"शशांक अरे आता तरी विचार कर ना..."
" आई अगं सहा वर्षे झाली तरी तुझं आपलं पुन्हा तेच आहे. मला माझ्या इरा साठी सावत्र आई नकोय "
"अरे आपण वाटलं तर त्या मुली कडून लेखी करार करून घेऊ...ती तिचं मुलं जन्माला नाही घालणार "
"आई.... हे तु बोलतेस? अगं असा लेखी करार करून आपण तिचं मातृत्व नाकारायचे... नाही मला पटत नाही..... आणि हा विषय इथेच थांबव "
आजी आणि बाबा चं बोलणं वजा भांडण ऐकून निरागस गोड ..वय वर्षे सहा असलेली इरा शशांक ला " बाबा आजी बरोबर नको ना भांडु... आणि आजी तु पण माझ्या बाबा बरोबर नको ना भांडु "
इरा ला जवळ घेत शंशाक" आम्ही भांडत नव्हतो बेटा..ते काय आहे आजी वाटतं की मी तुला नीट सांभाळत नाही म्हणून ती मला सांगत होती "
इरा लगेचच शशांक ची बाजू घेत " आजी...माझा बाबा सगळ्यांच्या बाबा पेक्षा भारी आहे."
शशांक च्या आईने इरा ला जवळ घेत " हो गं तुझा बाबा सगळ्यात ग्रेट आहे. "
शशांक चे डोळे मीरा च्या आठवणीने पाणावले.. कॉलेज पासून एकमेकांना ओळखत होते... नोकरी लागल्यावर रितसर मागणी घातली आणि लग्न केले...प्रेमाचा बहर फुलला... आणि दोन वर्षांनी मीरा च्या पोटी छोटीशी परी...इरा ने जन्म घेतला... आनंदाला उधाण आलं होतं... शशांक चं कुटुंब पुर्ण झालं होतं... पण कोणाचीतरी नजर लागावी असे घडले... डिलिव्हरी होऊन दोन दिवसांत मीराची तब्येत बिघडली... आणि जे घडायला नको होते ते च घडलं... मीरा कायम ची सोडून गेली... शशांक तर पुरता कोसळला..पण समोर लहान गोंडस अशा इरा ला बघुन... धीराने पुन्हा उभा राहिला.. मीरा च्या आई वडीलांनी तर छोट्याशा इरा चां वाईट पायगुण म्हणून दुषणे लावून मोकळे झाले...त्या क्षणी शशांक ने मीरा च्या आईवडिलांशी संबंध तोडले ते कायमचे..
शशांक च्या पाठीशी त्यांचे आई वडील खंबीर पणे उभे होते...
मीरा चं असं जाणं शशांक च्या जिव्हारी लागले होते..पण त्याने तेव्हा मनाशी निर्णय घेतला... काही ही झालं तरी माझ्या इरा ला मी चं सांभाळणार...तिची आई आणि बाबा होऊन...
तान्ह्या बाळाला सांभाळताना त्याला कळाले...एका आई ची तगमग.. काय होतं असेल ते...दिवस सरत होते...आई वडीलांच्या मदतीने शशांक इरा ला सांभाळत होता... हळूहळू इरा मोठी होऊ लागली...इराने पहिल्या शब्द बोलली असेल तो...'बाबा' त्या क्षणी शशांक ला आकाश ठेंगणे झाले होते... नोकरी करून आता इराला वेळ देताना शशांक ची दमछाक होत होती.. म्हणून नोकरी सोडून त्याने बिझनेस सुरू केला ...थोडा कठीण काळ अनुभवला पण देव तारी त्याला कोण मारी... तसंच देवाच्या कृपेने बिझनेस मध्ये जम बसला...इरा आता प्ले ग्रुप ला जाऊ लागली होती. बहुतेक मुलांना त्यांच्या आई सोडवायला यायच्या... शशांक च्या आई ला ती सोडवण्यासाठी आग्रह करु लागली.. आपल्या आजी लाच ती आई समजु लागली होती...इरा चां हट्ट पुरवला गेला...
केजी संपुन इरा पहिल्या वर्गात पोहोचली..आपण जिला आई समजतो ती खरं तर आपल्या बाबांची आई आहे..हे हळूहळू तिला लक्षात आलं..एक दिवस तिने शशांक ला विचारले.." बाबा ... सगळ्यांना आई आहे...मग माझी आई कुठे आहे"
शशांक ने तिच्या वयाला समजेल असं उत्तर देत म्हणाला " बाळा तुझी आई खूप चांगली होती..मग देव बाप्पा म्हणाला.. तुझ्या इरा कडे तर तिचा बाबा , आजी आबा आहेत... माझ्या इथल्या बाळा साठी कोणी नाही तर तु इथेच थांब... आणि रात्री तुझ्या इरा च्या स्वप्नात जाऊन तिला भेट.." बाबाने दिलेलं उत्तर त्या लहानग्या इराला पटलं... आणि आपली आई रोज आपल्या स्वप्नांत येते..यावर खुश होऊन गेली...
शशांक बापा बरोबर चं आई चं ही कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडत होता.. अगदी इरा चे केस विंचरणे, तिचं आवरणं ...अगदी इरा ने नेलपेंट सुद्धा शशांक च्या नखांना लावलेलं त्याने आनंदाने enjoy केलं...
बाप लेकी चां जिव्हाळा बघुन .. शशांक च्या आई वडीलांनी.. आनंद होत होतो चं पण त्याच बरोबर ... शशांक ने एकट्याने आयुष्य जगणं पटतं नव्हतं... शशांक ची मावशी सहज बोलून गेली..." तुम्ही आई बाबा सगळं करता म्हणून तो बिनधास्त आहे.. तुम्ही जबाबदारी घेऊ नका.. म्हणजे त्याला सगळं करायला लागले की कळेल.."
पोटच्या पोराला सुखात बघण्यासाठी शशांक चे आई वडीलांनी थोडे दिवस दुसऱ्या मुला कडे राहायला जायचा निर्णय घेतला...
हे ऐकून शशांक थोडासा घाबरला ...पण मनात विचार करत... शेवटी इरा ही माझी जबाबदारी आहे... माझं कर्तव्य मी करणारं.. आणि आई बाबांना उतार वयात माझ्या मुळे कशाला जबाबदारीत अडकवायचे..
आणि हळूहळू पुर्णतः इराचे खाण पिणं... बाकीचे सगळे आवरण अगदी व्यवस्थितपणे शशांक ने सांभाळून घेतले...
आपल्या या उपाया चां काही परिणाम झाला नाही हे आई वडीलांना कळुन चुकलं..
एक आई जे जे म्हणून आपल्या लेकी साठी करते ते सगळं शशांक इरा साठी करत होता..
दिवस सरत होते...इरा आता सहाव्या इयत्तेत मध्ये शिकत होती..
एक दिवस दुपारी शाळेतुन घरी आली..ती घाबरलेली चं होती..घरात कोणीच नव्हते. आजी आजोबा बाहेर गेले होते तर शशांक कामानिमित्त बाहेर होता.
थोड्या वेळाने शशांक घरी आल्यावर बघितले तर इरा खूप घाबरलेली होती. शशांक ला बघुन त्याला घट्ट मिठी मारत हुंदके देत होती.
शशांक ने सावरत तिला शांत करत बोलतं केलं..
" बाबा आज दुपारी शाळा सुटल्यावर आमच्या बस मधली ती सातवी च्या वर्गातील त्रिशा दिदी आहे ना तिच्या स्कर्ट वर मागे खुप रक्त होतं...ती रडत होती...बस च्या मावशी पण तिला रागवत होत्या..."
शशांक ला कळाले इरा कशा बदल बोलत आहे...त्याने तिला जवळ घेत ... तिच्या वयाला समजेल अशा सोप्या भाषेत 'पाळी' बद्दल माहिती दिली... अगदी असं झाल्यावर काय करावे याचे मार्गदर्शन केले... मनात विचार केला आज जर मीरा असती तर तिने असंच समजुन सांगितले असते..
शाळेत जेव्हा 'माझी आई' या विषयावर निबंध लिहिताना...इरा ने भरभरून आपल्या बाबा बद्दल लिहीलं होतं..
शाळेत नवीन आलेल्या शिक्षिकेला इरा च्या आई बद्दल काही माहिती नव्हती...तिने इरा चा निबंध बाजूला ठेवून ओपन हाऊस च्या वेळी बघता येईल असा विचार केला ..
ओपन हाऊस च्या वेळी इरा आपल्या बाबा सोबत गेली..
" तुम्ही एकटेच आलात...हिची आई कुठे आहे... दोन्ही पालकांनी येण कम्पल्सरी आहे.. नोटीस वाचली नाही का ?"
" मी सिंगल पेरंट आहे...."
" इरा चां रिझल्ट चांगला आहे...पण मला काही दुसरी माहिती द्यायची होती.. म्हणून आम्ही मदर पेरेंट ला बोलावले होते..."
" मी इरा चां आई बाबा दोन्ही आहे... तुम्ही माझ्याशी बोलु शकता "
शिक्षिकेला जरा अवघडल्यासारखे झाले..." ते आम्हाला... म्हणजे आमच्या शाळेत आम्ही मुलींना MC विषयी सांगणार आहोतच..पण.."
शशांक च्या एकंदर विषय लक्षात आला...शिक्षिकेचे अवघडलेपण दुर करत ..
" हो मी या बाबत मी इराला मार्गदर्शन केले आहे.. तिच्या school bag मध्ये extra dress, sanitary pads दिलेलं आहे.. पण एक विनंती आहे.. लहान मुलींना जसे मार्गदर्शन करणार ना तसेच तुमच्या शाळेतील मावशी यांना पण सांगा...असा प्रसंग आल्यास मुलींवर ओरडायचे नाही...तर समजून सांगत धीर दिला पाहिजे... शेवटी शरीरातील नवीन बदलाल सामोरं जायचं असतं.. अशा वेळी ओरडून .. भीती घालून ...ही कोवळी मने कोमेजून जातील..."
हे ऐकून शिक्षिका चकित झाली.." मी आता पर्यंत इतके पेरेंट बघितले पण तुम्ही सिंगल पेरंट असुन सुद्धा किती छान सांभाळले आहे.. खरंच इरा ने ' माझी आई ' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी सार्थ ठरतो..."
निबंध शशांक ला देत खरंच .." कौतुक वाटतं तुमचं ...एक सिंगल पेरंट म्हणून मी किती तरी स्त्रिया बघितल्या आहेत...पण आज एक पुरुष सिंगल पेरंट बघुन तुम्ही एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे..."
शिक्षिकेच्या बोलण्याकडे शशांक चं लक्षच नव्हतं...तो इरा ने लिहिलेल्या निबंध ची एक अन् एक ओळ वाचत होता..
पाणावलेल्या डोळ्यांनी " मॅडम मी हा निबंध माझ्या कडे ठेवु ?"
शिक्षिकेने होकार दिला...
घरी आल्यावर शशांक ने आईला इरा ने लिहिलेला निबंध वाचायला दिला...
आई ने वाचून तिचे डोळे भरून आले..." खरंच रे शशांक... मीरा गेली पण तुझ्यात आई पण देऊन गेली..."
प्रिती ब्रिजेश नाईक.
स्वरशब्दांचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा