शनिवार, २३ मे, २०२६

2845. आई ही आई असते

 ● आयझॅक-न्यूटनची आई : (ज्यांनी सफरचंद खाली का पडते यावरून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.) पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
● आर्किमिडीजची आई : (ज्यांनी पाण्यातील पदार्थाच्या वस्तुमानाचे तत्व सांगितले आणि एखादी गोष्ट साध्य केल्यावर त्यांना युरेका युरेका म्हणायची सवय होती. ) गाढवा ! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
● एडिसनची आई : (ज्यांनी विजेच्या बलाचा शोध लावला.) अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं !
● जेम्स वॅटची आई : (ज्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला.) सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या ! गॅस बंद कर आधी तो !
● ग्रॅहम बेलची आई : (ज्यांनी फोनचा शोध लावला.) ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
● मोनालीसाची आई : (चित्रकाराने काढलेले पहिले महिला चित्र) तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय !
● गॅलेलियोची आई : (ज्यांनी दुर्बिणीचा शोध लावला) मेल्या ! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
● कोलंबसची आई : (ज्यांनी व्यापार करणेसाठी कायम जहाजातून समुद्राचा प्रवास केला आणि अमेरिका शोधून काढली.) कुठे ही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
● मायकल अँजेलोची आई : (प्रसिद्ध चित्रकार होते) इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं !
● बिल गेट्सची आई : (ज्यांनी कॉम्पुटरचा शोध लावला.) दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते.
● फॅरेनहाइटची आई : (ज्यांनी तापमान मोजायचे मशीन तयार केले.) त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
आणि शेवटी..
● अलबर्ट आईनस्टाइनची आई : (ज्यांनी अणुबॉम्बचा शोध लावला आणि ज्यांचे केस कायम विस्कटलेले आणि लांब असायचे.) कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...