ही काही ईंजेक्शन्स् व गोळ्या लिहिलेल्या आहेत. त्या पटापट घेऊन या. अतिशय गरजेचं आहे. वेळ घालवू नका. - सिस्टरच्या आनाजाने तो भानावर आला. शून्यात हरवून, गेल्या चोवीस तासांपूर्वी घडलेल्या घटनांचा तो विचार करत बसला होता. दुहेरी व असह्य दडपण मणामणाच्या वजनाने डोक्यावर, मनावर वर्चस्व गाजवत होतं. सगळं सुखात व मस्त चाललेलं. अचानक परिस्थिती बदलली.. विश्वासही बसत नव्हता,असं काही होऊ शकेल.
तो विचारही करू शकत नव्हता.
एक मुलगी अन् नवरा बायको.
छान संसार चाललेला.
हा गुजरातला कामाला.. महाराष्ट्रात,मुंबईत छान थ्री बिएचकेचा आलिशान वस्तीत आलिशान फ्लँट. पैसा ,स्थावर जंगम मालमत्ता. सर्व सर्व होतं. कशाचीच ददात नव्हती.
पण आता या क्षणाला,सारं भयाण होतं.
सारं..!!
बायको आय सि यु त अँडमीट होती.
तीला मेजर अँटँक आलेला.
ईतका की जबरदस्त.
रोजच्या रोज वाँक घेणारी, डायेट फाँलो करणारी त्याची पत्नी, आज जिवन मरणाच्या ऊंबरठ्यावर होती.
डाँ. च्या मते हा सिव्हीयर अटँक होता. ह्रदय ईतकं कमकूवत झालेलं या अँटँक ने की जगायच्या आशा जेमतेम दहा टक्केही ऊरल्या नव्हत्या. ईतका तो भयानक अटँक होता.
सिस्टर ने लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसार गोऴ्या ईंजेक्शनस् आणायला तो धावतच सुटला.
त्याचं आयुष्य पणाला लागलेलं.
असं काय घडलं होतं ?
अन् ईतका सिव्हियर अँटँक!! ईतक्या कमी एज ला कसा आला..?
येऊ शकतो.. नाही असं नाही ..
पण कसं झालं हे?
काही घडलं होतं का?
त्यांची मुलगी कूठं होती?
जिन्याच्या पायऱ्या ऊतरताना अस्वस्थता मनाचा तळ गाठत होती.कमालीचं दडपण मनावर होतं.
डोळ्यांतलं तळं ओसंडून वहात होतं.
चार मजले खाली ऊतरून येईतोवर ,कालचा प्रसंग आठवत होता.
जूई , लाडाची लेक.कमालीची हूशार.दहावीत येई पर्यंत कधीच ९७ % हून कमी मार्क आले नव्हते.मग अपेक्षांची माळ जड झाली.
दहावीला महाराष्ट्रात प्रथम यायचं अन् अभियांत्रीकी ला प्रवेश घेणं ते ही व्हि जे टि आय ला... तिचं टार्गेट ठरलं.
व्हिजेटिआयला प्रवेश घ्यायचा व तो ही तिच्या आवडत्या केमीकल शाखेत, तर अबोव्ह ९८ हवेत. कारण तिथे केमीकल शाखा स्पेशल होती. तिचाही केमेस्ट्री फेवरेट विषय होता. स्पर्धेच्या युगात, तिचं दडपण वाढत होतं.
अर्थात आई वडिलांनी कधीच असं कोणतच ओझं लादलं नव्हतं तिच्यावर. कधीच नाही.
पण तिचं तिने ठरवलं होतं. तसा अभ्यासही चालू होता. पण मागील सेमिस्टर मधे तिचे मार्कस् कमी आले. कूठे तरी चूकलं होतं. हिंमत न हारता तिने चूकांवर मात मिळवायचं ठरवलंच होतं. पण संवेदनशील स्वभाव तिच्या मनात न्युनगंड निर्माण करत होता. मागील सेमिस्टरचे मार्कस् तिला मानसिकतेने, खाली खेचू पहात होते.
यातच तिच्या मनाची घालमेल वाढली.
अभ्यासातलं लक्ष कमी होऊन,गुण नाही मिळालं तर काय होईल ? हे विचार फेर धरू लागले. जूई याच विवंचनेत राहू लागली. बाबा बाहेर असायचे पण आईने या गोष्टी मार्क केल्या. ती जूईशी या विषयावर बोलू लागली, समजाऊ लागली पण तितकासा परिणाम होत नव्हता. जूईला समजावलं होतं, आम्हाला तू हवी हवीस, गुण नंतर. बाबाही हेच सांगायचे, पण ती तेवढ्या पुरती हो हो म्हणायची. नंतर परत तेच विचार तिला खात रहायचे. यातच तिची हार झाली.
अभ्यासावर चं लक्ष ऊडून, आपण ईतके मार्कस् मिळवू शकणारच नाही, असा न्युनगंड मनात निर्माण होऊ लागला.
तिच्या मनाने कच खाल्ली. आणि एका नाजूक क्षणी, तिने फार चूकीचं पाऊल ऊचललं.
काय विचार केला देवास ठाऊक..
आपण गूण मिळवू शकत नाही..!!
ईतरांनी ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आई बाबा किती चालेल म्हणाले तरी कमी गूण मिळालेले त्यांना सहन होणार नाही. आजवरचं माझं नाव खराब होईल. असे काहिसें चूकीचे विचार तिच्या नाजूक मनावर मात करण्यात यशस्वी झाले.
कालच्याच दिवशी तिने , तिच्याच स्कूल मधल्या केमीकल लँब मधलं एक विशिष्ट केमीकल मिळवून ,आपल्या रूम मधे ते पाण्यात टाकून घेतलं. ते केमीकल ईतकं जहाल असतं की माणूस दहा मिनीटांत श्वास कोंडून आपला जीव गमावतो. अन् झालं ही तेच. रूम आतून बंद करून तिने तो प्रयोग स्वत:वर केला. एका गूणी मूलीचा ,लढायच्या अगोदरच पऱाभव झाला. दार तोडलं तेंव्हा वेळ हातची गेलेली. तोंडात फेस येऊन मरण पावलेली आपली लेक, क्षमाला, जूईच्या आईला पहावलीच नाही.
कोणत्या आई ला पहावेल?
ईतकं सोपं असतं?
मनात आलं जीव दिला.
काय मस्करी आहे ही?
लढायच्या अगोदरच हारायचं?
ईतका स्वार्थी विचार करायचा?
आपल्या मागे आपल्या आई बाबांचं काय होईल? साधा विचार नाही आला?
ईतक मतलबी व्हायच?
का मूलं विचार नाही करत?
ईतका ईगो महत्वाचा? आई बाबांपेक्षा?
नाही मिळाले मार्कस्..काय फरक पडतोय?
आपण गेलो तर..आई बाबा रहातील जिवंत?
जूईचं हेच चूकलं.
क्षमाला पहावलच नाही. सहनच नाही झालं. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसला.
क्षणात जणू कोणीतरी ह्रदय पकडून पिळवटून टाकतय असा भास झाला. वेदनांची परिसिमा गाठली गेली.
एक सिव्हियर अँटँक तिच्या आईला तिथंच आला.
कोसळून पडली ती.
थोडे हातपाय आपटले गेले.
पाचव्याच सेकंदाला ती शुध्द हरवून बसली.
शेजारी पाजाऱ्यांनी ,ज्यांनी दार तोडायला मदत केली होती, तीला अँडमीट केली.
जूईच्या बाबांना फोन गेला.
पोलीस आले..
पंचनामा,पोस्टमाँर्टेम..
सोपस्कार पार पडू लागले अन् ईकडे क्षमा आय सि यु त जमा.
जिवन मरणाच्या ऊंबरठ्यावर.
जणू त्या अवस्थेतही ती आपल्या जूई ला पहात होती. धाय मोकलून रडत होती.
होत्याचं नव्हतं झालं क्षणात.
का..?
अगं का हो..?
नकोत आम्हाला मार्कस्..
नकोत काही.
फक्त तू हवीस बाबू.. फक्त तू..
नको ना जाऊ बाबू...
क्षमा जणू , बेशुध्दावस्थेतही ओरडून जूईला सांगत होती.
संजय.. जूईचे वडिल, जिना ऊतरताना सारं आठवत होते.
मूलीचं कालच जाणं..
तो शोक करू ?
की आपल्या बायकोला वाचवू?
किती मी कमनशिबी बाप व नवरा आहे..?
ना पोरीला वाचवू शकलो ना तिचे अंत्यविधी नीट करू शकत..
ईकडे बायको मरणाच्या वाटेवर..
काय पाप केलं की हे सारं वाट्याला आलं..?
ही जखम भरू शकेल?
पोरीशिवाय जगणं शक्य होईल?
काय हा विचार केला पोरीने !!
आम्हाला काय गूण अधिक होते? पोरीपेक्षाही..
थरथरत्या हाताने त्याने प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी मेडीकल मधे दिली.
गोळ्या घेऊन ,धावत पऴत चौथ्या मजल्यावर पोचेतोवर, त्याचा ही बिपी शूट झाला होता.
गोळ्या सिस्टर कडे द्यायला गेला..
तो अक्षरश: धापा टाकत होता.
ती मान खाली घालून बाजूला झाली..
"स सिस्टर ग गोळ्या घ्या..ना !! "
तोच डाँक्टर बाहेर आले.
"आय एम साँरी मिस्टर पानवलकर, तूमच्या मिसेस ला वाचवू नाही शकलो. गोळ्या येईतोवर दूसरा सिव्हियर अँटँक आला..
तो सर्व संपवून गेला. अखेरचं एकच वाक्य बोलल्या त्या.. जेमतेम..
"संजय, अहो, असं का केल जूईनी?"
हात पाय लटपटलेला संजय, क्षणात जमीनीवर कोसळला...
कदाचित कायमसाठी...
©दिप्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा