घर, संसार आणि लग्न या यापलीकडे सुद्धा तिचं एक वेगळं जग असू शकतं, ती तिच्या स्वप्नांना पंख देऊ शकते जर घरच्यांची योग्य साथ असेल तरच मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पायलट रितू राठी तनेजाची कहाणी सांगणार आहेत. जी त्यांनी नुकतीच ह्युमन्स ऑफ बॉम्बे सोबत खास संभाषणात सांगितली. या खास संभाषणात रितूने तिच्या यशामागील संपूर्ण कथा शेअर केली. चित्रपट 'दंगल' मधील म्हारी छोरियां छोरोंसे कम हैं के' ने या डायलॉगमुळे बर्याच मुलींचे आयुष्य बदलले. आज आम्ही तुम्हाला अशा यशस्वी मुलीची कहाणी सांगणार आहोत जी पेशाने पायलट असून एक यशस्वी युट्यूबरही तसेच दोन वर्षाच्या मुलीची आईही आहे.
रितू तिची कहाणी सांगतेवेळी म्हणते की, आयुष्य जितके सोपे दिसते तितके सोपे नाही. त्यांनी सांगितले की आपण अशा समाजात राहत आहोत जिथे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्याची सुरुवात प्रथम घरातून केली जाते. आपण अश्या समाजात राहतो जिथे लोक मुलीला ओझं समजतात, अशा समाजात वेगळी ओळख निर्माण करणे खूप अवघड आहे.
रितू राठी तनेजा स्वत: बद्दल सांगते की, मला शिकायचे होते. तिच्या आई-वडिलांना यात काहीच अडचण नव्हती, परंतु तिचे नातेवाईक संतप्त होते कारण की मुलीला शिकवण्यापेक्षा तिचं लग्न केलेलं चांगलं आहे. त्यांचे असे म्हणणे होते की मुलगी शिक्षण घेऊन काय करणार? पण रितूच्या आई-वडिलांनी तिला शाळेत पाठवण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि तिला जे काही करण्याची इच्छा होती ते तिला दिले, किंवा असे म्हणा तिला तिच्या आयुष्यात जे काय साध्य करायचे होते ते करू दिले.
शाळेत रितूच्या मित्राने तिला पायलट व्हायला सांगितले. आणि मग या कल्पनेवरच तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रितू सांगते की लहानपणापासूनच मी पायलट होण्याचे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर “मी अमेरिकेत पायलट प्रशिक्षण घेण्यासाठी फॉर्म भरला. त्यात प्रवेशही मिळाला परंतु मुलीला घराबाहेर एवढ्या लांब अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पाठवायला आई-वडिलांना भीती वाटत होती.
पण रितूने वडिलांना समजावून सांगितले की तुम्ही माझ्या लग्नासाठी दिलेली रक्कम माझ्या शिक्षणासाठी द्यावी तसेच रितूने वडिलांना वचन दिले की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल. रितूच्या आई-वडिलांचा तिच्यावर खूप विश्वास होता. या विश्वासामुळेच त्यांनी तिला परदेशी प्रशिक्षणासाठी पाठविले. त्याचवेळी, नातेवाईकांनी सांगितले की ती परदेशी जाऊन मुलांबरोबर राहील, यापेक्षा हिचे लग्नच करणे चांगले असेल.
रितू म्हणाली, 'दीड वर्षाच्या प्रशिक्षणातून जेंव्हा मी भारतात परतले तेंव्हा माझ्या आयुष्यात एक विचित्र वळण आले मला नोकरी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर मेंदूच्या रक्तस्रावामुळे माझ्या आईचा मृत्यूही झाला. त्यावेळी माझे कुटुंब पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. दुसरीकडे, नातेवाईक म्हणू लागले की आम्ही म्हणालो होतो की मुलीला बाहेर पाठवू नका. नोकरी मिळणार नाही.
जेंव्हा वडील पूर्णपणे कर्जात बुडले होते तेंव्हा आई मरण पावली. आमच्या कुटूंबावर बरेच कर्ज होते. मग मी पार्ट टाईम जॉब करू लागले आणि नोकरी सोबतच - दररोज 7 तासापर्यंत अभ्यास करत राहिले. त्यानंतर सह-वैमानिक नोकरीसाठी मला एअरलाइन्सचे ऑफर पत्र आले. 4 वर्षात मी किमान 60 उड्डाणे घेतली आणि माझी पदोन्नती झाली आणि मी कॅप्टन बनले. आणि त्यानंतर मी ज्या संधीची वाट पाहत होतो ती आली. प्रथमच जेंव्हा मी कॅप्टनच्या आसनावर बसले तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता.
नोकरीवर असताना मी माझ्या नवऱ्याला भेटले, बर्याच दिवसांपासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो, नंतर आम्ही लग्न केले. आणि आज आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की रितू पायलटही आहे आणि एक यशस्वी यूट्यूबरही असून तिचे 30 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पुढे रितू सांगते की आज माझे वडील एखाद्याला अगदी स्पष्टपणे सांगतात की माझी मुलगी पायलट आहे.
Ritu Rathee Taneja

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा