१२/६/२०२५ रोजीच्या अहमदाबाद विमान अपघातात २६५ ठार तर कित्येक कायम स्वरूपीं अपंगत्वाचे ओझे घेऊन परावलंबी जीवन जगणारे आहेत. विमानाने टेकऑफ केल्यावर अवघ्या दोन मिनिटात राखरांगोळी झाली. हे लिहिताना सुध्दा माझे हात जड झाले आहेत. अक्षरशः थरथर कापत आहेत.
मन अगदी सुन्न झाले.
विमान जसजसे धावपट्टीवर सरकते तेव्हा सुंदर चेहऱ्याची हवाई सुंदरी आपली काळजी घेत असते. आपले काम चोख बजावत असते. आणि आकाशात उडतोय पण एक आश्वासक हात आपल्या मदतीसाठी आहे हा विश्वास आपल्याला मिळतो.
( कारण अहमदाबाद ते पुणे हा प्रवास मी जेव्हा एकटीने केला तेव्हा मनावर खूपच दडपण होते.)
कालचा अपघात बघितला तेव्हा हा क्षण लक्षात आला.
पायलट हे तर आपले काम चोख बजावतात .
कालचा अपघात हा मन विषण्ण करणारा होता हे मात्र खरे.
कुणी आपले आप्तस्वकीय गमावले. कुणी आईवडील गमावले कुणी सहकारी गमावले
प्रिय पत्नीची ओळख होण्याआधीच तिला काळाने हिरावून नेले. मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना तर सेवानिवृत्ती घेऊन वडीलांची सेवा करायची होती. बि,जे मेडीकल चे जेवणाच्या मेसमध्ये विमान घुसलं ताटातला शेवटचा घास पण आपला नाही???
मोदीबरोबर असणारा मुख्यमंत्री पदाचा चेहरा व भावी पंतप्रधान पदाच्या पंगतीत नाव असलेले माजी मुख्यमंत्री स्व. विजय रूपाणी.
कुणाबद्दल काय काय व्यक्त होऊ.
किती डॉक्टरांच्या कुटूंबातील कुंकू पुसलं गेलं असेल. आपला मुलगा डॉक्टर होईल या आशेने कर्जबाजारी आईवडिलांच्या वेदनांना कसा आवर घालायचा ?
किती स्वप्न आशा धुळीस मिळाल्या. किती आणि कुणासाठी हळहळ करणार !!!
सर्वच अनपेक्षित ----
मनाला अत्यंतिक वेदना देणारा क्षण-----!!!!
आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या मनातील भिती झाडावर वास्तव्य करणारे पशुपक्षी सगळे सगळे पोरके झाले.!
*जग सुंदर आहे आयुष्य त्याहून सुंदर आहे, * म्हणून म्हणते जगा,प्रेमाने आपल्या जवळ जे जे काही आहे ते ते गरजवंतांना द्या. मनापासून हृदयस्थ एकमेकांची काळजी घेत जगा,---
पण हे होईल का हो!!! कुरघोडी,मोठेपण,संचय,
हव्यास लोभ,एकमेकांविषयी विनाकारण असलेली कटू भावना हे सर्व विसर्जित करून
मृत्यू अटळ आहे हे मान्य करा. ---!!!!
खोटा अहंकार दंभाचार सोडून द्या --!!!
सगळं क्षणभंगुर आहे.
एक दिवस असाही आहे.
*दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव *
सर्व मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻
सौ, ऊज्वला धर्माधिकारी पुणे.
-----------------------------------------------------------
सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले आणि लंडन येथे स्थायिक झालेल्या श्री प्रतिक जोशींनी आपल्या भारतात राहिलेल्या पत्नी आणि तीन लहान मुलांसाठी परदेशात जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते.
वर्षानुवर्षे योग्य परवानग्या मिळण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या पत्नी डॉक्टर डॉ. कोमी व्यास यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दिनांक १२ जुन २५ रोजीची अहमदाबाद ते लंडन अशी एअर इंडिया विमानाची तिकिटे मिळाली.
नातेवाईकांचे निरोप घेऊन आशा आणि उत्साहाने भरलेले पाच जणांचे कुटुंब एअर इंडियाच्या १७१ या फ्लाईटमध्ये बसले. त्यांनी एक सेल्फी काढून तो नातेवाईकांना पाठविला. 'नवी स्वप्ने नवी आशा'.
नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विमान कोसळले. कोणीही वाचले नाही. आयुष्यभराची रंगवलेली स्वप्ने क्षणभंगूर झाली. नियतीने काळाच्या अंधारात सर्व काही हरवून नेले. राहिल्या त्या ५ निष्पाप जीवांच्या आठवणी.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
----------------------------------------------------------------------------------------------------------
कोण ? कसं आणि कधी चाललं जाईल या गोष्टीचा आपण साधा अंदाज देखील लावू शकतं नाही.
इथं शाश्वत काहीचं नाही... जन्माला आल्यापासून आपली वाटचाल मृत्यू कडे सुरू असते फक्त मृत्यू भयावह नसावा इतकंच.
सुट्टी एन्जॉय करायला गेलेले आतंकवादी हल्ल्यात मरण पावतात.
सीएसके च्या ट्रॉफी परेड ला गेलेले चेंगराचेंगरीत मेले.
रोजचा लोकलचा प्रवास मात्रं , एक वळण येतं आणि काहींना मृत्यू आपल्या कवेत घेऊन जातो.
तुम्ही कामासाठी किंवा सुट्टी एन्जॉय करायला विमानाने बाहेर देशात जाताय ,
तेच विमान टेक ऑफ होतांना कोसळतं आणि मृत्यू चा आकडा हृदय हेलावून टाकणारा.
समजा तुम्ही बाहेर कुठेही जातं नाही हे. तुम्ही तुमच्या हॉस्टेल मध्ये अभ्यास करताय किंवा जेवण करताय आणि अशातच वरून उडणार विमान तुमच्यावर कोसळतं आणि जागेवर मृत्यू.
म्हणजे मृत्यू निश्चित असेल तर घटना फक्त निमित्त मात्रं असतात , इतकंच.
आपल्या आयुष्याची दोरी आपल्या हातात नाही... हेच एक त्रिवार सत्य आहे.
हे जग सोडण्याआधी मनसोक्त जगून घेणं आणि आपल्या हातून चांगलं घडतं राहील यावर भर देणं इतकंच आपल्या हाती आहे.
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली , ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो !!
🙏🙏💐💐💐
-----------------------------------------------------------------------------------------
एक चांगले निरोप देणं शिकूया...
एअर इंडियाच्या नुकत्याच झालेल्या विमान अपघाताच्या बातमीने सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे.
जेव्हा त्या दृश्यांकडे पाहिलं,
ती खरं, वेदनादायक आणि भयावह क्षणचित्रं...
तेव्हा मन आपसूकच त्या प्रवाशांच्या जागी गेलं.
मन अस्वस्थ झालं...
त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हळहळ वाटली.
एक सतत प्रवासात असलेला माणूस म्हणून – विमानात चढणं, डेडलाइन पाळणं, स्वप्नं उभारणं.
तो कुणीही असू शकत होतं.
मी, तुम्ही, किंवा आपल्यापैकी कुणी प्रिय व्यक्ती.
आणि आपण मात्र ५ वर्षांचे प्लॅन करत बसलोय...
भविष्याचा विचार करत...
पण उद्याचं अस्तित्वच निश्चित नाही,
हे आपण विसरतो.
या घटनेत सर्वात जास्त हळहळ वाटली ती अपघातामुळे नव्हे,
तर घरातून निघताना आपण जसा सहजपणे निघून जातो, त्याचा.
कधी आलिंगन नाही,
कधी एक थांबून घेतलेला श्वास नाही,
एक नीटसा “बाय” पण नाही…
फक्त दार उघडून घाईघाईने निघणं,
एक नजर चुकवलेला हात हलवणं,
किंवा कधी भांडणानंतर शांततेत निघून जाणं…
आजने पुन्हा आठवण करून दिली :
जीवन किती नाजूक आहे.
आणि त्यातले क्षण किती मौल्यवान.
तुम्ही हे वाचत असाल तर थोडा थांबा.
तुम्ही जिवंत आहात. तुमचं कुटुंब सुरक्षित आहे. एवढंच काय ते खरं सुख आहे.
माझी एकच विनंती –
अशा क्षणांची वाट न पाहता, ‘गुडबाय’ म्हणजे काय ते शिकून ठेवा.
तुम्ही ऑफिसला जात असाल, ट्रेन पकडत असाल, किंवा फ्लाइटला –
प्रेमाशिवाय, कृतज्ञतेशिवाय, नीट निरोप न देता निघू नका.
आपल्याला कोणी किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना कळवायला विसरू नका.
कारण कधी असा दिवस आला (देव करो आणि तो कधीच येऊ नये),
तर मागे राहणाऱ्यांच्या वेदना या नसतात की तुम्ही गेलात…
तर त्या असतात की :
"आपण पुरेसं बोललो नाही", "पुरेसं प्रेम दिलं नाही",
"थोडं अजून धरून ठेवलं असतं तर..." 💔
आपण सगळेच शिकूया
प्रेमाने, कृतज्ञतेने आणि निरोप देणाऱ्या निरोपांनी जगातून निघायला.
या अपघाताने प्रभावित झालेल्या प्रत्येक आत्म्याला प्रार्थना आणि मनापासून श्रद्धांजली....!
🙏🏼
------------------------------------------------------------------------------------------------------------
"आयुष्य क्षणभंगुर आहे…
विमान धावपट्टीवर सरकत होतं…
खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस."
कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈️” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – "सगळं नीट होऊ दे."
पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती.
एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं.
पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर…
त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत.
"Call me when you land..."
"Miss you already..."
"Take care..."
कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello?” म्हणणारा कोणी तरी.
कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल, शेवटचा शब्द कोणता असेल…
आज जे गेले, त्यांच्या हसण्याच्या प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहेत.
त्यांनी मागे ठेवलेली स्वप्नं, आवाज, माणुसकी – हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं...
"आयुष्य क्षणभंगुर आहे…
त्यामुळे प्रत्येक क्षण जगा – प्रेमाने, माफ करत, आणि अगदी मनापासून."
एक नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना –
ज्यांनी आजच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले.
मृत्यू अटळ आहे… पण तो येईपर्यंत
‘मृत्यूशिवाय’ जगणं, हेच खरं आयुष्य आहे.
🙏 नम्र श्रद्धांजली –🙏🏽
जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा