बुधवार, ११ जून, २०२५

1948. सत्संग कशाला ?

अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न-: "हा सत्संग कशाला.??? जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :
" पार्था, मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त परिणाम वेगवेगळे आहेत.."
तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल, तर दुसरा ८४ फेर्‍यामध्ये अडकेल.."
विष  काय आहे?
भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले. "जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकत असो गर्व असो. पैसा असो. भूक असो."
"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते. सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही."
 
सुखाचे १७ पाऊले
❗जाग येता पहिल्या प्रहरी हळुवार डोळे उघडावे... १

❗मग  उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे... २

❗अंथरुणातून उठताक्षणी देवाला नमावे... ३

❗ध्यानस्थ होऊ भगवंताला आठवावे... ४

❗देवाचरणी बसावे... ५

❗काही न मागता त्यालाच सर्व अर्पावे... ६ 

❗घरांतून निघता बाहेर आई वडिलांना नमावे... ७ 

❗येतो असा निरोप घेऊन मगच घर सोडावे... ८

क्षणभर दाराबाहेर थांबून देवाला स्मरावे... ९

❗समाधानाचे भाव आणून मगच मार्गस्थ व्हावे... १०

❗चेहऱ्यावर स्मित हास्य नेहमी बाळगून चालावे..११

❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आनंदाने पहावे... १२

❗जगात खूप भांडण तंटे आपण शांत राहावे... १३

❗सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ धरावे... १४

❗जीवन हे मर्त्य आहे नेहमी लक्षात असावे... १५

❗प्रत्येक क्षण हेच अंतिम जीवन हेच मनी ठसवावे... १६

❗सत्याने वागून नेहमी जीवन आपुले जगावे... १७

🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...