मुलांना सासरी पाठवल जात नाही घरातून पण मुलंही जातात सोडून
आपलं घर, आपली खोली, गल्ली मित्र अन गाव
शिक्षणासाठी, नोकरी साठी पोटापण्यासाठी.
आपलं घर, आपली खोली, गल्ली मित्र अन गाव
शिक्षणासाठी, नोकरी साठी पोटापण्यासाठी.
रात्रभर कुस बदलत बिन झोपेचा,
कण न् कण घराचा साठवत राहतो उदास डोळ्यात.
आपलं जग मागे सोडताना सर्टिफिकेट अन कपडे सुटकेसमध्ये भरताना.
भरलेल्या छातीत , मनाचं मेण होताना,
आपली बाईक, बॅट, अन् भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात
ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.

रेल्वेच्या दारात, बस मधल्या किडकितून,
बंद कारच्या काचेतून,विमान तळावरून चेक इन करताना डोळ्यातलं पाणी लपवत,
हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,
हळूहळू चालत्या रेल्वे सोबत, ओला सोबत,
हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,
हळूहळू चालत्या रेल्वे सोबत, ओला सोबत,
बस सोबत किंवा चेक इन करण्या करिता नाहीसा होतो मुलगा.
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.
मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून.
आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका
आणि वाजणार नाही दाराबाहेर खूणेच हॉर्न .
घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा.
उंबरठा ओलांडतांना घराचा त्यालाही रडावसं वाटतं.
आईच्या गळ्यात पडून पुन्हा मुल व्हावसं वाटतं.
पण जबाबदार्यांचा बंधारा अश्रूंची वाट अडवतो,
मुलगा मग सार्या भावना खोल छातीत दडवतो.
मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिल्या गेलीत
पण मूलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात.
मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिल्या गेलीत
पण मूलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात.
एका अनोळखी शहरात,
जिथे कोणीही त्याची वाट पाहत नाही.
अशा कुठल्यातरी एका घरात,
मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन करतात.
हो हे खरच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,
पण मुलंही घर सोडून जातात.
मुलंही घर सोडून जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा