शनिवार, २३ मे, २०२६

2810. लॉजिक व्यवसायाचे

 जग तुमच्या मूडवर चालत नाही, ते नियमांवर चालते.
एकदा एक गुरु आणि नंतर विद्यार्थीझाडाखाली बसले होते. ते झाड सफरचंदाचा होतं .
त्यावरील एक सफरचंद खाली पडलं.
त्या गुरुंनी ते सफरचंद उचलून त्याला दाखवलं .
तर तो शेजारी बसलेला विद्यार्थी हसत म्हणाला, “यात विशेष काय? सफरचंद रोजच पडतात.”
गुरु शांतपणे विचारतात, “ते खालीच का पडलं? बाजूला का नाही? वर का नाही?”
विद्यार्थी गप्प झाला न्यूटनचा उल्लेख करून सांगितलं की न्यूटनने "गुरुत्वाकर्षणाचा नियम" सांगितलेला आहे.आणि त्यानुसार ते सफरचंद खालीच पडलं .
गुरु म्हणाले, “आपण रोज घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण त्यामागे काहीतरी ठरलेला नियम असतो. जो तो नियम समजतो, तो पुढे जातो.”
हा मुद्दा व्यवसायालाही तितकाच लागू होतो.
ग्राहक कमी का येतात?
काही प्रॉडक्ट जास्त का विकले जातात?
काही कर्मचारी नेहमी चांगलं काम का करतात?
काही जाहिराती चालतात आणि काही का फसतात?
या सगळ्या गोष्टी नशिबाने होत नाहीत. त्यामागे कारणं असतात.काही नियम असतात .
पण आपण त्याच लॉजिकली विचार करणे ऐवजी इमोशनली विचार करतो .
मूड नुसार काम करतो .
अनेक व्यावसायिक भावना पाहून निर्णय घेतात आज मूड नाही, म्हणून काम सावकाश पणे .
राग आला, म्हणून कर्मचाऱ्यावर ओरड;
भीती वाटली, म्हणून ऑफर बंद कर .
असल्या गोष्टी रोज केल्या जातात .
पण बाजार भावना पाहत नाही,बाजार नियमांवर चालतो.
जसं सावली प्रकाशामुळे तयार होते, तसं परिणाम काही कारणामुळे तयार होतात.
कारण समजलं तर परिणाम बदलता येतो.
व्यवसायात हुशारी म्हणजे मोठ्या आयडिया नाहीत.
हुशारी म्हणजे साध्या गोष्टींमध्ये पॅटर्न ओळखणे.
म्हणून पॅटर्न ओळखायला शिका !
दररोजच्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या:
ग्राहक दुकानात येतो तेव्हा त्याचं पहिलं लक्ष कुठे जातं?
कर्मचारी वेळेवर का येत नाही?
एकाच ऑफरला काही जण प्रतिसाद देतात आणि काही नाहीत, का?
जो “हे असंच का होतं?” हा प्रश्न विचारतो, तो व्यवसाय वाढवतो.
भावना मोठ्या आवाजात असतात.
पण सत्य शांतपणे नियम पाळत असतं.
व्यवसाय वाढवायचा असेल, तर प्रत्येक परिणामामागचा नियम शोधा.
मग यश नशिबावर नाही, तर समजुतीवर उभं राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...