बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

675. डोक्यातून त्याचा हा अहम काढला...

 एक मॉडर्न महिला आपल्या विदेशी ब्रिडच्या कुत्र्याला घेऊन पशू वैद्यकीय डाॅक्टरकडे आली. ती तिची समस्या डाॅक्टरला सांगू लागली.
"डाॅक्टर, माझा हा पपी आजकाल फार विचित्र वागू लागलाय. हट्टी पण झालाय. एवढंच काय पण तो माझं काही ऐकत ही नाही. मी त्याला माझ्याजवळ बोलवते तेव्हा हा माझ्यावरच भुंकतो. डाॅक्टरसाहेब, काही ही करा पण याला व्यवस्थित करा. हा माझा जिवलग पपी आहे. मला याच्या शिवाय करमत नाही."
डाॅक्टरांनी कुत्र्यावर कटाक्ष टाकतात. पंधरा मिनिटं त्याची तपासणी करून ते त्या महिलेस म्हणाले.
"मी याची तपासणी केली याला जरा खास ट्रिटमेंटची गरज आहे. तुम्ही असं करा आजची एक रात्र याला माझ्याकडे सोडा आणि उद्या सकाळी अकरा वाजता येऊन तुम्ही याला घेऊन जाऊ शकता."
महिलेने मोठ्या जड अंतःकरणाने डाॅक्टरांकडे त्या कुत्राला सुपुर्द करून महिला दवाखान्यातून निघून गेली.
डाॅक्टरने आपल्या ॲस्सिस्टंटला बोलवून घेतलं आणि कुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याला ऑर्डर केली की
याला दवाखान्याच्या मागे म्हशीसोबत रात्रभर बांधून ठेव. दर तासाला त्याच्यावर थंडगार पाणी टाकून पाच चाबकाचे फटके मार आणि रात्रभर ही ट्रिटमेंट चालू ठेव."
असिस्टंट डाॅक्टरचा प्रामाणिक नोकर होता. त्याने रात्रभर डाॅक्टरच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.
दुसर्‍या दिवशी ठरवल्याप्रमाणे अकरा वाजता ती महिला दवाखान्यात आली. डाॅक्टर तिला म्हणाले. "तुम्ही तुमच्या पपीला किती मिस केलं माहीत नाही. पण तुमच्या पपीनी रात्रभर तुम्हाला मिस केलंय."
डाॅक्टरनी अस्सिस्टंटला त्या कुत्र्याला घेऊन येण्यास सांगितलं. कुत्र्यांने त्या खोलीत प्रवेश केल्याबरोबर त्या महिलेस पाहिलं आणि टुणकन उडी मारून त्या महिलेच्या कुशीत शिरला. त्या महिलेसचे हात चाटु लागला. अतिशय गरीब नजरेने महिलेकडे पाहत तो शेपुट हलवू लागला.
हा सर्व प्रकार पाहुन ती महिला ही अचंबित झाली आणि म्हणाली "डाॅक्टरसाहेब, हा सर्व प्रकार चमत्कारिक आहे. फक्त एका रात्रीत तुम्ही याच्यात एवढा अमुलाग्र बदल घडवून आणलात. असं काय केलंत की तुम्ही याच्यात एवढा बदल घडवून आणलात."
डाॅक्टर म्हणाले "रोज मिळणारं चमचमीत जेवण. राहायला वातानुकूलित घर. कसली ही जबाबदारी नाही. त्यामुळं हा स्वत:ला मालक समजू लागला आणि आपल्याच मालकाचा त्याला विसर पडू लागला होता. मी फक्त त्याच्या डोक्यातून त्याचा हा अहम काढला. आता त्याला वास्तवाची जाणीव झाली आहे. आता या पुढं आयुष्यभर तो तुमच्यासोबत उध्दट वागणार नाही आणि तुम्ही त्याला जसं सांगाल तसंच तो वागेल."
नमस्कार सगळ्यांना  वरची जी पोस्ट आहे ती एक नॉर्मल कथा आहे पण बरच काही शिकण्यासारखा आहे या गोष्टीतून आपली लाईफ सुद्धा तशीच असते
 माणूस सुद्धा स्वतःच्या पुढ्यातल ताट पंचपकवानाचे भले असो ते सोडून दुसऱ्याच्या ताटात काय आहे ते नेहमी बघत असतो तुमच्या आयुष्यात जे सुख आहे मग ते तुमच्या फॅमिलीचे सुख असो किंवा दुसरी कोणती चांगली गोष्टी आहे तुमच्या आयुष्यात जे चांगले माणस आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या ते सुख तो आनंद अनुभवा जी गोष्ट आपल्या हातात नाहीये तिच्या मागे लागुन आणि पुणढ्यातलं सुख सोडून देणे हे खरच सोडून द्या
 मी जर काही गोष्टींचा एक्झाम्पल दिला तर आपल्याला जी माणसं जीवापाड प्रेम करतात जी माणसे आपली काळजी घेतात त्यांच्यावर तुम्हीही जीवापाड प्रेम करा तुम्ही त्यांची काळजी घ्या त्या लोकांच्या मागे का जाता जे तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही तुमचा आदर करत नाही जे तुमचा फोन सुद्धा उचलत नाहीत ना तुमचा मेसेज चा रिप्लाय करत. अजून काही महिला अशा असतात किंवा काही लोक असे असतात की घरात खूप सुख आहे छान नवरा आहे फॅमिली आहे मुलं आहेत आपल्याला या घरात आदर मिळते सन्मान मिळतोय तो सोडून भैतिक गोष्टींच्या मागे धावत असतात मध्यंतरी एका लेडीजचा मेसेज मी वाचलेला तिथेही असंच काहीसं होतं घरात सगळं सुख होता पण बाकीच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या भौतिक गोष्टीने खूप संपन्न आहेत आणि माझ्याकडे ती गोष्ट नाहीये म्हणून मला वाईट वाटतं तरी असं करू नका देऊ 
तुमच्यासोबत तुमच्याकडे जे आहे त्याच्यात सुखी रहा त्याच्यात आनंद घ्या हे तरी माझं स्वतःचं मत आहे आणि स्वतःचा अनुभव आहे तुम्ही तुमचा अनुभव आणि तुमचं मत हे मला शेअर केला तर मला खूप आवडेल Everyone

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...