".....'जातो नाही येतो' म्हणायचं..
किती वेळा सांगितलंय मी हे तुला.
तरीही....
शेवटी सुद्धा तू असंच म्हणालास...
'जातो मी...'
जाता जाता फक्त हसलास...
हसत हसत गेलास.
आणि...
परत आलास तो तिरंगा लपेटून.
लग्न होऊन अवघे नऊ महिनेच तर झाले होते..
नऊ जन्म जगले मी त्या दिवसात..
त्या नऊ महिन्यात सुद्धा,
तू फार वाट्याला आलाच नाहीस माझ्या..
असू देत.
मिळतील ते क्षण भरभरून जगलो आपण.
तू कळलास.
तू समजलास.
मनापासून आवडलास.
तू किती कमिटेड असायचास.
आॅलवेज आॅन ड्यूटी.
तुझ्यासाठी नेहमीच ड्यूटी फर्स्ट.
मेरा देश, मेरा वतन...
देशासाठी सगळं कुर्बान केलंस तू.
अभिमान वाटतो तुझा खूप.
देवाचे लक्ष लक्ष आभार.
तू माझ्या आयुष्यात आलास..
आई म्हणायची ते अगदी खरं...
"नशीब काढलन् पोरीनं"
खरंच नशीबवान आहे मी.
आठवतंय तुला..
घरी आलास की तू माझ्या डोक्यावर,
तुझी कॅप ठेवायचास..
"मेजर विक्रम रिपोर्टींग सर..."
आणि कडक सॅल्यूट.
आयुष्यातले मूठभर सोनेरी क्षण कसे विसरेन मी...?
धुमसतं बर्फ लहान असल्यापासून बघत्येय मी.
माझा जन्म इथलाच.
काश्मीरमधलाच.
दहशतीच्या वादळानं ऊद्ध्वस्त झालेलं नंदनवन,
जवळून बघितलंय मी.
भारतीय सैन्याचं बलिदान,
सैन्यानं दिलेला मदतीचा हात,
शिक्षणाची दाखवलेली नवी वाट.
क्षितीजावर ऊगवणारी नवी पहाट.
कशी विसरेन मी ?...
मनाशी ठरवलं होतं..
शिकायचं.
खूप शिकायचं.
शिकले.
छान नोकरीही मिळाली...
आणि तू माझ्या आयुष्यात आलास.
एक विस्फोट.
अगणित स्वप्नांची राख करून गेला.
तू न सांगता निघून गेलास..
तुझ्या आठवणीनं आभाळभर रडले.
मग माझं मलाच पटलं.
तू गेला नाहीस.
तू आहेस...
माझ्यात चिरंतन निरंतर..
माझा प्रत्येक श्वास तुझाच.
तेव्हा वाटलं...
हे माझं आयुष्य माझं नाहीये.
सगळं काही तुझंय.
ठरलं...
मी कशी आवडेन तुला ?
तुझं ऊत्तर मला ठाऊकेय.
अर्थात आर्मी युनिफाॅर्ममधे...
तुझे आईबाबा आणि माझे आईबाबा.
सगळे पाठीशी ऊभे राहिले माझ्या.
एक वर्षाचं खडतर ट्रेनिंग.
वर्षातला प्रत्येक दिवस.
दिवसातला प्रत्येक क्षण.
माझं तन मन कणखर बनवून गेला..
पलपल तुझा सहवास, आभास जाणवायचा.
देवाकडे एकच मागणं आहे....
एक संधी मलाही दे.
विक्रमसारखी...
मीही पाय रोवून ऊभी राहीन...
संपवून टाकायचीय ही दहशत मला कायमची.
मला शक्ती दे देवा..
आज...
मी प्रचंड खूष आहे.
मीही इंडियन आर्मीच्या कुटूंबात सामील झालेय.
माझं स्वप्नं पुरं झालंय.
नव्हे तू ते माझ्याकडनं पुरं करून घेतलंयस...
खरं सांगू ?
आज तुझी खूप आठवण येतेय...
दीक्षांत समारंभ बघायला तू हवा होतास..
साॅरी..
पुन्हा या डोळ्यांत अश्र् येऊ देणार नाही..
लेफ्टनंट प्रभा रिपोर्टींग सर...!"
फोटोतल्या विक्रमला प्रभानं कडक सॅल्यूट मारला.
आणि फोटोतला विक्रम समाधानानं हसला.
जय हिंद की सेना !
ही खरी श्रद्धांजली....
प्रभा, तूच खरी इन्डियन आयडाॅल आहेस.
किती वेळा सांगितलंय मी हे तुला.
तरीही....
शेवटी सुद्धा तू असंच म्हणालास...
'जातो मी...'
जाता जाता फक्त हसलास...
हसत हसत गेलास.
आणि...
परत आलास तो तिरंगा लपेटून.
लग्न होऊन अवघे नऊ महिनेच तर झाले होते..
नऊ जन्म जगले मी त्या दिवसात..
त्या नऊ महिन्यात सुद्धा,
तू फार वाट्याला आलाच नाहीस माझ्या..
असू देत.
मिळतील ते क्षण भरभरून जगलो आपण.
तू कळलास.
तू समजलास.
मनापासून आवडलास.
तू किती कमिटेड असायचास.
आॅलवेज आॅन ड्यूटी.
तुझ्यासाठी नेहमीच ड्यूटी फर्स्ट.
मेरा देश, मेरा वतन...
देशासाठी सगळं कुर्बान केलंस तू.
अभिमान वाटतो तुझा खूप.
देवाचे लक्ष लक्ष आभार.
तू माझ्या आयुष्यात आलास..
आई म्हणायची ते अगदी खरं...
"नशीब काढलन् पोरीनं"
खरंच नशीबवान आहे मी.
आठवतंय तुला..
घरी आलास की तू माझ्या डोक्यावर,
तुझी कॅप ठेवायचास..
"मेजर विक्रम रिपोर्टींग सर..."
आणि कडक सॅल्यूट.
आयुष्यातले मूठभर सोनेरी क्षण कसे विसरेन मी...?
धुमसतं बर्फ लहान असल्यापासून बघत्येय मी.
माझा जन्म इथलाच.
काश्मीरमधलाच.
दहशतीच्या वादळानं ऊद्ध्वस्त झालेलं नंदनवन,
जवळून बघितलंय मी.
भारतीय सैन्याचं बलिदान,
सैन्यानं दिलेला मदतीचा हात,
शिक्षणाची दाखवलेली नवी वाट.
क्षितीजावर ऊगवणारी नवी पहाट.
कशी विसरेन मी ?...
मनाशी ठरवलं होतं..
शिकायचं.
खूप शिकायचं.
शिकले.
छान नोकरीही मिळाली...
आणि तू माझ्या आयुष्यात आलास.
एक विस्फोट.
अगणित स्वप्नांची राख करून गेला.
तू न सांगता निघून गेलास..
तुझ्या आठवणीनं आभाळभर रडले.
मग माझं मलाच पटलं.
तू गेला नाहीस.
तू आहेस...
माझ्यात चिरंतन निरंतर..
माझा प्रत्येक श्वास तुझाच.
तेव्हा वाटलं...
हे माझं आयुष्य माझं नाहीये.
सगळं काही तुझंय.
ठरलं...
मी कशी आवडेन तुला ?
तुझं ऊत्तर मला ठाऊकेय.
अर्थात आर्मी युनिफाॅर्ममधे...
तुझे आईबाबा आणि माझे आईबाबा.
सगळे पाठीशी ऊभे राहिले माझ्या.
एक वर्षाचं खडतर ट्रेनिंग.
वर्षातला प्रत्येक दिवस.
दिवसातला प्रत्येक क्षण.
माझं तन मन कणखर बनवून गेला..
पलपल तुझा सहवास, आभास जाणवायचा.
देवाकडे एकच मागणं आहे....
एक संधी मलाही दे.
विक्रमसारखी...
मीही पाय रोवून ऊभी राहीन...
संपवून टाकायचीय ही दहशत मला कायमची.
मला शक्ती दे देवा..
आज...
मी प्रचंड खूष आहे.
मीही इंडियन आर्मीच्या कुटूंबात सामील झालेय.
माझं स्वप्नं पुरं झालंय.
नव्हे तू ते माझ्याकडनं पुरं करून घेतलंयस...
खरं सांगू ?
आज तुझी खूप आठवण येतेय...
दीक्षांत समारंभ बघायला तू हवा होतास..
साॅरी..
पुन्हा या डोळ्यांत अश्र् येऊ देणार नाही..
लेफ्टनंट प्रभा रिपोर्टींग सर...!"
फोटोतल्या विक्रमला प्रभानं कडक सॅल्यूट मारला.
आणि फोटोतला विक्रम समाधानानं हसला.
जय हिंद की सेना !
ही खरी श्रद्धांजली....
प्रभा, तूच खरी इन्डियन आयडाॅल आहेस.
सलाम लेफ्टनंट प्रभा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा