मंगळवार, १७ जून, २०२५

1982. नवीन नातं

       वाराणसी पुणे गाडी हळूहळू प्लॅटफॉर्मवरून सरकू लागली. रमा आपल्या बर्थवर चादर  घालून बसली. आज ती, तिचा नवरा रमाकांतच्या अस्थी गंगेत प्रवाहित करून परतत होती.  जाताना मुलगा राकेश व सून नेहा  बरोबर होते पण परतताना ती एकटीच होती. स्टेशन वर‌  राकेश व  नेहा तिला सोडायला आले होते. राकेशने तिला त्यांच्याबरोबर लंडनला चलण्याचा खूप आग्रह धरला पण नेहाच्या स्वभावाचा मागचा अनुभव तिचे पाय मागे खेचत होता.
 तेवढ्यात गाडीने सिग्नल दिला आणि रमा एकटी परत निघाली.  तिला  रमाकांत च बोलणं आठवलं.
“मी गेल्यावर माझ्या अस्थी गंगेत प्रवाहित करा”.  
त्या वर रमा चिडून म्हणाली  “आणि जर मी तुमच्या आधी गेले तर?”
त्यावर हसुन म्हणाले की माझीच गाडी आधी सुटणार आणि खरच तसंच झालं. झोपेतच गेले. अस्थी गंगेत विसर्जनाची त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली. रमाचे डोळे भरून आले. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. रमाने खिडकीतून बाहेर नजर टाकली. गंगेचा अथांग प्रवाह ! रमाने हात जोडले. यातूनच रमाकांचा अस्थि कलश वहात गेला असेल. तिनेअश्रू पुरीत नेत्रांनी अंतिम प्रणाम केला व ती झोपली. 
      जाग आली ती लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने. तेवढ्यात कुपेचा दरवाजा खडखडला. तिने दार उघडलं एक तरुण जोडपं त्यांच्या कडेवर एक दहा अकरा महिन्याचे बाळ.  त्या तरुणाने  बर्थ खाली सामान लावले. ती तरुणी बाळाला मांडीत घेऊन थोपटत होती पण ते रडतच होते.  सामान जमवून त्यानी  बाळाला घेतले व दुधाची बॉटल त्तोंडाला लावली दूध पिऊन बाळ झोपले. ते दोघे  ही झोपले. रमाला त्या लहान बाळाला पाहून मनात आलं राकेश आणि नेहा ने जर मनावर घेतलं असतं तर अश्याच एक तान्ह्या बाळाची ती आजी झाली असती.  सकाळी सकाळी रमाला जाग आली ती टॉयलेटला निघाली. पाहिलं तर तो तरुण बाळाला फिरवत होता तेवढ्यात गाडी थांबली. 
बाहेर पाहून ती तरुणी म्हणाली ‘राहुल अरे याच्यासाठी दूध पहा’
तो तरुण उतरला व दूध घेऊन आला बरोबर थर्मस मध्ये चहा. रमालाही आता चहा प्यावासा वाटू लागला तेवढ्यात समोरच्या तरुणांनी चहाचा एक कप तिच्यासमोर धरला.” घ्या ना काकू चहा तुमची झोप डिस्टर्ब झाली असेल ना सोनूच्या रडण्याने ?”
“नाही नाही तसं काही नाही” म्हणत रमाने चहा घेतला.
“ प्रीती चहा ? त्याने वरच्या बर्थ वर बसलेल्या तरुणीला विचारले?"  प्रीती  मानेने नकोम्हणाली.
‘तू झोप प्रीती ,मी पाहतो सोनुला म्हणताच ती  झोपली.
 बाळ किरकिरत होतं दुधाला तोंड लावत नव्हतं रमाने पर्स मधून बिस्कीट काढून त्याला दिले ते  खाऊ लागलं. मांडीत बसून कंटाळल असावं कारण ते सारखं खाली उतरत होतं आणि त्या तरुणाला त्याला सांभाळणे फार कठीण होत होते. रमाने वर झोपलेल्या प्रीतीकडे पाहिलं ! 24- 25 वर्षाची आई तर झाली पण आईपणाचा कोणताच भाव तिच्या चेहऱ्यावर, वागण्यात दिसत नव्हता. रमाला आश्चर्य वाटलं बाळ इतकं रडत असताना आई इतकी घनघोर कशी झोपू शकते?  मग रमाने बाळाला आपल्या मांडीवर घेतलं त्याच्या जावळांवर हात फिरवत त्याला थोपटत गुणगुणायला लागली तसे ते गाढ़ झोपी गेल.
“काकू कुठे उतरायचे तुम्हाला? तरुणांना विचारलं?” 
‘जळगाव ‘.
अरे वा आम्ही पण तिथेच.  सोनुला रमाच्या  मांडीवरूनबर्थवर ठेवून तो म्हणाला.
 थोड्याच वेळात  सोनू परत रडायला लागला .आता तो तरुणही त्रासला,’ बहुतेक यांनी शी केली वाटतं.!’
 रमा उठली व बाळाचे डायपर बदलण्यात त्याची मदत करत म्हणाली” आईबाप होणं म्हणजे फार मोठी जबाबदारी असते  ख़ासकर आईची जास्त “!
“हो काकू, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण् आमचा अजून लग्न नाही झालं !”
‘म्हणजे ? मग हे बाळ? लग्न न होताच..?
 “नाही- नाही तसं नाही ! हा माझ्या भावाचा मुलगा आहे!’
‘मग ह्याचे आईबाप?’
 मी राहुल आणि ही प्रीती. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. एक महिन्यांनी आमचे लग्न आहे.
  दोन दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये फोन आला. माझ्या मोठ्या भावाचा नी वहिनीचा स्कूटर एक्सीडेंट झाला. तो दवाखान्यात आहे. मी प्रीतीला सांगून लगेच निघणार तेव्हा प्रीती म्हणाली मी पण चलते. आम्ही टॅक्सी करून घाई घाईने पोचलो.  धावतपळत दवाखान्यात गेलो वहिनी ऑन द स्पॉट गेली  होती. भाऊ पण क्रिटिकल.  पण, पहा ना देवाची काय मर्जी बाळाला एक साधा ओरखाडा  ही आला नाही. ते दूर जाऊन पडलं होतं !
 मला पाहताच दादा रडू लागला जणू माझ्या भावाचा जीव माझीच वाट पहात होता.  तो म्हणाला आता या सोनूला कोण? 
 मी त्याच्या हातावर हात ठेवत म्हटलं “मी आहे ना” ,
तेवढ्यात प्रीतीने सोनूला कडेवर घेत म्हटलं” दादा आज पासून सोनू आमचा मुलगा.”
प्रीतीचे आश्वासक शब्द ऐकून दादा की काळजी दूर झाली असावी आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज आम्ही त्यांचे अंत्यसंस्कार करून परत जातो आहे . बोलता बोलता राहुल चे डोळे भरून आले.
‘पण तुमच्या वहिनीचे माहेरचे कोणी?’
 एक भाऊ आहे पण् .
रमा समजून गेली. तिला आपल्या विचाराची लाज वाटू लागली. प्रीती बद्दल काय मत होते? एक अशी आई जिला आपल्या बाळाचा नीटपणे संभाळ ही करता येऊ नये?  पण प्रत्यक्षात प्रीती एक दृढ निश्चयी तरुणी आहे जी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची  कठीण प्रसंगी मनापासून साथ देत आहे. अजून लग्नही झाले नाही आणि बाळाची जबाबदारी ?आपल्या मधु चंद्राच्या दिवसात बाळाचे डायपर बदलण्यात घालवणार ! आणि तेही मनापासून. सोनूच काय? त्याला त्याची आई आठवत असेल कां? तरीच रात्री रडत होता. विचार करता करता रमाच्या डोळ्यात पाणी आले .
 तासाभराने प्रिती खाली उतरली.” ह्यानी त्रास दिला ना?
 ‘नाही ग, खूप गोड आहे तुझा मुलगा सोनू!’
 काकू तुम्ही एकट्याच? तुमच्या घरचे ?
रमाने रमाकांतच्या अस्थि विसर्जना बाबत थोडक्यात सांगितले बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. इकडे राहुल विचार करत होता नवऱ्याच्या वियोगाचे दुःख बाजूला ठेवून काकू आपली मदत कराल तत्पर. काय योगायोग नाही?
दुपारचे बारा वाजले होते . वेंडर जेवण घेऊन आला ते पाहून सोनू रडायला लागला.
“अरे हे तर सगळेच तिखट आहे हा काय खाईल ?”प्रीती ने  जेवण पहात म्हंटले !
दूध आहे न रमा ने विचारले 
 हो.
दे मी याला  खाऊ घालते म्हणत रमा ने पोळी कुस्करून दुधात मिसळून सोनू ला ‘एक घास चिऊ चा, एक घास काऊचा ‘म्हणत खाऊ घातले सोनू ही मजेत खात होता. 
सोनूच  पोट भरलं तशी तो पेंगायला लागला. प्रीती ची जेवण ही झाले च होते तिने त्याला मांडीवर घेऊन झोपवलं.
मग रमानेही खाऊन घेतले. गाडी  ची स्पीड कमी होताना पाहून “प्रीती जळगाव जवळच आल आहे, सामान गोळा करत राहुल म्हणाला !
“ काकू तुम्ही कुठे राहता? आम्ही तुम्हाला सोडून पुढे जाऊ.  तुमचा फोन नंबर द्या प्रीतीने काकूंना वाकून नमस्कार करत म्हणाली” 
"आम्हाला आशिर्वाद द्यायला,नक्की या.” मी फोन करेन.
‘'म्हणजे काय येईलच. आजी हवी ना त्याला सांभाळायला." राहूल  हसत म्हणाला.
रमाला जाणवले जुने संबंध सुटले पण नवीन नात्याची  सुरुवात झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...