सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

666. ...तर आरामच आराम आहे

ऑफिस ला जाताना सहजच म्हणाला ,
आता आहेस तू निवांत पूर्ण दिवस तुझा..
मी पण मस्त हसून म्हणाले ,
हो खरेच मीच घराचा राजा..

दार लावून आत येते ,तर चपलांचा हा ढीग ..
कॅबिनेट असताना ही पेपर ची अस्तव्यस्त शीग...
मनात म्हणलं , करून टाकू ,10 मिनिटांचं तर काम आहे ..
बाकी दिवस तर आरामच आराम आहे..!!

ते आवरून आत आले ,
तर दिसली कट्ट्यावरची धुळवड ..
अन्न , कणिक ,भाज्यांचे देठ ,चहाचे कप आणि अस्ताव्यस्त भांडयाची कडकड...
मनात म्हणलं , करणं तर भाग आहे ..
10 -15 मिनिटांचं काम आहे 
मग तर आराम आहे..!!

कट्टा झाला लक्ख ..
म्हणलं घ्यावी कॉफी मस्त...
समोर दिसली बेडरूम ,
पूर्ण अस्तव्यस्त..
गादीशी बेडशीटचे ,नाते दिले लावून...
उश्याना लावली जरा कडक शिस्त...
घराकडे बघून आता जरा बरे वाटले ,
असे करत करत सुमारे 10 वाजले!!
आता म्हणले पूजा करूनच,
घ्यावा कॉफी चा आस्वाद ..
बाथरूम कडे बघताच,
आठवले प्रत्यक्ष ब्रम्हांड...

साबण पाण्यात ...
शाम्पू उघडे ...
सगळी सांडासांड...
मनात पुन्हा विचार आला , 
आवरावे तर लागणारच ,
10 मिनिटांचं काम , 
पुन्हा आरामच आराम...!!
आंघोळीला सुरू करताच..
वाजली घराची बेल...
नेहमीप्रमाणे मावशी म्हणल्या , 
असुद्या असुद्या नंतर येते होईल थोडा वेळ..!!
काही बोलायच्या आधीच त्या निघूनही गेल्या..

म्हणलं मनात ,दुपारच्या झोपेचा कार्यक्रम ऑलरेडी कॅन्सल झाला...
जरा निवांत होई पर्यंत ..
वाजली घराची बेल...
चप्पल सरकवत मावशी म्हणाल्या , 
लैच झाला का वो येळ..
नाही नाही म्हणत ,
त्यांच्या दिमतीला लागले थेट ...
असे करता करता , वाजले की हो 3...
म्हणले , निद्रादेवी पेक्षा TV च्या व्हावे अधीन...
नुसता TV कसा बघणार , 
लागते म्हणे पाप...
लसूण घेतला ,चवळी घेतली ,
मेथी निवडायला साफ...
TV चे चॅनेल बदलून येऊन गेला कंटाळा ...
4 कधी वाजून गेले समजलेच नाही मला..!!
मस्तपैकी आल्याचा घेतला करायला चहा ...
गॅलरीतली झाडे म्हणाली , बयो 
आमच्याकडेही पहा...
झाडांचे आणि माझे झाले मस्त चहा पाणी...
घराचे 
मुलांचे 
नवर्याचे
पाहुण्यांचे
देवांचे 
झाडांचे 
मावशीनचे
ह्याचे आणि
त्याचे 
करत राहते काही न काही...
10-20 मिनिटांची कामे ,
फार जास्त नाही...

अशी कामे करता करता ...
आयुष्य तिचे जाते सरून..
एखाद्या कातरवेळी मन येते भरून...
मग येतो विचार पुन्हा ..
करावे तर लागणारच ...
कशाला करावी चिंता...
उगाच नको वाढवून घ्यायला 
आपल्या आयुष्याचा गुंता...!!
-Dr. Netra 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...