणजे संयमाने योग्य वेळेची वाट पाहणे. पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यातही बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात. तुमच्या ध्येयासाठी जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल. कारण ध्येयवेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात. छत्तीस गुणांपेक्षा जोडीदारांमध्ये चांगलं बोलणं, निर्मळ मन, सुंदर वागणं आणि प्रामाणिकपणा हे चार गुण असले तरी पुष्कळ आहे. मन शांत आणि एकाग्र केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते. सीता होऊन मौनाचं रामायण सहन करता येतं पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा असतो. चुकीचे वाटेवर एकदाच पाय पडतो पण आयुष्यभरासाठी पाय मुरघळतो. कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले? आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले? आत्ताच्या जगात सहजासहजी मेसेज किंवा कॉल करणारे भेटत नाहीत आणि भेटलेच तर त्यांना विसरू नका. कारण आजकाल कोणालाच वेळ भेटत नाही. जे वेळ काढून आपल्याला वेळ देतात ते लाखात एक असतात. वेळ व्यक्तीला यशस्वी करत नाही तर वेळेचा योग्य उपयोग व्यक्तीला यशस्वी बनवतो. पुरुषांच्या इतकीच स्त्री कणखर असते. कितीतरी असंख्य, जीव घेणे प्रसंग, पेलून नेण्याची ताकद तिच्यात असते. दडपण आलं म्हणून स्त्री व्यसनाधीन कधीच होत नाही. सगळे दुःख पचवून चेहरा हसरा ठेवण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. आयुष्य एक नाटकाप्रमाणे असते. आपल्या नशिबी राजा किंवा रंकाचे पात्र येतं. सकाळ दुपार आणि रात्र अशा तीन घंटा वाजतात. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन सावल्या असतात. माणसाच्या आयुष्यात चांगली वाईट लोक येतात. रंगमंचावर जागा अनेक पात्र घेतात. जसा नाटकाचा खेळ संपताच पडदा खाली पडतो तसा डोळ्याचा पडदा पडल्यावर आयुष्याचा खेळ संपतो. म्हणून आयुष्य जगताना माणसे कमवा. कोणी बोलवलं नाही तर जाऊ नका आणि कोणी सांगितलं नाही तर विचारू नका. कोणी उशिरा बोलावलं तर नकार द्या. नेहमी किमतीयोग्य बना, उपलब्ध नको. गरजू आणि अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणाऱ्या हातांची ओंजळ देव कधीच रिकामी ठेवत नाही. दूध, दही, लोणी, तूप, लस्सी सगळे एकाच वंशाचे आहेत. तरी किंमत सर्वांची वेगवेगळी असते. कारण श्रेष्ठत्व जन्माने नाहीतर कर्म, कला आणि गुणांनी प्राप्त होते. अहंकार कुठल्याही गोष्टीचा असू दे, सर्वांनाश केल्याशिवाय राहत नाही. जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक जास्त महत्त्वाचे असतात. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास होत नाही. जर तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये स्वतःला सकारात्मक ठेवत असाल तर तो तुमचा विजय आहे. वास्तवात आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करण्याची तयारी असावी लागते. गंगेत तीच पापे धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाहीत. चांगली कार्य करणारी व्यक्ती कधी सन्मानाची भुकेली नसते. त्याचे कार्य त्याला सन्मानाला पात्र बनवून देते. कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहोचते ती स्वाभिमानाला. कोणतेही काम तोपर्यंत अशक्यच वाटते जोपर्यंत ते केले जात नाही. प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते. शांतता देखील खूप मोठी दहशत करू शकते. आठवणी ह्या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच असतं. स्पर्शामागे देखील ती भावना लागते तर तो स्पर्श राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो जो सोडवता पण येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात. प्रत्येक आठवण मनात जपलेली असते. कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसलं तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेले असतं. एखादी गोष्ट मिळो अथवा न मिळो ही नशिबाची गोष्ट असते पण आपण प्रयत्न केलेच नाही तर ते चुकीचे ठरते. आयुष्य जखमांनी भरलेले आहे, वेळेला आपला मित्र बनवायला शिका. हारायचे तर आहे एक दिवस मृत्यूपासूनच पण त्या अगोदर आयुष्य जगायला शिका. अडचणीमध्ये कोणी सल्ला मागितला तर सल्ल्याबरोबर सोबत नक्कीच द्या. कारण सल्ला चुकीचा असू शकतो, परंतु सोबत नाही. हे खरे आहे की प्रेमासाठी सहवास महत्त्वाचा असतो पण खऱ्या प्रेमात सहवास मिळत नाही म्हणून ते कमी देखील होत नाही. उलट तुमची ओढ अधिक वाढते, तुम्ही अधिकाधिक त्या व्यक्तीशी जोडलेले राहता. अशा प्रेमाची एक वेगळी भाषा आहे ती फक्त आपल्याच व्यक्तीला कळते. आपला आनंद, राग, दुःख, आपलं शांत बसणं हे सहवासाशिवाय कळू शकतं. कारण तुम्ही आत्म्याने जोडलेले असता. स्पर्शाच्या पलीकडे असलेले ते एक वेगळेच जग. ज्यांना ते लाभतं त्यातील सुख जाणीव आणि समाधान तेच जाणतात. एकमेकांना बघण्याची भेटण्याची ती हूरहूर, ती ओढ आणि भेटीनंतर जाणवणारी ती तृप्तीची भावना कोणी शब्दात कधी मांडू शकत नाही तेच खरं.
42. योग्य ठिकाणीच तुमचे योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. माणसाची शरीरच सगळ्यात मोठे तीर्थ आहे. या शरीरामध्ये जेवढा आत्म्याचा विकास होऊ शकतो तेवढा कुठेही होऊ शकत नाही. देवता सुद्धा मानवी शरीर मिळवण्यासाठी तडफडत असतात. कारण आत्मा शरीराशिवाय साधना करू शकत नाही. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आली तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. जमिन चांगली, खत चांगले पण पाणी खारट असेल तर फुले उमलत नाहीत. तसेच भावना चांगल्या असतील तर कर्म ही चांगले पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. रांगोळी पुसली जाणार हे माहित असूनही आपण ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आपले आयुष्यही पुसले जाणार आहे हे माहित असूनही आपण त्या रांगोळी प्रमाणेच ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विश्वासघात करून कमावलेले पैसे जर पुण्याच्या कामी लावले तर पुण्य त्यालाच प्राप्त होईल ज्याचा विश्वासघात झालेला आहे. जसे जसे ज्याचे चरित्र असते त्याचे त्याचप्रमाणे मित्र असतात. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते पण त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. अनेक मित्र असण्यापेक्षा एकच असावा पण खास असावा. आयुष्य प्रवासात हजारो माणसे भेटतात पण आपल्या कितीतरी नकळत घडलेल्या चुकांवर सुद्धा पांघरून घालणाऱ्या आई-वडिलांची सर जगातल्या कोणत्याच नात्याला नाही. सीता जी जनक राजाची मुलगी आणि दशरथ राजाची सून होती. तिचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात साजरे झाले पण त्याच्यानंतर सीतेला काय मिळाले? वनवास आणि वनवासाच्या नंतर अपहरण पुन्हा अग्निपरीक्षा आणि शेवटी गरोदर असताना सुद्धा कुटुंबापासून दूर. बऱ्याच राज्यांवर राज्य करणारे वडील आणि सासरे इच्छा असून सुद्धा सीतेला सुख देऊ शकले नाही. तर एक साधारण मनुष्य आपल्या मुलांना त्यांच्या कर्माशिवाय कसे सुख देऊ शकतो? म्हणून माणूस तन मन आणि धन संततीला सगळे काही देऊ शकतो पण त्याला सुख त्याच्या कर्मानेच मिळणार, दुसऱ्याच्या कर्माने नाही. ज्या देवाकडे कोणताही नवस न करता सगळं काही मिळतं तो देव म्हणजे बाप. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला आयुष्यात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. हवी वाटणारी प्रत्येक गोष्ट मिळाली असती तर तडजोड काय असते? हे कधीच कळालं नसतं. काही वेळा कौतुकाच्या फुलांमध्ये स्वार्थाचे काटे असू शकतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल नक्कीच घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती. आयुष्य कधीच निरर्थक नसते फक्त काही लोक त्याला सार्थकी लावत नाही इतकच. देव सुद्धा कधी कधी खूप सुंदर टोमणा मारत असेल की नेहमीच मागायला येण्यापेक्षा कधी कधी भेटायला तरी यावे. धन असो वा मन चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर अतिस्वाद आणि अतिवाद या दोन्हींचा त्याग केला पाहिजे. अतिस्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि अतिवाद सोडला तर नात्याला फायदा नक्कीच होतो. मरेपर्यंत कष्ट करा पण अहंकार बाळगू नका. कारण एका झाडापासून लाखो काडेपेट्या तयार होतात पण त्यातील एक काडी त्या लाखो झाडांना आग लावण्याची ताकद राखते. आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल पण मन मात्र निर्मळ असायला हवे. अश्रू तेव्हाच येतात जेव्हा ओठ सांगू शकत नाही की हृदय किती दुखावले आहे. काही ठिकाणी प्रसंग पाहून रागाला आवळले पाहिजे. कारण त्याचे अस्तित्व क्षणभरासाठी असले तरी तो एखाद्याचे आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवून जातो. समोरच्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच खरी आपली कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे. खरे नवरा बायको तेच असतात जे प्रथम प्रेमानेच प्रेम जिंकतात. दोघांच्या नात्यात गोडी निर्माण करतात. त्याच गोडीने घराला मंदिराचं स्वरूप आणतात आणि त्याच मंदिरात विठ्ठल रुक्मिणी सारखा संसार करून दाखवतात. एखाद्याचं दिसणं तुम्हाला आकर्षित करू शकते पण एखाद्याचा स्वभाव हा आयुष्यभर त्याच्यासाठी तुम्हाला झुरायला लावू शकतो. कारण सुंदर दिसणे हे कालांतराने जाऊ शकते पण स्वभाव हा आयुष्यभर सोबतच असतो. मला कोणाचीही गरज नाही हा अहंकार आणि माझी सर्वांनाच गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी टाळल्या तर माणूस लोकप्रिय होतो. कोरोनाच्या काळात हजारोंचे कपडे शोरूम मध्ये लटकत राहिले आणि छोटासा मास्क मात्र करोडोंचा व्यवसाय करून गेला. कोणीही स्वतःला मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये. आयुष्यात कधी कधी नकोसा वाटणारा प्रवास इच्छेविरुद्ध असला तरी पार करावाच लागतो. त्रास होतो फरफड होते पण तरीही प्रवास अर्धवट सोडता येत नाही. राग राग करून आत्मा अक्षरशः जळतो. त्याचा धूर सर्वांना दिसतो. पण त्याने होणाऱ्या यातना फक्त तोच व्यक्तीच सोसतो ज्याच्या अंतर्मनात वनवा पेटलेला असतो. अंतिम चरणावर येताना फक्त एकच गोष्ट दिसते उर पेटून पेटून बाकी उरलेली ती राख. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. मनासारखा जोडीदार भेटला की संसार हा मातीच्या भिंती असलेल्या घरातही करता येतो. वडिलांची संपत्ती असणे गरजेचे नाही तर वडिलांची सावली असणे गरजेचे आहे. कारण जसं आई शिवाय घर अपूर्ण आहे तसं वडिलांशिवाय संपूर्ण आयुष्य. बाप नावाचा पाया भक्कम असला की परिस्थिती नावाची इमारत कोठेही उभी करता येते. सगळेच निर्णय आपल्या आयुष्याचे आपले कधीच नसतात तर काही निर्णय हे वेळ आणि परिस्थिती ठरवत असते. मुलगा मोठा झाल्यावर साहेब नाही झाला तरी चालेल पण आई-वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येतील एवढं मोठं नक्की व्हावं. रहायचे असेल तर एखाद्याच्या हृदयात घर करून राहावे. कारण तेथे राहण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि तेथून तुम्हाला कोणी बाहेरही काढू शकत नाही. भविष्यातील स्वप्न विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जेवढा मोठा संघर्ष तेवढं यश मोठं. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणांच्या नादी लागू नये. जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. सगळ्यांनाच सुख देण्याची क्षमता भलेही आपल्या हातामध्ये नसली तरी कोणाला दुःख होऊ नये हे तर आपल्या हातातच आहे. योग्य व्यक्ती समोर जड झालेलं मन वेळीच हलकं केलं तर बाकी सगळ जड जात नाही. कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आयुष्यात दोन गोष्टी शिकणे महत्त्वाचे असते. लोकांना सांभाळायचे असेल तर बोलण्यावर ताबा ठेवा आणि आपल्यापासून लांब गेलेल्यांना जवळ आणायचं असेल तर कोणाचही बोलणं फार मनावर घेऊ नका. चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाहीत. पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो. निर्णय घ्यायला, अयशस्वी व्हायला, कोणाच्या धमकीला, कष्टाला आणि एकटे रहायला या पाच गोष्टींपासून कधी घाबरू नका. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जे नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते, जिला अनेक टेन्शन असून सुद्धा जिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य टिकून असते, ती फक्त आईच असू शकते. मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे तुम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्यासमोर इतरांशी कसे वागता यातून आपोआप होत जाते. संस्कार ही समोर बसून शिकवण्याची गोष्ट नाही. ज्याला कर्म माहित आहे त्याला धर्म शिकवायची गरज नाही. पाप शरीर करत नाही तर विचार करतात आणि गंगा शरीर धुते, विचारांना नाही. काही माणसं सापासारखी दंश करणारी आणि संधी पाहून गाढवासारखी लाथ मारणारी असतात. आपल्या सोयीचा विचार करून सांभाळलेली नाती कधीच शेवटपर्यंत टिकत नाहीत. कारण अशा नात्यात अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो. दिवस प्रत्येकाचे पलटत असतात. थोडी सहनशक्ती ठेवावी लागते. कारण आजची परिस्थिती उद्या राहत नाही. प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराच अवलंबून असतो. चुका होणं हे माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण व्यक्ती चुका स्वीकारतो कसा? आणि सुधारतो कसा? यावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. थोडक्यात तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल करू शकत नाही.
43. पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे. पैसा आला रे आला की काही लोक एवढे भारावून जातात की आपल्याच जवळच्या माणसांना तुच्छ लेखू लागतात. तुमची संपत्ती, तुमचा पैसा कुणाचा घर खर्च चालवत नाही. त्यामुळे गर्व अभिमान तेव्हाच बाळगा जेव्हा दुसऱ्याला काही निस्वार्थपणे मदत करत असाल. प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलची सवय लागलेले हात जोपर्यंत पुस्तकाकडे आकर्षित होत नाहीत तोपर्यंत स्वतःची आणि समाजाची प्रगती केवळ अशक्य आहे. परिस्थिती कितीही तुमच्याविरुद्ध असू द्या, पण कोणाकडे हात पसरू नका. स्वतःच्या हिमतीने मार्ग काढा. पाने गळाली म्हणून झाड दुसऱ्या झाडाला उसनी मागत नाही तर नवीन पालवी जन्माला घालते. अती आनंद झाल्यावर आणि अति दुःख झाल्यावर निर्णय घ्यायचा नाही. कारण या दोन्ही परिस्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. मुलं घरापासून दूर जाताना मुलाच्या खिशात भले पडून असलेले लाखो रुपयांची किंमत शून्य होते जेव्हा त्याची आई शंभर रुपये तुमच्या हातावर ठेवून बोलते की वाटेत भूक लागली तर काहीतरी खा पण उपाशी राहू नकोस. सगळ्या अनुभवांचे स्वागत करा. माहित नाही कोणता अनुभव तुमचे आयुष्य बदलेल. राग आणि वादळ दोन्ही सारखेच. शांत झाल्यावर समजतं, किती नुकसान झालं. आपल्या मुलाला वाईट व्यसन लागले असेल तर त्याच्यावर उपचार करा. पण लग्न केल्यावर सुधारेल हा गैरसमज मनातून काढून टाका. कारण दुसऱ्याची मुलगी म्हणजे तुमची बिघडलेली औलाद दुरुस्त करायची मशीन नाही. बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. परमेश्वर सगळे बघतो पण योग्य निर्णय मात्र वेळाने देतो. प्रत्येक स्त्री तिची जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीने उचलत असतेच म्हणून त्यांच्यामध्ये तुलना करू नये. कोणताच माणूस कधीही डगमगला नसता जर आपल्या माणसांनीच आपल्या माणसाचा पाय खेचला नसता. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माणसं जवळ नसतील. स्वतःवर विश्वास ठेवायची कला शिकून घ्या. आधारावर किती पण विश्वास असला तरी काही कारणास्तव परिस्थितीनुसार एक दिवस साथ नक्की सुटते. सहनशीलतेची ताकद परमेश्वराने अशाच व्यक्तींना दिलेली असते ज्यांच्यात जिंकण्याचे सामर्थ्य असतं. नात्यांना पैशाच्या नजरेने पाहू नका. कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. आयुष्यात दुसऱ्याला हसण सोपं असतं परंतु दुसऱ्या करता रडणं फार कठीण असतं. कारण त्याला अंतःकरण असावं लागतं. शरीर सुखाच्या बाबतीत पुरुष निसर्गाच्या टोकावर उभा असतो. स्त्री लांब मागे पठारावर असते. तिला खुलवत, फुलवत, रुंजी घालत, हळुवारपणे टोकापर्यंत आणायचं असतं. तिथपर्यंत ती आली की मगच मिलनाचा अर्थ समजतो. हे रहस्य ज्यांना समजत नाही त्यांच्या घरी फक्त पाळणे हालतात. तिथं शृंगार होत नाही. नवरा झाल्यावरही त्याच्यातला प्रियकर जिवंत असला तर शृंगार उरतो. विधात्याने एखाद्या व्यक्तीची निवड तुमच्यासाठी करून ठेवली असेल तर आयुष्यातील प्रत्येक रस्ता तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत घेऊनच जातो. देव दर्शनाला गेला तर रांगेतून जा. कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. जिवंत आहे तोपर्यंत नात्यांना वेळ द्या. ताजमहाल जगाने पाहिला आहे मुमताजने नाही. जगणं पोरक झालं की आईच महत्व कळतं आणि पाठीवरती हात ठेवून लढ म्हणायला कोणी नसलं की बापाचा महत्त्व कळतं. चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा दोन्ही निरर्थकच आहे. तडजोड तिथेच करा जिथे तुमच्या भावनांची मोडतोड होत नाही. स्वतःच्या खिशात पाच लाखाचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचा आहे तळतळाट नसावा. कोणाच्या सांगण्यावरून चांगल्या व्यक्तीला गमावू नका कारण गळ्याला गळा देऊन भेट घेणारे अवघडीने मिळतात. जो तुमचा राग सहन करून देखील तुमची साथ देत असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेम दुसरे कोणीच करू शकत नाही. नात्याने नवरा बायको असण्यापेक्षा मनाने नवरा बायको असणं खूप महत्त्वाच आहे. कुणाच्या प्रेमाला टाईमपास समजू नका. कारण तुम्ही टाईमपास समजून केलेलं प्रेम कोणाचातरी आयुष्य बरबाद करून सोडतं. मंगळसूत्र घातल्यानंतर फक्त शरीरावर हक्क असतो. मनावर हक्क मिळवण्यासाठी जीवापाड प्रेम करावं लागतं. माणसांचे स्वभाव आपण बदलवू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्कीच बदलू शकतो. आत्म्याला तर पहिल्यापासूनच माहीत असते की बरोबर काय आहे आणि चुकीचे काय आहे. मनाला समजाऊन सांगण्याचे आव्हान मोठे असते. मानसिक विकृत्या आणि अपेक्षांचं ओझं नसतं म्हणून बालपण रम्य असतं. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसं पाणी आलं की धूळ निघून जाते. हवा आली की उष्णता निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसेच चांगले विचार आले की वाईट विचार निघून जातात. एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं. पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. विश्वासाचा अर्थ असा होत नाही की मला जे पाहिजे ते परमेश्वर करेल. परंतु याचा अर्थ असा आहे की मला जे आवश्यक आहे तेच परमेश्वर करेल. आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. कुटुंबासाठी भाकरी कमवणे खूप मोठी गोष्ट नाही पण कमावलेली भाकरी कुटुंबासोबत एकत्र बसून खाणे हे खूप मोठी गोष्ट आहे. एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा. कारण ती तुमची सिद्धता असते. ज्या लोकांचे स्मित हास्य सुंदर असते लक्षात ठेवा त्यांच्या जखमा खूप खोल असतात. सगळं काही खोटं असू शकतं पण प्रेमामध्ये गाळलेले अश्रू खोटे कधीच नसतात. पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस या जगात नाही. पावसात भिजणाऱ्या उंदराच्या पिलांना एका कबुतराने आपल्या पंखाखाली रात्रभर आसरा दिला. सकाळी त्या कबुतराला उडता येत नव्हतं. कारण ज्यांना आसरा दिला त्या उंदराच्या पिलांनी रात्रभरात कबुतराची पंख कुरतडले होते. म्हणून आसरा कोणाला द्यावा हेही तितकच महत्त्वाचं आहे. शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे. शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे. हळवी असतात मने जी शब्दाने मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसं जोडली जातात. नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही. कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही. टेबलला पाय असतात पण त्याला चालता येत नाही. बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही. सुईला नाक असते पण तिला वास येत नाही. कंगव्याला दात असूनही चावता येत नाही. माणसाला सगळं असूनही काही वेळा माणुसकी दाखवता येत नाही. जे तुम्हाला आपले समजतात ते नेहमीच तुमच्या संपर्कात असतात आणि जे तुमचे नसतात ते नेहमीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणे आवश्यक नसतं. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला निस्वार्थपणे मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणे पुण्यवान असतो. नेहमीच आत्मसन्मानाने जगा. कोणाच्याही आयुष्यात पर्याय म्हणून राहू नका. कारण उद्या अधिक चांगला पर्याय प्राप्त झाला तर तुम्ही त्यांच्या आयुष्यातून कधीही हद्दपार होऊ शकता. मी ताकद मागितली आणि परमेश्वराने मला मजबूत बनण्यासाठी अडचणी दिल्या. मी बुद्धी मागितली आणि परमेश्वराने मला शिकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी समस्या दिल्या. मी धाडस मागितले आणि परमेश्वराने मला अवघड परिस्थितीतून निघून जायची शक्ती दिली. मी प्रेम मागितले आणि परमेश्वराने मला मदतीसाठी माणसे पाठवली. मी इच्छा व्यक्त केली आणि परमेश्वराने मला संधी दिली. मला ते सगळे काही मिळाले नाही जे मला पाहिजे होते. पण मला ते सर्व काही मिळाले जे मला आवश्यक होते. सगळी नाती बरोबर कळतात कोण कसा आहे ते जेव्हा वाईट दिवस येतात.
44. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघानांच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका , एक "मनाचं बालपण " आणि दुसरे "अंतःकरणातील देवपण ".हे संपलं कि माणूस संपला. वेळ बरोबर शिकवते की आयुष्य कोणाची वाट पाहत नाही आणि कुणासाठी थांबतही नाही. जर कोणी तुम्हाला साथ दिली नाही तर तुम्हाला स्वतः लढायचे आहे आणि तुम्हीच स्वतःला सांभाळायचे आहे. ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस तीच वेळ आपल्यासाठी शुभ. जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही. तरीसुद्धा आयुष्य मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस सर्वच शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी. सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे, आयुष्यात सावकाश चला काही हरकत नाही, पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि दैदिप्यमान यशाची सोनपावलं सदैव मागे उमटलीच पाहिजेत. श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो, हीच आयुष्याची गंमत आहे. आयुष्य हे एकमार्गी असतं. आपण मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. आपण भूतकाळ जाऊन पुन्हा सुरुवात करू शकत नाही पण आपण आता सुरुवात करून चांगला शेवट नक्की करू शकतो. हुशारी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परिस्थितीनुसार बदलणे असते. मोठे बनण्यासाठी तुमची सुरुवात मोठी असणे गरजेचे नाही. पण मोठे बनण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. तुम्ही किती अंतर चालता हे महत्त्वाचे नाही परंतु त्यासाठी तुम्ही कोणता मार्ग निवडता हे महत्त्वाचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतही कार्य अडथळ्यांशिवाय पार पडत नाही. जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्ती होते. समोरच संकट बघून लढायचं की रडायचं हे स्वतःच ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. पासबुक आणि श्वास बुक, दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात "रक्कम" आणि श्वास बुकात "सत्कर्म". आयुष्याच्या मार्गावरील उरलेले आयुष्य "अवशेष" बनण्यापूर्वी त्याला "विशेष" बनवले तर आणि तरच आयुष्य फार सुंदर होईल.
45. दिवस उजाडायच्या आधी एक नयनरम्य व सुंदर
अशी पहाट असते. पहाट म्हणजेच आपल्या आयुष्यातील शिशुपण. प्रचंड निरागसता या पहाटेत
ठासून भरलेली असते. जशी पहाटेची काळजी ब्रम्हांड घेते त्याचप्रमाणे आपल्या शिशु पणाची
काळजी आपले आई-वडील आजी आजोबा भाऊ बहिणी, मावशी ,काका घेत असतात. या लहान मुलांच्या
हसणे व कोकिळेचे गीत गुंजन यात प्रचंड समानता असते या दोन्ही गोष्टी आपणास मनापासून
आनंद देतात. पहाटेच्या वेळेस शितल वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्नता देते त्याचप्रमाणे
लहान मुलांच्या लीला मन मोहवून टाकतात. एखाद्या लहानग्याच्या लीला पाहणे म्हणजे प्रत्यक्ष
देवदर्शन घेतल्याचा आनंद अनुभवल्यासारखे असते. दिवसातील सकाळचा प्रहर हा माणसाच्या
आयुष्यातील लहानपण. सकाळी सूर्य फार पटपट मार्गक्रमण करताना दिसतो त्याचप्रमाणे आपले
बालपण मार्गक्रमण करत असते. यात निरागसतेबरोबर कृतिशीलता ही दिसते. सकाळच्या वेळी दिवसाची
लगबग चालू होते. लहान मुले शाळेत जायला तयार होतात. दूध वाल्यांची पेपर वाल्यांची लगबग
असते. त्याचप्रमाणे आयुष्याची लगबग लहानपणी चालू होते. लहानपणीच आपल्या आयुष्याच्या
चित्रपटाचा कॅनव्हास बनतो. थोडक्यात आपल्या आयुष्याची आऊटलाईन तयार होते त्यात मोठेपणी
रंग भरायचे बाकी असतात. या लहानपणीच्या म्हणजेच सकाळच्या आठवणी आयुष्यभर मनात पिंगा
घालत राहतात. बऱ्याच गोष्टींचा शेवट हा चांगल्या सुरुवातीवर अवलंबून असतो त्यापैकी
एक म्हणजे आयुष्यातील सकाळ.
46. आयुष्यातील दुपार म्हणजे प्रौढ पण. प्रौढपणात
बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात तसेच बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे
दुपारी सूर्यराजा तापलेला असतो व त्याच्या दाहकता ही कुठल्याही संकटापेक्षा कमी नसते.
अशा या दुपारी प्रवास करावाच लागतो पण सोबत जर पाण्याची बाटली असेल व डोक्यावर टोपी
असेल तर संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होते. त्याचप्रमाणे प्रौढ पणात आपले नातेवाईक
व मित्रमंडळी आपल्या जवळ असतील तर संकटांना मात करण्यास मदत होते. प्रौढ पणात घरच्या
बरोबर सामाजिक कार्यही पार पाडली तर मनाला एक वेगळे समाधान मिळते. दुपारी चार नंतर
संध्याकाळची चाहूल लागते त्याचप्रमाणे पन्नाशीनंतर आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धाची
चाहूल लागलेली असते. या वयात सुद्धा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तींना कधीकधी
त्यांच्या मागणीप्रमाणे समुपदेशन करावेसे वाटते. गरज आहे ती फक्त या अनुभवाचा वापर
करून आपल्या आयुष्य व्यवस्थित करून घेणाऱ्यांची.
47. आयुष्याची संध्याकाळ म्हणजे म्हातारपण.
या संध्याकाळी आपल्या आयुष्याचा कॅनव्हास पूर्णपणे रंगवून झालेला असतो. गरज असते तो
कसा रंगवलाय याची माहिती इतरांना देण्याची. त्यासाठी कधी कधी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या
गप्पांच्या कट्ट्यांवर बुजुर्ग माणसांची गरज लागते व त्यांचे अनुभव ऐकून आपल्या आयुष्याचा
कॅनव्हास जो काही थोडाफार राहिलेला आहे तो कसा रंगवायचा याची माहिती घेता येते.संध्याकाळी
आभाळात तिन्हीसांजेला वेगवेगळ्या रंगछटा निर्माण होतात या वेगवेगळ्या रंगछटा दुसरे
तिसरे काहीही नसून आपल्या आयुष्यातील रंगीबेरंगी सुखदुःखाचे अनुभव असतात. परंतु या
तिन्हीसांजा फार वेळ टिकत नाही जसे निरोगी म्हातारपण टिकत नाही. तिन्ही सांजेला रात्रीच्या
गर्भात सामावून घेतले जाते त्याचप्रमाणे म्हातारपणानंतर आपणास देवाच्या घरी जावेच लागते.
प्रचंड अंधाराची म्हणजेच रात्रीची ही नांदी असते. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी,
आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची
काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान
सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प
तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ,
अहंकारी, लबाड, लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा,
नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा. चांगले
दिवस येतात तेंव्हा वाईट दिवसाचा विसर पडतो. ते पुन्हा येणार नाहीत अशा कल्पनेत माणूस
जगतो. पण कोरा करकरीत केलेला नवा रस्ता कालांतराने पुन्हा खडबडीत होतो हे आपण विसरतो. रोज बदलतं ते जग असत आणि रोज नव्या
समस्या घेऊन येतं ते "आयुष्य" असतं, वेळ बदलते तशा घटना बदलतात. परिस्थिती
बदलते तसे परिणाम ही बदलतात. आवक बदलते तशी नियत ही बदलते. प्रेम बदलते तसे आकर्षण
ही बदलते. म्हणून चांगल्या वाईट परिस्थितीत स्वतःला सहनशील बनवा आणि सक्षम ठेवा. म्हणजेच
"आयुष्य" चांगले जगता येईल.
48. चारित्र्य सहज आणि शांतपणे विकसित होऊ शकत नाही, फक्त परीक्षा आणि दुःखाच्या अनुभावातून मानवाला महत्वाकांक्षा प्रबळ करता येते आणि यश मिळवता येते." डॉ.हेलन केलर या अमेरिकन
लेखिका,
सुधारक
व प्राध्यापिका होत्या.
महाविद्यालयातून पदवीधर
होणाऱ्या त्या पहिल्या
मूकबधिर
व्यक्ती
होत्या. डोळ्याभोवती पट्टी
बांधून
खेळण्यात येणारा
आंधळी-
कोशिंबीर खेळ आपल्यापैकी बहुतेकांनी खेळला
असेल.
जेव्हा
डोळ्या
समोर अंधार
असतो तेव्हा
न अडखळता
चालण्यासाठी मोठी कसरत करावी
लागते. निसर्गाने आपल्याला दिलेले
निरोगी
शरीर ही खरोखरच
एक देणगी
आहे. ज्यांना
जन्मतःच
पाहण्यात, ऐकण्यात किंवा बोलण्यात अडचण असते त्यांचं आयुष्य किती खडतर होत असेल, याची कल्पना करणं सुद्धा कठीण होतं. कुठल्याही गोष्टी, व्यक्ती किंवा शारीरिक क्षमतेचं मूल्य जेव्हा त्याची उणीव भासू लागते तेव्हाच जाणवते. जिद्द, महत्वाकांक्षा व प्रयत्नात सातत्य असेल तर काहीही अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिले. आयुष्यात अडचणी, अडथळे, संकटे ही येतच रहाणार पण त्यावर मात करून आयुष्याचा आनंद घेणे , जीवन सुसह्य करणे हे आपल्याच हातात आहे. परिस्थितीवर आपलं पूर्णपणे नियंत्रण नसतं, पण त्यावर आपला प्रतिसाद काय असणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे अंतरमनाला सकारात्मक वळण मिळतं व वाईटातून चांगलं बघण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत मिळते. सकारात्मक विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो. पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते. माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे, तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत? खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते. कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत. खरतर आजकालच्या या खोटा दिखाव्याच्या शर्यतीत ,तु मोठा की मी मोठा, ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्या पायी माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय. जीवंतपणी, जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्या, अडचणीत सापडलेल्या ,एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून, माणुस व्हा.
49. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, आपल्या कर्मानुसारच
आपल्याला फळ प्राप्त होत असते. तसेच, त्यानुसारच आपली नाती आपोआप तयार होत असतात. प्रत्येक
घडणाऱ्या घटनेला कारण आहेच, विना कारणाचे असे काहीच घडत नसते. कित्येकदा आपल्या अनेक
नात्यांमुळे आपण दुःखी असतो. एक कायम लक्षात ठेवायला हवे की, जितके चटके ह्या जन्मात
बसत आहेत, बसू द्या, खरेतर ते चांगले आहे, कारण तितकेच आपले त्या आत्म्यांवरील देणे
घेणे, आपले हिशोब कमी होत आहेत. त्यामुळे जे येईल ते आनंदाने स्वीकारायचे मग ते सुख
असो अथवा दुःख. आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी की, दुसऱ्या कोणाचे
वागणे हे आपल्या हातातले नाही, तुमचा मित्र, तुमची मैत्रीण, तुमचा भाऊ, तुमची बहीण
किंवा कोणीही तुमच्याशी कसे वागतील हे तुम्ही ठरवू शकत नाही, आपल्या हातात असते ते
म्हणजे फक्त आपण कसे वागायचे? शेवटी प्रत्येक नातं काहीतरी देणी घेणी शिल्लक आहेत म्हणूनच
तयार झालेलं असतं. मग ते कुठलंही नातं असो, अगदी आपल्याला अचानक येऊन पटकन मदत करून
जाणाऱ्या व्यक्ती पासून ते आपल्याला लाभणारे आई, बाबा, नवरा, बायको पर्यंत कोणीही.
असे समजणे जास्त सोपे आहे की आपलं जीवन हा एक सिनेमा सुरू आहे आणि आपण सर्वजण ह्यातील
पात्र आहोत. प्रत्येक जण येथे ज्याचं त्याचं
पात्र निभावत आहे, त्याची भुमिका (देणी, घेणी) संपली की त्यांची आपल्या जीवनातून म्हणजेच
ह्या सिनेम्यातून exit असते. exit ही फक्त मृत्यूनेच नव्हे तर कित्येकदा अचानक काही
कारणांनी ते नाते संपुष्टात सुद्धा होते (किंवा त्या नात्याला एक अचानकपणे पूर्ण विराम
लागतो, असे म्हणता येईल.) जशी एखाद्या सिनेमातून, एखाद्या पात्राची भुमिका संपली की
ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते,अगदी तसेच. मग आपले ध्येय काय असावे? तर ह्या जन्म-मृत्यूच्या
फेऱ्यातून लवकरात लवकरत बाहेर पडणे. मग त्यासाठी काय गरजेचे आहे? तर ते म्हणजे विरक्त
भावना येणे, कशातही अडकून राहता कामा नये, हा कसा वागला, तो कसा वागला हिने असे केले,
तिने तसे केले, सर्व काही अगदी पार विसरून जायचे. सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे
अगदी स्वतःला सुद्धा, कारण मनात खंत राहिली म्हणजे भावना शिल्लक आहेत, भावना आहेत म्हणजे
वासना आहे. वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. वासनेतून मुक्त व्हायला
शिकायचंय. त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यावयाचे नाही आहेत. आपली ह्या मार्गावर वाटचाल
हळू हळू आपोआप होत राहणार आहे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन, नामस्मरण
हे सुरू ठेवायचं आहे. गुरुमहाराज आपल्याबरोबर मार्ग दाखवायला कायम आहेत हा ठाम विश्वास
ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची
पातळी वेगळी आहे हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचे. त्यामुळे जो तो ज्याच्या
त्याच्या पातळीनुसार वागणार. आपण आपल्या पातळीनुसार वागायचे. आयुष्य simple आहे पण
आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार complicated करत असतो. म्हणूनच हलकं फुलकं
जगा. नको त्या कर्मांची गाठोडी खांद्यावर घेत जगू नका. कर्म शुद्ध ठेवा आणि ध्येय पक्क
ठेवा म्हणजे कोणाच्या वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जीवन
म्हणजे काय? जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या.
१) रुग्णालय. २) तुरुंग. ३) स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल,
की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते, तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या
आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाही. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्रसेनानी यांनी अशाच
तुरुंगात तुरुंगवास भोगला असल्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे, त्याची आठवण येथे स्वातंत्र्याचे
महत्त्व तुम्हांला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वांत मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या
लक्षात येईल. स्मशानभूमीत गेल्यावर" जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण
इथे दुसऱ्या माणसाच्या अंतिमविधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कुणीतरी आपल्यालाही
खांद्यावरून येथेच घेऊन येणार आहे.
50. आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही
काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्याच्याकडे
आभार व्यक्त करा. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. संयम तुम्हाला मानसिक दृष्ट्या मजबूत बनवतो, मौन तुम्हाला भावनिक दृष्ट्या
मजबूत बनवते. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यामधील अंतर ज्याला समजतं, त्याला अपेक्षांचा
त्रास होत नाही. इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो. इच्छा पूर्ण झाली कि हाव वाढते,
म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला. जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे,
कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर नियतीचा डाव आहे, लढला तो जगला हरला तो संपला, इथे
तर जगण्याला भाव आहे.आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच. प्रयत्नशील
बनून काम अधिक चांगले करत राहायचे. त्याचे फळ नक्कीच वेळ आल्यावर मिळणार. जिंदगी में
टेंशन ही टेंशन है फिर भी इन लबों पर मुस्कान है, क्योंकि जीना जब हर हाल में है तो
मुस्कुराकर जीने में क्या नुकसान है। किसी को कुछ कहने से पहले एक बार ये जरूर सोच
ले कि अगर वही शब्द कोई आपसे कहे तो आपको कैसा महसूस होगा. ❝आपल्या
आपुलकीच्या माणसासाठी❞ दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत
जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे
राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी
आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा
करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.
आपण काही पुण्य कर्म किंवा सकारात्मकता किंवा मदत करणाऱ्यांची कृतज्ञता मानली असेल
तर मात्र या रात्रीच्या प्रवासात तुम्हाला चांदण्याची व प्रकाशाची साथ लाभते व याही
प्रवासात मन संतोषी राहू शकते. ब्रम्हांडाची ओढ जर मनात असेल तर हा ब्रम्हांडातील प्रवास
हा एखाद्या ध्यानधारणेप्रमाणे तुम्हास सुखाची वाट दाखवतो.
©️ ® लेखन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
मु. पो. महे (जरगवाडी)
ता. करवीर, जि. कोल्हापूर
मोबाईल : ७६२०० ३०६६८.
दिनांक : २३/११/२०२३.
स्रोत : आंतरजाळे आणि शेअरचाट आप्लिकेशन