सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

662. चुकत चाललाय ताळमेळ

      तंत्रज्ञान फोफावत आहे. नवे नवे शोध लागत आहेत. जग बदलत आहे माणसे बदलत आहेत.  गेले ते दिन गेले  आता फक्त मागच्या आठवणी काढत बसायचे. किती सुखद काळ होता तो! सुट्टी लागली की आजोळी जायच. एवढे मोठाले वाड्यासारखे घर. माणसांनी गजबजलेले. आजी -आजोबा, मामा-मामी, मावशा, काका-काकी आत्या, नि भरपूर भावंडांचा गोतावळा.  खेळायला कुणी नाही असा आजच्या सारखा प्रश्न उदभवत नव्हता. एकत्र कुटुंब पद्धतीने  बंध प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे होते. सुख- दुःखात घरातले तसेच संपूर्ण गावचे सुद्धा एकत्र येत होते. आज विभक्त कुटुंब पद्धतीने  माणूस स्वार्थी झालाय. मी आणि माझी बायको मूले एवढंच. आई-बाबा, भाऊ-बहीण सग- सोयरे कुणीच नको. किती प्रेमळ नाती होती. भाऊबीज,दसरा-दिवाळी अशा सणावारांचा आनंद किती वर्णावा. वाड-वडिलांना वंदून त्यांचे  आशीर्वाद घेत होतो. अमुल्य भेट असायची ती.  कुणाच्या घरी कधी केव्हाही जात येत  होतो. आणि घरात आलेल्याचे आगत स्वागत ही दिलखुलास केलं जायचं.  उदार मनाने अगत्याने देत घेत होतो. आता फोन करून येऊ का? विचारावं लागतं.  परक्याची गोष्ट सोडाच सख्या भाऊ बहिणीमध्ये ही असंच चाललंय. 
      आताच वाद -विवाद होतात अशी गोष्ट नाही पूर्वी सुध्दा भावंडांमध्ये भांडणे व्हायची पण वडील धाऱ्यांनी समजावले की परत सगळं सुरळीत व्हायचे. आज कल सगळीकडे सगळ्या नात्यामध्ये मी -मी, तू - तू खूप होत असतं ते खूप तांडले जात आहे. मी कां माघार घेऊ. मी मोठा, मी श्रीमंत  मी च एकमेव असा अहंम मोठ्यात व लहानात सुद्धा भरलाय. आज नाते बंधनापेक्षा मैत्रीचे नाते उच्च श्रेणीचे झालंय. आणि थोड्या फार प्रमाणात ते बरोबरच आहे.   आज विभक्त राहत असल्याने आपले भाऊ-बंध जवळ नसतात. फोन करून येई पर्यंत  शेजारी पाजारी अगोदर धावत येतात. हं पण  त्यांच्याकडे आपले संबंध चांगले असले तरच हं.  आणि माणूस ही मैत्रीशी शेजाऱ्यांशी सलोख्याने वागतो. मैत्रिचे नाते जास्त जपतो. कारण सध्याच्या अडी अडचणीत मैत्रीच जास्त उपयोगी पडते. आज मुले परदेशात स्थाईक झालीत. वयस्कर आई-वडील एकटे अथवा वृद्धाश्रमात.  तर काही आई-वडील  धड-धाकट असून सुद्धा स्वतःच्या नातवंडांना  बरोबर ठेवत नसतात. मग नोकरी करणारी आई आपल्या पिल्लूला पाळणाघरात ठेवणार नाही तर काय करणार.
     पूर्वी एकत्र कुटुंबात मुलांवर आपसूकच संस्कार घडत होते. कुटुंबातलील एकमेकांचे पाहून ती आत्मसात करत होती. आज विभक्त राहत असल्याने आजी -आजोबा जवळ नसल्याने  त्यांच्यावर संस्कार होणे कठीणच होत आहे. त्यामुळे आता मुलांना संस्कार केद्रांत पैसै भरुन घालतात. परदेशात असणारी मुले आई-बाप वारले हे कळून सुद्धा   (अपवाद सोडून )मुलगा मुलगी शेवटच्या दर्शनाला सुध्दा येत नसतात. पालक  राब राब राबतात. सगळी कमाई मुलांसाठी खर्चितात व शेवट असा तर दुदैवच म्हणावे लागेल. आयटीमध्ये कमावणारी पोरे  कोरोनाच्या काळात उपाशी का? तर आज कमवा आज खायचे साठवण मुळी करायची नाही. भविष्याची चिंता नाही. ' खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ' अशी वृत्ती आजच्या युवा पिढीत आढळत आहे. एकालाच कुणाला दोष  द्यायचा नाही तर आपण बघतो सगळ्यांचेच चुकत आहे. प्रत्येकांने सुधारायला हवे. एकता, माणुसकी्,आपलेपण जिव्हाळा जपायला हवा. आपल्या लहानग्या मुलांच्या पिढीला सुखात नि मायेत ठेवायचे असेल तर चुकत असलेला ताळमेळ आताच सावरायला हवाच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...