बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

705. आक्रमण आणि सरंक्षण

छोटा धडा,मोठी शिकवण !
एका कॉलेज जवळ एक जुनं पिझ्झा हॉटेल होतं. (Pizza A) चांगलं चालायचं. पिझ्झाची टेस्ट चांगली होती आणि एकूण सर्विस पण चांगली होती. कॉलेज मधील मुलांसाठी ते भरपूर डिस्काउंट कुपन्स वाटत असत. 
लवकरच तिथे आणखी एक पिझ्झा हॉटेल सुरू झालं. (Pizza B). त्यांनी पहिल्या हॉटेलचे ग्राहक मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. किंमत कमी केली. डिस्काउंट कुपन्स वाटले. मात्र कॉलेज मधील मुलं काही केल्या pizza B कडे जास्त फिरकत नव्हती. कारण Pizza A त्यांच्या चांगल्या सवयीचा झाला होता.
यावर उपाय म्हणून Pizza B ने एक शक्कल लढवली. त्यांनी एक जाहिरात पत्रक कॉलेजच्या बाहेर वाटायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं की pizza A चे 2 कुपन्स घेऊन या आणि pizza B चा पिझ्झा मोफत मिळवा. Pizza A चे ग्राहक आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
या युक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांनी free पिझ्झा साठी गर्दी केली. Pizza A च्या मालकाने यावर विचार केला आणि पुढच्या आठवड्यात यावर उपाय शोधला. पिझ्झा A ने जाहिरात केली की आमच्याकडे एक पिझ्झा घ्या व त्यावर 4 कुपन्स फ्री मिळवा. (जे वापरून pizza B चे दोन पिझ्झा मोफत मिळवता येतील!)
आता तर काय मुलांना चांगलीच संधी होती. पिझ्झा A कडून कुपन्स घेऊन ते पिझ्झा B मध्ये जायचे आणि मोफत 2 पिझ्झा घेऊन यायचे . Pizza B मध्ये ग्राहक तर वाढले पण पैसे कोणीच दिले नाहीत. नुकसान एवढे वाढले की लवकरच pizza B ने दुकानाला कुलूप ठोकलं.
मंडळी pizza B ने आपले स्वतःचे ग्राहक तयार करण्या ऐवजी इतरांचे ग्राहक चुकीच्या मार्गाने खेचण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची पहिली चूक.
आपल्या उत्पादनात वेगळेपण (Differentiation) आणण्याऐवजी त्यांनी केवळ किंमत युद्ध सुरू केले ही त्यांची दुसरी चूक.
आक्रमण (attack) करण्या आधी संरक्षण (defense) करण्याचा विचार केला नाही ही त्यांची तिसरी चूक.
व्यवसाय चालु करताना किंवा केला असेल तर स्वतःचा व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा, आपल्या मालाचा, कामाचा दर्जा कसा वाढेल त्यामुळे ग्राहक हे स्वतःहून तुमच्याकडे येतील. यासाठी 100 टक्के प्रयत्न करा पण दुसऱ्याचा व्यवसाय बंद किंवा त्याचे ग्राहक मिळवण्यासाठी चुकीची पद्धत वापरू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...